13/10/2017
आपली बुध्दी स्वतंत्रपणानं वापरणं,हे अनेक माणसांना अवघड वाटतं,जड जातं,हे मात्र खरं आहे. तसं करणं त्यांना असुरक्षितपणाचं वाटतं.त्यामुळं स्वतःच्या डोक्यावर जबाबदारीचं ओझं येतं.अपयशाची,पराभवाची भिती वाटते.त्यामुळं चाकोरीचा सुरक्षित मार्ग स्वीकारुन सुखा समाधानानं जगावं,असं त्यांना वाटतं.पण अशा प्रकारचं सुख समाधान हा आपल्या मानव्याचा अपमान आहे, असं मानुन जे लोक स्वातंत्र्या बरोबर येणारं जबाबदारीचं ओझं पेलायला सज्ज होतात,तेच इतिहास घडवतात.समाजाला नवं वळण लावतात. मानवी संस्कृतीवर आपला ठसा उमटवतात.समाज अशा लोकांकडं आधी संशयानं पाहतो,त्यांना विरोध करतो,पण नंतर तो त्यांनाच अभिमानानं डोक्यावर घेऊन नाचतो आणि कृतज्ञतेनं त्यांच्यापुढं नम्रही होतो.
- डॉ.आ.ह.साळुंखे