News Katta Live

News Katta Live बातमी.. जी घडवेल बदल..!

परभणी : न्यूज कट्टा    घरात मुलगी जन्माला येणं ही भाग्याची गोष्ट समजली जाते. मात्र परभणी जिल्ह्यात लागोपाठ तिसरी मुलगी झ...
28/12/2024

परभणी : न्यूज कट्टा घरात मुलगी जन्माला येणं ही भाग्याची गोष्ट समजली जाते. मात्र परभणी जिल्ह्यात लागोपाठ तिसरी मुलगी झाल्याच्या रागातून पतीनं पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून जीवंत पेटवून दिल्याची अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. या घटनेनंतर संबंधित महिलेने जीवाच्या आकांताने धावाधाव केली. मात्र तिचा जीव वाचला नाही. या प्रकरणी या नराधम पतीवर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

परभणी : न्यूज कट्टा

पुणे : न्यूज कट्टा  भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा उद्योजक सतीश वाघ यांच्या हत्येत पत्नीचाच सहभाग असल्याचं उघड झाल...
28/12/2024

पुणे : न्यूज कट्टा भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा उद्योजक सतीश वाघ यांच्या हत्येत पत्नीचाच सहभाग असल्याचं उघड झाल्यानंतर आता अनेक गोष्टी समोर येवू लागल्या आहेत. सतीश वाघ यांचेही बाहेर अनैतिक संबंध असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्याचवेळी केवळ हातपाय तोडण्याची सुपारी दिल्याची कबुली मोहिनी वाघ हिने पोलिसांकडे दिली आहे. दरम्यान, सतीश वाघ यांचे भाचे योगेश टिळेकर हे आमदार आहेत ही बाब समजल्यानंतर हल्लेखोरांनी सतीश वाघ यांची हत्या करण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक बाबही आता स्पष्ट झाली आहे....

पुणे : न्यूज कट्टा

जेजूरी : न्यूज कट्टा अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी श्र...
27/12/2024

जेजूरी : न्यूज कट्टा अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश प्र. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ३० डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत सोमवती अमावस्या यात्रेकरीता येणारी हलकी व इतर वाहने वगळून जड-अवजड वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे....

जेजूरी : न्यूज कट्टा

बारामती : न्यूज कट्टा       बारामती शहरातील बेकायदेशीर अकॅडमींवर स्थानिक प्रशासन मेहरबान असल्याचं पहायला मिळत आहे. अंतिम...
27/12/2024

बारामती : न्यूज कट्टा बारामती शहरातील बेकायदेशीर अकॅडमींवर स्थानिक प्रशासन मेहरबान असल्याचं पहायला मिळत आहे. अंतिम फायर एनओसी नसलेल्या अकॅडमींवर कारवाईचे आदेश होऊन चार महीने उलटून गेल्यानंतरही एकाही अकॅडमीवर कारवाई झालेली नाही. उलट ‘इंटीमेशन नोटिस’ या गोंडस नावाखाली अकॅडमींना वाचवण्याचाच प्रकार सुरू आहे. स्थानिक अधिकाऱ्यांची ‘मिलीभगत’ असल्यामुळे या अकॅडमींचं फावत असून जाणीवपूर्वक कारवाईत टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी केला आहे....

बारामती : न्यूज कट्टा

पुणे : न्यूज कट्टा  भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा उद्योजक सतीश वाघ यांच्या हत्येची त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ हिन...
27/12/2024

पुणे : न्यूज कट्टा भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा उद्योजक सतीश वाघ यांच्या हत्येची त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ हिनेच सुपारी दिल्याचं समोर आलं आहे. त्याचवेळी गेल्या सहा महिन्यांपासून सतीश वाघ यांच्या हत्येचा कट रचला जात होता ही बाबही आता तपासात निष्पन्न झाली आहे. सतीश वाघ यांचं अपहरण झाल्यानंतर कारमध्येच त्यांच्यावर ७२ वार करण्यात आल्याचं आणि हत्येसाठी वापरलेला चाकू भीमा नदीपात्रात टाकून दिल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे....

पुणे : न्यूज कट्टा

नवी दिल्ली : न्यूज कट्टा भारताचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन...
26/12/2024

नवी दिल्ली : न्यूज कट्टा भारताचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांचं निधन झाल्याचं जाहिर करण्यात आलं. मनमोहन सिंग यांची प्रकृती खालवल्यामुळे आज सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केलं.. देशाला आर्थिक मंदितून बाहेर काढणारं व्यक्तिमत्व गमावल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

नवी दिल्ली : न्यूज कट्टा

पुणे : न्यूज कट्टा  भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा उद्योजक सतीश वाघ यांच्या हत्येची त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ हिन...
26/12/2024

पुणे : न्यूज कट्टा भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा उद्योजक सतीश वाघ यांच्या हत्येची त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ हिनेच सुपारी दिल्याचं समोर आलं आहे. आपल्या मुलाच्या मित्राशी सुरू असलेल्या प्रेम प्रकरणावरुन पतीशी सातत्यानं वाद होत असल्यानं मोहिनी वाघ हिने सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पतीच्या हत्येनंतर धाय मोकलून रडणारी पत्नीच या हत्येची सूत्रधार असल्याचं स्पष्ट झाल्यामुळं खळबळ उडाली आहे....

पुणे : न्यूज कट्टा

पुणे : न्यूज कट्टा  भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा उद्योजक सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे...
25/12/2024

पुणे : न्यूज कट्टा भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा उद्योजक सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. सतीश वाघ यांच्या हत्येची त्यांच्या पत्नीनेच सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या घडवली गेल्याचंही आता समोर आलं आहे. ९ डिसेंबर रोजी पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सतीश वाघ यांचं अपहरण करत हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती....

पुणे : न्यूज कट्टा

बारामती : न्यूज कट्टा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी सहाव्यांदा निवड झाल्याबद्दल अजितदादा पवार यांचा उद्या रविवार दि. २२ डि...
21/12/2024

बारामती : न्यूज कट्टा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी सहाव्यांदा निवड झाल्याबद्दल अजितदादा पवार यांचा उद्या रविवार दि. २२ डिसेंबर रोजी बारामतीकरांच्या वतीने नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. तत्पूर्वी सकाळी ६ वाजल्यापासून अजितदादा आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. विकासकामांच्या पाहणीसह बारामतीत आयोजित विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. उद्या दुपारी ४ वाजता बारामती शहरातील शारदा प्रांगणामध्ये अजितदादांचा नागरी सत्कार होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार सुनेत्रा पवार, आमदार अमोल मिटकरी यांची उपस्थिती असणार आहे....

बारामती : न्यूज कट्टा

बारामती : न्यूज कट्टा  एकदा शब्द दिला की तो पूर्णच करायचा अशी अजितदादांची खासीयत सर्वश्रुत आहे. बारामती शहरातील वसंतराव ...
14/12/2024

बारामती : न्यूज कट्टा एकदा शब्द दिला की तो पूर्णच करायचा अशी अजितदादांची खासीयत सर्वश्रुत आहे. बारामती शहरातील वसंतराव पवार मार्गावर असलेलं दत्त मंदिराचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत चांगलाच चर्चेत आला होता. सांगता सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आचारसंहिता संपताच मंदिराचं काम करण्याचा शब्द दिला होता. आज श्रीदत्त जयंतीचं औचित्य साधत अजितदादांनी सकाळी या जागेची पाहणी केली आणि संध्याकाळी मंदिराच्या कामाचं भूमीपूजनही केलं....

बारामती : न्यूज कट्टा

पुणे : न्यूज कट्टा पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी  ...
13/12/2024

पुणे : न्यूज कट्टा पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी २७ डिसेंबर २०२४ च्या रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारित केलेल्या या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे....

पुणे : न्यूज कट्टा

बारामती : न्यूज कट्टा  राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली असून उपमुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार यांची निवड झाली आहे. ...
13/12/2024

बारामती : न्यूज कट्टा राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली असून उपमुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार यांची निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे, पुणे बाजार समितीचे माजी प्रशासक दिलीप खैरे यांच्यासह बारामती तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान, या भेटीमुळे येणाऱ्या काळात बारामतीच्या राजकारणात नवीन समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता आहे....

बारामती : न्यूज कट्टा

सातारा : न्यूज कट्टा  आपल्याला न्याय मिळावा यासाठी आपण न्यायालयात धाव घेत असतो. मात्र न्यायाधीशच लाच घेऊ लागले तर काय अस...
11/12/2024

सातारा : न्यूज कट्टा आपल्याला न्याय मिळावा यासाठी आपण न्यायालयात धाव घेत असतो. मात्र न्यायाधीशच लाच घेऊ लागले तर काय असा प्रश्न मनात येण्यासारखी धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन मिळवून देण्यासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम व इतर तिघांनी ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

सातारा : न्यूज कट्टा

बारामती : न्यूज कट्टा  महावितरणच्या बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून काम केलेले आणि सध्या महावितरणच्या कार्यकारी ...
03/12/2024

बारामती : न्यूज कट्टा महावितरणच्या बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून काम केलेले आणि सध्या महावितरणच्या कार्यकारी संचालकपदी कार्यरत असलेले सुनील रंगनाथ पावडे (वय ५४) यांचं सोमवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. जळगाव येथे लग्न समारंभासाठी गेलेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचं निधन झालं. दरम्यान, कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर अधिकारी म्हणून नावलौकिक असलेल्या पावडे यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त होत आहे....

बारामती : न्यूज कट्टा

शिरूर : न्यूज कट्टा  शिरूर तालुक्यातील शिक्रापूर गावचे माजी उपसरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बं...
02/12/2024

शिरूर : न्यूज कट्टा शिरूर तालुक्यातील शिक्रापूर गावचे माजी उपसरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले यांची काल दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या १२ तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पूर्ववैमनस्यातून ही हत्या केल्याची माहितीही आता समोर आली आहे. पप्पु नामदेव गिलबिले असं या हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे....

शिरूर : न्यूज कट्टा

शिरूर : न्यूज कट्टा   शिरूर तालुक्यातील शिक्रापूर गावचे माजी उपसरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय ब...
01/12/2024

शिरूर : न्यूज कट्टा शिरूर तालुक्यातील शिक्रापूर गावचे माजी उपसरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास गिलबिले यांच्या राहत्या घरासमोरच ही घटना घडली आहे. या घटनेनंतर शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज दुपारच्या वेळेत दत्तात्रय गिलबिले (वय ५१) हे आपल्या बंगल्यासमोर असलेल्या आवारात बसलेले होते....

शिरूर : न्यूज कट्टा

सांगली : न्यूज कट्टा   कोल्हापूर येथील लग्न सोहळ्यावरून परतत असताना भरधाव वेगातील कार कृष्णा नदीच्या पूलावरून कोसळून तीन...
28/11/2024

सांगली : न्यूज कट्टा कोल्हापूर येथील लग्न सोहळ्यावरून परतत असताना भरधाव वेगातील कार कृष्णा नदीच्या पूलावरून कोसळून तीनजण ठार झाल्याची घडली आहे. या घटनेत तीनजण जखमी झाले असून यामध्ये पाच वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. गुरुवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास अंकली येथे ही घटना घडली आहे. प्रसाद भालचंद्र खेडेकर (वय ४०), प्रेरणा प्रसाद खेडेकर ( वय ३५) आणि वैष्णवी संतोष नार्वेकर (२३) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे....

सांगली : न्यूज कट्टा

मुंबई : न्यूज कट्टा   महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबरोबरच मित्रपक्षांच्या सत्तेतील सहभागाबाबत आज दिल्लीत बैठक होणार आहे...
28/11/2024

मुंबई : न्यूज कट्टा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबरोबरच मित्रपक्षांच्या सत्तेतील सहभागाबाबत आज दिल्लीत बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे चर्चा करणार आहेत. या बैठकीतच मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे फडणवीस यांना संधी देतात की ऐनवेळी धक्कातंत्र वापरतात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत मोदी-शाह यांच्याकडून जो निर्णय घेतला जाईल तो आपल्याला मान्य असेल असं सांगत मुख्यमंत्रीपदावरील दावा मागे घेतला....

मुंबई : न्यूज कट्टा

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when News Katta Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to News Katta Live:

Videos

Share