10/09/2022
पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाला नवे नेतृत्व द्या ! या मगणीसाठी १२ सप्टेंबर रोजी, मुंबई येथे पक्ष कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांचे उपोषण,
शनिवार दि. १० सप्टेंबर २०२२
सासवड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तथा भारतीय रिपब्लिकन पक्ष, ( आठवले ) पुणे जिल्हा ग्रामीण ,या पक्षाच्या पक्षांतर्गत निवडणुकीसाठी निरीक्षकासह नविन जिल्हाध्यक्ष मिळावा ,व २३ ऑगस्ट २०२२ रोजी, मावळ तालुक्यात रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा मेळावा घेऊन, बेकायदेशीर रित्या करण्यात आलेल्या सर्व निवडी रद्द करण्यात याव्यात , व पुणे जिल्हा ग्रामीण रिपब्लिकन पक्षातील एकाधिकारशाही व मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी, सोमवार दि. १२ / ९ / २०२२ रोजी सकाळी ठिक १० वाजून ३० मिनिट या वेळेपासून रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई आझाद मैदान येथील, पक्ष कार्यालयासमोर जाहीर उपोषण करण्यात येणार आहे. अशी माहिती पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष तथा पक्षाचे जेष्ठ नेते , पंढरीनाथ जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली,
रिपब्लिकन पक्षाच्या पुणे जिल्हा ग्रामीण या पक्षाच्या पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम सन १९९८ या वर्षी घेण्यात आला होता, तदनंतर आजतागायत पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या पक्षांतर्गत निवडणूका घेण्यात आल्या नाहीत, त्यामुळे, गेले २४ वर्षे एकाच व्यक्तीकडे, व एकाचं तालुक्याला पुणे जिल्हा ग्रामीण रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे प्रत्येक तालुक्यात याबाबत असंतोष निर्माण झाला असून, पुणे जिल्हा ग्रामीण रिपब्लिकन पक्षातील एकाधिकारशाही व मक्तेदारीला लगाम घालण्यासाठी, पुणे जिल्हा ग्रामीणला नवे नेतृत्व मिळावे या बाबत , पक्षाच्या केंद्रीय व राज्य कार्यकारिणी यांच्याकडे याबाबत वारंवार लेखी व तोंडी युक्तिवाद केला आहे. त्यानुसार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी, देशभरातील रिपब्लिकन पक्षाच्या सर्व पक्ष कार्यकारण्या बरखास्त करून, लोकशाही मार्गाने, केंद्रीय, राज्य, जिल्हा, शहर ,व तालुका व शाखा या या सर्व कार्यकारण्या पुन्हा नव्याने घटीत करण्याचा निर्णय घेऊन, रिपब्लिकन पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना, वरील कमिटी मध्ये लोकशाही मार्गाने, अध्यक्ष व पदाधिकारी होण्यासाठीची संधी प्राप्त करुन दिली आहे, त्यामुळे या पक्ष निर्णयाचे देशभरातील कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. असे असताना, व राज्य कार्यकारिणी अस्तित्वात नसताना, २३ ऑगस्ट २०२२ रोजी मावळ तालुक्यात जिल्हा मेळावा घेऊन, पक्षाची नेत्यांची व पदाधिकारी यांची फसवणूक करुन, राष्ट्रीय अध्यक्ष, राज्य कार्यकारिणी यांची परवानगी नसताना किंवा त्यांनी जिल्हा कार्यकारिणी घटीत करण्यासाठी अधिकृत पक्ष निरीक्षक दिला नसताना , पक्ष ,नेते , व नेतृत्व यांची फसवणूक करुन सदर मेळाव्यात स्वतः हाची जिल्हाध्यक्ष म्हणून, निवड करुन पक्षशिस्तीचा भंग करुन, महिला आघाडी व युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांची निवड करुन, मीचं पक्षाचा कर्ता करविता आहे, असे म्हणून, सर्वांच्या अधिकाराचा गैरवापर करून, पक्षात अराजकता माजवून लोकशाहीचा मुडदा पाडला आहे,
त्यामुळे ही मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी , व याबाबींकडे पक्ष नेतृत्वाचे पक्ष श्रेष्ठींचे लक्ष वेधण्यासाठी, व पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाला नवे नेतृत्व व पक्षांतर्गत निवडणुकीसाठी निरीक्षक मिळावा . या मागणीसाठी सोमवार दि. १२ / ९ / २०२२ रोजी सकाळी ठिक १० वाजून ३० मिनिटापासून रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई येथील पक्ष कार्यालयासमोर जाहीर उपोषण करण्यात येईल, व सदर ठिकाणी पक्ष श्रेष्ठींना निवेदन देऊन , कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल , हे आंदोलन , पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात नसुन, पक्षाची व नेत्यांची फसवणूक करुन, त्यांची दिशाभूल करुन, स्वतः हाची पोळी भाजून, घेणा-या प्रवृत्ती विरोधात आहे. त्यामुळे पक्षातील एकाधिकारशाहीला लगाम घालण्यासाठी व पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना रोटेशन पध्दतीने जिल्हाध्यक्ष पदांची संधी मिळावी या मागणीसाठी सदर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे स्वतः हाचे पद वाचविण्यासाठी काही मंडळी हेतुपुरस्सर हे आंदोलन पक्ष विरोधी आहे . अशी अफवा पसरविण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे खोट्या आफवेवर विश्वास न ठेवता, खरे वास्तव पक्षनेतृत्वाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी , मी पंढरीनाथ जाधव , व पक्षाचे प्रभारी जिल्हा उपाध्यक्ष विष्णूदादा भोसले, व प्रभारी जिल्हानिमंत्रक संतोषनाना डोळस यांच्यासह रिपब्लिकन पदाधिकारी यांनी यांनी घेतलेला निर्णय सार्थ ठरविण्यासाठी , पुणे जिल्हा ग्रामीण रिपब्लिकन पक्षातील सर्व स्वाभीमानी पदाधिकारी यांनी सदर आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहान पंढरीनाथ जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.