News marathi baana

News marathi baana लढूया मराठी अस्मितेसाठी...
आपला आवाज आपली वृत्तवाहिनी

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, महासचिव विश्वासराव आरोटे, राज्य संघटक संजय भोकरे,कोकण वि...
17/07/2023

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, महासचिव विश्वासराव आरोटे, राज्य संघटक संजय भोकरे,कोकण विभागीय अध्यक्ष नितिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक १७ जुलै २०२३ रोजी पत्रकारांनी ठाणे जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री सचिव, ठाणे यांना मुख्यमंत्री, जिल्हा माहिती अधिकारी ठाणे यांच्या नावे निवेदन देऊन, अधिस्वीकृती समितीवर धर्मादाय, न्यास अंतर्गत नोंदणी असलेल्या सेवाभावी संस्थांना पत्रकार संघटना गृहीत धरून केलेल्या चुकीच्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी केली यावेळी ठाणे शहर अध्यक्ष जितेंद्र पाटील, उप‍ाध्यक्ष सुबोध कांबळे, मिनल पवार, सल्लागार सतिशकुमार भावे, राजन पाटील, प्रसिद्धी प्रमुख अमित गुजर, संदीप पालवी, कार्यकारी सदस्य किरण अन्वेकर, ख्वाजा शेख व यांच्या सह अनेक पत्रकार उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यात सोमवारी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी यांना निवेदन देण्यात येत आहे.सरकारने दखल घेऊन चुकीच्या पध्दतीने झालेल्या नियुक्त्या रद्द कराव्यात अन्यथा लोकशाही मार्गाने पण आंदोलन तीव्र करण्यातचाही निर्णय घेण्यात आला आहे.

#महाराष्ट्रराज्यमराठीपत्रकारसंघमुंबई #वसंतमुंडे

न्यासाकडे नोंदणी असलेल्या संस्थांना, संघटना गृहित धरुन अधिस्वीकृती समित्यांवर नियुक्त्यामाहिती विभागाचा अजब कारभारमुंबई(...
12/07/2023

न्यासाकडे नोंदणी असलेल्या संस्थांना, संघटना गृहित धरुन अधिस्वीकृती समित्यांवर नियुक्त्या
माहिती विभागाचा अजब कारभार
मुंबई(प्रतिनिधी)-धर्मदाय आयुक्त यांच्याकडे सोसायटी व ट्रस्ट अ‍ॅक्ट अंतर्गत नोंदणी असलेल्या सेवाभावी संस्थांना पत्रकार संघटना गृहित धरुन अधिस्वीकृती समितीवर सदस्य म्हणुन नियुक्ती देण्यात आली आहे. न्यास नोंदणीचा व संघटना नोंदणीचा स्वतंत्र कायदे आणि विभाग आहेत. असे असताना माहिती आणि जनसंपर्क विभागाने थेट पत्रकारांच्या सेवाभावी संस्थांनाच संघटना गृहित धरले आहे. याबाबत चौकशी करुन चुकीचे प्रस्ताव मंजुर करणार्‍या संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देत न्यायालयातही दाद मागणार असल्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने 11 जुलै 2023 रोजी राज्य अधिस्वीकृती व विभागीय अधिस्वीकृती समिती गठित करण्याबाबत शासन निर्णय जारी केला. प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती देण्यासंबंधी सदरील समिती निर्णय घेते. दि. 19 सप्टेंबर 2007 रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीवर एकूण 27 आणि 9 विभागाीय समित्यांवर 45 सदस्यांची नेमणूक केली जाते. पूर्वीच्या समित्यांची मुदत संपल्यानंतर मध्यंतरी महाविकास आघाडी सरकारने याबाबत कुठलाच निर्णय घेतला नाही. राज्यभरातील पत्रकारांच्या संघटनांनी सातत्याने मागणी लावून धरल्यानंतर अखेर याबाबतचा आदेश निघाला. याच आदेशामध्ये मराठी पत्रकार परिषद या संघटनेवर प्रशासक नियुक्त असल्याबाबत धर्मदाय सहआयुक्त पुणे यांनी कळवले असुन प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने संघटनेच्या सदस्यांची नियुक्ती मा. उच्च न्यायालय उक्त निकालाच्या अधिन करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या संघटनेचे राज्य समितीवर पाच आणि विभागीय समितीवर नऊ असे 14 सदस्य घेण्यात आलेले आहेत. याच पध्दतीने महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघटना तीन, महाराष्ट्र संपादक परिषद दोन, मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ एक, बृह्नमहाराष्ट्र जिल्हा वृत्तपत्र संपादक संघ एक, महाराष्ट्र दैनिक वृत्तपत्र संघटना एक आणि महाराष्ट्र साप्ताहिक वृत्तपत्र संपादक परिषद एक असे सदस्य घेण्यात आले आहेत.
धर्मदाय आयुक्त यांच्याकडे संस्था नोंदणीसाठी 1860 सोसायटी आणि 1950 ट्रस्ट कायद्यांतर्गत सेवाभावी संस्थांची नोंदणी केली जाते. तर असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या मानधन, पगार घेणार्‍या कामगारांसाठी कामगार कायदा (लेबर युनियन अ‍ॅक्ट) 1926 अंतर्गत नोंदणी केली जाते. या कायद्यांतर्गत नोंदणी असणार्‍या संघटनांनाच आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलन, मागणी, उपोषण करण्याचा अधिकार आहे. धर्मदाय यांच्याकडे न्यासा अंतर्गत नोंदणी असलेल्या संस्था या सेवा म्हणुनच काम करतात. यात रस्त्यावर उतरुन आंदोलने किंवा मागण्या करता येत नाहीत. सेवाभावी संस्था आणि श्रमिक संघटनांसाठी स्वतंत्र विभाग आणि कायदे असताना महाराष्ट्रात बहुतांशी पत्रकारांनी धर्मदाय आयुक्त यांच्याकडेच नोंदणी करुन सदरील प्रमाणपत्रे दाखल केली आहेत. माहिती आणि जनसंपर्क विभागासह सामान्य प्रशासन विभागानेही कोणतीही खातरजमा न करता काही लोकांच्या प्रभावामुळे चुकीच्या पध्दतीने अधिस्वीकृती समितीवर सदस्यांची नियुक्ती केली आहे.
मराठी पत्रकार परिषद या एकाच संस्थेच्या 14 जणांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे चुकीच्या पध्दतीने संस्थांना संघटना दाखवून सदस्यांची नियुक्ती प्रक्रिया करणार्‍या अधिकार्‍यांवर तात्काळ कारवाई करावी आणि नियमानुसार कामगार आयुक्त यांच्याकडे कामगार कायद्यांतर्गत नोंदणी असलेल्या संस्थांना प्राधान्य द्यावे. अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्‍वास आरोटे, विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी , कोकण विभाग अध्यक्ष नितीन शिंदे यांनी दिला आहे.

𝗩𝗮𝘀𝗮𝗻𝘁 𝗠𝘂𝗻𝗱𝗲 - वसंत मुंडे

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. वसंत मुंडे यांचे हार्दिक अभिनंदन !💐 #सोशलएक्सलन्सइनजर्नालिझमअव...
05/07/2023

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. वसंत मुंडे यांचे हार्दिक अभिनंदन !💐

#सोशलएक्सलन्सइनजर्नालिझमअवॉर्ड #दुबई #लोकमत #वसंतमुंडे

*सर्व माऊली भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा*
28/06/2023

*सर्व माऊली भक्तांना आषाढी
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा*

27/06/2023

गुडघ्यावरील शस्त्रक्रिया किंवा बदलण्यासाठी भारतात प्रथमच "रोबोटिक सर्जरी" टायटेन मेडिसिटी हॉस्पिटल कासारवडवली

* २५ ते ३० शस्त्रक्रिया केल्याचा दावा... रुग्णाला त्वरित अराम

वयोवृद्धांमध्ये गुडघ्याचे दुखणे वाढत चालले आहे. काहींना तर चालणेही मुश्किल होत असल्याने नाईलाजास्तव गुडघ्याची वाटी बदलण्याची वेळ येऊन ठेपते. दुसरीकडे हि शस्त्रक्रिया यशसवी होत असली तरीही १०० टक्के खात्री निश्चितच नाही. मात्र विज्ञानाने प्रगती केल्याने भारतात प्रथमच गुंघ्याची वाटी बदलण्यासाठी शतप्रतिशत खात्री "रोबोटिक शस्त्रक्रिया" असून भारतात आणि ठाण्यात प्रथमच अशा प्रकारची प्रगत शस्त्रक्रिया ठाण्याच्या टायटन मेडिसिटी कासारवडवली येथील रुग्णालयात यशस्वीरीत्या पार पाडल्याची माहिती डॉ. प्रफुल्ल अरोरा यांनी दिली. तर या अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रियेचा लाभ ठाणेकरांनी घ्यावा असे आवाहन टायटन मेडिसिटी रुग्णालयाचे संचालक अब्रार खान यांनी केले आहे.

ठाण्याच्या कासारवडवली येथील टायटन मेडिसिटी रुग्णालयात आता पर्यंत २५ च्या आसपास शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. याबाबत बोलताना डॉ. प्रफुल्ल अरोरा यांनी सांगितले. रोबोटिक शस्त्रक्रिया केल्याने निश्चितता मिळते. जेवढा भाग तेवढाच भाग रोबोटिक यंत्राच्या सहाय्याने कटिंग करण्यात येतो. त्यामुळे गुडघ्याची वाटी व्यवस्थित बसल्यास रुग्णाला अवघ्या आठवड्यात चालते फिरते आणि सीडी चढण्यास हरकत राहत नाही. तर हाताने केलेल्या शस्त्रक्रियेत आवश्यक भाग कटिंग करताना मिमी मध्ये फरक पडला तरी रुग्णाला त्रास होतो. अनावश्यक पेशी कटिंग होतात. रक्तस्त्राव होतो. मात्र रोबोटिक शस्त्रक्रियेत मात्र आवश्यक भाग कटिंग होत असल्याने अन्य गोष्टी उदभवत नाहीत असा दावा डॉ. अरोरा यांनी केला. विदेशात होणारी ही सर्जरी रोबोटिक यंत्राद्वारे निष्णातपणे करून दोन दिवसात रुग्ण चालताना पाहून आम्हाला ही आश्चर्य वाटले. अत्याधुनिक पद्धती ठाण्यात आलेली आहे. या रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी शाररिक फिटनेस महत्वाचा कुठल्याही वयाची अट नाही ठाणेकरांनी त्याचा लाभ घ्यावा. सर्वसामान्य रुग्णाला खर्च झेपत नसला तरीही रुग्णालयाच्या माध्यमातून सर्जरीसाठी एनजीओच्या माध्यमातून आर्थिक मदतीचा हातही देण्यात येत असलायची माहिती टायटन मेडिसिटी रुग्णालयाचे संचालक अब्रार खान यांनी दिली.

27/06/2023

लढूया मराठी अस्मितेसाठी...
आपला आवाज आपली वृत्तवाहिनी

27/06/2023

🔴*न्यूज मराठी बाणा*🔴

लढूया मराठी अस्मितेसाठी
आपला आवाज ..आपली वृत्तवाहिनी

Address

Court Naka
Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when News marathi baana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to News marathi baana:

Videos

Share