17/12/2022
Gairee
आदिवासी प्रश्नांची कास धरून हलक्या फुलक्या पण काहीसा द्विअर्थी विनोदाची झाल्लर असलेला नांदेडचा चित्रपट "गैरी"
नांदेडचा मराठी चित्रपट सर्व महाराष्ट्रात प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे, त्यासाठी दिग्दर्शक Pandurang Jadhav सरांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार की ज्यांनी आपल्या आदिवासी बांधवांची समस्या "गैरी" चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही समिक्षा म्हणून नव्हे तर चित्रपटाबद्दल ज्या काही गोष्टी मला आवडल्या किंवा जाणवल्या त्या (Review स्वरूपात) आपल्यासमोर शेअर करण्याचा मी प्रयत्न करतोय.
0) सर्व प्रथम तर नांदेडच्या मुकुटात अजून एक मानाचा तुरा लावल्याबद्दल निर्माते बियाणी सर आणि जाधव सरांचे खूप खूप धन्यवाद. या चित्रपटाची निर्मिती बाजू पाहिजेत तशी झालीय. ह्या मध्ये पांडुरंग जाधव सरांच कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण त्यांचं स्ट्रगल मी जवळून बघितलं आहे, कुठल्या कुठल्या डोंगर अडचणीचा सामना करून त्यांनी ही फिल्म पूर्णत्वाला नेली ह्याचा मी आणि माझा सर्व मित्र परिवार साक्षीदार आहे.
1) सर्व नांदेडच्या कलाकारांचे काम चांगले झाले आहे, विशेषतः ज्यात आमचा मित्र Ravi Jadhav (राडा फेम) ह्याने आपल्या भावनिक अभिनयाची चुणूक दाखवून देत प्रेक्षकांची मने जिंकली. प्रोफेशनल कलाकारांची अक्टिंग स्कूल नेमकी कोणती असेल हा प्रश्न मला मराठी सिनेमा पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न अधून मधून करत असतो. आपल्या हीरोने आदिवासी जगण्याचा आणि बोलण्याचा अभ्यास कसा व किती केला असेल रामजाने.
2) तांत्रिक आणि कलात्मक दृष्ट्या हा चित्रपट आपल्याला मोहित करतो, सुंदर लोकेशन, सेट व त्याचे त्याहूनही सुंदर चित्रीकरण नांदेडचे वैभव वाढवते विशेषतः आदिवासी भागातील घरं, डोंगर, रस्ते, नदी तलाव, ते वातावरण प्रेक्षक घरी घेवुन जातात. शहरी भागातील कॉलेज रस्ते गल्ल्या आणि हॉस्टेल सुंदर चित्रीत केल्या आहेत, पण त्यातल्या काही फ्रेम repeated झाल्या तर काही compositions उन्निसबिस झाल्या आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. एकंदरीत ते जग आपल्याला त्या अवकाशात घेवुन जातं.
3) Pandurang Jadhav सरांचे दिग्दर्शन कथेला अनुसरून आहे, बऱ्याच दृषात दिग्दर्शकाची कल्पक बुद्धी आपल्याला दिसून येते उदा. एका दृश्यात मुत्थू एका मुलीला गुलाबाचे फूल देतो ज्यात फक्त दोनच पाकळ्या उरतात ज्या त्या दोघांना दर्शवतात पण ती नाही म्हटल्या नंतर त्यातली एक पाकळी गळून पडते. ह्या दृषामध्येही पात्र काही न बोलताही प्रेक्षकांना खूप काही सांगून जातात व 'चित्र'पट ह्या शब्दाला न्याय मिळतो.
4) चित्रपटातील सर्व गाणे छान झाले आहेत, ज्यात अटम् बॉम्ब ह्या गाण्याचा ताल मांडीवर ठेका धरायला व त्याच्या तालावर मान थिरकावयाला भाग पाडतो. पण काही गाणे कथेच्या प्रवाहाला मारक ठरतात. प्रेमगीत श्रवणीय आहे पण ते लक्षात राहत नाही.
5) एडिटिंग छान झालं आहे पण काही दृश्य थोडे शार्प झाले असते तर कथेचा flow अजून smooth झाला असता, पण तरीही Transition, bridges smooth वाटतात, फक्त deadzone (acts) sharp असायला हवे होते.
6) लिखाणाबद्दल बोलायचे झाल्यास, कथा बीज छान आहे, एक आदिवासी मुलगा आपल्या ग्रामीण भागाच्या कल्याणासाठी डॉक्टर होवू इच्छितो, या आधी आदिवासी भागातील कथा किंवा समस्या मुख्यधारांमधून मांडताना कोणी दिसत नाही, ईक्का-दुक्का असेलही पण निदान माझ्या बघण्यात तरी नाही, त्यासाठी लेखकाचे विशेष कौतुक. कथेची मांडणी अजून थोडी प्रभावी हवी होती, मुख्य पात्रांचा त्यासाठी चाललेला संघर्ष थोडा अटीटतीचा हवा होता, कथेचा setup, कथेचा प्लॉट, पात्रांची रचना त्यांची भाषा किंवा त्यांची कास्टींग believable केल्याने प्रेक्षक त्या पात्रांशी व कथेशी emotionally attached व्हायला मदत होते, कथेमध्ये stake high असल्याने ध्येतप्राप्ती साठी नायकाचा strugle बघायला उत्कंठा वाढते.
7) चित्रपटामध्ये मुख्य पात्रांचा प्रवास हळू हळू पुढे सरकतो, खेळी मेळीतून किंवा कुरघोड्या करत नायक कॉलेजमध्ये रमतो प्रामाणिक आणि अभ्यासू वृत्तीने नायक आपले यश संपादन करत असतो प्राध्यापकाच्या मनात घर करतो, प्रेमात पडतो, एक एक टप्पे चढत असतो, बऱ्याचश्या संकटातही अडकतो पण त्यातून बाहेर येण्यासाठी तो वेगळं काही करत नाही त्याच्या निर्णय शमतेचे वेगळे पहलू आपल्याला दिसत नाहीत तो फक्त बाकी पात्र जसे कथेत वाहत जातात तसा तोही वाहत जातो. कथेच्या उत्तरार्धात चढउतार वाढतात आणि नवीन बाबींचा खुलासा होतो पण त्याची पाळेमुळे पूर्वार्धात वैवस्थित पेरली तर दोन्ही भागातील काही दृश्य अजून खुलली असती.
8) मुख्य खलनायक म्हणल्या पेक्षा आपण त्याला Antagonist म्हणू जो नायकाच्या म्हणजेच protagonist च्या ध्येयात अडथळे आणतो, पण त्याच्या जवळ नायकाला विरोध करण्याचे किंवा अडथळे आणण्याचे ठोस कारण असले असते तर कथेची खोली अजून वाढली असती, व त्याने आपल्या नायकाच्या ध्येयामध्ये (goal) जर म्हणाव्या तश्या अडचणी आणल्या नाहीत आणि नायकाने त्यातून लक्षवेधक सुटका करून घेतली नाही तर त्याची संघर्षयात्रा रोमांचकारी होणार नाही आणि ज्या यात्रेत रोमांच नाही ती यात्रा फक्त एक यात्रा होईल त्याचे रूपांतर अनुभवा मध्ये होणार नाही.
9) सवांद लेखन छान झालय, कथेला पूरक आहेत पण काही ठिकाणी दृश्य विनोदी करण्याच्या प्रयत्नात त्यातील प्रभाव कमी होवून काही दृश्य stage वाटतात. काही दृश, त्याची बांधनी आणि संवाद सशक्त आणि कॉम्पॅक्ट हवी होती.
- शेवटी सांगायचे झाले तर आदिवासी जगण्यावर खूप कमी चित्रपट बनतात वा नसतातच त्यासाठी ह्या प्रयत्नाला तुम्ही दुर्लक्षित करून चालणार नाही, आपल्या आदिवासी बांधवांसाठी व निर्माते-दिग्दर्शकाच्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी हा चित्रपट तुम्ही एकदातरी नक्की बघू शकता वा बघायलाच पाहिजेत, विषयधनाची कास धरून हलक्या फुलक्या पण काहीसा द्विअर्थी विनोदाची झाल्लर असलेला हा नांदेडचा चित्रपट "गैरी" तुम्हाला निराश तर नक्कीच नाही करणार...............अमोल जैन, Bigshot Cinema Nanded.