22/11/2024
परळीचा आमदार कोण; मतदारांनी दिलेला निकाल आज जाहीर होणार परळी (प्रतिनिधी) - परळी विधानसभा निवडणुकीसाठी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. मतदारांनी कोणाला कोल दिला, कोण होणार परळीचा आमदार याचा फैसला आज शनिवारी मतमोजणीनंतर जाहीर होणार आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे दुसऱ्यांदा परळीचे आमदार होणार का महाविकास आघाडीचे राजेसाहेब देशमुख पहिल्यांदा आमदार होणार या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. परळी विधानसभा मतदानाच्या दिवशी मतदारसंघात काही भागात मतदान यंत्राची मोडतोड, संवेदनशील मतदार केंद्रातील कॅमेरे बंद ठेवणे , पुढाऱ्यास मारहाण करणे असे प्रकार घडल्याने याची चर्चा राज्यभर झाली होती. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अनेक आरोप - प्रत्यारोपाने ही निवडणूक गाजली होती. परळी मतदार संघातील मतदार कोणाच्या गळ्यात आमदारकीची माळ टाकणार हे आज शनिवारी जाहीर होणार आहे.