ABnews

ABnews ABnews

स्व.सुशिल-शितल राऊत मित्र परिवार व जय शिवराय प्रतिष्ठाण, बार्शी च्या वतीने १३ व्या भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन...चला तर ...
29/12/2024

स्व.सुशिल-शितल राऊत मित्र परिवार व जय शिवराय प्रतिष्ठाण, बार्शी च्या वतीने १३ व्या भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन...
चला तर मग एक पाऊल जीवनदानासाठी...
AB news: बार्शी,

प्रत्येक २ सेकंदाला
कोणालातरी रक्ताची
गरज भासते

म्हणून करा रक्तदान
वाचवा अनमोल प्राण

तारीख - १/१/२०२५
वेळ - सकाळी ८ ते सायंकाळी ७
वार - बुधवार
स्थळ - क्रिडा भवन,शनी मंदिरा जवळ,बार्शी

आयोजक :-
स्व.सुशिल-शितल राऊत मित्र परिवार.
जय शिवराय प्रतिष्ठाण, बार्शी.

बार्शी पोलीस ठाण्याच्या वतीने चोरी झालेला मोबाईल फोन केला युवकाच्या स्वाधीन... AB news : बार्शी, बार्शी येथील युवक वीरूप...
28/12/2024

बार्शी पोलीस ठाण्याच्या वतीने चोरी झालेला मोबाईल फोन केला युवकाच्या स्वाधीन...

AB news : बार्शी,
बार्शी येथील युवक वीरूपाक्ष वायकर याचा मोबाईल फोन चोरीला गेला होता. यानंतर सदरील युवकाने बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली होती. बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने सदरील युवकाच्या तक्रारीची दखल घेऊन, मोबाईलचा शोध घेऊन, संबंधित मोबाईल वीरूपाक्ष वायकर याच्या स्वाधीन करण्यात आला.

याप्रसंगी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीमंत खराडे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

28/12/2024

वाढत्या #सायबर_क्राईम मुळे! #बार्शी शहर पो.नि. #बालाजी #कुकडे यांचे नागरिकांना #आवाहन.

26/12/2024

नेहरू युवा केंद्र, सोलापूर व क्रांती बहुउद्देशीय संस्था,बेलगाव यांच्या तर्फे खुल्या वक्तृत्व स्पर्धा

फिनिक्स  #पोदार लर्न स्कूल  #बार्शी अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर करतात  #कौतुकाची थापAB news :- बार्शी कोणतेही क्लास...
25/12/2024

फिनिक्स #पोदार लर्न स्कूल #बार्शी अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर करतात #कौतुकाची थाप

AB news :- बार्शी
कोणतेही क्लासेस मध्ये किंवा कोणत्याही स्पर्धेमध्ये आपल्या शाळेचा विद्यार्थी यशस्वी झाल्यावर त्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्याची अनोखी पद्धत
त्याप्रमाणे अबॅकस तृतीय पातळी स्पर्धेमध्ये बार्शीच्या #अथर्व #शिंदेला प्रथम पारितोषिक

डिजिटल जगताप क्लासेस संचलित जगताप अबॅकस लर्निग मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय तृतीय पातळी स्पर्धेमध्ये बार्शीतील अथर्व अभिजीत शिंदे याने प्रथम पारितोषिक मिळवित बार्शीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

गुरुवार, दि. 23 डिसेंबर, 2024 रोजी जगताप लर्निंग क्लासेस येथे पार पडलेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात त्यास पारितोषिक प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी बार्शीतील कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक सिंधू देशमुख यांचेसह जगताप क्लासेसचे संचालक प्रा. तानाजी गलांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्यांसह जगताप अबॅकस लर्निगच्या संचालिका सौ. प्रणाली जगताप, सहशिक्षिका सौ. अमृता पवार

फिनिक्स पोदार लर्न स्कूल बार्शी अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर करतात कौतुकाची थाप यांनी दिली
हनुमंत चव्हाण सर, माया सावंत मॅडम, प्रतिमा हावळे मॅडम, तानाजी अंकुशे सर

जगताप क्लासेस मार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी राज्य पातळी, राष्ट्रीय पातळी तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धांमध्ये बार्शी शहर व तालुक्यासह महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवितात.

अबॅकस मध्ये अतिशय अवघड मानल्या जाणाऱ्या तृतीय पातळी स्पर्धेमध्ये अथर्वने मिळविलेल्या या यशासाठी सर्व स्तरातून त्याचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

भोयर येथे जमिनीच्या वादातून  #दोघांचा खून तर तिसरा जखमीबार्शी तालुक्यातील भोयरे गावात शेतीच्या  दुहेरी वादात  चुलती व चु...
24/12/2024

भोयर येथे जमिनीच्या वादातून #दोघांचा खून तर तिसरा जखमी

बार्शी तालुक्यातील भोयरे गावात शेतीच्या दुहेरी वादात चुलती व चुलत भाऊ दोघांचा खून तर चुलत्याला गंभीर जखमी केल्याची घटनेने बार्शी तालुका हादरला आहे

जमिनीच्या या दुहेरी वादात सिंधू किसन मोरे (पाटील) (वय ४५) आणि सागर किसन मोरे (पाटील) (वय २६) यांचा मृत्यू झाला, तर किसन गोवर्धन मोरे (पाटील) (वय ५५) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपी सौदागर पाटील व त्याच्या दोन जोडीदाराने धारदार शस्त्राने चुलत भाऊ, चुलती, आणि चुलत्यावर केलेल्या हल्ल्यांमध्ये चुलती आणि चुलत भाऊ यांचा मृत्यू झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, कुटुंबातील शेतीच्या कारणावरून वादाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. हा वाद अनेक दिवसांपासून सुरू होता आणि तो आज इतक्या टोकाला गेला की कुटुंबातील सदस्यांवर प्राणघातक हल्ला केला.

घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास तालुका पोलीस करतआहेत
या दुर्दैवी घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

बार्शीत  #रेड्याच्या_झुंजीतून_तंटा; धारदार हत्याराने रेड्याला केले गंभीर जखमीरेड्यावर हल्या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा ...
22/12/2024

बार्शीत #रेड्याच्या_झुंजीतून_तंटा; धारदार हत्याराने रेड्याला केले गंभीर जखमी
रेड्यावर हल्या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल .

AB news: बार्शी
बार्शी तालुक्यातील देशमुख प्लॉट, गाडेगाव रोड परिसरात जनावरांच्या झुंजीतून निर्माण झालेल्या तंट्यात एका पंढरपुरी रेड्याला धारदार हत्याराने गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे.
सुनिल अनिल राऊत रा.देशमुख प्लॉट, गाडेगाव रोड, बार्शी यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, २१ डिसेंबर रोजी
रात्री ११.३० वाजता जनावरांना चारा देऊन ते झोपी गेले होते. मात्र, २२ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता त्यांच्या परिचितांनी त्यांना उठवले आणि त्यांच्या रेड्याने इरफान शेख यांच्या गोट्यावर झुंज दिल्याची माहिती
दिली.
त्यानंतर, झुंज सोडवण्याच्या प्रक्रियेत
इप्तीकार शेख, इरफान शेख, इम्रान शेख आणि एका अनोळखी व्यक्तीने धारदार हत्यार आणि दांडक्याने रेड्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात रेड्याला शेपटी, पाय, आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या असून मोठ्या
प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच सुनिल राऊत आणि त्यांच्या नातेवाईकांनी रेड्याला झाडाला बांधून ठेवले व पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावून उपचार केले. सुनिल राऊत यांनी इप्तीकार शेख, इरफान शेख, इम्रान शेख आणि अनोळखी इसमांविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस पुढील
तपास करत आहेत.

बार्शी तालुक्यात शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा आणि शेतीसाठी दिवसा विजपुरवठा द्या - छावा ...
17/12/2024

बार्शी तालुक्यात शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा आणि शेतीसाठी दिवसा विजपुरवठा द्या - छावा संघटनेची मागणी...

AB news बार्शी : दि. 17 डिसेंबर, 2024
गेल्या काही दिवसांपासून बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये बिबट्याने अक्षरशः थैमान घातले आहे. उपळाई (ठों.), पानगाव, रुई, चारे आदी भागातील जाणवरांवर हल्ला करून, गाई, वासरे व शेळ्या फस्त केल्या आहेत. बिबट आणि त्याच्या पिल्लांचा वावर बार्शी तालुक्यात असल्याचे बार्शी वनविभागाने देखील जाहीर केले आहे. बिबट्याने जनावरांवर केलेल्या हल्ल्यामुळे अनेक जनावरे मृत्यूमुखी पडून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे बार्शी तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची तालुक्यातील शेतकऱ्यांची व नागरिकांची जोरदार मागणी आहे.

तसेच ग्रामीण भागामध्ये शेतीसाठी रात्रीचा विजापूरवठा असल्यामुळे रात्री - अपरात्री अनेक संकटांना तोंड देत शेतकऱ्यांना शेतामध्ये ज्वारी, हरभरा, गहू तसेच कांदा या पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी जीव मुठीत घेऊन शेतामध्ये जात आहेत. शेतकऱ्यांना संकटातून वाचवण्यासाठी शासनाने शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा द्यावा असे देखील शेतकऱ्यांमधून मोठी मागणी होत आहे.

तरी आपण वरील गोष्टींचा गांभीर्याने विचार करून, नागरिकांसाठी धोकादायक असणाऱ्या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा व शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी तसेच शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी छावा संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल अशा प्रकारचा इशारा छावा संघटनेचे बार्शी तालुकाध्यक्ष धीरज शेळके यांनी बार्शी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

 #अंगणवाडी_सेविका  #मेगा_भरती!AB news : सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की, राज्यात हजारो रिक्...
12/12/2024

#अंगणवाडी_सेविका #मेगा_भरती!

AB news : सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की, राज्यात हजारो रिक्त पदांसाठी लवकरच अंगणवाडी विभागामार्फत भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अंगणवाडी विभागामार्फत होणाऱ्या या भरतीमुळे राज्यातील अनेक महिलांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. आता अंगणवाडी सेविकेला 15000 रुपये मानधन देण्याची देखील घोषणा करण्यात आली आहे. ही भरती 10 वी पास वर होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

#शासकीय_अंगणवाडी_सेविका_भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या #शासनमान्य_प्रमाणपत्र मिळण्यासाठी #महाराष्ट्र_कौशल्य_विकास_केंद्र 9922914009 या क्रमांकावर आजच संपर्क करा.

 #ग्रामीण भागातील  #खेळाडूंना प्रोत्साहन: १७ खेळाडूंना शूज जोड्यांचे वाटपAB news:खांडवी, बार्शी: हाय-परफॉर्मन्स क्रिकेट ...
12/12/2024

#ग्रामीण भागातील #खेळाडूंना प्रोत्साहन: १७ खेळाडूंना शूज जोड्यांचे वाटप

AB news:
खांडवी, बार्शी: हाय-परफॉर्मन्स क्रिकेट अकॅडमी, #बार्शी व #वर्तमान हेल्थ केअर (हिरेमठ हॉस्पिटल) ( अमित #इंगोले व सुमित प्रकाश जैन) यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सोजर मूकबधिर शाळा, खांडवी येथील १७ खेळाडूंना शूज जोड्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोजर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. सुजित करपे सर, सोजर मूकबधिर शाळेचे भोसले सर होते. या वेळी जगदाळे सर, सचिन आवटे सर, पंकज मुळे, तसेच सोजर आयटीआयचे प्राचार्य कारंडे सर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी प्रोत्साहन दिले.

#सामाजिक बांधिलकीतून प्रेरणा:
हाय-परफॉर्मन्स क्रिकेट अकॅडमीचे डायरेक्टर अमित इंगोले व सुमित प्रकाश जैन यांनी क्रीडाक्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना उभारी देण्यासाठी या उपक्रमाची संकल्पना मांडली. विद्यार्थ्यांनी, मुलांनी जास्तीत जास्त खेळाकडे लक्ष द्यावे, तसेच आपल्या शरीराकडे ही लक्ष द्यावे, खेळाडूंना उत्तम क्रीडा सुविधा व संधी मिळाव्यात, यासाठी त्यांनी आपली बांधिलकी व्यक्त केली.

हा उपक्रम ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृती वाढवण्यासाठी प्रेरणादायी ठरत असून, १७ खेळाडूंना दिलेला हा पाठिंबा त्यांना स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी निश्चितच प्रेरणा देईल.

07/12/2024

खाकी वर्दीतल्या हिरोचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरलं...

बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे साहेब यांच्या कर्तव्यदक्षपणामुळे वाचले युवकाचे प्राण...

AB News : बार्शी,
बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे हे रात्री गस्त घालत असताना, रात्री एक वाजल्याच्या सुमारास बार्शी - लातूर रोडवर, पांगरी जवळ, एका चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाल्याचे दिसून आले. अपघात एवढा गंभीर होता की अक्षरशः चारचाकी गाडीच्या पलट्या झाल्या होत्या. या अपघातामध्ये चारचाकी मधील एक युवक जखमी अवस्थेमध्ये गाडीमध्येच अडकलेला होता. एवढ्यात गस्तीसाठी निघालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी तात्काळ गाडी थांबवून, सदरील अपघातग्रस्त चारचाकी मधील युवकाला स्वतः बाहेर काढून सहकाऱ्यांच्या मदतीने पांगरी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल केले. सदरील जखमी युवकाचे नाव अजय पांचाळ असून, तो धाराशिव जिल्ह्यातील सांजा येथील रहिवाशी असल्याचे समजले. याप्रसंगी दिलीप ढेरे यांनी जखमीचा मोबाईल घेऊन घडलेला प्रकार त्याच्या नातेवाईकांना सांगितला. दिलीप ढेरे हे आपल्या साहसी व धाडसी कार्यामुळे नेहमीच एक कार्यक्षम व दबंग पोलीस अधिकारी म्हणून चर्चेत असतात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बार्शी तालुक्यामध्ये अतिशय चोखपणे बंदोबस्त राबविल्याबद्दल, त्यांना सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या कार्य तत्परतेमुळे एका युवकाचे प्राण वाचले असून, यामुळे बार्शी तालुक्यातून दिलीप ढेरे यांचे कौतुक केले जात आहे.

व्हिडिओ सौजन्य : सोशल मीडिया ( व्हायरलं व्हिडीओ )

इर्ले इथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अनोख्या उपक्रमातुन अभिवादनडॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या...
07/12/2024

इर्ले इथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अनोख्या उपक्रमातुन अभिवादन

डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या
68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त इर्ले इथे विनम्र अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी कार्यक्रमास उपस्थित वैराग पोलीस स्टेशनचे श्री.निवृत्ती मोरे साहेब, सचिन मुंडे साहेब , गणेश चव्हाण साहेब व मारकड साहेब यांनी उपस्थिती लावली
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिसारण व पंचशील घेतले
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले...
तसेच बु. बजरंग आप्पा चव्हाण तालीम या संघाकडून वैराग पोलीस स्टेशनला, इर्ले ग्रामपंचायत,जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडी व भिमनागर मधील सर्व घरांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा संकल्पनेतुन देणात आली
यावेळी प्रमुख उपस्थिती श्री निवृत्ती मोरे साहेब व सचिन मुंढे साहेब, गणेश चव्हाण साहेब,मारकड साहेब व सोसायटी चेअरमन किरण पाटील व सरपंच सतिश पाटील व आयोजक बु. बजरंग आप्पा चव्हाण तालीम संघाचे कौतुक केले व पुढील उपक्रम राबविण्यात यावे यासाठी प्रोत्साहन दिले इर्ले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.समाधान गायकवाड यांनी केले
कार्यक्रमाचे संयोजन बु.बजरंग आप्पा चव्हाण तालीम सघं इर्ले राजवाडा (भीमनगर) याने केले🙏💐

बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव...AB news : बार्शी,बार्शी तालु...
01/12/2024

बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव...

AB news : बार्शी,
बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांना विधानसभा 2024 निवडणूक शांततेने आणि शिस्तीने पार पाडल्याबद्दल पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.

याप्रसंगी बार्शी तालुका पोलीस स्टेशनने तालुक्यातील विविध संवेदनशील गावांमध्ये शांततेचे वातावरण राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले. सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या नेतृत्वाखाली, सर्व ठिकाणी शिस्तीचे पालन करत निवडणूक अत्यंत शांततेने पार पडली, ज्यामुळे ग्रामस्थांनी सुरक्षिततेची भावना व्यक्त केली.

26/11/2024

व्हाईस ऑफ मिडियाच्या बार्शी तालुकाध्यक्ष पदी अस्लम काझी यांची निवड

सागर बंगला, मुंबई येथे बार्शी तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार राज्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय गृह...
25/11/2024

सागर बंगला, मुंबई येथे बार्शी तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार राज्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केला.

गाताचीवाडी बायापास चौकातघात की अपघात,प्रेताची छिन्नविछिन्न अवस्थाबार्शी गाताचीवाडी बायपास चौकात अंदाजे ३५ ते ४० वयोगटाती...
24/11/2024

गाताचीवाडी बायापास चौकात
घात की अपघात,प्रेताची छिन्नविछिन्न अवस्था

बार्शी गाताचीवाडी बायपास चौकात अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील एका अनोळखी इसमाचा मृतदेह दि २४ नोव्हेंबर रोजी सकाळीच्या सुमाराला आढळून आला आहे. त्या अनोळखी व्यक्ती सोबत अज्ञात स्थळी घातपात करून व मयताचे चेहरा तोंड सोलुन काढुन ओळख लपविण्याचा प्रयत्न असावा तसेच सदरचे प्रेत सदर ठिकाणी आणून टाकल्याचा संशय व्यक्त होत आहे. प्रेताची छिन्नविछिन्न अवस्था झाली असुन ओळख पटवणे अवघड बनले आहे . घटनास्थळी तालुका पोलीस पो कॉ दशरथ बोबडे आदी पथक दाखल झाले असून मोठ्या प्रमाणात घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली आहे. पोलीसांनी पुढील कारवाई सुरु केली आहे.

23/11/2024

राजेंद्र राऊत यांची पत्रकार परिषद live

23/11/2024

बार्शी विधानसभा मतदारसंघातून दिलीप सोपल यांचा 6169 मतांनी विजय...!

Address

Barshi
Solapur
413401

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABnews posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ABnews:

Videos

Share