08/04/2020
नुकताच कागर रिलीज झाला आणि आर्ट फिल्म मधील परिचित एक चेहरा त्या फिल्म मध्ये दिसला. जवळपास 42 short फिल्म 15 मराठी डिप्लोमा व फुल्ल लेंथ फिल्म आणि 2 हॉलिवूड फिल्म असा अनुभवाचा पेटारा असणारा एक कलाकार म्हणजे विठ्ठल काळे.
विठ्ठल काळे - भावड्या (मराठी चित्रपट कागर ,२०१९)
घेणं अन देणं फुकटच .....हा संवाद आणि नागीण डान्स ह्यात जे काम त्याच दिसत ते त्यांचा अनुभवाला
शोभणार आहे. त्यांची औषध ह्या लघुचित्रपातील त्याच काम पाहून मी त्याचा फॅन झालो होतो. पाठीमागे वास्तववादी अभिनय ह्या शब्दावर कोणी तरी आक्षेप घेतला होता त्याच म्हणणं बरोबर होत जेथे अभिनय हा विषय आला त्याला वास्तव कस म्हणता येईल,पण ह्याची दुसरी बाजु अशी की तुम्हला वास्तवाचा भास तयार करायचा असतो. त्यात जर तुह्मी खरे उतरलात तर तो खरा वास्तववादी अभिनय आणि हा म्हणुस त्याला 100 टक्के नाही तर 101 टक्के पूर्ण करतो.
राक्षक ह्या सिनेमातील त्या एका मित्राची आणि लँड 1857 मधील एक शेतकऱ्यांच्या मुलाची भूमिका, पात्र वेगळे होते पण निभावणार एक होता. त्यांनी त्याच ताकदीने ते निभावल्या पण. तुकाराम ह्या मराठी चित्रपटातील एक रागडा लक्ष्मण आणि हॉटेल मुंबई ह्या हॉलिवूड चित्रपटामधील एक प्रोफेशनल पोलीस इन्स्पेक्टर तितकाच जिवंत आणि ज्वलंत वाटतो.
विठ्ठल काळे - लक्ष्मण ( मराठी चित्रपट - तुकाराम )
कलाकार आणि त्यांनी निभावलेले पात्र ह्यातील अंतर ज्यांना कमी करण्यात यश आले ते खरे अभिनेते म्हणून नावारूपास आले. ह्या माणसाने कामे खूप केले पण नावा साठी कधीच काम नाही केले ते केले त्यांनी केलेल्या पत्राला न्याय मिळावा म्हणून. त्याने लिहलेली एक कविता मनाला खूप भावते अभिनेता म्हणून ती शशांक शेंडे च्या page वरती पाह्यला मिळते त्यात ते एक पात्र कस जगल जात त्या बद्दल तो बोलतो -
....या समुद्रातील कोट्यावधी, अगणित, अनंत जीव म्हणजे पात्राच्या मनातील भाव भावना आहेत
एवढं सगळं असतं भरलेलं फक्त एका पात्रात !
‘ते’ दाखव तू
मुठभर भावभावना दाखवून दुकान मांडू नको acitng चं
असं म्हणून त्यानं जोरकस सूर मारला त्या समुद्राच्या खोल पोटात.....
ही अशीच नुसती कविता नाही तो माणूस तसं जगत आहे प्रत्येक पात्र जिवंत करण्यासाठी.
अश्या या हरहुन्नरी कलाकाराची प्रकट मुलाखत फक्त तुमच्यासाठी...