महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज

  • Home
  • India
  • Solapur
  • महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज

महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज महाराष्ट्रातील एकमेव 🎥 चॅनल महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज मराठी माणसापर्यंत पोचलेलं आपलं मराठी चैनल news taime

29/12/2023

Manoj Jarange Patil Official यांचा ताफा मुंबईत दाखल महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज ताज्या अपडेट अशाच updetsathi follow नक्की करा 👍☺️

ठाणे स्थानकात प्रवाशांना घेराव घालून तिकीट तपासणीद्वितीय श्रेणी डब्यातील सर्वाधिक विनातिकीट प्रवासी पकडण्यात आल्याचे समो...
27/12/2023

ठाणे स्थानकात प्रवाशांना घेराव घालून तिकीट तपासणी
द्वितीय श्रेणी डब्यातील सर्वाधिक विनातिकीट प्रवासी पकडण्यात आल्याचे समोर आले आहे.

Written by महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज टीम
December 26, 2023 21:58 IST
Follow Us

मुंबई : विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मोहिम हाती घेतली आहे. नियमित तिकीट तपासणीसह आता विशेष तिकीट तपासणी केली जात आहे. नुकतीच दादर रेल्वे स्थानकात विशेष तिकीट तपासणी करण्यात आली तर, मंगळवारी ठाणे स्थानकात प्रवाशांना घेराव घालून तपासणी (फोर्ट्रेस चेक) करण्यात आली. त्यात एकूण १,३०९ विनातिकीट प्रवाशांना पकडले असून ४,१९,२३५ रुपये दंड वसूली केली. द्वितीय श्रेणी डब्यातील सर्वाधिक विनातिकीट प्रवासी पकडण्यात आल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा >>> पाणी पुरवठ्यासाठी जलबोगद्यातून समांतर यंत्रणा उभारणार; पाणी गळतीच्या वेळी पाणी पुरवठा ठप्प होऊ नये म्हणून उपाययोजना

आणखी वाचा

special train on Mumbai to Nagpur route
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! या मार्गावर दोन दिवस धावणार विशेष गाडी

ब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल; सीएसएमटी – पनवेल शेवटची लोकल रात्री १०.५८ वाजता
करोना काळानंतर प्रवाशांची संख्या हळूहळू वाढू लागली असताना, विनातिकीट प्रवाशांचा प्रवास अधिक होत असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आले. त्यामुळे मध्य रेल्वेच्या तिकीट विक्रीच्या संख्येवर आणि त्यावरील महसुलावर परिणाम होत होता. परिणामी, मध्य रेल्वेने विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू केली आहे. सीएसएमटीनंतर सर्वाधिक गर्दीच्या स्थानकामध्ये ठाणे स्थानक आहे. ट्रान्स हार्बर, मुख्य मार्ग यावरून लाखोंच्या संख्येने प्रवाशांचा प्रवास होतो. त्यामुळे ठाणे स्थानकाची ओळख गर्दीचे स्थानक म्हणून आहे. या स्थानकातून विनातिकीट प्रवाशांची संख्याही अधिक असल्याने त्यांना अटकाव घालण्यासाठी मंगळवारी विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. ठाणे स्थानकातील पादचारी पूल, फलाट व इतर ठिकाणी ५८ तिकीट तपासणीस, १२ आरपीएफ जवान तैनात केले. या पथकाकडून द्वितीय श्रेणी डब्यातून प्रवास करणारे विनातिकीट प्रवासी सर्वाधिक पकडण्यात आले. पथकातील प्रत्येक तिकीट तपासणीसाने २३ हून अधिक जणांना पकडून प्रत्येकी ७,४८६ रुपयांची दंडवसुली केली, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Pune Crime : विवाहितेला हातपाय बांधून शेततळ्यात बुडवलं, महिलेच्या हत्याकांडानं पुणे हादरलंबातमीची लिंक कमेंटमध्ये
26/12/2023

Pune Crime : विवाहितेला हातपाय बांधून शेततळ्यात बुडवलं, महिलेच्या हत्याकांडानं पुणे हादरलं

बातमीची लिंक कमेंटमध्ये

गुजरात के बड़ौदा का एक ख़ूबसूरत मंज़र, जहां लोग मार्केटिंग करते दिख रहे हैं
26/12/2023

गुजरात के बड़ौदा का एक ख़ूबसूरत मंज़र, जहां लोग मार्केटिंग करते दिख रहे हैं

26/12/2023

जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच आम्हाला हव्या - अजित पवार गट

26/12/2023

रस्त्याचे खड्डे बुजवण्याऱ्याची काँटक्टदाराची काळाबाजार उलगडा

मिरज : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी पुणे-कोल्हापूर रेल्वेमार्गाची पाहणी दौऱ्यात मिरज स्थानकास भेट दिली....
26/12/2023

मिरज : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी पुणे-कोल्हापूर रेल्वेमार्गाची पाहणी दौऱ्यात मिरज स्थानकास भेट दिली. यावेळी त्यांनी दुहेरीकरण, इंटरलॉकिंग, रेल्वेस्थानक, प्रवासी सुविधा, कर्मचारी वसाहतीची पाहणी केली. कोल्हापूर मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पुणे विभागाच्या प्रबंधक इंदूराणी दुबे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

पुणे-कोल्हापूर रेल्वेमार्गावर सुरू असणाऱ्या विविध कामांची पाहणी करण्यासाठी रेल्वे महाव्यवस्थापक रामकरण यादव हे सोमवारी मिरज, कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. लोणंद रेल्वेस्थानकापासून या पाहणीला सुरुवात करण्यात आली. महाव्यवस्थापक यादव यांनी विविध रेल्वेस्थानकांवर नव्याने करण्यात येत असलेली कामे प्रवासी सुविधांची, पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्याने उभारण्यात येत असलेले फलाट, रेल्वे सुरक्षा कक्ष, मालधक्का, रेल्वे क्रॉसिंग गेट, रेल्वे पूल इत्यादींची पाहणी केली.

मिरज रेल्वेस्थानकाजवळ सुरू असणाऱ्या इंटरलॉकिंग दुहेरीकरण, विद्युतीकरणाची व मालधक्क्याची त्यांनी पाहणी केली. पुणे ते कोल्हापूर दरम्यान विशेष रेल्वेतून महाव्यवस्थापक यादव यांनी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाची पाहणी केली. मिरज स्थानकात रेल्वे कृती समितीचे सुकुमार पाटील, गजेंद्र कडोळी, ज्ञानेश्वर पोतदार, सचिन कुकरेजा यांनी यादव यांना कोल्हापूर मुंबई वंदे भारत एक्स्प्रेससह कोल्हापूर वडोदरा व कोल्हापूर हैदराबाद एक्स्प्रेस सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. महाव्यवस्थापक यादव यांनी कोल्हापूर मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले.

आमच्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज नेटवर्क ची काही टॉप  #शहरे व अन्य 3  #विदेश  👍☺️
25/12/2023

आमच्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज नेटवर्क ची
काही टॉप #शहरे व अन्य 3 #विदेश 👍☺️

महाराष्ट्र प्रतिनीधी   यांच्या शुभ विवाह दरम्यान महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चे सर्व स्टाफ प्रतिनीधी संपादक  #उमेशजी_क...
25/12/2023

महाराष्ट्र प्रतिनीधी यांच्या शुभ विवाह दरम्यान महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चे सर्व स्टाफ प्रतिनीधी संपादक #उमेशजी_काळे साहेब उपस्थिती राहून वधू वराना शुभ आशीर्वाद देऊन शुभेच्छा देण्यात आल्या 💐😊📩

Happy Marriage Life 👩‍❤️‍👨 💐😊

25/12/2023

#मुंबई_पुणे एक्सप्रेस हायवेवर पिकप आणि #मालवाहतूक टेम्पोचा भिषण अपघात झाला #टेंपो आणि #पिकाप चा मोठया प्रमाणावर नुकसान झालं आहे कोणत्याही #जीवितहानी झाली नाही अपघात एवढा भिषण होता की ड्राइव्हवर चा जीव वाचला मुकामार लागल्याने जवळ्याच्या हॉस्पिटल मध्ये करण्यात आले
महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज

प्रतीक्षा केवळ काहीच दिवसांची... 🚩🚩🚩22 जानेवारी, 2024 #श्रीराम  #मंदीर  #अयोध्या        महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज
25/12/2023

प्रतीक्षा केवळ काहीच दिवसांची... 🚩🚩🚩
22 जानेवारी, 2024
#श्रीराम #मंदीर #अयोध्या
महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज

मोठी बातमी! आरोग्य मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री   तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला कोल्हापूरजवळ भीषण अपघात, जीवि...
25/12/2023

मोठी बातमी! आरोग्य मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला कोल्हापूरजवळ भीषण अपघात, जीवितहानी नाही, स्वीय सहाय्यक जखमी

सोलापूर येथील अतिशय दु खद घटना कॉलेजला_निघालेल्या_अकरावीतील_भाग्यश्रीचा_मृत्यूभावपुर्ण श्रध्दांजली👏👏सोलापूर : कोंडी येथू...
25/12/2023

सोलापूर येथील अतिशय दु खद घटना कॉलेजला_निघालेल्या_अकरावीतील_भाग्यश्रीचा_मृत्यू
भावपुर्ण श्रध्दांजली👏👏

सोलापूर : कोंडी येथून सोलापूर शहरात कॉलेजसाठी निघालेल्या रिक्षाला (एमएच १३, सीटी ९४७९) सोलापूर विद्यापीठासमोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे चाललेल्या कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, यामध्ये बसलेली भाग्यश्री कांबळे ही विद्यार्थिनी रिक्षातून फेकली गेली. मुख्य रस्त्यावर असलेल्या रिक्षातून फेकली गेलेली भाग्यश्री सर्विस रस्त्यावर आपटली. यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. त्याचबरोबर रिक्षात तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी (वय १९) ही या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. तिच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याचबरोबर या अपघातात रिक्षात असलेला आदित्य सुनील भोसले (वय १४) हा आठवी शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी सोलापूर शहरातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ऐश्वर्या सोडगी हिच्यावर अश्विनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच कोंडी येथील तरुणांनी जखमींना सोलापूर शहरातील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच भाग्यश्रीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

कोंडीत हळहळभाग्यश्री कांबळे ही शहरातील गांधीनाथा कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. वडील निवृत्ती कांबळे हे शासकीय सेवेत चतुर्थश्रेणी कर्मचारी असून भाग्यश्रीला एक बहीण आहे. भाग्यश्रीच्या अपघाती मृत्यूमुळे कोंडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज

सोलापूर : एसटी बसमध्ये राहिलेली पाच लाख ऐवजाची पिशवी महिला प्रवाशाला परतएसटी बसमधून प्रवास करताना एका महिला प्रवाशाची बस...
24/12/2023

सोलापूर : एसटी बसमध्ये राहिलेली पाच लाख ऐवजाची पिशवी महिला प्रवाशाला परत
एसटी बसमधून प्रवास करताना एका महिला प्रवाशाची बसमध्येच अनावधानाने राहिलेली किंमती ऐवज असलेली पिशवी बसवाहक आणि चालकाच्या प्रामाणिकपणामुळे संबंधित महिला प्रवाशाला जशीच्या तशा स्वरूपात परत मिळाली.

Follow Us
महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज

सोलापूर : एसटी बसमध्ये राहिलेली पाच लाख ऐवजाची पिशवी महिला प्रवाशाला परत (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

सोलापूर : एसटी बसमधून प्रवास करताना एका महिला प्रवाशाची बसमध्येच अनावधानाने राहिलेली किंमती ऐवज असलेली पिशवी बसवाहक आणि चालकाच्या प्रामाणिकपणामुळे संबंधित महिला प्रवाशाला जशीच्या तशा स्वरूपात परत मिळाली. सोलापूर एसटी बसस्थानकात ही पिशवी परत घेताना त्या महिला प्रवाशासह तिच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू तरळले.

त्याचे असे झाले की, ललिताबाई गोविंदराव भोसले (वय ३०, रा. खानापूर, ता. बसवकल्याण, जि. बीदर, कर्नाटक) या उमरगा येथून नळदुर्गला जाण्यासाठी हैदराबाद-सोलापूर या एसटी बसमधून आपल्या दोन कुटुंब सदस्यांसह प्रवास करीत होत्या. नळदुर्गला उतरल्यानंतर त्यांची पिशवी चुकून अनावधानाने एसटी बसमध्येच राहिली होती. हा प्रकार नंतर त्यांच्या लक्षात आला तेव्हा त्या अक्षरशः हतबल झाल्या होत्या. पिशवीत सोन्याचे दागिने, चांदीची भांडी आणि रोख रक्कम होती. तसेच त्यांचा भ्रमणध्वनीही पिशवीतच होता. सुदैवाने ही पिशवी बेवारस स्थितीत एसटी वाहक महेश विकास माने यांना सापडली. त्यांनी सापडलेली पिशवी एसटी चालक मिलिंद चंदनशिवे यांच्याही निदर्शनास आणून दिली.
आणखी वाचा
पिशवीत पाहिले असता भ्रमणध्वनीसह सोने-चांदी आणि रोख रक्कम असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज होता. वाहक आणि चालकाने ही किंमती पिशवी सोलापूर एसटी स्थानकावर पोहोचताच आगार प्रमुख अशोक बनसोडे यांच्या हवाली केली. पिशवीतील भ्रमणध्वनीच्या आधारे ललिताबाई भोसले यांच्याशी संपर्क झाला. तेव्हा त्यांच्यासह भोसले कुटुंबीयांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी सोलापूर एसटी बसस्थानक गाठले आणि आगारप्रमुख बनसोडे यांची भेट घेतली. योग्य खातरजमा केल्यानंतर पोलिसांच्या समक्ष संपूर्ण ऐवजासह किंमती पिशवी ललिताबाई भोसले यांना जशीच्या तशी सुपूर्द करण्यात आली. यावेळी बसवाहक महेश माने व चालक मिलिंद चंदनशिवे यांच्या प्रामाणिकपणाचे भोसले कुटुंबीयांनी कौतुक करीत बक्षीस देऊ केले. परंतु दोघांनी नम्रपणे नकार दिला. एसटी वाहक महेश माने (वय ३०) हे मूळ शेटफळ (ता. मोहोळआ) येथील राहणारे असून गेल्याच वर्षी त्यांची एसटी वाहकपदावर नियुक्ती झाली होती.

शेतकऱ्यांनी सुरू केले स्वतःचे सुपरमार्केट बेंगलोर कर्नाटकात शेतकऱ्यांनी सुरू केले स्वतःचे फळ, भाजींचे स्वतःचे सुपर मार्क...
23/12/2023

शेतकऱ्यांनी सुरू केले स्वतःचे सुपरमार्केट बेंगलोर कर्नाटकात शेतकऱ्यांनी सुरू केले स्वतःचे फळ, भाजींचे स्वतःचे सुपर मार्केट शेतातील माल डायरेक्ट ग्राहका कडे
महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज नेटवर्क

उत्तर प्रदेश | 19 डिसेंबर 2023 : अयोध्येमध्ये प्रभू श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु...
22/12/2023

उत्तर प्रदेश | 19 डिसेंबर 2023 : अयोध्येमध्ये प्रभू श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. 22 जानेवारी रोजी हा सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचे प्रमुख यजमान आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशातील प्रमुख पुजारी, नेते यांना आमंत्रित करण्यात आलंय. प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाबाबत देशभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अयोध्येतील रामलल्लाच्या भव्य मंदिराच्या उभारणीत प्रत्येक रामभक्ताच्या मनात काही तरी अर्पण करण्याची इच्छा आहे. याच भावनेतून जोधपूरचे देशी तूप, कंबोडियाचे राज, थायलंडची हळद येथे पाठविण्यात आली आहे. यानंतर आता गुजरातच्या रामभक्तांनी रामलल्लाला अर्पण करण्यासाठी जगातील सर्वात मोठी अगरबत्ती बनविली आहे

21/12/2023

श्री तुळजाभवानी देवीच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला
चार महंतासह सात जणांवर गुन्हा दाखल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली माहिती
महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज ताज्या अपडेट

इतक्या अपेक्षा माझ्याकडून जनता करती आहे हे खुप ओझे होत आहे हे आहेत मोहन आत्माराम रक्तारे रा. गुगळे कॉलनी बुऱ्हाननगर ता. ...
20/12/2023

इतक्या अपेक्षा माझ्याकडून जनता करती आहे हे खुप ओझे होत आहे हे आहेत मोहन आत्माराम रक्तारे रा. गुगळे कॉलनी बुऱ्हाननगर ता. जी. अहमदनगर यांनी येस बँक अहमदनगर येथून एका टेम्पो साठी कर्ज घेतले काही दिवसांनी हप्ते थकले म्हणून त्यांचा टेम्पो ओढून नेण्यात आला त्यांनी तो सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु तो सुटला नाही पैसे जमवले ते देण्यासाठी बँकेत गेले तेव्हा बँकेवाल्यांनी सांगितले तुमची गाडी विकली आहे त्यामुळे मोहन रक्तारे अतिशय वैफल्यग्रस्त झाले आणि 10 तारखेला त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली मरताना त्यांनी माझ्या नावे चिठ्ठी लिहून ठेवली त्यामध्ये "तात्या" मी मेल्यानंतर ना मला न्याय मिळवून द्या अशी हाक मारून चिठ्ठी मध्ये दोन-तीन व्यक्तींची नावे लिहिलेली आहेत त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार घेत नाही म्हणून मी उद्या या कुटुंबाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी व नंतर कै. मोहन रक्तारे यांच्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस स्टेशनला जातोय ....

स्थानिक आमदार विकास निधी कार्यक्रमाअंतर्गत तळा शहरातील तळा एसटी बस स्थानकाचे सुशोभीकरण तसेच वाहतूक नियंत्रण कक्ष बांधण्य...
20/12/2023

स्थानिक आमदार विकास निधी कार्यक्रमाअंतर्गत तळा शहरातील तळा एसटी बस स्थानकाचे सुशोभीकरण तसेच वाहतूक नियंत्रण कक्ष बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन केले. या कामामुळे तळा आणि परिसरातील प्रवाशांचा प्रवास सुलभ होण्यास मदत होणार आहे.

#अदिती_तटकरे

20/12/2023

अंतिम आठवडा प्रस्तावात गुन्हेगारीवर आज चर्चा हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस.. पाहा
महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज ताज्या अपडेट

20/12/2023

VIDEO : फुकट... फुकट... ६४ पिशव्या फुकट...! कांदा शेतकऱ्याचा बेंबीच्या देठापासून आक्रोश महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज ताज्या अपडेट

IPL 2024 Auction: इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेसाठी दुबईत मंगळवारी (दि. 19 डिसेंबर) मिनी लिलाव पार पडला. या लिलावात ए...
20/12/2023

IPL 2024 Auction: इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेसाठी दुबईत मंगळवारी (दि. 19 डिसेंबर) मिनी लिलाव पार पडला. या लिलावात एकूण 333 खेळाडू सामील झालेले. यातील 214 खेळाडू भारतीय, तर 119 खेळाडू परदेशी होते. यातील एकूण 77 खेळाडूच खरेदी करता येणार आहेत. त्यातही परदेशी खेळाडूंची संख्या 30 एवढीच आहे. यापैकी मोजक्या खेळाडूंवर 20 कोटींपेक्षा जास्त, काही खेळाडूंवर 10 कोटींपेक्षा जास्त, तर काहींवर बेस प्राईज इतकीच बोली लागली. बेस प्राईजमध्ये विकल्या गेलेल्या खेळाडूंमध्ये महाराष्ट्र संघाचा 18 वर्षीय स्टार फलंदाज अर्शिन कुलकर्णी याचाही समावेश होता.
अर्शिन कुलकर्णी बेस प्राईजमध्ये सोल्ड
देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र (Maharashtra) संघाकडून खेळणारा अर्शिन कुलकर्णी आयपीएल 2024 (Arshin Kulkarni IPL 2024) लिलावात 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजसह उतरला होता. त्याच्यावर बोली लावण्यासाठी संघांनी फारसा रस दाखवला नाही. मात्र, लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने अर्शिन कुलकर्णी याला त्याच्या बेस प्राईज 20 लाखांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. अशाप्रकारे आता 18 वर्षांच्या अर्शिन केएल राहुल (KL Rahul) याच्या नेतृत्वाखालील लखनऊ संघाचे प्रतिनिधित्व करेल. आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळेल.
एमपीएलमध्ये चमकलेला अर्शिन
जून 2023मध्ये महाराष्ट्र प्रीमिअर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या एमपीएल (MPL) स्पर्धेत अर्शिनने चमकदार कामगिरी केली होती. तो ईगल नाशिक टायटन्स (Eagle Nashik Titans) संघाकडून खेळताना स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू होता. अर्शिनने खेळलेल्या फक्त 3 सामन्यात 65च्या सरासरीने 195 धावा कुटल्या होत्या. विशेष म्हणजे, अर्शिनने या धावा करताना एक शतकही झळकावलं होता. याव्यतिरिक्त मध्यमगती गोलंदाजी करताना त्याने 6 विकेट्सही घेतल्या होत्या.
महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज ताज्या अपडेट महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज

तब्बल 29 वर्षानंतर आपल्या सोलापुरात होणार आहे रणजी सामना.महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सि...
19/12/2023

तब्बल 29 वर्षानंतर आपल्या सोलापुरात होणार आहे रणजी सामना.
महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज
सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटी अंतर्गत इंदिरा गांधी स्टेडियम चे नूतनीकरण करण्यात आले यानंतर या स्टेडियम वर रणजी सामने कधी होतील याचे सोलापूरकर वाट पाहत होते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या पुढाकाराने हे स्वप्न आता सत्यात उतरत आहे पुढच्या वर्षी म्हणजेच पाच जानेवारी रोजी आपल्या इंदिरा गांधी स्टेडियमवर रणजी सामना खेळला जाणार आहे
हा सामना महाराष्ट्र vs मणिपूर असा होणार आहे
या सामन्यादरम्यान सोलापूरकरांना आंतरराष्ट्रीय प्लेयर ला पाहता येणार आहे 29 वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या सोलापुरात रणजी सामना होणार आहे ही सोलापूरकरांसाठीअभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे .

महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज सोलापूरच्या कृषी प्रदर्शनात सोन्या वळूचे आकर्षण राहणार ; होम मैदानावर झाले भूमिपूजनप्रशांत...
18/12/2023

महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज

सोलापूरच्या कृषी प्रदर्शनात सोन्या वळूचे आकर्षण राहणार ; होम मैदानावर झाले भूमिपूजन
प्रशांत कटारे by प्रशांत कटारे 18 December 2023
सोलापूरच्या कृषी प्रदर्शनात सोन्या वळूचे आकर्षण राहणार ; होम मैदानावर झाले भूमिपूजन

सोलापुरात होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे थाटात भूमिपूजन झाले असून सोन्या नावाचा सर्वात उंच वळू यंदाच्या कृषी प्रदर्शनात सर्वांचे आकर्षण ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे होम मैदान इथे थाटात भूमिपूजन संपन्न करण्यात आले. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, कृषी प्रदर्शनाचे चेअरमन गुरुराज माळगे यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे भूमिपूजन करून सभा मंडपाचे पूजन करत हातोडा मारण्यात आला. यावेळी श्रीसिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सर्व विश्वस्त पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

कृषी प्रदर्शनाचे यंदाचे हे 53 वे वर्ष असून गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रसाद दिलेला दिसून आला. तीनशेहून अधिक स्टॉल्स या प्रदर्शनामध्ये असणार आहेत तसेच प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्वात उंच सोन्या हा वळू यामध्ये देखील सहभागी होणार आहे. तसेच डॉग आणि कॅट शो देखील संपन्न होणार आहे. श्वान तसेच वन्यजीव प्रेमींनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले.

कृषी क्षेत्रातील नामवंत कंपन्या तसेच सोलापूर जिल्हा कृषी विभागाच्या सहकार्याने हे प्रदर्शन संपन्न होणार आहे. भव्य दिव्य अशा या कृषी प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांसह विविध कंपन्यांनी आणि नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी आणि राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे चेअरमन गुरुराज माळगे यांनी केले आहे.

Sleeper Vande Bharat Expressभारतातील पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्रातून धावणार ! केव्हा सुरु होणार Sleeper ...
18/12/2023

Sleeper Vande Bharat Express
भारतातील पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्रातून धावणार ! केव्हा सुरु होणार Sleeper Vande Bharat Express ? कसा असणार रूट, वाचा
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज ताज्या अपडेट
Sleeper Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय रेल्वे आता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार आहे. सध्याच्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चेअर कार सीटिंग अरेंजमेंट आहे. पण स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस मध्ये इतर स्लीपर एक्सप्रेस प्रमाणेच बर्थ असतील.

खरे तर वंदे भारत एक्सप्रेस ही 2019 मध्ये सुरू झाली. पहिल्यांदा नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर ही गाडी धावली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही गाडी देशातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या मार्गावर सुरू करण्यात आली. सध्या स्थितीला देशातील जवळपास 34 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी धावत आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
विशेष म्हणजे येत्या काही महिन्यात ही संख्या आणखी वाढणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 17 डिसेंबर 2023 रोजी अर्थातच येत्या चार दिवसात मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर देखील वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे.या वंदे भारत ट्रेनला दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

Sponsored LinksYou May Like
'CID' actor Dinesh Phadnis dies, co-star Dayanand Shetty confirms. He was 57
India Today
by Taboola
निश्चितच मुंबई येथील सीएसएमटी ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस दरम्यान सुरू होणारी ही वंदे भारत ट्रेन या दोन्ही शहरा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष फायदेमंद राहणार आहे.

या ट्रेनमुळे या संबंधित शहरातील नागरिकांचा प्रवास जलद अन सुरक्षित होईल अशी आशा आहे. अशातच आता महाराष्ट्रासाठी आणखी एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे.

ती म्हणजे देशातील पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ही महाराष्ट्रात सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशाची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई ते राष्ट्रीय राजधानी दिल्ली दरम्यान ही पहिली Sleeper वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे.

सध्या स्थितीला दिल्ली ते मुंबई या मार्गांवरील रेल्वे गाड्यांचा सरासरी वेग हा 80 ते 100 किलोमीटर प्रतितास एवढा आहे. गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रुळ मजबूत करणे आणि दोन्ही बाजूला भिंती बांधण्याचे काम सुरू आहे.

मिशनशी संबंधित अभियांत्रिकी विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भिंत आणि ट्रॅक मजबूत करण्याव्यतिरिक्त, ट्रॅक जितका सरळ होईल तितका वेग वाढणार आहे. या प्रकल्पातील पश्चिम रेल्वे परिसरातील 107 वक्र ट्रॅक सरळ करण्यात आले आहेत. उर्वरित 27 वक्र ट्रॅक देखील लवकरच सरळ केले जातील.

ताशी 160 किमी वेगासाठी, 60 किलो 90 यूटीएस रेलची आवश्यकता असते, तर भारतीय रेल्वेमध्ये बहुतेक ठिकाणी 52 किलो 90 यूटीएस रेल ट्रॅक स्थापित आहेत. यामुळे ताशी 160 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ला सुरू करण्यासाठी ट्रॅक बदलावे लागणार आहेत.

यासाठी मुंबई-दिल्ली मार्गावरील ट्रॅक बदलण्याचे काम वेगाने सुरू आहे. वेग वाढवण्यासाठी रुळाखालील दगडीचा थर हा 250 mm वरून 300 mm केला जात आहे. म्हणजे जेव्हा ही कामे पूर्ण होतील त्यानंतर या मार्गावर स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. पुढल्या वर्षी ही स्लीपर ट्रेन सुरु होऊ शकते असा दावा केला जात आहे.

पंढरपूर ची जुलमी करवाढ रद्द होणार..महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांची नागपूर येथील मुख्यमंत्री कार्य...
18/12/2023

पंढरपूर ची जुलमी करवाढ रद्द होणार..

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांची नागपूर येथील मुख्यमंत्री कार्यालयात राज्याचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब आणि मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी भेट घेऊन पंढरपूर नगरपालिकेने केलेली करवाढ रद्द करा अशी मागणी केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्वरित यावर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
धन्यवाद कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री साहेब..आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब...
मनसे वृत्तांत अधिकृत मनसे नेते मा. श्री #दिलीप_धोत्रे

यंदाच्या IPL 2024 च्या सीजन मध्ये   कर्णधार पदावरून पायउतार करण्यात आलेल्या भारतीय कप्तान   चे फॅन्स अवघ्या काही तासांत ...
18/12/2023

यंदाच्या IPL 2024 च्या सीजन मध्ये कर्णधार पदावरून पायउतार करण्यात आलेल्या भारतीय कप्तान चे फॅन्स अवघ्या काही तासांत 4 लाखाऊन पेज ला

18/12/2023

बलात्कार प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलिसात तक्रार घेण्यास नकार पीडित महिलेचे तक्रार
अशाच बातमीसाठी #संपर्क करा व आमच्या #फेसबुक पेज ला Follow करा
#संपादक
9325009999
महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज ताज्या अपडेट

महाराष्ट्र सरकारने काही काळापूर्वी महाराष्ट्र लॅपटॉप योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेद्वारे, लॅपटॉप खरेदी करण्यासाठी स...
16/12/2023

महाराष्ट्र सरकारने काही काळापूर्वी महाराष्ट्र लॅपटॉप योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेद्वारे, लॅपटॉप खरेदी करण्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांना ₹ 25000 चे आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल. आम्ही तुम्हाला हे देखील सांगूया की राज्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या सर्व विद्यार्थ्यांना किमान 75% गुण आणि सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांना किमान 85% गुण मिळणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सरकारी आणि खासगी शाळांनाच मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारकडून या योजनेअंतर्गत 30 लाखांहून अधिक लॅपटॉप वितरित केले जाणार आहेत. महाराष्ट्र लॅपटॉप योजना 2024 साठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही सर्वांनी पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत.

Maharashtra Sarkar free laptop Yojana 2023
कोरोना विषाणूनंतर देशाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे पण सर्वात मोठी समस्या आर्थिक परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासोबतच शासनाकडून विविध प्रकारच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. ज्या अंतर्गत सर्वांना खूप फायदे मिळाले आहेत. अशा प्रकारे, महाराष्ट्र सरकारने अलीकडेच महाराष्ट्र लॅपटॉप योजना 2023 जारी केली आहे. त्याद्वारे सर्व विद्यार्थ्यांना लॅपटॉपसाठी आर्थिक मदत दिली जाईल. जर तुम्ही पात्र आणि पात्र लाभार्थी असाल. मग हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या लेखाखाली, आम्ही तुम्हाला महाराष्ट्र लॅपटॉप योजना 2023 शी संबंधित माहिती देणार आहोत जसे की योजनेचे उद्दिष्ट, फायदे आणि वैशिष्ट्ये, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया इ. लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचावा ही विनंती

मुंबई: मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाजवळ भिवंडी येथील आमणे गावानजिक लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान विकसित करण्यात य...
15/12/2023

मुंबई: मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाजवळ भिवंडी येथील आमणे गावानजिक लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान विकसित करण्यात येणार आहे. खेळासाठी राखीव असलेली आमणे येथील ५० एकर जागा क्रिकेट मैदानासाठी ६० वर्षे भाडेतत्त्वावर देण्याकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) निविदा जारी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही जागा घेण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) स्वारस्य दाखविल्याचे समजते. ही जागा एमसीएच्या ताब्यात गेली तर ठाण्यात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उपलब्ध होईल.

एमएसआरडीसीने मुंबई – नागपूर ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम हाती घेतले आहे. समृद्धी महामार्गावरील नागपूर – शिर्डी ६०० किमीचा टप्पा सध्या सेवेत दाखल असून उर्वरित महामार्ग नव्या वर्षात सेवेत दाखल होईल. दरम्यान, या महामार्गालगत पेट्रोल पंप, हॉटेल, शौचालय यासह अन्य सुविधा एमएसआरडीसी विकसित करणार आहे. त्यानुसार ठाण्यात समृद्धी महामार्ग जिथून सुरू होतो त्या भिवंडीतील आमणे गावापासून काही अंतरावर, वडपेपासून ५ किमी अंतरावर राज्य सरकारच्या मालकीची आणि सध्या एमएसआरडीसीकडे असलेली ५० एकर जागा खेळासाठी राखीव आहे. ही जागा खेळासाठी, त्यातही क्रिकेटच्या मैदानासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या निर्णयानुसार ही जागा ६० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याकरिता निविदा काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

याला म्हणतात सोशल मीडियाचा योग्य वापर’, गरीब पेंटरनं शेअर केली अशी रील की अमेरिकन्स घेतायेत शोधसोशल मीडिया हे अत्यंत प्र...
13/12/2023

याला म्हणतात सोशल मीडियाचा योग्य वापर’, गरीब पेंटरनं शेअर केली अशी रील की अमेरिकन्स घेतायेत शोध

सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. जर सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीनं केलात तर काही तासांत तुम्ही लाखो रुपये सुद्धा मिळवू शकता. असे कितीतरी सोशल मीडिया इन्फ्लुएंझर्स तुम्ही पाहिले असतील ज्यांच्याकडे खाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते अन् आज ते लाखो रुपयांच्या गाड्यांमध्ये फिरतायेत. अन् याचिच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. भिंती रंगवणाऱ्या एका पेंटरनं स्वत:ची जाहिरात अशा पद्धतीनं केली की आज तो आंतरराष्ट्रीय पेंटर म्हणून ओळखला जातोय. एका व्हिडीओमुळे रातोरात तो एखाद्या फिल्मस्टारसारखा प्रसिद्ध झालाय.

U-19 Asia Cup, IND vs PAK: अंडर-१९ आशिया चषक २०२३च्या पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला. या सामन्यात टीम...
11/12/2023

U-19 Asia Cup, IND vs PAK: अंडर-१९ आशिया चषक २०२३च्या पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाच्या अर्शीन कुलकर्णीने चमकदार कामगिरी केली. त्याला भारतीय संघातील पुढचा हार्दिक पंड्या असे म्हटले जात आहे. खरच अर्शीन पंड्याची जागा घेणार का?

Written by स्पोर्ट्स न्यूज डेस्क
December 10, 2023 14:09 IST
Follow Us महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज

IND vs PAK: Will Team India's new all-rounder Arshin Kulkarni replace Hardik Pandya find out
टीम इंडियाच्या अर्शीन कुलकर्णीने चमकदार कामगिरी केली. त्याला भारतीय संघातील पुढचा हार्दिक पंड्या असे म्हटले जात आहे. सौजन्य- (ट्वीटर)

सोलापूर : सोलापूर शहरातील जिल्हा कारागृहामध्ये गार्ड म्हणून सेवेत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवर तीन गोळ्या झाडून  ...
10/12/2023

सोलापूर : सोलापूर शहरातील जिल्हा कारागृहामध्ये गार्ड म्हणून सेवेत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवर तीन गोळ्या झाडून घेतल्याची घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. विकास गंगाराम कोळपे (वय ३७ रा. जि. कारागृह वसाहत सोलापूर) असे या पोलिसाचे नाव आहे.

गोळ्या झाडून घेतलेले विकास हे मूळचे पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी येथील रहिवासी आहे. दोन वर्षांपूर्वी तो सोलापुरातील जिल्हा कारागृहात बदलून आला होता. त्याने यापूर्वी २०१३ मध्ये कोल्हापूर, २०१६ येरवडा जेल पुणे, २०१७ अहमदनगर, २०१९ सांगली आणि २०२१ मध्ये सोलापूर जिल्हा कारागृहात मुख्य प्रवेशद्वारात गार्ड म्हणून कर्तव्य बजावत होते. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांनी स्वतः जवळील एसएलआर बंदुकीतून स्वतःवर तीन गोळ्या झाडून घेतल्या.
या गोळ्या छाती आणि खांद्यात घासून गेल्या असल्या तरी ते यामुळे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर जिल्हा कारागृहातील वरिष्ठ अधिकारी हरिभाऊ मिंड व इतरांनी भेटी देऊन माहिती घेतली. दरम्यान यातील पोलीस शिपाई कोळपे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलले असल्याची चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज ताज्या अपडेट

08/12/2023

चित्रदुर्ग कर्नाटक मधील नॅशनल हायवेवर एका कंटेनर गाडीचा पलटी होऊन अपघात

04/12/2023

कारवाहीच्या नावाने महाराष्ट्र पोलिसांचा वाहतुक विभाग नुसत ढोंग करतय... अधिकारी आला तर डिवाईस नसतं... डिवाईस असलं की ते वापरायची परवानगी असलेला अधिकारीच नसतो... बेशिस्त बस चालकांना शिस्त लावायची आहे की नाही..? नक्की काय साट-लोटं आहे..?

नागालँड पासिंगच्या गाड्यांच्या अवैध व्यवसायाला महाराष्ट्र रस्ते वाहतुक अधिकारी अभय का देत आहेत...? माल नागालँडला मिळतोय...पण मलिदा कोण खातय..?

#पनवेल_मनसे
योगेश चिले अधिकृत मनसे वृत्तांत अधिकृत महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज

 #बार्शी-सोलापूर रोडवर सौंदरेजवळ अपघात, 3 जखमीबार्शी - बार्शी-सोलापूर रोडवरील सौंदरे गावाजवळ बस आणि कारची भीषण धडक बसली....
04/12/2023

#बार्शी-सोलापूर रोडवर सौंदरेजवळ अपघात, 3 जखमी

बार्शी - बार्शी-सोलापूर रोडवरील सौंदरे गावाजवळ बस आणि कारची भीषण धडक बसली. या अपघातात कारमधील 3 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शहरातील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस प्रशासन, ग्रामस्थ आणि भगवंत सेना दलाच्या स्वयंसेवकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले. शिवसेना नेते दीपक आंधळकर यांनीही माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात हातभार लावला. कार सोलापूरहुन बार्शीकडे येत होती, तर बस बार्शीतून सोलापूरकडे जात असताना दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली.

महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज ताज्या अपडेट

रेकॉर्ड ब्रेक… प्रतिसादाबद्दल आभार !नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करण्यासाठी अविरत श्रमदान आणि सायकल मित...
04/12/2023

रेकॉर्ड ब्रेक… प्रतिसादाबद्दल आभार !

नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करण्यासाठी अविरत श्रमदान आणि सायकल मित्र संघटनासह विविध स्वयंसेवी संस्था, संघटना यांच्या पुढाकारो आयोजित ‘रिव्हर सायक्लोथॉन-२०२३’ यशस्वी झाली. तब्बल ३० हजाराहून अधिक सायकलपटू सहभागी झाले.

‘रिव्हर सायक्लोथॉन टीम’ ने ‘लाँगेस्ट लाईन ऑफ बायसिकल्स स्टॅटिक्स’च्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. जर्मनीचे रेकॉर्ड तोडण्यासाठी ६० देशांनी प्रयत्न केले. मात्र, भारताने हे रेकॉर्ड मोडले. या स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण आणि फिटनेसचा संदेश देण्यात आला.
ऐतिहासिक प्रतिसाद… आणि अविस्मरणीय क्षण… अशी ही रॅली.. रेकॉर्ड ब्रेक झाली!

पिंपरी-चिंचवड महापालिका, पोलीस प्रशासन तसेच सर्व सहभागी सायकलपटू आणि पर्यावरण प्रेमींचे मन:पूर्वक आभार!

महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज ताज्या अपडेट

04/12/2023

आजचा धक्कादायक अनुभव-

मुंबईत सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेताना त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला- प्रत्येक चौकात २५००० रूपयांची वसुली व २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे!

मुंबईत 652 ट्रॅफिक जंक्शन आहेत. 25,000×652 = 1,63,00,000/ प्रति दिन म्हणजे फक्त एकट्या मुंबईत तब्बल 1.63 कोटी रुपये.. इतर शहरांचं काय?

संबंधित मंत्रीमहोदयांनी वा अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठी होतोय का याची जनतेला माहिती मिळेल!

ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली ?

𝗪𝗜𝗡𝗡𝗘𝗥𝗦 👏Congratulation to the Suryakumar Yadav-led unit on winning the   T20I series 4-1
04/12/2023

𝗪𝗜𝗡𝗡𝗘𝗥𝗦 👏

Congratulation to the Suryakumar Yadav-led unit on winning the T20I series 4-1

Address

Solapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category