MH 13 NEWS

MH 13 NEWS सोलापूरकरांच्या हक्काचं

https://www.youtube.com/c/MH13NEWS
(30)

बेळगावसह सीमा भागातील माणसांनी मेळावे घेऊ नयेत, अशी कर्नाटक सरकारने घेतलेली भूमिका घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करणारी आह...
10/12/2024

बेळगावसह सीमा भागातील माणसांनी मेळावे घेऊ नयेत, अशी कर्नाटक सरकारने घेतलेली भूमिका घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे. या घटनेचा राज्य शासन निषेध करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्र विधानमंडळ सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असून बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र होत नाही तोवर आमचा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारने विरोध केला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य यांना अटक करण्यात आली. तसेच लोकप्रतिनिधींना स्थानबद्ध करण्यात आले. या कर्नाटक सरकारच्या कृत्याचा महाराष्ट्र शासन तीव्र निषेध करीत आहे.- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘मॅट’च्या ३३ वर्षात प्रथमच लोक अदालतसेवाविषयक १३८ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. तीन प्रकरणांमध्ये १२६ अर्जदारांन...
10/12/2024

‘मॅट’च्या ३३ वर्षात प्रथमच लोक अदालत

सेवाविषयक १३८ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. तीन प्रकरणांमध्ये १२६ अर्जदारांना शासकीय नोकरीचा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अध्यक्ष न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम यशस्वी झाला.

चर्चेला फुलस्टॉप : बार्शीचे आमदार दिलीप सोपल मातोश्रीवर दाखल..!बार्शी : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेना उद्धव ...
09/12/2024

चर्चेला फुलस्टॉप : बार्शीचे आमदार दिलीप सोपल मातोश्रीवर दाखल..!

बार्शी : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सर्वच आमदारांची बैठक झाली. मात्र, बार्शीचे आमदार दिलीप सोपल या बैठकीला उपस्थित नव्हते. शिवाय विजयानंतर ते पक्षप्रमुखांच्या भेटीला न गेल्याची चर्चाही मतदारसंघात होती, अखेर विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आ. दिलीप सोपल यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे दिलीप सोपल नेमकी काय भूमिका घेणार या वरच्या चर्चेला फुल स्टॉप मिळाला आहे.

राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर विधिमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनात सर्वच आमदारांचा शपथविधी आणि गाठीभेटी झाल्या. त्यामध्ये, बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचाही शपथविधी झाला. ते 7 व्यांदा विधानसभा सभागृहात जात असल्याने पूर्वीच्या अनेक नेत्यांच्या ओळखी आणि जवळीकही त्यांची दोन दिवसांत फोटोंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतचे त्यांचे फोटो व्हायरल झाले. त्यामुळे, महायुतीच्या नेत्यांना जादू की झप्पी देणारे सोपल अद्याप उद्धव ठाकरेंना भेटले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

अखेर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दिलीप सोपल यांनी मातोश्री बंगल्यावर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी, शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर हेही उपस्थित होते. त्यामुळे, विजयानंतर 15 दिवसांनी सोपल हे उद्धव ठाकरेंना भेटल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

Adv. Dilip Sopal - ॲड. दिलीप सोपल
#बार्शी

राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत त्वरिता खटकेने पटकाविले सुवर्णपदक
09/12/2024

राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत त्वरिता खटकेने पटकाविले सुवर्णपदक

MH 13 news network राष्ट्रीय रायफलमध्ये त्वरिता खटकेने पटकाविले सुवर्णपदक सोलापूर : केरळ येथे थिरूवनंतपुरम (त्रिवेंद्रम) म.....

नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा .! - सोलापूर महानगपालिका
09/12/2024

नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा .! - सोलापूर महानगपालिका

🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर       सोमवार दि- ०९ डिसेंबर २०२४           🌸 दुपारचा पोशाख 🌸        ...
09/12/2024

🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर
सोमवार दि- ०९ डिसेंबर २०२४
🌸 दुपारचा पोशाख 🌸
🙏🏻 जय हरी.🙏🏻
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕

सन २०२४-२५ मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत १,१३,२३६ कोटी रुपये इतक्या थेट परकीय गुंतवणुकीसह महाराष्ट्राने देशात पुन...
09/12/2024

सन २०२४-२५ मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत १,१३,२३६ कोटी रुपये इतक्या थेट परकीय गुंतवणुकीसह महाराष्ट्राने देशात पुन्हा प्रथम स्थान प्राप्त केले आहे. ही गुंतवणूक, मागील वर्षाच्या एकूण गुंतवणुकीच्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी अभिभाषणात सांगितले.

राज्य विधानमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात संबोधन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते.

 #अक्कलकोट : ‘ त्या ‘ ग्रामपंचायत सरपंचांचा जातीचा दाखला अखेर अवैध
09/12/2024

#अक्कलकोट : ‘ त्या ‘ ग्रामपंचायत सरपंचांचा जातीचा दाखला अखेर अवैध

MH 13 News Network सोलापूर : ग्रामपंचायत पितापूर ता. अक्कलकोट, जि. सोलापूर या ग्रामपंचायतीच्यासरपंच मोहसीना चिकळ्ळी यांचा जु...

विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज (दि. ९ डिसेंबर) ४ नवनिर्वाचित सदस्यांना विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास निळकंठ कोळंबकर...
09/12/2024

विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज (दि. ९ डिसेंबर) ४ नवनिर्वाचित सदस्यांना विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास निळकंठ कोळंबकर यांनी सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.
शपथ घेतलेल्या सदस्यांमध्ये सर्वश्री जयंत राजाराम पाटील, विनय विलासराव कोरे (सावकार), सुनील शंकरराव शेळके, उत्तम शिवदास जानकर यांचा समावेश आहे. या विशेष अधिवेशनाच्या कालावधीत एकूण २८३ सदस्यांनी सदस्यपदाची शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

#विशेषअधिवेशन२०२४

शहराच्या पंचक्रोशीत नंदीध्वजाच्या पूजेची लगबगसोलापूर ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील योगदंडाचे प्रतीक असलेले नंदीध्वज ...
09/12/2024

शहराच्या पंचक्रोशीत नंदीध्वजाच्या पूजेची लगबग

सोलापूर ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील योगदंडाचे प्रतीक असलेले नंदीध्वज पेलण्याचा सराव शहरात सुरु असुन 'बोला ...बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, श्री सिद्धारामेश्वर महाराज की जय' अशा घोषणा देत भक्तिमय, आनंददायी आणि मंगलमयी वातावरणात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत तिसऱ्या नंदीध्वजांचे पूजन शेळगी येथील श्री रामराज्य नगर येथे मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील तिसरे नंदीध्वजाचे पूजन नागनाथ दिलीप बडूरे दाम्पत्य यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. नंदीध्वजाला आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते. यावेळी नंदीध्वजांचे विधिवत पूजन करून महाआरती करण्यात आली. केदार स्वामी आणि मल्लिनाथ कंदलगावकर यांनी मंत्रोच्चाराचे पठण केले.

यात्रेच्या अगोदर आपल्या घरी नंदीध्वज पूजनासाठी यावेत अशी अनेक भक्तांची इच्छा असते. सोलापूर शहर परिसरात हे नंदीध्वज पूजनासाठी घेऊन जातानाचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. यावेळी तिसऱ्या नंदीत्वजाचे मास्तर रेवणसिद्ध माळी, प्रभाकर हेबळे, शिवानंद भिमदे, गंगाधर कुडल, श्रीकांत माळी, कैलास माळी, मल्लिनाथ माळी, रितेश सवळी, योगेश चिंचोळी, योगीराज भिमदे, प्रसाद भिमदे उपस्थित होते.

श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा ही आनंदाची पर्वणी असते. यंदा आम्ही नंदीध्वजाला बारा ज्योतिर्लिंगाच्या फुलांची आरास केली होती. नंदीध्वज पूजन करताना मनोमन आनंद होते.
विश्वनाथ बडूरे

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारताचे थोर सुपुत्र व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर मानवतावादी डॉ.द्वारकानाथ कोटणीस  यांच्या...
09/12/2024

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारताचे थोर सुपुत्र व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर मानवतावादी डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथील पुतळ्यास व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील द्वारकानाथ कोटणीस स्मारक येथील त्यांच्या पुतळ्यास त्यानंतर कॉन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या प्रतिमेस महापालिकेचे सहायक आयुक्त गिरीष पंडित यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर,मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, गणेश चन्ना,सिद्धू तिमिगार आदी मान्यवर उपस्थित होते.

Live : अधिवेशनाचा तिसरा दिवस *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जय...
09/12/2024

Live : अधिवेशनाचा तिसरा दिवस

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांची विधानसभेत भाषणे.!*

https://youtube.com/live/ph7cWzfNDfw?feature=share

*MH 13NEWS सबस्क्राईब करा*

सोलापूरकरांच्या हक्काचंWelcome to Mh13 Newsमहत्त्वाच्या बातम्या, घडामोडी आणि रंजक गोष्टींचा खजिनाClick Here to Subscribe our YouTube Channel :- https://youtu...

 #इंटॅक_सोलापूरकडून_वारसा_फेरीचे_आयोजन▪️सोलापूर - नुकत्याच साजऱ्या झालेल्या ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्याचे औचित...
08/12/2024

#इंटॅक_सोलापूरकडून_वारसा_फेरीचे_आयोजन

▪️सोलापूर - नुकत्याच साजऱ्या झालेल्या ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून 'इंटॅक सोलापूर' विभागाकडून रविवार ८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत मंदिर-वाडा फेरी (वारसा फेरी) चे आयोजन करण्यात आले होते.
▪️ या उपक्रमाची सुरुवात पश्चिम मंगळवार पेठेतील भडंगे गल्ली येथील रूक्मिणी पांडुरंग मंदिरापासून झाली. या मंदिराचे वहिवाटदार मुकुंद भडंगे यांनी मंदिराची स्थापना व येथील परिसर याबद्दल सखोल माहिती दिली. तसेच भडंगे गल्लीतील भडंगे कुटुंबाचे वंशज व अक्षरतज्ञ श्री. अभिजित भडंगे यांनी नुकताच स्वहस्ताक्षरात ज्ञानेश्वरी लिहिण्याचा दीर्घ प्रकल्प पूर्ण केला. या भेटीदरम्यान त्यांनी उपस्थित इतिहासप्रेमींशी संवाद साधला. त्यांनीं स्वहस्ताक्षरात लिहिलेले ग्रंथ यावेळी पहावयास मिळाले. तसेच त्यांनी त्यांच्या पूर्वजांनी बांधलेल्या जुन्या कौशल्यपूर्ण बांधकामाची आठवण देणारे पुरातन घर सुद्धा दाखवले.
▪️यानंतर इतिहासप्रेमींचा जथ्था याच परिसरातील एक सुंदर वस्तू असलेल्या केकडे राधा-कृष्ण मंदिर-वाड्याकडे वळला. या मंदिराचे वंशज श्री. केकडे परिवाराने त्यांच्या या भव्य कलाकुसर असलेल्या व वाडायुक्त मंदिराची माहिती दिली. याच्यावरती बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक हवेलीचे सुद्धा इतिहासप्रेमींना दर्शन झाले. विसाव्या शतकातील ही दोन्ही मंदिरे तत्कालीन वांधकाम पद्धतीची व मराठा शैलीतील मंदिर बांधणीची उत्तम उदाहरणे आहेत. यासगळ्याची विस्तारीत माहिती देण्यासाठी इंटॅकच्या सह-समन्वयिका आर्कि. श्वेता कोठावळे व इतिहास अभ्यासक श्री. नितीन अणवेकर यावेळी उपस्थित होते. यासोबतच ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, अरविंद मोटे, अजित चौहान, अजित कोकणे, तुषार राठोड यांनी सुद्धा या वारसा फेरीत आपला सहभाग नोंदवला.

नंदीध्वजधारकांकडून कसून सराव सुरू बोला... बोला एकदा... भक्त रिंग बोला हरसोलापूरशिवयोगी श्री सिध्दरामेश्वर महाराज यांची य...
08/12/2024

नंदीध्वजधारकांकडून कसून सराव सुरू
बोला... बोला एकदा... भक्त रिंग बोला हर

सोलापूर
शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर महाराज यांची यात्रा अवघ्य एका महिन्यावर आली असल्याने नंदीध्वजधारकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. नंदीध्वजधारकांकडून सराव करून घेण्यास मास्तर मंडळी व्यस्त झाली आहेत. गेल्या आठवड्यापासून याचा सराव केला जात आहे. श्री ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रा काही दिवसांवर आल्याच्या पार्श्वभूमीवर नंदीध्वज पेलण्याचा सराव अंतिम टप्यात आल्याचे दिसून येते.

दिवाळी संपल्यानंतर सोलापूरकरांच्या मनात ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेबद्दल ओढ लागलेली असते. या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या नंदीध्वज आणि नंदीध्वजधारकांबद्दल विलक्षण आकर्षण असल्याने भक्तांमध्ये सराव नंदीध्वजांची पूजा करण्याची प्रथा आहे. नंदीध्वज पूजा केल्यानंतर नंदीध्वजधारकांना अधिक ऊर्जा मिळावी म्हणून सेवेकऱ्यांना सुकामेवा खिरीचे जेवण देण्याची परंपरा आहे. खिरीसोबत तूप, केळी आणि दुधाला प्राधान्य दिले जाते. यात्रेत सर्व समाजाचे मिळून मानाचे सात नंदीध्वज असून नंदीध्वज पेलण्याचा कसून सराव मास्तरांकडून करुन घेतला जात आहे. होम मैदान, सम्मती कट्टा, बाळीवेस, मल्लिकार्जुन मंदिर, गांधी नाथा मैदान, सम्राट चौक, चाटी गल्ली, विजापूरवेस ते मधला मारुती, तुळजापूर वेस, रुपाभवानी रोड परिसरात नंदीध्वज सराव सुरु आहे. सकाळी, दुपारी आणि रात्री असे तीन वेळा नंदीध्वजधारकांना नंदीध्वज पेलण्याचे कौशल्य शिकविले जात आहे.

वजन पेलण्याचा सराव व्हावा यासाठी सरावादरम्यान सराव काठ्यांना लोखंडी साखळी बांधून तयारी करून घेतली जात आहे. भक्ती आणि शक्तीच्या संगमातूनच पात्रेत काठी पेलणे शक्य होते. नंदीध्वज पेलण्यासाठी कौशल्य लागते, कसून सराव करावा लागतो. यात्रेच्या एक महिना आधी आम्ही सरावाला सुरुवात करत असल्याची माहिती तिसऱ्या नदीध्वजाचे मास्तर रेवणसिध्द माळी यांनी सांगितली

MPSC चे निकाल आणि गुणवत्ता यादी जाहीर• अनुवादक (मराठी): ५-६ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या मुलाखतींची तात्पुरती गुणवत्ता याद...
08/12/2024

MPSC चे निकाल आणि गुणवत्ता यादी जाहीर
• अनुवादक (मराठी): ५-६ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या मुलाखतींची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर.
• सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या मुलाखती २८ फेब्रुवारी २०२४ रोजी घेतलेल्या मुलाखतीचा निकाल प्रसिध्द
• महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४: १ डिसेंबर २०२४ च्या परीक्षेच्या उत्तरतालिका प्रकाशित. हरकतीसाठी १० डिसेंबरपर्यंत मुदत.
• सहयोगी प्राध्यापक (न्यायवैद्यकशास्त्र): पदाचा निकाल जाहीर.
• तालुका क्रीडा अधिकारी: ५-६ डिसेंबर २०२४ च्या मुलाखतींची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रकाशित.
• कर सहायक: प्रतीक्षायादीतील शिफारस यादी प्रसिद्ध.
• इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी : आसुधारित निकाल
तपशील आणि पुढील माहिती आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ https://mpsc.gov.in ला भेट द्या.

Live : छत्रपती संभाजी महाराज चौक येथे पिण्याच्या पाण्याची गळती ; दुरुस्त करण्याची गरज
08/12/2024

Live : छत्रपती संभाजी महाराज चौक येथे पिण्याच्या पाण्याची गळती ; दुरुस्त करण्याची गरज

किल्ले रायगड Rajgad fort, Maharashtra ❤️
08/12/2024

किल्ले रायगड

Rajgad fort, Maharashtra ❤️

धोम येथील श्री सिद्धेश्वर लक्ष्मी नरसिंह मंदिर व एकमेव कासवाच्या पाठीवर तयार करण्यात आलेला  वैशिष्ट्यपूर्ण नंदी मंडपनिती...
08/12/2024

धोम येथील श्री सिद्धेश्वर लक्ष्मी नरसिंह मंदिर व एकमेव कासवाच्या पाठीवर तयार करण्यात आलेला वैशिष्ट्यपूर्ण नंदी मंडप

नितीन अणवेकर,( इतिहास अभ्यासक)

वाईपासून सुमारे ८ कि.मी अंतरावर धोम हे छोटेसे गाव वसलेले आहे. गाव तसे खूपच लहान असले तरी गावातील श्री सिद्धेश्वर नरसिंह मंदिर प्रसिद्ध आहे.जसजसे गावातून लहान झाडीतून वळणदार वाट गावाच्या शेवटी असलेल्या मंदिरा पर्यात घेऊन जाते.एखाद्या जणू समोर गढी आहे असा भासवणारे हे मंदिराची बाह्य तटभिंत आहे. मंदिराच्या संपूर्ण भोवती चिरेबंदी तटबंदी त्यावर पेशवेकालीन विटांचे नक्षीकाम आहे. हा उत्कृष्ट स्थापत्य कलेचा संगम आपले लक्ष वेधून घेतो. मंदिराचे प्रवेशद्वार देखील रेखीव असून प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दोन भक्कम बुरूज आहेत. या बुरूजयुक्त प्रवेशद्वार नगारखाना आहे. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करता येतो.पूर्वी येथे
धौम्य ऋषीचे वास्तव्य होते त्यामुळे गावास धोम हे नाव रूढ झाले आहे असे सांगितले जाते.मंदिराच्या प्रांगणात नरसिंहाचे मंदिर आहे. एकाच मंदिरात समोरील बाजूस शांत आणि त्याच बरोबर मागील प्रदक्षिणा मार्गावर उग्र लक्ष्मी नरसिंहाची विलोभनीय मूर्ती आहे.याच नरसिंह मंदिराच्या शेजारी व सिद्धेश्वर मंदिराच्या समोर जल नंदी मंडप आहे.असा हा विलोभनीय नंदी मंडप भारतात एकमेव आहे. असा तो वैशिष्ट्यपूर्ण आहे.कलाकाराने अत्यंत कुशलतेने हा नंदी मंडप तयार केला आहे.एका भव्य कमळ पुष्पाच्या आकाराची उथळ पुष्करणी प्रमाणे दिसणारी ( हौद)तयार करण्यात आली आहे. या पुष्कर्णीच्या मध्यभागी कट्यावर एकाच अखंड दगडात भव्य कासवाची निर्मिती करण्यात आली आहे. तो कासव पुष्कर्णीच्या पाण्यावर तरंगत पोहत आहे असे कलाकाराने मोठ्या कौशल्याने दाखवले आहे.याच भल्यामोठ्या कासवाच्या पाठीवर नंदी मंडप तयार करण्यात आला आहे. पाहताना पाण्यावरून कासव आपल्या पाठीवरून नंदीना पाण्यातून पाठीवर असलेल्या नंदी मंडपातील नंदीला घेऊन येत आहे असे दाखवण्यात आले आहे. कासवाचे पाय देखील पाण्यात विहार करत आहेत असेच दाखवण्यात आले आहे.ही योजना खूपच वैशिष्ट्यपूर्ण आणि लक्षवेधी आहे.असा हा नंदी मंडप अद्वितीय आहे. याच नंदी मंडपाच्या समोर श्री सिद्धेश्वर मंदिर आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहात सुरेख शिवलिंग आहे. याच मंदिराच्या खाली धोम ऋषी यांची समाधी आहे.मंदिराच्या प्रांगणात बारव आहे. गणपती मंदिर देखील आहे. एक चार शिवमुखे असलेला मुख स्तंभ आहे. असे हे आगळे वेगळे वैशिष्ट्यपूर्ण श्री सिद्धेश्वर मंदिर आणि लक्ष्मी नरसिंह मंदिर लाखो पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.

Address

Main Road
Solapur
413001

Alerts

Be the first to know and let us send you an email when MH 13 NEWS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MH 13 NEWS:

Videos

Share


Other Media/News Companies in Solapur

Show All