Vishwakarma Publications

Vishwakarma Publications Vishwakarma Publications, proud to be one of the most efficient and fast paced publishers in India, i

About Vishwakarma Publications

Vishwakarma Publications is one of Maharashtra’s largest book publishers. Established on 1st July 2012, it is owned by the Vishwakarma Group which is more than 30 years old in existence. Headquartered in Pune, the company commercial activity includes the publishing of a wide variety of books that covered every sphere of interest including fiction, non-fiction, poetr

y, plays, children’s literature, biographies, self-help, religion, philosophy, culture, academics and business management. Vishwakarma Publishing publishes in English, Marathi & Hindi and has a wide distribution network across India. Its close association with the educational establishments of the Vishwakarma Groups has given Publications the leverage and advantage create various types of content , related to schools engineering and management ( K12,Testprep and STM Publishing) as also other kinds of content.

विश्वकर्मा पब्लिकेशन्स पुणे जिजाऊ ग्रंथ महोत्सव धाराशीव येथे सहभागी झाले आहे !
10/01/2025

विश्वकर्मा पब्लिकेशन्स पुणे जिजाऊ ग्रंथ महोत्सव धाराशीव येथे सहभागी झाले आहे !

विश्वकर्मा पब्लिकेशन्स सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवा मध्ये सहभागी झाले आहे! आमच्या स्टॉल ला जरूर भेट द्या :स्टॉल नंबर ४१/...
10/01/2025

विश्वकर्मा पब्लिकेशन्स सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवा मध्ये सहभागी झाले आहे!
आमच्या स्टॉल ला जरूर भेट द्या :
स्टॉल नंबर ४१/४२

राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या, देशभरातील प्रतिभावंत मुलांच्या प्रेरणादायी गोष्टी सांगणारे 'तेजस्वी मूल घडताना ...
06/01/2025

राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या, देशभरातील प्रतिभावंत मुलांच्या प्रेरणादायी गोष्टी सांगणारे 'तेजस्वी मूल घडताना प्रेरणादायी अनुभवकथन' हे पुस्तक, पालक आणि मुलांसाठी अत्यंत स्फूर्तिदायक आहे. चिकाटी, संयम, निर्णयक्षमता, संवेदनशीलता, उमदेपणा, प्रेम, नम्रता असे कित्येक गुण या मुलांमध्ये त्यांच्या पालकांनी रुजवले आहेत. या पालकांनी मुलांना वाढवताना साधी तत्त्वे आचरणात आणली आहेत, पारंपरिक मूल्ये जपली आहेत. त्यांच्या पालकत्वाचा मंत्र काय आहे, हेही त्यांनी या पुस्तकात उलगडून सांगितलं आहे.

५ ते १८ वयोगटातल्या या मुलांना कशा प्रकारे यश मिळालं, हे वाचताना लक्षात येतं की, त्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी एकत्रितपणे त्यासाठी काम केलं आहे, मेहनत घेतली आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, हे तत्त्व त्यांनी जोपासलं आहे.

पालकत्वाच्या यशस्वी मंत्राच्या शोधात असलेले पालक, आपल्या मुलाच्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने बघणारे पालक, तरुण मुलं अशा सगळ्यांसाठी हे पुस्तक आहे. भारतीय संस्कृतीतील मूल्ये आणि भारतीय कुटुंबपद्धती हा आपल्या देशाचा वारसा आहे. 'तेजस्वी मूल घडताना प्रेरणादायी अनुभवकथन' हे पुस्तक म्हणजे हा वारसा दाखवणारा आरसाच आहे.

तुम्हाला तुमच्या मुलांसाठी कोणती गोष्ट वारसा म्हणून मागे ठेवायची आहे?

तणावमुक्त औवनाची २५ सूत्रे (25 Essentials to Happy Living) आणि 'शोथ अंतरीचा.... मार्ग समृद्धीचा' (Enrich Life), या आमच्य...
06/01/2025

तणावमुक्त औवनाची २५ सूत्रे (25 Essentials to Happy Living) आणि 'शोथ अंतरीचा.... मार्ग समृद्धीचा' (Enrich Life), या आमच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या दोन यशस्वी पुस्तकांच्या पुरस्कार विजेत्या लेखिका, प्रीती पाठक आता त्यांच्या वाचकांसाठी 'इग्नाइट युवर इनर पॉवर : जागरूकतेने जगण्याची कला' हे भावनांच्या जागरूकतेवरील पुस्तक आणत आहेत. 'भावनिक कल्याण' या त्रयीतील हे त्यांचे शेवटचे पुस्तक आहे.

या पुस्तकाचे वेगळेपण म्हणजे, प्रीतीचे 4A सजगता प्रारूप हे चार स्तंभांवर आधारित आहे; जागरूक राहा, स्वीकारा, कृती करा आणि सुधारणा करा. आपण बहुतेक वेळा आपल्या भावना, संवेदना आणि दृष्टिकोनांकडे दुर्लक्ष करतो. भावनांबद्दल सजग राहणे आपल्याला आपण अनुभवत असलेल्या भावना आणि संवेदना किंवा आपण विकसित केलेल्या दृष्टिकोनांबद्दल जागरूक होण्यास मदत करते. जागरुकता आपले मन स्वीकारशील बनवते. आपल्याला काय, का आणि कसे वाटते, याचा स्वीकार करण्याऐवजी ते नाकारण्याकडे आपला कल असतो. त्यामुळे आपली नव्वद टक्के लढाई स्वतःशीच असते. आपल्या भावनांचा स्वीकार करून, आपण सकारात्मक त्वरित कृतीसह आपल्या समस्यांवर मात करण्यासाठी आणि आपले आयुष्य सुधारण्यासाठी स्वतला सक्षम बनवतो.

प्रीती त्यांच्या सोप्या आणि सुस्पष्ट शैलीत आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावनिक आरोग्यावरील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतात. जीवनाच्या विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींनी सांगितलेल्या प्रेरणादायी केस स्टडीजने या पुस्तकाचे वाचन मनोरंजक झाले आहे.

इग्नाइट युवर इनर पॉवर : जागरूकतेने जगण्याची कला' हा चार प्रभावी पाय-यांमध्ये जागरूकतेचा सराव करून सशक्त जीवन जगण्यासाठी अत्यंत उपयुक्त ग्रंथ आहे.
- शिवी वर्मा, संपादक, लाईफ पॉझिटिव्ह

इग्नाइट युवर इनर पॉवर : जागरूकतेने जगण्याची कला' ही एक उत्कृष्ट कलाकृती आहे. प्रीती तिच्या अनोख्या शैलीत आनंदी आणि अर्थपूर्ण जीवनाचे साधे सार प्रकाशात आणते.

- दिलीप आर्य, अभिनेता

काश्मीरनरेशललितादित्य मुक्तापीडचा जीवनप्रवासआठव्या शतकात संपूर्ण आशिया खंडावर लोकोपयोगी निर्माणकार्ये करणारा, ललितादित्य...
04/01/2025

काश्मीरनरेश
ललितादित्य मुक्तापीडचा जीवनप्रवास
आठव्या शतकात संपूर्ण आशिया खंडावर लोकोपयोगी निर्माणकार्ये करणारा, ललितादित्याएवढा प्रभाव टाकणारा सम्राट झाला नाही, हे एक वास्तव आहे. ललितादित्याचे समग्र जीवन मुळातच एवढे झंझावाती आणि साहसी आहे की, लेखिकेला ते कादंबरीरूपात मांडावेसे वाटले. या कादंबरीच्या रूपाने ललितादित्याची तेजाने झळाळणारी जीवनगाथा आपल्यासमोर आली आहे.
दोन स्तरांवर कादंबरी पुढे नेण्याचे आणि तिला अजून थरारक बनवण्याचे कौशल्य डॉ. लिली जोशी यांनी दाखवलेले आहे. त्यामुळे कादंबरीची वाचनीयताही वाढलेली आहे. ललितादित्याच्या जीवनाची नाळ वर्तमानाशी भिडवण्याचे लेखिकेचे कौशल्य उत्कृष्ट कादंबरीकाराचे गुण त्यांच्यात आहेत, याचे निदर्शक आहे.
या कादंबरीच्या माध्यमातून भारतीय इतिहासात एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या, पण इतिहासात दुर्लक्षित राहिलेल्या ललितादित्य या महान सम्राटाकडे लक्ष वेधून घेण्याचे महत्त्वाचे ऐतिहासिक आणि अभिनंदनास्पद कार्य डॉ. लिली जोशी यांच्याकडून पार पडले आहे. बहुतेक सर्वच मराठी कादंबरीकार मराठी इतिहासातील महानायकांच्या प्रभावक्षेत्रात वावरत असताना त्यांनी थेट काश्मीरच्या इतिहासाकडे झेप घेतली आणि एक दुर्लक्षित, पण गौरवास्पद इतिहासाला वाचा फोडली, हे त्यांचे साहित्यकार्य राष्ट्रीय पातळीवर दखलपात्र आहे.
संजय सोनवणी
(प्रसिद्ध इतिहास संशोधक व लेखक)

खांडवप्रस्थ - एक उजाड माळरान, वास्तव्यासाठी प्रतिकूल... समोर आलेल्या निर्वासितांची समस्या आणि आर्थिक अस्थिरतेशी दोन हात ...
04/01/2025

खांडवप्रस्थ - एक उजाड माळरान, वास्तव्यासाठी प्रतिकूल... समोर आलेल्या निर्वासितांची समस्या आणि आर्थिक अस्थिरतेशी दोन हात करताना पांडवांची राज्य विस्ताराची वाटचाल, की तिचे एक आई म्हणून तिच्या मुलांसोबतचे नाते असो, या सर्व गोष्टींचा अनुभव या कथेत घ्या.
या प्रवासात देविका, वलंधरा, सुभद्रा, कारेणुमती आणि विजया या घरातील कुशल, हुशार आणि मेहनती स्त्रियांनी द्रौपदीच्या आधिपत्याखाली एकत्र येऊन एका महान साम्राज्य स्थापनेसाठी आपापल्या परीने कसे योगदान दिले, हे पाहा.
नारीशक्तीच्या या अफाट कर्तृत्वाच्या कथांचा आनंद घ्या...

द्रौपदीची आई, महाराणी प्रीश्ती, मानवी हक्कांची पुरस्कर्ती आणि एक चतुर राजकारणी म्हणून ओळखली जात असे. आपल्या मुलीच्या व्य...
04/01/2025

द्रौपदीची आई, महाराणी प्रीश्ती, मानवी हक्कांची पुरस्कर्ती आणि एक चतुर राजकारणी म्हणून ओळखली जात असे. आपल्या मुलीच्या व्यक्तिमत्त्व विकासात आणि तिला खंबीर बनवण्यात महाराणींचा मोठा वाटा होता. अशा स्वतंत्र विचारांच्या राजकन्येने, माँ कुंतींनी चुकून सांगितलेली गोष्ट आंधळेपणाने कशी ऐकली असती? सर्व पांडव तिच्याशी लगेचच विवाहबद्ध होण्यास तयार झाले का? बुद्धिमान सहदेव आणि दूरदृष्टी असलेली द्रौपदी यांनी एकत्रितपणे विभाजनासाठी युक्तिवाद केला, त्याचा परिणाम म्हणून दुर्योधन हस्तिनापुराच्या सिंहासनावर कायदेशीररीत्या बसू शकला का? खुल्या आणि मुक्त विवाहाची गुंतागुंत (बहुपतित्व), सत्तेचा आणि राजकारणाचा अनाठायी प्रयत्न, असामान्य आणि विलक्षण मैत्री, सर्वसमावेशकता आणि लिंग-समानतेला सक्रियपणे प्रोत्साहन देणाऱ्या भावंडांचे एकमेकांशी असलेले बंध, अशा अनेक गोष्टी उलगडून दाखवणारी प्राचीन महाकाव्याची ही कालातीत कथा आहे. पाच भागांत उलगडत जाणाऱ्या, एका साम्राज्ञीचा जीवनपट कथेच्या रूपात सादर केलेला आहे.



गुरुवर्य डॉ. अरुण दातार म्हणजे शरीरसौष्ठवजन उचलणे, पॉवर लिफ्टिंग, सूर्यनमस्कार या क्षेत्रांतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आण...
03/01/2025

गुरुवर्य डॉ. अरुण दातार म्हणजे शरीरसौष्ठवजन उचलणे, पॉवर लिफ्टिंग, सूर्यनमस्कार या क्षेत्रांतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि वने आर्ट या क्रीडाप्रकाराचे जनका आई-वडिलांचे उत्तम संस्कार, गुरुवयांचे उत्कृष्ट मार्गदर्शन आणि मित्रमंडळींचे उत्कट प्रेम या त्रिवेणी संगमातून त्यांनी विद्यार्थिदशेतच अनेक बक्षिसांसह क्रीडापटू म्हणून अभिनंदनीय कामगिरी केली.
विवाहानंतर झालेल्या भीषण अपघातात होत्याचं नव्हतं झालं सुड शरीर कायमचं जायबंदी झालं, परंतु भेटलेली देवमाणसं, कमालीची सहनशीलता आणि सुविद्य पत्नीनं शुश्रूषेसह दिलेलं मानसिक पाठबळ यांमुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली.
पुढे पत्नीच्या आग्रहामुळे व्यायामशाळा हेच जीवितकार्य मानून शेकडो कीडापटू घडवले. त्यांच्या विद्यार्थ्यांनी पुणे श्री ते विश्व श्री असं यश संपादन करत सूर्ण जिमची कीर्ती सर्वदूर पोहोचवली. यथावकाश सरांनाही अनेक पुरस्कारांसह क्रीडामहर्षी पदवी प्राप्त झाली. अर्थात, हा प्रवास सोपा नव्हताच. नित्य नवा संघर्ष असला, तरी असंख्यांच्या जीवनात हर्ष पेरून, आपलं बोनस आयुष्य राष्ट्रकार्यासाठी समर्पित करणारे डॉ. अरुण दातार आणि संतसाहित्य समरसून जगणाऱ्या गुरुवर्या डॉ. आरती दातार या दाम्पत्याने वळणावळणांवर भेटलेल्या मदतीच्या हातांचा ओघवत्या शैलीत परामर्श घेतला आहे.
व्यायामातून आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, विवेक, शिस्त, सहकार्य, संयम, सातत्य, साधना, साहस, सेवा अशा नानाविध वैश्विक मूल्यांचं संस्करण असलेले हे हा शब्दधन प्रत्येकासाठी प्रेरक आहे. शक्ती आणि भक्तीचं प्रतीक आहे. दातृत्व आणि दूरदृष्टीचं द्योतक आहे. कृतार्थता आणि कृतज्ञतेचा परिपाक आहे. म्हणूनच 'क्रीडापटू ते क्रीडामहर्षी ही यशोगाथा नक्कीच संग्राह्य आहे. डॉ. लता पाडेकर (संत साहित्याच्या अभ्यासक)

#



रामायण ही केवळ एक कथा नाही. ही एक जीवनशैली आहे. हा एक जीवनसंचिताचा खेळ आहे. आपल्या नियंत्रणाबाहेरील गोष्टीविषयी त्रागा क...
03/01/2025

रामायण ही केवळ एक कथा नाही. ही एक जीवनशैली आहे. हा एक जीवनसंचिताचा खेळ आहे. आपल्या नियंत्रणाबाहेरील गोष्टीविषयी त्रागा करणे, हे वेळ आणि शक्तीचा अपव्यय आहे. धैर्य, सातत्य आणि एकमेकांवरील अतुट विश्वासामुळे राम आणि लक्ष्मण यांनी वनवासाचा कठीण काळ यशस्वीपणे पूर्ण केला. रामायणातील पात्रांचे धैर्य आपल्या जीवनातील बिकट प्रसंगात आपली स्वतःची मूल्ये आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेला दर्शवितात आणि कशा प्रकारे आपण खालील गोष्टी करू शकतो, हे सांगतात : * गोंधळातून बाहेर पडणे, आपल्या मार्गावर अढळपणे राहण्यास रामांना त्यांच्या दृढ नीतिमत्तेने साह्य केले. * तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे. दुष्ट शक्तींवर विजय प्राप्त करण्यासाठी लक्ष्मणाला त्याच्या एकनिष्ठतेने साह्य केले. संकट काळातही स्थिर राहणे. अत्यंत बिकट परिस्थितीतही सहन करण्यासाठी सीतेला तिच्या लवचीकपणाने साह्य केले. आपल्या ध्येयांना पूर्णपणे प्राप्त करण्यासाठी तुमच्याकडे धैर्य आहे का? रामायण-खेळ जीवनसंचिताचा या मालिकेतील धैर्याचे फळ हे तिसरे पुस्तक आहे. हे पुस्तक वाल्मीकींच्या महाकाव्याच्या अरण्यकांडावर आधारित आधुनिक कथन आहे. यात धैर्याचे मधुर फळ प्राप्त कसे करावे, याचे वर्णन आहे. सत्ता आणि लोभ यांचे जीवनातील क्लिष्ट जाळे, या आधुनिक जगातील आपला संभ्रम आणि या सर्वांवर विजय प्राप्त करण्यासाठी लागणारे शहाणपण या पुस्तकातून ओसंडून वाहत आहे.



रामायण ही केवळ एक कथा नाही. ही एक जीवनशैली आहे. हा एक जीवनसंचिताचा खेळ आहे. जीवन हे सुनिश्चित आणि आरामदायी असावे, अशी आप...
03/01/2025

रामायण ही केवळ एक कथा नाही. ही एक जीवनशैली आहे. हा एक जीवनसंचिताचा खेळ आहे. जीवन हे सुनिश्चित आणि आरामदायी असावे, अशी आपणा सर्वांची अपेक्षा असते. तथापि, वास्तवात तणाव, कठीण प्रसंग आणि अनपेक्षित संकटे आपल्याला त्रस्त करून सोडतात. रामायणातील प्रत्येक प्रसंग आपल्या आधुनिक जीवनातील कोंडीला आणि त्यावरील उपायाला प्रस्तुत करतात: * आव्हानांचा सामना सकारात्मक दृष्टीने करा. राम आपल्या अनेक शौर्यकार्याप्रसंगी अचल राहिले. * प्रलोभनांचा सामना करणे. समंजस भरताने घेतलेले काळजीपूर्वक निर्णय आणि नंतर त्याला निर्णय घेण्यास मिळालेले साहा, प्रलोभने टाळण्यास दिशा देतात. आरामदायी क्षेत्रातून बाहेर पडणे. सीतेचा दृढ आत्मविश्वास हा आपल्या आरामदायी क्षेत्रातून बाहेर पडण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. जीवनात अचानक झालेल्या परिवर्तनाला आपण निराश न होता कसे सामोरे जातो? रामायण - खेळ जीवनसंचिताचा या मालिकेतील परिवर्तनाचे स्वागत हे दुसरे पुस्तक आहे. हे पुस्तक वाल्मीकींच्या महाकाव्यातील अयोध्याकांडावर आधारित आधुनिक कथन आहे. नशिबाचे पारडे फिरल्यावर काय करावे, याविषयी या पुस्तकात सांगितलेले आहे. मानवी संबंध आणि व्यवहाराचे गूढ़ नियम काय करावे, काय करू नये आणि या क्लिष्ट कोड्यातून कसा सुखरूप प्रवास करावा, याचे विस्तृत वर्णन लेखक शुभ विलास प्रस्तुत करीत आहेत.


release # marathi book

As 2024 comes to a close, we reflect on how swiftly the year has passed with HarperCollins India. Together, we have jour...
01/01/2025

As 2024 comes to a close, we reflect on how swiftly the year has passed with HarperCollins India. Together, we have journeyed through a vast universe of genres, each book offering an invitation to explore new worlds, full of intrigue and wonder.

Looking ahead to 2025, we are excited for another year of exceptional stories. Let's turn the page, dive into fresh narratives, and discover our next favorites together!

New Year

vishwakarmapublications

डॉ. अरुण दातार यांनी लिहिलेल्या आणि विश्वकर्मा पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या 'क्रीडापटू ते क्रीडापटू : यशोगाथा' या व्य...
29/12/2024

डॉ. अरुण दातार यांनी लिहिलेल्या आणि विश्वकर्मा पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या 'क्रीडापटू ते क्रीडापटू : यशोगाथा' या व्यक्तिचित्रणपर पुस्तकाचे आज दिमाखदार सोहळ्यात गुरुवर्य नानासाहेब फटाले यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले. या प्रसंगी लोकसभेच्या माजी सभापती मा. सुमित्रा महाजन, संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. आरती दातार, सूर्या जिमचे प्रथितयश विद्यार्थी कर्नल प्रसाद पुरोहित, प्रसिद्ध अभिनेते अजय पुरकर, विश्व श्री महेश हगवणे, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे सीईओ विशाल सोनी, संपादक संदीप तापकीर उपस्थित होते. या दोन तास चाललेल्या रंगतदार कार्यक्रमाचे डॉ. लता पाडेकर यांनी अत्यंत खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले.


#

21/12/2024

विष्‍वकर्मा पब्लिकेशन्स पुणे बुक फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले आहे!
आमच्या स्टॉलला जरूर भेट द्या:
हॉल C, स्टॉल B-28

तारीख:१४ ते २२ डिसेंबर
वेळ: सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत
स्थळ:फर्ग्युसन कॉलेज, पुणे

काय चुकवू नये:
- आमच्या पुस्तकांवर विशेष सवलती
- लेखकांशी संवाद साधण्याची संधी
- आकर्षक गिव्हअवे

प्रवेश मोफत आहे!
चला, वाचनाचा आनंद साजरा करूया!

Address

34A/1, Suyog Center, 7th Floor, Gultekadi Marketyard Road, Giridhar Bhavan Chowk
Pune
411037

Opening Hours

Monday 9:30am - 6pm
Tuesday 9:30am - 6pm
Wednesday 9:30am - 6pm
Thursday 9:30am - 6pm
Friday 9:30am - 6pm

Telephone

+919168682201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwakarma Publications posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category

Our Story

About Vishwakarma Publications Vishwakarma Publications is one of Maharashtra’s largest book publishers. Established on 1st July 2012, it is owned by the Vishwakarma Group which is more than 30 years old in existence. Headquartered in Pune, the company commercial activity includes the publishing of a wide variety of books that covered every sphere of interest including fiction, non-fiction, poetry, plays, children’s literature, biographies, self-help, religion, philosophy, culture, academics and business management. Vishwakarma Publishing publishes in English, Marathi & Hindi and has a wide distribution network across India. Its close association with the educational establishments of the Vishwakarma Groups has given Publications the leverage and advantage create various types of content , related to schools engineering and management ( K12,Testprep and STM Publishing) as also other kinds of content.