24/12/2024
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोमवारी दैनिक ऐक्यच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली. दैनिक ऐक्यचे संपादक शैलेंद्र पळणिटकर यांनी त्यांचे स्वागत केले. ऐक्यकार स्व. सुरेश पळणिटकर आणि स्व. अभयसिंहराजे भोसले यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. तीच परंपरा संपादक शैलेंद्र पळणिटकर यांनी जोपासली आहे. दैनिक ऐक्यने नेहमीच सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान दिले आहे. जिल्हयातील सर्वसामान्यांचे प्रश्न परखडपणे मांडले आहेत असे देखील ते म्हणाले. #सातारा