SahityaVishwa Prakashan, Pune

SahityaVishwa Prakashan, Pune Welcome to your new home on WordPress.com

मानवी हक्क म्हणजे काय? पुस्तक प्रकाशन समारंभ...आज सायंकाळी, ५ वाजता. नक्की या...स्थळ : जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घो...
10/12/2024

मानवी हक्क म्हणजे काय?
पुस्तक प्रकाशन समारंभ...
आज सायंकाळी, ५ वाजता.

नक्की या...

स्थळ : जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, समुख सोसायटी, शिवाजीनगर, पुणे. ०५

04/12/2024
उद्या सायंकाळी नक्की भेटूया...Good Evening😊
27/11/2024

उद्या सायंकाळी नक्की भेटूया...Good Evening😊

"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जलपैलू उलगडताना" या पुस्तकातून आपण जलसिंचन पैलू सर्वदूर पोहोचवण्यासाठी आंबेडकरांचा वैश्विक रा...
23/11/2024

"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जलपैलू उलगडताना" या पुस्तकातून आपण जलसिंचन पैलू सर्वदूर पोहोचवण्यासाठी आंबेडकरांचा वैश्विक राज्य समाजवाद व जलसमाजवाद खूप सोप्या भाषेत मांडून वाचकांसाठी चांगली कलाकृती लिहिली आहे. याबद्दल आपणाला खूप खूप धन्यवाद. तसेच हे स्वलिखित पुस्तक आपण मला सदिच्छा भेट दिल्याबद्दल डॉ. दत्तात्रय गायकवाड सर आपला मी ऋणी आहे.

Pune: Dr Rajendra Shende, Launches Rajendra Zunjarrao’s Ninth Poetry Collection Darpanhttps://dhunt.in/XzaC2By SahityaVi...
15/11/2024

Pune: Dr Rajendra Shende, Launches Rajendra Zunjarrao’s Ninth Poetry Collection Darpan

https://dhunt.in/XzaC2
By SahityaVishwa Prakashan, Pune

Pune: Dr Rajendra Shende, Launches Rajendra Zunjarrao’s Ninth Poetry Collection ...

https://www.freepressjournal.in/pune/pune-dr-rajendra-shende-launches-rajendra-zunjarraos-ninth-poetry-collection-darpan...
15/11/2024

https://www.freepressjournal.in/pune/pune-dr-rajendra-shende-launches-rajendra-zunjarraos-ninth-poetry-collection-darpan

To get epaper daily on your whatsapp click here:

https://whatsapp.freepressjournal.in

Speaking at the launch event of Rajendra Zunjarrao’s ninth poetry collection, Darpan, Dr. Shende stated, "Expression is crucial to relieve stress in our challenging life journey, and literature, especially poetry, is a powerful medium for this. Writers should offer positive thoughts to society thr...

दै.'सकाळ',15.11.24
15/11/2024

दै.'सकाळ',
15.11.24

The Free Press Journal is India's oldest renowned English newspaper since 1928 and Has above 1.5 Lac  circulation in Mah...
15/11/2024

The Free Press Journal is India's oldest renowned English newspaper since 1928 and Has above 1.5 Lac circulation in Maharashtra.
Thank You So Much Daily Free Press Journal.

सकारात्मक विचारांच्या साहित्याची गरजजागतिक पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांचे विचारडॉ. राजेंद्र झुंजारराव यांच्या ‘...
14/11/2024

सकारात्मक विचारांच्या साहित्याची गरज
जागतिक पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांचे विचार

डॉ. राजेंद्र झुंजारराव यांच्या ‘दर्पण’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

पुणे, दि, १४ नोव्हेंबर: " धकाधकीच्या जीवन प्रवासात तणावातून मुक्त होण्यासाठी व्यक्त होणे महत्त्वाचे असते. साहित्य व विशेषतः कविता हे यासाठी एक चांगले माध्यम आहे. साहित्याच्या माध्यमातून व्यक्त होत असताना साहित्यिकांनी समाजाला सकारात्मक विचार द्यावेत." असे विचार जागतिक पर्यावरण तज्ज्ञ आणि ग्रीन तेर फाउंडेशनचे संस्थापक, माजी संचालक डॉ. राजेंद्र शेंडे यांनी व्यक्त केले.
साहित्यविश्व प्रकाशन, पुणे प्रकाशित मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पुणे चे प्राचार्य. डॉ. राजेंद्र झुंजारराव यांच्या ''दर्पण" या नवव्या काव्यसंग्रहांच्या प्रकाशन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी स्नेहवर्धने प्रकाशनाच्या प्रमुख डॉ. स्नेहलता तावरे, साहित्यविश्व प्रकाशनाचे संस्थापक विक्रम मालनआप्पा शिंदे, मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालाचे प्राचार्य. डॉ. राजेंद्र झुंजारराव उपस्थित होते.

डॉ. राजेंद्र शेंडे म्हणाले," कविता किंवा कोणत्याही साहित्य कृतीमध्ये चांगुलपणाची तळमळ असते. नाट्य, काव्य आणि समाजाचे सौंदर्य फक्त कवीचं पाहू शकतो. डॉ. झुंजारराव यांच्या कविता मानवतेच्या विचारांचे उदात्तीकरण करणाऱ्या आहेत. जगण्याच्या सौंदर्याचं भावविश्व प्राचार्यांच्या कवितेत आहे. चिंतनातून मानसिक आरोग्य व सकारात्मक विचारांची प्रेरणा कवितेत असल्याने सर्वांसाठी उपयुक्त आहेत.”

डॉ. स्नेहलता तावरे म्हणाल्या," प्राचार्यांच्या कवितेत सहजता, वाचनीयता आणि गेयता आहे. त्यांच्या कवितेंची गाणी होऊ शकतात. कोणत्याही क्षणी दुःखावर फुंकर घालून निर्मळ आनंद देणाऱ्या सकारात्मक कविता ही झुंजाररावांना मिळालेली एक नैसर्गिक देणगीच आहे."

विक्रम मालनआप्पा शिंदे म्हणाले, " जगण्याचा आशावाद आणि बळ देणाऱ्या कविता असून आज सर्वांनाच सकारात्मक व प्रेरणादायी विचारांनी गरज आहे."

डॉ. झुंजारराव लिखित कवितेचे स्वाती पटवर्धन व संजय शिगवण यांच्या स्वरबद्ध गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
हा कार्यक्रम मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या लता मंगेशकर सभागृहात पार पडला.
डॉ. अंजली सरदेसाई यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. वैजयंतीमाला जाधव यांनी आभार व्यक्त केले.

- साहित्यविश्व प्रकाशन, पुणे
यांच्याद्वारे प्रसिद्धीसाठी.
विक्रम मालन आप्पासो शिंदे
7743884307

साहित्यविश्व प्रकाशन निर्मित आणि डॉ. राजेंद्र झुंजारराव लिखित  दर्पण या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमातील छायाचित्र...
13/11/2024

साहित्यविश्व प्रकाशन निर्मित आणि डॉ. राजेंद्र झुंजारराव लिखित दर्पण या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमातील छायाचित्रे.

संविधानात संत परंपरेतील वैश्विक मूल्यांचे प्रतिबिंब :  ज्ञानेश्वर महाराज बंडगर------------------------------------------...
01/11/2024

संविधानात संत परंपरेतील वैश्विक मूल्यांचे प्रतिबिंब :
ज्ञानेश्वर महाराज बंडगर
------------------------------------------------------------
‘संत आणि संविधान’ या पुस्तिकेचे प्रकाशन संपन्न

पुणे, दि. २९ ऑक्टोबर : भारतातील संत परंपरेची समता, बंधुता आणि न्याय या वैश्विक मूल्यांशी बांधिलकी ठेवून, त्या काळात समाजातील अनिष्ट परंपरा, सामाजिक विषमता, स्त्रियांवरील अन्याय आणि अंधश्रद्धांविरूद्ध जोरदार आवाज उठवला त्या सर्व उदात्त मानवीमूल्यांचे भारतीय राज्यघटनेत प्रतिबिंब पडले असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी केले. ‘संवैधानिक राष्ट्रवाद मंच’च्या वतीने काल आयोजित केलेल्या ‘संत आणि संविधान’ या पुस्तिकांच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संविधान प्रसार चळवळीचे नेते प्रा. सुभाष वारे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी, व्यासपीठावर मंचाचे संस्थापक प्रशांत कोठडिया, संयोजक विवेक काशिकर, संपादक प्रा. नीलम पंडित आणि विद्यालंकार घारपुरे, साहित्यविश्व प्रकाशनाचे विक्रम मालनआप्पा शिंदे, साखळीपीर राष्ट्रीय तालीम मारूती मंदिराचे अध्यक्ष रविंद्र माळवदकर, सीए प्रसाद झावरे, ज्येष्ठ समाजसेवक मच्छिंद्र गोजमे, सामाजिक कार्यकर्त्या अरुणा तिवारी व रामदास मारणे, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी ‘साहित्यविश्व प्रकाशना’च्या वतीने प्रसिद्ध करण्यात येणा-या ‘संत आणि संविधान’ या मराठी व इंग्रजी पुस्तिकांचे; तसेच श्री. मच्छिंद्र गोजमे लिखित व ‘शब्दवेध बुक हाऊस’, संभाजीनगर निर्मित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ या पुस्तकाचेही श्री. बंडगर आणि प्रा. वारे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

पुढे बोलताना, श्री. बंडगर यांनी संत शिरोमणी श्री. ज्ञानदेव महाराज, एकनाथ महाराज, संत कबीर, नामदेव महाराज आणि संत तुकाराम, आदी थोर संतांनी; तसेच छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांनी सामाजिक ऐक्यासाठी केलेल्या महान कार्याची व संपन्न वारशाची माहिती सांगितली. जातीच्या उतरंडीमुळे ग्रासलेल्या समाजामध्ये संतांनी, तसेच, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी श्री. शाहू महाराज, आदी थोर सत्यशोधक नेत्यांनी भेदाभेद संपविण्याची प्रेरणा दिली आणि म्हणूनच वारकरी संप्रदायामध्ये जातीभेदाला स्थान नसून, आता धर्माच्या नावाखाली काही सनातनी प्रवृत्ती समाजात विद्वेष पसरविण्याचे आणि समाजात भेद पाडण्याचे प्रयत्न करीत असून, त्याविरोधात आपण सर्वांनी सतर्क राहून समाज प्रबोधन करण्याचे त्यांनी आवाहन केले.

अध्यक्षीय समारोप करताना, प्रा. सुभाष वारे यांनी संविधानाची निर्मिती करताना, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्याची सर्वसमावेशक चळवळ आणि त्याचबरोबर जगभरातील राजकीय चळवळींचा डॉ. आंबेडकर आणि संविधान सभेतील मान्यवर सदस्यांनी सखोल अभ्यास केला आणि भारतीय मातीतून निर्माण झालेल्या वैश्विक प्रागतिक विचार व मानवीमूल्यांचा त्यामध्ये समावेश केल्यामुळेच, आपल्या देशात लोकशाही शासनव्यवस्था रुजू शकली, असे ठाम प्रतिपादन केले. सध्या देशामध्ये संकुचित विचारांच्या हिंदुत्ववादी शक्ती या माणसाच्या स्खलनशील स्वभावाचा फायदा घेऊन, संतांचा उपदेश आणि संविधानाचा गाभा असलेले ‘प्रेम’, ‘समता’ आणि ‘बंधुता’ या तत्वांनाच उध्वस्त करण्याचे पद्धतशीर प्रयत्न करीत असल्याचे सांगून प्रा. वारे यांनी, संविधानातील तत्वे पुन्हा एकदा समाजामध्ये रुजविण्याचे एकत्रित प्रयत्न करण्याचे आव्हान केले.

युवा कलावंत श्री. धनंजय पवार आणि मोहिनी पवार यांनी या कार्यक्रमात आपल्या सुरेल आवाजाने संतांचे निवडक अभंग, भारूड व प्रार्थना सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. या कार्यक्रमात विवेक काशिकर, नीलम पंडित, विद्यालंकार घारपुरे, विक्रम मालनआप्पा शिंदे, रविंद्र माळवदकर, मच्छिंद्र गोजमे यांची भाषणे झाली. श्री. प्रशांत कोठडिया यांनी सूत्रसंचालन केले, तर श्रीमती तमन्ना इनामदार यांनी आभार मानले.

------------------------------------------------------------

संविधानात संत परंपरेतील वैश्विक मूल्यांचे प्रतिबिंब :  ज्ञानेश्वर महाराज बंडगर------------------------------------------...
25/10/2024

संविधानात संत परंपरेतील वैश्विक मूल्यांचे प्रतिबिंब : ज्ञानेश्वर महाराज बंडगर
------------------------------------------------------------
'संत आणि संविधान’ या पुस्तिकेचे प्रकाशन संपन्न

पुणे दि २५ भारतातील संत परंपरेची समता, बंधुता आणि न्याय या वैश्विक मूल्यांशी बांधिलकी ठेवून, त्या काळात समाजातील अनिष्ट परंपरा, सामाजिक विषमता, स्त्रियांवरील अन्याय आणि अंधश्रद्धांविरूद्ध जोरदार आवाज उठवला त्या सर्व उदात्त मानवीमूल्यांचे भारतीय राज्यघटनेत प्रतिबिंब पडले असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी केले. ‘संवैधानिक राष्ट्रवाद मंच’च्या वतीने काल आयोजित केलेल्या ‘संत आणि संविधान’ या पुस्तिकांच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संविधान प्रसार चळवळीचे नेते प्रा. सुभाष वारे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी, व्यासपीठावर मंचाचे संस्थापक प्रशांत कोठडिया, संयोजक विवेक काशिकर, संपादक प्रा. नीलम पंडित आणि विद्यालंकार घारपुरे, साहित्यविश्व प्रकाशनाचे विक्रम शिंदे, साखळीपीर राष्ट्रीय तालीम मारूती मंदिराचे अध्यक्ष रविंद्र माळवदकर, सीए प्रसाद झावरे, ज्येष्ठ समाजसेवक मच्छिंद्र गोजमे, सामाजिक कार्यकर्त्या अरुणा तिवारी व रामदास मारणे, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी ‘साहित्यविश्व प्रकाशना’च्या वतीने प्रसिद्ध करण्यात येणा-या ‘संत आणि संविधान’ या मराठी व इंग्रजी पुस्तिकांचे; तसेच श्री. मच्छिंद्र गोजमे लिखित व ‘शब्दवेध बुक हाऊस’, संभाजीनगर निर्मित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ या पुस्तकाचेही श्री. बंडगर आणि प्रा. वारे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

पुढे बोलताना, श्री. बंडगर यांनी संत शिरोमणी श्री. ज्ञानदेव महाराज, एकनाथ महाराज, संत कबीर, नामदेव महाराज आणि संत तुकाराम, आदी थोर संतांनी; तसेच छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांनी सामाजिक ऐक्यासाठी केलेल्या महान कार्याची व संपन्न वारशाची माहिती सांगितली. जातीच्या उतरंडीमुळे ग्रासलेल्या समाजामध्ये संतांनी, तसेच, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी श्री. शाहू महाराज, आदी थोर सत्यशोधक नेत्यांनी भेदाभेद संपविण्याची प्रेरणा दिली आणि म्हणूनच वारकरी संप्रदायामध्ये जातीभेदाला स्थान नसून, आता धर्माच्या नावाखाली काही सनातनी प्रवृत्ती समाजात विद्वेष पसरविण्याचे आणि समाजात भेद पाडण्याचे प्रयत्न करीत असून, त्याविरोधात आपण सर्वांनी सतर्क राहून समाज प्रबोधन करण्याचे त्यांनी आवाहन केले.

अध्यक्षीय समारोप करताना, प्रा. सुभाष वारे यांनी संविधानाची निर्मिती करताना, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्याची सर्वसमावेशक चळवळ आणि त्याचबरोबर जगभरातील राजकीय चळवळींचा डॉ. आंबेडकर आणि संविधान सभेतील मान्यवर सदस्यांनी सखोल अभ्यास केला आणि भारतीय मातीतून निर्माण झालेल्या वैश्विक प्रागतिक विचार व मानवीमूल्यांचा त्यामध्ये समावेश केल्यामुळेच, आपल्या देशात लोकशाही शासनव्यवस्था रुजू शकली, असे ठाम प्रतिपादन केले. सध्या देशामध्ये संकुचित विचारांच्या हिंदुत्ववादी शक्ती या माणसाच्या स्खलनशील स्वभावाचा फायदा घेऊन, संतांचा उपदेश आणि संविधानाचा गाभा असलेले ‘प्रेम’, ‘समता’ आणि ‘बंधुता’ या तत्वांनाच उध्वस्त करण्याचे पद्धतशीर प्रयत्न करीत असल्याचे सांगून प्रा. वारे यांनी, संविधानातील तत्वे पुन्हा एकदा समाजामध्ये रुजविण्याचे एकत्रित प्रयत्न करण्याचे आव्हान केले.

युवा कलावंत श्री. धनंजय पवार आणि मोहिनी पवार यांनी या कार्यक्रमात आपल्या सुरेल आवाजाने संतांचे निवडक अभंग, भारूड व प्रार्थना सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. या कार्यक्रमात विवेक काशिकर, नीलम पंडित, विद्यालंकार घारपुरे, विक्रम शिंदे, रविंद्र माळवदकर, मच्छिंद्र गोजमे यांची भाषणे झाली. श्री. प्रशांत कोठडिया यांनी सूत्रसंचालन केले, तर श्रीमती तमन्ना इनामदार यांनी आभार मानले.

------------------------------------------------------------

Address

Pune
411016

Alerts

Be the first to know and let us send you an email when SahityaVishwa Prakashan, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SahityaVishwa Prakashan, Pune:

Share

Category