Nave Shahar

Nave Shahar ठाणे, नवी मुंबई, रायगड, उरण, खारघर येथील बातमी, जाहिरात पेपरमध्ये देण्यासाठी , आम्हाला संपर्क करा..

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून गत पाच वर्षात तब्बल ९५६५ व्यक्ती बेपत्ताअद्याप बेपत्ता असलेल्या १४८२ व्यक्तींचा ...
26/12/2023

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून गत पाच वर्षात तब्बल ९५६५ व्यक्ती बेपत्ता

अद्याप बेपत्ता असलेल्या १४८२ व्यक्तींचा शोध घेण्याचे नवी मुंबई पोलिसांसमोर आव्हान

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतुन २०१९ पासून नोव्हेंबर २०२३ या पाच वर्षाच्या कालावधीत एकूण ९५६५ व्यक्ती बेपत्ता झाल्याचे उघडकिस आले आहे. यात सर्वात जास्त ४४४३ महिलांची संख्या असून त्यांच्या खालोखाल ३५७७ पुरुष बेपत्ता झाले आहेत. त्याचप्रमाणे ११३७ मुली व ४०८ मुले देखील बेपत्ता झाले आहेत. २०१९ पासून अतापर्यंत बेपत्ता झालेल्या एकुण महिलांपैकी ३७३९ महिला तसेच २८७७ पुरुषांचा शोध लागला आहे. त्याचप्रमाणे १०८३ मुली व ३८७ मुलांचा देखील शोध लागला आहे. या आकडेवारीवरुन मागील पाच वर्षात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतुन बेपत्ता झालेल्यापैकी ७०४ महिला, ७०० पुरुष, ५६ मुली व २२ मुले अशा एकुण १४८२ व्यक्तीचा शोध लागलेला नाही. हि अतिशय गंभीर बाब असून बेपत्ता असलेल्या या १४८२ व्यक्तींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान नवी मुंबई पोलीस दलासमोर आहे.



Vashi,Koparkhairane,Ghansoli,Airoli,Turbhe,Nerul,kharghar,ulwe Nave Shahar Navi Mumbai Police - Zone 1 नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police Navi mumbai police आपली Navi Mumbai Navi Mumbai City

बेपत्ता असलेल्या या १४८२ व्यक्तींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान नवी मुंबई पोलीस दलासमोर

दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती विभागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईयापुढे सर्वच प्रभाग समिती क्षेत्रात टप्प्या...
26/12/2023

दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती विभागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

यापुढे सर्वच प्रभाग समिती क्षेत्रात टप्प्याटप्प्याने मोहीम

ठाणे : २५ डिसेंबर रोजी ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती विभागातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार महापालिका अतिक्रमण विभाग, परिमंडळ यांनी सदर कारवाई केली आहे.



Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Nave Shahar Thane Municipal Corporation Thane Kalwa Mumbra Diva Kalwa Thane Diva Thane Majivade, Thane thane Manpada Manpada Thane

यापुढे सर्वच प्रभाग समिती क्षेत्रात टप्प्याटप्प्याने मोहीम

टाकाऊपासून टिकाऊ संकल्पनेचा आकर्षक अविष्कारपुर्नप्रक्रियाकृत प्लास्टिक शीट, एकल वापर प्लास्टिक पासून निर्मिती नवी मुंबई ...
26/12/2023

टाकाऊपासून टिकाऊ संकल्पनेचा आकर्षक अविष्कार

पुर्नप्रक्रियाकृत प्लास्टिक शीट, एकल वापर प्लास्टिक पासून निर्मिती

नवी मुंबई : स्वच्छता आणि सुशोभिकरणाकडे प्राधान्याने लक्ष देणारी नवी मुंबई महापालिका नेहमीच स्वच्छताविषयक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यामध्ये आघाडीवर राहिलेली आहे. या पार्श्वभूमीवर एक अभिनव शौचालय टाकाऊतून टिकाऊ या संकल्पना अंतर्गत कोपरखैरणे सेक्टर-१४ मध्ये उभारण्यात आले असून, शासनाच्या निकषानुसार बनविण्यात आलेल्या या आकांक्षी शौचालयाचे (Aspirational Toilet) लोकार्पण महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.



Koperkhairane, Sec 4, Navi Mumbai Nave Shahar NMMC Navi Mumbai Municipal Corporation Koper Khairane Koperkhairane Navi Mumbai

पुर्नप्रक्रियाकृत प्लास्टिक शीट, एकल वापर प्लास्टिक पासून निर्मिती

पनवेल  महापालिकेचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनमहत्वाच्या गोष्टीचे पालन केल्यास कोविडचे संकट टाळता येणे शक्य पनवेल :...
26/12/2023

पनवेल महापालिकेचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

महत्वाच्या गोष्टीचे पालन केल्यास कोविडचे संकट टाळता येणे शक्य

पनवेल : देशातील काही भागात कोविडचा जेएन1 या नवीन विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली असली तरी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी नागरिकांना घाबरून न जाता जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.



Nave Shahar Panvel Municipal Corporation Covid 19 Panvel Municipal Corporation Kalamboli, Maharashtra, India PANVELKARS Panvel New Panvel

महत्वाच्या गोष्टीचे पालन केल्यास कोविडचे संकट टाळता येणे शक्य

देश-विदेशातील ५ हजार मासे पाहण्यासाठी गर्दीखारघर जिमखाना स्पोर्ट्‌स असोसिएशन तर्फे आयोजनखारघर : खारघर जिमखाना स्पोर्ट्‌स...
26/12/2023

देश-विदेशातील ५ हजार मासे पाहण्यासाठी गर्दी

खारघर जिमखाना स्पोर्ट्‌स असोसिएशन तर्फे आयोजन

खारघर : खारघर जिमखाना स्पोर्ट्‌स असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या खारघर महोत्सव मध्ये देश-विदेशातील विविध प्रकारचे ५ हजार मासळीच्या विहंगम दृश्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेता परेश ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ‘खारघर जिमखाना स्पोर्ट्‌स असोसिएशन'चे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर, माजी उपसरपंच संतोष गायकर, भाजप पदाधिकारी नितेश पाटील, सचिन वास्कर यांच्यासह इतर भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.



Paresh Thakur Sachin Vaskar Gurunath Gaikar Nave Shahar Bjp- kharghar BJP Kharghar Gharkul Mahalaxmi Complex KHARGHAR GYMKHANA SPORTS ASSOCIATION

खारघर जिमखाना स्पोर्ट्‌स असोसिएशन तर्फे आयोजन

मोबाईल जणू ‘जीव की प्राण'मोबाईलच्या व्यसनामुळे कित्येकांना आपले प्राण गमावे लागतात. तरी तरुणाईच डोके जागेवर येईना. मोबाई...
26/12/2023

मोबाईल जणू ‘जीव की प्राण'

मोबाईलच्या व्यसनामुळे कित्येकांना आपले प्राण गमावे लागतात. तरी तरुणाईच डोके जागेवर येईना. मोबाईल जणू ‘जीव की प्राण' झाला आहे. टीव्ही पाहताना, जेवण करताना देखील मोबाईल चालू असतो. फेसबुक, व्हाट्‌सअप, इंस्टाग्राममुळे तर सर्वच वेडावले आहेत. त्यांना स्वतःचे भान राहत नाही. ‘अन्न परब्रम्ह' असे म्हणतात. पूर्ण लक्ष देऊन, एकाग्रतेने स्वच्छ होऊन जेवण करावे असे म्हणतात तरचं ते अंगी लागतं; पण यांना ते कोण सांगणार?



आपला कोपरखैराणे / Koparkhairane Nave Shahar मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय वाशी नवी Marathi Sahitya Sanskriti and Kala Mandir मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ , नवी मुंबई Rajendra Gopinath Gharat Thane Nagar Wachan Mandir Tembhi Naka Mumbai Marathi Granth Sangrahlaya

मोबाईलच्या व्यसनामुळे कित्येकांना आपले प्राण गमवावे लागतात.

मना सज्जना नियमित लेखमाला - आसावरी भोईरहे सज्जन मना..माझे हीत करमूळ परब्रह्म हे निराकार आहे. त्याचे ध्यान करणे सोपे नाही...
26/12/2023

मना सज्जना नियमित लेखमाला - आसावरी भोईर

हे सज्जन मना..माझे हीत कर
मूळ परब्रह्म हे निराकार आहे. त्याचे ध्यान करणे सोपे नाही. म्हणून सगुण साकार भगवंताचे, श्रीरामाचे आलंबन समर्थांनी दिले आहे. हनुमंताने जसे सतत श्रीरामाचे स्मरण केले तसेच आपणही करावे हे समर्थांचे सांगणे आहे.

.

Nave Shahar Rajendra Gopinath Gharat मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ , नवी मुंबई मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय वाशी नवी Marathi Sahitya Sanskriti and Kala Mandir Thane Nagar Wachan Mandir Tembhi Naka Mumbai Marathi Granth Sangrahlaya

नियमित लेखमाला

निष्ठा, सेवा, माणुसकीचा वसाआनंदवन नि हेमलकसामहामानव बाबांचे आनंदवन आणि महात्मा डॉ.प्रकाशजींचे ठलोक बिरादारी प्रकल्प येथे...
26/12/2023

निष्ठा, सेवा, माणुसकीचा वसा

आनंदवन नि हेमलकसा

महामानव बाबांचे आनंदवन आणि महात्मा डॉ.प्रकाशजींचे ठलोक बिरादारी प्रकल्प येथे प्रत्येक माणसाने निदान एकदातरी भेट द्यायला हवी. म्हणजे आपल्यासारख्याच माणसाने एखादे कार्य श्रद्धेने, निष्ठेने, निस्वार्थीपणे आणि दुसऱ्याच्या कल्याणासाठी करायचे ठरवले तर तो माणूस काय चमत्कार करू शकतो हे कळून येईल. हे माझे, ते माझे, हे मी केले, ते मी केले असे प्रौढीने बोलणारे आपण या आभाळाच्या उंचीच्या माणसांकडे बघताना आपल्याला आपल्या खुजेपणाची जाणीव होते.



Dr Prakash Amte Dr. Prakash Baba Amte Dr. Vikas Baba Amte DrVikas Baba Amte Manmohan Roge मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ , नवी मुंबई Marathi Sahitya Sanskriti and Kala Mandal Nave Shahar Thane Nagar Vachan Mandir Mumbai Marathi Granth Sangrahlaya

हेमलकसा येथे आदिवासींच्या कल्याणाकरिता लोक बिरादारी प्रकल्प

राष्ट्रवादी आणि शिवसेना तर्फे नेरुळ, वाशी पोलिसांकडे  तक्रारआक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुध्द कारवाई करण्याची मागणीवाशी ...
25/12/2023

राष्ट्रवादी आणि शिवसेना तर्फे नेरुळ, वाशी पोलिसांकडे तक्रार

आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुध्द कारवाई करण्याची मागणी

वाशी : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आमदार रोहित पवार यांच्या विरोधात अर्वाच्य भाषेमध्ये फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विशाल गोरडे या विकृत व्यवतीविरुध्द तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकात पाटील तसेच शिवसेना (उबाठा) नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आणि द्वारकानाथ भोईर यांनी पोलिसांकडे केली आहे.



Dwarkanath Bhoir Shivsena Navi Mumbai Navi Mumbai NCP Navi mumbai NCP Raghunath Gole Navi Mumbai Ncp Nave Shahar

आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुध्द कारवाई करण्याची मागणी

पनवेलकर मोठ्या संख्येने उपस्थित प्रितम म्हात्रे यांनी दिल्या कलाकारांना शुभेच्छा!नवीन पनवेल : पनवेल मध्ये रोटरी क्लबच्या...
25/12/2023

पनवेलकर मोठ्या संख्येने उपस्थित

प्रितम म्हात्रे यांनी दिल्या कलाकारांना शुभेच्छा!

नवीन पनवेल : पनवेल मध्ये रोटरी क्लबच्या माध्यमातून गेली 26 वर्षे पनवेल फेस्टिवलचे आयोजन करण्यात येत आहे. "पनवेल फेस्टिवल 2023" पनवेल येथे सुरू झाले आहे. पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी फेस्टिवलला भेट दिली. फेस्टिवल मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते ते पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कलाश्रुती अकॅडमी च्या माध्यमातून पनवेलच्या वृषाली पाटकर यांच्या नियोजनात पनवेल मधील कलाकारांनी "धरोहर" पहचान भारत के इतिहास की या नृत्यअविष्काराचे सुंदररीत्या सादरीकरण केले. यात भारतातील विविधतेने नटलेल्या आपल्या रूढी, परंपरा आणि एकात्मता आपल्या कलेतून उत्तम प्रकारे सादर केले. फेस्टिवल मध्ये शेकडो प्रकारचे स्टॉल आहेत तेथील विविध स्टॉल्सला त्यांनी भेट दिली. त्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तू आणि चविष्ट खाद्यपदार्थ यांचा त्यांनी आस्वाद घेतला.



Shirish Pimpalkar Nave Shahar Rotary Club Of Panvel Rotary Club of Panvel Panvel Municipal Corporation Shekap Panvel Municipal Corporation Shetkari Kamgar Paksh Panvel

पनवेलकर मोठ्या संख्येने उपस्थित

विद्या उत्कर्ष मंडळाच्या प्राथमिक विद्यामंदिराचा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम संपन्ननवी मुंबई आंतरशालेय समुह नृत्य स्प...
25/12/2023

विद्या उत्कर्ष मंडळाच्या प्राथमिक विद्यामंदिराचा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई आंतरशालेय समुह नृत्य स्पर्धा संपन्न

नवी मुंबई : बेलापूर येथील विद्याउत्कर्ष मंडळ या शैक्षणिक संकुलात गत शुक्रवारी पार पडलेल्या नवी मुंबई आंतरशालेय समुह नृत्य स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम विद्यादीप कोपरखैरणे, द्वितीय विद्याभवन नेरुळ तृतीय प्राथमिक विद्यामंदिर बेलापूर, उत्तेजनार्थ न्यू बॉम्बे स्कूल घणसोली व माध्यमिक गटात प्रथम क्रमांक विद्याभवन नेरुळ, द्वितीय न्यू बॉम्बे सिटी स्कूल घणसोली, तृतीय विद्याप्रसारक हायस्कूल बेलापूर, उत्तेजनार्थ शिक्षण प्रसारक नेरुळ या शाळांनी पटकावला.

'

Vidya Prasarak High School and Junior College Belapur Vidyaprasarak High School Vidya Utkarsh Mandals English Medium Belapur New Bombay City School, Ghansoli, Navi Mumbai - 400701 Friends Nave Shahar Vidya Bhawan School Sector 18 nerul navi Mumbai P.V.G Vidya Bhavan Nerul

नवी मुंबई आंतरशालेय समुह नृत्य स्पर्धा संपन्न

अधिवेशन संपताच पुन्हा एकदा ‘हुक्का पार्लर' मधून धुराचे लोट?अंमली पदार्थ व्यवसाय, ऑर्केस्ट्रा बार तेजीतवाशी : नवी मुंबई श...
25/12/2023

अधिवेशन संपताच पुन्हा एकदा ‘हुक्का पार्लर' मधून धुराचे लोट?

अंमली पदार्थ व्यवसाय, ऑर्केस्ट्रा बार तेजीत

वाशी : नवी मुंबई शहरातील अवैध व्यवसायांचा आवाज नुकताच नागपूर येथे ७ ते २० डिसेंबर २०२३ दरम्यान झालेल्या राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात घुमला होता. तर ‘हुक्का पार्लर'चा प्रश्न अधिवेशनात येणार म्हणून नवी मुंबई शहरातील हुक्का पार्लर, पब आणि ऑर्केस्ट्रा बार यांवर पोलिसांनी अंकुश ठेवला होता. मात्र, राज्य विधीमंडळाचे अधिवेशनात संपताच नवी मुंबई शहरातील अवैध व्यवसायांवर घातलेली वेसण सैल केल्याने हुक्का पार्लर मधून धुरांचे लोट पुन्हा एकदा सुरु झाले आहेत.



APMC Police Station Navi Mumbai City नवी मुंबई शहर Navi Mumbai City (New Mumbai) Nave Shahar Vashi,Koparkhairane,Ghansoli,Airoli,Turbhe,Nerul,kharghar,ulwe APMC Market Vashi Turbhe Turbhe Store

अंमली पदार्थ व्यवसाय, ऑर्केस्ट्रा बार तेजीत

छावा प्रतिष्ठान, नवी मुंबईच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण संपन्नछावा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमास नामवंतांची उपस्थितीन...
25/12/2023

छावा प्रतिष्ठान, नवी मुंबईच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण संपन्न

छावा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमास नामवंतांची उपस्थिती

नवी मुंबई : छावा प्रतिष्ठान, छावा शिवकालीन बहुउद्देशिय कलामंच, नवी मुंबई या संस्थेच्या पुढाकाराने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद अमित गडांकुश यांच्या मार्गदर्शनाखाली २२ डिसेंबर रोजी वाशी सेवटर ६ येथील साहित्य मंदिर सभागृहात छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार २०२३ व इंडियन नॅशनल अवार्ड २०२३ पुरस्कार वितरणाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता.



Chhava Pratishthan Amit Gadankush Rajendra Gopinath Gharat Sandeep Naik Nave Shahar Balraj Mane

छावा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमास नामवंतांची उपस्थिती

विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून ध्वनी प्रदूषण टाळण्याचे वाहन चालकांना केले आवाहन वाहन प्रदूषणबाबत जनजागृतीला सुर...
25/12/2023

विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून ध्वनी प्रदूषण टाळण्याचे वाहन चालकांना केले आवाहन

वाहन प्रदूषणबाबत जनजागृतीला सुरुवात

नवी मुंबई : महापे वाहतूक शाखेने महापे गांव येथील महानगरपालिका माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करून वाहन प्रदूषणबाबत जनजागृतीला सुरुवात केली आहे. या कार्यक्रमांतर्गत महापालिका शाळेतील नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी पथनाट्यच्या माध्यमातून पियुसी काढण्याचे तसेच वाहन चालकांनी अनावश्यक हॉर्न न वाजवता ध्वनी प्रदूषण टाळण्याचे आवाहन केले.



Nmmc School No 40 Mahape Nmmc Secondary School Mahape Nmmc School Mahape Gaon Navi Mumbai Traffic Police Navi Mumbai Police Traffic Branch Nave Shahar

वाहन प्रदूषणबाबत जनजागृतीला सुरुवात

चोरी केलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यशआरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगीनवी मुंबई : नातेवाईकांच्या घरी पाहुणा...
25/12/2023

चोरी केलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश

आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

नवी मुंबई : नातेवाईकांच्या घरी पाहुणा म्हणून जाऊन संधी साधून त्यांच्या घरातील दागिने चोरणाऱ्या ओंकार साळवी (वय-२९) या तरुणाला रबाळे पोलिसांनी रत्नागिरी येथून अटक केली आहे. ओंकार साळवी याने ऐरोली येथील त्याच्या नातेवाईकांच्या घरी पाहुणचार घेऊन त्यांच्या घरातील तब्बल १७ लाख ५० हजार रुपये किमतीचे ३५ तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करुन पलायन केले होते. त्यानंतर ओंकार साळवी याने सदर दागिने चिपळूण मधील दोन फायनान्समध्ये तारण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज घेतले होते. पोलिसांनी ओंकार साळवी याने चोरलेले सर्व दागिने हस्तगत केले आहेत.



Rabale police station, Navi Mumbai Rabale Midc Police Station Nave Shahar Vashi,Koparkhairane,Ghansoli,Airoli,Turbhe,Nerul,kharghar,ulwe Airoli Navi Mumbai Airolicity.in

आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

पावणेतील  त्या धोकादायक वीज वाहिन्या बदलल्या या ठिकाणी वीज वाहिन्या खाली पडण्याच्या घटना नवी मुंबई : पावणे एम आय डी सी  ...
25/12/2023

पावणेतील त्या धोकादायक वीज वाहिन्या बदलल्या

या ठिकाणी वीज वाहिन्या खाली पडण्याच्या घटना

नवी मुंबई : पावणे एम आय डी सी परिसरात वीज वाहिन्या जीर्ण होऊन त्या पाडण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे येथील वीज वाहिन्या बदलण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर महावितरणला जाग आली असून येथील वीज वाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात आल्याने येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.



Midc Pawane Midc Tic Pawane Nevi Mumbai ALOK company Mahavitran Nave Shahar आपली Navi Mumbai

या ठिकाणी वीज वाहिन्या खाली पडण्याच्या घटना

सीआरझेड क्षेत्रावर उभारल्या जाणा-या बालाजी मंदिराला एमसीझेडएमएची  मंजूरीग्रीन्सचा उद्रेक             Nave Shahar Nationa...
25/12/2023

सीआरझेड क्षेत्रावर उभारल्या जाणा-या बालाजी मंदिराला एमसीझेडएमएची मंजूरी

ग्रीन्सचा उद्रेक



Nave Shahar National Green Tribunal CIDCO CIDCO National Green Tribunal - NGT Reporter National Green Tribunal - NGT Reporter

ग्रीन्सचा उद्रेक

नवी मुंबई जिल्हा महिला मोर्चा कार्यकारणी जाहीरसर्व महिलांना जिल्हाध्यक्षांचे मोलाचे मार्गदर्शननवी मुंबई : महाराष्ट्र भाज...
25/12/2023

नवी मुंबई जिल्हा महिला मोर्चा कार्यकारणी जाहीर

सर्व महिलांना जिल्हाध्यक्षांचे मोलाचे मार्गदर्शन

नवी मुंबई : महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ चित्रा वाघ तसेच जिल्हाध्यक्ष संदीप गणेश नाईक साहेब यांच्या मान्यतेने नवी मुंबई जिल्हा महिला मोर्चा कार्यकारणी जाहीर करण्यात आली.



Sandeep Naik Chandrashekhar Bawankule Nave Shahar Chitra Wagh Madhuri Sutar BJP Navi Mumbai BJP Media Navi Mumbai BJP Navi Mumbai

सर्व महिलांना जिल्हाध्यक्षांचे मोलाचे मार्गदर्शन

"सुखाची उधळण!मेरी ख्रिसमस!तुम्हाला व कुटुंबियांनाख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा" प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजेच ख्रिस...
25/12/2023

"सुखाची उधळण!
मेरी ख्रिसमस!
तुम्हाला व कुटुंबियांना
ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा"

प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजेच ख्रिसमस अर्थात नाताळ हा सण ख्रिश्चन बांधवांचा महत्त्वाचा सण आहे. ख्रिसमस या सणामुळेच सरत्या वर्षाचा शेवट हा गोड होत असतो. त्यामुळे हा सणाला महत्त्व प्राप्त झाला आहे.



@bjp_maharastra Maharashtra Pradesh Congress Sevadal ShivSena Maharashtra

‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ भारतात दरवर्षी 24 डिसेंबरला ‘National Consumer Day’ अर्थात ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा केला जातो...
24/12/2023

‘राष्ट्रीय ग्राहक दिन’

भारतात दरवर्षी 24 डिसेंबरला ‘National Consumer Day’ अर्थात ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा केला जातो. 1986मध्ये आजच्याच दिवशी ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला.
या संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले आहेत.

१) सुरक्षेचा हक्क २) माहितीचा हक्क ३) निवड करण्याचा अधिकार ४) म्हणणे मांडण्याचा हक्क
5) तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क ६) ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार

.

‘राष्ट्रीय ग्राहक दिन’भारतात दरवर्षी 24 डिसेंबरला ‘National Consumer Day’ अर्थात ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा केला जातो....
24/12/2023

‘राष्ट्रीय ग्राहक दिन’

भारतात दरवर्षी 24 डिसेंबरला ‘National Consumer Day’ अर्थात ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा केला जातो. 1986मध्ये आजच्याच दिवशी ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला.
या संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले आहेत.
१) सुरक्षेचा हक्क २) माहितीचा हक्क ३) निवड करण्याचा अधिकार ४) म्हणणे मांडण्याचा हक्क
5) तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क ६) ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार




BJP Mumbai @[email protected] Mumbai @ .updates

अनेकतेत एकता काळाची गरज!दिव्यांची किरणे पण सुर्याच्या किरणाची कामे करतात तीही सुर्य प्रकाशाचाच अंश आहे. पण आपली समज चुकी...
23/12/2023

अनेकतेत एकता काळाची गरज!

दिव्यांची किरणे पण सुर्याच्या किरणाची कामे करतात तीही सुर्य प्रकाशाचाच अंश आहे. पण आपली समज चुकीची होत चालली आहे, आपला सर्व धर्म समभाव लोप होत चालला आहे आणि सर्वजण आपापली खुराडीच आपले जगत समजत चाललो आहोत. त्यातूनच नवनवीन समस्या निर्माण होत आहेत. एकीकडे आपण सगळं जग आपलं घर समजत आहोत, ‘वसुधैव कुटूंबम' म्हणत आपण आपली वैचारिक विशालता कमी करत चाललो आहोत. अशात आपण जगतगुरु कसे होणार?



Nave Shahar मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ , नवी मुंबई मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय वाशी नवी Thane Nagar Wachan Mandir Tembhi Naka Mumbai Marathi Granth Sangrahlaya

दिव्यांची किरणे पण सुर्याच्या किरणाची कामे करतात तीही सुर्य प्रकाशाचाच अंश

भिंतीवरी कॅलेंडर...असावे !   गेल्या काही वर्षाभरातल्या घटना पाहिल्यानंतर माणूस आतून पुरता हादरलाय, एवढं मात्र खरं!कधीकाळ...
23/12/2023

भिंतीवरी कॅलेंडर...असावे !

गेल्या काही वर्षाभरातल्या घटना पाहिल्यानंतर माणूस आतून पुरता हादरलाय, एवढं मात्र खरं!

कधीकाळी कॅलेंडर्स अस्तित्वात नसावीत. त्यावेळी ‘पंचांग' हेच एकमेव कालमापक पुस्तक उपलब्ध होतं. मात्र ते पंचांगही फक्त उच्चवर्गीय पंडिताकडेच असायचं. मग काही शुभकार्याचा मुहूर्त वगैरे पाहण्यासाठी अशा पंचांगधारी पंडिताकडे जाऊन मुहूर्त काढावा लागायचा. हल्ली नवनव्या रूपात कॅलेंडर येत आहेत. भिंतीवरच्या कॅलेंडरप्रमाणे टेबल कॅलेंडर, पॉकेट कॅलेंडर अशी विविध प्रकारची कॅलेंडर्स येताहेत.. आणि आता तर काय! जग मुठीत आल्याने, मोबाईलमध्ये कॅलेंडर असल्याने, घरी-दारी कुठेही, कधीही कॅलेंडर पहाता येते.



मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय वाशी नवी Nave Shahar मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ , नवी मुंबई Thane Nagar Wachan Mandir Tembhi Naka Mumbai Marathi Granth Sangrahlaya

गेल्या काही वर्षाभरातल्या घटना पाहिल्यानंतर माणूस आतून पुरता हादरलाय, एवढं मात्र खरं!

पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते बेकायदेशीर वाहनतळवाहतुक कोंडीने नागरिक कमालीचे त्रस्तनवीन पनवेल : वाहतुक पोलिसांकडून...
23/12/2023

पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते बेकायदेशीर वाहनतळ

वाहतुक कोंडीने नागरिक कमालीचे त्रस्त

नवीन पनवेल : वाहतुक पोलिसांकडून दिवाळीनंतर टोइंग व्हॅन बंद करण्यात आल्यामुळे पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते बेकायदेशीर वाहनतळ होऊन बसले आहेत. पनवेल आणि नविन पनवेलमध्ये पार्कींगची मोठी समस्या आहे. त्यामुळे पनवेल आणि नवीन पनवेल मधील बंद टोइंग व्हॅन पुन्हा सुरु करण्याची मागणी केली जात आहे.



Panvel railway station Nave Shahar New Panvel CIDCO CIDCO पनवेल,नवी-मुंबई Panvel PANVELKARS

वाहतुक कोंडीने नागरिक कमालीचे त्रस्त

हवा गुणवत्ता ‘२३२ एक्यूआय'वरमहापालिकेच्या उपाययोजना सैल वाशी : मुंबई उच्च न्यायालयाने वायू प्रदूषणाची दखल घेतल्यानंतर नव...
23/12/2023

हवा गुणवत्ता ‘२३२ एक्यूआय'वर

महापालिकेच्या उपाययोजना सैल

वाशी : मुंबई उच्च न्यायालयाने वायू प्रदूषणाची दखल घेतल्यानंतर नवी मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना आखल्यानंतर नवी मुंबई शहरातील हवेच्या गुणवत्तेत बऱ्यापैकी सुधारणा झाली होती. मात्र, महापालिका प्रशासनाने घेतलेली दखल सैल होताच नवी मुंबई शहरात पुन्हा एकदा वायू प्रदूषण वाढल्याने २३ डिसेंबर रोजी हवा गुणवत्ता ‘२३२ एक्यूआय'वर गेली होती. नवी मुंबई शहरात होणाऱ्या वायू प्रदूषणाच्या दर्प वासाने रहिवाशांचा श्वास मात्र कोंडला जात आहे.



NMMC Navi Mumbai City Bombay Municipal Corporation Nave Shahar NAVI Mumbaikars Navi Mumbai Municipal Corporation

महापालिकेच्या उपाययोजना सैल

राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक, फायर ऑडीट करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देशराज्यात ६३ ...
23/12/2023

राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक, फायर ऑडीट करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राज्यात ६३ हजार विलगीकरण, ३३ हजार ऑक्सिजन बेड्‌स उपलब्ध

ठाणे : देशात आणि राज्यात सध्या कोरोना जेएन-१ या नवीन विषाणू प्रकारातील रुग्ण आढळून येत आहेत.यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे, त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस्‌ यांची यंत्रणा सज्ज ठेवावी, नागरिकांनी घाबरुन न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करतानाच, राज्यभरातील आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

,

Nave Shahar Bhushan Gagrani Dr Tanaji Sawant FC Dr. Tanaji Sawant Samarthak- डॉ. तानाजी सावंत समर्थक Manoj Saunik Hasan Mushrif Hasan Mushrif Bharatiya Janata Party (BJP)

राज्यात ६३ हजार विलगीकरण, ३३ हजार ऑक्सिजन बेड्‌स उपलब्ध

१७  देशातील ६१ खेळाडू सहभागीबक्षीसाची रक्कम ४० हजार डॉलर्सनवी मुंबई :  गत १० वर्षांपासून नवी मुंबईसह मुंबई, पुणेकरांसाठी...
23/12/2023

१७ देशातील ६१ खेळाडू सहभागी

बक्षीसाची रक्कम ४० हजार डॉलर्स

नवी मुंबई : गत १० वर्षांपासून नवी मुंबईसह मुंबई, पुणेकरांसाठी विशेष आकर्षण ठरलेली आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धा उद्या २५ डिसेंबर पासून सुरु होत आहे. या स्पर्धेचे आयोजन नवी मुंबई स्पोर्टस्‌ असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण १७ देशातील ६१ महिला टेनिसपटू सहभागी होणार असून, यावर्षी विजेत्यांना २५ हजार डॉलर ऐवजी ४० हजार डॉलर इतकी रक्कम देण्यात येणार आहे. रक्कम वाढवली गेल्यामुळे आंतरराष्ट्रीय टेनिस विश्वात १८८ रँकिंग असलेली टेनिसपटू इकरीना मायक्रोवा (रशिया) आणि १९६ रँकिंग असलेली टेनिसपटू मोयुका उचीजीमा (जपान) या नामवंत खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.



Mandatai Mhatre Nave Shahar Moyuka Uchijima Navi Mumbai Sports Association, NMSA, Vashi BJP Media Navi Mumbai Dr. Dilip Rane Hospital Sec

बक्षीसाची रक्कम ४० हजार डॉलर्स

१५० अधिकारी-कर्मचारी यांची बदलीबदली झालेले अधिकारी-कर्मचारी जागेवरचवाशी : नवी मुंबई महापालिका आस्थापनात एकाच जागी ठाण मा...
23/12/2023

१५० अधिकारी-कर्मचारी यांची बदली

बदली झालेले अधिकारी-कर्मचारी जागेवरच

वाशी : नवी मुंबई महापालिका आस्थापनात एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या १५० अधिकारी-कर्मचारी यांचे बदली आदेश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ८ डिसेंबर २०२३ रोजी काढले आहेत. मात्र, बदली झालेले चार-पाच अधिकारी-कर्मचारी वगळता इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अजून नवीन पदभार स्वीकारला नाही. त्यामुळे आता बदली रद्द करण्यासाठी बदली झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यावर राजकीय दबाव वाढवला जात असल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरु आहे.



Nave Shahar NMMC Navi Mumbai Municipal Corporation Mangesh Lad आपली Navi Mumbai नवी मुंबई शहर Navi Mumbai City (New Mumbai)

बदली झालेले अधिकारी-कर्मचारी जागेवरच

गावपण जाई देवाsss आपण कितीही नामांकित महानगरांतून राहात असलो तरी आपल्याला भूरळ घालते ते गाव...खेडेच! जिथे विहीर आहे, शेत...
22/12/2023

गावपण जाई देवाsss

आपण कितीही नामांकित महानगरांतून राहात असलो तरी आपल्याला भूरळ घालते ते गाव...खेडेच! जिथे विहीर आहे, शेते आहेत, गायी-गुरे, वासरे आहेत, त्यांच्या शेणामुताचा वास येतोय, आजूबाजूला भरपूर झाडझाडोरा आहे, सुखद वारे वाहताहेत, पायाला थेट जमिनीचा स्पर्श होतोय, चुलीवरचे जेवण शिजतेय. घरावरील कौलांवरुन पावसाच्या पाण्याचे नर्तन स्पष्टपणे ऐकू येतेय, जवळच नदी आहे, तेथे डुंबण्याचा आनंद घेता येतो.. हे सारे हवेहवेसे वाटणारे आहे. मामाचा गाव, आजोळ, आईचे गाव, वडिलांचे गाव, मावशीचे गाव, आत्याचे गाव या साऱ्यातून आपण सारे जवळीक व्यक्त करतो ती गावाप्रतिच; महानगराप्रति नव्हे!!



Nave Shahar मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ , नवी मुंबई मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय वाशी नवी Mumbai Marathi Granth Sangrahlaya Thane Nagar Wachan Mandir Tembhi Naka Marathi Sahitya Sanskriti and Kala Mandir Rajendra Gopinath Gharat

आपण कितीही नामांकित महानगरांतून राहात असलो तरी आपल्याला भूरळ घालते ते गाव...खेडेच!

बटकींचा बाजार बंद करणारे शिवबा!एकंदर महाराज आपण जसे वाचत जाऊ, तसे समजत जातात आणि गर्वाने छाती भरून येते.अनेक तरुण पोरी, ...
22/12/2023

बटकींचा बाजार बंद करणारे शिवबा!

एकंदर महाराज आपण जसे वाचत जाऊ, तसे समजत जातात आणि गर्वाने छाती भरून येते.

अनेक तरुण पोरी, यांचा तो पुण्यात भरणारा बाजार दररोज भरतोय आणि त्यास बटकीचा बाजार म्हणतात, हे समजल्यावर तर महाराज यांची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी त्या मुला-मुलींच्या विक्रीबद्दलचे हाकारे ऐकले आणि आपल्या घोड्यावरूनच चाबकाचे फटके त्या इस्लामी व्यापाऱ्यांना देण्यास, झोडपण्यास त्यांनी सुरुवात केली. त्या व्यापारी मंडळीनीं आपल्या झग्यातून सुरे काढताच महाराजांच्या सोबत असणाऱ्या साठ, सत्तर मावळ्यांनी त्यांना झोडपायला सुरुवात केली आणि काहीं मावळ्यांनी त्या बांधलेल्या पोरीपोरांना रस्सीतून मुक्त केले.



Nave Shahar Rajendra Gopinath Gharat मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय वाशी नवी मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ , नवी मुंबई Thane Nagar Wachan Mandir Tembhi Naka Mumbai Marathi Granth Sangrahlaya

एकंदर महाराज आपण जसे वाचत जाऊ, तसे समजत जातात आणि गर्वाने छाती भरून येते.

ग्रंथालीच्या ४९ व्या वाचकदिनी वाशीमध्ये दोन दिवसीय भरगच्च कार्यक्रमनामवंत साहित्यिक, संशोधक नवी मुंबईत उपस्थित राहणारनवी...
22/12/2023

ग्रंथालीच्या ४९ व्या वाचकदिनी वाशीमध्ये दोन दिवसीय भरगच्च कार्यक्रम

नामवंत साहित्यिक, संशोधक नवी मुंबईत उपस्थित राहणार

नवी मुंबई : वाचक चळवळ म्हणून ख्यातनाम असलेल्या ग्रंथालीतर्फे २४ डिसेंबर रोजी विज्ञानधारा आणि आरोग्ययात्रेची सांगता व २५ डिसेंबर रोजी ४९ वा वाचकदिन सोहळा वाशी सेवटर ६ येथील प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय, साहित्य मंदिर सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास नवी मुंबई महानगरपालिकेचेही सहकार्य लाभले आहे.



NMMC Nave Shahar Nmmc School No 101 Sec4 Nerul Rajendra Gopinath Gharat मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ , नवी मुंबई मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय वाशी नवी

नामवंत साहित्यिक, संशोधक नवी मुंबईत उपस्थित राहणार

येत्या एप्रिल महिन्यात पुन्हा दरात उसळी१६ ते २४ रुपये प्रतिकिलो दरवाशी : राज्यात पडलेल्या थंडीमुळे कांदा उत्पादनास पोषक ...
22/12/2023

येत्या एप्रिल महिन्यात पुन्हा दरात उसळी

१६ ते २४ रुपये प्रतिकिलो दर

वाशी : राज्यात पडलेल्या थंडीमुळे कांदा उत्पादनास पोषक वातावरण तयार झाल्याने कांदा उत्पादनात वाढ होत आहे. त्यामुळे वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कांदा-बटाटा घाऊक बाजारात नवीन कांद्याची आवक वाढली आहे. आवक वाढत चालल्याने कांदा दरात घसरण होत असून, कांदा १६ ते २४ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे.



Nave Shahar Sector 18-Apmc Potato Onion Market APMC Market Vashi Manohar Totlani Vashi Navi Mumbai Vashi,Koparkhairane,Ghansoli,Airoli,Turbhe,Nerul,kharghar,ulwe नवी मुंबई शहर Navi Mumbai City (New Mumbai) आपली Navi Mumbai

१६ ते २४ रुपये प्रतिकिलो दर

नागरिकांनी घाबरुन न जाता महापालिकेस सहकार्य करावे - आयुक्त अभिजीत बांगरअत्यावश्यक औषधे व यंत्रणेची पुरेशी व्यवस्था करावी...
22/12/2023

नागरिकांनी घाबरुन न जाता महापालिकेस सहकार्य करावे - आयुक्त अभिजीत बांगर

अत्यावश्यक औषधे व यंत्रणेची पुरेशी व्यवस्था करावी.

ठाणे - देशाच्या काही राज्यात जे एन-वन या ओमायक्रॉन कोविड 19 विषाणूच्या उपप्रकाराचे रुग्ण आढळून येत असून, मागील काही दिवसांमध्ये आपल्या राज्यातही आढळला असून यासाठी 24 X 7 सतर्क राहण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभाग व संबंधित सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यातही आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविणे, सर्व आरोग्य केंद्रातील तापाच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या नागरिकांची कोविडची चाचणी करावी. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बेडची संख्या वाढविणे आदी सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरूवारी (22 डिसेंबर) झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाला दिल्या आहेत.



Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Thane City Shivaji Hospital,kalwa Nave Shahar Thane City Thane City...

अत्यावश्यक औषधे व यंत्रणेची पुरेशी व्यवस्था करावी.

६२ कोटी रुपयांचा घोटाळा ;चौकशीचे आदेशआजी-माजी अधिकाऱ्यांची झोप पुन्हा एकदा गायबवाशी : वाशी मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार...
22/12/2023

६२ कोटी रुपयांचा घोटाळा ;चौकशीचे आदेश

आजी-माजी अधिकाऱ्यांची झोप पुन्हा एकदा गायब

वाशी : वाशी मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील मसाला मार्केट मध्ये एफएसआय घोटाळा झाल्याचा आरोप आमदार महेश शिंदे यांनी लक्षवेधीद्वारे केला असून, या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली आहे. तर या प्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईंल, असे राज्याचे पणन मंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी सुचित केले. त्यामुळे एपीएमसी बाजारात शौचालय घोटाळ्यानंतर एफएसआय घोटाळा अधिकाऱ्यांच्या अंगावर शेकण्याची चिन्हे दिसत आहेत.



MLA Mahesh Sambhajiraje Shinde APMC (Agricultural Produce Market Committee) MLA Shashikant Shinde Saheb Sector 19-Apmc Market Masala Market Nave Shahar Apmc Masala Market

आजी-माजी अधिकाऱ्यांची झोप पुन्हा एकदा गायब

सिडको हॅशटॅगवर मेट्रो प्रवासाचे फोटो, रिल्स शेअर करण्याबाबतही प्रवाशांचा उत्साहमहिनाभरात ४ लाख प्रवाशांचा प्रवासनवी मुंब...
22/12/2023

सिडको हॅशटॅगवर मेट्रो प्रवासाचे फोटो, रिल्स शेअर करण्याबाबतही प्रवाशांचा उत्साह

महिनाभरात ४ लाख प्रवाशांचा प्रवास

नवी मुंबई : ‘सिडको'च्या नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मार्ग क्रमांक-१ वर बेलापूर ते पेंधर स्थानकांदरम्यान १७ नोव्हेंबर २०२३ पासून मेट्रो सेवा सुरु झाल्यानंतर अवघ्या महिनाभराच्या कालावधीत ४ लाख ३० हजार प्रवाशांनी मेट्रो मधून प्रवास केला आहे. मेट्रोला नवी मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद लाभत असून, केवळ परिवहनाचे साधन म्हणून नव्हे; तर ‘आपली मेट्रो' या भावनेतून नवी मुंबईकरांचे मेट्रोबरोबर एक अनोखे नाते निर्माण झाले आहे. तसेच ‘सिडको'ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर ‘सिडको'च्या आणि या हॅशटॅगवर आपल्या मेट्रो प्रवासाची छायाचित्रे, रिल्स आणि अनुभव शेअर केले आहेत.



NAVI Mumbaikars Pendhar - MIDC Taloja ( Panvel ) CIDCO Nave Shahar Cbd Belapur Navi Mumbai Metro

महिनाभरात ४ लाख प्रवाशांचा प्रवास

माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या मागणीला अखेर यशअद्यापपर्यंत २० पेक्षा अधिक स्थानिक रहिवाशांचा मृत्यूतुर्भे : मागील २...
22/12/2023

माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या मागणीला अखेर यश
अद्यापपर्यंत २० पेक्षा अधिक स्थानिक रहिवाशांचा मृत्यू

तुर्भे : मागील २० वर्षांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या तुर्भे स्टोअर येथील उड्डाणपुलाच्या कामाला अखेर २२ डिसेंबर पासून प्रारंभ करण्यात आला आहे. या उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती नवी मुंबई पोलीस उपायुक्त (वाहतूक विभाग) तिरुपती काकडे यांनी दिली.



Turbhe Store Navi Mumbai Traffic Police Navi Mumbai Police Traffic Branch Navi Mumbai Police - Zone 1 Suresh kulkarni Shrikant Dharne Nave Shahar

अद्यापपर्यंत २० पेक्षा अधिक स्थानिक रहिवाशांचा मृत्यू

Address

1314, Realtech Park, Sector 30A, Vashi
Navi Mumbai
400703

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm

Telephone

+919967520006

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nave Shahar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nave Shahar:

Videos

Share

Nearby media companies


Other Media/News Companies in Navi Mumbai

Show All