Voice of Nanded

Voice of Nanded Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Voice of Nanded, Social Media Agency, Nanded.

https://aimamedia.org/newsdetails.aspx?nid=238905&y=1
01/04/2024

https://aimamedia.org/newsdetails.aspx?nid=238905&y=1

इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षातर्फे वसंतराव बळवंतराव चव्हाण यांनी आर्ज दाखल केले

नांदेड विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत  नांदेड, दि. 10 : हिंगोली येथील रामलीला मैदानावर आयोजित “शासन आपल...
10/03/2024

नांदेड विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत

नांदेड, दि. 10 : हिंगोली येथील रामलीला मैदानावर आयोजित “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळावर दुपारी 2.15 वाजता आगमन झाले. हिंगोली येथील कार्यक्रमासाठी ते आले आहेत. नांदेड येथे विशेष विमानाने आल्यानंतर विमानतळ येथील कक्षात पदाधिकारी यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर हेलिकॉप्टरने ते हिंगोलीकडे रवाना झाले.

यावेळी नांदेड विमानतळावर खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

https://aimamedia.org/newsdetails.aspx?nid=211759
07/03/2024

https://aimamedia.org/newsdetails.aspx?nid=211759

छत्रपती शिवरायांच्या जीवनाचे दर्शन घडवणारे शिवगर्जना महानाट्य कुटुंबासोबत बघा : जिल्हाधिकारी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर स्वागत नांदेडवरून चेन्नईला रवाना नांदेड दि. 4 :  श्री. गुरु गोविंदसिंघ...
04/03/2024

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

नांदेडवरून चेन्नईला रवाना

नांदेड दि. 4 : श्री. गुरु गोविंदसिंघजी नांदेड विमानतळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज दुपारी दोनच्या सुमारास आदीलाबादवरून आगमन झाले. विमानतळावर मान्यवरांनी स्वागत केल्यानंतर लगेच त्यांनी विशेष विमानाने चेन्नईकडे प्रयाण केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तेलंगणातील आदीलाबाद येथील एका सार्वजनिक सभेसाठी आज सकाळी नागपूर येथून हेलिकॉप्टरने उपस्थित झाले होते. त्याच हेलिकॉप्टरने ते नांदेड विमानतळावर आले. नांदेडवरून विशेष विमानाने ते चेन्नईकडे रवाना झाले.

विमानतळावर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, खा. हेमंत पाटील, खा. डॉ. अजित गोपछडे, आ. राम पाटील रातोळीकर, आ. तुषार राठोड,आ. राजेश पवार, आ.श्यामसुंदर शिंदे, आ. बालाजी कल्याणकर,नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

(दिनेश कवडे) - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, अंतर विभागीय नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी नांदेड विभागात अत्यंत जल्ल...
06/01/2024

(दिनेश कवडे) - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, अंतर विभागीय नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी नांदेड विभागात अत्यंत जल्लोषात संपन्न झाली या स्पर्धेत सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने “जिथे राबती हात”, पुणे विभागाच्या वतीने “गटार”, रत्नागिरी विभागाच्या वतीने “किनारा”, लातूर विभागाच्या वतीने “आर्धा कोयता”आणि नांदेड विभागाच्या वतीने “खेळीया” अश्या एकूण पाच नाट्य प्रयोगांचे सादरीकरण झाले.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी दत्ता भगत यांच्या “खेळीया” या नाट्यप्रयोगाचे सादरीकरन झाले. प्रा. दत्ता भगत यांच्या इतर नाटका प्रमाणेच “खेळीया” हे नाटक त्या काळी समीक्षक, रंगकर्मी, प्रेक्षक या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेलं हे नाटक बर्याच कालावधीनंतर नांदेडकर रसिकांना अनुभवता आले.
हि कथा एका दलित युवकाची आहे जो एका ब्राम्हण समाजाच्या घरी लहानाचा मोठा होतो, संस्कारी होतो यात त्या ब्राम्हण कुटुंबाचा खूप मोठा वाटा असतो. नारायण दलित असतानाही त्याला देव घरापर्यंत प्रवेश करण्याची मुभा असते ते कुटुंब नारायणला स्वतःचे कुटुंब वाटत असते घरातील प्रत्येक काम तो चोखंदळ पणे करत असतो. कालांतराने तो याच कुटुंबाच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात जातो, राशनच दुकान मिळवतो, मोठा होतो पण त्याच मोठेपण खुपायला लागत आणि नंतर सुरु होतो त्याच्या विरोधातल राजकारण...आणि त्यात त्याचा अंत होतो.
या नाटकाचे पार्श्वसंगीत काळानुरूप साकारले असते आणि त्याचे टायमिंग जुळवले असते तर नाटकची उंची वाढवण्यास त्याची मदत झाली असती. किशोर चावरे आणि रुपेश सावंत यांनी प्रकाशयोजना साकारली. गणेश दिगांबर कळसे, नरसिंग सिंघीतम, मुक्तार अहमद अब्दुल कादर यांनी वास्तववादी स्वरूपाचे नेपथ्य साकारले पण नेपथ्याचा पुरेपूर वापर होताना दिसत नाही. रंगभूषा आणि वेशभूषा कल्पना मोरे आणि गजानन रायलवार यांनी आशयानुरूप साकारली.
यात गणेश कदम यांनी साकारलेला भास्कर, श्रीहरी पांचाळ यांनी साकारलेला अण्णा, सचिन सुवर्णकार यांनी साकारलेला कासारे हे लक्षवेधी ठरले. तर राजेशकुमार मंठाळकर, आनंद कदम, नागेश अमिलकंठवार, सुरजकुमार अवस्थी, सविता निलेवाड, प्रदीप कदम यांनी भूमिका साकारल्या.
एकंदर स्पर्धेत विविध आशय विषय असलेल्या नाट्य प्रयोगाचे नांदेकर रसिक प्रेक्षकांना आनंद घेता आले.

रात्री उशिरा या स्पर्धेचा निकाल लागला.
प्रथम क्रमांक :- नाटक – किनारा (रत्नगिरी विभाग )
द्वितीय क्रमांक :- नाटक – जिथे राबती हात (सिंधुदुर्ग विभाग)

सोशक आणि सोशीत यांच्यातील संघर्ष मांडणारे नाटक म्हणजे “आर्धा कोयता”(दिनेश कवडे)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अ...
05/01/2024

सोशक आणि सोशीत यांच्यातील संघर्ष मांडणारे नाटक म्हणजे “आर्धा कोयता”

(दिनेश कवडे)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर विभागीय नाट्यस्पर्धा अंतिम फेरी नांदेड येथे कुसुम सभागृहात संपन्न होत आहे. आतापर्यंत या स्पर्धेत चार नाटके सादर झालीत. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी लातूर विभागाच्या वतीने पांडुरंग वाघमारे लिखित, जनार्धन तळीखेडे दिग्दर्शित “आर्धा कोयता” या नाटकाचे सादरीकरण झाले.
हि कथा एका राधा नावच्या पात्राभोवती गुंफवण्यात आली आहे. तिचा नवरा खदाणीच्या कामात बारूद लावताना स्फोटात मरण पावतो. जगण्यासाठी धडपडत असताना उस टोळीचा मुकादम गुंडाजी तिच्यावर वाईट नजर ठेऊन असतो आणि तिला प्रामाणिक मदत करणारा राहुल तिला वेळोवेळी सतर्क करत असतो. गुंडाजी राधाला आपल्यासोबत आपल्या उस तोडीच्या टोळीसोबत येण्यास सांगतो, सोबत राहुलही असतो. गुंडाजी राहुलला आपल्या कामावरून जाण्यास सांगतो, तेंव्हा सगळी टोळी बंड करते. हि गोष्ठ सेठजिला कळते गुंडाजीच खर रूप उघड होते आणि सेठ गुंडाजीलाच कामावरून काढतात आणि राहुलला मुकादम करतात याचा राग धरून गुंडाजी एक दिवस राधावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा हातातल्या कोयत्याने राधा गुंडाजीचा वध करते.
या नाटकाचे नेपथ्य अनिल लांडगे, तुकाराम सगर, शिवशंकर स्वामी यांनी कल्पकतेचा वापर करत वास्तववादी स्वरूपाचे साकारले तर मुक्ताराम खलसे यांची प्रकाशयोजना आशयपूर्ण होती पण काही काही प्रसंगात कलावंत अंधारात जात होते त्यामुळे दृश्यमानता परिणामकारक होण्यास अडथळा निर्माण होत होता. नाटकाचे पार्श्वसंगीताचा दोन दृश्यांच्या मध्ये त्यांचा दुआ म्हणून कार्य होणे अपेक्षित असते परंतु काही दृश्यामध्ये नेमक त्याच वेळेस संगीत अपुरे पडत होते. विलास देशमुख आणि देवानंद सूर्यवंशी यांनी साकारलेलं रंगभूषा वेशभूषा आशयानुरूप होती.
यातील गुंडाजीची भूमिका साकारणार दत्तात्रय गायकवाड, राधाची भूमिका साकारणारी प्रीती ठाकूर आणि राहुलची भूमिका साकारणारा तात्याराव पांचाळ यांनी आप आपल्या पात्रांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. यात सिद्धार्थ सूर्यवंशी, अरविंद वाघमारे, जनार्धन तळीखेडे, पांडुरंग वाघमारे, शिवशंकर स्वामी, जनार्धन माने, उषा खंदारे, शिवाजी कोंडमगिरे, अश्विनी सूर्यवंशी, तुकाराम सगर, राजगिरे द. कि., बालाजी डवरे, मुक्ताराम खलसे, स्वाती कालेकर यांनी अप आपल्या भूमिका साकारल्या.
एकंदर स्पर्धेच्या चौथ्या दिवशी ग्रामीण बाज असलेल उत्तम नाटक रसिकांना अनुभवता आले.

“किनारा” नाटकाने वाढवली स्पर्धेत चुरसनांदेड (दिनेश कवडे)- जयवंत दळवी यांच्या “किनारा” या अजरामर कलाकृतीचे सशक्त सादरीकरण...
03/01/2024

“किनारा” नाटकाने वाढवली स्पर्धेत चुरस

नांदेड (दिनेश कवडे)- जयवंत दळवी यांच्या “किनारा” या अजरामर कलाकृतीचे सशक्त सादरीकरण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर विभागीय नाट्य स्पर्धा अंतिम फेरीत रत्नागिरी विभागाच्या वतीने ३ जानेवारी रोजी, स्पर्धेच्या तिसर्या दिवशी सादरीकरण झाले.
बायको आणि बायका, प्रेम आणि शरीर सुख यातील फरक करता नाही आले तर संसाराची कशी वाताहात होते हे या नाटकातून उमजते. किनारा नाटकातील शिरुभाऊ आपल्या पेक्षा पाच वर्षांनी मोठ्या असलेल्या पत्नीला जीजीला एकटीला सोडून शेलजा या पत्रासोबत संबंध ठेवतात आणि आपले कर्तव्य विसरून जातात. घरातील दुषित वातावरणामुळे शिरुभाऊचा मुलगा यदु व्यसनाधीन होतो. कालांतराने शैलजा शिरुभाऊला सोडून जाते कारण शिरुभाऊ आता शरीरसुख देण्यास असमर्थ होतात त्यांना आर्धांग वायू चा झटका येतो. पण अश्या अवस्थेत हि जीजी त्याना स्वीकारते. बायको आणि बायका यातील फरक कळण्यासाठी जीवावर बेताव लागत. जुन्या गोष्टी विसरल्याने आणि माफ केल्याने कुटुंब टिकत. असा निर्मल संदेश देत एका स्त्रीच्या मनाची व्याप्ती हे नाटक मांडते.
या नाटकाचे नेपथ्य प्रवीण बापर्डेकर, विजय मेस्त्री, रवींद्र तेरवणकर, यांनी वास्तववादी स्वरूपाचे आशयपूर्ण नेपथ्य साकारले. तर सचिन बारगुडे यांचे संगीत विषयानुरूप होते पण काही काही प्रसंगात तिचा परिणाम जास्त झाला त्यामुळे कलावंतांच्या संवाद आणि त्यांच्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यास अडथळा निर्माण होत होता. या नाटकाची जमेची बाजू म्हणजे राजेश कीर यांची प्रकाश योजना, प्रकाशयोजने मुळे नाटकाने चांगलीच उंची गाठली आणि यास साथ मिळाली ती कलावंतांची श्रद्धा मयेकर यांनी साकारलेली जीजी हे मंत्रमुग्ध करते तर तिच्या तोडीस तोड प्रशांत आडिवरेकर शिरुभाऊ साकारतात. फडके ची भुमिक नंदकुमार भारती आणि शामा ची भूमिका साकारणारी सुप्रिया शिवलकर यांचा सहज सुंदर अभिनय, भाग्यश्री अभ्यंकर यांनी साकारलेली शैला या सर्वानीच आप आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. यात यदूची भूमिका प्रदीप घवाळी यांनी साकारली. राजेश मयेकर यांनी आपल्या दिग्दर्शनातून विषय प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी ठरले.
एकंदर स्पर्धेचा तिसरा दिवस इतर स्पर्धकांना हूड हुडी भरवणार ठरला.......

समाज व्यवस्थेवर भाष्य करणारे नाटक “गटार”नांदेड-(दिनेश कवडे)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, अंतर विभागीय नाट्य स...
03/01/2024

समाज व्यवस्थेवर भाष्य करणारे नाटक “गटार”

नांदेड-(दिनेश कवडे)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, अंतर विभागीय नाट्य स्पर्धा अंतिम फेरीत दुसर्या दिवशी पुणे (मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी) च्या वतीने वीरेंद्र गणवीर लिखित शशिकांत गायकवाड दिग्दर्शित “गटार” या नाटकाचे सादरीकरण झाले.
मानवी मनाची घाण साफ करण्याचा प्रयत्न गटार या नाटकातून होते. गटार साफ करणार कुटुंब आणि आपला मुलगा शिकून मोठा ऑफिसर झाला पाहिजे अस स्वप्न जगणारा बाप त्याचा संघर्ष व्यथा या नाटकातून मांडण्यात आले.
बाबा, अम्मा आणि रवी या तिघांचं कुटुंब बाबा हा गटार साफ करण्याच काम करत असतो त्याचा मुलगा रवी हा शिकून मोठा ऑफिसर झाला पाहिजे हे त्याचे स्वप्न. एक दिवस बाबा आणि त्याचे साथीदार यादव, गौतम गटारीत घाण साफ करताना पडतात आणि मरण पावतात. असे अनेक लोक गटार साफ करताना मृत्यू पावतात त्यांच्या व्यथा मांडणारे, समाज व्यवस्थेवर असूड ओढणारे हे नाटक. खरेतर गटारीचे काम यंत्राने झाले पाहिजे असा आदेश असताना हि आजही अनेक कर्मचारी गटारीत उतरून घाण साफ करतात आणि त्यात त्यांचा मृत्यू होतो. असे कर्मचारी देशासाठी काम करताना मृत्यू पावले आहेत. त्यांना श्हीदाचा दर्जा मिळावा ते एक प्रकारे श्हीदच झाले आहे असे भाष्य हे नाटक करते.
मनोज शिरसाट, महेश कांबळे आणि सुनील यांनी वास्तववादी नेपथ्य साकारले, मागच्या बाजूस साकारलेला रस्ता त्याची उंची यामुळे कलावंताना त्यावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मेहनत घ्यावी लागत होती. त्यात सहजता निर्माण होण्याच्या दृष्टीने नेपथ्य साकारणे गरजेचे होते. किंवा तश्या हालचाली दिग्दर्शकाने देणे गरजेचे होते. यामुळे नाटकाची गती मंदावते. प्रकाशयोजना या नाटकाची जमेची बाजू म्हणता येईल पण काही काही प्रसंगात कलावंताच्या जागा चुकल्यामुळे त्याचीही परिणाम कारकता साधता आले नाही. मोजकेच आणि प्रसंगानुरूप संगीत नाटकाची उंची वाढवण्यास मदत करते.
या नाटकातील बाबा ची भूमिका साकारणारे संदीप अवघडे, अम्मा- कल्पना बहुले, रवी- शशिकांत गायकवाड यांनी आप आपल्या पात्रांना न्याय देण्याचा प्रयत्न केला तर यादव- रवींद्र तुपे, शैला – कविता कोळी यांनी भूमिका साकारल्या.
एकंदर स्पर्धेच्या दुसर्या दिवशी सामाजिक आशय, विषय असलेल्या नाटकाचा आनंद रसिकांना घेता आला.

प्रेक्षक जातात भक्तीत वाहात, पाहून नाटक “जिथे राबती हात”महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आयोजित ५१ वी अंतर विभागीय ...
02/01/2024

प्रेक्षक जातात भक्तीत वाहात, पाहून नाटक “जिथे राबती हात”

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आयोजित ५१ वी अंतर विभागीय नाट्य स्पर्धा २०२३-२४ ची अंतिम फेरी नांदेड येथे कुसुम सभागृहात संपन्न होत आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने विलास खानोलकर लिखित, गणपत घाणेकर दिग्दर्शित "जिथे राबती हात" या नाट्य प्रयोगाचे उत्तम सादरीकरण झाले.
संत सावता माळी यांच्या जीवन प्रसंगावर आधारित हे नाटक अनेक अभंगाचा आधार घेत पुढे सरकते. सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. 'आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत' असे ते एका अभंगात म्हणतात. शेतात आढळलेला दगड ते एका झाडाखाली ठेवतात लोक त्यास पूजू लागतात त्यांच्या अशा कारणामुळे गावात रोगराई पसरली असे गावातील लोकांना वाटते आणि हे रोग राई दूर करण्यासाठी देवास बकरे कोंबडे कापण्याचे गावकरी ठरवतात पण यास संत सावता माळी यांचा विरोध असतो म्हणून गावकरी संत सावता माळी यांना विविध प्रकारे त्रास द्यायला सुरुवात करतात. सावता माळी यांच्या छोट्याशा मुलीच्या भक्ती पाई विठ्ठू रुक्मीणी प्रत्यक्ष तिला दर्शन देतात आणि नाटक इथे संपते.
यात नाटकात अनेक अभंगाचा वापर केल्यामुळे स्वाभाविक संगीताची गरज भासते या नाटकाचे पार्श्वसंगीत नागेश तेली, धोंडीराम सावंत, संतोष बोडेकर यांनी साकारले. संगीतामुळे आणि कलावंताच्या गायनामुळे नाटकाची उंची वाढते, नाटकाचा विषय पुढे जाण्यास मदत होते पण संगीत हे नाटकाशी पूरक असेल तरच नाटकाचा आशय फुलतो पण काही काही प्रसंगात संगीताचा अतिरेक झाल्याचे जाणवते.
या नाटकात अनेक स्थळ आहेत पण वास्तववादी स्वरूपात दत्ताराम कुळे आणि हरेश खवणेकर यांनी साकारलेल्या नेपथ्यामुळे कलावंतांच्या हालचालीवर बंधने येत होते असे जाणवत होते. प्रकाशयोजना आशयपूर्ण साकारण्याचा प्रयत्न झाला. रंगभूषा, वेशभूषा आशयानुरूप साकारली.
यात संत सावता माळी यांची भूमिका साकारणार्या मारुती मैस्त्री या कलावंताने आपली भूमिका लीलया पेलली तर प्रमोद तांबे यांनी साकारलेला पाटील, प्रसाद लाड यांनी सकालेला वारकरी, कीर्तनकार हे लक्षवेधी ठरले. यात दत्ताराम कुळे, दीपक कानसे, गणपत घाणेकर, बालकलावंत कु. रितिका सावंत, प्रकाश वालावलकर, संजय ढोलये, सुविधा कदम, हरेश खवणेकर, विनायक शेट्ये, मयूर जांभवडेकर, अविनाश सावंत, संतोष बोडेकर, अशा तांबे या सर्वांनी आप आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ गेली ५० वर्ष्यापासून नाट्य स्पर्धा राबवते आणि त्यात अनेक कर्मचारी सहभाग घेतात, आणि रंगचळवळ पुढे नेतात हेच कौतुकास्पद आहे. एकंदर स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भक्तिमय वातावर निर्माण करणारे नाट्य प्रयोग नांदेडकर रसिकांना अनुभवता आले.
आज दि. २ जानेवारी रोजी पुणे विभागाच्या वतीने “गटार” या नात्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.
उद्या दि. ३ जानेवारी रोजी रत्नागिरी विभागाच्या वतीने “किनारा” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.


दिनेश कवडे

https://aimamedia.org/newsdetails.aspx?nid=180396
12/12/2023

https://aimamedia.org/newsdetails.aspx?nid=180396

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात त्वचा व गुप्तरोग विभागाचे विस्तारीकरण

https://aimamedia.org/newsdetails.aspx?nid=180132&y=1
11/12/2023

https://aimamedia.org/newsdetails.aspx?nid=180132&y=1

नांदेड (प्रतिनिधी)- शहरात अनधिकृत बांधकामाचे मजल्यावर मजले चढत असताना महानगरपालिका केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. .....

https://aimamedia.org/newsdetails.aspx?nid=179648
08/12/2023

https://aimamedia.org/newsdetails.aspx?nid=179648

अभ्यासासोबत खेळांनाही महत्व द्या - मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

https://aimamedia.org/newsdetails.aspx?nid=178946&y=1
05/12/2023

https://aimamedia.org/newsdetails.aspx?nid=178946&y=1

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे प्रशासनाकडून सोडण्यात येणाऱ्या अतिरिक्त .....

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन व परळीकडे...
05/12/2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन व परळीकडे प्रयाण

नांदेड (जिमाका) दि. 5 :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज नांदेड विमानतळ येथे आगमन झाले. माजी मंत्री पंकजा मुंडे याही सोबत होत्या.

आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

परळी येथील नियोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी नांदेड विमानतळ येथून हेलिकॉप्टरने परळीकडे प्रयाण केले.

“रायगडाला जेंव्हा जाग येते” या नाट्य प्रयोगाने होणारे स्पर्धेला सुरवात.नांदेड दि. २१ -महाराष्ट्र शासन संस्कुतिक कार्य सं...
20/11/2023

“रायगडाला जेंव्हा जाग येते” या नाट्य प्रयोगाने होणारे स्पर्धेला सुरवात.

नांदेड दि. २१ -महाराष्ट्र शासन संस्कुतिक कार्य संचालनालय आयोजित ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा नांदेड केंद्रावर “रायगडाला जेंव्हा जाग येते” या वसंत कानेटकर लिखित आणि मीनाक्षी पाटील दिग्दर्शित ऐतिहासिक नाटकाने होणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा-नांदेडच्या वतीने या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. तब्बल बारा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत, गटार, वाडा,मयतीम्होर्ल आग्टं, महात्मा कांबळे, गंमत असते नात्याची, नेकी, मंतरलेली चेत्रवेल, दि अनॉनिमस, खंडहर, कथा मुक्तीच्या व्यथा मातीच्या, चिरंजीव अश्या विविध आशय, विषय असलेल्या नाट्य प्रयोगांचे नांदेडकर रसिक प्रेक्षकाना रस आस्वाद घेता येणार आहे. हि स्पर्धा दि. २१ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर या कालावधीत कुसुम सभागृह, नांदेड येथे रोज सायंकाळी ७:०० वाजता संपन्न होणार आह.

राज्य नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक....
17/11/2023

राज्य नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक....

विकसीत भारतासाठी दुर्गम भागातीलआदिवासींच्या विकासावर शासनाचा प्रामुख्याने भर-   पालकमंत्री गिरीश महाजन   ·  “विकसीत भारत...
15/11/2023

विकसीत भारतासाठी दुर्गम भागातील
आदिवासींच्या विकासावर शासनाचा प्रामुख्याने भर
- पालकमंत्री गिरीश महाजन

· “विकसीत भारत संकल्प यात्रा” मोहिमेचा किनवट येथे शुभारंभ

नांदेड, (जिमाका) दि. 15 :- आजवर जे वंचित घटक विकासाच्या प्रवाहात येऊ शकले नाहीत, अशा दुर्गम आदिवासी भागातील लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यावर आपण भर देत आहोत. प्रत्येक व्यक्तींच्या गरजेनुसार ज्या योजना त्यांना योग्य असतील अशा योजना साकारलेल्या आहेत. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंत, स्वयंरोजगारापासून कृषी पर्यंत विविध योजनांचा समावेश आहे. या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी आहे. शासकीय योजनाप्रती सकारात्मकता ठेऊन त्या-त्या योजनांचा लाभ घेतल्यास भारताला विकसीत देशाच्या क्रमवारीत येण्याला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

“विकसीत भारत संकल्प यात्रे”च्या किनवट येथील शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार भिमराव केराम, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, गोकुंदा येथील सरपंच अनुसया सिडाम, सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, सुधाकर भोयर व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आदिवासी समाज हा राना-वनात राहणारा आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात आदिवासी समाजानेही मोठे योगदान दिले आहे. भगवान बिरसा मुंडा, तंट्ट्या भिल्ल, तेलंगा ख‍डीया, वीर नारायण सिंह, जत्रा भगत, अल्लूरी राजू, बुधू भगत या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी आपले योगदान दिले आहे. जल, जमीन, जंगल यांच्या रक्षणासाठी आदिवासी बांधवांनी मोठी भूमिका पार पाडली आहे. आदिवासींच्या विकासासाठी विविध विकास योजना प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज आहे. या यात्रेतून दुर्गम भागातील प्रत्येक गावात ज्या आदिवासींना आजवर कोणत्या योजना मिळाल्या नाहीत अशा लाभार्थ्यांची निवड करून त्यांना त्या-त्या योजनांचा लाभ देण्याच्या कामास निश्चित गती मिळेल, असा विश्वास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून “विकसीत भारत संकल्प यात्रा” होत असून केंद्र सरकार, राज्य सरकार यासाठी कटिबद्ध होऊन काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. उज्ज्वला सारखी योजना, आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपण देवू शकलो, असे ते म्हणाले. प्रत्येक वाड्या-पाड्यांवर आदिवासी वस्तींवर शुद्ध नळाचे पाणी पोहोचले पाहिजे यासाठी “हर घर नल से जल” ही योजना त्यांच्याच दूरदृष्टीतून साकारली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 50 लाखांपेक्षा अधिक आदिवासींना लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सुमारे 1 कोटी 50 लाखांपेक्षा अधिक कुटुंबियांना शासन शौचालय देवू शकले. शासकीय योजनांद्वारे झालेले हे मोठे परिवर्तन आहे, असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

यावेळी आमदार भिमराव केराम, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या देशव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी झारखंड राज्यातून दूरदृष्यप्रणालीद्वारे केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
छाया :- सदानंद वडजे, नांदेड.

नांदेड केंद्रावरील स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर
15/11/2023

नांदेड केंद्रावरील स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

राज्य नाट्य स्पर्धा २१ नोव्हेंबर पासून, नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर.

 #नांदेडकर रसिक प्रेक्षकांसाठी विशेष मेजवानीवीरेंद्र गणवीर लिखित दिग्दर्शित सुप्रसिद्ध दोन नाट्यप्रयोगांचे सादरीकरण.... ...
13/10/2023

#नांदेडकर रसिक प्रेक्षकांसाठी विशेष मेजवानी
वीरेंद्र गणवीर लिखित दिग्दर्शित सुप्रसिद्ध दोन नाट्यप्रयोगांचे सादरीकरण....
#बुद्धिस्ट थिएटर फेस्टिवल....
दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी,
रात्री ठीक 8:00 वाजता.
स्थळ: कुसुम सभागृह नांदेड.

 #चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी यांची प्रकट मुलाखत नांदेडकर रसिक प्रेक्षकांनी अवश्य यावे...दिनांक 13 ऑक्टोबरसायंका...
13/10/2023

#चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी यांची प्रकट मुलाखत
नांदेडकर रसिक प्रेक्षकांनी अवश्य यावे...
दिनांक 13 ऑक्टोबर
सायंकाळी 6:00 वाजता.
स्थळ: कुसुम सभागृह नांदेड.

*डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गत 24 तासात 134 रुग्ण बरे होऊन परतले घरी* ▪️47 रुग्णांवर शस...
06/10/2023

*डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गत 24 तासात 134 रुग्ण बरे होऊन परतले घरी*

▪️47 रुग्णांवर शस्त्रक्रिया
▪️819 रुग्णांवर उपचार
▪️रुग्णालयामध्ये भरती रुग्ण 768

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकुण 819 रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला. सद्यस्थितीत 768 रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. मागील 24 तासात म्हणजेच दि. 4 ऑक्टोंबर ते 5 ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकुण 136 नवीन रुग्णांची भरती झालेली आहे. या 24 तासात 134 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, याचबरोबर या 24 तासात 11 अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 3 नवजात बालक (पुरुष जातीचे 1, स्त्री जातीचे 2 ) व बालक 1 (स्त्री जातीचे) व प्रौढ 7 (पुरुष जातीचे 6, स्त्री जातीचे 1) यांचा समावेश आहे.

गत 24 तासात एकूण 47 शस्त्रक्रिया झाल्या. यात 34 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया तर 13 रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मागील 24 तासात 23 प्रसुती करण्यात आल्या. यात 9 सीझर होत्या तर 14 नॉर्मल प्रसुती झाल्या अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
00000

*पालकमंत्री गिरीश महाजन व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास तातडीन...
04/10/2023

*पालकमंत्री गिरीश महाजन व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास तातडीने भेट देऊन पाहणी*

▪️सुधारणेसाठी काही कमी पडू दिले जाणार नाही
- पालकमंत्री गिरीश महाजन

▪️वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे तात्काळ भरले जातील
- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

नांदेड, (जिमाका) दि. 3 :- डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे गंभीर आजारी असलेली बालके दगावल्याची घटना अत्यंत दुर्देवी आहे. याची तात्काळ गंभीर दखल घेऊन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना सोबत घेऊन आज भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. नांदेड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल असलेल्या गंभीर आजारी रुग्णांची पाहणी करून त्यांनी वस्तुस्थिती समजून घेतली. याचबरोबर वरिष्ठ पातळीवर आढावा बैठक घेऊन निर्देश दिले.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयाच्या इमारतीत वरिष्ठ पातळीवर बैठकीत त्यांनी आढावा घेतला. या बैठकीस राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, वैद्यकीय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, सहसंचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक पातळीवर मंजूर असलेली वर्ग 4 ची सुमारे 60 कर्मचारी तातडीने भरण्याचे निर्देश वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीत दिले. याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी वर्ग 3 ची सुमारे 130 कर्मचारी भरण्याची प्रक्रिया शासन स्तरावर झाली असून ती 1 महिन्यात नियुक्त करण्याच्या सूचना आयुक्त राजीव निवतकर यांना मंत्री महोदयांनी दिल्या. वर्ग-1 व वर्ग-2 ची पदे राज्यसेवा आयोगाच्या मार्फत तात्काळ भरण्याबाबत तातडीने प्रक्रिया करण्याचेही त्यांनी सांगितले. औषधासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. या रुग्णालयातील अस्वच्छता व अल्प कर्मचारी, व्यवस्थापन याचे समर्थन करता येणार नाही. यात सुधारणा करण्यासाठी काहीही कमी पडू देणार नाही, अशी नि:संदिग्ध ग्वाही त्यांनी दिली. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या महाविद्यालयातील व रुग्णालयातील दुरावस्था, जिल्ह्यातील रुग्णांची होणारी गैरसोय याकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधले.
वेळप्रसंगी जिल्हा नियोजन विकास आरखड्यातील काही निधी हा औषध खरेदीसाठी वळविला जावा, अशी सूचना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या बैठकीत केली.

आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी बैठकीत विविध सूचना केल्या.

दिनांक 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबरच्या कालावधीत एकुण 24 अंतीगंभीर असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला. यात 12 ही नवजात शिशू होते. यातील 9 रुग्ण हे खासगी रुग्णालयातून संदर्भीत झालेली होती. पूर्ण दिवस होण्या अगोदर जन्मलेल्या या बालकांचे वजन न भरल्याने जन्मताच त्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याची वस्तुस्थिती महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांनी बैठकीत दिली. इतर 12 रुग्ण हे वयोवृद्ध होते. त्यांचा वयोगट 70 ते 80 वर्षे होता. यात 4 वयोवृद्ध हृदय विकार, 2 वृद्ध विविध अवयव निकामी झाल्याने तर 1 वयोवृद्ध विषबाधा व उर्वरीत अपघात मृत्यू असल्याची त्यांनी माहिती दिली.
00000
छाया :- सदा वडजे, नांदेड

Address

Nanded
431601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Voice of Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other Social Media Agencies in Nanded

Show All