30/12/2024
सोलापूरची विमानसेवा सुरू न झाल्याबद्दल सोलापूरकर संतप्त - गाजर आंदोलन करून व्यक्त केला निषेध
हे खरोखरच जुमलेबाज सरकार आहे का? सोलापूर विकास मंचचा संतप्त सवाल_
सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून सर्वसामान्य सोलापूरकरांनी चार वर्षांचा प्रदीर्घ लढा दिला आहे. विमानसेवेतील प्रमुख अडथळे दूर करूनही दीड वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला असून विमानतळाचे नूतनीकरण होऊन चार महिने झाले, तरीही नागरी विमानसेवा सुरू झालेली नाही.
गाजर आंदोलन आणि उपोषण
३० डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या पुनम गेटसमोर सोलापूर विकास मंचतर्फे गाजर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सोलापूरकर सहभागी झाले. आंदोलनादरम्यान उपोषणाद्वारे संतप्त सोलापूरकरांनी आपला आक्रोश व्यक्त केला. आंदोलनासाठी अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करण्यात आला. AI च्या साहाय्याने व्हिडिओ आणि ऑडिओ संदेश पाठवून नागरिकांना आंदोलनाची माहिती देण्यात आली.
*आंदोलनात मान्यवरांची उपस्थिती
आंदोलनात खालील मान्यवर सहभागी झाले होते
सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष: डी. राम रेड्डी*
*महाराष्ट्र नवनिर्माण सेना*
*बहुजन क्रांती सेना*
*सोलापूर विकास मंच सदस्य:* विजय जाधव, मिलिंद भोसले, केतन शहा, योगिन गुर्जर, सुहास भोसले, आनंद पाटील, दत्तात्रय अंबुरे, सुशील कुमार व्यास, इकबाल हुंडेकरी, नरेंद्र भोसले, हर्षल कोठारी, राजीव देसाई, प्रसन्ना नाझरे, काशिनाथ भतगुणकी, अर्जुन रामगिर, सुभाष वैकुंटे, बिराजदार राजू, अशोक अहुजा, संजय वाकडे, गौरी अंबेकर, विनय वडगावकर, शुभदा पाटील, भरत पाटील, किसन रिकेबी, आरती अरगडे, अमृता अकलूजकर, शैलेंद्र क्षीरसागर, प्रशांत भोसले, कुंडल राकेश, घनश्याम डायमा, नागेश काकी, अमित कामतकर, श्रीकांत अंजुटगी, श्रीनिवास पोटाबत्ती, लक्ष्मीकांत दंडी, बाळासाहेब मोरे, सुनील दस्सल, शशिकांत बनसोडे, प्रभाकर कमटम, परवेज पिरजादे, रवींद्र कोळी, महेश चिंचोळे, राजकुमार राठोड, अब्दुल शेख.
*सुरवसे कुटुंबीयांची उपस्थिती:*
प्रभा सुरवसे, विजय सुरवसे, अनुराधा सुरवसे, शैला सुरवसे, सुमन सुरवसे, श्वेता सुरवसे, राखी सुरवसे, सुमन लोखंडे, युवराज सुरवसे.
*इतर प्रतिष्ठित नागरिक:*
विनोद क्षीरसागर, सरताप काझी, नीलकंठ उंबरजगीकर, सतीश दारूकर, विनोद सिद्धम, विनय वरणगावकर, मनोज कुमार तमिवार, शेखर बंगाळे, मोसिन शेख, संतोष कसे, बनसोडे कोहीरकर, रोहन झटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
े