Thanedar - ठाणेदार

Thanedar - ठाणेदार ठाणेदार- बातमी ठाण्याच्या हिताची ! आपल बातमी स्वरूपातील व्हिडिओ किंवा फोटो आपण ठाणेदारच्या अधिकृत ई- मेल आयडी वर पाठवू शकता.. [email protected]

30/03/2024

Feed avi- thane bjp mla sanjay kelkar byte on loksabha

*भाजप आमदार-संजय केळकर- ऑन ठाणे,कल्याण आणि लोकसभा*

-----
खरं म्हणजे ही चारी जागा महायुतीच्या आहे.

पूर्वी देखील चारी लोकसभा जागा युतीच्या होत्या...

न्याय पद्धतीने जागावाटप झाल्या तर महायुतीच्या जागा निश्चितपणे येऊ शकतात

स्वर्गीय आनंद दिघे जिल्हाप्रमुख होते तेव्हा राम कापसे सेटिंग सीट शिवसेना दिली होती .आता सध्या लोकसभेमध्ये ठाणे जिल्ह्यात नऊ आमदार भाजपचे आहे आणि पाच आमदार शिवसेना शिंदे गटाचे आहेत त्यामुळे न्यायवाटप हेतूने वरिष्ठ विचार करत असतील सर्व जागा कशा प्रकारे येईल तो देखील विचारविष्ट करीत आहे ,मात्र कार्यक्रम त्यांचे मनोबळ इच्छा आहे योग्य पद्धतीने समतोल राखला या सर्व जागा यशस्वीपणे या ठिकाणी निवडून येतील..

*असं काय बाले किल्ला असा विषय नाही. भाजपचे चार आमदार या लोकसभा क्षेत्रात आहे .मात्र त्या पद्धतीने समतोल ठेवला तर घवघवीत यश मिळेल असे आम्हाला वाटते.*

वरिष्ठ लोकसभेचा निर्णय घेत असतात. पालघर ची जागा राजेंद्र गावित कमळाच्या तिकिटावर निवडून आले. शिवसेनेत गेले आणि धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले..

कोडीनेशन आणि कॉम्पिटिशन प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये असते जर योग्य पद्धतीने समतोल रखायचा असेल तर त्या पद्धतीने जागा वाटप झालं निश्चित पणे युतीला यश मिळेल

रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे ,जगन्नाथ पाटील, राम नाईक हे तेव्हा पासून आहेत

भारतीय जनता पार्टीला ही जागा मिळावी हे त्यांच्या दृष्टीकोने स्वाभाविक आहे रामतत्त्व स्वाभाविक आहे.

400 पार करण्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करणार आहे.

कोणी जागा लढावी काय करावं हे आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील.

*वरिष्ठ जे कागदावरती लिहून देतील त्या आदेशाचे आम्ही पालन करणार. योग्य निर्णय वरिष्ठ घेतील.चिठ्ठी मध्ये ज्याचं नाव असेल त्याने लढायला पाहिजे*

30/03/2024
30/03/2024

*जांभळी नाका येथील सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या देवीच्या जागराला सुरुवात*

प्रतिनिधी - दरवर्षी प्रमाणे यंदाही जांभळी नाका येथे आदिशक्तीचा जागराला लवकरच सुरुवात होणार आहे. आज आनंद चॅरीटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्रोत्सव देवीच्या मंडपाचे भूमिपूजन शिवसेना नेते, खासदार राजन विचारे व त्यांच्या पत्नी सौ. नंदिनी विचारे यांच्या हस्ते संपन्न झाले.
त्यावेळी ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, उप, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, मा. नगरसेवक मंदार विचारे, युवसेनेचे उप जिल्हा अधिकारी ठाणे शहर अर्जुनसिंग डाभी, सुरेश मोहिते, विभाग प्रमुख प्रशांत सातपुते, प्रदीप पूर्णेकर स्वप्नील शिरकर, विनायक आंबेकर, शाखाप्रमुख महेश ढोमणे, अशोक घोलप, राजेंद्र महाडिक, सुधीर बेलोसे, बाबू शेलार, दिनकर पाचंगे, उपशहर संघटक मंजिरी ढमाले, कुंदा दळवी, अपूर्वा तेलवणे, अनुराधा बाईत, वनिता कोळी, गौरी ताम्हणकर, विभाग संघटक सुनंदा देशपांडे, सौ. उषा बोरुडे, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य धनश्री विचारे, तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, युवासेना व युवती सेना मोठ्या संख्येने उपस्थित होते.

29/03/2024

ठाण्यातील आर्यन देवळेकर भारतात 54 व्या स्थानावर सी डी एस परीक्षेत उत्तीर्ण,

ठाण्याच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

ठाणे :
ठाण्यातील आर्यन देवळेकर संपूर्ण भारतात 54 व्या स्थानावर सी डी एस परीक्षेत उत्तीर्ण झाला असून तो पुढील प्रशिक्षणासाठी चेनई येथे जाणार असून प्रभाव डिफेन्स मोटिवेशन सेंटरच्यावतीने त्याचा सन्मान करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
शालेय विद्यार्थ्यांना सैन्य दलाची, शिस्त आणि परिश्रम याची आवड निर्माण व्हावी याकरिता प्रभाव डिफेन्स मोटिवेशन सेंटर, सुरू करण्यात आले आहे.लेफ्टनंट आर्यन देवळेकर हा प्रभाव संस्थेचा माजी कॅडेट आहे, आर्यन देवळेकर संपूर्ण भारतात 54 व्या स्थानावर सी डी एस परीक्षेत नुकताच उत्तीर्ण झाला असून OTA चेन्नई येथे पुढील प्रशिक्षण घेण्या करिता जाणार आहे. पण त्याच्या ह्या यशस्वी प्रवासातील सुरुवात पिडिमसीमध्ये 2012 सालीच झाली होती. 2012 ते 2015 तीन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि त्याच्या सैन्य दलात सामील होण्याचा आणि आपल्या स्वप्नांना खर करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आपल्या अथंक परिश्रमाने तो यशस्वी झाला आहे.या यशानंतर प्रभाव डिफेन्स मोटिवेशन सेंटर च्यावतीने त्याचा कौतुक सोहळा आयोजित केला होता . यावेळी त्यांच्या पालकांचा ही सन्मान करण्यात आला.प्रभाव डिफेन्स मोटिवेशन सेंटर, मेजर सुभाष गावंड आणि कमाडंट संदीप शिरगांवकर यांचीही येथे उपस्थिती लाभली.यावेळी पालकांनी मुलांची आवड लक्षात घेवून त्यांच्या पाठीशी उभे रहा त्यांना सहकार्य करा असे यावेळी मत आर्यनच्या पालकांनी व्यक्त केले.तसेच कमाडंर संदिप शिरगांवकर यांचे कौतुक केले, तर आपण ज्या देशात राहतो त्याच्या सुरक्षेसाठी काम करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.कॉर्पोरेट क्षेत्रात सहज काम मिळू शकते मात्र आर्मी मध्ये काम करण्याचे समाधान फार वेगळे असते.तरुणांनी कठोर परिश्रम आणि मेहनत करून पेशन्स ठेवल्यास नक्की त्यांची स्वप्न पूर्ण होतील असा संदेश यावेळी आर्यन देवळेकर यांनी दिला.

29/03/2024

महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात जागावाटपाच्या चर्चांची उधळण सुरू असतानाच, ठाणे शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या प्रचाराची धडाकेबाज सुरुवात केली आहे. शुक्रवारी येथे आयोजित एका धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या हायटेक प्रचाररथाचे उद्घाटन केले.

राजू पारवे यांच्या प्रचारासाठीचा हा हायटेक रथ, मतदारांच्या मनात घर करण्याच्या उद्देशाने डिजाइन केला गेला आहे. या प्रचाररथाच्या माध्यमातून राजू पारवे यांच्या विचारांचा, उपक्रमांचा आणि धोरणांचा प्रसार केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाररथाचे उद्घाटन करताना यावेळी उपस्थित जनसमूहाला संबोधित करताना महायुतीच्या ध्येयांची आणि उमेदवाराच्या कार्यक्षमतेची प्रशंसा केली.

महायुतीमधील जागावाटपाच्या चर्चांच्या गुऱ्हाळातून या कार्यक्रमाने एक नवी दिशा निर्माण केली असून, महायुतीचे नेतृत्व आणि कार्यकर्ते यांच्यातील एकजुट आणि उत्साहात भर घालण्याचे काम केले आहे. मुख्यमंत्री यांनी प्रचाररथाचे उद्घाटन करून नारळ फोडतानाच, महायुतीच्या प्रचाराचा नारळही फोडला.

राजू पारवे यांच्या प्रचाररथाच्या उद्घाटनानंतर, मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीच्या विजयासाठी आशीर्वाद मागितला आणि मतदारांना जागृत करण्याचे काम सुरू केले. या प्रचाररथाच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवारांचे संदेश मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा मार्ग सुलभ होणार आहे.

29/03/2024

दरवर्षीप्रमाणे, यावर्षी देखील ठाणे शहराच्या कोपरी परिसरातील संत तुकाराम मैदानात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या आयोजनातून चैत्र नवरात्रौत्सवाची धामधूम उत्साहात सुरू झाली आहे. या उत्सवाचे पाट पूजन शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिवत पूजाअर्चा व आरती करून उत्सवाची औपचारिक सुरुवात केली. यावेळी त्यांनी मंदिर व सभामंडपाचे भूमीपूजनही केले, जे या उत्सवाच्या वाढत्या भव्यतेचे प्रतीक आहे. यावर्षीचा उत्सव अधिक विशेष व आकर्षक असेल असे संकेत मिळत आहेत.
या प्रतिष्ठित कार्यक्रमास माजी आमदार रविंद्र फाटक, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नरेश म्हस्के, हेमंत पमनानी, प्रकाश कोटवानी यांच्यासहित अनेक राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्वांनी उत्सवाचे आयोजन आणि संचालनाबद्दल प्रतिष्ठानचे कौतुक केले.
उत्सवाच्या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि प्रवचने आयोजित केली जाणार आहेत. यासह, श्रद्धाळूंसाठी विविध सामाजिक उपक्रम आणि सेवाभावी गतिविधीही राबविली जाणार आहेत. चैत्र नवरात्रौत्सव हा एक सामूहिक आणि आध्यात्मिक सोहळा असून, यानिमित्ताने समाजातील सर्व स्तरातील लोक एकत्र येऊन धार्मिक व सांस्कृतिक एकात्मता साजरी करतात.या उत्सवाचे आयोजन करणार्‍या धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानाचे प्रयत्न आणि समर्पण यामुळे या उत्सवाला ठाणे शहरात विशेष स्थान प्राप्त झाले आहे. यावर्षीच्या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी आणि समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या भावी कल्याणासाठी प्रार्थना केली जात आहे.

28/03/2024

"शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराची जाहीरात; ठाणे लोकसभेसाठी राजन विचारे यांची उमेदवारी

ठाणे, [तारीख]: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारांची यादी जाहीर केली, ज्यामध्ये राजन विचारे यांचे नाव अग्रस्थानी आहे. यावेळी ठाण्याच्या प्रसिद्ध मासूंदा तलावाजवळील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विचारे यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली.

या प्रसंगी बोलताना विचारे म्हणाले, "जर मुख्यमंत्र्यांना उमेदवार मिळत नसेल, तर मला बिनविरोध निवडून द्या." त्यांनी आपल्या भाषणात ठाण्यातील जनतेच्या समर्थनाचा विश्वास व्यक्त करताना ठाणे शहर आणि त्याच्या जनतेशी आपल्या जिव्हाळ्याचे नाते असल्याचे सांगितले.

महाविकास आघाडीच्या समर्थनाने विचारे यांच्या प्रचाराच्या सुरुवातीला झालेल्या शक्तिप्रदर्शनाने स्थानिक राजकारणात मोठी चर्चा निर्माण केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये ठाणे मतदारसंघाची बाजू कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे."

28/03/2024

ऑस्ट्रेलियन नागरिकाला होरायझन हॉस्पिटलने दिले जीवदान
श्वास घेणेही झाले होते कठीण, मित्रही आला धावून; दाखविले माणुसकीचे दर्शन

28/03/2024

सार्वजनिक शिव जयंती उत्सव मंडल भंडारी आळी शिवजयंती मिरावनुक आयोजन समाचार मुख्यबाजार पेठेत करण्यात आळी आहे. आयोजक माजी नगरसेवक पवन कदम. व माजी उपमंहापौर पल्लवी कदम..

28/03/2024

ठाण्यात गुडघा प्रत्यारोपणासह खुब्याची रोबोटिक शस्त्रक्रिया होतेय मोफत
कॅश काऊंटर नसलेल्या भारतातील पहिले मातोश्री गंगुबाई शिंदे रुग्णालयात दोघींवर रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी

ठाणे,दि.२६ : प्रतिनिधी
ठाण्याच्या मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे या कॅश काऊंटर नसलेल्या भारतातील पहिल्या रुग्णालयामध्ये प्रथमच दोन गरजु महिला रुग्णांवर रोबोटिक मशिनद्वारे गुडघ्याच्या प्रत्यारोपणाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या आहेत. दोन्ही रुग्ण आता स्वतःच्या पायावर हिंडु फिरू शकत असल्याने त्यांच्या नातलगांनी या नविन रोबोटीक तंत्रज्ञानाचे तसेच, गंगुबाई शिंदे रुग्णालयाचे विशेष आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दिवंगत मातोश्री गंगुबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ ठाणे महापालिकेच्या माध्यमातुन ठाण्यातील किसननगर येथे हे कॅश काऊंटर नसलेले गंगुबाई संभाजी शिंदे रुग्णालय सुरू केले आहे. या रुग्णालयात तब्बल १२ कोटी रुपये किमतीचे रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे मशिन नुकतेच कार्यन्वित करण्यात आले आहे. या मशिनद्वारे बदलापुर येथील पुष्पा केदारे ५० वर्षीय यांच्या उजव्या गुडघ्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. केदारे यांना गेल्या तीन वर्षापासुन संधीवात झाल्याने त्यांचे पाय वाकडे झाले होते. बसायला व उठायलाही त्रास होत होता.तर, भिवंडीच्या बेबी गायकवाड ६६ वर्षीय महिलेच्या डाव्या पायाच्या गुडघ्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. चालताना अडखळत चालावे लागत होते. गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी रुग्णालयाचा लाखोंचा खर्च या रुग्णांना परवडणारा नव्हता. काही नातेवाईकाच्या संदर्भाने गंगुबाई शिंदे रुग्णालयाची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार रुग्णालयात दाखल केल्यानंतर येथील भुलतज्ज्ञ डॉ.अक्षय राऊत, अस्थीतज्ज्ञ डॉ. सचिन पांडे यांनी या दोन्ही रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया नुकत्याच केल्या. याकामी रोबोटीक स्पेशालिस्ट तंत्रज्ञ दुर्गेश तोडणकर, तंत्रज्ञ अजित आहेर, राकेश सोनार यांचेही शस्त्रक्रियेसाठी मौलिक साह्य लाभले. या शस्त्रक्रियेनंतर केवळ एकच दिवस त्रास जाणवल्याचे रुग्णांनी सांगितले.
रोबोटीक ही ओपन सर्जरी आहे. एक शस्त्रक्रिया करण्यासाठी साधारण सव्वा तासांचा अवधी लागला. एरव्ही मॅन्युअली ऑर्थोपेडीक ऑपरेशनमध्ये असलेले धोके या मशिनद्वारे केलेल्या शस्त्रकियेमध्ये टाळता येतात. या मशिनचा लाभ म्हणजे याद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेत कोणतेही इन्फेक्शन्स होत नाहीत अथवा रक्तस्त्राव देखील कमीतकमी होत असल्याने रुग्णाला कोणताही मानसिक व शारीरिक त्रास उद्भवत नसल्याचे डॉ.पांडे यांनी सांगितले.

चौकट - रोबोट करतो अवघड शस्त्रक्रिया

गुडघा प्रत्यारोपणासाठी आलेल्या रुग्णाच्या संपुर्ण शरीराचे सिटी स्कॅन केल्यानंतर ती सर्व माहिती रोबोटिक मशिनच्या संगणकीय मेमरीमध्ये समाविष्ट केली जाते. त्यानंतर मशिनद्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी संगणकाद्वारे तयारी केली जाते. रोबोट, पेन्डन्ट, ओटीएस, सर्जिकल प्लॅनिंग केल्यानंतर रोबोट स्वतः ही गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करतो. शस्त्रक्रिये दरम्यान रुग्णाला फारसा त्रास जाणवत नाही. मात्र या शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना खूप काळजी घ्यावी लागते. दोनच दिवसात रुग्ण चालु लागतो.
- डॉ.सचिन पांडे, ऑर्थोपेडीक सर्जन

चौकट - कॅशलेस रुग्णालयाचा गोरगरीबांना आधार

ठाण्यात गेली दोन वर्ष सुरू असलेल्या मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे या रुग्णालयामध्ये रुग्णाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. शिधापत्रिका धारक गरीब रुग्णांवर अत्यंत महागड्या शस्त्रक्रिया तसेच सर्व औषधोपचार इथे मोफत केला जातो. नुकतेच दोन महिला रुग्णावर रोबोटीक शस्त्रक्रिया करून गुडघ्याचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले.
- डॉ. जालंदर भोर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, कै.गंगुबाई शिंदे रुग्णालय.

27/03/2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जयभवानी नगर येथील होळीचे होलिकादहन

धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने जय भवानी नगर येथील धर्मवीर आनंद दिघे उद्यान येथे गेल्या 35 वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या एक गाव होळीचे आयोजन शिवसेना वागळे विभागप्रमुख माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते तर गेली 25,26 वर्ष झाली सदर कार्यक्रमास शिवसेना मुख्यनेते नामदार एकनाथजी शिंदे हे उपस्थित राहून होलिकेचे दहन करतात
सदर प्रसंगी माजी नगरसेवक एकनाथ भोईर,माजी नगरसेविका एकता भोईर, यदनेश भोईर,युवराज भोईर,माजी नगरसेवक दशरथ यादव,माजी नगरसेविका राधा फत्तेबहादुर सिंह, शाखाप्रमुख संजय जाधव ,
ऍड शैलेश कदम, उपविभागप्रमुख बालाजी कांबळे,कृष्णप्रकाश तिवारी,राजेंद्र देसाई ,रामकृपाल त्रिपाठी,शहाजी मोहिते,शिवाजी काचकुंडे, दत्ता हजारे,कृष्णकुमार सोडारी,अशोक चव्हाण,संतोष जाधव,कुलदीप तिवारी, दत्तात्रय कुलकर्णी ,
सदाशिव माने युवा शाखा अधिकारी प्रकाश मगरे किशोर यादव राहुल बांगर
प्रतीक पाटील केतन शेळके अमोल पानमंत उपशाखाप्रमुख मनोज साळवे विलास राऊत सुभाष थोरात सचिन कापडी राजेश माने अभिजीत गायकवाड सुरेश ठसाळ शंकर शेळके नारायण एगडे संतोष मस्के राजन मेटारे राज जगदाने शशिकांत गौड व इतर पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी एकनाथ भोईर यांनी सपत्नीक होळीचे पूजन करून वाईट प्रवृत्ती चे विनाश होवो व सर्वांस सुख समृध्दी लाभो अशी होलिका माते कडे प्रार्थना करण्यात आली .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले एकनाथ शिंदे यांनी ही नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

27/03/2024

ठाण्यातील किसन नगर नं. १ मध्ये आज होळी पौर्णिमेनिमित्त संकल्प प्रतिष्ठान तर्फे आयोजित १३ वर्षांच्या परंपरेतून चालत आलेला चैत्र नवरात्र उत्सव आज १४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त सहपत्नीक मंडप पूजन करून परंपरा आणि या उत्सवाचा वारसा अविरत चालू ठेवण्याचा संकल्प केला.

या शुभप्रसंगी, नगरसेवक श्री. दीपक वेतकर, नगरसेविका जयश्री फाटक, विभाग प्रमुख श्री. संजय भोसले, विभाग संघटक सीमाताई औटी शाखा प्रमुख पांडुरंग औटी, बाबू महाडिक, सतीश वारंग.महिला शाखा संघटक अनमोल महाडिक, रोहिणी पवार, भावना ठक्कर, योगिता गुरव, सोनल सोनार, चमेली बेलेल व इतर पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

27/03/2024

नजीब मुल्ला व आनंद पराजपे याची पत्रकार परिषद.

25/03/2024

ठाण्यातील टेभी नाका येतील आनंद आश्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यान्ही केली होली साजरी...

25/03/2024

ठाण्यातील टेभी नाका येतील आनंद आश्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस कलर लाउन केली होली साजरी...

24/03/2024

ठाण्यातील बालकुम येथील एक गांव एक होली....

24/03/2024

रंगाचा बेरंग होणार नाही !

धुळवडीसाठी ठाण्यात २,००० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा

ठाणे। राजकीय आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ठाण्यात होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी आवश्यक सर्व खबरदारी घेतली आहे. पाण्याचे - फुगे मारणाऱ्यांवरही पोलिसांचे बारीक लक्ष असणार आहे. ठाणे शहर आणि परिसरात पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी असा सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक - पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात येणार आहे.

दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. - धूलिवंदनाच्या अनुषंगाने लोहमार्ग पोलिसही सतर्क झाले असून, धावत्या लोकलवर फुगे मारण्याचे प्रकार टाळण्यासाठी

रेल्वेरुळालगतच्या वस्त्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जात आहे.

रविवारी होळीचा सण असून, दुसऱ्या दिवशी धूलिवंदन आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात हे सण साजरे केले जातात. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली आहे. आयुक्तालयातील पाचही परिमंडळांत पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे.

शनिवारपासूनच वाहतूक पोलिसांची मोहीम

मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. शनिवार, २३ मार्चपासून संपूर्ण पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरू होणारी ही विशेष कारवाई

२५ मार्चपर्यंत सुरू राहील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली. नाकाबंदीच्या ठिकाणी चालकांची ब्रेथ अॅनालयाझर मशीनद्वारे तपासणी केली जाणार असून, या मशीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे राठोड असून, यांनी सांगितले. त्याचबरोबर हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे तसेच अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवरही कारवाईचा बडगा उगारला जाईल. या कारवाईसाठी ६३ पोलिस अधिकारी आणि ६५० कर्मचारी तैनात असतील, असेही ते म्हणाले.

23/03/2024

कैद्यांना सुधारण्यासाठी पुस्तकांची मदत

ठाणे: पुस्तके ही व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरतात. त्यांचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतो. मनःस्थिती सुधारण्यासाठी मदतही करतात. पुस्तकांमुळे जीवनात चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते.

यातून व्यक्तीमत्वात सकारात्मक बदल घडवून येतो. याच हेतूने कारागृहातील बंद्यांना देखील त्यांच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी, चांगल्या गुणांची जोपासणा होण्यासाठी पुस्तकांची मदत होईल, असे मत कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांसाठी ई - ग्रंथालय सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन दक्षिण विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक देसाई यांच्या हस्ते तसेच ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी देसाई बोलत होते. कैद्यांनी या ई ग्रंथालयातील पुस्तकांचा सकारात्मकदृष्टया आपल्यात परिवर्तन घडवून येण्यासाठी उपयोग करावा. ई-ग्रंथालयाचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

23/03/2024

*आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर नजर ठेवणार*

*निवडणूक आयोगाने कारवाई न केल्यास थेट उच्च न्यायालयात जाणार*

# आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीसाठी अजय जेया यांनी सुरू केले अभियान

ठाणे (प्रतिनिधी)- देशात लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र, या आचारसंहितेचा विविध मार्गांनी भंग केला जात आहे. त्याविरोधात तक्रार केल्यानंतरही कारवाई न केल्यास नागरिकांनी आपल्याशी संपर्क साधावा; आपण, थेट उच्च न्यायालयात दाद मागू, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी दिली.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर बेकायदेशीरपणे जाहिरातबाजी करणे, निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय बॅनर, होर्डिग्ज लावभे, मतदारांना आमीष दाखविणे, धमक्या देणे आदी कृत्यांवर निवडणूक आयोगाने प्रतिबंध केला आहे. मात्र, असे प्रकार सर्रास घडत असतात. हे प्रकार घडत असल्यास त्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणे नागरिकांना सोपे जावे, यासाठी निवडणूक आयोगाने सी व्हिजल नावाचे एप्लिकेशन सुरू केले आहे. नागरिकांना कुठेही आचारसंहिता भंग झाल्याचे दिसल्यास सदर एप्लिकेशनवर तक्रार नोंदवावी तसेच छायाचित्र अपलोड करावे. त्यानंतरही कारवाई न केल्यास नागरिकांनी आपल्याशी फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून संपर्क साधावा; आपण वकिलांची टीम उभी केली असून ही टीम उच्च न्यायालयात खटला लढेल, अशी माहिती अजय जेया यांनी दिली.
दरम्यान, आपणांस आचारसंहिता भंग होत असल्याचे दिसल्यास आपण फेसबुक लाईव्ह करून हे कृष्णकृत्य जनतेसमोर मांडणार असल्याचेही अजय जेया यांनी सांगितले

23/03/2024

ठाण्यात अभिनय कट्यावर रंगली विशेष मुलांची होळी
लोकसभा निवडणुकीसाठी केली मतदान जनजागृती

ठाणे, दि.२३ : प्रतिनिधी
होळी - धुळवडीच्या सणात उत्साहाचे रंग उधळताना समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, या भावनेने ठाण्यातील किरण नाकती यांच्या अभिनय कट्टा व दिव्यांग कला केंद्र यांच्यावतीने होळीच्या पुर्वसंध्येला अनोखी धुळवड साजरी करण्यात आली. यंदा या विशेष धुळवडीचे १० वे वर्ष असुन लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून जिल्हा निवडणुक अधिकारी तहसिलदार आसावरी संसारे आणि ठाणे महापालिकेचे नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांनी "मतदार राजा जागा हो" हे अभियान राबवण्यात आले. किंबहुना १८ वर्ष पूर्ण केलेल्या दिव्यांग बांधवांना मतदानाचा हक्क बजावण्याबाबत प्रबोधन देखील यावेळी करण्यात आले.
होळी आणि धुळवडीचा आजपासुन सर्वत्र जल्लोष सुरू होणार असला तरी, समाजातील दिव्यांग बांधवांसाठी ठाण्यातील अभिनय कट्टा व दिव्यांग कला केंद्राचे प्रमुख किरण नाकती यांनी प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही नौपाडा भास्कर कॉलनी येथील जिजामाता उदयान येथील केंद्रात शनिवारी विशेष मुलांसोबत होळी व धुळवडीचे आयोजन केले होते. यावेळी या विशेष मुलामुलींनी संगीताच्या तालावर नाचत एकमेकांना रंग लावुन धुळवड साजरी केली. दरम्यान, या विशेष होळीचे औचित्य साधुन लोकसभा निवडणुकीच्या महोत्सवाची जनजागृती करण्यात आली.जिल्हा निवडणुक अधिकारी तहसिलदार आसावरी संसारे आणि ठाणे महापालिकेचे नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांनी "मतदार राजा जागा हो" या अभियानाच्या माध्यमातुन मतदानाचे पवित्र कार्य बजावण्याचे आवाहन केले.

23/03/2024

ठाणे महानगरपालिकेच्या नव्या आयुक्तांनी स्वीकारला पदभार; स्मार्ट सिटीत नव्या प्रकल्पांचा संकल्प

ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार सौरभ राव यांनी आज स्वीकारला. नव्या आयुक्तांनी ठाणे शहराला स्मार्ट सिटीच्या दिशेने आणखीन एक पाऊल पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिका स्मार्ट सिटी प्रकल्पांत नवीनतम तंत्रज्ञान आणि सुविधांचा समावेश करून शहराचे सौंदर्यीकरण आणि नागरिकांच्या सुविधांमध्ये भर घालण्याच्या दिशेने प्रयत्नशील असेल.

आयुक्त सौरभ राव यांनी विशेषतः ठाणेकरांच्या पाणीटंचाईच्या समस्येवर लक्ष केंद्रित केले आहे. ते म्हणाले की, "येणाऱ्या काळात ठाणेकरांना पाणीटंचाईच्या समस्येपासून सुटका प्रदान करणे हे आमचे प्राधान्य असेल." त्यांच्या आधारे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्याचे तसेच पाणी संधारणाचे उपाययोजना करण्याचे दिशानिर्देश देण्यात आले आहेत.

या नव्या दिशेने ठाणे महानगरपालिका चालली असून, ठाणे शहराच्या विकासात आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कार्यान्वयनात नवीन अध्याय सुरू होण्याची अपेक्षा आहे.

22/03/2024

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेनंतर देशभर आंदोलनाची लाट

मुंबई: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँन्डिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर, देशभरात विशेषत: ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर रस्त्यावर उतरून आम आदमी पार्टीच्या समर्थकांनी भाजप विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. आम आदमी पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी ठिया आंदोलन केले आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

आंदोलकांनी जाहीर केले की, जर केजरीवाल यांना जेलमध्ये टाकण्यात आले तर ते जेल भरो आंदोलन छेडण्यासाठी तयार आहेत. त्यांच्या मते, ही अटक राजकीय द्वेषातून केली गेली आहे आणि न्याय्य प्रक्रियेचा भंग आहे. आम आदमी पार्टीचे नेते आणि समर्थक देशभरातील विविध भागांतून न्यायाची मागणी करीत आहेत.

पोलिसांनी आंदोलकांना शांततेचा सल्ला दिला आणि कोणत्याही प्रकारच्या अवांछित घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना केल्याचे सांगितले. देशभरातून येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये, काही लोकांनी ईडीच्या कारवाईचे समर्थन केले, तर काहींनी ती निंदनीय ठरवली.

या घटनेच्या परिणामांवर देशाचे लक्ष लागून आहे, तर राजकीय वर्तुळातूनही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

22/03/2024

ती महोत्सव उत्साहात संपन्न

डॉ राजेश मढवी फाऊंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ आयोजित ती महोत्सव उत्साहात संपन्न झाला .महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी रविवारी17 मार्च रोजी महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महिलांनी खेळ पैठणीचा अंतर्गत विविध खेळांच्या आनंद घेतला. तसेच बक्षिसांचीही लयलूट केली. यावेळी ख्यातनाम दिग्दर्शक विजू माने, ठाणे जिल्हा हॉसिंग फेडरेशन चे अध्यक्ष सीताराम राणे ,यांसह इतर मान्यवर बंधू भगिनी ठाणेकर नागरिक येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात सहकार्य करनाऱ्या सर्वांचे माजी नगरसेविका प्रतिभा मढवी,डॉ. राजेश मढवी,व समर्थ भारत व्यासपीठ चे उल्हास कार्ले, भटु सावंत यांनी आभार व्यक्त केले.

22/03/2024

श्री अक्कलकोट संस्थानतर्फे ४२ एकरवर साकारणार भव्य अनुभुती प्रकल्प

लोकवर्गणीसाठी स्वामी भक्तांना आवाहन

ठाणे : तमाम मराठी भक्तांच्या
मनात अढळ स्थान प्राप्त केलेले श्री स्वामी समर्थ यांचे अक्कलकोट येथे सुमारे 22 वर्षे वास्तव्य होते. तीर्थक्षेत्र म्हणून नावारुपास आलेल्या अक्कलकोटचा विकास हे ध्येय ठेवून कार्य करणाऱ्या श्री अक्कलकोट संस्थानतर्फे 42 एकरांच्या जागेवर प्रस्तावित 375 कोटींचा भव्य असा अनुभुती प्रकल्प लोकवर्गणीतुन साकारण्यात येत आहे.

हा प्रकल्प राज्यातील देवस्थानातील शाही निवासस्थानाची अनुभूती, समृद्धी आणि ऐश्वर्य बहाल करणारा असेल, अशी माहिती श्री अक्कलकोट संस्थानचे नरेश श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले (तिसरे) यांनी काल आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अनुभूती ही आध्यात्मिक संकल्पना असून या प्रकल्पात ब्रह्मस्थानी श्री स्वामी समर्थांची पंचधातूमध्ये बनवलेली 108 फुटी भव्य मूर्ती (स्टॅच्यु ऑफ मिरॅकल) उभारण्यात येणार आहे.

त्यासोबत दिव्य दर्शन, बहुउद्देशीय रुग्णालय, प्रसादालय, निवास व्यवस्था, स्टुडिओ अपार्टमेंट, भव्य पार्किंग व्यवस्था, पंचकर्मा रिसॉर्ट, फूड कोर्ट आणि हत्तींच्या मुक्त संचारासाठी कुंजरबन हे जंगल यांचाही समावेश आहे.

या प्रकल्पाची संकल्पना श्रीमंत मालोजी राजे भोसले (तिसरे)
यांची असून महेश नामपूरकर हे प्रमुख वास्तू विशारद म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. या प्रकल्पासाठी श्रीमंत मालोजीराजे यांनी अक्कलकोट संस्थानची सुमारे 250 कोटीहून जास्त मुल्याची 42 एकर जागा सेवा स्वरुपात दिली आहे. या अनुभूती प्रकल्पाला सुमारे 375 कोटी खर्च अपेक्षित असून याला सर्व स्वामीभक्तांकडुन स्वामी सेवा स्वरुपात हातभार लागावा या उद्देशाने लोकवर्गणीतून हा प्रकल्प उभा राहावा अशी इच्छा श्रीमंत मालोजी राजे भोसले (तिसरे) यांनी व्यक्त केली. या प्रकल्पासाठी एक रुपये मूल्यापासून शक्य होईल त्या रक्कमेपर्यंत वर्गणी देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. सदरच्या प्रकल्पाला वर्गणी देणाऱ्या भाविकांनी अधिक माहितीसाठी 9867391461 अथवा www. swamisamarthanubhuti.com येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

22/03/2024

"विशेष मुलांसोबत ठाण्यातील 'जिद्द' शाळेत विठाई प्रतिष्ठानाच्या वतीने रंगली नैसर्गिक होळी"

ठाणे: विठाई प्रतिष्ठानच्या पुढाकाराने ठाण्यातील प्रसिद्ध 'जिद्द' शाळेत गेल्या 18 वर्षांपासून विशेष मुलांसाठी होळीचे आयोजन केले जात आहे. या वर्षीही विठाई प्रतिष्ठानने या खास उत्सवाचे आयोजन केले, जिथे विविध कलाकार आणि दिग्दर्शकांनी हजेरी लावून विशेष मुलांसोबत होळी साजरी केली.

यंदाच्या होळीत प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता भाऊ कदम आणि दिग्दर्शक विजय माने यांनी विशेष मुलांसोबत नैसर्गिक रंगांनी होळी खेळून संदेश दिला की, आनंदाच्या या क्षणांत पाण्याचा अपव्यय टाळता येऊ शकतो. या कार्यक्रमात विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत चव्हाण यांनीही सहभाग नोंदवला आणि या खास उत्सवातील आयोजनाची प्रशंसा केली.

अभिजीत चव्हाण म्हणाले, "हा कार्यक्रम आम्ही गेल्या 18 वर्षांपासून आयोजित करत आहोत आणि प्रत्येक वर्षी हा अधिकाधिक उत्साही बनत चालला आहे. विशेष मुलांसाठी आनंदाचे हे क्षण त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतात."

कार्यक्रमात सहभागी झालेले विशेष मुले आणि त्यांचे पालकही या आयोजनाबद्दल उत्साही दिसून आले. नैसर्गिक रंग आणि पाण्याचा विचारपूर्वक वापर या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य बनले.

या उत्सवामुळे न केवळ विशेष मुलांना आनंद मिळाला, तर समाजातील प्रत्येकाला एक महत्त्वपूर्ण संदेशही मिळाला की, सणांचे साजरे करताना पर्यावरणाचे रक्षण कसे केले जाऊ शकते.

22/03/2024

ठाणे :
ज्या ठाणे शहरात मुख्यमंत्री राहतात, त्यांना अजून साधा उमेदवार सापडत नाही. आता स्वतःच्या पक्षाचे उमेदवार जाहीर करण्यासाठी ही दिल्लीला जावे लागते, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावून जैन धर्माचा अपमान करणारे आणि उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्या मनसेला सोबत घेण्याची मोठी किंमत भाजपला मोजावी लागेल, असे भाकीत शिवसेना सचिव वरुण सरदेसाई यांनी ठाण्यातील मेळाव्यात वर्तविले आहे.

ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे इंडिया आघाडीच्या स्वाभिमानी युवकांचा मेळावा झाला. यावेळी खासदार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या ब्रँड ठाकरे या गाण्याच्या चित्रफितीचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना शिवसेना सचिव वरुण सरदेसाई यांनी खासदार विचारे यांची कामे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचवा आणि गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मताने विचारे यांच्या विजयात हातभार लावा, असे आवाहन केले. ते पुढे म्हणाले आजपासून जेव्हा कधी निष्ठेचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा सुवर्ण अक्षरांनी नाव राजन विचारे यांचे कोरले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांचा अपेक्षा भंग केला असून ती चूक सुधारण्याची जबाबदारी तरुणांनी खांद्यावर घ्यायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी खासदार राजन विचारे, विक्रम खामकर, किरण जाधव, गिरी, शिवराम मोरे, धनश्री विचारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आप, शिवसेना ठाकरे गट, यांच्यासह इंडिया आघाडीतील युवा नेते यांची भाषणे झाली.

सरदेसाई यांचे कल्याण लोकसभा लढविण्याचे संकेत
कल्याण लोकसभा मतदार संघात खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात लढण्यासाठी वरुण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा आहे, याबाबत विचारणा केली असता सरदेसाई यांनी येत्या काळात जी पक्ष जबाबदारी देईल ती पूर्ण करण्याचे काम करेल, असे स्पष्ट करत निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली. महायुतीमध्ये होणाऱ्या मनसेच्या प्रवेशाबाबत बोलताना सरदेसाई म्हणाले, भाजपने मतदारांना गृहीत धरले असून प्रामुख्याने जैन, गुजराती आणि उत्तर भारतीय समाजालाचा अपमान करणाऱ्यांना जवळ केले आहे. मोदी मोठे की जैन धर्म मोठा हा प्रश्न नक्कीच जैन मतदार विचारतील आणि उत्तर भारतीय मतदार मनसेकडून खाल्लेले मार विसरणार नाही. उद्धव ठाकरे हे भाजपासून दूर झाल्यापासून शिवसेनेचे ४० आमदार फोडले, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० आमदार फोडले आणि काँग्रेसही फोडली तरी ठाकरे यांची जागा ते भरून काढू शकले नाहीत. त्यामुळे मनसेला सोबत घ्यावे लागत आहे. २०१९ मध्ये एका चुकीमुळे किती नुकसान झाले हे भाजपाला कळून चुकले असेल, असा टोलाही सरदेसाई यांनी भाजपला लगावला.

Address

Thane

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thanedar - ठाणेदार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Thanedar - ठाणेदार:

Videos

Share



You may also like