रेडीओ सम्यक वाणी भारत आणि भारताच्या विभिन्न राज्यामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व , चा प्रचार करण्या हेतू रेडीओ सम्यक वाणी च्या माध्यमातून निरंतर सम्यक विचाराचा कार्यक्रम प्रसारित करून बुद्ध-कबीर-शिव छत्रपती-शाहू-फुले आंबेडकरी विचारधारा तसेच बुद्ध धम्मावर प्रोबोधन केले जात आहे. “बुद्ध आणि त्यांचा धम्म’’ या मध्ये डॉ.बाबसाहेब आंबेडकरानी लिहिले आहे कि बुद्ध धम्म चा प्रचार व प्रसार करणे म्हणजे मानवते
ची सेवा करणे होय. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून त्यांना बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ आणि बुद्ध धम्म चांगल्या रीतीने समजू शकेल. या उदेश्याने रेडीओ सम्यक वाणी या app चे निर्माण केले गेले आहे. वर्तमान परिस्थिती मध्ये धम्म प्रचार कार्य कठीण आहे. परंतु समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी हे करने अत्यंत गरजेचे आहे. जर आपल्या द्रढ निश्चय असेल आणि कठीण परीस्थितीत हि आपण निश्चयी राहून निरंतर कार्य करीत राहिलो तर आपण हे लक्ष सहजपणे प्राप्त करू शकतो. त्यामुळे या app ला जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवार, संपर्कातिल लोकांमद्दे share करून धम्म प्रसार-प्रचार कार्यामध्ये योगदान करावे.. हि नम्र विनंती. रेडिओ सम्यक वाणी टीम