Dhanvi Yogesh RK creations

Dhanvi Yogesh RK creations Digital creations regarding adeveritising and marketing, music,movies and most importantly CRICKET

12/10/2023

#सांगली
#प्रगतिशील सांगली
#वेगवान सांगली

16/07/2023
नमस्कार,🚩 *रामानंद रेसिडन्सी* मध्येएकदम मस्त प्राईम लोकेशन, हवेशीर प्लॅनिंग, अद्यावत सेवा सुविधा यांचा सुंदर मिलाप आणि प...
13/04/2023

नमस्कार,

🚩 *रामानंद रेसिडन्सी* मध्ये

एकदम मस्त प्राईम लोकेशन,

हवेशीर प्लॅनिंग,

अद्यावत सेवा सुविधा

यांचा सुंदर मिलाप
आणि

पहाता क्षणीच ❤प्रेमात पडावं असा भव्य गृहप्रकल्प .

आणखी काय पाहिजे?

आणि किमतीपण एकदम💰 पॉकेट फ्रेंडली

🔖 1 BHK २१ लाख*
🔖 2 BHK २९ लाख*

⛳लोकेशन असं भारी की सगळ्या इंग्रजी मराठी माध्यमांच्या प्रतिष्ठित शाळा व कॉलेजीस अगदी जवळ

गार्डन, बाजार, बँक, हॉस्पिटल्स रोज लागणा-या सगळ्या गोष्टींची हाकेच्या अंतरावर

💁🏻‍♀️सुविधा :
✔ लिफ्ट व बॅटरी बॅक अप सुविधा⚡

✔ पार्किंगची भरपूर सोय 🚗

✔ सीसी टीव्ही🎥

✔ प्लॉटला लागूनच किडझ पार्क🚶‍♂️🚶‍

✔ दत्त व हनुमान मंदिर अगदी ५०० मिटर अंतरावर🛕

✔ किराणा, औषधं, भाजी बाजार हाकेच्या अंतरावर 😎

✔ एच. डी.एफ. सी. सह सर्व बँकांच्या गृहकर्जाची सोय💰

📣मनासारखं घर तुमची वाट पहातेय त्वरा करा ,आपला फ्लॅट आजच बुक करा

👨‍✈️फडके डेव्हलपर्स म्हणजेच नातं आपुलकीचं प्रेमाच्या विश्वासाचं

🎯 साईटचा पत्ता:
वारणाली, विद्यानगर, गल्ली नंबर १, विश्रामबाग, सांगली ४१६ ४१५
Rera No: P53100030929

📞संपर्क:- *9326306847*

( WhatsApp वरती '🙏' पाठवा...
आमचा प्रतिनिधी तुम्हाला संपर्क करेल)

फडके डेव्हलपर्स

*योगेश कुलकर्णी*
*Dhanvi marketing associates*

06/04/2023

#रामानंदरेसिडेन्सी
#फडकेडेव्हलपरस्

30/03/2023






नमस्कार,श्रीराम नवमीच्या शुभेच्छा🙏🚩 *रामानंद रेसिडन्सी* मध्येएकदम मस्त प्राईम लोकेशन, हवेशीर प्लॅनिंग, अद्यावत सेवा सुवि...
30/03/2023

नमस्कार,

श्रीराम नवमीच्या शुभेच्छा🙏

🚩 *रामानंद रेसिडन्सी* मध्ये

एकदम मस्त प्राईम लोकेशन,

हवेशीर प्लॅनिंग,

अद्यावत सेवा सुविधा

यांचा सुंदर मिलाप
आणि

पहाता क्षणीच ❤प्रेमात पडावं असा भव्य गृहप्रकल्प .

आणखी काय पाहिजे?

आणि किमतीपण एकदम💰 पॉकेट फ्रेंडली

🔖 1 BHK २१ लाख*
🔖 2 BHK २९ लाख*

⛳लोकेशन असं भारी की सगळ्या इंग्रजी मराठी माध्यमांच्या प्रतिष्ठित शाळा व कॉलेजीस अगदी जवळ

गार्डन, बाजार, बँक, हॉस्पिटल्स रोज लागणा-या सगळ्या गोष्टींची हाकेच्या अंतरावर

💁🏻‍♀️सुविधा :
✔ लिफ्ट व बॅटरी बॅक अप सुविधा⚡

✔ पार्किंगची भरपूर सोय 🚗

✔ सीसी टीव्ही🎥

✔ प्लॉटला लागूनच किडझ पार्क🚶‍♂️🚶‍

✔ दत्त व हनुमान मंदिर अगदी ५०० मिटर अंतरावर🛕

✔ किराणा, औषधं, भाजी बाजार हाकेच्या अंतरावर 😎

✔ एच. डी.एफ. सी. सह सर्व बँकांच्या गृहकर्जाची सोय💰

📣मनासारखं घर तुमची वाट पहातेय त्वरा करा ,आपला फ्लॅट आजच बुक करा

👨‍✈️फडके डेव्हलपर्स म्हणजेच नातं आपुलकीचं प्रेमाच्या विश्वासाचं

🎯 साईटचा पत्ता:
वारणाली, विद्यानगर, गल्ली नंबर १, विश्रामबाग, सांगली ४१६ ४१५
Rera No: P53100030929

📞संपर्क:- *9326306847*

( WhatsApp वरती '🙏' पाठवा...
आमचा प्रतिनिधी तुम्हाला संपर्क करेल)

फडके डेव्हलपर्स

*योगेश कुलकर्णी*
*Dhanvi marketing associates*

23/03/2023

#गुढीपाडवा
#नवहिंदुवर्ष
#शुभेच्छा

07/03/2023



04/03/2023

#मौजिबंधन
#श्रिहान
#भाग्यनगर
#एन्जॉय

03/03/2023

#मौजिबंधन
#श्रिहान
#हैद्राबाद
#एन्जॉय

18/02/2023




16/02/2023




13/02/2023



10/02/2023


#कसोटीक्रिकेट



" रडके "

ऑस्ट्रेलिया क्रिकेट म्हणले की मोठे मोठे क्रिकेट ग्राउंड,मोठे मोठे खेळाडू,जबरदस्त तेजतर्रार गोलंदाज,धुवाधार फलंदाज,आकर्षक क्षेत्र रक्षक,एकापेक्षा एक कल्पक कर्णधार..बिनधास्त आणि खडूस स्लेजिंग

आणि

अचूक आणि बिनचूक प्रक्षेपण आणि मस्त असे समालोचन

असे काही चित्र सगळ्यांच्या डोळ्या समोर येत असेल

मला मात्र ऑस्ट्रेलया क्रिकेट म्हणले की

अंडर आर्म गोलंदाजी

मर्यादा सोडून केलेली शिवीगाळ

पंचांशी केलेली वादावादी

मुरली ला बरबाद करण्याचा प्रयत्न

आणि

Sandpaper gate प्रकरण

जास्त आठवते....

त्यात काही दिवसा पूर्वीच दीड दिवसात संपलेला आफ्रिकेविरुद्ध चा कसोटी सामना देखील जमा करूया...
(असाच फॉलोअप घेत होतो तर तिसऱ्या दिवशी धावफलक च दिसेना.मग हुडकले तर समजले
सामना दीड दिवसात संपला.)

आणि
हे भारताला शिकवतात...

काय म्हणतात बघा....

ऑस्ट्रेलिया संघा मध्ये डावखुरे फलंदाज जास्त आहेत म्हणून एका बाजूला खेळ पट्टी कोरडी ठेवली आहे.

.खेळपट्टी खूप च फिरकी घेती आहे.

रवींद्र जडेजा ने चेंडू वर काहीतरी लावले आणि चेंडूचा आकार बदलण्याचा ,( बॉल tampering) प्रयत्न केला....

रडा लेकानो...नाचता येईना अंगण वाकडे...

जाऊदे..

सौरव गांगुली युगा नंतर सगळ्यांनीच तुमच्या असल्या वागण्याकडे दुर्लक्ष करणे शिकून घेतले आहे...

आपटा किती अपटायची ते....

दरम्यान

भारत
151 /3

उपहार
दुसरा दिवस.

    #कसोटीक्रिकेट       तरपहिल्या दिवशी लाडखडत्या सुरुवाती नंतर उपहार  वेळ ( lunch time ) पर्यंत ऑस्ट्रेलिया 76 / 2.... ...
09/02/2023



#कसोटीक्रिकेट

तर

पहिल्या दिवशी लाडखडत्या सुरुवाती नंतर उपहार वेळ ( lunch time ) पर्यंत ऑस्ट्रेलिया 76 / 2....

ऑस्ट्रेलिया क्रिकेट मध्ये ज्यांना nuffy म्हणजे चोवीस तास क्रिकेट विचार करणारे खेळाडू म्हणून संबोधले जाते ते

स्टीव्हन स्मिथ आणि मारनस लाबुषेन ...

जे सध्याचे कसोटी क्रिकेट मधील आघाडीचे फलंदाज आहेत ...
त्यांनी डाव सांभाळत किल्ला लढवला आहे....
आता फलंदाजी करणे थोडे सोपे होत जाईल आणि गोलंदाजी ची परीक्षा घेतली जाईल
मात्र

त्याच वेळी चेंडू रिव्हर्स स्विंग व्हायला लागला...40 षटके जुना , लाल चेंडू भारतीय उपखंडात रिव्हर्स स्विंग होतो...
तर चेंडू आणि बॅट मधील युद्ध पाहण्यासारखे असेल.

असो

आता चर्चा करूया संघ निवडीची.....

ऑस्ट्रेलिया चा संघ आपेक्षे प्रमाणे निवड करून पुढे गेला आहे....
Travis head खेळत नाहीये ही एकच आश्चर्य पूर्वक गोष्ट.. बाकी सगळा संघ अपेक्षे नुसारच आहे.....

भारतीय संघ निवडी बाबत मात्र असे म्हणता येणार नाही....

1. के एल राहुल संघात आणि शुभमन गिल बाहेर.....

राहुल चा फॉर्म सध्या चांगला नसल्याने त्याच्या ऐवजी गिल सलामीला खेळला पाहिजे असे बरेच जणांचे मत असू शकते किंबहुना आहे...

त्यातच एकदिवसीय सामन्यात गिल ची फलंदाजी तुफान चालली होती...

मात्र

पांढरा चेंडू व लाल चेंडू ह्यामध्ये नक्कीच फरक असतो .तसेच प्रत्येक खेळाडू ची मेहनत,प्रयत्न असतात .प्रत्येकाने स्वतःचे काही ना काही स्थान निर्माण केलेले असते...त्यामुळे तडका फडकी बदल करता येत नाहीत.

त्यामुळे राहुल खेळतो आहे हे योग्य च आहे...

त्याच वेळी त्याच्या साठी ही शेवटची संधी आहे असे मला तरी वाटते आहे.

शुभमन चा दिवस लवकरच येईल.

2.सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल....

सूर्या पेक्षा गिल चांगला खेळतो कसोटी क्रिकेट..
मात्र गिल रणजी मध्ये ही सलामी ला खेळतो आणि सूर्या मधल्या फळीत..त्या मुळे ठिक आहे ...

सूर्या खेलेगा...
3.श्रीकर भरत आणि इंशान किशन......

जो खेळेल तो पदार्पण करणार...

ईशान डावखुरा फलंदाज आणि भारत पेक्षा थोडा चांगला फलंदाज
मात्र यष्टिरक्षक म्हणून

निवड समिती चे झुकते माप भारत च्या पारड्या मध्ये आहे.मागील काही मालिका मध्ये भारत कसोटी संघाचा नियमित सदस्य आहे.

त्यामुळे भारत ची निवड योग्य.

4.रवींद्र जडेजा / axar पटेल / कुलदीप यादव.....

रवींद्र जडेजा पूर्ण फिट असेल तर कधीही अष्टपैलू खेळाडू आणि प्रथम क्रमांकाचा डावखुरा गोलंदाज म्हणून पहिली पसंती असेल.त्याची कामगिरी च तशी आहे.

axar पटेल की कुलदीप हा प्रश्र्न आहे.

एक वेगळ्या धाटणीचा गोलंदाज ..जादुई फिरकी...म्हणून

मी कुलदीप ला माझ्या संघात नेहमीच ...जिथे संधी मिळेल तिथे...(तीन फिरकी गोलंदाज एकाच सामन्यात खेळू शकतील तिथे )स्थान देईन.

आज राहुल द्रविड आणि रोहित शर्माने मात्र वेगळा विचार केला आहे.आणि axar पटेल ला निवडले आहे.अर्थात हा काही बचावात्मक वगैरे विचार नाही.

Axar हा गेल्या काही सामन्यात आघाडीचा डावखुरा गोलंदाज म्हणून पुढे आला आहे.
त्यामुळे

Axar ठिक है.

5.आश्विन ला पर्याय नाही.

6.जलदगती गोलंदाज न 1...मोहम्मद सिराज...कधीही...निर्विवाद

7.जलदगती गोलंदाज...अनुभवी..फिट...मोहम्मद शमी.... भरोसेमंद.....निर्विवाद

8.उमेश यादव आणि उनाडकट.....संधी मिळणे थोडे अवघडच आहे...

खरे तर त्या दोघांना रणजी उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्यात खेळायची परवानगी द्यायला हवी होती.

सौराष्ट्र आणि विदर्भ खेळत आहेत का,?
रणजी उपांत्य आणि अंतिम सामन्यात?

....Dhanvi
....Yogesh RK
Creations....

  #कसोटीक्रिकेट          कसोटी क्रिकेट मध्ये एक जुनी म्हण आहे....नाणे फेक जिंका      विचार करा...विचार करा...पुन्हा विचा...
09/02/2023


#कसोटीक्रिकेट


कसोटी क्रिकेट मध्ये एक जुनी म्हण आहे....
नाणे फेक जिंका
विचार करा...विचार करा...पुन्हा विचार करा
आणि
फलंदाजी निवडा.....

दौरा करणाऱ्या संघाला कसोटी मध्ये प्रथम फलंदाजी करण्याची संधी द्यावी असे देखील माझे मत आहे जेणेकरून यजमान संघाला परिस्थिती चा जास्त फायदा मिळू नये आणि परिस्थिती समसमान राहो...
असो
तर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे.
ऑस्ट्रेलिया ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी सुद्धा घेतली.
मात्र
फारसा फायदा उठविण्यात कमी पडलेले दिसतात...

धावसंख्या आहे
2/2 (2 गडी (वॉर्नर आणि ख्वाजा)) तंबूत परतले आहेत.

भारतीय गोलंदाजी जोशात आहे....

....Dhanvi
....Yogesh RK
Creations....

  #कसोटी क्रिकेट सर्वोत्कृष्ट क्रिकेट          चला बऱ्याच दिवसांनी पुन्हा कसोटी क्रिकेट चे दिवस आले असे म्हणावे लागेल.  ...
08/02/2023


#कसोटी क्रिकेट सर्वोत्कृष्ट क्रिकेट


चला बऱ्याच दिवसांनी पुन्हा कसोटी क्रिकेट चे दिवस आले असे म्हणावे लागेल.

बघा ना

वेस्ट इंडिज संघ झिम्बाब्वे मध्ये गेला आहे ...पहिला कसोटी सामना संपत आला...
दोन कसोटी सामने खेळले जाणार.

इग्लंड संघ न्यूझीलंड मध्ये आहे..सराव सामना चालू आहे.
ह्या दौऱ्यात दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत .

आणि

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत.......कसोटी क्रिकेट...
भारी वाटले ना.....

ऑस्ट्रेलिया संघ भारता मध्ये चार कसोटी सामने खेळण्या साठी आला आहे.
..वाह ..क्या बात है....

माझ्या सारख्या कसोटी क्रिकेट चाहत्या साठी मेजवानी च की......

अर्थात क्रिकेट बघितले किती जाईल ? सांगू नाही शकत

मात्र

नवीन पद्धती ( trend) नुसार आढावा घेणे ( follow and update) नक्की च आणि वारंवार....

अर्थात

भारत ऑस्ट्रेलिया मालिके वरती जास्त भर असेल
पण

इंग्लंड न्यूझीलंड सामने सुद्धा रोमांचक होऊ शकतात.

हा

वेस्ट इंडिज झिम्बाब्वे

सामने थोडे

क्रॉसिंग वेळी पॅसेंजर गाडी जशी एक्स्प्रेस गाडीला वाट (रुळ) देण्यासाठी बाजूला घेतात तसे चर्चिले जातील...

म्हणजे

वेळ मिळाला तर...
नाहीतर पहिल्या कसोटी मध्ये ब्रेथवेट आणि चांदरपौल चा सलामी भगिदरीचा ह्या शतकातील विक्रम ,
आणि
tangerine chandarpaul चे द्विशतक झिम्बाब्वे विरुद्ध ह्या बातम्यात कोणाला रस असणार?

मात्र झिम्बाब्वे ने पहिल्या डावात केलेला प्रतिकार कौतुकास्पद च...
असो

तर
भारत ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना उद्या पासून सुरू होतो आहे.....

नागपूर मध्ये...

दोन्ही संघ तगडे आहेत.

भक्कम फलंदाजी
जोरदार वेगवान गोलंदाजी
जादुई फिरकी गोलंदाजी
आणि
आकर्षक असे क्षेत्र रक्षण

ह्या सर्वांचे भरपूर नजराणे पेश होतील...

चांगल्या खेळपट्ट्या नक्की तयार केलेल्या असणार अशी खात्री बाळगावी अशी वक्तव्ये बी सी सी आय कडून येत आहेत.
तर चला ,

तयार होऊ आणि पुढील महिनाभर कसोटी क्रिकेट चा आस्वाद घेऊ.....

....Dhanvi
....Yogesh RK
Creations....

05/02/2023







nagar

02/02/2023

#बापटमळामस्तच .....
नाना
वाढदिवस
शुभेच्छा
Yogesh RK

01/02/2023

Book Your Stall Now !!!!!
Become a part of Credai Sangli’s Dream Home Property & Material Exhibition 2023 at Sangli.

27/01/2023

Dhanvi (शोनू)

starting new venture
..dance class...

And

Giving us the chance for new ..creation....

Choreography
Dilogs
Acting
Anchoring
Camera

All by herself.....

24/01/2023

गणेश मूर्ती प्रतिष्ठापना......

24/01/2023

क्रीडाई सांगली चे अध्यक्ष श्री रवींद्र खिलारे - पवार

यांची

जॉइंट सेक्रेटरी, क्रिडाई महाराष्ट्र पदी (कार्यकारिणी 2023-25)

निवड झाली.

दीपक सुर्यवंशी (उपाध्यक्ष,क्रीडाई महाराष्ट्र ) ,
क्रीडाई सांगली कार्यकारिणी सभासद आणि क्रीडाई सांगली सभासद यांच्या उपस्थिती मध्ये श्री रवींद्र खिलारे - पवार यांचा सत्कार करण्यात आला.

....Dhanvi
....Yogesh RK
Creations....

प्रख्यात वक्ते,प्रचंड अभ्यासू ' बहुआयामी ' व्यक्तिमत्त्वलेखक,गीतकार,माझे मित्र श्री विक्रम एडके यांची पुणे मध्ये लोणी ये...
22/01/2023

प्रख्यात वक्ते,
प्रचंड अभ्यासू
' बहुआयामी ' व्यक्तिमत्त्व
लेखक,गीतकार,
माझे मित्र
श्री विक्रम एडके यांची पुणे मध्ये लोणी येथे भेट घेतली...
बऱ्याच विषयांवर मनमोकळ्या गप्पा एवढाच कार्यक्रम....
आणि
वारंवार पुनर्भेट घडणार असे आश्वासन...

#एक आनंददायी घटना........

14/01/2023

#ब्राम्हण क्रिकेट लीग
#सांगली
of full video

13/01/2023

cricket league




n enjoy

12/01/2023

#कसोटी क्रिकेट सर्वोत्कृष्ट क्रिकेट
#किमान एक दिवसीय क्रिकेट तरी आहे....

काल गोवाहाटी येथे भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय क्रिकेट मालिके मधला पहिला सामना झाला.त्या मध्ये भारताने प्रथम फलंदाजी केली आणि नंतर श्रीलंकेला रोखून धरले व साठ सत्तर धावांनी सामना जिंकला.

विराट कोहली,गील,रोहित आणि राहुल तसेच शनका ,डिसिल्वा यांनी चांगली फलंदाजी केली तर भारताचे सर्वच गोलदांज विशेषतः उमरान मलिक चांगली गोलंदाजी करताना दिसून आले.

विशेष असे काही घडले नसल्याने खेळ कसा झाला,कुठले विक्रम झाले वगैरे विश्लेषण करत बसायला नको....एक ठिक ठाक सामना झाला इतकेच.

खरा मुद्दा वेगळाच आहे...भारतीय संघाची निवड....निवड समिती ला हवीहवीशी वाटणारी डोकेदुखी...काहीही अभ्यास नसणारी जनता..अक्कल शून्य नव...सोशल मीडिया ..पत्रकार...

तर विषय असा आहे की ईशांत किशन आणि सूर्यकुमार यादव यांना संघात घेतले नाही...

मागील एकदिवसीय सामन्या मध्ये ईशान ने द्विशतक झळकावले होते तर तो संघाच्या बाहेर कसा ?

आणि

दोन दिवसा पूर्वीच्या टी 20 सामन्यात सूर्या ने अफलातून धुवाधार फलंदाजी ,करीत शतक झळकावले होते मग त्याला बाहेर का बसवता?

तसे बघायला गेले तर म्हणणे रास्त च आहे..मात्र असे केले गेले त्या मागचे कारण ही रास्त च आहे.

ईशान ला बाहेर करून संघा मध्ये कोणाला खेळवले?
रोहित शर्मा...कप्तान रोहित शर्मा...कोणाला काही शंका आहे?

एकतर जबरदस्त खेळाडू आहे आणि येत्या विश्व करंडक स्पर्धे साठी कप्तान म्हणून अतिशय योग्य आहे त्यामुळे त्याने खेळणे स्वाभाविक च आहे...

त्याविषयी कोणीही काहीही तक्रार करणे म्हणजे क्रिकेट मधले काही कळत नाही असेच म्हणावे लागेल.

मग गिल ला का खेळवले? त्या च्या ऐवजी खेळवयाचे ईशान ला....तर गेल्या काही एकदिवसीय सामन्यात गिल कायम स्वरुपी खेळत आला आहे आणि खूप चांगली कामगिरी त्याने केली आहे.

.ईशान टी 20 मध्ये आणि गिल एकदिवसीय सामन्यात सलामीला येतात...दोघांची कामगिरी चांगली आहे

आणि

रोहित शर्मा कप्तान असल्या मुळे त्याचे खेळणे नक्की आहे...एका सामन्यात गिल आणि एका सामन्यात ईशान असे च चित्र इथून पुढे बघायला मिळेल असे वाटते.

तीच गोष्ट सूर्या आणि श्रेयस अय्यर बाबतीत आहे.

एकदिवसीय क्रिकेट मध्ये चार नंबर वरती खेळून व अतिशय चांगली कामगिरी करून श्रेयस भारतीय संघाच्या फलंदाजी चा कणा बनलेला आहे.

चौदा पंधरा सामन्यात अकरा बारा अर्धशतके अशी त्याची कामगिरी आहे.

सूर्या टी 20 मध्ये कितीही चांगली कामगिरी करीत असला तरी एकदिवसीय सामन्यात अजून म्हणावा तेवढा यशस्वी झालेला नाही.

आणि

श्रेयस ला टी 20 मध्ये हल्ली घेतच नाहीत..

कसे असते संघ निवड करीत असताना त्या त्या *प्रकारच्या (format) सामन्या तील कामगिरी...

*Performance*

बघूनच निवड केली जाते.

*फॉर्म*

हा देखील महत्वाचा विषय आहे मात्र दोन वेग वेगळ्या प्रकारच्या संघासाठी वेगळे निकष लावणे गरजेचे च आहे.

नाहीतर मग गिल आणि श्रेयस एकदिवसीय सामन्यात चांगले खेळणार आणि टी 20 सामन्यात चांगली कामगिरी केली म्हणून ईशान आणि सूर्या ला पुढील एकदिवसीय सामन्यात त्यांच्या जागी खेळवणार

असे करायचे नसते...

प्रत्येकाची मेहनत आहे..कष्ट असतात...त्यांच्या प्रयत्नावर कुठल्या ही विचित्र निर्णय पद्धतीने पाणी फेरायचे नसते...

त्यात तीन नंबर वरती विराट कोहली खेळणार....

आहे कोणाची बिशाद त्याच्या ऐवजी ईशान किंवा सूर्या ला खेळवा म्हणण्याची?

दोन नंबर रोहित शर्मा...
तीन नंबर विराट कोहली....

विश्व करंडक स्पर्धे पर्यंत line-up fix आहे


एक नंबर ...गिल / ईशान

चार नंबर.... श्रेयस

पाच नंबर वरती k l राहुल...

आत्ता फॉर्म जरी कमी जास्त असला

तरी तो यष्टिरक्षक आहे..त्यामुळे अष्टपैलू म्हणून संघात आहे

त्यामुळे सूर्या चे स्थान अणीच अवघड आहे..

हा जर राहुल चा फॉर्म खालावला ( काल 46 धावा केल्या आहेत) तर त्याच्या ऐवजी ईशान ला खेळविण्याचा विचार केला जाऊ शकतो.

त्यावेळी मग गिल ऐवजी ईशान ..जो यष्टिरक्षक कामगिरी करू शकतो

आणि

राहुल ऐवजी सूर्या

असा संघ निवडला जाऊ शकतो.

हार्दिक पांड्या

हा धडाकेबाज फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज असा अष्टपैलू पर्याय कायम स्वरुपी संघात असायला हरकत नाही.

आणि

त्यानंतर axar पटेल हा फिरकी गोलंदाजी आणि सातव्या क्रमांकावर बऱ्यापैकी फलंदाजी करणारा दुसरा अष्टपैलू पर्याय ...

अर्थात रवींद्र जडेजा फिट झाल्यास तोच प्रथम पसंती असेल.

ऋतुराज गायकवाड
Rajat पाटीदार

ह्या दोघांना सद्ध्या तरी बाहेरच राहावे लागणार असे वाटते.

गोलंदाजी विषयी आत्ताच काही लिहू शकत नाही...

बुमराह कधी फिट होणार काय माहित?

सिराज हा अजून हि कसोटी मधला च गोलंदाज आहे.

उमरान आत्ता आत्ता सुरुवात करतो आहे..पण चांगली प्रगती करीत आहे..

वेगवान गोलंदाजी आकर्षक असते...

अर्शदिप एकदिवसीय सामन्यात कशी कामगिरी करतो ते बघावे लागेल..

आणि

शामी....असेलच बहुदा

स्पिनर्स मध्ये

युझवेंद्र चहल सध्या फॉर्म मध्ये नाही असे दिसते आहे..

कुलदीप यादव किती खेळवतात ते बघावे लागेल.

आश्विन खेळण्याचे किती chances वाटतात?

राहुल चाहर ची सध्या काय कामगिरी आहे?

थोडा अभ्यास करावा लागेल.

असो..

तर

एखाद्या सामन्यात एखाद्याला बाहेर बसवले म्हणजे जगबुडी होत नसते...

पुढच्या सामन्यात खेळतील..

ह्यालाच

क्रिकेट खेळ म्हणायचे....आणि

क्रिकेट हा अनिश्चितते चा खेळ आहे

.... Dhanvi
....Yogesh RK
Creations....
11/1/23

12/01/2023

cricket league
#2023
6

12/01/2023

Hello friends....

Starting a new venture with creation of this page...will be expressing my views and activities regarding movies,cricket,music,and food....and somany things

In form of

Comment
Videos
Write ups
And

All,

Hope you all to appreciate and encourage..

With

Likes, shares and comments

....Dhanvi
....Yogesh RK
Creations....

Address

1A, Sneh Darpan, Old Kipwad Road
Sangli

Telephone

+919422406847

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhanvi Yogesh RK creations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share