MH 04 Media

MH 04 Media News, Media & Entertainment
(2)

02/02/2025

शिवसेनेचे खासदार "नरेश म्हस्के" भाजपासाठी दिल्लीच्या मैदानात..

शिवसेनेच्या खासदारांकडून दिल्लीत विधानसभेत दारोदार संपर्क करून भाजपचा प्रचार. मतदारांच्या भेटीगाठी सुरू.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या आवाहनानंतर मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने भाजपचे मित्रपक्ष म्हणून शिवसेना दिल्लीत गृहसंकुल, प्रतिष्ठित नागरिक यांच्याशी संपर्क साधत आहेत …
बवाना विधानसभा मतदारसंघात उमेदवार रविंदर कुमार (इंद्राज ) यांच्यासाठी खासदार नरेश म्हस्के प्रचार अभियानात...
घरोघरी ,गृह संकुल ,ज्येष्ठ नागरिक मतदारांशी संपर्क साधून डबल इंजिन च्या सरकारची दिल्ली च्या विकासा साठी असलेली गरज समजावून सांगत प्रचार यात्रा

02/02/2025

"जितेंद्र आव्हाड" यांची महत्त्वाच्या विषयांवर पत्रकार परिषद

02/02/2025

सगळ्यात मोठ्या विकासकाकडून ठाणेकरांची फसवणूक, F scam आहे तरी काय..? सर्व रहिवासांनी रस्त्यावर उतरून एकत्रित केले निदर्शनं..!

01/02/2025

उत्तर भारतीय समाजाचे ठाणे जिल्ह्याचे नेतृत्व "संजय झा" यांच्या माध्यमातून श्री राम कथेचे आयोजन..

01/02/2025

स्वामीभक्त "महेश कदम" यांनी
कर्करोगासाठी केली आर्थिक मदत,"शिवराम भोसले" यांनी मानले आभार..!

01/02/2025

"वंदे भारत संघ" आयोजित ठाणे महोत्सव श्री माघी गणेशोत्सव भव्य सोहळा..!
आयोजक:- संदीप लेले (भाजप महाराष्ट्र- सचिव, मा.नगरसेवक)

01/02/2025

मुंबई बीकेसी परिसरात लागली भीषण आग; गॅस सिलेंडरचा झाला स्फोट.. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू..!

01/02/2025

शिवसेना ठाणे शहरप्रमुख "हेमंत पवार" यांनी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यातील त्रिवेणी संगमात केले शाही स्नान..!

01/02/2025

समस्त ठाणेकरांच्या वतीने बजेट चे स्वागत ..राष्ट्रपतींच्या भाषणात ठाण्याचा उल्लेख,अभिमानाचा क्षण..खासदार "नरेश म्हस्के" यांनी दिली प्रतिक्रिया..!

माघी गणेशोत्सव जयंतीनिमित्त शिवसेना आमदार "रवींद्र फाटक" यांनी सिद्धिविनायक मंदिर येथे श्रीगणेशाचे घेतले दर्शन..!
01/02/2025

माघी गणेशोत्सव जयंतीनिमित्त शिवसेना आमदार "रवींद्र फाटक" यांनी सिद्धिविनायक मंदिर येथे श्रीगणेशाचे घेतले दर्शन..!

01/02/2025

हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार संघटनेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त हिंदुस्तान माथाडी कामगार चषक २०२५..!
आयोजक:-हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार संघटना.

01/02/2025

ठाण्यातील नौपाडा एम.जी रोड मार्गावर गेल्या तीन दिवसांपासून गटाराचे चेंबरमधून वाहणाऱ्या सांडपाण्याची ठाणे महापालिकेकडून साफसफाई करण्यात आली..!

31/01/2025

"वंदे भारत संघ" आयोजित ठाणे महोत्सव श्री माघी गणेश आगमन सोहळा..!
आयोजक:- संदीप लेले (भाजप महाराष्ट्र- सचिव, मा.नगरसेवक)

पर्यावरण संवेदशनशिल क्षेत्रातील इमारत बांधकाम परवानग्या आता राज्य शासनाकडून मिळणार  गेली 6 महिने रखडलेले अनेक नवीन आणि प...
31/01/2025

पर्यावरण संवेदशनशिल क्षेत्रातील इमारत बांधकाम परवानग्या आता राज्य शासनाकडून मिळणार

गेली 6 महिने रखडलेले अनेक नवीन आणि पुनर्विकास प्रकल्प लागणार मार्गी

खासदार नरेश म्हस्के ,शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांच्या प्रयत्नांना यश

ठाणे - इमारत बांधकाम, टाऊनशिप आणि नागरी, प्रादेशिक विकास प्रकल्पांसाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने 29 जानेवारी 2025 रोजी एक अधिसूचना जारी करून दिलासा दिला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई , मीरा भाईंदर व राज्यातील अनेक शहरांमध्ये अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान आणि एमआयडीसीच्या 5 किलोमीटर परिघातील (पर्यावरण संवेदनशिल क्षेत्र) 20,000 चौरस मीटर ते 1,50,000 चौरस मीटर बिल्टअप विकास क्षेत्र असलेल्या प्रकल्पांना आता राज्य शासनाच्या पर्यावरण सनियंत्रण समितीकडून बांधकाम परवानग्या मिळणे सोईचे होणार आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी यासाठी केंद्रीय पातळीवर केलेल्या पाठपुराव्यामुळे ही अधिसूचना निघाली आहे.

ऑगस्ट 2024 साली राष्ट्रीय हरित लवादाच्या एका निर्णयामुळे अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान आणि एमआयडीच्या 5 किलो मिटर परिघातील 20,000 चौरस मीटर ते 1,50,000 चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या बांधकाम प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या परवानग्या घेणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. मात्र या निर्णयाबाबत संदिग्धता असल्याने गेली 6 महिने राज्यातील अनेक बांधकाम विकास प्रकल्प रखडले होते. खासदार नरेश म्हस्के, शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधत मार्ग काढण्याची विनंती केली होती.

खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश येत 29 जानेवारी 2025 रोजी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे संयुक्त सचिव रजत अग्रवाल यांनी या संदर्भात राजपत्रीय अधिसूचना जारी केली आहे. आता 20,000 चौरस मीटर ते 1,50,000 चौरस मीटर बिल्टअप विकास क्षेत्र असलेल्या बांधकाम प्रकल्पांना राज्य शासनाच्या पर्यावरण सनियंत्रण समितीकडून परवानग्या घ्याव्या लागणार आहे.

या निर्णयामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई , मीरा भाईंदर व राज्यातील अनेक शहरांतील बांधकाम विकास, नागरी प्रकल्प मार्गी लागणार आहेत. या निर्णयामुळे केवळ विकासकांना दिलासा मिळाला नसून अनेक फ्लॅट खरेदीधारक, पुनर्विकास प्रकल्पांतील रहिवासी यांचाही फायदा होणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.

यासाठी सहकार्य करणारे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पर्यावरण ,वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव ,खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे खासदार नरेश म्हस्के, किशोर पाटकर यांनी जाहीर आभार मानले आहेत.

31/01/2025

"जन जागृती प्रतिष्ठान" आयोजित भव्य पालखी सोहळा..!
गणेश नगर,मानपाडा ते सिद्धिविनायक मंदिर,दादर पदयात्रेचे आयोजन..

आयोजक:- सुमित बोराटे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,शाखा प्रमुख,आझाद नगर)

31/01/2025

ठाणे शहर भाजप सरचिटणीस "डॉ.समीरा भारती" यांच्यातर्फे आयोजित भव्य शिबीर..!

31/01/2025

शालेय पोषण आहारातून अंडी वगळल्याने "डॉ.जितेंद्र आव्हाड" यांनी जिल्हाधिकारी दालनात केले अनोख्या पद्धतीने आंदोलन..!

Address

Thane
400

Telephone

+918655552958

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MH 04 Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MH 04 Media:

Videos

Share