
25/12/2024
पारंपारिक म्हणा किंवा स्थल-कालानुरूप म्हणा,
प्रत्येक घराच्या ‘पध्दती’ ठरलेल्या असतात.
#कथाविश्व
त्यातल्या तुमच्या-आमच्या घरातल्या काही काॅमन पध्दतींच्या बाबतीतला हा 👇संवाद नि आठवणी
-😃😃
* पध्दत असते तशी !*
“अगं अगं ss शमिका, हे कुठलं पातेलं घेतलंयस दूध तापवायला ? “
“आई, अबाऊट कंटेनर इतकं एक्साईट व्हायला काय झालं ??😯 चांगलं क्लीन तर आहे.“
“ जर्रा येताजाता लक्ष दिलं की , ब्वाॅ कोणतं पातेलं घेते आई तर ...?😠 पण नै !! कंटेनर क्लिन आहे म्हणेss!! पिशवी कट नाही नं केलेयस अजून ?”
तणतणत सुनेत्रा नेहेमीचं दूधाचं भांडं काढायला खाली वाकली.
“कम्माॅन, आई ‘ड्रेस कोड’ सारखा दूधाला काय ‘पातेलं-कोड’ 😯असतोय का ? “
“आता कसं कर्रेक्ट बोललीस. दूध नेहमी ठरलेल्या
पातेल्यातच तापवायचं ! *पध्दत असते तशी* “
फणकारयातच आईने काढून दिलेल्या पातेल्यात दूध ओतून शमिकाने पातेलं गॅस वर ठेवलं नि गॅस मोठा केला.
“शमा, आधी गॅस मंद कर बघू “
“आई , मला अर्जंटली काॅफी हवेय गं , उतू नाही जाणार मी उभी रहातेय इथे”
कित्ती बोलायचं सारखं ss!!
शेवटी सामोपचारानं घेत सुनेत्राने खालची पट्टी घेतली,
“शमिका, तुला हवंय तेवढं दूध छोट्या पातेलीत काढून, गॅस मोठा केलास तरी चालेल. तुझी तुझी काॅफी घे नि तू जा. S M ( सोशल मिडिया) खोळंबला असेल. 🤨आणि होss, मोठ्या पातेलीखालचा गॅस मंदच राहू दे. नि आता ‘का ??’ असं विचारू नको.
*पध्दत असते तशी* “
देवपूजा करता करता एकीकडे दूधाकडे लक्ष होतंच सुनेत्राचं. पूजा संपत आलीच नि तेवढ्यात शार्दूल घुसला कीचनमध्ये ! धसमुसळेपणा अंगात भरलेला नुस्ता ! सांडशी पडल्याचा आवाज आला अन्
“अरे अरे, काय घाई चालल्ये तुझी ?
दूध गरम आहे. “
“ ममुडी ss”
“Hmm ...”
काहीतरी लाडीगोडी नक्की ! सुनेत्रा सावध झाली.
“ अरे बाबा, ते वरचं झाकण ‘अप साईड डाऊन’ करून ठेव. भरलेल्या दूधाच्या पातेल्यात सांडशी बुचकळू नको, कीचन टाॅवेल वापर ! आणि....
असं का?? तर मुळ्ळीच विचारायचं नाही.
*पध्दत असते तशी*
आई, I remember it well ! पण कीचन टाॅवेल सांडशीखाली होता , so ती पडली ! चिल्ल गंs
ममा “😀
अस्सा मिश्किलै नं !!सुनेत्राने हसू कसंबसं
लपवलं !!🤓
“हां , आणि आता कुठे जायचंय उंडारायला ?”
“ पटकन् दूध घेऊन ग्राऊंडवर चाललोय. क्रिकेटची मॅच आहे आमची B wing च्या बाॅईज बरोबर !
‘मssग जरा लवकर तरी उठायचंs’-ममा ,हे
असं म्हणू नको, व्हेकेशनमध्ये ‘उशीराच उठावं’,
* पध्दत असते तशी*😛 BTW खालून येतांना
काही आणायचंय ??”
“ गध्ध्या, माझी चेष्टा करतोस ?चल पटकन जा आता ! मित्र वाट बघत असतील !! नि दुपारच्या जेवणाला वेळेवर उगवा , काssय ?”
मुलं गेली आपापल्या उद्योगाला नि सुनेत्रा मात्र
* पध्दत असते तशी* च्या आठवणीत गुंतली.
तिचं लहानपण चाळीतलं. दिवसा बैठकीची असलेल्या खोलीची रात्री ‘बेडरूम’ होत असे तेव्हा.
त्यावेळेस,
“ जरा सरसा केर काढून मग सतरंजी ‘अंथरा’वी
गं ! नंतर त्यावर गादी घालावी.
*पध्दत आहे तशी* ! “
आईची ही सूचना ठरलेली. झोप डोळ्यात भरलेल्या वेळी ही सतरंजी ‘अंथरा’यची सूचना ‘ मंथरा’ एवढी दुष्ट😒 वाटायची आपल्याला.
झालंच तर...
रोज वापरायच्या मुरांब्यातल्या, लोणच्यातल्या मीठातल्या, तूपातल्या....( ही यादी केवढी तरी मोठी) *चमच्याला* ठेवणीतल्या ‘त्या त्या’ कंटेनरच्या ‘हद्दीत’ जायची बंदी असे.
ठेवणीतल्या बरण्यांसाठी अर्थातच वेगळे टेबलस्पून्स नि ‘हद्द’ म्हणजे जर्राही ‘ओले -चिले’
नसलेले. 😉
‘ओले’ ठीकै पण ‘चिले’ काय असायचं 🤔ते काही कळायचं नाही तेव्हा ! ‘चिल गं आई’ हा आताचा प्रचलित शब्द बहुतेक तसाच असावा.😛
‘गॅलरीतली केरसुणी नि घरातली ‘ ह्यांना कायम
( कायदेशीर घटस्फोट दिल्यासारखं😶)
वेगळं ठेवलं जायचं , का ??
‘आंघोळीच्या नि कपडे धुवायच्या बादल्यांची
*अदलाबदल* साफ नामंजूर , का ??
‘बाहेरून आल्यावर हात-पाय -तोंड धुतल्यानंतर ( सॅनिटायझर वगैरे चा दूरान्वयानेही संबंध नसलेल्या त्या काळात हे मस्ट होतं .)
पाय पुसायच्या नि हात -तोंड पुसायच्या टाॅवेलची
जागा वेगळाली असायची, का ??
असे कैक ‘का s’ ?? पण...
*पध्दत असते तशी* हे एक्कच उत्तर मिळायचं
आईकडून अन्
मुलांच्या प्रत्येक शंकेचं निरसन केलं पाहिजे किंवा ‘काss’ चं उत्तर दिलं पाहिजे -
*अशी पध्दत नसल्याने* 😀ती पुढच्या कामाला लागत असे.
सुनेत्राच्या मनात आलं,
‘आपणही मुलांच्या ‘ काss’ ला जमेल तेवढ्या वेळेस नि शक्य तितकी लाॅजिकल उत्तरं द्यायचा प्रयत्न करतो पण अखेरीस -* पध्दत असते तशी*
चा आसरा घेणं सुटसुटीत पडतं, हेही खरंच!’😄
काही का असेना पण त्यामुळे ‘पध्दती’
पुढच्या पिढीत झिरपायला मदतही होते हेही नाकारतां येत नाही.👍
*पध्दत असते तशी * -आईच्या ह्या उत्तर द्यायच्या पध्दतीला मनातल्या मनात सलाम करत सुनेत्रा पुढच्या कामाला लागली.😊
©️ अनुजा बर्वे.
फोटो: नेट सौजन्य !🙏
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉✨