Warkari_pandharicha

Warkari_pandharicha श्री विठ्ठल-रखुमाईच्या नित्यपूजेचे फोटो-विडिओचे डिजिटल माध्यम

वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा दुपारी संपन्न...धार्मिकदृष्ट्या या विवाह स...
02/02/2025

वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा दुपारी संपन्न...

धार्मिकदृष्ट्या या विवाह सोहळ्याचे खूप महत्त्व असून या आगळ्या वेगळ्या विवाहाची धामधूम आज सकाळपासून पंढरपूर परिसरात सुरु झाली.

वसंतपंचमी म्हणजे निसर्गाचा उत्सव, निसर्गाचे सौदर्य खऱ्या अर्थाने वसंत ऋतूत बहरते. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर दरवर्षी विठ्ठल रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळा पार पडतो. देवाच्या या लगीनघाईचे वेध पंधरा दिवसापासून लागलेले असतात. त्यानुसार आज हा विवाह सोहळा पार पडला.
वसंत पंचमीला होणारा श्री विठ्ठल रुक्मिणीचा हा विवाह सोहळा दरवर्षी राजेशाही पद्धतीने पार पडतो.

श्री विठ्ठल व चि सौ का रुक्मिणीदेवी यांचा शुभविवाह आज वसंतपंचमीच्या शुभमुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथ...
02/02/2025

श्री विठ्ठल व चि सौ का रुक्मिणीदेवी यांचा शुभविवाह आज वसंतपंचमीच्या शुभमुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथे संपन्न झाला शुभमंगल सावधान #विठ्ठल #शुभविवाह

आज वसंतपंचमी श्री विठ्ठल व रुक्मिणी विवाहसोहळ्या निमित्ताने मंदिर गाभाऱ्यास झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे     ...
02/02/2025

आज वसंतपंचमी श्री विठ्ठल व रुक्मिणी विवाहसोहळ्या निमित्ताने मंदिर गाभाऱ्यास झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे

श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूररविवार दि- ०२ फेब्रुवारी २०२५            *🌹काकडा आरती               *🌸नित्य पुजा...
02/02/2025

श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर
रविवार दि- ०२ फेब्रुवारी २०२५
*🌹काकडा आरती
*🌸नित्य पुजा🌸*
*🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

श्री विठ्ठल व रखुमाईमाता काकडा आरती व नित्यपूजा शनिवार ०१ फेब्रुवारी २०२५
01/02/2025

श्री विठ्ठल व रखुमाईमाता काकडा आरती व नित्यपूजा शनिवार ०१ फेब्रुवारी २०२५

31/01/2025
30/01/2025
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूरबुधवार दि- २९ जानेवारी २०२५ काकडा आरतीनित्य पुजा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
29/01/2025

श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर
बुधवार दि- २९ जानेवारी २०२५ काकडा आरती
नित्य पुजा
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

नव्या जोडप्यांना थेट दर्शनराज्यभराच्या अनेक भागातून नवीन लग्न झाले की नवदांपत्य विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असते. मात्र व...
28/01/2025

नव्या जोडप्यांना थेट दर्शन
राज्यभराच्या अनेक भागातून नवीन लग्न झाले की नवदांपत्य विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असते. मात्र विठुरायाच्या दर्शन रांगेत या नवदांपत्याला तासंतास तिष्ठत उभे राहावे लागते. आता या नवीन जोडप्याला विठुरायाच्या दर्शनाला थांबावे लागणार नसून या नवदांपत्याला त्याच्यासोबत आलेल्या तीन लोकांसह थेट दर्शन दिले जाणार आहे. आज मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

शेड उभारणीचे काम अंतिम टप्प्यात
आठ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या माघ यात्रेसाठी मंदिर समितीची बैठक झाली. या बैठकीत आषाढी आणि कार्तिकी या महायात्राप्रमाणेच माघी वारीत सुद्धा भाविकांना तशाच सुविधा दिल्या जाणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. माघ यात्रा काळात ऑनलाइन आणि व्हीआयपी दर्शन हे पूर्णपणे बंद राहणार असून भाविकांना जलद दर्शन होण्यासाठी सहा पत्रा शेड उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 

स्थानिकांच्या दर्शन वेळेत वाढ 
पंढरपूर शहरातील नागरिकांसाठीही आता सकाळी सहा ते सात आणि रात्री दहा ते साडेदहा या वेळात आता थेट दर्शन दिले जाणार आहे . यापूर्वी स्थानिक नागरिकांसाठी सकाळी सहा ते साडेसहा एवढाच वेळ दर्शनासाठी असायचा. आज झालेल्या बठकीत ही वेळ वाढविण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनाही विठुरायाचे दर्शन सुलभ रीतीने होणार आहे. 
दर्शनरांगेत मृत्यू झाल्यास एक लाख रुपयांची मदत
विठुरायाच्या दर्शनासाठी येणारे अंध अपंग दिव्यांग आणि चालता न येणारे अतिवृद्ध यांना झटपट दर्शन दिले जाणार आहे. यासाठी व्हील चेअरची व्यवस्था केली जाणार आहे. अंध , अपंगांसोबत आता नवविवाहितांनाही झटपट दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. विठुरायाच्या दर्शन रांगेत मृत्यू झालेल्या भाविकांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत व मृतदेह गावापर्यंत नेण्याचा खर्चही आता मंदिर समिती उचलणार असल्याचे औसेकर यांनी सांगितले.
पोस्ट सौजन्य

श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपुरमंगळवार  २८ जानेवारी २०२५ दुपारचा पोशाख              🙏🏻 जय हरी.🙏🏻🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕    ...
28/01/2025

श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपुर
मंगळवार २८ जानेवारी २०२५ दुपारचा पोशाख
🙏🏻 जय हरी.🙏🏻
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕

#विठ्ठल #रखुमाई #पंढरपूर

श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपुर मंगळवार  २८ जानेवारी २०२५ काकडा आरती नित्य पूजा 🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
28/01/2025

श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपुर
मंगळवार २८ जानेवारी २०२५
काकडा आरती नित्य पूजा
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕

आज २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनानिमित्ताने श्री विठ्ठल व रखुमाई मातेस सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले
26/01/2025

आज २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनानिमित्ताने श्री विठ्ठल व रखुमाई मातेस सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले

श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूररविवार दि- २६ जानेवारी २०२५ काकडा आरतीनित्य पुजा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
26/01/2025

श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर
रविवार दि- २६ जानेवारी २०२५ काकडा आरती
नित्य पुजा
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूरशनिवार दि- २५ जानेवारी २०२५काकडा आरती नित्य पुजा षट्तिला एकादशी.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩षट्ति...
25/01/2025

श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर
शनिवार दि- २५ जानेवारी २०२५
काकडा आरती नित्य पुजा षट्तिला एकादशी.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

षट्तिला एकादशी ही हिंदू धर्मातल्या महत्त्वाच्या एकादशींपैकी एक आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला षट्तिला एकादशी असे म्हणतात. यामध्ये ‘षट्’ म्हणजे सहा आणि ‘तिला’ म्हणजे तीळ. या दिवशी तीळाचे सहा प्रकारे महत्त्व सांगितले आहे – तीळ सेवन करणे, तीळ तेलाने अंगाला अभ्यंग करणे, तीळ दान करणे, तीळ होम करणे, तीळ युक्त अन्न खाणे आणि तीळयुक्त पाण्याने स्नान करणे.

श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर शुक्रवार दि- २४ जानेवारी २०२५ काकडा आरती नित्य पुजा
24/01/2025

श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर
शुक्रवार दि- २४ जानेवारी २०२५
काकडा आरती नित्य पुजा

श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर गुरुवार दि- २३ जानेवारी २०२५काकडा आरती नित्य पुजा      🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
23/01/2025

श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर गुरुवार दि- २३ जानेवारी २०२५
काकडा आरती नित्य पुजा

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Address

Pandharpur

Telephone

+919529918940

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Warkari_pandharicha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category