Vithal_Maza_official

Vithal_Maza_official vithal_maza_official provides you the best video content , our aim to entertain people and promote various talent through this platform.

27/11/2022
03/10/2022

फुल कॉमेडी भारुड !हसून हसून पोट दुखेल

01/10/2022
29/02/2020

एक व्यक्ती अस म्हणत आहे कि इंदुरीकर महाराजांनी माझी माफी मागावी ही मागणी तुम्हा मायबाप जनतेला योग्य वाटते का या तुन त्या व्यक्तीचा अहंकार तुम्हाला दिसतोय का ? माझामुळे कोल्हापूरचे किर्तन बंद झाले असे गर्विष्ठ पणे बोलणाऱ्या व्यक्ती बदल तुमचे काय मत आहे( जर ती व्यक्ती उघड पणे अस म्हणत असेल तर कोल्हापूरला पाठवलेल्या त्या व्यक्ती त्यांच्याच सांगण्यावरून किंवा सुपारी घेऊन तिथे गेल्या होत्या अस उघड दिसतंय ), वारकरी किर्तन कारणा संपवण्याचा कट आहे अस तुम्हाला वाटतय का ? मंदिरात प्रवेश मिळवणे म्हणजे आम्ही माता भागीनिकरता खुप काही केल असं म्हणणाऱ्या कथित लोकांबद्दल तुमचे म्हणणे काय आहे? ज्या गुरु तुल्य महाराजांनी माझ्या कडून काही चुकीच बोललं गेलं असेल तर मी माफी मागणाऱ्या तसेच मला तुमचा पोरगा , भाऊ म्हणुन ऐका असे म्हणणाऱ्या महाराजावर आग ओकणाऱ्या अहंकारी लोकाबद्दल तुमचे काय म्हणणे आहे ? चुकीच्या गोष्टीवर टीका करणाऱ्या सामान्य जनतेला खोटे लोक आहेत व मी कशी खरी आहे अस म्हणणाऱ्या ढोंगी लोकाबद्दल तुमचं काय म्हणन आहे

कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया नकी कळवा
तुमच्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया बहुमूल्य आहेत
अशा लोकांना मेडिया कडून प्रसिद्धी देऊन समाजासाठी चांगल्या काम करणाऱ्या लोकांना संपवण्याच्या या कटाला तुम्ही आम्ही सामान्य लोकांनी कसं उतरं द्यावं
समाज सेवेचं पांधरून घेऊन मी म्हणेल तेच खर अशा हिटलर शाही प्रवृतीला तुम्ही
गप बसुन सहन करत राहणार काय तुमच्या प्रतिक्रिया नकी कळवा!

ही तुकाराम महाराजांनी सांगितलेली उक्ती खरी करण्याची वेळ आली आहे का ?

"मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास | कठीण वज्रास भेदूं ऐसे || ध्रु ||
मेले जित असों निजोनिया जागे | जो जो जें जें मागे तें तें देऊं || १ ||
भले तरी देऊं गांडीची लंगोटी | नाठ्याळा चि गांठी देऊं माथां || २ ||
मायबापाहूनि बहु मायावंत | करूं घातपात शत्रूहूनि || ३ ||
अमृत तें काय गोड आम्हांपुढे | विष तें बापुडें कडू किती || ४ ||
तुका म्हणे आम्ही अवघे चि गोड | ज्याचें पुरे कोड त्याचेपरिं || ५ ||"

रामकृष्ण हरी !

महाराज तुमचं मन मोठं आहे म्हणुनच जनता तुम्हाला आपलं मानते
18/02/2020

महाराज तुमचं मन मोठं आहे म्हणुनच जनता तुम्हाला आपलं मानते

जो चांगलं काम करतो त्याच्यावर चिखलं फेकण्याची सवय हि महाराष्ट्रासाठी जुनीच ते महात्मा फुले असो किंवा दुसरे कोणीहीइंग्रजा...
15/02/2020

जो चांगलं काम करतो त्याच्यावर चिखलं फेकण्याची सवय हि महाराष्ट्रासाठी जुनीच ते महात्मा फुले असो किंवा दुसरे कोणीही
इंग्रजांनी अत्याचार केला आता मेडियावल्यानी सुरु केला, कांद्याचा भाव वाढला कि सर्व मेडिया ओरडायला सुरुवात सामान्य माणसाच्या डोळ्यातुन पाणी आले पण इंदुरीकर महाराज म्हणतात होऊ दे ना शेतकर्यांचं कल्याण कधीतरी त्यालाही सुख मिळू दे शेतकरी राजा होऊ दे, मुली आज सर्व क्षेत्रात अवल आहेत म्हणणारे महाराज म्हणतात मी माझ्या मुलीचे लाड करतो मुलाला 200 रु चा बूट तर मुलीला 500 रु चा, मुलींची शाळेत जाताना छेड काढणाऱ्याच्या नळ्या फोडा म्हणणारे हि महाराज, आजच्या मुली कोणत्याही क्षेत्रात कमी नाही म्हणणारे महाराज, मुलीकडंन हुंडा घेणाऱ्या सासारच्यांना खसकवणारे महाराज, सुनेला मुली प्रमाणे वागवं म्हणुन सासवना तू कमावलेल डोक्यावर घेऊन जाणार आहे का खसकवणारे महाराज, मुली या मुलापेक्षा हुशार आणि आई वडिलांचं नाव काढतात असे म्हणणारे महाराज, मुलींनी तबेत कमावून स्वतःचे संरक्षण केले पाहिजे सांगणारे महाराज आज मुलगी पायलट आहे देशाच्या सीमेवर रक्षण करते राष्ट्रपती होते तहसीलदार होते डी वाय एस पी, कलेक्टर आहे आहे मुलगी कुठंच कमी नाही असे ठासून सांगणारे महाराज, मुलीने आई वडिलांचे नाव जपले पाहिजे आई वडिलांनी पोटाला चिमटा घेऊन तुम्हाला शिकवले याची जाणं ठेवा अस म्हणणारे महाराज ,मुली या दुसऱ्याच्या घरी जाणार आहेत त्यांचे लाड केलेच पाहिजे असं समाजाला सांगणारे महाराज, नोकर्या मिळत नाही ना व्यवसाय कर म्हणणारे महाराज, आपली बायको हीच आपला आधार असते अस सांगणारे महाराज, आपल्या बहिणीचे लाड करा 500 ची नाही 2000 हजाराची साडी घ्या असे म्हणणारे महाराज, शाळेतील बिन पगारी शिक्षकांची व्यथा सांगणारे महाराज, भावा भावानी जमिनी साठी भांडण करू नका असे सांगणारे महाराज, दंगलीत सामील होऊ नका असे कळकळी ने सांगणारे महाराज, आत्महत्या करू नका , आई वडिलांची महती सांगु नका त्यांना आनंदात ठेवा असे सांगणारे महाराज, दारू पिऊन वरातीत नाचणार्यांना खसकवणारे महाराज, परीक्षा द्या यश मिळवा आयुष्याचा वेळ वाया घालवू नका असे सांगणारे महाराज, भांडण करण्यात वेळ घालवू नका माघारीत जय आज असे सांगणारे महाराज, लग्नात फाजील खर्च करू नका असे सांगणारे महाराज, हजारो अनाथ मुलांना शिकवणारे महाराज ,आपल्या आई वडिलांच्या स्मरनार्थ सप्ताह भरवणारे महाराज ,अनेक शाळांना लाखो रुपयाची देणगी देणारे महाराज, आपल्यासाठी कधीही काही न मागणारे महाराज , कीर्तनाच्या आधी लहान मुलामध्ये रमणारे महाराज, आई वडिलांची सेवा हेच काशीचे तीर्थ असे सांगणारे महाराज , शाळेतील मुलांना किर्तनातुन विज्ञानाचे धडे देणारे महाराज, टेन्शन घेऊ नका हसत खेळत जागा निरीगी रहा असे म्हणणारे महाराज, मुलांना ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात करियर करु द्या असे ठाम सांगणारे महाराज, लहान वयात मुलांना दडपण देऊ नका असे सांगणारे महाराज, शेतकऱ्यांना जोडधंदा करा तरच शेती फायद्याची राहील असे सांगणारे महाराज , आई बापाच्या जीवावर मजा करणार्यांना महाराज खसकवतात स्वतःच्या पैशावर मजा करा तुमच्या आई बापाला आनंदच होईल, तरुण मुलांना राजकारणात संधी द्या असे जुन्या लोकांना सांगणारे त्यांचे पाय ओढू नका असे सांगणारे महाराज , दारू पिऊन आपल्या बायकोला मारणार्यांना खासकवनारे महाराज, आपल्या घरी कोणीही आलं तरी चहा घेतला का असे आवर्जून विचारणारे महाराज, असे आहेत मी अनुभवलेले इंदुरीकर महाराज, काही दिवसा पूर्वी ह्याच मेडिया वाल्यांनी महाराज राजकारणात आले अशा वावड्या उठवल्या काहींनी त्यांच्या कट्यावर येण्यासाठी आग्रह हि केला पण महाराज गेले नाही याचाच बदला म्हणून हे षडयंत्र रचले गेले अनेक chayanal वाल्यांनी त्यांचे किर्तन दाखवून trp कमावला त्यात चारही chayanal चा समावेश आहेत ज्यांनी महाराजांची बदनामी केली आहे पण महाराष्ट्रातील लोक काही मूर्ख नाहीत जे तुमच्या अशा बातम्यांना बळी पडतील जनता हुशार आहे , तुम्ही चॅनेल वाले खासगी आहात तुम्ही समाजाच्या व्यथा दाखवण्या साठी नाही तर पैशे कमावण्यासाठी बातम्या तयार करतात सोयी नुसार कोणालाही बदनाम करतात आणि त्याची चांगली वेळ आली कि त्याचा उदो उदो करतात. आजच्या मेडिया वाल्या मध्ये खरे पत्रकार उरलेच नाही जे चांगल्या बाजू शकतील एका चॅनेल वाल्याने काही गोष्ट दाखवलि कि तेच , आणखी एक विषय म्हणजे महाराज 1 लाख रुपये घेतात हे तर अगदीच खोटं ज्यांनी कधी महाराजांचा कार्यक्रम ठेवलाच नाही त्यांनी अस धधांत खोटं सांगावं , महाराजांनी जनते साठी त्यांचे आयुष्य वाचले आहे तुम्हा मेडिया वाल्या धंदे वाईक लोकांना काय समजेल ......महाराज तुम्ही असेच किर्तन करत रहा जणता तुमच्या पाठीशी आहे मेडिया वाल्यानी दिलेल्या महाराजां विषयी दिलेल्या बातम्या खालील दिलेल्या जनतेच्या comment नकी पहा ज्यात पुर्ण जनतेने महाराजांना पाठिंबा दिला आहे
----------------भूषण जाधव (नाशिक)

पैशे कितीही कमवा पण आई बापाला विसरू नका !!ज्या विठ्ठल देवाची भक्ती आपण करतो ! तोही भक्त पुंडलिकाने आई बापाची केलेली सेवा...
19/12/2019

पैशे कितीही कमवा पण आई बापाला विसरू नका !!
ज्या विठ्ठल देवाची भक्ती आपण करतो ! तोही भक्त पुंडलिकाने आई बापाची केलेली सेवा पाहुनच या धरतीवर अवतरला ! हीच गोष्ट लक्षात घ्या !

अवघ्या जगाची माऊली ज्यांनीजगातील सर्वोत्तम ग्रंथ ज्ञानेश्वरी आपल्याला दिला
14/12/2019

अवघ्या जगाची माऊली ज्यांनी
जगातील सर्वोत्तम ग्रंथ ज्ञानेश्वरी आपल्याला दिला

Address

Panchavati
Nashik
422003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vithal_Maza_official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Nearby media companies