Livesolapur News

Livesolapur News livesolapur news
(22)

राहुल गांधी यांची आ.प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापुरातील सभेतून LIVE...
24/04/2024

राहुल गांधी यांची आ.प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापुरातील सभेतून LIVE...

राहुल गांधी यांची ४२, सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारआमदार प्रणितीताई शिंदे या....

15/04/2024

लोकसभा उमेदवार आ.प्रणिती शिंदे पत्रकार परिषद...

11/04/2024

रक्तातील साखर म्हणजे डायबिटीस नव्हे - डॉ.नानासाहेब साठे

05/04/2024

पाण्याविना शेतकरी संकटात

पाणी म्हणजे जीवन आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पाण्याची गरज आहे. पाण्याविना सर्व सजीवांचे जगणे केवळ अशक्यच आहे.माणूस हा प्राणी पाण्याविना जीवनाचा विचार देखील करु शकत नाही.मानवाच्या शारिरीक,आर्थिक,मानसिक गरजा या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पाण्याशी निगडित आहेत.मानवाच्या शारिरीक गरजा तर पाण्यावरच अवलंबून आहेत.मानवाला पिण्यासाठी स्वच्छतेसाठी,शेतीसाठी,औद्योगिक गरजांसाठी पाणी आवश्यक आहे.शेतीसाठी पाणी हे तर सर्वात महत्त्वाचे आदान आहे.पाण्याविना शेती होऊच शकत नाही.

भारत देश हा कृषिप्रधान देश आहे.भारतातील शेती ही नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे.भारतात पावसाळा हा प्रामुख्याने चारच महिन्यांचा ऋतू आहे.या चार महिन्यात पडणाऱ्या पावसावर शेतीचे संपूर्ण वर्षभराचे नियोजन ठरते.या चार महिन्यांत पाऊस कमी पडला तर त्याचा शेतीवरच नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम दिसून येतो.

शेतीसाठी पावसाच्या पाण्याबरोबरच विहिर,तलाव,कुपनलिका,धरण व त्यापासून काढण्यात आलेले कालवे इ.मार्गानी पाणी मिळविले जाते.हे सर्व मार्ग प्रत्यक्षपणे पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहेत.पावसाचे जे पाणी जमिनीत मुरते तेच विहिरी व कूपनलिका इ.च्या माध्यमातून उपसले जाते पावसाचे साठविलेले पाणी धरण,कालवे व तलाव इ.मधुन प्राप्त होते.गेल्या काही दिवसांमध्ये शेतीच्या एकूण क्षेत्रापैकी लागवडीखालील क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली.तसेच पीकरचनेत बदल झाले.ऊस व तत्सम बागायती व नगदी पिकांकडे शेतकरी वळु लागला.त्यामुळे उपलब्ध पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला.शेतीसाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होऊ लागला.त्यामुळे पाण्याच्या पातळ्या दिवसेंदिवस खालावत गेल्या.दहा-पंधरा वर्षापूर्वी चाळीस फुटापर्यंत असलेली विहिर शंभर फुटापर्यंत कधी गेली हे कळालेच नाही आणि शंभरीपर्यंत असणारी बोअर हजारामध्ये कधी पोहचली व त्याप्रमाणात खिसा कधी रिकामा झाला हे विचार करायला शेतकरी बांधवांना विचार करायला वेळच मिळाला नाही.एक तर जागतिक पातळीवरील हवामान बदलांमुळे पावसाच्या प्रमाणावर परिणाम झाला,तापमानात वाढ झाली.याचा परिणाम कृषी अर्थव्यवस्थेवर झाला.पिकांपासुन मिळणारे उत्पादन घटले.

पेलिओ हिस्टाॅरिक वाॅटर-

मध्यंतरी मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास करताना शास्त्रज्ञांना दिसुन आले की मराठवाड्यातील बहुसंख्य बोअरवेल्सला असणारे सध्याचे पाणी हे ' पेलिओ हिस्टाॅरिक वाॅटर ' आहे.म्हणजेच ते ऐतिहासिक पाणी आहे.आपल्या पूर्वजांनी जे पाणी जमिनीत मुरवले,ज्या पाण्याचा साठा केला,ते पाणी म्हणजे ऐतिहासिक पाणी होय.आपल्या पूर्वजांनी पुढील पिढीसाठी हे पाणी जतन केले.आपण ते पाणी उपसतोय.मग आपल्या पुढच्या पिढीचे काय ? पुढच्या पिढीचा काय आपल्या पिढीचाच विचार केला तर अंगावर काटे नक्की उभा राहतील.
महाराष्ट्राची भौगोलिक रचना-
महाराष्ट्राचा जवळजवळ ९०% भाग हा अग्निजन्य खडकापासुन बनला आहे.हा खडक कठीण असतो पावसाचे पाणी या खडकात मुरू शकत नाही.हे पाणी नद्या,नाले,ओढे इ.मधून वाहुन जाते त्यामुळे पावसाचे पाणी हेतुपूर्वक जमिनीत मुरवले पाहिजे.बंधारे,धरणे इ.मध्ये साठवून ठेवले पाहिजे.

विहिर व कुपनलिका यांच्या खोलीवर बंधने आणली पाहिजेत-
विहिर व कुपनलिका यांच्या खोलीवर,अंतरावर,संख्येवर बंधने घातली गेली पाहिजेत तसेच त्यासंबंधीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जावी.

ठिबक सिंचन-
ठिबक सिंचनाची सोय सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे.तसेच सर्वप्रकारच्या बागायती पिकांना ठिबक सिंचनाची गरज व्यक्त केली पाहिजे.

पिक रचनेत बदल करणे गरजेचे-
कमी पाण्यावर जगु शकणारी व अधिक उत्पादन देणारे पिके घेतली पाहिजेत,त्याचबरोबर शेतमालाला योग्य भाव असणारी पिके अधिकाधिक घ्यावी.अधिक पाणी लागणारी ऊसासारखी भस्मासुराचा अवतार असणारी पिके काही प्रमाणात कमी केली पाहिजे.

जलसंधारण,जलपुर्नभरण इ.वर भर दिला पाहिजे.

भौगोलिक क्षेत्र,हवामान,पाण्याची उपलब्धता इ.वर आधारीत पिक रचनेसाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घ्यायला हवा.

कमी पाण्यावर ऊस व तत्सम नकदी पिके ठिबक सिंचनाच्या सह्याने देखील घेतली जाऊ शकतात याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती केली पाहिजे.

विहिरींची खोली,बोअरची खोली या गोष्टी आपल्यासाठी भूषणावह नाहीत.तर पाण्याची पातळी जेवढी वर राहिल तेवढे आपले व आपल्या पुढच्या पिढीचे जिवन सुखात व समाधानात जाईल.

धरणात साठविलेल्या पाण्याचे योग्यपणे वाटप व्हावे.तसेच त्या पाण्याचा उपयोग काही प्रमाणात भूजलपातळी वाढविण्यासाठी देखील उपयोग होऊ शकतो.

- पै.माऊली नागनाथ हेगडे, सामाजिक कार्यकर्ते.मु.पो.हराळवाडी, ता.मोहोळ जि.सोलापूर(९०११६१६११५)

04/04/2024

सोलापूरचा विकास; गरज व वास्तव '

लेखक - समाजिक कार्यकर्ते पै.माउली हेगडे...

श्री सिद्धेश्वराच्या पद्स्पर्शाने पावन झालेले सोलापूर हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे शहर आहे.भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासून सोलापूरचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारताच्या नकाशावर विशेषत:आधोरेखित झालेले दिसून येते.गिरणी कामगारांचे स्वातंत्र्य लढ्याबरोबर स्वातंत्र्यानंतरच्या काळात सोलापूरच्या विकासातील योगदान महत्त्वपूर्ण राहिलेले आहे.सोलापूरची ओळख या गिरणी कामगारांमुळे गिरणगाव म्हणून निर्माण झाली.औद्योगिकीकरणाच्या युगात सोलापूर बदलत गेले.सोलापूर शहर व जिल्हाचा विकास होत गेला.परंतु मुंबई,पुणे,नाशिक या शहरांच्या तुलनेत सोलापूरच्या विकासाचा वेग हा काहीसा कमी राहिलेला दिसून येतो.

सोलापूरच्या औद्योगिक विकासाचा पाया कापड गिरण्यांच्या रूपाने तयार होता.परतू सोलापूर शहर व जिल्हाचा ज्या वेगाने विकास होणे अपेक्षित होते त्या प्रमाणात विकास झाला नाही.सोलापूरची शान व मान असणाऱ्या गिरण्या नंतरच्या काळात बंद पडत गेल्या हजारो गिरणी कामगार बेघर झाले.सोलापूरच्या वैभवाच्या खुणा आता इतिहासाच्या रूपाने शिल्लक राहिल्या आहेत.

सोलापूरचा विकास एम.आय.डी.सी.च्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला गेला या प्रयत्नांना काही प्रमाणात यश मिळत गेले अनेक कामगारांना रोजगार प्राप्त झाला.परंतु,अंतरराष्ट्रीय दर्जाचे औद्योगिक प्रकल्प सोलापूरला आजूनही आलेले नाहीत.मध्यंतरी बोरामणीत अंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ मंजूर झाले आहे.एन.टी.पी.सी.च्या रूपाने सोलापूरला राष्ट्रीय दृष्टीने महत्वाचा प्रकल्प सुरू आहे.सोलापूरतील उद्योगांना विजेचा तुटवडा, कच्चामालाच्या वाढत्या किंमती यासारखा समस्यांना नेहमी तोंड द्यावे लागते या समस्या दुर करण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सोलापूर शहरांमध्ये मराठी, हिंन्दी, कन्नड, तेलगु इ.भाषिक लोक राहतात.या सर्व भाषिक,धार्मिक,जातीय लोकांच्या एकत्र वास्तव्यामुळे सोलापूरचे संस्कृतीक जिवन समृद्ध झालेले आहे.सोलापूर हे साखर कारखान्याने व सिमेंट फॅक्टरर्‍यामुळे भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक शहर म्हणुन ओळख आहे.धुळीचे असणारे प्रचंड प्रमाण या प्रदूषणामुळे वाढ होण्यास कारणीभूत ठरत आहे.परंतु या प्रश्नांकडे जेवढ्या गांर्भियाने लक्ष देण्याची गरज आहे तेवढे अजून दिले गेले नाही.

सोलापूर शहरातील नागरिकांना प्रदुषणाबरोबर भेडसावणारी आणखी एक महत्वाची समस्या म्हणजे शहरातील खराब रस्ते सोलापूर शहरातील रस्त्याची अवस्था गेले काही दिवस खुपच खराब झाले आहेत.ठराविक दोन-चार रस्ते सोडले तर इतर रस्त्याची अवस्था खुपच खराब झाली आहे.पावसाळ्यात तर या रस्त्यावरून पायी चालणे अशक्य होऊन बसते त्यावरून गाडी चालविणे ही तर एक मोठी कसरतच होऊन बसते त्यामुळे सोलापूर शहरवासी चांगल्या पक्या रस्त्यांच्या प्रतिक्षेत आहेत.सोलापूरमध्ये अलीकडील काळात शैक्षणिक क्षेत्रात मोठ्याप्रमाणात बदल झाल्याचे ठळकपणे दिसून येत आहे.सोलापूर विद्यापीठाची स्थापना ही यामधील एक महत्वाची घडामोड ठरली आहे.फक्त एका जिल्ह्यासाठी असणारे महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ असा गौरव सोलापूर विद्यापीठास प्राप्त झाला आहे.अनेक नावाजलेल्या शिक्षण संस्थांची स्थापना सोलापूरमध्ये झाली आहे.त्यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणाची सोय झाली आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्याच्या विकासास खूप वाव आहे.सोलापूरास सुशीलकुमार शिंदे, शरद पवार,विजयसिंह मोहिते- पाटील यांचे नेतृत्व लाभले आहे.दोन देशमुखांनी मंत्रीपदे भूषविली आहेत.येणाऱ्या काळात हे मान्यवर सोलापूरकरांस भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतील का? अशी आशा सोलापूरकरांना आहे.तसेच सोलापूर महानगरपालिकेतील सर्व सत्ताधारी व विरोधक एकत्र येऊन सोलापूर शहरास स्मार्ट सिटी व गतवैभव प्राप्त करून देण्यास प्रयत्नशील राहतील का?अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

पै.माऊली नागनाथ हेगडे
सामाजिक कार्यकर्ते.मु.
पो.हराळवाडी,ता.मोहोळ
जि.सोलापूर.मो. नं.
९०११६१६११५

31/03/2024

राष्ट्रवादी शरद पवार गट प्रेस

29/03/2024

शिंदे परिवारातील तिसऱ्या व्यक्तीचा पराभव करण्यासाठी शिवसेना सज्ज - मनीष काळजे #

28/03/2024

अरे भिडायचं असेल तर माझ्याशी भिडा, माझ्या वडिलांना काय मध्ये घेता

28/03/2024

लावणी मोहत्सव...

24/03/2024

भाजप ची राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी

22/03/2024

उमेदवारीबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार, भाजप बद्दल गावोगावी रोष दिसून येत आहे, प्रणिती शिंदे

21/03/2024

सरकोली येथील मराठा बांधवानी प्रणिती शिंदे यांना गावात येण्यापासून रोखले

15/03/2024

लोकांचा विश्वास राहुल गांधी अथवा ममता बॅनर्जीवर नाही तर मोदीवर आहे

15/03/2024

काँग्रेस ने जरी मला सांगितलं भाजप मध्ये जा तरी मी जाणार नाही

14/03/2024

होय रं आमदार खासदार केल्यावर अन्याय होतोय का... ओमराजे निंबाळकर संतापले

13/03/2024

मंत्री तानाजी सावंत यांच्यावर शिवसेना उबाटा गट नेत्याची सडकून टीका

12/03/2024

कर्णकर्कस आवाजाचा बुलेटचा सायलेंसर पोलिसात केला जमा, वाहन धारकाने सुधारली स्वतःची चूक

12/03/2024

सोलापुर लोकसभेसाठी मोची समाज बंडाच्या पवित्र्यात

12/03/2024

अबकी बार 400 पार नव्हे, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे

11/03/2024

आणि खासदारांना मराठा बांधवांनी गावाच्या बाहेर काढले

11/03/2024

लोकसभेसाठी मराठा समाज मैदानात, प्रत्येक मतदारसंघात किमान 1500 उमेदवार

08/03/2024

सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे इच्छुक

07/03/2024

महाराष्ट्र सोलापूर पोलीस बुलेटवरून आयोध्येत, उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवले

प्रभाग क्र. २२ येथील विजापूर नाका रेवणसिद्धेश्वर नगर मातंग वस्ती येथील रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे शुभारंभ...सामान्य माणसा...
06/03/2024

प्रभाग क्र. २२ येथील विजापूर नाका रेवणसिद्धेश्वर नगर मातंग वस्ती येथील रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे शुभारंभ...

सामान्य माणसांशी नाळ आणि स्वच्छ राजकारणाची प्रतिमा म्हणजेच किसन जाधव...

स्थानिक रहिवाशांनी मानले जाधवांचे आभार..

सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ येथील विजापूर नाका रेवन सिद्धेश्वर नगर मातंग वस्ती येथे सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सण २०२२-२३ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरिक दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत ७ लाख ३५हजार ३९० रुपये खर्चित या रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे शुभारंभ करण्यात आले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे या रस्ता कामासाठी विशेष सहकार्य लाभले. प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी किसन जाधव आणि नागेश गायकवाड हे नेहमी अग्रेसर असतात. सामान्य माणसांशी नाळ आणि स्वच्छ राजकारणाची प्रतिमा अशी किसन जाधव यांची ओळख आहे. असे मनोगत यावेळी उपस्थित नागरिकांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका तसेच महाराष्ट्र शासनाच्या स्तरातून सर्वाधिक निधी खेचून आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला असे मनोगत यावेळी किसन जाधव यांनी व्यक्त केलं.

या रस्ता कामाचे शुभारंभ प्रसंगी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव, ज्येष्ठ नागरिक शिवराय बुक्कानुरे, राहुल हत्ती, प्रकाश चव्हाण, जितू आठवले, योगिनाथ हिंगमिरे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, पिंटू सुरवसे, सुनील कांबळे, गंगाधर हिरेमठ, सिद्धू पवार, सुरज कांबळे, हरिदास सुरवसे, मल्लिनाथ जाधव, शहाजी सुरवसे, बिराजदार विश्वनाथ सुरवसे, सौदागर ठोंबरे, आकाश तोरणे, सुरेखा बोराळे, सुजाता अजूटगी, ज्योती कदम, छायाताई व्हणमोरे, रेणुका मठपती, लक्ष्मीताई वाघ कांताबाई कांबळे, गौराबाई पाटील,बिराजदार ताई यांच्यासह प्रभागातील युवक व ज्येष्ठ नागरिक महिला यांच्या उपस्थितीत या रस्ता कामाचे शुभारंभ करण्यात आले.

प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी तसेच स्थानिक रहिवाशांना मूलभूत सुविधांसाठी पाठपुरावा करून ते काम मार्गी लावण्यासाठी किसन जाधव आणि नागेश गायकवाड हे नेहमी प्रयत्नशील असतात त्यामुळेच प्रभागाचा सर्वांगीण विकास होत आहे असेच कार्य त्यांच्या हातून येणाऱ्या काळात होईल अशी अपेक्षा येतील स्थानिक रहिवाशांनी यावेळी व्यक्त करत किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचे या रस्ता शुभारंभ प्रसंगी आभार मानले.

03/03/2024

भाजपमध्ये फडणवीस आहेत तो पर्यंत भाजप ला मतदान नाही,मराठा समाजाचा निर्णय

02/03/2024

प्रमोद गायकवाड यांची महाविकास आघाडीकडे लोकसभेच्या उमेदवारीची मागणी

02/03/2024

दोन-तीन टर्म पासून पराभूत होणाऱ्या काँग्रेस च्या जागा वंचित आघाडीला दया

29/02/2024

मनोज जरांगे पाटील साठी सोलापुरातील मराठा समाजाच्या महिला आक्रमक

22/02/2024

श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांचा 67 वा पुण्यतिथी मोहत्सव 25 फेब्रुवारी पासून

20/02/2024

सरकार ने मराठा समाजाला गाजर दाखवलं आता मराठा समाज गाजर दाखवेल

Address

Solapur
413001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Livesolapur News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Livesolapur News:

Videos

Share

Nearby media companies


Other Social Media Agencies in Solapur

Show All