महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या दरेनिवासस्थानी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पाचगणी तापोळा तसेच नवीन महाबळेश्वरच्या विकास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासकीय बैठकीचा आयोजन केले होते याप्रसंगी सातारा जिल्ह्यातील प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित आहेत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे दौऱ्यावर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसीय दरे दौऱ्यावर आले असून आज त्यांचे दरे हेलीपॅड वर आगमन झाले. दरम्यान साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपमुख्यमंत्री शिंदे हे मंगळवार दि. १४ रोजी होणाऱ्या उत्तरेश्वरच्या यात्रेसाठी आले आहेत. दरम्यान हा त्यांचा खासगी दौरा असल्याचे सांगितले जात आहे. उद्या पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री शिंदे हे बैठक घेणार आहेत. दरम्यान कोयना जलाशयावर चालणारी तराफासेवा उत्तेश्वरच्या यात्रेनिमित्त भाविकांसाठी मोफत केली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मैत्रीचा गैरफायदा घेवून सातारा मधील महिलांची ४० लाखांची फसवणूक.
साताऱ्यातील महिलांची 40 लाखांची फसवणूक सातारच्या बंटी बबली चरकी दाम्पत्यावर कारवाईची मागणी
सहकार विभागाशी निगडीत सर्व संस्थांचा कारभार पादर्शक असावा
- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील
सातारा, दि.11 : सहकार विभागाशी निगडीत असलेल्या सर्व संस्थांचा कारभार हा पादर्शक असला पाहिजे, अशी शासनाची अपेक्षा आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी व संस्थेत काम करणाऱ्यांना न्याय दिला पाहिजे, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केले.
महाबळेश्वर पाचगणीसह साताऱ्यात सर्वत्र दाट धुके
महाबळेश्वर पाचगणी सह साताऱ्यात सर्वत्र दाट धुके आणि ढगाळ वातावरण आहे.सर्वत्र पहाटे पासून आकाश काळवंडलेले वातावरण आहे
अशा ढगाळ आणि दाट धुक्याच्या वातावरणामुळे स्ट्रॉबेरी पिकासह बागायती पिकांना धोक्याचे घंटा समजली जात आहे
मोठ्या प्रमाणात वातावरणात धुके पसरल्याने पिकांवर रोगराई त्याचबरोबर साथीच्या रोगाचे ही प्रमाण वाढले आहे ढगाळ वातावरण व धुके असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी पिकासह इतर बागायती पिकांवर औषधाच्या फवारणीचा खर्च वाढला आहे दरम्यान महाराष्ट्राचे मिनी काश्मीर देखील या दाट धुक्यामुळे व पर्वतरांगांवर पसरलेले पांढरे शुभ्र दाट धुके जणू बर्फाच्छादित प्रदेशाचा अनुभव देत आहे
अजिंक्यता-यावर श्रमदानासाठी धावली युवा शक्ती
गुरू अकादमीचे योगदान
सातारा : मिलिटरी व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणात प्रशिक्षण देणाऱ्या साताऱ्यातील गृह अकादमीच्या जवानांनी एकजुटीची ताकद दाखवत किल्ल्यावर श्रमदान केले.
मेटगुताड येथे प्रशासनाच्या आशीर्वादाने अवैध उत्खनन ; कारवाईची मागणी
मेटगुताड येथे प्रशासनाच्या आशीर्वादाने अवैध उत्खनन ; कारवाईची मागणी
महाबळेश्वर-पाचगणी हा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो. मात्र अलीकडच्या काळात वाढते पर्यटन पर्यावरणाच्या तथा निसर्गाच्या मुळावर घाव घालत असून प्रशासन याला अभय देत असल्याचे उघड होत आहे.
पाचगणी परिसरातील मेटगुताड येथे सर्वे नंबर 19/अ/3 येथील 44 गुंठे क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत उत्खनन सुरू आहे. याबद्दल प्रशासनाला वारंवार कळवून देखील प्रशासनाने हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका घेतल्याचे दिसत आहे. याठिकाणी स्ट्रॉबेरी लावण्याकरता शिंदे नामक व्यक्ती हे सपाटीकरण करत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले मात्र या ठिकाणी समक्ष जाऊन पाहणी केली असता येथे व्यावसायिक कारणासाठी जमिनीचे सपाटीकरण व मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असल्याचे समोर आले आहे.
सातारा स्वाभिमान दिन शाही पद्धतीने साजरा
सनईचे मंजुळ स्वर, तुतारीचा निनाद, गुरुकुल स्कूलच्या बॅंण्डने वातावरण उल्हासित
किल्ले अजिंक्यताऱ्याच्या प्रवेशद्वाराला झेंडूच्या फुलांची तोरणांची सजावट
छ. शाहु महाराजांच्या पालखीला श्रीमती याशनी नागराजन यांच्या हस्ते प्रारंभ
पालखीचा मान महिलांना
सातारा ः तत
प्रतिनिधी
सातारा
थंडीच्या धुक्याच्या वातावरणात सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास किल्ले अजिंक्यताऱ्याच्या प्रवेशद्वाराजवळ तुतारींचा निनाद, सनईचे मंजुळ स्वर आणि गुरुकुल स्कूलच्या बँड पथकामुळे वातावरण शिवमय झाले होते. अजिंक्यताऱ्याच्या प्रवेशद्वाराला झेंडूच्या फुलांचे तोरण करण्यात आले होते. सातारा स्वाभिमान दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांच्या हस्ते छ. शाहु महाराज यांच्या मानाच्या पाल
अजिंक्यता-यावर श्रमदानासाठी धावली युवा शक्ती
गुरू अकादमीचे योगदान
सातारा : मिलिटरी व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणात प्रशिक्षण देणाऱ्या साताऱ्यातील गृह अकादमीच्या जवानांनी एकजुटीची ताकद दाखवत किल्ल्यावर श्रमदान केले.
छत्रपती शाहू महाराज यांचा स्वाभिमान दिवस अजिंक्यतारा किल्ला येथे साजरा
*४५४ आडवी बाटली १९ उभी बाटली ७ बाद*
*४८० झालेले महिला मतदान ७२३ एकुण महिला मतदान आळजापूर लढा जिंकला*
*आळजापूरचा दारूबंदीचा लढा महाराष्ट्राला दिशा देणार : विलास बाबा जवळ*
आळजापूर ता. फलटण येथे सहा महिन्यापूर्वी सुरू झालेल्या परमिट रूम बार या दारू दुकानाला विरोध करीत महिला व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांनी गावात सुरू केलेला लढा जिंकला आहे आज गावातील लोकांनी मतदान करून दारू दुकान हद्दपार केले आहे.
या वेळी महाराष्ट्र व्यसनमुक्ती संघाचे मार्गदर्शक विलास बाबा जवळ यांनी हा निकाल महाराष्ट्राला नवी दिशा देणार असल्याचे मत व्यक्त केले.
आळजापूर येथे परमिट रूम बारला परवानगी देत असताना ग्रामपंचायतीचा कोणतीही परवानगी अथवा ना हरकत दाखला न घेता उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली होती. गावात याची माहिती मिळताच ग्रामपंचायतीचे सरपंच शुभम नलवडे यांनी या विषयावर त