The Atul Trekker

The Atul Trekker “I like being near the top of a mountain. One can’t get lost here.”

सिंहगढ़ क़िले का विहंगम दृश्य (पुणे, महाराष्ट्र)
24/11/2024

सिंहगढ़ क़िले का विहंगम दृश्य (पुणे, महाराष्ट्र)

* #प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृद्धिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजींची ही मुद्रा मांगल्यासाठी...
16/10/2024

* #प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृद्धिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजींची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे. 🌙*

लोहगढ़ क़िले का विहंगम दृश्य (पुणे,महाराष्ट्र)
15/09/2024

लोहगढ़ क़िले का विहंगम दृश्य (पुणे,महाराष्ट्र)

16/11/2023
Nature has a great simplicity and therefore a great beauty!😌🌀           ❤️😍
12/08/2023

Nature has a great simplicity and therefore a great beauty!😌🌀 ❤️😍

26/07/2023

बाणकोट किल्ला / हिम्मतगड किल्ला / फोर्ट व्हिक्टोरिया हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीपासून 47 किमी अंतरावर...
16/06/2023

बाणकोट किल्ला / हिम्मतगड किल्ला / फोर्ट व्हिक्टोरिया हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीपासून 47 किमी अंतरावर असलेला किल्ला आहे . हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्वाचा किल्ला आहे. हा किल्ला सावित्री नदीच्या काठावरील व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी प्रमुख आणि कमांडिंग पॉईंटवर स्थित आहे , जो मध्ययुगीन काळातील एक व्यस्त मार्ग महाड पर्यंत जातो. समुद्राजवळील टेकडीवर असलेला हा किल्ला आहे.

च्या पहिल्या शतकातील ग्रीक भूगोलशास्त्रज्ञ टॉलेमीच्या नोंदींमध्ये या किल्ल्याचा पहिला पुरावा सापडतो . तेव्हा त्याला मंदारगिरी किंवा मंदगोरा असे म्हणतात. चिनी प्रवासी हियुन त्सांगने इसवी सन ६४० मध्ये बाणकोट येथे प्रवास केला असावा. हा किल्ला पोर्तुगीजांनी १५४८ मध्ये विजापूरच्या मोहम्मद आदिल शहाकडून काबीज केला होता. तो १७०० मध्ये मराठा कोळी अ‍ॅडमिरल [१] कान्होजी आंग्रे यांनी जिंकला आणि त्याला हिम्मतगड असे नाव दिले. तुळाजी आंग्रे आणि पेशव्यांच्या वैरामुळे . पेशव्यांनी इंग्रजांशी युती करून तुळाजीशी युद्ध पुकारले. 1755 मध्ये सुवर्णदुर्गच्या पतनानंतर हा किल्ला ब्रिटिश ताफ्यातील कमोडोर जेम्सला शरण गेला.. [२] ब्रिटीश सैन्याने किल्ला ताब्यात घेतला आणि त्याला फोर्ट व्हिक्टोरिया असे नाव दिले. नंतर इंग्रजांनी हे उघड केले की किल्ला राखणे हा आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही आणि तो पेशव्यांच्या ताब्यात देण्यात आला . [३] १८३७ मध्ये मामलतदार कार्यालय बाणकोट येथून मंडणगड येथे हलविण्यात आले .

निसर्गाची अद्भुत रचना,सह्याद्रीतील एक अत्यंत कठीण किल्ला,🚩 मोरोशीचा भैरवगड 🚩"ठाणे" जिल्ह्यातील "मुरबाड" तालुक्यात माळशेज...
03/06/2023

निसर्गाची अद्भुत रचना,
सह्याद्रीतील एक अत्यंत कठीण किल्ला,
🚩 मोरोशीचा भैरवगड 🚩

"ठाणे" जिल्ह्यातील "मुरबाड" तालुक्यात माळशेज घाटाच्या पायथ्याशी "मोरोशी" हे भैरवगडाच्या पायथ्याचे गाव आहे, दुरवरून पाहिल्यास एका उंच पठारावर निसर्गाची राकट परंतु सुंदर कलाकृती नजरेस पडते ती भैरवगडाच्या रूपाने, निसर्गाने निर्माण केलेली ही आगळीवेगळी भिंतचं,तिन्ही बाजूनी ताशीव कातळकडे
पूर्वेकडील बाजूस कातळात रचनात्मक पायऱ्या असलेला,यातल्या काही पायऱ्या आज उध्वस्थ स्वरूपात पहायला मिळतात,या पायऱ्यांवरून चढणे-उतरने मोठे आव्हान आहे, (येथे आपल्या साहसाची खरी परीक्षा होणार आहे) गडाच्या काही पायऱ्या तुटक स्वरूपात असल्यामुळे आपल्याला दोराच्या सहाय्याने जीव मुठीत घेऊनचं चढाई करावी लागते, एक-एक पायरी चढतांना मन इतिहासात रमतं आणि सह्याद्रीतल्या या अशा उंच ठिकाणी या निसर्ग भिंतीवर पूर्वजांनी कशाप्रकारे आपल्या कला-कौशल्याचे दर्शन घडवून आणले याबद्दल जाणून घेण्यासाठी मन अधिकचं उत्साहित होतं,परंतु खंत एव्हढीचं की त्या कलाकारचं नाव अज्ञातचं.

भैरवगडाच्या पायऱ्या कोणत्या काळात व कोणी उध्वस्थ केल्या याबद्दल अधिक माहिती मिळत नाही,पायऱ्या चढतांना अनेक गुहा बनवलेल्या आहेत, त्यांचा उपयोग विश्राम करण्यासाठी होतो,गडापर्यंत जाणारी वाट संपूर्ण झाडा-झूडूपांनी व्यापलेली असल्यामुळे चुकार वाटांचे दर्शन घडण्याची शक्यता असते.

थरारक आणि साहसिक अनुभवाचे दर्शन घडवणारा
किल्ला "मोरोशीचा भैरवगड" 🚩

अभेद्य आणि शेवटपर्यंत अजिंक्यचं,छत्रपतींच्या छत्रछायेपासून वंचित राहिलेला जलदुर्ग"मुरुड-जंजिरा किल्ला"हिंदवी स्वराज्य स्...
31/05/2023

अभेद्य आणि शेवटपर्यंत अजिंक्यचं,
छत्रपतींच्या छत्रछायेपासून वंचित राहिलेला जलदुर्ग
"मुरुड-जंजिरा किल्ला"

हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवरायांना अखेरपर्यंत आव्हान,ठरलेला किल्ला म्हणजे "मुरुडचा जंजिरा किल्ला"
हे दुर्दैवचं,परंतु,त्या जंजिऱ्यालासुद्धा शिवरायांचे पदस्पर्श लाभले नाहीत किंवा भगव्याचा मान मिळाला नाही हे त्याचं सर्वात मोठं दुर्दैव.

महाराष्ट्रातला एक असा जलदुर्ग ज्याला शत्रू आक्रमणापासून नेहमीचं सुरक्षितता लाभली,जो आजही प्रत्येकाच्या मनावर एक वेगळीच छाप सोडतो,तो "जंजिरा किल्ला" जो आजसुद्धा अजिंक्य मानला जातो.

महाराष्ट्रातला एक असा जलदुर्ग ज्याला मराठ्यांचं भगवं निशाण मिळालं नाही किंवा गडाला छत्रपतींच सानिध्य लाभलं नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हा जलदुर्ग घेण्यासाठी अतोनात प्रयत्न केले,हे प्रत्येक मावळ्याने ध्यानी असू द्यावे,शिवाय अशा कोणत्याची गडाला कमी लेखन किंवा त्याचा गडावरील वास्तूंचा अपमान करणं आपल्या रक्तात नाही.

🚩 महाराष्ट्राची शान 🚩
"मुरुड जंजिरा किल्ला"
ता.मुरुड जि.रायगड

🚩 किल्ले रामशेज 🚩50 हजार मुघलं विरुद्ध 600 मावळेनाशिक जिल्ह्यातील "दिंडोरी" तालुक्यात "रामशेज किल्ला" स्थित आहे,भगवान श्...
29/05/2023

🚩 किल्ले रामशेज 🚩

50 हजार मुघलं विरुद्ध 600 मावळे

नाशिक जिल्ह्यातील "दिंडोरी" तालुक्यात "रामशेज किल्ला" स्थित आहे,भगवान श्रीराम वनवासात असताना काही दिवस या डोंगरावर वास्तव्यास होते, त्यामुळे त्याला "रामशेज" नाव दिले गेले.छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत तब्ब्ल साडे सहा वर्षे ह्या किल्ल्याने मुघलांना झुंज दिली,मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासात रामशेजचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवले आहे,परंतु ज्या किल्लेदाराने इतकी वर्षे रामशेज अजिंक्य ठेवला त्याच नाव मात्र अज्ञातचं.
छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात शक्ती आणि
युक्तीनिशी लढली गेलेली ही लढाई आजही इतिहासात प्रसिद्ध आहे.

पायथ्याचे गाव:-आशेवाडी
ता.दिंडोरी जि.नाशिक

स्वातंत्र्याच्या लख्ख उजेडाकडे घेऊन जाणारं धगधगत पर्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज...🙏🏻🙇🏻‍♂️शुभ प्रभात...😊
29/04/2023

स्वातंत्र्याच्या लख्ख उजेडाकडे घेऊन जाणारं धगधगत पर्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज...🙏🏻🙇🏻‍♂️

शुभ प्रभात...😊

   फिरस्तीच्या आजच्या प्रवासात तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आज आपण भेट देतोय *राजियांचा गड आणि गडांचा गड आणि राजांच...
10/04/2023


फिरस्तीच्या आजच्या प्रवासात तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आज आपण भेट देतोय *राजियांचा गड आणि गडांचा गड आणि राजांचा गड किल्ले राजगड.*
रविवारी रात्री दहा वाजता पनवेल इथून निघून रात्री साडेबारा वाजता पुण्यातील मित्राच्या घरी वस्तीला थांबून सकाळी सहा वाजता निघून साडेसात पर्यंत राजगड चढायला सुरुवात करायचा असं नियोजन असताना पुण्यातल्या थंडीमुळे आम्हाला राजगड चढायला साडेनऊ वाजले. साडेनऊ वाजता केलेला ट्रेक जवळ जवळ सव्वा बारा ते साडेबारा वाजता आम्हाला गुंजवणे येथील महादरवाज्याच्या ठिकाणी घेऊन गेला खरंतर कोणत्याही ट्रेकरणे राजगड ट्रेक करताना गुंजवणे चोर दरवाजा करून गडावर पोहोचणे आणि तिथूनच गडाच्या खाली उतरणे महत्त्वाचे सुरक्षितेचे राहील राजगडाने स्वराज्याची वीस ते पंचवीस वर्ष धुरा सांभाळली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा राजगड किल्ला आजही दिमाघ्यात उभा आहे सुवेळा माची आणि संजीवनी माची या दोन्ही माच्या आजही तेवढ्याच हिमतीने आणि ताकतीने इतिहासाची साक्ष देत उभे आहे राजगडावरील बालेकिल्ला हा पूर्णपणे ढासळलेला असला तरी आपल्या इतिहासाची साक्ष देतच राहतो राजगड बघायचं म्हटलं तर एक दिवस अपुरा पडतो भरपूर असे ऊन आणि शनिवार रविवार सोडून केलेल्या ट्रेक यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे मनात असतानाही राजगडावर इतर ठिकाणी फिरायला जमलं नाही गडावर बघण्यासारखं बऱ्याच गोष्टी आहेत.
राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैर्ऋत्येला ४८ कि. मी. अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे. दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो, तर किल्ले रायगड हा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो. राजगडाच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोंगर तासून तयार केलेला बालेकिल्ला म्हणजे पृथ्वीने स्वर्गावर केलेली स्वारी होय.

#राजगडाचा #इतिहास
राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे. या मुरूंबदेवाच्या डोंगराला किल्ल्याचे स्वरूप गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच शालिवाहन राजा ज्याने युद्धात शकांना हारवून इ.स ७८ साली स्वतःच्या नावाचं शक सुरू केले, यानेच आठ वर्षांपूर्वी इ.स ७० साली ह्या मुरूंबदेवाच्या डोंगरावर सुंदर असा व उंचपुरा राजगड किल्ला बांधला. बहुधा सन १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले. मराठेशाहीची २५ वर्षे राजधानी याव्यतिरिक्त सदर किल्ल्यावर शिवाजीमहाराजांनाचे धाकटे चिरंजीव राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून, हा बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली.

#राजगडावर #जाण्याचा #मार्ग
राजगडावर जाण्यासाठी चोहोबाजूंनी पाऊलवाटा आहेत.वेळवंड, मळे, भूतुंडे, पाल खुर्द, वाजेघर, गुंजवणे, फणसी, या मार्गाने गडावर जाता येते.काही पाऊलवाटा वापरात नाहीत.दाटझाडी व अतिशय अवघड चढ-उतर्नीमुळे तसेच रस्ता चुकण्याच्या शक्यतेमुळे त्या दुर्लक्षित आहेत.शिवकालीन राजमार्ग असलेल्या पाल दरवाजा मार्ग गडावर जाण्यासठी साखर-वाजेघर,पालखुर्द भोसलेवाडी मार्गे चांगला रस्ता आहे. पुणे वेल्हे रस्त्यावरील मार्गासनी-गुंजवणे गावातून गेलेला रस्ता चोरदिंडीतून पद्यावती माचीवर येतो.वेळवंड खोऱ्यातील भूतांडे गावातून अळू दरवाज्यातून गडावर जाता येते.तोरण्याच्या बूधला माचीवरून डोंगराच्या सोंडेवरून जाऊन संजीवनी माचीवर जाणारा मार्ग सहा-सात तासात गडावर पोहोचतो.

07/04/2023

I have reached 2.5K followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Atul Trekker posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Atul Trekker:

Videos

Share