Priyanka Misal

Priyanka Misal Simple and Cute Marathi Mulgi. Dream to make a 500k facebook family.

तु हसला तर ते जळतील, तु रडला तर ते हसतील, काही नवं केलं तर पाप म्हणतील जुन्यात अडकुन राहीला तर श्राप म्हणतील, गमावलं तर ...
15/12/2024

तु हसला तर ते जळतील,
तु रडला तर ते हसतील,
काही नवं केलं तर पाप म्हणतील
जुन्यात अडकुन राहीला तर श्राप म्हणतील,
गमावलं तर दलिंद्री म्हणतील,
कमावलं तर माज म्हणतील,
पुढे निघाला तर मागे ओढतील येतील,
मागे राहीला तर तुडवतील,
तु हात दिला तर साथ म्हणतील,
तु तुझा विचार केला तर स्वार्थ म्हणतील,
कौतुक केलं तर वाह म्हणतील,
उणीव दाखवली तर जा..
म्हणतील, काही केलं तर.. काय केलं?
म्हणतील, नाही केलं तरी.. काय केलं म्हणतील ??

म्हणुन...
तु जग तुला हवं तसं मित्रा..
जगाच काय ???
ते काहीही म्हणतील....

गेले अनेक दिवस ती नुसतीच नजर देत होती आज मात्र अचानक हसली गर्दीतून वाट काढत शेजारी येऊन बसली म्हणाली, नाऊ डोंट वरी, उद्य...
15/12/2024

गेले अनेक दिवस ती नुसतीच नजर देत होती
आज मात्र अचानक हसली गर्दीतून वाट काढत
शेजारी येऊन बसली म्हणाली, नाऊ डोंट वरी,
उद्या दुपारचा ये घरी.

तिच्या घरची दुपार मस्त गेली
मी फस्त केली तिनं माझ्या गळ्यात हात टाकले
तिचे ओठ माझ्या ओठांशी वाकले आणि म्हणाली,
एक प्रश्न मिटला, चुटकीसरशी सुटला

तिनं शिजवलेली कोंबडी तुझं टक लावून रोज पाहणं मला काही रुचत नव्हतं.
आणि बर्ड फ्लू झालेल्या कोंबडीचं काय करावं, तेही सुचत नव्हतं

मैत्री मध्ये ना खर ना खोट असत मैत्री मध्ये ना माझ ना तूझ असत ! कुठल्या हि पारड्यात तिला तोला मैत्रीचं पारड नेहमी जडच असत...
15/12/2024

मैत्री मध्ये ना खर ना खोट असत
मैत्री मध्ये ना माझ ना तूझ असत !

कुठल्या हि पारड्यात तिला तोला
मैत्रीचं पारड नेहमी जडच असत !!

मैत्री श्रीमंत किंवा गरीब नसते
मैत्री सुंदर किवा कुरूप नसते
कुठल्याहि क्षणी पहा मैत्री
फक्त मैत्रीच असते!!!

रक्ताच्या नात्याचं मला काही माहित नाही
पण मैत्रीच्या नात्या मध्ये प्राण असतो..!!!

म्हणून कदाचित रक्ताची नाती मरतात
पण मैत्रीची नाती सदैव टिकतात.

विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही....!!पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही...!!छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन ...
15/12/2024

विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही....!!

पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही...!!

छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी....!!

अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही....!!

माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे....!!

जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही....!!

रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर....!!

डोळ्यांत जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही....!!

येतील वादळे,
खेटेल तुफान तरी वाट चालतो..!!

अडथळ्यांना घाबरून अडखळणे,
पावलांना पसंत नाही....!!

कवी - सुरेश भट

आयुष्यात असं एक नातं असावं दिसण्यावर नाही मनावर प्रेम करणार... जगाला दाखवण्यासाठी नाही, आपल्या दोघात जग निर्माण करणारं.....
14/12/2024

आयुष्यात असं एक नातं असावं
दिसण्यावर नाही मनावर प्रेम करणार...

जगाला दाखवण्यासाठी नाही,
आपल्या दोघात जग निर्माण करणारं...

आयुष्यात असं एक नातं असावं

कितीही भांडणं झाली तरी साथ न सोडणारं...
आपली मनापासून विचारपूस करून,
आपली काळजी करणारं...

आयुष्यात असं एक नातं असावं
एक उदास असताना दुसऱ्याने ते न सांगताच
ओळखनार...

डोळ्यात न दिसणार पाणी मनातल्या नजरेने अलगद टिपणारे...

आयुष्यात असं एक नातं असावं

म्हणे नाती खूप अनमोल असतात जितकी मजबूत बनतात तितकीच लवकर तुटत असतातखरचं ही नाती अतूट असतात का....?जातांना म्हणालीस विसर ...
14/12/2024

म्हणे नाती खूप अनमोल असतात
जितकी मजबूत बनतात
तितकीच लवकर तुटत असतात

खरचं ही नाती अतूट असतात का....?

जातांना म्हणालीस विसर मला
जमलेच तर आता सावर स्वतःला
खरचं विसरणे सोपे असेल तर.....
मी खरचं तुला विसरु शकेन का ?

आज संपवतो आहे स्वतःला
एक नवे आयुष्य जगण्यासाठी
जगलो होतो ते नाते जपण्यासाठी
खरचं मी तुझ्याशिवाय जगू शकेन का ?

लिहीलेल्या तुझ्याचसाठी
अशा अनेक कविता
आज धूळ खात पडल्या आहेत......

कदाचित तू त्या वाचल्या असशील
कदाचित नसशील ही.....
मज आता नाही चिंता

खरचं ही नाती अतूट असतात का....?

कुणीतरी हवं असतं जीवनात साथ देणारं हात हातात घेऊन शब्दाशिवाय बोलणारं कुणीतरी हवं असतं जिवाला जीव देणारं.....!!फुलातल्या ...
14/12/2024

कुणीतरी हवं असतं जीवनात साथ देणारं
हात हातात घेऊन शब्दाशिवाय बोलणारं
कुणीतरी हवं असतं जिवाला जीव देणारं.....!!

फुलातल्या सुगंधासारखे आयुष्य जपनारं
कुणीतरी हवं असतं हक्काने रागावणारं
चुका झाल्या तरी मायेनं समजावणारं.....!!

कुणीतरी हवं असं मनापासून धीर देणारं
स्वताःच्या दुःखातही मला सामावून घेणारं.....!!

कुणीतरी हवं असतं मला समजून घेणारं
आयुष्याच्या वाटेवर साथ देशील का विचारणारं.....!!

हेही असेच होते, तेही तसेच होते आपापल्या ठिकाणी सारे असेच होते !केले न बंड कोणी.. त्या घोषणाच होत्या! ज्यांनी उठाव केला त...
14/12/2024

हेही असेच होते,
तेही तसेच होते
आपापल्या ठिकाणी
सारे असेच होते !

केले न बंड कोणी..
त्या घोषणाच होत्या!
ज्यांनी उठाव केला
तेही आपलेच होते !

आला न गंध त्यांना
केव्हाच चंदनाचा..
सारे उगाळलेले ते
कोळसेच होते !

तू भेटलीस तेव्हा
मी बोललोच नाही!
तू भेटतेस तेव्हा
माझे असेच होते !

होती न ती दयाही..
ती जाहिरात होती!
जे प्रेम वाटले ते
माझे हसेच होते !

झाला उशीर जेव्हा
हाका तुला दिल्या मी.
मातीत पावलांचे
काही ठसेच होते!

हेही असेच होते,
तेही तसेच होते
आपापल्या ठिकाणी
सारे असेच होते !

किती मांडावे स्वःताला किती द्याव्या शब्दांना वाटा शब्द संपले, विरुन गेले ना कळले स्वःतालाआले प्रश्न निघुनी गेले पाहुनी उ...
14/12/2024

किती मांडावे स्वःताला
किती द्याव्या शब्दांना वाटा
शब्द संपले, विरुन गेले
ना कळले स्वःताला

आले प्रश्न निघुनी गेले
पाहुनी उत्तराची वाट
वाटेतुन चालताना दिली
शब्दांनी साथ

आयुष्य सरेल उरतील कोडे
कोड्यांत दडले आयुष्य
शोधुनी बघितला भुत आणि भविष्य
रांगेत उभा वर्तमान

काळाच्या या ओघाने
भुत पडला उघडा
भविष्याने कोडे रचिले
वर्तमान बोलला

मैत्री मध्ये ना खर ना खोट असत मैत्री मध्ये ना माझ ना तूझ असत ! कुठल्या हि पारड्यात तिला तोला मैत्रीचं पारड नेहमी जडच असत...
13/12/2024

मैत्री मध्ये ना खर ना खोट असत
मैत्री मध्ये ना माझ ना तूझ असत !
कुठल्या हि पारड्यात तिला तोला
मैत्रीचं पारड नेहमी जडच असत !!

मैत्री श्रीमंत किंवा गरीब नसते
मैत्री सुंदर किवा कुरूप नसते
कुठल्याहि क्षणी पहा
मैत्री फक्त मैत्रीच असते!!!

रक्ताच्या नात्याचं मला काही माहित नाही
पण मैत्रीच्या नात्यामध्ये प्राण असतं..!!!

म्हणून कदाचित रक्ताची नाती मरतात
पण मैत्रीची नाती सदैव टिकतात.

कुणाचेच नसतात हक्क कुणावर पण. तरीही डोळे भरतातच ना ?मुळात अपेक्षाच करु नये पण. तरीही आस लागतेच ना ? हिशोब मांडायचा सारा ...
13/12/2024

कुणाचेच नसतात हक्क कुणावर पण.
तरीही डोळे भरतातच ना ?

मुळात अपेक्षाच करु नये पण.
तरीही आस लागतेच ना ?

हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी,
तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना.?

लाख झाला असेल मनाचा दगड
पण तरीही आठवणींनी त्याला पाझर फुटतोच ना.?

जोडलेली नाती तुटताना मनात वेदना होतातच ना.?
या सगळ्यातनं हाती उरायचे असते फक्त एक शून्य पण, तरीही जीव जडतातच ना.?

तुझं सोबत असणं, तप्त उन्हातल्या सांवली सारखं होतं,वसंतातल्या अलवार फुलणाऱ्या गुलमोहरा सारखं होतं,शरदातल्या हरित तृणपात्य...
13/12/2024

तुझं सोबत असणं,
तप्त उन्हातल्या सांवली सारखं होतं,
वसंतातल्या अलवार फुलणाऱ्या गुलमोहरा सारखं होतं,
शरदातल्या हरित तृणपात्याच्या गारव्या सारखं होतं,
खळखळणाऱ्या फेसाळ
जलधारांच्या धबधब्या सारखं होतं,
आज फक्त तुझ्या आठवणीतील आठव,
कोऱ्या कागदावर लिहुन वाचण्या सारखं होतं,

कवी - मंमल तानाजी पाटील (तासगांव)

कुणीतरी हवं असतं जीवनात साथ देणारं हात हातात घेऊन शब्दाशिवाय बोलणारं कुणीतरी हवं असतं जिवाला जीव देणारंफुलातल्या सुगंधास...
13/12/2024

कुणीतरी हवं असतं जीवनात साथ देणारं
हात हातात घेऊन शब्दाशिवाय बोलणारं
कुणीतरी हवं असतं जिवाला जीव देणारं

फुलातल्या सुगंधासारखे आयुष्य जपनारं
कुणीतरी हवं असतं हक्काने रागावणारं
चुका झाल्या तरी मायेनं समजावणारं

कुणीतरी हवं असं मनापासून धीर देणारं
स्वताःच्या दुःखातही मला सामावून घेणारं

कुणीतरी हवं असतं मला समजून घेणारं
आयुष्याच्या वाटेवर साथ देशील का विचारणारं.....!!

कितीही मारले मन तरी ते मरत नसते आशेच्या फांदीवर ते कुठेतरी झुलत असतेमनाचे मरणे असते की भावनांचे जगणे??प्रत्येक क्षणी फक्...
13/12/2024

कितीही मारले मन तरी ते मरत नसते
आशेच्या फांदीवर ते कुठेतरी झुलत असते

मनाचे मरणे असते की भावनांचे जगणे??
प्रत्येक क्षणी फक्त स्वतःचे उरणे असते

जीवनात आनंद असा कितीवेळ टिकतो??
पाण्याने भरलेल्या ओंजळीत शेवटी ओलावाच राहतो

आस कशाची करायची? मनाच्या रखरखत्या तव्यावर आठवणींची पोळी भाजायची

आभाळ भरून येते तसे कधी कधी मनही भरून येते मेलेल्या मनावर जणु आशेची नवीन पालवी फुटते

कितीही मारले मन तरी ते मरत नसते आशेच्या फांदीवर ते कुठेतरी झुलत असते..

कवी - सौ नीलम निकम

असा पार्टनर प्रत्येक व्यक्तीला हवाहवासा वाटतो. जो उपदेश करणार नाही पण साथ देईल. जो उणिवा दाखवून देईल पण दोष देणार नाही. ...
13/12/2024

असा पार्टनर प्रत्येक व्यक्तीला हवाहवासा वाटतो.
जो उपदेश करणार नाही पण साथ देईल.
जो उणिवा दाखवून देईल पण दोष देणार नाही.
कौतुक करेल पण अहंकार फुलवणार नाही.
भेटेल असा पार्टनर ?
पण असं भेटेल का म्हणून ?
आपणच का नाही तसं व्हायचं ?
कुणासाठी तरी अशा स्वरुपाचा पार्टनर ?
किती कठीण आहे आणि सोपंही.

कवी - व. पू. काळे
संकलन : प्रशांत साळवे

जीवनातील नाती जपायची वेगळीच मजा असते. फक्त ती नाती जपतांना.. थोडी काळजी घ्यायची असते..!ताई, आत्या, काकू, मावशी.. काका, म...
13/12/2024

जीवनातील नाती जपायची
वेगळीच मजा असते.
फक्त ती नाती जपतांना..
थोडी काळजी घ्यायची असते..!

ताई, आत्या, काकू, मावशी..
काका, मामा, दादा, भाऊ
ओढ लावणारे हे शब्द..
ह्या शब्दांनीच तर् आपुलकीचे
नाते तयार होत असते.
फक्त ती नाती जपतांना
थोडी काळजी घ्यायची असते..!

दैनंदिन जीवन जगतांना
रुसून, फुगण, नाक मुरडन
हे तस चालायचच..

प्लेन जीवन जगण्यात
जेवढी मजा नसते..
तेवढी मजा आपल्या माणसाला
थोड रुसवून Sorry, Thanks
म्हणण्यात असते.
मात्र त्या नात्याला
विश्वासाची गरज असते.

जीवनातील नाती जपायची
वेगळीच मजा असते
फक्त ती नाती जपतांना
थोडी काळजी घ्यायची असते..!!

कवी - सौ. रजनी भुरे

विसाव्याच्या क्षणी हवाहवासा सहवास तू केसात माळलेल्या मोगऱ्याचा वास तू भाळावर मिरवावे अश्या कुंकवाची आरास तू मंगळसुत्राच्...
13/12/2024

विसाव्याच्या क्षणी हवाहवासा
सहवास तू
केसात माळलेल्या मोगऱ्याचा
वास तू
भाळावर मिरवावे अश्या कुंकवाची
आरास तू
मंगळसुत्राच्या मण्यात गोवलेला सौभाग्याचा
ध्यास तू
साता जन्माचे बंध जपावे असा
विश्वास तू....
अडखळेल प्राण शेवटी ज्याच्यासाठी तो
शेवटचा श्वास तू...

निस्वार्थपणे समोरच्या व्यक्तीला लावलेला जीव म्हणजे मैत्री...त्याच्याकडून काही भेटेल, हे न विचार करता त्याच्या एका smile ...
12/12/2024

निस्वार्थपणे समोरच्या व्यक्तीला
लावलेला जीव म्हणजे मैत्री...

त्याच्याकडून काही भेटेल,
हे न विचार करता त्याच्या
एका smile साठी काहीही करणे
म्हणजे मैत्री..

काही गोष्टी समजून घेणं
काही गोष्टी समजावून सांगणं
म्हणजे मैत्री...

न लपवता सर्व काही शेअर करणे
म्हणजे मैत्री....

कितीही भांडणं झाली तरी
Ego बाजूला ठेवून स्वतःहून
Sorry बोलणे म्हणजे मैत्री...

Address

Navi Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Priyanka Misal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Priyanka Misal:

Videos

Share