Shegaon Niwasi

Shegaon Niwasi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shegaon Niwasi, Digital creator, Gajanan maharaj Mandir, Shegaon.
(3)

12/12/2023

Jai Shri Gajanan

13/11/2023

आणी विस्तवा वाचून चिलीम पेटली...

09/11/2023
शेगावमध्ये मुख्य मंदिराच्या आग्नेयेस महाराजांनी जेथे दिनांक ८ सप्टेंबर १९१० रोजी समाधी घेतली तेथे आज संगमरवरी पादुका आहे...
31/10/2023

शेगावमध्ये मुख्य मंदिराच्या आग्नेयेस महाराजांनी जेथे दिनांक ८ सप्टेंबर १९१० रोजी समाधी घेतली तेथे आज संगमरवरी पादुका आहेत. त्यापाठी विठ्ठलरुक्मिणीचे मंदिर असून त्या जागेला समाधीस्थळ म्हणतात. त्याला लागूनच महाराजांचे शयनगृह आहे. श्रींच्या वापरातील पलंग येथे ठेवला असून त्यावर त्यावर दोन बाजूला लोड आहे आणि मध्यभागी श्रींचा फोटो आहे. #समाधीग्रहण स्थळाच्या डाव्या बाजूला श्रींनी त्या काळी प्रज्वलीत केलेली धूनी आजही धगधगत असून शेजारीच श्रींनी वापरलेले चिमटे येथे ठेवलेले आहेत. एक सेवक धूनी अखंड तेवत ठेवतो. शिवाय अनेक भक्त त्यात तूप,राळ,तूपाची वात, गांजा इत्यादी साहित्याची भर घालत असतात.

#पाठशाळा

मुख्य मंदिराच्या भोवती पटांगण आहे आणि त्याला चार बाजूंनी दगडी पाठशाळेने वेढलेले आहे. पाठशाळेला जागोजागी सुंदर कमानी आहेत. ह्याच पाठशाळेत आज विश्वस्त मंडळाची कचेरी, देणगी, आणि अभिषेक काउन्टर आणि सनई चौघडा वाजविण्याची जागा आहे.

समाधी ग्रहण स्थळाबाहेरचा परिसर

समाधी ग्रहण स्थळाबाहेर पूर्व बाजूस एक विशाल औदुंबर वृक्ष व #हनुमानाची अतिप्राचीन मूर्ती असणारे छोटे मंदिर आहे.
🌹🌹🚩🚩🌹🌹

मुख्यप्रवेशद्वारा बाहेरचा परिसर

मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजुला नागदेवता मंदिर आणि श्रींचे सेवक श्री बाळाभाऊ महाराज व श्री नारायण महाराज ह्यांच्या समाध्या आहेत.

पारायण मंडप

समाघीग्रहण स्थळ आणि शयनगृहाच्या समोर पारायण मंडप आहे. ज्या भक्तांना महाराजांच्या ग्रंथाचे वाचन करायची इच्छा असते त्यांच्याकरीता ग्रंथ, आसन, निरांजन विझू नये म्हणून काचेचे कंदिल, उदबत्तीची घरे सुद्धा ठेवले आहेत. काही वेळेस भक्त आपले चष्मे न आणल्याने पारायण करु शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन संस्थानाने विविध नंबरच्या चष्म्यांची सोय तेथेच केलेली आहे. या मंडपात भक्तांना जप, ध्यान, चिंतन, मनन व पारायण करता येते.

प्रवेशद्वार

पाठशाळेला लागूनच दोन प्रवेशद्वारे आहेत. उत्तरेकडे मंदिरात येण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार असून पश्चिमेला दुसरे प्रवेशद्वार आहे.स्वामी भक्त यांनी या मठात जाऊन स्वामींच्या या प्रासादिक पादुकांचे अवश्य दर्शन घ्यावे.

At Shegaon
31/10/2023

At Shegaon

25/10/2023

आज मुख्य मंदिराच्या तळघरात जिथे हरि पाटलांनी शीला ठेवली होती तिथे श्री गजानन महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे. ह्या जागेला भुयार म्हणतात. भुयारात प्रवेश केल्यावर श्रींचे दर्शन घडते. भुयारात आतल्या बाजुनी आता संगमरवराच्या लादया बसविण्यात आल्या आहेत.
🎪
मंदिराचा बाहेरचा भाग
१९०९ साली मंदिराच्या बांधकामाची सुरुवात झाली. काळया दगडांनी बांधलेल्या या मंदिराची लांबी ४८ फुट व रुंदी ४२ फुट असून शिखराचा भाग ५१ फूट उंच आहे. मंदिराच्या पूर्वीच्या दगडी भिंतीवर पौराणिक काळातील व्यक्तिरेखा कोरल्या होत्या. समाघी शताब्दी सोहळयाचे औचित्य साधून हा फोडलेला भाग आणि दगडी शिखराचा भाग २००९ मध्ये उतरवीण्यात आला आहे. उतरविलेल्या भिंती आणि शिखराची पूनर्रचना संकल्पानुसार अडगांवच्या मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी करण्यात येणार आहे.
🌹🌹
राम मंदिर
श्रींचे दर्शन घेऊन भक्त भूयारातून तळमजल्यावर राम मंदिरात प्रवेश करतात. अशी रचना करण्या मागे एक विशिष्ट हेतू आहे. संताकडे गेल्यावर संत भक्तांना देवापर्यन्त पहोचण्याचा मार्ग दाखवितात. म्हणून महाराजांचे दर्शन घेऊन भूयारातून बाहेर पडल्यावर भक्त रामाच्या दर्शनासाठी जातात. याच राम मंदिरात महाराजांचे पालखीत ठेवन्यात येणारे चांदीचे दोन मुखवटे आहेत.
🌺
सभामंडप
राम आणि हनुमान मंदिराला जोडणाऱ्या सभामंडपातील आतल्या भागात महिरपीच्या (कमान) वरच्या भागात महाराजांच्या पोथीतील विविध लीला चित्रबद्ध केल्या आहेत. या सभामंडपात सर्वत्र रेखीव कमानी आहेत. पूर्वीच्या दगडाच्या बांधकामावर रंग चढविल्याने त्या अधिक आकर्षक दिसतात.

श्री_गजानन_महाराज #शेगाव "🚩🚩🌺

08/10/2023

गावकर्यांनी घेतली भक्त पितांबराची अग्नीपरीक्षा :🚩: #अनंतकोटी

19/09/2023

#ऋषीपंचमी च्या दिनी शेगावीचा राणा समाधीस्थ झाला
#गजानन_महाराज_पुण्यतिथी

07/09/2023

#गजानन_महाराजांची परमभक्त बायजाबाईची सत्वपरीक्षा

03/09/2023

#गजानन_महाराज_शेगाव सोडुन का गेले होते? आणी कुणी परत आणले ?

31/08/2023

#संत_गजानन_महाराजांनी धगधगत्या अग्नीलाही थंड केले ||🚩||

12/08/2023

क्या आपने भी शेगाव मे यह महोत्सव देखा हैं? 🔭

11/08/2023

- पंढरपूर मुक्कामी असताना बापूराव नामक महाराजांचा भक्त स्वत: विठ्ठल मंदिरात जाऊ शकला नाही. श्रीगजानन महाराजांनी त्याला विठोबाचे दर्शन घडवून दिले. इतरांना जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा त्यांनीही महाराजांकडे दर्शनाचा आग्रह धरला. तेव्हा अगोदर बापूरावांसारखे निरागस व शुद्ध मनाचे व्हा, असे महाराज म्हणाले, पंढरपुरात कॉलऱ्याने ग्रस्त झालेल्या एका सोबत्याला सोडून जेव्हा इतर लोक जाऊ लागले, तेव्हा श्रीगजानन महाराजांनी स्वत: त्या आजारी माणसाची काळजी घेतली . तो बरा होईपर्यंत त्यांनी जाणे तहकूब केले. बाळापूर येथील बाळकृष्णपंत व पुतळाबाई वृद्धावस्थेत शेवटी दरवर्षीप्रमाणे सज्जनगडावर जाऊ शकत नव्हती. स्वप्नातील दृष्टान्ताप्रमाणे बाळकृष्ण उत्सवाच्या दिवशी समर्थांची वाट पाहत होते. खरोखरच समर्थांची जय जय रघुवीर समर्थ अशी वाणी ऐकू आली आणि समर्थ बाळकृष्णासमोर उभे ठाकले. पाहता पाहता क्षणात समर्थ व क्षणात गजानन महाराज अशी दोन्ही रूपे बाळकृष्णांना दिसू लागली. एका दृष्टीने हा चमत्कार म्हणता येईल, . अशाच प्रकारचे दर्शन श्री मथुरबाबू यांना घडले असल्याचा उल्लेख श्रीरामकृष्ण-लीलाप्रसंग या ग्रंथात आहे. श्रीरामकृष्ण व्हरांड्यात फिरत होते. मथूरबाबूंचे त्यांच्याकडे लक्ष होते. पाहता पाहता मथूरबाबूंचा आपल्या डोळ्यांवर विश्र्वास बसेना. कारण एकदा शिव व एकदा श्रीरामकृष्ण असे त्यांना दर्शन घडले.

श्रीगजानन महाराजांनी गंगायमुनेचे स्मरण करताच भास्कर पाटलांच्या शेतातील कोरडी विहीर तुडुंब भरून जाणे, नर्मदेची स्मृती करताच बुडणारी नाव तरून जाणे या चमत्कारांमागेही श्रीमहाराजांची इच्छाशक्तीच होती. ही इच्छाशक्ती लोकमान्य टिळकांच्याही पाठीशी उभी राहिल्याचा उल्लेख ‘श्री गजानन विजय’मध्ये आहे. लोकमान्य टिळक, दादासाहेब खापर्डे, त्यांचे चिरंजीव बाबासाहेब यांच्यासारख्या बुद्धिनिष्ठ व्यक्तीनांही श्रीगजाननमहाराजांबद्दल नितांत आदर होता, ही गोष्टही चमत्कारांमधील कार्यकारणसंगती दर्शवून जाते. गंगाभारतीचा सर्वांगावर उठलेला कुष्ठरोग श्री गजानन महाराजांनी नष्ट केला. महापुरुषांचा स्पर्शामुळे घडून आलेल्या अशा घटनांचा उल्लेख अन्य वाङ्मयांतही आढळून येतो.

10/08/2023

संत गजानन महाराज शताब्दी महोत्सव का दुर्लभ विडिओ |🚩🚩!! #गजाननमहाराज #शेगाव

Address

Gajanan Maharaj Mandir
Shegaon

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shegaon Niwasi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other Digital creator in Shegaon

Show All