VIDEO: खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे? संगमनेर तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था, नागरीकांचे हाल
संगमनेर तालुक्यातील पठार भागात रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पानोंडी घाट ते मांडवा फाट्यापर्यंत रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. साकुर चौफुली ते बिरवाडी फाट्यापर्यंत रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हेच समजत नाही अशी स्थिती झाल्याचा नागरिकांनी आरोप केलाय. दरेवाडी ते वरंवडी फाटाही अशीच भयानत परिस्थिती असून शेतकरी, नोकरदारांचा प्रवास खडतर झाला आहे.
आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांवर नागरिकांचा संताप, रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवरही गंभीर प्रश्नचिन्ह, रस्त्याचे काम झाले की दोन ते तीन महिन्यात रस्ता खराब होत असल्याच्या तक्रारी
#संगमनेर #रस्ते #Sangamner #Raod #Potholes #Ahmednagar
VIDEO: संगमनेरमधील कोटमारा धरण तुडुंब भरले
संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी व आंबीदुमाला या दोन गावांच्या सीमेवर असलेले कोटमारा हे धरण तुडुंब भरून वाहू लागले आहे. त्यामुळे आता शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अकोले तालुक्यातील बदगी बेलापूर येथील धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर ते सर्व पाणी कोटमारा धरणात आले. त्यानंतर कोटमारा धरण तुडुंब भरून वाहू लागले. धरण भरल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
#संगमनेर #पाऊस #पाणी #Sangamner #SangamnerNews #Rain #Water
VIDEO: संगमनेरचा म्हसवंडी धबधबा झाला वाहाता; पर्यटकांसाठी पर्वणी
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील म्हसवंडी धबधबा कोसळु लागला आहे. परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने त्यामुळे परिसरातील ओढे, नाले व छोटे मोठे पाझर तलाव तुडूंब भरुन वाहू लागले आहे. म्हसवंडी हे गाव चारीही बाजूंनी डोंगरदर्यात वसलेले आहे. त्यातच गेल्या दोन ते दिवसांपासून परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ओढे,नाले, छोटे मोठे बंधारे हे तुडूंब भरून वाहत आहे त्यामुळे शेतकर्यांन मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे आता शेतकर्यांच्या विहीरींचीही पाणी पातळी वाढणार आहे.
व्हिडिओ सौजन्य - RNO
#संगमनेर #अहमदनगर #धबधबा #Sangamner #Ahmednagar
VIDEO: संगमनेरमध्ये चंदनापुरी घाटात एका मालवाहू टेंम्पोला भीषण आग
संगमनेरमध्ये १० वी १२ वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी घाटातील घटना, टेंम्पोतील प्रश्नपत्रिका जळून खाक, वाहनाचंही मोठं नुकसान, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट, डोळासणे महामार्ग पोलीस व घारगाव पोलिसांची घटनास्थळी धाव, संगमनेर नगरपालिका व कारखान्याचे अग्नीशमन बंबही घटनास्थळी दाखल
#SangamnerNews #AhmednagarNews
VIDEO: संगमनेरमधील देवगाव परिसरात डीपीला भीषण आग, वीज संयंत्र जळून खाक
संगमनेरमधील देवगाव परिसरात डीपीला भीषण आग, वीज संयंत्र जळून खाक, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
#Fire #MSEB #Deogaon #Sangamner #SangamnerNews #Ahmednagar
संगमनेर तालुक्यातील कोकणगाव सबस्टेशन येथे परिसरातील गावकऱ्यांचं ठिय्या जोरदार आंदोलन सुरू
संगमनेर तालुक्यातील कोकणगाव सबस्टेशन येथे परिसरातील गावकऱ्यांचं ठिय्या जोरदार आंदोलन सुरू, आजूबाजूच्या गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी रहावं असं आंदोलक शेतकऱ्यांचं आवाहन
#Sangamner #SangamnerNews #Electricity
संगमनेरांच्या जीवाशी खेळ, प्रशासन झोपेत, प्रवरा नदीत कोणतीही प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडण्यात येत असल्यानं पाणी प्रदुषित, याला जबाबदार कोण?
#Sangamner #PravaraRiver #Ahmednagar #Water #Pollution
संगमनेरमध्ये जातीयवादी शिवीगाळ करत सरपंचाला चपलांचा हार घातला, नेमकं काय झालं? व्हिडीओ पाहा...
#Sangamner #Ahmednagar #Caste
VIDEO: आमच्या गाडीला कट का मारला? वाद करत संगमनेरच्या लेखापालाकडील चाकणमध्ये 12 लाख लुटलं
VIDEO: आमच्या गाडीला कट का मारला? वाद करत चाकणमध्ये संगमनेरच्या लेखापालाकडील 12 लाख लुटले
संगमनेरमधील के. के. थोरात कंपनीचे लेखापाल बोऱ्हाडे आणि कार चालक सुरेश गायकवाड यांना चाकणमध्ये लुटले, आमच्या गाडीला कट का मारला असं विचारत तिघांनी गाडी अडवली, वादात गुंतवून कारमधील 12 लाख रुपयांची रोख रक्कम चोरली
रविवारी (8 ऑगस्ट) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तळेगाव चौक, चाकण येथील घटना, दोघेही कंपनीच्या कामगारांच्या पगारासाठी पैसे घेऊन जात होते, या प्रकरणातील चार जणांना चाकण पोलिसांकडून अटक
समीर सोनवणे,अक्षय सोनवणे, प्रदीप नवाळे,सुरेश गायकवाड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे
#SangamnerNews #Sangamner #SangamnerUpdates
VIDEO: संगमनेरमध्ये शेतकऱ्यावर पाळत ठेवत गाडीच्या डिकीतून 2 लाख 60 हजार रुपयांची चोरी
संगमनेर येथील बँक ऑफ इंडियासमोरून एका शेतकऱ्यावर पाळत ठेवून त्याच्या गाडीच्या डिकीतून चोरट्यानी 2 लाख 60 हजार रुपयांची रक्कम पळवून नेली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
पीडित शेतकऱ्याने कोणालाही पैसे चोरणाऱ्या व्यक्तीची ओळख पटल्यास संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचं आवाहन केलंय. या घटनेनंतर आता सर्व नागरिकांनी रोख रक्कम बाळगताना काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय.
#SangamnerNews #SangamnerUpdates #Sangamner