जलगाव येथे शनिपेठ पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन युवकांवर केला गुन्हा दाखल
शहरातील बेंडाळे चौक ते पांझरापोळ चौक दरम्यान प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन युवकांना शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दर्शन संजय शिंपीसह एका अल्पवयीन बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध BNS कलम 125, 223 आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलम 5, 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईत पोलिसांनी संशयित आरोपींच्या ताब्यातून मोनोकाइट नायलॉन मांजाच्या पाच चक्री जप्त केल्या आहेत.
मानराज मोटर मारुती सर्व्हिस शोरूमला भीषण आग, या भीषण आगीमध्ये करोडोचे नुकसान...
आज सकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक रित्या भीषणआग लागली असल्याच समोर आले,ही आग छतावरती लावलेल्या सोलर पॅनलच्या शॉर्टसर्किटमुळे लागल्या चा अंदाज शोरूम चे मालक अशोक बेदममुथा यांनी म्हटल आहे ,ही आग सकाळी सात वाजता लागली असता,काही वेळातच आग वाढत गेल्याने सोलर पॅनलच्या खाली असलेले अकाउंट विभाग, ॲक्सेसरीज विभाग हे आगीत जळून खाक झाले आहे, त्यामुळे जवळपास करोडोचे नुकसान झाले असल्याचे शोरूम चे मालक अशोक बेदमूथा यांनी सांगितले आहे. आतापर्यंत अग्निशामक विभागातर्फे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून आग आटोक्यात आली असून बारा बंब आग विझवण्यासाठी या ठिकाणी लागले आहे
जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गावर भरधाव जाणाऱ्या पामतेलच्या टँकरचा अपघात
धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळ महामार्गावर शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तेल घेऊन जाणारा टैंकर पलटी झाला. हा टैंकर धुळेकडून जळगावकडे चालला होता. समोरून येणाऱ्या वाहनाला चुकवण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटल्याने हा टँकर उलटल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले
जळगाव महापालिका आयोजित खान्देश महोत्सवाला सुरूवात !
जळगाव महापालिका आयोजित खान्देश महोत्सव आजपासून सुरू झाला आहे. सागर पार्क मैदानावर खासदार स्मिता वाघ आमदार, सुरेश भोळे,अभिनेत्री ऋतुजा शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.
२३ वा बालगंधर्व संगीत महोत्सवाची थाटात सुरवात...
जळगावच्या बालगंधर्व महोत्सवात शास्त्रीय संगीता बरोबरच उपशास्त्रीय संगीताची रेश्मा आणि रमैय्या भट यांनी मेजवानी दिली. हरहुन्नरी दोन्ही भगिनींची संगीत सेवा जुगल बंदितुन याची देही याची डोळा पाहण्याची व अनुभवण्याची संधी २३ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या निमित्ताने जळगावकर रसिकांना मिळाली. सर्व प्रथम राग पुरीया धनाश्री मधील विलंबीत एकतालातील बडा ख्याल 'गावे गुणीजन' तर द्रुत तीनतालातील 'बहुत दिन बिते' ही बंदिश सादर केली.
नाशिक पोलिसांतर्फे नागरिकांना नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन
नाशिक पोलिसांतर्फे नागरिकांना नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन
आमदार सुरेश भोळे यांनी घेतली महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांची भेट
गृह तथा लघु उद्योग करू पाहणाऱ्या महिलांना कर्ज मिळविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यासंदर्भात आज आमदार सुरेश भोळे यांनी पद्मालय विश्रामगृहात शहरातील महिलांसह जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत महिलांना गृह तथा लघु उद्योगासाठी सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना आमदार भोळे यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांना केल्या.
देशदूत संवाद कट्टा : हवामानातील बदल आणि शेती
सहभाग: डॉ. प्रमोद रसाळ - विभागीय संचालक, मुक्त विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र
संवाद : डॉ. वैशाली बालाजीवाले - संपादक, दैनिक देशदूत, देशदूत टाईम्स
#Deshdoot #Weather #weatherchange #farming #nashiknews
देशदूत विशेष संवाद कट्टा : नाशिक क्रेडाई शेल्टर २०२४
सहभाग - कृणाल पाटील - अध्यक्ष, क्रेडाई नाशिक मेट्रो
दिपक बागड - उपाध्यक्ष, क्रेडाई नाशिक
गौरव ठक्कर - समन्वयक, क्रेडाई नाशिक शेल्टर
संवाद - डॉ. वैशाली बालाजीवाले - संपादक, दैनिक देशदूत, देशदूत टाईम्स
#nashiknews #Deshdoot #samvadkatta #nashikcredai #shelter #exhibition
जळगावात दिव्यांग बांधवांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा
जळगाव । दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सागर पार्क येथून दिव्यांग सेनेतर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांच्या घोषणांनी परिसर दणाणला. पहा नेमक्या काय आहेत त्यांच्या मागण्या..
माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची मोठी घोषणा : शरद पवार गटाला धक्का
शरद पवार गटाचे नेते तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिली आहे.कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तवर मी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. अशी भावना माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केली आहे.
Live: देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री शपथविधी सोहळा
Live: देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा