11/08/2024
उद्या 12 ऑगस्ट 2024 रोजी एकलव्य आघाडीच्या वतीने निफाड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर यांच्या संपर्क कार्यालयावर भव्य मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. या मोर्चातील विषयी
1) भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झाली तरी वनी पाचोरा या आदिवासी वस्तीमध्ये लाईट ची सुविधा नाही.
2) त्या आदिवासी वस्तीमध्ये घरा खालच्या जागा सुद्धा नावावर नाहीत.
3) कोणतीही आरोग्य सुविधा त्यांना उपलब्ध नाही.
अशा विविध मागण्यासाठी एकलव्य आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अनिल राव जाधव साहेब, प्रदेश कार्याध्यक्ष संजय जी बर्डे साहेब, जिल्हाध्यक्ष साईनाथ बर्डे, शहराध्यक्ष नारायण बर्डे, एकलव्य आघाडीचे नेते रमेश जी माळी साहेब तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने या मोर्चाला उपस्थित राहावे अशी आव्हान एकलव्य आघाडी महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आले आहे. 🚩