Smart Solapurkar

Smart Solapurkar Trending Digital Media In Solapur news

20/12/2023

आमदार मंगेशदादांनी पर्यावरण कार्यकर्त्याला गप्प बसवलं!

पहा काय झाला संवाद..

MLA Mangesh Chavan Aamsabha Viral

18/12/2023

बँकर न लावता चढते भोर अन् थळ घाट!

आत्मनिर्भर #वंदेभारत एक्सप्रेसचा न्याराच थाट!!

देगावची कन्या उच्च शिक्षणासाठी जाणार अमेरिकेलाअनसूया वाघमारेला मिळाली 18 लाखांची शिष्यवृत्तीसोलापूर : म्हारी छोरियां छोर...
18/12/2023

देगावची कन्या उच्च शिक्षणासाठी जाणार अमेरिकेला

अनसूया वाघमारेला मिळाली 18 लाखांची शिष्यवृत्ती

सोलापूर : म्हारी छोरियां छोरोंसे कम हैं के? हा दंगल चित्रपटातील आमीर खानचा डायलॉग प्रत्यक्षात खरा करून दाखविला आहे देगावच्या एका कन्येने व तिच्या पित्याने.

एकामागून एक तीन मुली झाल्यानंतर तिच्या वडिलांना जवळच्याच लोकांकडून खूप बोलणे खावे लागले. मात्र त्या मुलींच्या पित्याने आपल्या मुलीला इतके चांगले शिक्षण दिले की ‘हम भी किसीसे कम नही’ हे सिध्द करत व वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत त्या मुलीने अमेरिकेतील एका विद्यापीठाची उच्च शिक्षणासाठी तब्बल 18 लाखांची शिष्यवृत्ती मिळविली आहे.

मूळची देगाव, तालुका उत्तर सोलापूर येथील मात्र सध्या मुंबई येथे राहात व शिक्षण घेत असलेल्या अनसूया नवनाथ वाघमारे हिने आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर ही उंच भरारी घेतली आहे.

अनसूया वाघमारे हिचे पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण सीबीएसई बोर्डाच्या माध्यमातून अ‍ॅटोमीक एनर्जी सेंट्रल स्कूल, अणुशक्ती नगर मुंबई येथून झाले. तिने दहावीला 87 टक्के तर बारावीला 92 टक्के गुण मिळविले असून आता तिला बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स या पुढील पदवीच्या शिक्षणासाठी युनिव्हर्सिटी ऑफ आयडाहो या अमेरिकेतील विद्यापीठाची 15 ते 18 लाखांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.

ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी आयडीबी या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या ऑफलाइन पात्रता परीक्षेत अनसूया हिने आय.इ.एल.टी.एस.परीक्षेमध्ये नऊपैकी सात बँड मिळविले तर एस.ए.टी. परीक्षेत 1600 पैकी 1100 गुण मिळविले आहेत. तसेच 45 मिनिटे चाललेल्या ऑनलाइन मुलाखतीत अपेक्षित उत्तरे दिली. यामुळे ती शिष्यवृत्ती मिळविण्यास पात्र ठरली आहे. आता ती चार वर्षे अमेरिकेतच स्थायिक होवून आपले शिक्षण पुर्ण करणार आहे. आपल्या पुढील शिक्षणासाठी ती जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेला रवाना होणार आहे. त्याचबरोबर शिक्षण पुर्ण केल्यानंतर परत भारतात आल्यावर सॉफ्टवेअर डेव्हलपर बनून देशसेवा करणार असल्याचे तिने सांगितले. तसेच आपल्या या यशात शिक्षकांसह आई नीता, आजोबा दत्तात्रय, आजी पद्मिनी वाघमारे तसेच आजी तेजा घंटे व कल्पना घंटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे तिने सांगितले.

वाहनचालक वडिलांनी दिले प्रोत्साहन
अनसूया हिचे वडील नवनाथ दत्तात्रय वाघमारे हे भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई येथे ग्रेड एक वाहनचालक पदावर कार्यरत आहेत. त्यांनीच तिला उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन व पाठिंबा दिला आहे. आपल्या कन्येच्या या भरारीविषयी ते म्हणाले की, आपण स्वत: जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेत शिकलो आहोत. मात्र आपल्याला शिक्षण किती महत्वाचे आहे, याची जाणीव असल्याने आपण मुलीच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. मुलीनेही त्याचे चीज केले, याचा आपल्याला अभिमान आहे. शिवाय आपल्याला तिन्ही मुलीच असल्याने अनेकांकडून नको त्या गोष्टी ऐकाव्या लागल्या होत्या. त्यामुळे आपण मुलींना काहीही झाले तरी उच्च शिक्षण देण्याचा चंगच तेव्हापासून बांधला होता. आता मोठया मुलीने अपेक्षेप्रमाणे भरारी घेतली आहे याचे मोठे समाधान आहे. मी यानिमित्ताने एकच सांगेन मुलगा - मुलगी असा भेदभाव करणे चुकीचे आहे. कारण मुलीदेखील मुलांपेक्षा कोठेही कमी नाहीत हेच खरे आहे.

मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बार्शीत पहिलं पुस्तकManoj Jarange Patil Book be Pratap Nalawadeबार्शी : एका सर्वसामान्य शेतकर...
17/12/2023

मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बार्शीत पहिलं पुस्तक

Manoj Jarange Patil Book be Pratap Nalawade

बार्शी : एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या तरूणाने आपल्या जिवाची बाजी लावत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्याला जोरदार प्रतिसाद मिळाला आणि संपूर्ण मराठा समाज एकवटला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या आंदोलनावर आंतरवाली ते मुंबई हे पुस्तक प्रकाशित होत आहे. प्रकाशनापूर्वीच या पुस्तकाला केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून मागणी होऊ लागली आहे.

विशेष म्हणजे बार्शीपुत्र पत्रकार प्रताप नलावडे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे, बार्शी तिथं सरशी ही म्हण पुन्हा एकदा सत्यात उतरली आहे.

प्रकाशनापूर्वीच राज्यभरातून अनेकांनी या पुस्तकासाठी नोंदणी केली असून तामीळनाडू, मध्यप्रदेश, दिल्ली, गुजरातमधूनही वाचकांनी पुस्तकासाठी नोंदणी केली आहे. गेली वीस वर्षे मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या माध्यमातून अतिशय प्रामाणिकपणे काम केले. त्यांच्या आंतरवाली सराटीतून सुरू झालेल्या आंदोलनाची सविस्तर कहाणी या पुस्तकात मांडली आहे. आंतरवाली सराटीत झालेला लाठीचार्ज, सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संवाद जसा या पुस्तकात आहे, तसाच मनोज जरांगे पाटील यांच्या एकूणच वीस वर्षाच्या आंदोलनाचा आढावाही आहे. त्यांच्या रोखठोक शैलीतील भाषणांचा आणि राज्यव्यापी दौऱ्याचाही वृत्तांत या पुस्तकात मांडण्यात आला आहे. मराठा आरक्षणाची आवश्यकता, आरक्षणासाठी आजवर दिलेले लढे, कायदेशीर लढा देणारे विनोद पाटील यांची कहाणी, आणि मराठा अभ्यासकांनी आरक्षणाची केलेली मांडणीही या पुस्तकात आहे. राजकीय मंडळींशी जरांगे पाटील यांचा झालेला वाद आणि बीडमध्ये आंदोलनाला लागलेल्या हिंसकवळणाचीही कहाणी या पुस्तकातून मांडण्यात आली आहे.

पुस्तकासाठी संपर्क

आरक्षणाचा लढा घराघरात पोहोचविण्यासाठी -
मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणासाठीचा लढा घराघरात पोहोचविण्यासाठी या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली असल्याचे बीएफएम इंटरप्राईजेसच्या वतीने सांगण्यात आले. आरक्षणाची गरज मराठा समाजाला का आहे, याचीही मांडणी या पुस्तकातून करण्यात आलेली आहे.

पुस्तकाची ऑनलाईन मागणी करण्यासाठी ९४०४६७६५०७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन बीएफएम इंटरप्राईजेसच्या वतीने करण्यात आले आहे. ना नफा ना तोटा, अशा तत्वावर या पुस्तकाची विक्री करण्यात येत आहे.

रक्तदानासाठी गर्दीच गर्दी!दर्बी चॅरिटेबल ट्रस्टच्या रक्तदान शिबीरात 471 जणांचे रक्तदानDarbi Family Blood Donation Activi...
17/12/2023

रक्तदानासाठी गर्दीच गर्दी!

दर्बी चॅरिटेबल ट्रस्टच्या रक्तदान शिबीरात 471 जणांचे रक्तदान

Darbi Family Blood Donation Activity News

सोलापूर : स्वर्गिय जयरामसा गोपाळसा दर्बी आणि अंबुबाई जयरामसा दर्बी यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने दर्बी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शुक्रवार पेठेतील महावीर सांस्कृतिक भवनमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 471 रक्तदात्यांनी रक्तदान करून विक्रम केला.

प्रारंभी स्वर्गिय जयरामसा दर्बी आणि स्वर्गिय अंबुबाई दर्बी यांच्या प्रतिमेला राजुसा काटवे, रघुनाथसा बंकापुरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून रक्तदान शिबीराला सुरूवात झाली. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे याचे महत्व ओळखून दर्बी परिवाराच्या वतीने दरवर्षी 12 डिसेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. यंदाचे हे सातवे वर्ष आहे.

सकाळी 9 वाजता सुरू झालेले हे रक्तदान शिबीर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास बंद करण्याची वेळ आली. नागरीक, तरूणांची मोठी झुंबड रक्तदान करण्यासाठी होती. रक्तदान नको असे म्हणण्याची वेळ संयोजक आणि रक्तपेढीवर आली. तरीही अनेकांच्या आग्रहाखातर हे शिबीर दुपारी 3 वाजेपर्यत सुरू ठेवण्यात आले‌. यामध्ये 471 रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य पार पाडले. डॉ. हेडगेवार रक्तपेढी, सिध्देश्वर ब्लड बँक आणि शिवशंभू रक्तपेढी अशा तीन रक्तपेढ्यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबीर पार पडले. रक्तदानासाठी उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून दर्बी परिवारातील प्रत्येक सदस्यांनी रक्तदात्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

यावेळी गोपाळसा दर्बी, नित्यानंद दर्बी, लक्ष्मण दर्बी, जयंत दर्बी, कलबुरगी सर, जयेश दर्बी, संजीव काटवे, गिरीष दर्बी, यशपाल दर्बी, जयेश गोरख,राजेश दर्बी, आमरेश दर्बी, जय दर्बी, पुजा गोरख, अमृता काटवे, ऍड मंगला जोशी - चिंचोळकर, हेमा चिंचोळकर, डॉ. सचिन पांढरे, सुधाकर जाधव, सुतकर सर, सज्जन निचळ यांच्यासह दर्बी परिवार आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

16/12/2023

कंट्रोल करा.. विधानसभा अध्यक्षांनी थांबवलं!
▪️तरीही आमदार मंगेश चव्हाण बोलत राहिले..

MLA Mangesh Chavan
मंगेश चव्हाण

14/12/2023

दक्षिण दिग्विजय मोहीम फत्ते!
🚩हिंदवी परिवाराचा उपक्रम; जिंजी, साजिरा-गोजिरा, वेल्लोर किल्ल्यात भटकंती

Hindavi Pariwar Mohim 2023 | Gingee Fort Sajira Gojira Fort Vellore Tanjore Palace
Dr Shivratn Shete

14/12/2023

MLA Praniti Shinde
Solapur Civil Hospital

06/12/2023

दादांच्या प्रश्नांना फॉरेस्ट ऑफिसरची उत्तरं

MLA Mangesh Chavan
Aamsabha Viral Video
आमदार मंगेश चव्हान

06/12/2023
06/12/2023

कोण संजय राऊत?

निवडून येऊ शकत नाही!

MLA Mangesh Chavan
BJP Sanjay Raut

पर्यावरणपूरक दिवाळी जागरसोलापूर : इको फ्रेंडली क्लबच्यावतीने जुळे सोलापुरातील कै.वि.मो.मेहता माध्यमिक शाळेत पर्यावरणपूरक...
09/11/2023

पर्यावरणपूरक दिवाळी जागर

सोलापूर : इको फ्रेंडली क्लबच्यावतीने जुळे सोलापुरातील कै.वि.मो.मेहता माध्यमिक शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा उपक्रम राबविण्यात आला. सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले.

प्रारंभी इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुधंरा मित्र परशुराम कोकणे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळीचे महत्व पटवून सांगितले. त्यानंतर पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी फटाके मुक्त दिवाळीचा मंत्र दिला. फटाके उडविल्याने होणारे दुष्परिणाम, आरोग्यास धोका, फुफुसांचे आजार, ध्वनी प्रदूषण, कानाचे आजार या अनुषंगाने पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी विद्यार्थ्यांसोबत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला.

यावेळी इको फ्रेंडली क्लब समन्वयक अजित कोकणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रुती बागेवाडी यांनी केले. आभार शाळेच्या सहशिक्षका वैशाली दुनगे यांनी मानले. या कार्यक्रमास पर्यवेक्षिका सुस्मिता तडकासे, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.


नूतन जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन व मंदीर समितीचे नियोजन पाहून झाले प्रभावीत श्री...
19/08/2023

नूतन जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन व मंदीर समितीचे नियोजन पाहून झाले प्रभावीत

श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेणे यासाठीही खूप मोठ भाग्य लागतो. आज जीवनात भारतीय प्रशासन सेवेचा सेवक असून सुद्धा स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याची पर्वणी आजपर्यंत आपल्याला लाभलेली नव्हती. आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट दिल्यानंतर मंदिरातील स्वच्छता, भाविकांना स्वामी दर्शनाचे नियोजन, मंदिर समितीचे उपक्रम जाणून घेतल्यानंतर स्वामी दर्शनाने आपण भारावलो आहे, म्हणून स्वामी दर्शन व मंदिर समितीचे नियोजन पाहून आपण खूपच प्रभावित झालो असल्याचे मनोगत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.

याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र शासन म्हाडा कॉलनीचे उपाध्यक्ष संजय जैस्वाल, जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाठ, मंडल अधिकारी ओंकार माने, अक्कलकोट नगरपरिषदचे नगर अभियंता मल्लय्या स्वामी, कार्यअधीक्षक मलिक बागवान, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, म्हेत्रे तलाठी, गिरीश पवार, विपुल जाधव, संजय पवार इत्यादी उपस्थित होते.

वर्सोवा विधानसभा मतदार संघात श्रावण सोहळा मंगळागौर उत्सवात अमृता फडणवीस यांनी मराठमोळी नऊवारी साडी नेसून मंगळागौरीचे खेळ...
18/08/2023

वर्सोवा विधानसभा मतदार संघात श्रावण सोहळा मंगळागौर उत्सवात अमृता फडणवीस यांनी मराठमोळी नऊवारी साडी नेसून मंगळागौरीचे खेळ खेळले, फुगडी खेळली, उखाणा घेतला.

17/08/2023

पत्रकार संरक्षण कायद्याची होळी | पत्रकारांवरील हल्ल्यांचा निषेध | Patrakar Andolan

15/08/2023

असा झाला जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण सोहळा
🔸 मंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थिती; तंबाखू मुक्तीची शपथ आणि बरंच काही..

15/08/2023

स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर मार्गदर्शन मंत्री हसन मुश्रीफ सोलापूरविषयी म्हणाले..

काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागा : आमदार प्रणिती शिंदेकाँग्रेस मावळ लोकसभा आढावा बैठकपनवेल :  काँग्रेस पक्ष...
14/08/2023

काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागा : आमदार प्रणिती शिंदे

काँग्रेस मावळ लोकसभा आढावा बैठक

पनवेल : काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि मावळ लोकसभा निवडणूक निरीक्षक प्रणिती शिंदे यांनी पनवेलमध्ये जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि काँग्रेस पक्षात पदाधिकाऱ्यांना कोणत्या अडचणी भेडसावत आहेत का ? याबाबत चर्चा केली.

यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदार संघातील आढावा बैठक घेवून नव्या उमेदीने काम करण्याची ऊर्जा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केली.

आगामी निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व आणण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच एकजुटीने कामाला लागावे,असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.सदर आढावा बैठकीच्या व्यासपीठावर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे,रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत,कॅप्टन कलावत,मल्लिनाथ गायकवाड,निर्मला म्हात्रे, श्रुती म्हात्रे,हेमराज म्हात्रे आदी उपस्थित होते.

‘सायकल लवर्स’कडून 76 किमीची सायकल फ्लॅग राईड76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अनोखा उपक्रमसोलापूर : 76 व्या स्वातंत्र्य दि...
14/08/2023

‘सायकल लवर्स’कडून
76 किमीची सायकल फ्लॅग राईड

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अनोखा उपक्रम

सोलापूर : 76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वंसंध्येला सोलापुरातील सायकल लवर्स सोलापूर या क्लब कडून रविवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी 76 किलोमीटर सायकल राईड चे आयोजन करण्यात आले होते.

या राईडमध्ये सोलापुरातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी सहभाग घेऊन सोलापूर ते माचनूर परत सोलापूर असे 76 किलोमीटर अंतर पूर्ण केले. श्रीनिवास ननवरे (वय वर्ष 8), जय जोशी वय 11 वर्ष या लहान चिमुकल्यांनी ही राईड मध्ये सहभाग नोंदवला व सर्व सायकल स्वरांसोबत सायकलिंग केले.

सोलापुरातील भैय्या चौक येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून सकाळी सहा वाजता राइडला सुरुवात झाली. एसआर दादाराव इंगळे यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करण्यात आले. पुढे कामती मार्गे माचनुर पर्यंत सायकलिंग करण्यात आले. माचनूर येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेऊन परत भैया चौक पर्यंत असे 76 किलोमीटर सायकलिंग सर्वांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. यावेळी सर्व सायकल स्वरांनी तिरंगी रंगाच्या जर्सी परिधान केल्या होत्या तसेच सायकल ला तिरंगी झेंडे फडकत होते. आणि देशभक्तीपर घोषणा देत उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणात सर्वांनी राईड पूर्ण केली.

सदर राईड मध्ये दादाराव इंगळे,
अमेय केत, प्रविण जवळकर,रूपाली जोशी,प्रवीण नन्नवरे,बालाजी सुरवसे
तृप्ती राठी,अंबरीश कदम,
चंद्रकांत क्षीरसागर,जय जोशी
सीमा मंगरुळे,सोमनाथ पाटणे
मंजुषा,प्रदीप कदम,
वैशाली जोशी,सुशांत कुलकर्णी,
अतुल बांदिवडेकर, नागेश गायकवाड, महेशसिंग राजपूत,महेश शिंदे,लगमन्ना माळी, शिवलिंगय्या स्वामी,
सुरेश मनुरे, अभिजीत वाघचवरे,
राजश्री वाघचवरे,रुपेश कुलकर्णी,हर्षवर्धन जोशी,विजया देवाडकर,सीमा क्षीरसागर,सपना रामभिया, अद्वैत लवटे,
विनीत शाह,डिंपल कांकरिया,
सचिन जगताप,अजय मळगणकर,गिरीराज जखोटिया,नागरत्न एलगोंडे, नागेश स्वामी,रोहन वर्धा,प्रकाश गिरी,जतीन पटेल,चंदू पाटणे,विराज माने,शिवतेज माने,ऋषिकेश चौगुले,
रघुवीर फलमारी,सुमित बारडोळे,अविनाश देवाडकर,
महेश बिराजदार यांनी सहभाग घेतला होता. सर्व सायकल स्वरांचे सायकलवर सोलापूर यांच्याकडून सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.

या राईड चे आयोजन करण्यासाठी राईड समन्वयक श्री दादाराव इंगळे, महिला राईड समन्वय डॉ.रूपाली जोशी यांच्यासह सायकल लवर्सचे पदाधिकारी श्री महेश बिराजदार श्री अविनाश देवाडकर , श्री प्रवीण जवळकर, इंजि. अमेय केत, डॉक्टर प्रवीण ननवरे , श्री देशमाने, अविनाश कुरापती व डॉ. राजश्री वाघचौरे यांनी परिश्रम घेतले.

13/08/2023

Sharad Pawar Speech | Solapur | IT Park | Mahesh Kothe | NCP

IPS तेजस्वी सातपुते यांच्या वर्दीवर मानाचा तुरा सोलापूर : श्रीमती तेजस्वी सातपुते, तत्कालीन पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्राम...
12/08/2023

IPS तेजस्वी सातपुते यांच्या वर्दीवर मानाचा तुरा

सोलापूर : श्रीमती तेजस्वी सातपुते, तत्कालीन पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी त्याच्या सेवा कालावधीत जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री बंद करण्यासाठी " ऑपरेशन परिवर्तन " हा उपक्रम हाती घेतला होता.

त्यामध्ये त्यांनी हातभट्टी दारू व्यवसाय करणारे 737 लोकांचे परिवर्तन करून कायदेशीर व्यवसाय सुरू केले होते. त्यांच्या या कामाची केंद्र सरकारच्या "गृह विभागा" कडून दखल घेतली आहे.

गृह विभागाशी निगडित असलेल्या ब्युरो आॅफ पोलीस रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट, गृह विभाग दिल्ली (BPRND) कडून संरक्षण दलातील नावीन्यपूर्ण कामासाठी "सन्मान चिन्ह" प्रदान करण्यात येते. यावर्षी BPRND तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर जिल्ह्यात राबवलेल्या ऑपरेशन परिवर्तन यात केलेल्या कामांची दखल घेऊन हा पुरस्कार तेजस्वी सातपुते यांना जाहीर केला आहे.

12/08/2023

IT Park Update
▪️कुठे, काय आणि कसं असणार?

🔸उद्या रविवारी शरद पवारांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा; पहा महेश कोठे यांची संपूर्ण पत्रकार परिषद..

12/08/2023

Solapur IT Park

Mahesh Kothe

10/08/2023

DCP Dr Dipali Kale

Crime Branch ची मोठी कामगिरी | चोरीला गेलेली Innova Crysta परराज्यातून जप्त

10/08/2023

MP Amol Kolhe Speech

09/08/2023

DCP Vijay Kabade

याला वाली कोण?हुतात्मा स्मृती मंदिर बाहेर फुटपाथवर  फोर जी चाय जवळ कचरा बॉक्स बसवण्यात आले होते. सध्या त्याची ही अवस्था....
09/08/2023

याला वाली कोण?

हुतात्मा स्मृती मंदिर बाहेर फुटपाथवर फोर जी चाय जवळ कचरा बॉक्स बसवण्यात आले होते. सध्या त्याची ही अवस्था. एका रात्रीत हे लोखंडी साहित्य कोणीतरी चोरूनही नेऊ शकेल. याचं काम किती दर्जेदार होतं याचा पुरावा काँक्रीटसह ते उघडून पडलय यात दिसतं. याच ठिकाणी वारंवार मंडपासाठी खुदाई होते. शेजारी एम एस ई बी चे बॉक्स आहेत. त्याला काटेरी झुडपांनी विळखा घालायला सुरू केलंय. या ठिकाणी भिक्षा मागणारी एक वृद्ध महिला रात्रंदिवस बसलेली असते. पालिकेचं या ठिकाणी एक केंद्र आहे. या केंद्राजवळ येणाऱ्या लोकांच्या सावलीसाठी. स्मृती मंदिरच सुशोभीकरण नष्ट होईल अशा पद्धतीने पडदे बांधले आहेत मंडप टाकला आहे.

आपली महापालिका आपलं स्मार्ट सोलापूर?

याला वाली कोण? जबाबदार कोण..?

- अविनाश सर

08/08/2023

रेकॉर्ड ब्रेक गर्दी /स्पाईस एन आईस रॉक्स
काल फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने स्पाईस एन आईस आयोजित लेडीज स्पेशल फ्रेंडशिप पार्टीला सोलापुरातील महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला.

900 ते 1000 महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. म्युझिक, डान्स आणि अनलिमिटेड फूड याचा मनमुराद आनंद लुटला.

स्पाईस एन आईस नेहमीच महिलांसाठी काही ना काही उपक्रम घेऊन येतात. सोलापुरातील महिलांना सेफ वातावरणात एन्जॉय करता यावं यासाठी त्यांची धडपड असते. गेल्या 9 वर्षांपासून याच उद्देशाने लेडीज स्पेशल फ्रेंडशिप डे पार्टीचं आयोजन केलं जातं.

याच धर्तीवर आधारित क्वीन्स क्लब नावाचा क्लब यावर्षी खास महिलांसाठी सुरू करण्यात आला आहे. ज्यामध्ये महिलांसाठी वर्षभरात 36 कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

याची मेंबरशिप फी फक्त 999/- इतकी आहे. यात महिलांना प्रत्येक महिन्यात एक इव्हेंट, एक वर्कशॉप आणि एक कॉम्पीटिशन याचा आनंद घेता येणार आहे, महिलांनी नक्की याचा लाभ घ्यावा...

स्पाईस एन आईस च्या या उपक्रमासाठी स्पाईस एन आईस रॉक्स हे बोल सर्व महिलांच्या तोंडी होते.

टीम स्पाईस एन आईस
8956713495
8956713496
9607970292



SPICE n ICE Events

दक्षिण सोलापूर तालुक्यातील ६० गाड्यांचा ताफा हैद्राबादकडे रवाना.. दक्षिणमधील बहुसंख्या सरपंच करणार BRS Party मध्ये KCR य...
07/08/2023

दक्षिण सोलापूर तालुक्यातील ६० गाड्यांचा ताफा हैद्राबादकडे रवाना.. दक्षिणमधील बहुसंख्या सरपंच करणार BRS Party मध्ये KCR यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.

Bull Fight..सोलापूरमध्ये विविध चौक हे गोवंशियांचे विश्रांती स्थानं आहेत. यांना वाहतुक नियंत्रण करणारे हकलत नाहीत किंवा भ...
05/08/2023

Bull Fight..

सोलापूरमध्ये विविध चौक हे गोवंशियांचे विश्रांती स्थानं आहेत. यांना वाहतुक नियंत्रण करणारे हकलत नाहीत किंवा भटक्या जनावरांस पकडुन पांजरापोळमध्ये हलवणाऱ्या यंत्रणेस ही विश्रांती घेणारी गोवंशाची पिलावळ दिसत नाही. आज तर हद्द्च झाली संध्याकाळी 5 वाजता एम्लायमेंट चौक येथे कामत हॉटेल समोर दोन वळुंची जणु Bull Fight चालु होती.

- छायाचित्र : संजय भंडारी

🙏🏽आज संकष्टी चतुर्थी🙏🏽🌝आजचा चंद्रोदय - रात्री ९ वाजून १८ मिनिटेपरंपरा तीच अंदाज नवा,🚩इको फ्रेंडली बाप्पा घरी हवा!🌳🙏🏽🚩पर्...
04/08/2023

🙏🏽आज संकष्टी चतुर्थी🙏🏽
🌝आजचा चंद्रोदय - रात्री ९ वाजून १८ मिनिटे

परंपरा तीच अंदाज नवा,🚩
इको फ्रेंडली बाप्पा घरी हवा!🌳

🙏🏽🚩पर्यावरणपूरक गणेशोत्सव २०२३🌳💐
⏱️लवकरच...

Eco Friendly Club
9021221114
8888856530

Eco Friendly Club

Address

Hotagi Road Solapur
Solapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smart Solapurkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Smart Solapurkar:

Videos

Share

Nearby media companies


Other Broadcasting & media production in Solapur

Show All

You may also like