30/05/2022
दलित पॅंथर 1956-1972 यातील जो काय आंतर आहे तो अवघ्या 16 वर्षाचा.! मग या 16 वर्षात नेमकं काय घडलं.? कोणत्या घटना उदयास आल्या यावर चिंतन केल्यास, दलित समाजातील काही तरुणांना पॅंथर सारख्या संघटनेच्या स्थापनेची गरज का वाटली.? असावी हे लक्षात येत.! त्यामुळे ही सुरुवात येथूनच करावी लागेल असं मला वाटतं.! की मी काही मोठा लेखक नाही किंवा विचारवंतही नाही.! जे वाचण्यात आल ते मांडण्याचा केवळ एक छोटासा प्रयत्न करत आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले आणि बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर जवळपास काही महिन्यांनीच बाबासाहेबांनी स्थापन केलेला 'शेड्युल कास्ट फेडरेशनला' दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी बरखास्त करण्यात आल, आणि रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली.! परंतु रिपब्लिकन पक्षाला जवळपास एकाच वर्षातच फुटीचा वारं लागलं आणि 3 ऑक्टोबर 1958 ला या पक्षाचे दोन गट निर्माण झाले.! मग काय पुढे दोनाचे चार ,चाराचे पाच , होत होत हा पक्ष विविध गटात मोडत गेला,; काही काँग्रेसवासी झाले तर काही कम्युनिस्टांच्या जवळ होत गेले आणि पर्यायाने रिपब्लिकन पक्ष हा पोकळ होत गेला.! या सर्व घटनांनी दलित समाज, तरुण मुले, तळागाळातील सामाजिक कार्यकर्ते निराश होत गेले त्यावेळी दलितांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत होत्या त्यामुळे बाबासाहेबांच्या अनुपस्थित पोरका झाल्याची भावना दलित समाजात दिसून येत होती.,! 'दलित स्त्रियांची नग्न धिंड काढणे, पाणवठे बाठवले म्हणून बेदम मारहाण करणे, पाटलांच्या समोर चांगले कपडे घालून आला म्हणून चाबुकाने मारणे, बलात्कार करून गुप्त आंगांना चटके देणे, दलित पाणवठ्यावर घाण टाकण असे नाना प्रकार "एलिया पेरूमल" समितीच्या अहवालातून 1970 दशकात समोर येत गेले. एकीकडे असं काही होत असताना त्यावेळी महाराष्ट्रात अत्याचाराच्या एकामागे एक घटना समोर येऊ लागल्या या सगळ्या घटना मुळे दलित समाजातील तरुण अस्वस्थ होत होता आणि या सगळ्यांची परिनीती झाली.! संतप्त दलित तरुणांच्या जळजळीत प्रतिक्रियेत आणि ती प्रतिक्रिया होती पॅंथर ... हो पँथर "दलित पँथर" .! 29 मे 1972 रोजी दलित पँथरचा जन्म झाला त्या काळात दलित पॅंथर हा एक झंझावात होता.! या प्रभावशाली झंझावताने जो काही पालापाचोळा मनुवादी विचारांचा होता सर्व उडवून लावला ,वाढत्या अन्याय अत्याचाराचा बिमोड करण्यासाठी जन्मलेल्या ज्वालामुखी संघटनेने आंबेडकरी समाजात नवचैतन्य निर्माण केली , संघटनेचे रूपांतर खळखळत्या आणि झळझळत्या चळवळीत झाले.! बेभान झालेल्या दलित तरुण रस्त्यावर लढत होता, प्रत्येक तरुण एक चळवळ होत होता, व्यवस्थेशी टक्कर घेत होता, पीडितांना दिलासा देत होता, लढत होता, फक्त आणि फक्त लढत होता.! काळ छोटासा होता परंतु त्यांनी शासनाला जाग आणली, राजकीय पक्षांना भानावर आणलं, ऊपेक्षिता वरील अन्यायावर वाचा फोडली होती...! दलित पँथर चा लढा केवळ संपत्तीसाठी नवता तो होता घटनात्मक अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी, तो होता समतेची स्थापना करण्यासाठी, तो होता स्वातंत्र्याचे मोल जपण्यासाठी, समाजात बंधू भावना निर्माण करण्यासाठी, तो होता माणसाला माणूसपण बहाल करण्यासाठी, श्रमाला ,घामाला किंमत मिळवून देण्यासाठी...! आज दलित पॅंथर सारखी जहाल संघटना असती तर...? माझ्या मते आज सुद्धा दलित पॅंथर ज्वलंत व जिवंत आहे.,! ती म्हणजे दीपक भाऊ केदार यांच्या विचारातील, त्यांच्या संघर्षातली, अन्यायाविरुद्ध लढा देऊ पाहणाऱ्या क्रांतीतली, पँथर.... ऑल इंडिया पँथर सेना ..! जयभीम बलभीम. महेंद्र कुमार देवरे. मिशन आंबेडकर न्यूज 9075693744