Navi Mumbai Varta

Navi Mumbai Varta Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Navi Mumbai Varta, Newspaper, B10/15/2:3, Omkar Apartment, Sector 15, NAVI MUMBAI.

Bring to the knowledge of citizens about the day-to-day happenings, social / political events, civic policies, police reports and other news and current events of Navi Mumbai.

02/07/2024
बेलापूर विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाईनवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ए विभाग कार्यालयांतर्गत बेलापूर, से...
11/06/2024

बेलापूर विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ए विभाग कार्यालयांतर्गत बेलापूर, सेक्टर 19, श्री सखूभाई कोळी घर क्रमांक 494 व रघुनाथ कोळी घर क्रमांक 495/496 यांनी केलेले बांधकाम दिनांक 08 जुन रोजी पुनश्च हटविण्यात आले.

आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे आदेशान्वये व डॉ राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनानुसार ए विभाग कार्यालयाचे सहा. आयुक्त शशिकांत तांडेल, यांच्या नियंत्रणाखाली सदरचे बांधकाम पुनश्च हटविण्यात आले. या धडक मोहिमेसाठी उप अभियंता (प्रभारी) रोहित ठाकरे, कनिष्ठ अभियंता मयुरेश पवार, वरीष्ठ लिपिक स्वप्निल तारमळे, उपस्थित होते सदर कारवाई साठी 1 पोकलन, 12 मजूर, 1 पिकअप ई. साहित्य सामुग्री वापरण्यात आली होती .

पावसाळा कालावधीतील मदतकार्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्जपावसाळा कालावधीत नवी मुंबई शहर सुरक्षिततेच्या दृष्टीने नमुंम...
11/06/2024

पावसाळा कालावधीतील मदतकार्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज

पावसाळा कालावधीत नवी मुंबई शहर सुरक्षिततेच्या दृष्टीने नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियोजन बैठका पार पडल्या असून पावसाळापूर्व कामे तसेच पावसाळा कालावधीत तत्परतेने करावयाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीचा कृती आराखडा तयार करण्यात येऊन त्यानुसार अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. पावसाळा कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राधिकरणांनी परस्पर समन्वय राखून आपत्तीप्रसंगी मदत कार्य करावे व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्दैश आयुक्तांमार्फत देण्यात आले आहेत.

त्यास अनुसरुन नवी मुंबई महानगरपालिकेने पावसाळापूर्व नालेसफाई तसेच गटारे सफाई व मलनि:स्सारण वाहिन्यांची सफाई कामे पूर्ण केली असून खाडीतील भरतीचे पाणी सामावून घेणा-या होल्डींग पॉन्ड्सची फ्लॅप गेट्स दुरुस्तीची कामेही पूर्ण केली आहेत.

पावसाळा कालावधीतील मदत कार्याकरिता नमुंमपा मुख्यालयातील 365 दिवस 24 X 7 कार्यरत असणा-या तात्काळ कृती केंद्राच्या जोडीला आठही विभाग कार्यालयांमध्ये तसेच पाचही अग्निशमन केंद्रांमध्ये आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. ही सर्व केंद्रे पावसाळा कालावधीत दिवस-रात्र 24 तास मदतीसाठी तत्पर असणार असून त्याठिकाणी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

आठही विभाग कार्यालयांमध्ये संबंधित विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली शोध व बचाव पथके तयार करण्यात आली असून त्यामध्ये त्या विभागातील पोलीस, वाहतुक पोलीस, वैद्यकीय, अभियांत्रिकी, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, पोहणा-या व्यक्ती अशा 36 विविध प्राधिकरणांच्या / संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

सर्व आपत्कालीन नियंत्रण कक्षात टिकाव, फावडे, पाणी उपसा पंप, धान्यसाठा अशा आवश्यक बाबींची पुरेशा प्रमाणात उपलब्धता करुन ठेवण्यात आलेली आहे. दरडप्रवण क्षेत्रात आवश्यक दक्षता घेण्यात आलेली आहे. वाहतुकीला अडचण होईल अशा अथवा धोकादायक झाडांच्या फाद्यांची गरजेनुसार छाटणी करण्यात आलेली आहे.

एखादी नैसर्गिक आपत्ती आकस्मिकपणे उद्भवून एखाद्या भागातील लोकांचे स्थलांतरण करावे लागल्यास त्यांच्या तात्पुरत्या निवा-यासाठी विभागनिहाय संक्रमण शिबिराच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. नमुंमपा क्षेत्रातील धोकादायक इमारतींची यादीही घोषित करण्यात आली आहे.

पावसाळा कालावधीत उद्भवणारे जलजन्य आजार व साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासोबतच सर्व नागरी आरोग्य केंद्रे व रुग्णालये येथे पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध करुन ठेवण्यात आलेला आहे. आपद्ग्रस्तांवरील उपचारार्थ सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे 10 बेड्स आणि नेरुळ व ऐरोली रुग्णालय येथे प्रत्येकी 5 बेड्सचे नियोजन करुन ठेवण्यात आलेले आहे.

9 जून रोजी सकाळी 8.30 वा. पासून, 10 जून रोजी सकाळी 8.30 पर्यंत नमुंमपा क्षेत्रात 35.67 मि.मि. पावसाची नोंद झाली असून यंदाच्या पावसाळी कालावधीत नमुंमपा क्षेत्रात 44.77 मि.मि. पर्जन्यवृष्टी झालेली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरण प्रकल्प परिसरात आज 12.80 मि.मि पावसाची नोंद झाली असून या मोसमात 29.60 मि.मि. पर्जन्यवृष्टी झालेली आहे. सद्यस्थितीत मोरबे धरणाची पातळी 69.77 मि.मि. असून पावसाळी कालावधीत पाणी पुरवठा स्वच्छ व शुध्द राहील याची दक्षता घेण्यात आलेली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका पावसाळा कालावधीतील मदत कार्यासाठी सज्ज असून नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इतर प्राधिकरणांच्या सहयोगाने आपत्ती निवारणासाठी सुयोग्य नियोजन करण्यात आले असलेल्याची माहिती देत शहर आपत्ती निवारण समितीचे सदस्य सचिव तथा अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी पावसाळी कालावधीत अडचणीच्या प्रसंगी नागरिकांना कोणत्याही प्रकारची गरज भासल्यास त्यांनी 24 X 7 कार्यरत असणा-या नमुंमपा तात्काळ कृती केंद्राशी 27567060 / 7061 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 1800222309 / 2310 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन केले आहे.

ऐरोली विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाईनवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली कार्यालय क्षेत्रांतर्ग...
11/06/2024

ऐरोली विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली कार्यालय क्षेत्रांतर्गत सेक्टर 03, ऐरोली येथे घर क्र. जे-48 व जे-194 यांचे आरसीसी इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. तसेच घर क्र. जे-185 यांनी नमुंमपाच्या परवानगी व्यतिरिक्त वाढीव बांधकाम केलेले आहे.

या अनधिकृत बांधकामांस ऐरोली विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.

सदर अनधिकृत बांधकामावर ऐरोली विभागामार्फत तोडक मोहीमेचे आयोजन करण्यात येऊन ही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. तसेच सदर कारवाई अंतर्गत रू. 50,000/- दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. या धडक मोहिमेसाठी एकुण 08 मजूर, 01 गॅस कटर, 02 इलेक्ट्रिक हॅमर यांचा वापर करण्यात आला.

Address

B10/15/2:3, Omkar Apartment, Sector 15
Navi Mumbai
400703

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navi Mumbai Varta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Navi Mumbai Varta:

Videos

Share

Category


Other Newspapers in Navi Mumbai

Show All