Apla Pandharpur

Apla Pandharpur This page is for media,news and entertaing purpose

प्रेम येई हातां जरी । जेथे नांदू ती पंढरी ॥          - संत नामदेव महाराज
06/08/2021

प्रेम येई हातां जरी । जेथे नांदू ती पंढरी ॥
- संत नामदेव महाराज

24/05/2021
पुण्याच्या प्रथमेश जाजू या दहावीच्या विद्यार्थ्याने तब्बल ५० हजारहून अधिक छायाचित्रे एकत्र करून सुस्पष्ट चंद्रबिंब टिपण्...
20/05/2021

पुण्याच्या प्रथमेश जाजू या दहावीच्या विद्यार्थ्याने तब्बल ५० हजारहून अधिक छायाचित्रे एकत्र करून सुस्पष्ट चंद्रबिंब टिपण्याची अनोखी कामगिरी केली. याबद्दल त्याचं मनःपूर्वक अभिनंदन! त्याची जिद्द आणि चिकाटी याचं मनापासून कौतुक वाटतं! त्याला पुढील अवकाश छायाचित्रणासाठी शुभेच्छा!

16/05/2021

जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर
कुत्र्याला लाथ मारण्याचा नादात सुटला रिक्षावरील ताबा, अक्षरशः तोंडावर आपटला चालक

💐भावपूर्ण श्रद्धांजली💐 काँग्रेस नेते आणि खासदार राजीव सातव यांचे आज पहाटे कोरोनाने निधन झाले आहे. उद्या सोमवारी हिंगोलीत...
16/05/2021

💐भावपूर्ण श्रद्धांजली💐
काँग्रेस नेते आणि खासदार राजीव सातव यांचे आज पहाटे कोरोनाने निधन झाले आहे. उद्या सोमवारी हिंगोलीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी त्यांचे पार्थिव शरीर हिंगोलीत आणण्यात येईल, अशी माहिती काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिली.

राजीव सातव यांचे आज पहाटे 4 वाजून 58 मिनिटाने पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. त्यामुळे राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना जहांगीरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेली त्यांची कोरोना विरुद्धची झुंज आज संपली. उद्या सोमवारी सकाळी 10 वाजता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली. सातव यांचे पार्थिव पुण्याहून हिंगोलीकडे रवाना झाले आहे. रुग्णवाहिकेत सातव यांची आई, पत्नी आणि इतर अप्तेष्ट आहेत. उद्या सकाळी कळमनुरीमध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येईल

सांगोला पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार दीपक भोसले यांना Covid-19 ची लागण झाल्याने यांच्यावर तब्बल 25 दिवस उपचार चालू हो...
16/05/2021

सांगोला पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार दीपक भोसले यांना Covid-19 ची लागण झाल्याने यांच्यावर तब्बल 25 दिवस उपचार चालू होते. उपचारादरम्यान DYSP श्री विक्रम कदम साहेब यांनी पोलीस अंमलदार भोसले यांना धीर देऊन संपूर्ण वेळ डॉक्टरांच्या संपर्कात राहून लक्ष देण्यास सांगितले. पोलीस भोसले हे corona वर मात करून ज्यावेळी हॉस्पिटल बाहेर पडले त्यावेळी त्यांनी श्री विक्रम कदम साहेब यांचे हात जोडून आभार मानले. त्यावेळी कदम साहेब यांनी पोलीसांप्रती हे माझे कर्तव्यच असल्याचे सांगून भविष्यात काळजी घेण्यास सांगितले.

05/07/2020

आतापर्यत खूप डान्स बघितले पण असा धम्माल डान्स नाही बघितला 😂😍

नक्की शेअर करा..!

पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष संवर्धनाची गरजपर्यावरणमंत्री ठाकरे: पंढरपुरातून झाडे लागवडीच्या मोहिमेचा शुभारंभ सोलापूर, दि. ...
01/07/2020

पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष संवर्धनाची गरज
पर्यावरणमंत्री ठाकरे: पंढरपुरातून झाडे लागवडीच्या मोहिमेचा शुभारंभ
सोलापूर, दि. 1 : प्रत्येक झाड ऑक्सिजन निर्मितीचा कारखाना असते. म्हणून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्ष संवर्धनाची गरज असल्याचे प्रतिपादन पर्यावरण, पर्यटन, राज शिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. दरम्यान वृक्ष लागवड मोहिमेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या.
श्री. ठाकरे यांनी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह आवारात वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तुळशी वृंदावन येथे वृक्षारोपण केले. यावेळी सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वन संरक्षक दिनेशकुमार त्यागी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, विभागीय वन अधिकारी सुवर्णा माने, उपविभागीय अधिकारी उदय भोसले, सहायक वनसंरक्षक आय.एच.शेख, के.एस. आहीर, व्ही.एन. पवळे आदी उपस्थित होते.
श्री. ठाकरे म्हणाले, ‘वृक्ष जल व मृद संधारणाचे महत्वाचे साधन आहेत. शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि सकस अन्न वृक्ष लागवडीतूनच मिळणार आहे. प्रदूषण नियंत्रणात वृक्षांचे महत्व जाणून शेतकरी, विद्यार्थी, नागरिक आणि शासकीय यंत्रणांनी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी.’
श्री. भरणे म्हणाले, ‘पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड करून वृक्षांचे संवर्धन करणे महत्वाचे आहे. समाजातील सर्व घटकांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हावे. यावेळी त्यांनी वन विभागाने साकारलेल्या तुळशी वृंदावनाची पाहणी करून कामाचे कौतुक केले.
15 जून ते 30 सप्टेंबर 2020 दरम्यान या काळात वन विभागातर्फे वन महोत्सव साजरा करण्यात येत असून वृक्ष लागवडीसाठी नागरिक, संस्था यांना सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे विभागीय वन अधिकारी श्रीमती माने यांनी सांगितले. आर्थिक तरतूद नसणाऱ्या शासकीय यंत्रणांना आगावू मागणी केल्यास मोफत पुरवठा करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

पंढरपूर आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे.01/07/2020
01/07/2020

पंढरपूर आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे.
01/07/2020

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर                           मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातलं विठ्ठलाच्या चरणी...
01/07/2020

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातलं विठ्ठलाच्या चरणी साकडं

पंढरपूर, दि. 1 जुलै:- महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, श्री. तेजस ठाकरे उपस्थित होते.
श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरू झाली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि सौ. अनुसया बढे (मु.चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे जग, देश तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचे हे संकट लवकरात-लवकर दूर करून महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे. राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. त्यासाठी विकास प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे, असे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढरपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन श्री. ठाकरे यांनी भाविकांना केले. वारकरी सांप्रदायाने शासनाच्या वतीने वेळोवळी करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेस शासनाच्यावतीने पाच कोटी रुपयांचा अनुदानाचा धनादेश नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष साधना भोसले, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, शिवाजीराव मोरे, माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र भोसले, पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.

🙏श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन  🌺आषाढ शुद्ध एकादशी
01/07/2020

🙏श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
🌺आषाढ शुद्ध एकादशी

सोलापूर जिल्हा ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र कोरोना अपडेट
06/06/2020

सोलापूर जिल्हा ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र कोरोना अपडेट

04/06/2020

सोलापूर आजचा अहवाल
दि.04/06/20 सकाळी 8.00
आजचे तपासणी अहवाल - 261
पॉझिटिव्ह- 55 (पु. 38 * स्त्री-17 )
निगेटिव्ह- 206
आजची मृत संख्या- 0
एकूण पॉझिटिव्ह- 1135
एकूण निगेटिव्ह - 6986
एकुण चाचणी- 8121
एकूण मृत्यू- 94
एकूण बरे रूग्ण- 469

दि.03/06/2020सोलापूर जिल्हा कोरोना अपडेट
03/06/2020

दि.03/06/2020

सोलापूर जिल्हा कोरोना अपडेट

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करासर्वपक्षीय बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहनसोलापूर, दि.3 - ...
03/06/2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करा

सर्वपक्षीय बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

सोलापूर, दि.3 - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभागातील व परिसरातील नागरिकांना लोकप्रतिनिधींनी घरी राहण्याच्या सूचना द्याव्यात. शासनाच्या सूचनांचे पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे. सकारात्मक भूमिका ठेवून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सर्वपक्षीय बैठकीत केले.

पालकमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पोलीस उपायुक्त बापू बांगर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. कोविड, नॉन कोविड रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यासंदर्भात शासनाच्या, महानगरपालिकेच्या व खासगी दवाखान्यांमध्ये सोय करण्यात आली आहे. आता कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. या संकटकाळात शासन नागरिकांसोबत आहे. सर्व खबरदारी व उपाययोजना केल्या जात आहेत. उपचारासाठी, उपायोजनासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद करण्यात आली आहे.

यावेळी माजी आमदार नरसय्या आडम, गुरुशांत धुत्तरगावकर,राजाभाऊ सरवदे, महेश कोठे, राजाभाऊ इंगळे, श्रीनिवास करली, कामिनी आडम, आनंद चंदनशिवे, मनोहर सपाटे, गणेश पुजारी, जुबेर भगवान, प्रशांत इंगळे आदींनी विविध सूचना मांडल्या. या सर्व सूचनांचे शासनाकडून निश्चितच दखल घेण्यात येत असल्याची ग्वाही पालकमंत्री भरणे यांनी दिली.

विडी उद्योगाबाबत

सकारात्मक निर्णय

सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात असलेला विडी उद्योग सुरू करण्यासंदर्भात येत्या दहा-पंधरा दिवसानंतर सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिली. विडी उद्योग करण्यासंदर्भात विडी उद्योग प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी माजी आमदार नरसय्या आडम यांनी विडी कामगारांच्या समस्या सांगितल्या. कारखानदारांनी विडी कामगारांना ॲडव्हान्स स्वरूपात मदत करण्यासंदर्भात सूचना पालकमंत्री भरणे यांनी केल्या. सोलापुरातील कोरोना परिस्थिती पाहून शासनाच्या निकषानुसार विडी उद्योग सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेऊ असे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.

अलिबाग येथे पुनर्वसनाचे काम लगेच चालू.
03/06/2020

अलिबाग येथे पुनर्वसनाचे काम लगेच चालू.

  | कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाचा प्रभाव, वाऱ्याचा वेग (ताशी किमी)गोवा - 33, रत्नागिरी - 33, हर्णे -26, कुलाबा 33, सांत...
03/06/2020

| कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाचा प्रभाव, वाऱ्याचा वेग (ताशी किमी)
गोवा - 33, रत्नागिरी - 33, हर्णे -26, कुलाबा 33, सांताक्रुझ 09, डहाणू 07 ताशी किमी
पाऊस (मिमीमध्ये) - 2 जूनपासून
गोवा - 74, रत्नागिरी - 20, हर्णे -13, कुलाबा 37, सांताक्रुझ 21, डहाणू 04 मिमी

02/06/2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ वा. महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करणार CMOMaharashtra

दि.01/06/2020सोलापूर जिल्हा कोरोना अपडेट
01/06/2020

दि.01/06/2020

सोलापूर जिल्हा कोरोना अपडेट

दि.31/05/2020सोलापूर जिल्हा कोरोना अपडेट
31/05/2020

दि.31/05/2020

सोलापूर जिल्हा कोरोना अपडेट

दि.30/05/2020सोलापूर जिल्हा कोरोना अपडेट
30/05/2020

दि.30/05/2020

सोलापूर जिल्हा कोरोना अपडेट

30/05/2020

केंद्र सरकार कडून लॉकडाउन 5 ची घोषणा..
देशातला लॉकडाउन ून पर्यंत वाढवण्यात आला..

30/05/2020

Address

Pandharpur
413304

Alerts

Be the first to know and let us send you an email when Apla Pandharpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Apla Pandharpur:

Videos

Share

Nearby media companies