Rohan Prakashan

Rohan Prakashan रोहन प्रकाशन
|| घर समृद्ध करणारी पुस्तकं || Aspires to broaden the horizons of its readers. Rohan Prakashan was established in 1982.

Aims to enrich our lives through the books, which can provide authentic information, knowledge guidance and a holistic perspective. Since inception Rohan has been into publishing of books in Marathi, touching upon several aspects of life- literature, social, political, individual health, arts and personal skills of various kinds etc. Rohan publishes translated versions of noteworthy English books.

Superior quality of production has become the hallmark of ROHAN Prakashan and over 300 books touching upon several subjects (like Biography, History, Politics, Social studies, Education, Arts, Theatre, Culture, Health & Medicine, Naturopathy, Yoga, Literature, Humour, Literature for Children, Craft Art & Skills, Sports, Adventure and Communication, Cookery) are testimony to this unbeatable, proud distinguishing feature of ROHAN. ROHAN had formed an enviable association with high quality writers. Apart from the production, ROHAN has a battery of fine editors to ensure structured and skilful presentation of the writing of talented authors. The efforts are reflected in the publications. ROHAN has received several national and state level awards for excellence in book production. It is no surprise that since the last decade ROHAN has been considered to be a name to reckon with in the field of elite publishing. ROHAN has contributed vastly by bringing into light many fine books which created a mark of their own. To name a few, Biographies of Lal Bahadur Shastri (Ex. Prime Minister of India), Kasturba Gandhi, Autobiography of ShriYaswantrao Chavan (Krishnakath). With the success of its research based voluminous book ‘Yanee Ghadvale Sahasrak’ (They Shaped the Millennium), which proved to be the first of its kind in the history of Marathi publication, ROHAN reached the high point of its journey. The book not only got an overwhelming response
from Marathi readers but it also received national level of recognition. At the turn of this century, the English division of ROHAN, ‘Rohan Prints’ was set up. With the publication ‘Fast Forward’ a milestone book by Sharad Pawar, ROHAN PRINTS made a fine debut in the stream of English publication. The book was released at the hands of the Hon’ble Prime Minister Dr Manmohan Singh at his residence at New Delhi, in July 2008. ROHAN PRAKASHAN's Head Office is located in Pune also known as “The Oxford of the East” while the Sales office is in Mumbai, the Business Capital of India. With its important distribution centers in Kolhapur and Nagpur, a coverage of pan Maharashtra and Goa is ensured. While ROHAN thus far has reached some significant peaks during the last three decades, no efforts have been spared to maintain its stature, standards and attempt scaling of new heights!! This however could not have ever been possible without the unflinching support of all its readers.





#मराठी
#मराठीपुस्तके
#प्रकाशक
#महाराष्ट्र

24/06/2024

लवकरच...

#नाटक #मराठी #नाट्यभूमी #रंगभूमी

प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद!
22/06/2024

प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद!

22/06/2024

नक्की या.

#मराठी #रोहनप्रकाशन

 #शब्दरत्नाकर गीता अय्यंगारचिंतन आणि प्रात्यक्षिक यांचा मेळ घालणारी योगशिक्षका व 'रोहन'ची लेखिका आपल्या वडिलांकडून वारश्...
22/06/2024

#शब्दरत्नाकर

गीता अय्यंगार
चिंतन आणि प्रात्यक्षिक यांचा मेळ घालणारी योगशिक्षका व 'रोहन'ची लेखिका

आपल्या वडिलांकडून वारश्यातून आलेली योगसाधना शिकून सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील आरोग्य समस्यांना योगासन, प्राणायामाद्वारे उपचार देणाऱ्या योगगुरू ....

गीता अय्यंगार यांना योगशास्त्राचा मौल्यवान वारसा, त्यांचे वडील विश्वविख्यात योगतज्ज्ञ श्री. बी. के. एस. अय्यंगार यांच्याकडून मिळाला. योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार हे आपल्या विशाल योगतत्त्वज्ञानाच्या कलात्मक आविष्कारासाठी सर्वश्रुत आहेत. गीता अय्यंगार यांचा योगाभ्यासाचा प्रारंभ बालपणापासूनच झाला. १९६२ पासून त्यांनी ‘योग’ हा विषय शिकवण्यास सुरुवात केली. त्या ‘तत्त्वज्ञान’ व ‘आयुर्वेद’ या विषयातील पदवीधर आहेत. त्यांच्या योगविषयक ज्ञानाला मिळालेल्या वैद्यकीय ज्ञानाच्या जोडीमुळे, त्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण मार्गदर्शन करू शकत. गीता अय्यंगार ‘रमामणि अय्यंगार मेमोरियल इन्स्टिट्युट’च्या त्या एक चालक होत्या. त्यांनी योगविषयाच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी भारतात आणि विदेशात सर्वदूर प्रवास केलेला आहे. त्यांची या विषयावरील पुस्तकंही जगन्मान्य आहेत. या क्षेत्रात ज्या काही फार थोड्या स्त्रिया काम करू शकल्या त्या ‘योगशास्त्र’ विषयासंदर्भात त्यांचं नाव अतिशय आदराने व मानाने घेतलं जातं.

गीताताईंच्या ‘स्त्रियांसाठी योग-एक वरदान’ या पुस्तकाच्या मूळ इंग्रजी आवृत्तीचे, या पूर्वी युरोपातील सहा विविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. स्वत: एक स्त्री असल्यामुळे स्त्रियांच्या आयुष्यातील अडीअडचणी, आव्हानं, शारीरिक व मानसिक चढउतार हे त्या उत्तमरीत्या जाणू शकत आणि त्याप्रमाणे मार्गदर्शन करत. स्त्रियांविषयी आंतरिक तळमळ असल्यामुळेच त्यांनी हे पुस्तक अतिशय तपशिलात लिहिलं आहे.

'शांतियोग' या त्यांच्या दुसऱ्या पुस्तकातून लेखिकेने योग हा विषय जीवनप्रवाहासारखा प्रवाहित करत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे; अवघड विषय सोपा करून सांगितला आहे, त्याचप्रमाणे योगसाधनेतील अडचणी लक्षात घेत मार्गदर्शन केलं आहे. त्यामुळे सामान्यजनांना योगशास्त्र समजेल आणि त्यांना ते अनुभवताही येईल अशी शाश्वती या पुस्तकातून मिळते. या पुस्तकाचं वाचन, मनन व चिंतन करून सर्व योगसाधकांना निश्चितच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता येईल.

www.rohanprakashan.com

#रोहनप्रकाशन #साहित्यमैफल #मैफल #मैफलएक्सक्लुसिव्ह #रोहनप्राइम #पुस्तकं #वाचन #वाचाल_तर_वाचाल #शब्दरत्नाकर #योग #गीताअय्यंगार

या आठवड्यातील ट्रेंडिंग पुस्तकं!
22/06/2024

या आठवड्यातील ट्रेंडिंग पुस्तकं!

रोहन प्रकाशनची संगीत विषयक पुस्तकं..!
21/06/2024

रोहन प्रकाशनची संगीत विषयक पुस्तकं..!

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगविषयक पुस्तकांवर ३०% सवलत!पुस्तकांची यादी - १. योगदीपिका २. आरोग्ययोग,  आरोग्ययोग ENGLI...
21/06/2024

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगविषयक पुस्तकांवर ३०% सवलत!
पुस्तकांची यादी -
१. योगदीपिका
२. आरोग्ययोग, आरोग्ययोग ENGLISH
३. योग एक कल्पतरू
४. योग सर्वांसाठी
५. स्त्रियांसाठी योग
६. योगासने मुलांसाठी
७. योगोपचार
८. पातंजल योगसूत्र
९. शांतियोग
१०. योगाचार्य

अधिक माहितीसाठी संपर्क - ७०६६७३८८८८
लिंक - https://rohanprakashan.com/product-category/yoga/

#मराठी #आंतरराष्ट्रीययोगदिवस

नक्की या.           #मराठी  #रोहनप्रकाशन
20/06/2024

नक्की या.

#मराठी #रोहनप्रकाशन

20/06/2024

#जागतिकमराठीउद्योजगतादिन

2015 साली झी 24 तासवर सादर झालेल्या ‘दि सुरेश हावरे बिझनेस शो’चं संपादित स्वरूप..
‘बिझनेस बाजीगरांची’ जिद्द, ध्यास, मेहनत, कर्तृत्व तरुणांपुढे मांडणारं..
२१ उद्योजकांशी साधलेल्या संवादातून उलगडलेली बिझनेस सिक्रेट्स सांगणारं..
उद्योग भरभराटीचा हमखास फॉर्म्युला सांगणारं पुस्तक.. 'उद्योग करावा ऐसा!'

https://rohanprakashan.com/product/udyog-sanch/

#रोहनप्रकाशन #मराठी

 #आजचे_अंतरंगपुस्तक : योगदीपिकालेखक : बी.के.एस अय्यंगार पृष्ठ संख्या : ५०४ मूल्य : रु. ५०० योग म्हणजे काय?'योग' हा शब्द ...
19/06/2024

#आजचे_अंतरंग
पुस्तक : योगदीपिका
लेखक : बी.के.एस अय्यंगार
पृष्ठ संख्या : ५०४
मूल्य : रु. ५००

योग म्हणजे काय?

'योग' हा शब्द संस्कृत भाषेतील 'युज्' या धातूपासून बनलेला आहे. 'बांधणे, एकत्र जुळवणे, संयोग पावणे किंवा जुंपणे' तसेच 'आपले लक्ष एखाद्या गोष्टीकडे वळवणे व केंद्रित करणे, योजणे आणि उपयोग करणे' असे या धातूचे विविध अर्थ आहेत. 'संयोग' किंवा 'एकत्व' असाही त्याचा अर्थ आहे. आपली इच्छा आणि ईश्वरेच्छा यांचे खरेखुरे ऐक्य म्हणजे योग. 'Gita according to Gandhi' या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये श्री. महादेव देसाई म्हणतात, "अशा त-हेने योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांच्या सर्व शक्ती ईश्वराशी जोडणे. योग म्हणजे बुद्धी, मन, भावना आणि संकल्प यांचे नियमन. हे नियमन योगामध्ये गृहीतच धरलेले असते. योग म्हणजे आत्म्याचे स्थिरत्व. या स्थिरत्वामुळे जीवनाच्या सर्व पैलूंकडे समबुद्धीने पाहणे शक्य होते."
योग हे प्राचीन भारतातील सहा दर्शनांपैकी म्हणजे तत्त्वज्ञानांपैकी एक दर्शन होय. पतंजलीने योगाविषयीचे ज्ञान १९५ सूत्रे असलेल्या आपल्या 'योगसूत्रे' या ग्रंथामध्ये एकत्र आणले व त्याला एकसूत्री आणि व्यवस्थित स्वरूप दिले. जगात जे जे काही आहे ते ते परमात्म्याने व्यापले असून जीवात्मा हा त्या परमात्म्याचा एक अंश आहे असे प्राचीन भारतीय विचारवंत मानतात. जीवात्मा आणि परमात्मा यांचा संयोग किंवा ऐकात्म्य घडवून मोक्ष कसा मिळवावा हे या दर्शनाने सांगितले म्हणून त्याला 'योग' हे नाव मिळाले आहे.
या योगमार्गाचा अवलंब जो कोणी करतो त्याला योगी म्हणतात. भगवद्‌गीतेच्या सहाव्या अध्यायात योगावरील सर्वांत महत्त्वपूर्ण आणि अधिकृत असे विवेचन सापडते. 'सुख आणि दुःख यांच्या संपर्कापासून मुक्त होण्याचा उपाय' म्हणून श्रीकृष्णांनी अर्जुनाला योग समजावून दिला आहे. श्रीकृष्ण म्हणतात, "जेव्हा मनुष्याचे मन, बुद्धी आणि अहंकार यांचे नियमन केले जाते; आणि ती चंचल वासनेच्या दास्यातून मुक्त होऊन आत्मरूपामध्ये तल्लीन होतात, त्या वेळी त्या मनुष्याला 'युक्त' असे म्हटले जाते. निवाऱ्याच्या जागी दिव्याची ज्योत न थरथरता स्थिरपणाने तेवत राहते, त्याप्रमाणे मन, बुद्धी आणि अहंकार यांचे नियमन केलेला
योगी अंतरात्म्याशी तदाकार झालेला असतो. मन, बुद्धी आणि अहंकार ही निरोधामुळे इकडेतिकडे धावेनाशी झाली म्हणजे अंतरात्म्याच्या कृपेने योग्याला कृतार्थता प्राप्त होते. बुद्धीला अगम्य आणि इंद्रियांच्या पलीकडचे असे महान सुख तो तो अनुभवू लागतो. त्यानंतर या तत्त्वावर तो योगी खंबीरपणे उभा राहतो; त्यापासून तो लेशभरसुद्धा ढळत नाही. इतर सर्व लाभ तुच्छ वाटावेत अशी एक गोष्ट त्याला प्राप्त झालेली असते. तिच्याहून श्रेष्ठतर असे काहीच नसते. तिचा लाभ ज्याला झाला, तो दुःखाच्या कडेलोटातही अढळपणे स्थिर राहतो. यातना आणि दुःख यांच्या बंधनातून सुटणे हाच योगाचा खरा अर्थ."
उत्तम पैलूदार हिऱ्याची प्रत्येक बाजू ज्याप्रमाणे प्रकाशाची वेगवेगळी रंगछटा परावर्तित करते, त्याचप्रमाणे 'योग' या शब्दाचा एकेक पैलू अर्थाची वेगवेगळी छटा दाखवतो. आंतरिक मनःशांती आणि संतुष्टता मिळवण्याचा मनुष्याचा जो महान प्रयत्न चाललेला असतो, त्याची सर्व अंगे 'योग' या शब्दाच्या विविध पैलूंमधून स्पष्ट होतात. भगवद्‌गीतेने 'योग' या शब्दाची आणखीही काही स्पष्टीकरणे दिली असून कर्मयोगावर विशेष भर दिला आहे. गीतेत सांगितले आहे, "कर्म करणे एवढाच तुझा अधिकार; त्याच्या फळावर तुझा अधिकार नसतो. त्यामुळे कर्माचे फळ लाभावे अशी इच्छा तू कधीच बाळगू नकोस आणि कर्मेही सोडू नकोस. देवाचे नाव घेऊन आणि स्वार्थी वासना सोडून तू कर्म करीत राहा; यश आणि अपयश यांचा परिणाम तू स्वतःवर
होऊ देऊ नकोस. या समत्वबुद्धीलाच 'योग' असे म्हणतात."
'कर्म करण्यातील कौशल्य किंवा विविध कर्मे करताना चातुर्याने जीवन व्यतीत करणे किंवा समतोलपणा आणि संयम' अशा शब्दांनीही योगाचा अर्थ सांगितला जातो.
"अति खाणारा किंवा स्वतःला उपाशी ठेवणारा यांपैकी कोणालाच योग साध्य होत नाही; अति झोपणारा किंवा सतत जागा राहाणारा यांनाही साधत नाही. आहार आणि विश्रांती यांमध्ये संयम ठेवला, काम करण्यातही परिमितता ठेवली, जागृती आणि निद्रा यांमध्ये समतोल राखला, तर योग सर्व दुःखे व यातना यांचा नाश करतो."
कठोपनिषदामध्ये योगाचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे "जेव्हा इंद्रिये स्तब्ध होतात, मन स्वस्थ राहते आणि बुद्धीची चळवळ थांबते, त्या वेळेला सर्वोच्च स्थिती प्राप्त होते, असे ज्ञाते म्हणतात. मनाचा आणि इंद्रियांचा हा अखंड निरोध म्हणजेच 'योग' अशी व्याख्या केली जाते. ज्याला ही स्थिती प्राप्त होते, तो मायेपासून मुक्त होतो."
योगसूत्रांच्या प्रथम पादाच्या दुसऱ्या सूत्रामध्ये पतंजलीने योगाचे वर्णन चित्तवृत्तीचा निरोध असे केले आहे. याचा अर्थ 'मनाच्या विविध वृत्तींचे नियमन' किंवा 'चित्ताच्या चंचलतेचे दमन' असा करता येईल. 'चित्त' या शब्दामध्ये मनाची तीनही अंगे एकत्रितपणे व्यक्त होतात : (अ) 'मन' म्हणजे एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे, तिचा स्वीकार करणे किंवा अव्हेर करणे या शक्ती असलेले व्यक्तिगत मन, मनाची चंचल आणि अनिश्चयी
प्रवृत्ती म्हणजे हे मन; (ब) 'बुद्धी' किंवा दोन गोष्टींमधला फरक ओळखणारी निश्चयात्मक तर्कशक्ती; आणि (क) 'अहंकार' किंवा 'स्व'ची जाणीव किंवा 'मी जाणतो' हे सुचवणारी स्थिती.
'वृत्ती' हा शब्द संस्कृत भाषेतील 'वृत्' या धातूपासून बनलेला आहे. 'वृत्' म्हणजे 'वळणे', 'स्वतःभोवती फिरणे' किंवा 'गडगडत जाणे'. त्यामुळे 'वृत्ती' या शब्दाचा अर्थ क्रिया, वर्तन, जीवनपद्धती, परिस्थिती किंवा मनःस्थिती असा होतो. योग म्हणजे चंचल मनाला स्थिर करण्याची आणि आपल्या शक्ती विधायक दिशेला वळवणारी पद्धती. ज्याप्रमाणे एखादी प्रचंड नदी धरणे आणि कालवे यांनी नियंत्रित केल्यावर पाण्याचे मोठे सरोवर निर्माण करते, दुष्काळाची भीती नाहीशी करते आणि विविध उद्योगांसाठी पाण्याचा भरपूर पुरवठा करू शकते, त्याप्रमाणे मनसुद्धा नियंत्रित केल्यावर शांतीचे सरोवर निर्माण करते आणि आत्मोद्धारासाठी भरपूर सामर्थ्य पैदा करते.
मनाचे नियमन करण्याचा प्रश्न सोडवायला सोपा नाही, हे भगवद्‌गीतेच्या सहाव्या अध्यायातल्या पुढील संवादावरून स्पष्ट होईल. अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो;
"योग म्हणजे एकमेव परमात्म्याशी एकरूपता असे तू मला सांगितलेस, पण हे मन अत्यंत चंचल आणि लहरी आहे, त्यामुळे हा योग टिकणार कसा? हे मन बेपर्वा आणि हट्टी, शक्तिमान आणि लहरी व वाऱ्याप्रमाणेच आवरण्यास कठीण असे आहे." त्यावर श्रीकृष्ण उत्तर देतात "तू म्हणतोस त्याप्रमाणे हे मन चंचल आणि अनावर आहे खरेच, परंतु अभ्यास आणि वैराग्य यांच्या योगाने मनाचा निग्रह होऊ शकतो. ज्या माणसाला मनाचा संयम करता येत नाही, त्याला योग साध्य होणे कठीणच; परंतु संयमी माणसाला खूप प्रयत्न केल्यास आणि योग्य उपायांनी आपल्या शक्तीला वळण लावल्यास योगावस्था प्राप्त होऊ शकते."

#योगासने #योग

आज 'राष्ट्रीय वाचन दिवस' या दिवसाचे औचित्य साधत लवकरच घेऊन येत आहोत विविधांगी विषयांची नवीकोरी पुस्तकं! STAY TUNED!     ...
19/06/2024

आज 'राष्ट्रीय वाचन दिवस'
या दिवसाचे औचित्य साधत लवकरच घेऊन येत आहोत विविधांगी विषयांची नवीकोरी पुस्तकं!
STAY TUNED!

आज 'आंतरराष्ट्रीय पिकनिक दिवस'...! रोहन प्रकाशनची पिकनिकविषयक पुस्तकं नक्की वाचा
18/06/2024

आज 'आंतरराष्ट्रीय पिकनिक दिवस'...! रोहन प्रकाशनची पिकनिकविषयक पुस्तकं नक्की वाचा

नमस्कार! विविधांगी लेखमालिका, परीक्षणं आणि बरंच काही...! 📚📚'रोहन प्रकाशन'च्या वेबसाईटला भेट द्या आणि 'मैफल EXCLUSIVE' अं...
17/06/2024

नमस्कार!
विविधांगी लेखमालिका, परीक्षणं आणि बरंच काही...! 📚📚
'रोहन प्रकाशन'च्या वेबसाईटला भेट द्या आणि
'मैफल EXCLUSIVE' अंतर्गत वाचनानंद घ्या 'नवनवीन लेखमालिकांचा'!
मोबाइलवर सोपं- रीडर फ्रेंडली वाचन, रिडींग टाईम आणि 'ऑडिओ'च्या नवीन फिचरसह! 🎧
समृद्ध वाचनाचा आनंद आता फक्त एका क्लिकवर!
लिंक - https://rohanprakashan.com/category/maifal-exclusive/
#मराठी #वाचनआवड #मराठीवाचक

16/06/2024

रवींद्रनाथ टागोरांची पत्रे!
पुस्तकातील काही निवडक भाग!

#मराठी

 #रोहनचे_शब्दरत्नाकर'रोहन'ची संवेदनशील लेखिका, हळवी व्यक्ती आणि लढाऊ कार्यकर्ती!अरुणा सबाने यांच्या व्यक्तिमत्त्वाची अशी...
15/06/2024

#रोहनचे_शब्दरत्नाकर
'रोहन'ची संवेदनशील लेखिका, हळवी व्यक्ती आणि लढाऊ कार्यकर्ती!

अरुणा सबाने यांच्या व्यक्तिमत्त्वाची अशी अनेक रूपे असली तरी 'स्वातंत्र्य' या मूल्यासाठी जिवाची बाजी लावणारे धगधगते स्त्रीत्व हे त्यांचे अस्सल रूप आहे. 'आकांक्षा'सारखे मासिक असो, 'माहेर'सारखी संस्था असो की 'दक्षिणायन'सारखं आंदोलन असो, त्यासाठी अरुणा सबाने झोकून देऊन काम करतात. त्यांचं लेखन, मग ती कादंबरी असो, ललित लेखन असो की वैचारिक लेखन; त्या लेखनातील प्रत्येक शब्द स्त्रीत्वाच्या स्वाभिमानाने भारीत झालेला असतो आणि त्यांच्या कोणत्याही कृतीतील प्रत्येक क्षण हा स्त्रीत्वाचं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्यासाठी असतो.

विदर्भात स्त्रियांच्या प्रश्नांवर गेल्या पंचवीसहून अधिक वर्षांपासून त्या कार्यरत आहेत. ‘विमुक्ता’, ‘मुन्नी’, ‘ते आठ दिवस’, ‘आईचा बॉयफ्रेंड’ ही पुस्तके ,तसेच ‘सूर्य गिळणारी मी’ हे आत्मकथन लोकप्रिय! साहित्यक्षेत्रातील योगदानासाठी आणि त्यांच्या कार्यासाठी विविध क्षेत्रातील अनेकविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

#स्त्री #शब्दरत्नाकर #रोहनप्रकाशन

या आठवड्यातील ट्रेंडिंग पुस्तकं!
15/06/2024

या आठवड्यातील ट्रेंडिंग पुस्तकं!

मोसाद मिशन्स.... आवर्जून वाचावं असं पुस्तक! पुस्तक खरेदी करण्यासाठी : https://rohanprakashan.com/product/mossad-missions...
14/06/2024

मोसाद मिशन्स.... आवर्जून वाचावं असं पुस्तक!
पुस्तक खरेदी करण्यासाठी : https://rohanprakashan.com/product/mossad-missions/
व्हॉट्सअप नंबर - 7066738888
#रोहनप्रकाशन #पुस्तकं #मोसादमिशन्स #वाचन

 #आजचेअंतरंगपुस्तक : मोसाद लेखक : आशिष काळकरपृष्ठ संख्या : १६८मूल्य : रु. २४० मोसादची निर्मिती : थोडी पार्श्वभूमी■ इस्त्...
13/06/2024

#आजचेअंतरंग
पुस्तक : मोसाद
लेखक : आशिष काळकर
पृष्ठ संख्या : १६८
मूल्य : रु. २४०

मोसादची निर्मिती : थोडी पार्श्वभूमी

■ इस्त्रायल देशाबद्दल...

थिओडोर हर्झल (२ मे १८६०३ जुलै १९०४) ही व्यक्ती आपल्याला विशेष परिचयाची नसली, तरी या व्यक्तीला ज्यू धर्मीयांच्या आधुनिक इतिहासात अतिशय मानाचं स्थान आहे. मूळच्या ऑस्ट्रो-हंगेरियन वकील असलेल्या हर्झलने एकोणिसावं शतक संपण्याच्या उंबरठ्यावर असताना, समस्त पृथ्वीतलावर विखुरलेल्या ज्यू लोकांना 'इस्त्रायल'च्या पवित्र भूमीत पुन्हा एकदा परतण्याचं भावनिक आवाहन केलं.

यहोवा देवतेने फक्त ज्यू लोकांसाठी नेमून दिलेली कनानची पवित्र भूमी म्हणजेच 'इस्त्रायल', ही भूमी ज्यू लोकांचा हक्काचा देश. सतरा-अठरा शतकांपासून या भूमीतून परागंदा झालेल्या ज्यू धर्मीयांनी आधुनिक जगाच्या नकाशावर आपला देश निर्माण करण्यासाठी एकत्र येणं ही घटना म्हणजेच 'झिओनिझम' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कडव्या ज्यू राष्ट्रवादाची सुरुवात होती.

अठराव्या शतकापासून पूर्व युरोपमध्ये विखुरलेल्या ज्यू लोकांमध्ये सुरू झालेली 'हसकला' नावाने ओळखली जाणारी चळवळ हा झिओनिझमचा तात्त्विक आणि बौद्धिक पाया होता. युरोप, मध्यपूर्व आणि आजूबाजूच्या भागातल्या सर्वाधिक प्राचीन संस्कृतींपैकी सगळ्यात प्राचीन आणि म्हणून 'आद्य' असलेली ज्यू संस्कृती तिच्या मूळ स्वरूपात जपणं हा या चळवळीचा मुख्य उद्देश होता. त्यातून 'झिओनिझम'ला पोषक पार्श्वभूमी तयार व्हायला मदत झाली. युरोपमध्ये तेव्हाच्या काळात होत असलेल्या भू-राजकीय उलथापालथीतून पुढे जे जे काही घडलं, त्यात झिओनिझमचा उदय हे एक महत्त्वाचं प्रकरण ठरलं.

या काळात युरोप अतिशय मोठ्या स्थित्यंतरातून जात होता. ब्रिटन, फ्रान्स अशा मोठ्या साम्राज्यवादी देशांमध्ये राजेशाहीच्या मांडीला मांडी लावून लोकशाही विराजमान झाली होती. रशियाच्या झारशाहीला हादरे बसत होते. उर्वरित जगाची आपापसात अतिशय मनमानी पद्धतीने वाटणी करून या महासत्ता सधन झाल्या होत्या. दूरवर अमेरिकेतही लोकशाहीने बाळसं धरलं होतं. आपापसातल्या कुरघोड्यांमुळे हे युरोपीय देश नकळत महायुद्धाची पायाभरणी करत होते.

या सगळ्या वातावरणात कुठेतरी ज्यू धर्मीयांमध्ये पुन्हा एकदा आपल्या हक्काचा, आपल्या मालकीचा देश आपल्या हाती परत यावा, ही भावना वाढीला लागली होती... पण का?

वास्तविक उर्वरित जगात इतक्या घडामोडी होत असतानाही आपल्या वस्त्यांमध्ये 'घेट्टो' मध्ये - जगणारे ज्यू लोक कोणाच्या अध्यात ना मध्यात अशा पद्धतीने स्वित्झर्लंड देशातील बासल इथे १८९७ साली भरलेली पहिली ज्यू परिषद, कनानच्या पवित्र भूमीत परतण्याचा प्रस्ताव यात परिषदेत चर्चिला गेला.

सगळ्यांपासून समान अंतर राखून होते. व्यापार, उद्योगधंदे, सावकारी वगैरे क्षेत्रांत अग्रेसर असलेल्या ज्यू लोकांना राजकारण वर्ज्य नसलं, तरी त्यांच्यासाठी राजकारणाचं महत्त्व होतं अर्थकारणापुरतं. शतकानुशतकं 'पक्के व्यापारी' म्हणून ओळखले जाणारे ज्यू याच एका कारणामुळे जगभरात टिकूनही राहिले होते आणि बदनामही झाले होते.

ज्यू लोकांचा इतिहास पाहिला, तर त्यांच्या संघर्षाची कल्पना करता येऊ शकते. 'बायबल' - 'तोरा' अशा धर्मग्रंथात आणि इतर अनेक जुन्या हस्तलिखितांमध्ये ज्यू लोकांची ससेहोलपट कशी कशी झाली, याचं समग्र वर्णन आलं आहे. यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लामिक धर्मीयांचा मूळपुरुष अब्राहम याच्या, म्हणजे तीन हजार वर्ष जुन्या कालखंडात या यहुदी किंवा ज्यू धर्माची पाळंमुळं आढळून येतात. आजच्या इराक देशाच्या दक्षिण भागातल्या 'उर कसदिम' नावाच्या प्रांतात अब्राहम जन्माला आला असं मानलं जातं. त्याला देवाने दृष्टांत दिला आणि 'उर कसदिम' भागातून 'खुद्द देवाने मुक्रर केलेल्या' कनानच्या पवित्र भूमीत जाऊन तिथेच कायमची वस्ती करायला सांगितलं, असं 'बुक ऑफ जेनेसिस'मध्ये लिहिलं आहे. या अब्राहमच्या 'सारा' नावाच्या बायकोचा मुलगा 'आयझेंक' म्हणजे ज्यू लोकांचा आद्यपुरुष.

ही कनान भूमी म्हणजेच आजचा इस्त्रायल देशाचा भाग. अब्राहमच्या आणि त्याच्या अनुयायांच्या स्थलांतराआधीपासून इथे फिलिस्तिनी (म्हणजेच पॅलेस्टिनी) भटके लोक राहत होते. हे तेव्हा इस्लाम नव्हे, तर आपापल्या टोळ्यांचे देव पुजायचे. या धर्मपद्धतीला 'अनेकेश्वरवाद' किंवा 'पेगनीझम' म्हणून ओळखले जातं. या सगळ्याचा आढावा घेतला, तर कनानच्या भूमीत 'मूळचे' लोक पॅलेस्टिनी ठरतात, आणि 'उपरे' ज्यू. इथूनच पुढे हजारो वर्ष चालत आलेला ज्यू-पॅलेस्टिनी वाद जन्माला आला, आणि पुढे या पॅलेस्टिनी लोकांनी इस्लाम स्वीकारल्यावर त्याला धार्मिक संघर्षाची नको ती जोडसुद्धा मिळाली.

दुसऱ्या शतकात आक्रमक रोमन सेनानी सेक्सटस जुलियस सेव्हरस याच्याकडून न भूतो न भविष्यती असा भीषण पराभव स्वीकारावा लागल्यावर ज्यू लोक कनानच्या (म्हणजेच इस्त्रायलच्या) भूमीतून जे परागंदा झाले, ते पुढची सतरा- अठरा शतकं आपल्या मायभूमीकडे परतलेच नाहीत. युरोप, रशिया, भारत अशा अनेक ठिकाणी आसऱ्याला गेलेले हे ज्यू तिथेच स्थायिक झाले. या लोकांनी बरोबर नेलेल्या आणि पिढ्यानुपिढ्या निगुतीने जपलेल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे 'तोरा' हा धर्मग्रंथ आणि आपली मूळ भाषा 'हिब्रू'. शतकानुशतकं ज्यू लोकांच्या पिढ्या आल्या नि गेल्या, पण त्यांच्यातला धर्माभिमान कधीच कमी झाला नाही.

कमालीची चिकाटी आणि प्रचंड कष्ट उपसायची उपजत देणगी या गुणांमुळे ज्यू जिथे गेले तिथे श्रीमंत झाले. स्थानिक अर्थकारणात ज्यू व्यापाऱ्यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माणही केलं... पण जगातल्या कुठल्याही देशातल्या संस्कृतीत ते कधीच विरघळून गेले नाहीत. आपल्या वस्त्या उभारून, आपल्या संस्कृतीला कवटाळून आणि आपल्या धर्माला चिकटून राहत हे ज्यू स्वखुशीने 'उपरे' राहिले.

युरोपमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात राजेशाही-सरंजामशाही सर्वसामान्य माणसांना नकोशी झाली, ती आर्थिक विषमतेमुळे. एकीकडे श्रीमंत वर्ग ऐषोआरामात, तर दुसरीकडे सर्वसामान्य कामगार-कष्टकरी लोकांचा वर्ग हलाखीत अशी परिस्थिती असंतोषाला खतपाणी घालत होती. ज्यू लोकांच्या हाती व्यापार, वित्तसंस्था, पैसा, उद्योगधंदे होतेच. त्यामुळे त्यांच्या हाती असलेला पैसा आणि त्यापाठोपाठ त्यांच्याकडे आपसूक चालत आलेली 'राजकीय आणि सामाजिक' ताकद सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यांत खुपत होती. शिवाय ख्रिस्ती धर्माचं प्राबल्य असलेल्या युरोपमध्ये येशूच्या 'हत्येला' जबाबदार असलेल्या ज्यू धर्मीयांबद्दल पूर्वापारपासून घृणा होतीच.

स्त्री-पुरुष समता या वैचारिक धारेखाली निर्माण झालेली चळवळ ही पहिल्या पर्वातील चळवळ आहे असे आजच्या बहुसंख्य स्त्रिया, विश...
11/06/2024

स्त्री-पुरुष समता या वैचारिक धारेखाली निर्माण झालेली चळवळ ही पहिल्या पर्वातील चळवळ आहे असे आजच्या बहुसंख्य स्त्रिया, विशेषत: कार्यकर्त्या मानतात. या पहिल्या पर्वातील स्त्री-पुरुष समतेच्या चळवळीला चालना देण्याचे काम हे पुरुषांनी केलेले आहे हे मान्यच झाले आहे. त्यामध्ये महात्मा गांधी हेही एक महत्त्वाचे नाव आहे हे विसरून चालत नाही.

परीक्षणासाठी धन्यवाद टीम लोकसत्ता!

Do read.
Link - https://www.loksatta.com/lokrang/gandhis-idea-of-equality-between-men-and-women-mrj-95-4416497/

#लोकसत्ता

रोहन प्रकाशनच्या 'मर्डर इन माहीम' या पुस्तकावर आधारित वेबसिरीज!
10/06/2024

रोहन प्रकाशनच्या 'मर्डर इन माहीम' या पुस्तकावर आधारित वेबसिरीज!

रायगडाबद्दल न ऐकलेल्या गोष्टी, किस्से व माहिती शिवकालीन मावळ भाषेत! घरबसल्या रायगडावर भटकंती केल्याची अनुभूती देणारी लेख...
10/06/2024

रायगडाबद्दल न ऐकलेल्या गोष्टी, किस्से व माहिती शिवकालीन मावळ भाषेत!
घरबसल्या रायगडावर भटकंती केल्याची अनुभूती देणारी लेखमालिका...
'वाटाड्या बारा मावळाचा - रायगड'
लेखक - संतोष सोनवणे
'रोहन प्रकाशन'च्या वेबसाईटला भेट द्या आणि 'मैफल EXCLUSIVE' अंतर्गत वाचनानंद घ्या 'नवनवीन लेखमालिकांचा'!
लेखमालिका वाचण्यासाठी लिंक - https://rohanprakashan.com/.../interestingfactsaboutfort.../
समृद्ध वाचनाचा आनंद आता फक्त एका क्लिकवर!
#ऐतिहासिक #रायगड

 #शब्दरत्नाकररामचंद्र गुहा हे इतिहासतज्ज्ञ आणि स्तंभलेखक आहेत. त्यांनी येल, स्टॅनफोर्ड आणि ऑस्लो या विद्यापिठांतून आणि इ...
08/06/2024

#शब्दरत्नाकर
रामचंद्र गुहा हे इतिहासतज्ज्ञ आणि स्तंभलेखक आहेत. त्यांनी येल, स्टॅनफोर्ड आणि ऑस्लो या विद्यापिठांतून आणि इन्डियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे प्राध्यापकी केली आहे. इंडिया आफ्टर गांधी या त्यांच्या पुस्तकाची 'द बुक ऑफ द इयर' म्हणून इकॉनॉमिस्ट, दि न्यू यॉर्क टाइम्स, दि वॉशिंग्टन पोस्ट, दि वॉल स्ट्रीट जर्नल, दि टाइम आणि आऊटलुक यांनी निवड केली असून टाइम्स ऑफ इंडिया आणि हिंदुस्थान टाइम्स यांनी 'द बुक ऑफ द डेकेड' म्हणून निवड केली आहे.
'न्यूयॉर्क टाइम्स'ने सर्वोत्तम नॉनफिक्शन भारतीय लेखक म्हणून त्यांना नावाजले आहे. तर टाइम या मासिकाने त्यांची भारतीय लोकशाहीचा सर्वात नामवंत इतिहासकार म्हणून त्यांची नोंद घेतली आहे.

MAKERS OF MODERN INDIA मराठीत 'आधुनिक भारताचे शिल्पकार' या नावाने रोहन प्रकाशनने पूर्वी प्रकाशित केलं आहे.

रामचंद्र गुहांना मिळालेली पारितोषिके :
द लिओपोल्ड-हेडी प्राइझ ऑफ द अमेरिकन सोसायटी ऑफ एनव्हायरनमेन्टल हिस्टरी
द दि डेली टेलिग्राफ/क्रिकेट सोसायटी प्राइझ द माल्कम आदिसेशा अ‍ॅवॉर्ड फॉर एक्सलन्स इन सोशल सायन्स रिसर्च द रामनाथ गोएन्का अ‍ॅवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जर्नलिझम आर. के. नारायण प्राइझ द २००८मध्ये प्रॉॅस्पेक्ट अ‍ॅण्ड फॉरेन पॉलिसी या मासिकाने गुहांची जगातील १०० सर्वात प्रभावी बुद्धिमंतांमध्ये गणना केली.
ह २००९मध्ये भारत सरकारने गुहांना पद्मभूषण सन्मानाने गौरवले.

नुकतंच क्रिकेट या सुसंस्कृत खेळाबरोबर असलेलं त्यांचं आजन्म प्रेमप्रकरण सांगणारं 'द कॉमनवेल्थ ऑफ क्रिकेट' हे पुस्तक रोहनने प्रकाशित केलं आहे. क्रिकेट खेळावर निस्सीम प्रेम करणाऱ्या विचारवंत इतिहासकाराचं क्रिकेटच्या आठवणींना उजाळा देणारं आणि वाचकालाही त्या काळाची सफर घडवून आणणारं प्रांजळ कथन..द कॉमनवेल्थ ऑफ क्रिकेट!

#रोहनप्रकाशन #मराठी #रामचंद्रगुहा #क्रिकेट

या आठवड्यातील ट्रेंडिंग पुस्तकं!
08/06/2024

या आठवड्यातील ट्रेंडिंग पुस्तकं!

लवकरच....       #रोहनप्रकाशन
05/06/2024

लवकरच....

#रोहनप्रकाशन

पुस्तक:आपत्तीचक्रलेखक : अतुल देऊळगावकर पृष्ठ संख्या :२९०मूल्य: रु.४३० २५ वर्षांपूर्वी 'हवामान बदल' ही संज्ञा मांडली गेली...
05/06/2024

पुस्तक:आपत्तीचक्र
लेखक : अतुल देऊळगावकर
पृष्ठ संख्या :२९०
मूल्य: रु.४३०

२५ वर्षांपूर्वी 'हवामान बदल' ही संज्ञा मांडली गेली आणि तिचा अन्वय लावण्यासाठी जग एकत्र आलं. त्यातून 'इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज' (आय.पी.सी.सी) स्थापना करण्यात आली. त्या 'आय.पी.सी. सी. 'च्या सहाव्या अहवालात "भारत हे हवामान बदलामुळे परिणाम होणाऱ्या सर्वाधिक असुरक्षित राष्ट्रांपैकी एक आहे," असा इशारा दिला आहे. त्यात "आताच भारतातील काही भागात १.२० ते २० सेल्सियसने तापमान वाढलं आहे. अवर्षण, दुष्काळ, पाण्याचं दुर्भिक्ष व महापूर यांमुळे भारताच्या सकल उत्पादनात १.५ टक्क्यांनी घट होऊन अर्थव्यवस्थेवर भीषण परिणाम होणार आहेत. त्यामुळे २०३० पर्यंत किमान ५ कोटी जनता दारिद्र्याकडे ढकलली जाईल. इथून पुढे महापूर, उष्णतेची लाट व समुद्रपातळीत वाढ ह्या धोक्यांची टांगती तलवार भारतावर असणार आहे," असा भेसूर भविष्यवेध केला आहे. ह्या कल्पनेपेक्षा आपल्याकरिता, वास्तव हे महाभयंकर आहे. २१ व्या शतकातील २२ वर्षांत भारतातील सुमारे ४७० नैसर्गिक आपत्तींमध्ये ८० हजार बळी व ७ लाख कोटींच्या मालमत्तेची हानी झाली आहे. (आपत्तीमुळे दर वर्षी सरासरी १ हजार कोटी मालमत्तेचा विनाश होतो.)
हवामान बदलाच्या घटनांची वारंवारता वाढत जाणाऱ्या भागास 'क्लायमेट हॉटस्पॉट' ठरवलं जातं. आपल्या देशातील अशी अतिसंवेदनशील ठिकाणं वाढत आहेत. ७,५०० लांबीचा समुद्रकिनारा व त्यावरील मुंबई, चेन्नई, कोलकाता यांसारखी अवाढव्य महानगरं असलेला आपला देश हा आपत्तींच्या खाईत आहे. म्हणून हवामान बदल हा 'धोक्यांच्या मालिका निर्माण करणारा विनाशक धोका' ठरत आहे.
धनाढ्य राष्ट्रांनासुद्धा आपत्ती हाताळणं वरचेवर कठीण होत चाललं आहे.
उष्णतेची लाट, दुष्काळ, अतिवृष्टी व पूर एकानंतर एक व एकाच ठिकाणी येत असल्यामुळे व्यवस्थापनात अतोनात अडचणी येत आहेत. हवामान बदलाच्या घटना, मालमत्ता आणि जीवन नष्ट करणाऱ्या अधिक हिंसक बनत आहेत. ही 'प्रदीर्घ आणीबाणी' असून जागतिक उष्मावाढ, जागतिक महासाथी, जागतिक रोगटपणा, हवामान बिघाड हे जगाचं किळसवाणीकरण आहे.
ब्रिटिश पत्रकारितेत जुनी म्हण आहे 'तुमच्या गल्लीतील रस्त्यावर एक अपघाती मृत्यू झाला तर पुढच्या गावात दहा, युरोपियन देशात शंभर आणि जगात दहा हजार मृत्यू होऊ शकतात.' काहीशी अनाकलनीय, गूढ व क्रूर वाटणारी ही म्हण हे हवामान आणीबाणीच्या काळातील असह्य वास्तव ठरत आहे. हवामान बदलाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन ती व्यक्त करण्यासाठी संज्ञादेखील बदलत आहेत. हवामान संकट, हवामान आणीबाणी, हवामान अनागोंदी, हवामान युद्ध व हवामान कडेलोट !
'हिरोशिमा'चा विनाश पाहिल्यानंतर, १९४७ साली हताश अणुशास्त्रज्ञांनी, जगाला सावध करण्यासाठी 'डूम्सडे क्लॉक' हे प्रतीकात्मक घड्याळ तयार केलं. नोबेलने सन्मानित जग‌द्विख्यात शास्त्रज्ञ 'या' घड्याळाच्या टिकटिकीतून संपूर्ण जगाला सावध करीत असतात. सर्व जगासाठी काळरात्रीचा धोका पाहून ह्या घड्याळाची वेळ आजपर्यंत २२वेळा बदलली गेली आहे. १९५३ साली अमेरिका व सोव्हिएत युनियन यांच्या अणुचाचण्यांनंतर हे घड्याळ बाराला दोन मिनिटं कमी ही वेळ दाखवत होतं. १९९१ला सोव्हिएत युनियन कोसळल्यानंतर या घड्याळाचे काटे १२ ला १७ मिनिटे कमी ही वेळ दाखवू लागले. २००७ साली, अनेक ज्ञानशाखांच्या वैज्ञानिकांनी, 'जगाला अण्वस्त्रयुद्धाएवढाच हवामान बदलाचा धोका' असल्याचं सांगितल्यामुळे 'डूम्सडे क्लॉक'ची व्याप्ती वाढवली गेली. २०१५ साली या घड्याळात बाराला तीन मिनिटे कमी होती. सहा जानेवारी २०१९ला अमेरिकेतील 'द बुलेटिन ऑफ अॅटॉमिक सायन्टिस्टस' ह्या संस्थेमधील वैज्ञानिकांनी प्रदीर्घ चर्चेनंतर 'डूम्सडे क्लॉक' नामक प्रतीकात्मक घड्याळाचे काटे अलीकडे आणून १२ला २ मिनिटे कमी असल्याची वेळ सांगितली. ह्या घड्याळाचं वय ७५ वर्ष होत असताना वैज्ञानिकांना संपूर्ण जगावरील महासंकट अधिकच विनाशक झाल्याची जाणीव झाली. २० जानेवारी २०२३ रोज 'बाराला ९० सेकंद कमी' अशी वेळ हे घड्याळ दाखवू लागलं. ७५ वर्षातील सर्वाधिक कठीण काळ दाखवणाऱ्या घड्याळाचे काटे बदलताना वैज्ञानिकांच्या मंडळानं निवेदनात म्हटलंय, "रशिया-युक्रेन युद्ध, दोन कोरियांमधील तसंच चीन-तैवानमधील तणाव आणि ह्या घडामोडींमध्ये अमेरिका व युरोप यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग ह्या कारणांमुळे जग अणुयुद्धाच्या जवळ गेलं; तर हवामान बदलामुळे येणाऱ्या आपत्तींच्या स्फोटामुळे जग कडेलोटाकडे ढकललं जात आहे."


#मराठी #वाचनआवड #वाचनआवड #रोहनप्रकाशन

05/06/2024



'पर्यावरण' हा आपल्या जगण्यातल्या महत्त्वाचा भाग आहे.
उद्या जगात सुखानं राहता यावं ही सर्वांचीच इच्छा आहे.
त्यासाठी काय करायला हवं, कसली काळजी घ्यायला हवी हे सांगणारं..
सोप्या भाषेत पर्यावरणाची ओळख करून देणारं पुस्तक!
मुलांसाठी ओळख पर्यावरणाची

#मराठी #वाचनआवड #मराठीवाचक #रोहनप्रकाशन

Address

5 Dhavalgiri, 430 Shaniwar Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+917066738888

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rohan Prakashan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rohan Prakashan:

Videos

Share

Category

Team Rohan!!!

Aims to enrich our lives through the books, which can provide authentic information, knowledge guidance and a holistic perspective. Aspires to broaden the horizons of its readers. Rohan Prakashan was established in 1982. Since inception Rohan has been into publishing of books in Marathi, touching upon several aspects of life- literature, social, political, individual health, arts and personal skills of various kinds etc. Rohan publishes translated versions of noteworthy English books. Superior quality of production has become the hallmark of ROHAN Prakashan and over 300 books touching upon several subjects (like Biography, History, Politics, Social studies, Education, Arts, Theatre, Culture, Health & Medicine, Naturopathy, Yoga, Literature, Humour, Literature for Children, Craft Art & Skills, Sports, Adventure and Communication, Cookery) are testimony to this unbeatable, proud distinguishing feature of ROHAN. ROHAN had formed an enviable association with high quality writers. Apart from the production, ROHAN has a battery of fine editors to ensure structured and skilful presentation of the writing of talented authors. The efforts are reflected in the publications. ROHAN has received several national and state level awards for excellence in book production. It is no surprise that since the last decade ROHAN has been considered to be a name to reckon with in the field of elite publishing. ROHAN has contributed vastly by bringing into light many fine books which created a mark of their own. To name a few, Biographies of Lal Bahadur Shastri (Ex. Prime Minister of India), Kasturba Gandhi, Autobiography of ShriYaswantrao Chavan (Krishnakath). With the success of its research based voluminous book ‘Yanee Ghadvale Sahasrak’ (They Shaped the Millennium), which proved to be the first of its kind in the history of Marathi publication, ROHAN reached the high point of its journey. The book not only got an overwhelming response from Marathi readers but it also received national level of recognition. At the turn of this century, the English division of ROHAN, ‘Rohan Prints’ was set up. With the publication ‘Fast Forward’ a milestone book by Sharad Pawar, ROHAN PRINTS made a fine debut in the stream of English publication. The book was released at the hands of the Hon’ble Prime Minister Dr Manmohan Singh at his residence at New Delhi, in July 2008. ROHAN PRAKASHAN's Head Office is located in Pune also known as “The Oxford of the East” while the Sales office is in Mumbai, the Business Capital of India. With its important distribution centers in Kolhapur and Nagpur, a coverage of pan Maharashtra and Goa is ensured. While ROHAN thus far has reached some significant peaks during the last three decades, no efforts have been spared to maintain its stature, standards and attempt scaling of new heights!! This however could not have ever been possible without the unflinching support of all its readers.worthy English books.