SANAY Publications

SANAY Publications We can publish, creates,edit,promote,distribut,sell books

*आग्रहाचे निमंत्रण* २३ मार्च २०२४शहिद दिन व सनय प्रकाशनाच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त *सनय प्रकाशन* प्रकाशित १२ वैचार...
21/03/2024

*आग्रहाचे निमंत्रण* २३ मार्च २०२४

शहिद दिन व सनय प्रकाशनाच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त *सनय प्रकाशन* प्रकाशित १२ वैचारिक ग्रंथांचा प्रकाशन सोहळा

*शुभहस्ते*

*डॉ. गिरीश जाखोटिया* (साहित्यिक)
*डॉ. अलीम वकील* (साहित्यिक)
*डॉ. लहू गायकवाड* (लेखक)
*मा. राधिका गोडबोले* (लेखिका)
*मा. मोगल जाधव* (लेखक)
*मा. पोपट सातपुते* (लेखक, कवी)
*मा. नदीम सय्यद* (लेखक)
*मा. संदिप बडोले* (अनुवादक)
*मा. नितीन साळुंखे* (अनुवादक)
*मा. शीतल भांगरे* (अनुवादक)
*मा. मिना शेटे-संभू* (अनुवादक)

*तरी आपण प्रकाशन सोहळ्यास अवश्य उपस्थित राहावे, ही विनंती.*

वेळ : *शनिवार, २३ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता.*

स्थळ : *कलासागर गार्डन मंगल कार्यालय, नारायणगाव.*

आपले नम्र : *सनय प्रकाशन, नारायणगाव.*
*८६२६०८५७३४ l ८६५२१२१९१२*
●●●

01/03/2024
*सुवर्णसंधी, सुवर्णसंधी, सुवर्णसंधी**शिवराय मनामनात, शिवराय घराघरात**छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त, अखंड भारतभू च्...
25/01/2024

*सुवर्णसंधी, सुवर्णसंधी, सुवर्णसंधी*
*शिवराय मनामनात, शिवराय घराघरात*
*छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त, अखंड भारतभू च्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या शिवाजी महाराजांच्या साहित्य संचाची सुवर्णसंधी* *एकूण पुस्तके ११, एकूण पाने ५७६, वजन १ किलो, मूळ किंमत ६७० ₹, सवलत किंमत ५५० ₹ भारतात कोठेही, त्वरा करा या सुवर्णसंधीचा लाभ घ्या*
*सनय प्रकाशन*
*८६५२१२१९१२ l ८६२६०८५७३४*
*९०९६५९६७६८ l ८१८००३१७३३*

*१. विरमाता जिजाऊसाहेब l डॉ.मोगल जाधव l पाने ७२ l १०० ₹*

*२. शिवरायांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी l डॉ.लहू गायकवाड l पाने ४८ l ५० ₹*

*३. खरा शिवाजी l तफज्झूल दाऊद l पाने १२० l १५० ₹*

*४. कुळवाडीभूषण रयतेचा राजा l डॉ.जितेंद्र कदम l पाने ४० l ५० ₹*

*५. शिवाजी कोण होता l कॉ.गोविंद पानसरे l पाने ८० l ८० ₹*

*६ . शिवचरित्राची शिकवण l डॉ.अशोक राणा l पाने ४० l ४० ₹*

*७. दगलबाज शिवाजी l प्रबोधनकार ठाकरे l पाने २४ l ३० ₹*

*८. शिवाजी महाराजांच्या पत्रातून कळणारे शिवाजी महाराज l प्रा.रा. वि. ओतुरकर l पाने ४८ l ५० ₹*

*९. शिवाजी शूद्र कसा l डॉ.अशोक राणा l पाने ३२ l ३० ₹*

*१०. शिवकालीन जलनीती l डॉ.लहू गायकवाड l पाने ४० l ५० ₹*

*११. शिवचरीत्रातील शंभूराजे l डॉ.अशोक राणा l पाने ३२ l ३० ₹*

धन्यवाद.
•••••

*प्राचीन भारतातील गुलामगिरी*देव राज चनाना लिखित Slavery In Ancient India या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद *प्राचीन भारती...
26/12/2023

*प्राचीन भारतातील गुलामगिरी*

देव राज चनाना लिखित Slavery In Ancient India या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद *प्राचीन भारतीतील गुलामगिरी* या नावाने प्रसिद्ध झाला आहे. हा ग्रंथ *पाली आणि संस्कृत ग्रंथामधील मजकुरावर आधारित* असून हा ग्रंथ प्राचीन भारतातील गुलामगिरीवर सखोल भाष्य करतो. गुलामांची खरेदी, गुलामांचा व्यापार, गुलामांची नावे, किंमत, शिक्षा, दंड, त्यांचा आहार, कपडे, दासी-देवदासी, अंगवस्त्रे, हुजरे, दाई, भेट दिलेले गुलाम या विषयी *ऋग्वेद, रामायण, महाभारत, मनुस्मृती, त्रिपिटक, अर्थशास्त्र, मिलिंदपन्हो, थेरीगाथा, जातक कथा* या ग्रंथाच्या आधारे भाष्य करत लेखक आपली मते नोंदवतात. *पाने २८३ | आकार ५.५"×८.५" | किंमत ४०० ₹ l भारतात कोठेही घरपोहोच, कोणताही टपाल खर्च नाही*

*प्रस्तावना*
*लेखकाचे मनोगत*
*०१ । प्राचीन भारतातील गुलामगिरीवरचे अभ्यास*
*०२ । पूर्वकालीन घटना*
*०३ । महाकाव्यांतून सूचित होणारी गुलामगिरीची प्रथा*
*०४ । बौद्धकालीन गुलामगिरी*
*०५ । गुलामगिरीशी संबंधित माहिती*
*०६ । गुलामगिरीविषयीचे कौटिल्याचे विवेचन*
*०७ । निष्कर्ष*
*परिशिष्ट*
*संदर्भसूची*
*संक्षिप्त रुपे*
सदर ग्रंथ आपणास हवा असल्यास आम्हाला त्वरित कळवा, *सनय प्रकाशन*
*८६५२१२१९१२ । ८६२६०८५७३४ (w)*
*८१८००३१७३४ । ९०९६५९६७६८ (w)*
*९८६०४२९१३४ । ८१८००३१७३३*
●●

*२६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त**"भारतीय राज्यघटनेची ओळख"**१२९ कोटी लोकसंख्येचा, ३० राज्यांनी व्यापलेला, ६१८ बोली भाषा...
26/11/2023

*२६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त*

*"भारतीय राज्यघटनेची ओळख"*

*१२९ कोटी लोकसंख्येचा, ३० राज्यांनी व्यापलेला, ६१८ बोली भाषा बोलणारा, ६४०० जाती-जमातींचा, सहा प्रमुख धर्म आणि सहा वांशिक समूहांनी नटलेला व २९ सण-उत्सव साजरे करणारा, लोकशाही राज्य असलेला देश म्हणजे भारत! या भारताची लोकशाही या घटनेवर खंबीरपणे उभी आहे, ती घटना म्हणजे 'भारतीय राज्यघटना' होय. भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाची सर्वात मोठी राज्यघटना मानली जाते.*
'भारतीय राज्यघटना' ही वैश्विक संस्कृतीला प्रतिसाद देणारी आणि विकसनशील मूलभूत कायद्यांचे रूप असणारी एक आधुनिक विचारधारा आहे. भारताची राज्यघटना उद्देशिका, मुख्य भाग आणि १२ पुरवण्या (परिशिष्टे) यांत विभागलेली आहे. मुख्य संविधानाचे २२ विभाग आहेत. सुरुवातीला राज्यघटनेत ३९५ कलमे होती. सध्या राज्यघटनेत ४४७ कलमे असून, भारतीय राज्यघटना समजण्यास आणि उमजण्यास तितकीच किचकट व गुंतागुंतीची आहे. भारतीय राज्यघटना सर्वांना सहज समजावी आणि ती सहज आत्मसात व्हावी, या हेतूने साध्या सोप्या भाषेत भारतीय राज्यघटनेची ओळख करून देणारे पुस्तक म्हणजेच *"भारतीय राज्यघटनेची ओळख"*
राज्यशास्त्राचे अभ्यासक *डॉ. अभिजित पाटील व प्रा. लक्ष्मण साके* लिखित हे पुस्तक असून पुस्तकाची *पाने १८४* आहेत. पुस्तकाचा *आकार ५.५"×८.५" इंच* असून पुस्तकाची *किंमत २०० ₹ (घरपोहोच)* आहे. पुस्तकाची अनुक्रमणिका खालील प्रमाणे.
*● मनोगत*
*०१ । भारतीय राज्यघटनेचे पार्श्वभूमी आणि वैशिष्ट्ये*
*०२ । मूलभूत हक्क/अधिकार/कर्तव्य आणि राज्याची मार्गदर्शक तत्वे*
*०३ । संघराज्य*
*०४ । संघशासन/केंद्रीय प्रशासन*
*०५ । राज्य शासन*
*०६ । भारतीय पक्ष पद्धती आणि निवडणुका*
*०७ । भारतीय राजकारणातील जात, धर्म व भाषा*
*०८ । प्रादेशिकवादाचे घटक व विकासात्मक धोरण*
*०९ । घटनादुरुस्ती*
*१० । राजकीय घडामोडी*
*● लेखक परिचय*

हे पुस्तक आपल्याला हवे असल्यास आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड आणि ईमेल आयडी असल्यास *सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अपच्या ८६५२१२१९१२ । ९०९६५९६७६८ । ८६२६०८५७३४ । ८१८००३१७३४ । या नंबर वर पाठवा किंवा ८१८००३१७३३ । ९८६०४२९१३४ या नंबरवर आम्हाला त्वरित फोन करा.* आम्ही हे पुस्तक आपल्यापर्यंत *घरपोहोच* करू भारतात कोठेही. धन्यवाद. आम्ही आपले आभारी आहोत.
●●

*महात्मा जोतीराव फुले पुण्यतिथीनिमित्त खास ग्रंथ सवलत योजना**एकूण पुस्तके : १०**एकूण पाने : ८७६**एकूण किंमत : ₹ ९५५**सवल...
02/11/2023

*महात्मा जोतीराव फुले पुण्यतिथीनिमित्त खास ग्रंथ सवलत योजना*

*एकूण पुस्तके : १०*
*एकूण पाने : ८७६*
*एकूण किंमत : ₹ ९५५*
*सवलत किंमत : ₹ ५५५ फक्त (टपाल खर्चासह भारतात कोठेही)*

*२८ नोव्हेंबर महात्मा जोतीराव फुले पुण्यतिथीनिमित्त आणि खास वाचकांच्या आग्रहास्तव* महात्मा जोतीराव फुलेंच्या विचारांचा क्रांतीचा प्रसार-प्रचार करण्यासाठी सनय प्रकाशन कटिबद्ध* असून *महात्मा जोतीराव फुले यांची खालील महत्वाची १० पुस्तके आम्ही ५० टक्के सवलतीत १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीतच घरपोहोच* आमच्या बांधवांसाठी देत आहोत. तरी वाचक बांधवांनी, ग्रंथ आणि फुले प्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा. *संच सवलत फक्त १० पुस्तकांच्या संचावर आणि दिलेल्या तारखेपर्यंतच*

०१ । *गुलामगिरी (ब्राम्हणी धर्माच्या आडपडद्यात)* । लेखक : महात्मा जोतीराव फुले । पाने १२८ । किंमत १२० रुपये.*

०२ । *शेतकऱ्यांचा असूड । लेखक : महात्मा जोतीराव फुले* । पाने १२० । किंमत १२० रुपये.

०३ । *सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक* । लेखक : महात्मा जोतीराव फुले । पाने १३६ । किंमत १५० रुपये.

०४ । *संग्रामनायक जोतीराव फुले* । लेखक : यशवंत मनोहर । पाने १३६ । किंमत १५० रुपये.

०५ । *महात्मा जोतीराव फुले* । लेखक : पंढरीनाथ पाटील । पाने ८० । किंमत १०० रुपये.

०६ । *सावित्रीबाई जोतीराव फुले : कार्य आणि कर्तृत्व* । लेखक : मोगल जाधव । पाने ६४ । किंमत ७० रुपये.

०७ । *जोतीराव व सावित्रीबाईंची भाषणे* । लेखक : सावित्रीबाई जोतीराव फुले । पाने ४८ । किंमत ५० रुपये.

०८ । *जोतिचरित्र* । लेखक : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी । पाने १०७ । किंमत ११५ रुपये.*

०९ । *महात्मा फुले यांचा गणपती* । लेखक : डॉ. अशोक राणा । पाने ३२ । किंमत ४० रुपये.

१० । *पुन्हा क्रांतीज्योती (एकपात्री नाट्यप्रयोग)* । लेखक : डॉ. सोमनाथ मुटकुळे । पाने ३६ । किंमत ४० रुपये.

*ग्रंथ सवलत* योजनेचा लाभ घ्यावा. त्वरित संपर्क करा. *सनय प्रकाशन*
*८६५२१२१९१२ । ८६२६०८५७३४ (w)*
*८१८००३१७३४ । ९०९६५९६७६८ (w)*
*९८६०४२९१३४ । ८१८००३१७३३*
●●●

*गांधीजी : वसाहतवाद विरोधापासून विभाजनवाद विरोधापर्यंत*       *सुवर्णसंधी, सुवर्णसंधी, सुवर्णसंधी प्रकाशनपूर्व सवलत, महा...
01/10/2023

*गांधीजी : वसाहतवाद विरोधापासून विभाजनवाद विरोधापर्यंत*

*सुवर्णसंधी, सुवर्णसंधी, सुवर्णसंधी प्रकाशनपूर्व सवलत, महात्मा गांधी सप्ताह निमित्त ०२ ऑक्टोबर ते ०८ ऑक्टोबर पर्यंत. मूळ किंमत ५०० ₹. सवलत किंमत ३०० ₹ घरपोहोच. ग्रंथ ३० ऑक्टोबर नंतर पाठवला जाईल.*

*प्रसिद्ध विचारवंत व राजकीय विश्लेषक असलेले डॉ. अलीम वकील* यांचा *गांधीजी : वसाहतवाद विरोधापासून विभाजनवाद विरोधापर्यंत* हा ग्रंथ प्रकाशित होत असून *भारताच्या फाळणीला गांधी हेच जबाबदार आहे. असा सतत अपप्रचार गांधीजींचे विरोधक करत असतात. या व अशा अनेक गांधीं विरुद्ध उठवलेल्या अफवांविरुद्ध लेखक सखोल आणि तितकेच स्पष्ट विश्लेषण आपल्या ग्रंथात करतात.* या ग्रंथाची पृष्ठ संख्या ३५२ असून, आकार ५.५" ×८.५" इंच असा आहे. या *ग्रंथाची किंमत ५०० ₹* आहे. ग्रंथाची अनुक्रमणिका खालील प्रमाणे -
*• प्रस्तावना*
*०१ आत्मा ते महात्मा: एक प्रवास*
*०२ वसाहतवादावरील गांधी-भाष्य हिंद स्वराज*
*०३ गांधीजींचा अस्पृश्यता निवारण्याचा वसा*
*०४ भारताचे विभाजन-गांधीजींची भूमिका*
*०५ ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातील : मानवी स्वभाव, सत्ताहाव आणि विभाजन*
*• निवडक साहित्य-संदर्भसूची*
*• लेखक परिचय*

*गांधीजी : वसाहतवाद विरोधापासून विभाजनवाद विरोधापर्यंत* हा ग्रंथ आपल्याला हवा असल्यास त्वरित संपर्क करा. *सनय प्रकाशन*
*८६५२१२१९१२ । ८६२६०८५७३४ (w)*
*८१८००३१७३४ । ९०९६५९६७६८ (w)*
*९८६०४२९१३४ । ८१८००३१७३३*
●●

10/07/2023

*प्रसिद्ध राजकीय विचारवंत आणि लेखक डॉ. कांचा अइलैय्या (धनगर, मेंढपाळ)* यांचे 2009 ला *POST-HINDU INDIA : A Discourses on Dalit-Bahujan, Socio-Spiritul and Scientific Revolution* हे पुस्तक प्रकाशित झाले पुस्तकातील *Social Smuggling (सामाजिक तस्करी)* या प्रकरणावरून *वाद निर्माण* झाला आणि *पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्यात यावी आणि त्याना भर चौकात ×× द्यावी असे फतवे काही संघटनांनी काढले.* पुस्तकावर *बंदीचा खटला* भरला गेला. आणि कांचा अइलैय्या यांच्यावर *जीवघेणा हल्ला* सुद्धा झाला. *जातीय राजकारणावर विखारी हल्ले चढवत हिंदुत्वाच्या चष्म्यातून मांडलेल्या ऐतिहासिक घटनांना हे पुस्तक आव्हान देते. जातिव्यवस्थेच्या 3500 वर्षाच्या इतिहासातील दलित जातींच्या शोषणाचे विश्लेषण* या पुस्तकात *कांचा अइलैय्या* यांनी केले आहे. या इंग्रजी पुस्तकाचा नुकताच *हिंदुत्व-मुक्त भारत : दलित-बहुजन, सामाजिक-आध्यात्मिक आणि वैज्ञानिक क्रांतीवरील चिंतन* या नावाने *मराठीत अनुवाद* झाला आहे.
पुस्तकाचा आकार 5.5"×8.5" इंच असून, पानांची संख्या 406 असून पुस्तकाची *किंमत 500 रुपये* आहे. पुस्तकाची अनुक्रमणिका खालील प्रमाणे

*प्रस्तावना*
*1.मोबदला न मिळालेले शिक्षक*
*2.अज्ञात वैज्ञानिक*
*3.उत्पादक सैनिक*
*4.जनसामान्यांमधले स्त्रीवाद*
*5.समाजाचे शल्यविशारद*
*6.मांस आणि दुधाचे अर्थशास्त्रज्ञ*
*7.अज्ञात अभियंते*
*8.अन्नधान्याचे उत्पादक*
*9.सामाजिक तस्कर*
*10.अध्यात्मिक फॅसिस्ट*
*11.बुद्धिजीवी गावगुंड*
*12.नागरी युद्धाची चिन्हे आणि हिंदुत्वाची अखेर*
*13.उपोदघात - हिंदुत्व-मुक्त भारत*

*हिंदुत्व-मुक्त भारत : दलित-बहुजन, सामाजिक-आध्यात्मिक आणि वैज्ञानिक क्रांतीवरील चिंतन* हे पुस्तक आमच्याकडे उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचण्याची, समजून घेण्याची आपल्या इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला हे पुस्तक हवे असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास *सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अप (Whats app) च्या 8652121912 । 8626085734 । 8180031734 । 9096596768 ।* या नंबर वर पाठवा किंवा अधिक माहिती हवी असल्यास *9860429134 । 8180031733* या नंबर वर आम्हाला त्वरित फोन करा. आम्ही हा ग्रंथ आपल्यापर्यंत *घरपोहच* करू. *भारतात कोठेही, हे पुस्तक घरपोहच पाठवण्याचा टपाल खर्च वेगळा आकारला जाणार नाही.* याची नोंद घ्यावी. धन्यवाद।
●●●

08/07/2023

पुस्तकांचे समृद्ध दालनअनेक पुस्तके भरपूर सवलतीच्या दरात या दालनात वाचकांना घरपोहोच देण्याचा एक अभिनव उपक्रमपु....

30/06/2023

*१ जुलै महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त खास सवलत*

*विषमुक्त शेती - सुलभ शेती*

झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी आणि भरमसाठ उत्पन्न घेण्याच्या प्रयत्नात आपण दुप्पट तिप्पट पीक उत्पादन घेण्याच्या मागे आहोत. *मूलभूत गरजांमधील सर्वप्रथम घटक म्हणजे "अन्न" परंतु त्याचा स्त्रोत मात्र आज घातक बनत चालला आहे,* याचे महत्वाचे कारण म्हणजेच रासायनिक शेती, त्याचा दुष्परिणाम व प्रभाव हा नकळत आपल्यावर व पुढील पिढीवर होत आहे, यापासून दूर राहण्यासाठी *सर्वोत्तम उपाय म्हणजे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती,* शेतीविषयक दांडगा अनुभव असलेले, असंख्य शेतकऱ्यांच्या व समाजोपयोगी ठरलेले आणि ५० हून अधिक शेतीविषयक पुस्तकांचे लिखाण केलेले कृषी व्यवस्थापन महाविद्यालय प्राचार्य व कृषी विज्ञान केंद्र कार्यक्रम समन्वयक भी. गो. भुजबळ यांनी अगदी सोप्या भाषेत हे पुस्तक आपल्या समोर आणले आहे. *सुलभ शेती* l *पाने : ३०४ l किंमत : ४०० ₹ l सवलत किंमत : ३०० ₹ l*
*अनुक्रमणिका*
*१. नैसर्गिक शेती*
*२. सेंद्रिय शेती*
*३. यज्ञीय शेती*
*४. योगीक शेती*
*५. पुरवणी*
हे पुस्तक आपल्याला हवे असल्यास हे पुस्तक आमच्याकडे उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचण्याची, समजून घेण्याची आपल्याला इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला हे पुस्तक हवे असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास *सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अप (Whats app) च्या 8652121912 । 8626085734 । 8180031734 । 9096596768 या नंबर वर पाठवा किंवा 8180031733 । 9860429134 ।* या नंबर वर आम्हाला त्वरित फोन करा. *आम्ही हे पुस्तक आपल्याला भारतात कोठेही घरपोहोच करू. कृपया यांची नोंद घ्यावी.* धन्यवाद । आम्ही आपले आभारी आहोत.
◆◆◆

*आरक्षणाचे जनक* असलेल्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची *६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी पार पडली* तसेच २६ जून रोज...
24/06/2023

*आरक्षणाचे जनक* असलेल्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची *६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी पार पडली* तसेच २६ जून रोजी येणाऱ्या जयंती निमित्ताने हे *वर्ष ‘कृतज्ञता पर्व’* म्हणून साजरे करण्यात येणार असून शाहू महाराज यांच्या प्रती *सनय प्रकाशन* ही कृतज्ञ आहे. *राजर्षी छत्रपती शाहू महाराज* यांच्या जीवनाचा परिचय करून देणारे *पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते* यांनी लिहिलेली *चरित्र पुस्तिका मराठी आणि इंग्रजी अश्या दोन पुस्तिका भरघोस (५०%) सवलतीत* देत आहोत तरी वाचक बांधवांनी, ग्रंथ प्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा.

पुस्तिकेचे नाव । *शाहू महाराज : एक थोर राष्ट्रपुरुष*, *‘Shahu Maharaj , A Great Nation Man'*
पुस्तिकेचे लेखक । *पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते*
पुस्तिकेचा आकार । *५.५" इंच × ८.५"इंच*
पुस्तिकेची किंमत । *५०₹ + ५०₹*
पुस्तिकेची पाने । *४० ₹*
दोन पुस्तके सवलत किंमत | *९०₹ फक्त टपाल खर्चासह संपूर्ण भारतात कोठेही* वरील पुस्तके हवी असल्यास त्वरित संपर्क करा.
*सनय प्रकाशन*
*८६५२१२१९१२ । ८६२६०८५७३४ (w)*
*८१८००३१७३४ । ९०९६५९६७६८ (w)*
*९८६०४२९१३४ । ८१८००३१७३३*
●●

19/06/2023

*आरक्षणाचे जनक* असलेल्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची *६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी पार पडली* तसेच २६ जून रोजी येणाऱ्या जयंती निमित्ताने हे *वर्ष ‘कृतज्ञता पर्व’* म्हणून साजरे करण्यात येणार असून शाहू महाराज यांच्या प्रती *सनय प्रकाशन* ही कृतज्ञ आहे. *राजर्षी छत्रपती शाहू महाराज* यांच्या जीवनाचा परिचय करून देणारे *पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते* यांनी लिहिलेली *चरित्र पुस्तिका मराठी आणि इंग्रजी अश्या दोन पुस्तिका भरघोस सवलतीत* देत आहोत तरी वाचक बांधवांनी, ग्रंथ प्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा.

पुस्तिकेचे नाव । *शाहू महाराज : एक थोर राष्ट्रपुरुष*, *‘Shahu Maharaj , A Great Nation Man'*
पुस्तिकेचे लेखक । *पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते*
पुस्तिकेचा आकार । *५.५" इंच × ८.५"इंच*
पुस्तिकेची किंमत । *५०₹ + ५०₹*
पुस्तिकेची पाने । *४० ₹*
दोन पुस्तके सवलत किंमत | *९०₹ फक्त टपाल खर्चासह संपूर्ण भारतात कोठेही* वरील पुस्तके हवी असल्यास त्वरित संपर्क करा.
*सनय प्रकाशन*
*८६५२१२१९१२ । ८६२६०८५७३४ (w)*
*८१८००३१७३४ । ९०९६५९६७६८ (w)*
*९८६०४२९१३४ । ८१८००३१७३३*
●●

17/05/2023
23/02/2023

*गाडेबाबा जयंतीनिमित्ताने*
बुरसटलेल्या विचारांची "साफसफाई" करणारे, संत शिरोमणी गाडगे बाबा. आपल्या रसाळवाणीने ज्यांनी उभा महाराष्ट्र शहाणा करून सोडला ते महान संत म्हणजे गाडगे बाबा. देव दगडात नसून माणसात आहे आणि दीनदलितांसाठी आयुष्य वेचणाऱ्या आंबेडकरांना देव माना, त्यांच्यातील माणूसकीची पूजा करा हे जगाला ठणकाणून सांगणारे संत म्हणजे श्री संत गाडगे बाबा.* १९५२ ला *प्रबोधनकार ठाकरे* यांनी *श्री संत गाडगे बाबा* हा *बाबांच्या जीवनावर आधारित चरित्र ग्रंथ* लिहिला. गाडगे बाबांच्या हयातीत हा ग्रंथ लिहला असल्यामुळे हा *दुर्मिळ ग्रंथ लवकरच आऊट ऑफ प्रिंट* झाला. तेव्हा या ग्रंथाची किंमत फक्त *अडीच रुपये* होती. हा ग्रंथ नव्याने उपलब्ध झाला असून या ग्रंथाची *पाने १५२* असून, *आकार ५.५"×८.५" इंच* आणि ग्रंथाची *किंमत २०० रुपये* आहे. *गाडगे बाबांचे चरित्र व विचार घराघरात जावे या तळमळीने आम्ही हा ग्रंथ भरघोस सवलतीत* देत आहोत. *बापा हो आपण या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.*
*एका प्रतीसाठी फक्त २०० रु. (घरपोहोच)*
*पाच प्रतीसाठी ६५० रु. (घरपोहोच)*
ग्रंथाची अनुक्रमणिका खालील प्रमाणे-
*०१ । 'मला कोणी शिष्य नाही, मी कुणाचा गुरू नाही'*
*०२ । डेबूजीचे गोवारी जीवन*
*०३ । पोहता येत नाही म्हणजे का ?*
*०४ । गुरख्याचा नांगऱ्या बनला*
*०५ । डेबूजीचे गोधनावरील प्रेम*
*०६ । अन्यायाची चीड*
*०७ । लोकसेवेचा प्रारंभ*
*०८ । नवं मानव धर्माच्या शोधात*
*०९ । षड्रिपुंचे दमन कसे केले ?*
*१० । वनवासातही लोकसेवा*
*११ । ऋणमोचनचा रविवाऱ्या शंकर*
*१२ । ऐन कसोटीचा प्रसंग हाच*
*१३ । खराट्याचा नवा धर्म*
*१४ । माणुसकीचा संदेश*
*१५ । ऋणमोचनचे ऋण फेडले*
*१६ । डेबूजी पुढे, कीर्ती मागे*
*१७ । घार फिरे आकाशी-परि चित्त तिचे पिल्लांपाशी*
*१८ । लोकजागृतीची पार्श्वभूमी*
*१९ । आधीच भटाची जात सुशिक्षीत*
*२० । तीक्ष्ण निरीक्षणांचे सिद्धांत*
*२१ । बाबांचे संघटना-चातुर्य असामान्य*
*२२ । शून्यातून निर्माण केलेला पसारा*
*२३ । तत्वजिज्ञासूं नि तत्वविवेचक बाबा*
*२४ । चारधाम दिंडीवाल्यांची हजेरी*
*२५ । लोक-श्रद्धेला वळण लावले*
*२६ । जनता - संपर्क (मास कॉन्टॅक्ट)*
*२७ । गंगेच्या पाण्याने गंगेची पूजा*
*२८ । संत गाडगेबाबांनी बांधलेल्या धर्मशाळा*
*२९ । संत गाडगेबाबांचे जीवनवृत्त*

*श्री संत गाडगे बाबा* हा ग्रंथ आपल्याला हवा असल्यास आम्हाला लगेच आपला पत्ता पाठवा किंवा फोन करा. धन्यवाद.
*सनय प्रकाशन*
*8652121912 । 8626085734* *8180031734 । 9096596768* *8180031733 । 9860429134*
●●●

10/02/2023

*महापुरुषांचे विचार घराघरात आणि मनामनात खास सवलत योजना. वाचावी आणि घरात असावी अशी पुस्तके*

*असत्याला सुद्धा सत्याची कास धरावयास लावणारी पुस्तके*

*एकूण पुस्तके : ४१*
*एकूण पाने : १६४०*
*वजन : ३ किलो १०० ग्रॅम*
*भाषा : मराठी*
*आकार : ५.५ × ८.५ इंच*
*एकूण किंमत : २०७५ ₹.*
*सवलत किंमत : १५०० ₹. (घरपोहोच)*

*०१ । डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली?* । डॉ. यशवंत मनोहर । पाने ४० । ४० ₹.
*०२ । डॉ. आंबेडकर* (१९४६ मध्ये प्रसिद्ध झालेले पहिले चरित्र) । तानाजी खरावतेकर । पाने ६४ । ६० ₹.
*०३ । मनुस्मृती, संघ, हिंदुत्व व संविधान* । डॉ. अशोक राणा । पाने ३२ । ३० ₹.
*०४ । बुद्धाची ज्ञानप्राप्ती : एक महाकाव्य* । उत्तम कांबळे । पाने २४ । २५ ₹.
*०५ । शिवाजी शूद्र कसा?* । डॉ. अशोक राणा । पाने ३२ । ३० ₹.
*०६ । शिवचरित्राची शिकवण* । डॉ. अशोक राणा । पाने ४० । ४० ₹.
*०७ । शिवकालीन जलनीती* । डॉ. लहू गायकवाड । पाने ४० । ५० ₹.
*०८ । शिवाजी महाराजांच्या पत्रातून कळणारे शिवाजी महाराज* । रा. वि. ओतूरकर । पाने ४८ । ५० ₹.
*०९ । शिवरायांचे जन्मस्थान : शिवनेरी* । डॉ. लहू गायकवाड । पाने ४८ । ५० ₹.
*१० । शिवचरित्रातील शंभूराजे* । डॉ. अशोक राणा । पाने ३२ । ३० ₹.
*११ । डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समतेसाठी लढा* । मोगल जाधव । पाने ५६ । ५० ₹.
*१२ । दगलबाज शिवाजी* । प्रबोधनकार ठाकरे । पाने २४ । ३० ₹.
*१३ । भारतातील जाती* । डॉ. बाबासाहेब आंबेडकर । पाने २४ । २० ₹*
*१४ । दलित राजकारण आणि दलित साहित्य* । उत्तम कांबळे । पाने ४८ । ४० ₹.
*१५ । कॉम्रेड अण्णा भाऊ साठे* । उत्तम कांबळे । पाने २४ । ३० ₹.
*१६ । लोकशाहीला असलेला धोका* । डॉ. बाबासाहेब आंबेडकर । पाने ३२ । ४० ₹*
*१७ । सत्यशोधक भाऊराव पाटील* । प्रबोधनकार ठाकरे । पाने ५६ । ५० ₹.
*१८ । राष्ट्रसंत तुकडोजी व्यक्ती व विचार* । डॉ. अशोक राणा । पाने ५६ । ५० ₹.
*१९ । महात्मा फुले यांचा गणपती* । डॉ. अशोक राणा । पाने ३२ । ४० ₹.
*२० । सावित्रीबाई जोतीराव फुले : कार्य आणि कर्तृत्व* । मोगल जाधव । पाने ६४ । ६० ₹.
*२१ । मी नास्तिक का आहे?* । शहीद भगतसिंग । पाने ४० । ५० ₹.
*२२ । मुक्ती कोण पथे ?* । डॉ. बाबासाहेब आंबेडकर । पाने ४८ । ५० ₹*
*२३ । माझा देवावर का विश्वास नाही?* । अ‍ॅनी बेझंट । पाने ३२ । ३० ₹.
*२४ । देवळांचा धर्म धर्माची देवळे* । प्रबोधनकार ठाकरे । पाने २४ । ३० ₹.
*२५ । ५५ कोटी नि गांधी हत्या* । पार्थ पोळके । पाने ५६ । ५० ₹.
*२६ । देशाचे दुष्मन* । दिनकरराव जवळकर । पाने ५६ । ६० ₹.
*२७ । लढा भ्रष्टाचाराशी* । दीपक कांबळे । पाने ३२ । ३० ₹.
*२८ । अंधश्रद्धेची वावटळ* । चंद्रसेन टिळेकर । पाने ४० । ५० ₹.
*२९ । पुन्हा क्रांतीज्योती* (एकपात्री नाट्यप्रयोग) । डॉ. सोमनाथ मुटकुळे । पाने ३६ । ४० ₹.
*३० । खेळ मांडीयेला* (भक्ती आंदोलनातील दोन अंकी सामाजिक नाटक) । डॉ. सोमनाथ मुटकुळे । पाने ६४ । ६० ₹.
*३१ । सातवाहनकालीन व्यापारी राजमार्ग : नाणेघाट* । डॉ. लहू गायकवाड । पाने ४८ । ५० ₹.
*३२ । श्री बसवेश्वर* । आर. सी. हिरेमठ । पाने ४० । ५० ₹.
*३३ । लोकनेते कर्मवीर दादासाहेब गायकवाड* । मोगल जाधव । पाने ७२ । १०० ₹.
*३४ । लोकमाता अहिल्यामाई* । पाने ५६ । ६० ₹.
*३५ । अण्णाभाऊ साठेंची आणि माझी रशियाला भेट* । डॉ. एस. एस. धाकतोडे । पाने ४८ । ५० ₹.
*३६ । मुलांनो गाडा या अंधश्रद्धा* । चंद्रसेन टिळेकर । पाने ६४ । १०० ₹.
*३७ । क्रांतिवीर बिरसा मुंडा* । डॉ. तुकाराम रोंगटे । पाने ६४ । १०० ₹.
*३८ । रा. स्व. संघ खोली आणि व्याप्ती* । देवनुरू महादेव । पाने ४८ । ५० ₹.
*३९ । वीरमाता जिजाऊसाहेब* । मोगल जाधव । पाने ७२ । १०० ₹.
*४० । त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर* । मोगल जाधव । पाने ७२ । १०० ₹.
*४१ । जोतीराव व सावित्रीबाईंची भाषणे । सावित्रीबाई जोतीराव फुले* । पाने ४८ । ५० ₹.

वरील *४१ पुस्तके* हवी असल्यास त्वरित संपर्क करा. *सनय प्रकाशन*
*८६५२१२१९१२ । ८६२६०८५७३४ (w)*
*८१८००३१७३४ । ९०९६५९६७६८ (w)*
*९८६०४२९१३४ । ८१८००३१७३३*
●●

07/12/2022

*महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुबंई अंतर्गत मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजना 2022* साठी *सनय प्रकाशन, नारायणगाव* प्रकाशित *डॉ. सोमनाथ मुटकुळे (संगमनेर)* लिखित *खेळ मांडियेला (संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावरील)* या पुस्तकास *भा. रा. भागवत पुरस्कार* *आज जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख *lरक्कम ५०००० रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र* असे आहे. लेखक डॉ. *सोमनाथ मुटकुळे आणि सनय प्रकाशन नारायणगाव या संस्थेचे स्थापना श्री शिवाजी शिंदे व त्यांच्या परिवाराने दहा वर्षांपूर्वी केली. त्यांच्यासोबत वंदना शिंदे, निलेश शिंदे आणि तेजल शिंदे हे चौघेजण अहोरात्र कष्ट करत असतात. विशेष म्हणजे या परिवाराशी माझा स्नेह मागील दहा वर्षांपासून चा आहे. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याची संपूर्ण इतिहास मांडणी सांगणारा पहिला ग्रंथ शिवनेरीची जीवनगाथा हा ग्रंथ सनय प्रकाशनाने प्रकाशित केला. हा त्यांचा प्रकाशन व्यवसायामधील पहिला ग्रंथ. या ग्रंथासही सोलापूर येथील संत तुकाराम महाराज वाचनालयाचा सर्वोत्तम ग्रंथ पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर त्यांनी दर्जेदार* संदर्भ ग्रंथांची निर्मिती केली. *आणि करत आहेत. सनय प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या विविध ग्रंथांना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेचा पुरस्कार आणि इतरही पुरस्कार त्यांच्या ग्रंथांना प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे श्री शिवाजी शिंदे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात पीएचडी पदवीसाठीचे संशोधन करत आहेत. लवकरच ते आपला प्रबंध सादर करतील. नोकरी नाही म्हणून कोणाच्याही नावाने काहीही आरडा ओरड न करता शांत चित्ताने या व्यक्तीने प्रकाशन व्यवसायात पाऊल ठेवले. ज्या कोणत्याही व्यक्तीस जगाच्या कोणत्याही भागात जे पुस्तक हवे आहे ते पुस्तक शासकीय पोस्टाने त्यांना पोहोच करणे हे खरे त्यांच्या व्यवसायाचे यश होय. ते कोणतेही बनावट काम करत नाहीत. सर्व काही कामे प्रामाणिक जिज्ञासृष्टीने आणि सचोटीने करतात. पुरोगामी परंपरेचे ते पाईक असले तरी मी असे म्हणतो की भगवंतांनी त्यांच्या पुस्तकाला प्राप्त करून दिलेले हे पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याची पोहोच पावती आणि भगवंताने पाठविलेले प्रेम पत्र आहे. भगवंत या शब्दा ऐवजी आपण निसर्गसृष्टीचा निर्माता अन्य कोणताही शब्द वापरू शकाल. मागील दहा वर्षात त्यांचे जवळजवळ 150 ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. खेळ मांडीयेला या ग्रंथाला मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या आजवरच्या जीवनातील सर्वोत्तम पुरस्कार आहे. या ग्रंथावर स्वतंत्र नाटकाची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्रभर त्याचे प्रयोग होत आहेत. आगामी काळात नारायणगाव येथे देखील या महानाट्याचा प्रयोग होत आहे. योग्य वेळी आपणास त्याविषयी सुचित करणार आहोत. एकंदरीतच सनय प्रकाशन नारायणगावच्या सर्व सदस्यांना उज्वल भविष्य प्राप्त होवो ही प्रार्थना. त्यांच्या हातून अशीच दर्जेदार ग्रंथ निर्मिती होत जावो ही प्रार्थना.*

07/11/2022

*२८ नोव्हेंबर, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले पुण्यतिथी निमित्त*

*महात्मा जोतीराव फुले लिखित तीन महत्त्वाची पुस्तके भरघोस सवलतीच्या दरात उपलब्ध*

एकूण पुस्तके : ०३
एकूण पाने : ३८४
एकूण किंमत : ₹ ३७०
सवलत किंमत : ₹ १८५ (₹ ४५ टपाल खर्च)

*०१ । गुलामगिरी (ब्राम्हणी धर्माच्या आडपडद्यात) । लेखक : महात्मा जोतीराव फुले । पाने १२८ । किंमत १०० रुपये.*

*०२ । शेतकऱ्यांचा असूड । लेखक : महात्मा जोतीराव फुले । पाने १२० । किंमत १२० रुपये.*

*०३ । सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक । लेखक : महात्मा जोतीराव फुले । पाने १३६ । किंमत १५० रुपये.*

वरील तिन्ही पुस्तके *फक्त २३० रुपयात* देत आहोत तरी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

ही तिन्ही पुस्तक आमच्याकडे उपलब्ध आहे. ही बहुमोल अशी पुस्तके आपल्याला, आपल्या मित्राला हे पुस्तक हवी असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास *सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अप (Whats app)
*८६५२१२१९१२ । ८६२६०८५७३४ (w)*
*८१८००३१७३४ । ९०९६५९६७६८ (w)*
*९८६०४२९१३४ । ८१८००३१७३३* या नंबर वर आम्हाला त्वरित फोन करा. आम्ही हे पुस्तक आपल्यापर्यंत घरपोहच करू. *भारतात कोठेही, पुस्तक घरपोहच पाठवण्याचा पोस्टेज (टपाल खर्च) ४५ रुपये वेगळा आकारला जाईल.* याची नोंद घ्यावी. धन्यवाद। आम्ही आपले आभारी आहोत.
◆◆

*देशातील राजकीय उलट सुलट घडामोडींच्या आणि सर्व प्रकारच्या माध्यमांच्या चर्चाविश्वातील राजकारणाच्या अभ्यासाची सुवर्णसंधी*...
03/07/2022

*देशातील राजकीय उलट सुलट घडामोडींच्या आणि सर्व प्रकारच्या माध्यमांच्या चर्चाविश्वातील राजकारणाच्या अभ्यासाची सुवर्णसंधी*

*"आपला देश किंवा आपले राज्य कसं चाललं पाहिजे ?, कुठल्या तत्वांवर चाललं पाहिजे ?, त्याचे आग्रह काय असले पाहिजेत ? राज्य कशासाठी चालवलं पाहिजे ? याचा विचार मांडणं, त्या विचारांचा आग्रह धरणं आणि तो पूर्ण करण्यासाठी सत्तेत येणं, सत्तेत येण्यासाठी निवडणुका लढवणं, त्या जिंकणं, त्या जिंकण्यासाठी आपला विचार लोकांना पटवून देणं, व नंतर ते सत्यात उतरवणं" म्हणजे राजकारण* याच राजकीय पद्धतीतील राजकारणाच्या व्याख्येची व एका विशिष्ट राजकीय पक्षाची पडताळणी व उलटतपासणी करून समोर आलेला इत्यंभूत लेखा जोखा परखडपणे पुराव्यांनिशी उघडपणे मांडणारी पुस्तके म्हणजेच,

*१. आरएसएस : भारताला असलेला धोका । लेखक : ए. जी. नूरानी । पाने : ६७२ । किंमत : १५०० ₹*

*२. द पॅराडोक्सिकल प्राइम मिनिस्टर (नरेंद्र मोदी आणि त्यांचा भारत) । लेखक : शशी थरूर । पाने : ५६७ । किंमत : ५०० ₹*

*३. गुजरात फाईल्स (कृष्णकृत्यांचा रहस्यभेद) । लेखक : राणा अय्युब । पाने : २०० । किंमत : ३०० ₹*

*४. बॉम्बस्फोट : ब्राह्मण्यवादी दोषी, मुस्लिमांना फाशी । लेखक : एस.एम.मुश्रीफ । पाने : ३१२ । किंमत : ३०० ₹*

*५. वादा - फरामोशी (माहिती अधिकारातून उघडकीस आलेले आकाल्पनिक सत्य) । लेखक : संजॉय बासू, नीरज कुमार, शशी शेखर । पाने : १५९ । किंमत : २५० ₹*

*६. शॅडो आर्मीज (काठावरच्या संघटना आणि हिंदुत्ववादाचे पायदळ) । लेखक : धीरेंद्र झा । पाने : २२४ । किंमत : ३०० ₹*

*७. आय ऍम ट्रोल (भाजपाच्या डिजिटल सैन्याच्या रहस्यमय जगात) । लेखक : स्वाती चतुर्वेदी । पाने : १४६ । किंमत : २५० ₹*

*८. "हू किल्ड करकरे ?" (भारतातील दहशतवादाचा खरा चेहरा) । लेखक : एस.एम.मुश्रीफ । पाने : ३५० । किंमत : ४२५ ₹*

*९. त्याने गांधींना का मारलं (षडयंत्राची आणि स्रोतांची पडताळणी) । लेखक : अशोक कुमार पांडेय । पाने : २९६ । किंमत : ३०० ₹*

*१०. हिंदुत्व-मुक्त भारत : दलित-बहुजन, सामाजिक-आध्यात्मिक आणि वैज्ञानिक क्रांतीवरील चिंतन । लेखक : डॉ. कांचा अइलैय्या । पाने : ३०५ । किंमत : ३५० ₹*

*१० पुस्तकांची एकत्रीत मूळ किंमत ४४७५ ₹ व सवलत किंमत ३५८० ₹ घरपोहोच भारतात कोठेही, कोणताही टपाल खर्च नाही* त्वरा करा, आपल्याला किंवा आपल्या मित्रपरिवारास ही पुस्तके हवी असल्यास आम्हला त्वरित फोन करा. *सनय प्रकाशन*
*9860429134 । 8180031734* किंवा आम्हांला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित त्वरित आमच्या व्हाट्सअप्प क्रमांकावर पाठवा,
*8652121912 । 8626085734*
धन्यवाद , आम्ही आपले आभारी आहोत,
http://www.sanaybooks.com
●●

*आरएसएस : भारताला असलेला धोका* *आरएसएसची कृती राष्ट्रविरोधी आहे आणि त्या नेहमीच विध्वंसक, घातपाती आणि हिसंक राहिल्या आहे...
23/06/2022

*आरएसएस : भारताला असलेला धोका*

*आरएसएसची कृती राष्ट्रविरोधी आहे आणि त्या नेहमीच विध्वंसक, घातपाती आणि हिसंक राहिल्या आहेत.*- पंडित नेहरू

*RSS : A Menace to India* या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद *आरएसएस : भारताला असलेला धोका* हा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला असून *भारताच्या सर्वोच्च न्यायालयात आणि मुबंई उच्च न्यायालयात वकील म्हणून काम केलेले, लेखक, स्तंभलेखक, भारतातील घटनात्मक आणि राजकीय घडामोडींचे तज्ज्ञ* असलेल्या *ए. जी. नूरानी* यांनी या पुस्तकात *१९२५ मध्ये आरएसएसची स्थापना झाल्यापासून आजपर्यंतच्या प्रवासाची प्रभावीपणे मांडणी* या ग्रंथात केलेली आहे.

ग्रंथाचे नाव : *आरएसएस : भारताला असलेला धोका*
लेखकाचे नाव : *ए. जी. नूरानी*
मराठी अनुवाद : *मीना शेटे-संभू*
ग्रंथाची पाने : *६७२*
ग्रंथाचा आकार : *६.५"×१०"इंच*
ग्रंथाची बांधणी : *पुठ्ठा बांधणी (HB)*
ग्रंथाचे वजन : *१ किलो ४०० ग्रॅम*
ग्रंथाची किंमत : *₹ १५००/-*
सवलत किंमत : *१३००/-*

ग्रंथाची अनुक्रमणिका
*● प्रस्तावना*
*● उपोदघात*
*०१ । आरएसएसची निर्मिती का झाली?*
*०२ । आरएसएसचा एकोणीसाव्या शतकातील वारसा*
*०३ । भारतीय राष्ट्रवादाची बांधिलकी*
*०४ । ब्रिटिशांशी सहकार्य*
*०५ । यूरोपच्या फॅसिस्टना आरएसएसची लाडीगोडी*
*०६ । सावरकरांचा महासभेवर ताबा*
*०७ । आरएसएसने धर्मग्रंथ प्राप्त केला*
*०८ । स्वातंत्र्याविषयी आरएसएसचे मत*
*०९ । आरएसएस आणि गांधीहत्या*
*१० । आरएसएस वरची बंदी*
*११ । गोळवलकर आणि मुखर्जी यांचा जनसंघाविषयीचा करार*
*१२ । मुखर्जी, आरएसएस आणि जनसंघ*
*१३ । मुखर्जींच्या नंतरची आरएसएस*
*१४ । आरएसएस आणीबाणी आणि जनता पक्ष*
*१५ । भाजपचा जन्म आणि आरएसएसची समस्या*
*१६ । रामाच्या नावावर सत्ता*
*१७ । धार्मिक समुदायाच्या छळाचा मोदींना कसा फायदा झाला*
*१८ । अडवाणी अध्याय*
*१९ । आरएसएसची विजयी घोडदौड*
*२० । भारताचा पंतप्रधान आरएसएस निवडते*
*२१ । मोदींच्या नेतृत्वाखाली आरएसएसचे राज्य*
*२२ । सन २०१८ मधील अखेरचा डाव*
*२३ । आरएसएस आणि हिंसा*
*२३ । आरएसएसची पिलावळ : अभाविप, विहिंप आणि बजरंग दल*
*२४ । कर आणि धर्मदाय अधिकारी यंत्रणेसमोर आरएसएसने उघड केलेली माहिती*

*परिशिष्टे*
०१ । आरएसएसची प्रार्थना आणि प्रतिज्ञा
०२ । आरएसएसची घटना
०३ । आरएसएसला बेकायदेशीर ठरविण्यात आले
०४ । गोळवलकरांचा गृहमंत्री सरदार पटेलांशी संपर्क
०५ । जस्टिस ऑन ट्रायल
०६ । गुरुजी-इंदिराजी पत्रव्यवहार
०७ । आणीबाणीच्या दरम्यान देवरस यांचा पत्रव्यवहार
०८ । नागपूरच्या जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात
०९ । आरएसएस आणि इतर संलग्न संघटनांच्या मतैक्यासाठी लिमयेंचे प्रयत्न
१० । जनता पक्षातील पेचप्रसंगाला सर्वच जण जबाबदार
११ । आधुनिक तिरस्कार
१२ । संघ हा माझा आत्मा आहे
१३ । भारतातील मुस्लिमांना चार कलमी आव्हान
१४ । गुजरातमधील राज्य यंत्रणा दोषमुक्त होऊ शकत नाही
१५ । भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांची मुलाखत
१६ । १२०० वर्षे जोडणे
*● संदर्भसूची*

*आरएसएस : भारताला असलेला धोका* हा ग्रंथ आपणास हवा असल्यास त्वरित संपर्क करा.
*सनय प्रकाशन*
*८६२६०८५७३४ । ९०९६५९६७६८ (w)*
*८१८००३१७३४ । ८६५२१२१९१२ (w)*
*९८६०४२९१३४ । ८१८००३१७३३*
https://www.sanaybooks.com
●●●

Address

Anandwadi Road
Narayangaon
410504

Alerts

Be the first to know and let us send you an email when SANAY Publications posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SANAY Publications:

Videos

Share

Category


Other Publishers in Narayangaon

Show All