Rajhans Prakashan Pune

Rajhans Prakashan Pune मराठी पुस्तक विश्वातले अग्रगण्य नाव - राजहंस प्रकाशन
विषयांचं वैविध्य आणि आशयाची समृद्धी!

एखादा धरणप्रकल्प साकार होताना नेमकं काय घडतं? त्या ठिकाणी तज्ज्ञ इंजिनियरांपासून रोजंदारीवरच्या मजुरापर्यंत शेकडो माणसं ...
15/01/2025

एखादा धरणप्रकल्प साकार होताना नेमकं काय घडतं? त्या ठिकाणी तज्ज्ञ इंजिनियरांपासून रोजंदारीवरच्या मजुरापर्यंत शेकडो माणसं कसा हातभार लावतात? या सगळ्यांच्या एकत्र जगण्यातून कोणतं जीवननाट्य उलगडत जातं? विस्थापितांना कोणत्या मरणयातनांना सामोरं जावं लागतं? धरणउभारणीत किती व्यामिश्र तांत्रिक बाबी गुंतलेल्या असतात? एकापाठोपाठ एक महत्त्वपूर्ण धरणांची उभारणी करणाऱ्या एका कुशल इंजिनियरच्या नजरेतून धरणप्रकल्पाशी नाळ जोडलेल्या एका आगळ्यावेगळ्या जगाचा अन् संस्कृतीचा वेध घेणारी अनोखी कादंबरी एखादा धरणप्रकल्प साकार होताना नेमकं काय घडतं? त्या ठिकाणी तज्ज्ञ इंजिनियरांपासून रोजंदारीवरच्या मजुरापर्यंत शेकडो माणसं कसा हातभार लावतात? या सगळ्यांच्या एकत्र जगण्यातून कोणतं जीवननाट्य उलगडत जातं? विस्थापितांना कोणत्या मरणयातनांना सामोरं जावं लागतं? धरणउभारणीत किती व्यामिश्र तांत्रिक बाबी गुंतलेल्या असतात? एकापाठोपाठ एक महत्त्वपूर्ण धरणांची उभारणी करणाऱ्या एका कुशल इंजिनियरच्या नजरेतून धरणप्रकल्पाशी नाळ जोडलेल्या एका आगळ्यावेगळ्या जगाचा अन् संस्कृतीचा वेध घेणारी 'राजहंस' प्रकाशित एक अनोखी कादंबरी म्हणजे 'धरणसूक्त'!

याच कादंबरीबद्दल 'राजहंसी मोहोर'च्या या भागात आपण संवाद साधला आहे, लेखक विलास शेळके यांच्याशी.

संपूर्ण पॉडकास्टची लिंक कमेंट्समध्ये.

11/01/2025

राजहंस प्रकाशनने नव्या वर्षात सुरू केलेला नवीन उपक्रम म्हणजे 'कविता राजहंसी'! दर आठवड्याला आम्ही आपल्यासमोर नवनवीन कविता घेऊन येणार आहोत.

आजची कविता - आपुलकी
कवयित्री - विद्या पोळ-जगताप
कवितासंग्रह - देवचाफा

आपला प्रतिसाद जरूर आम्हाला कळवा.

स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी चित्रपटसृष्टीचं जे सुवर्णयुग अवतरलं त्यात चित्रपटसंगीताचा मोलाचा वाटा होता. या सुवर्णकाळाती...
09/01/2025

स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी चित्रपटसृष्टीचं जे सुवर्णयुग अवतरलं त्यात चित्रपटसंगीताचा मोलाचा वाटा होता. या सुवर्णकाळातील चार लखलखती नक्षत्रं म्हणजे लता मंगेशकर, मोहम्मद रफ़ी, आशा भोसले आणि किशोर कुमार. या चार गायकांच्या कारकीर्दीचा आढावा घेत त्यांनी गायलेल्या हज़ारो गाण्यांपैकी प्रत्येकी २५ गाण्यांचा रसास्वाद घेणारी सुहास किर्लोस्कर आणि डॉ. मृदुला दाढे लिखित चार नवीन पुस्तकं साठवणीतील गाणी या मालिकेअंतर्गत नुकतीच राजहंसने प्रकाशित केली आहेत. याबद्दलच 'राजहंसी मोहोर'च्या या भागात आपण या पुस्तकांचे संपादक डॉ. शिरीष सहस्त्रबुद्धे यांच्याशी संवाद साधला आहे.

संपूर्ण पॉडकास्टची लिंक कमेंट्समध्ये.

सुप्रसिध्द लेखिका वंदना बोकील-कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!या पुस्तकांवर २५% सवलत. (७,८,९ जानेवारी)पुस्त...
07/01/2025

सुप्रसिध्द लेखिका वंदना बोकील-कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

या पुस्तकांवर २५% सवलत. (७,८,९ जानेवारी)

पुस्तक खरेदी करण्यासाठी आजच www.rajhansprakashan.com ला भेट द्या.

 

मराठी-हिंदी नाटककार, पटकथालेखक, अभिनेते आणि चित्र-नाट्य दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!या प...
07/01/2025

मराठी-हिंदी नाटककार, पटकथालेखक, अभिनेते आणि चित्र-नाट्य दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

या पुस्तकांवर २५% सवलत. (७,८,९ जानेवारी)

पुस्तक खरेदी करण्यासाठी आजच www.rajhansprakashan.com ला भेट द्या.

 

06/01/2025

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अतिशय आनंदाची बातमी!🌸

सर्व लेखकांचे मनःपूर्वक अभिनंदन!

ही पुस्तके खरेदी करण्यासाठी आजच www.rajhansprakashan.com ला भेट द्या.

04/01/2025

भारतीय सिनेसंगीताच्या शिरपेचातील मानाचा तुरा म्हणून ओळखले जाणारे गायक म्हणजे किशोरकुमार! त्यांचं गाणं, त्यांचा दिलखुलासपणा, त्यांचा गाण्यामागचा विचार, त्यांच्या काही सुप्रसिद्ध गाण्यांमागचे किस्से या सगळ्याचा आढावा लेखक सुहास किर्लोस्कर यांनी त्यांच्या 'आवाजाचा अवलिया किशोर कुमार' या पुस्तकात घेतला आहे. याबद्दलच 'राजहंसी मोहोर'चा हा खास भाग!

संपूर्ण पॉडकास्टची लिंक कमेंट्समध्ये.

04/01/2025

नमस्कार!
नववर्षाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

या नव्या वर्षात आम्ही आपल्यासमोर एक नवीन उपक्रम घेऊन येतो आहोत - 'कविता राजहंसी'! या सदराद्वारे आम्ही आपल्यासमोर राजहंस प्रकाशित कवितासंग्रहातील कवितांचे त्यांच्या कवींनी केलेले सादरीकरण घेऊन येऊ. दर आठवड्याला एक कविता आपल्याला या उपक्रमातून ऐकता येईल.

आजची कविता - अशीच नाही फुलली
कवयित्री - विद्या पोळ-जगताप
कवितासंग्रह - देवचाफा

आपला प्रतिसाद जरूर आम्हाला कळवा.

हिंदी चित्रपटसृष्टीतलं उत्स्फूर्त संगीताचा आविष्कार असणारं हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे किशोर कुमार. एक मनस्वी हळवा माणू...
01/01/2025

हिंदी चित्रपटसृष्टीतलं उत्स्फूर्त संगीताचा आविष्कार असणारं हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे किशोर कुमार. एक मनस्वी हळवा माणूस लपला होता त्याच्यात.

‘आ चल के तुझे मैं ले के चलूं’ गाण्याचा गीतकार किशोर...‘कोई हमदम न रहा’ गाण्याचा संगीतकार होता.

‘मैं हुं झुम झुम झुमरू’ गाणारा किशोर...‘दुखी मन मेरे’सारखी दर्दभरी गाणी तितक्याच तन्मयतेनं गायचा.

या पुस्तकात रसिक कला आस्वादक सुहास किर्लोस्कर आपल्याला सांगताहेत किशोर कुमार नावाच्या अष्टपैलू गायकाबद्दल. कसा होता किशोर गायक म्हणून? काय होत्या त्याच्या खासियती? सिनेसृष्टीत त्याला कसं झगडावं लागलं? या रसदार कथनानंतर वाचायला मिळतील किशोरची निवडक पंचवीस गीतं आणि त्यांचं रसग्रहण...

संपूर्ण पॉडकास्टची लिंक बायोमध्ये.

31/12/2024

तुम्हाला यांमधील सर्वात जास्त आवडलेले पुस्तक कोणते?

#2025

31/12/2024

प्रा. स. ह. देशपांडे यांच्या निवडक लेखांचा संग्रह असलेले 'ऐवज विचारांचा' हे पुस्तक राजहंस प्रकाशनने प्रा. स. ह. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सरत असताना प्रकाशित केले आहे. यानिमित्त राजहंसी मोहोरने प्रसिद्ध केलेल्या विशेष भागाबद्दलचा हा एक अंश!

संपूर्ण पॉडकास्टची लिंक कमेंट्समध्ये.

भारतीय चित्रपटसृष्टीतील सुरांची ४ घराणी म्हणजे लता मंगेशकर, किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि आशा भोसले! या प्रत्येक दालनाचा ...
30/12/2024

भारतीय चित्रपटसृष्टीतील सुरांची ४ घराणी म्हणजे लता मंगेशकर, किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि आशा भोसले! या प्रत्येक दालनाचा स्वतंत्र अभ्यास करून केलेली ग्रंथनिर्मिती नुकतीच 'राजहंस'ने वाचकांच्या भेटीला आणली आहे.

आजच आपली प्रत खरेदी करण्यासाठी www.rajhansprakashan.com ला भेट द्या.

भोवतालच्या समाजाचे आणि सामाजिक परिस्थितीचे एका समाजशास्त्रज्ञाच्या चश्म्यातून सतत आकलन करून घेणारे प्रा. स. ह. देशपांडे ...
25/12/2024

भोवतालच्या समाजाचे आणि सामाजिक परिस्थितीचे एका समाजशास्त्रज्ञाच्या चश्म्यातून सतत आकलन करून घेणारे प्रा. स. ह. देशपांडे हे वैचारिक महाराष्ट्राला परिचित असणारे एक नाव. प्राध्यापक देशपांडे यांनी पाच दशकांहूनही अधिक काळ विपुल लेखन केले आणि महाराष्ट्राच्या विचार-विश्वावर एक विशिष्ट ठसा उमटवला. राष्ट्रवाद या विषयाचे त्यांचे लिखाण हे अनेक मान्यवरांकडून व व्यासपीठांवरून चर्चिले गेले. प्रा. स. ह. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सरत असताना त्यांच्या निवडक लेखांचा संग्रह असलेले 'ऐवज विचारांचा' हे पुस्तक राजहंस प्रकाशनने प्रकाशित केले आहे. यानिमित्त राजहंसी मोहोरचा हा विशेष भाग!

संपूर्ण पॉडकास्टची लिंक कमेंट्समध्ये.

भारताचे माजी पंतप्रधान आणि कवी अटल बिहारी वाजपेयी यांना विनम्र अभिवादन!या पुस्तकावर २५% सवलत! (२५, २६ व २७ डिसेंबर)आजच ख...
25/12/2024

भारताचे माजी पंतप्रधान आणि कवी अटल बिहारी वाजपेयी यांना विनम्र अभिवादन!

या पुस्तकावर २५% सवलत! (२५, २६ व २७ डिसेंबर)

आजच खरेदी करण्यासाठी www.rajhansprakashan.com ला भेट द्या.

24/12/2024

संगीतप्रेमींसाठी अतिशय संग्राह्य ठरणारी अशी राजहंस प्रकाशित नवीकोरी पुस्तके!

आजच खरेदी करण्यासाठी www.rajhansprakashan.com ला भेट द्या.

'राजहंस' प्रकाशित पुस्तकाला सलग तिसऱ्या वर्षी साहित्य अकादमी पुरस्कार!
20/12/2024

'राजहंस' प्रकाशित पुस्तकाला सलग तिसऱ्या वर्षी साहित्य अकादमी पुरस्कार!

मनःपूर्वक अभिनंदन!🙏🏻🌸
20/12/2024

मनःपूर्वक अभिनंदन!🙏🏻🌸

Address

Rajhans Prakashan Pvt Ltd, 1025 Sadashiv Peth, Near Nagnath Par
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 6:30pm
Wednesday 10am - 6:30pm
Thursday 10am - 6:30pm
Friday 10am - 6:30pm
Saturday 10am - 6:30pm

Telephone

02024465063

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajhans Prakashan Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rajhans Prakashan Pune:

Videos

Share

Category