Dhammpala

Dhammpala •••
विरहात जळतांना
मी लिहलेलं जखमांव?

आजच्याचदिवशी २८ एप्रिल १८१९ रोजी तब्बल २०५ वर्षां पूर्वी ब्रिटिश सैन्य आधीकारी मेजर जाॅन स्मिथ अजिंठाच्या जंगलात शिकारी ...
28/04/2024

आजच्याचदिवशी २८ एप्रिल १८१९ रोजी तब्बल २०५ वर्षां पूर्वी ब्रिटिश सैन्य आधीकारी मेजर जाॅन स्मिथ अजिंठाच्या जंगलात शिकारी साठी गेले असता त्यांना अजंठा मधील प्राचीन बौद्ध लेणी नजरेस पडली ह्याच दिवशी अजंठा लेणी जगासमोर आली तत्पूर्वी , तब्बल हजार वर्षांहूनही अधिक काळ ही लेणी दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली पडझड झालेल्या अवस्थेत दबलेली होती. जॉन स्मिथयांनी तत्कालीन हैदराबाद संस्थानच्या नबाबाच्या सहकर्याने उत्खनन करून या लेणी जगासमोर आणल्या. .
आज दि.२८ एप्रिल २०२४ रोजी या ऐतिहासिक घटनेस बरोबर २०५ वर्षे पूर्ण होत आहेत....!!!

एका मोठ्या कालखंडानंतर आंबेडकर निवडणुकीचे केंद्रबिंदू बनले आहे. अकोला लोकसभा मतदार संघातून बाळासाहेब आंबेडकर आणि अमरावती...
25/04/2024

एका मोठ्या कालखंडानंतर आंबेडकर निवडणुकीचे केंद्रबिंदू बनले आहे. अकोला लोकसभा मतदार संघातून बाळासाहेब आंबेडकर आणि अमरावती लोकसभा मतदार संघातून आनंदराज आंबेडकर साहेब निवडणूकीच्या रिंगणात आहेत. महाराष्ट्राचेच नव्हे तर देशभरातील सर्व प्रमुख नेत्यांच्या नजरा या दोन निवडणूकांवर लागून आहेत.

बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूकीच्या रिंगणात आहेत. या खेपेला मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण होईल, असा उमेदवार रिंगणात नाही. अकोल्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे अकोल्याचं भविष्य आता सुरक्षित हातात जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. या निवडणूकीत बाळासाहेबांची निशाणी प्रेशर कुकर आहे. हा विजय खूप गरजेचा आहे. कारण “आता नाही तर पुन्हा केव्हाच नाही” इतकी महत्त्वाची ही वेळ बनली आहे. देश एका मोठ्या संकटातून जात असून या अशा परिस्थितीत या देशातील शोषित, पिडीत, वंचित जनतेचा चेहरा म्हणून बाळासाहेबांसारखे अभ्यासू नेतृत्व संसदेत असणे महत्वाचे आहे. येत्या २६ जानेवारी २०२५ रोजी भारत देश आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करेल, तेंव्हा संसदेत बाळासाहेब आंबेडकर राहणं ही अकोलाकरांची जबाबदारी आहे.

तर अमरावती मधून आनंदराज आंबेडकर साहेब ऊभे आहेत. त्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे. आनंदराज साहेब पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सर्वेसर्वा आहेत. पीईएस ही तीच संस्था जीचं रोप बाबासाहेबांनी लावलं, वाढवलं त्या रोपाचं वटवृक्षात रूपांतर करण्याची सारी तजवीज ही करून ठेवली. आज पीईएसचा डेरेदार वटवृक्ष सांभाळणारे आनंदराज साहेब एक संधी जरूर डिजर्व करतात. आज ते स्वतः रिपब्लिकन सेनेतर्फे निवडणूक लढवतायेत. अमरावतीमधून त्यांना पाठिंबाही मिळतोय. सभांना तुफान गर्दी होते आहे. आनंदराज साहेबच इंदू मिल स्मारकाचे प्रणेते. या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं खरं आणि एकमात्र श्रेय आनंदराज साहेबांचंच. एक कुशल नेतृत्व, उत्कृष्ट संस्थाचालक, प्रेमळ व्यक्तित्व, सायंटिफिक टेंपरामेंट जपणारं नेतृत्व अमरावतीकरांनी केंद्रात पाठवलेच पाहीजे. जय भीम!

-राहूल एस.एम.प्रधान

देखावा  #भिमजयंती निम्मित सादर केला बाबासाहेबांप्रती प्रेम...आणि तो मस्त झाला सुद्धा ☺️🤟🏻Handsome शब्द वाचल्यावरच माणसां...
23/04/2024

देखावा #भिमजयंती निम्मित सादर केला बाबासाहेबांप्रती प्रेम...
आणि तो मस्त झाला सुद्धा ☺️🤟🏻

Handsome शब्द वाचल्यावरच माणसांच्या मनात गोड हसु आणि बाबासाहेबांबद्दल निखळ प्रेम्
चेहऱ्यावर हसू आल्या शिवाय राहणारच नाहि.

Handsome म्हणजेच जगातला सर्वात सुंदर व्यक्ति 🫀🥰😘
-Rahul

#जयंती 2024 #सोलापूर

 #गोरेगावात एक Atrocity चा गुन्हा दाखल झाला..सांताक्रूझ येथील उच्चशिक्षित बौद्ध तरुण ११ एप्रिल २०२४ रोजी गोरेगाव येथे Ev...
17/04/2024

#गोरेगावात एक Atrocity चा गुन्हा दाखल झाला..
सांताक्रूझ येथील उच्चशिक्षित बौद्ध तरुण ११ एप्रिल २०२४ रोजी गोरेगाव येथे Event कंपनी मध्ये Marketing Executive या पदावर रूजू झाला होता ३ दिवस काम केले त्यानंतर १४ एप्रिल आंबेडकर जयंतीच्या दिवशी सकाळी त्याच कंपनीच्या मालकांकडून या तरूणाला Whatsapp च्या संभाषण द्वारे विचारण्यात आले की तु जयभीम वाला है क्या. तो मुलगा हो बोलल्यानंतर त्याला सांगण्यात आले की Me Actually jai Bhim Wale ko job pe nahi rakhti hu...
या घटनेनंतर संबंधित मालका विरोधात Atrocity &Protection of civil Rights या कायद्याअंतर्गत गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आजही अशा पध्दतीने मुंबईसारख्या महानगरात जातीवरून उच्च शिक्षित तरुणासोबत भेदभाव केला जातोय मुळात हि घटना आंबेडकर जयंतीच्या दिवशी घडली होती कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तरुणांनी दुसऱ्या दिवशी उघडकीस आणली....
या वेळी ॲड. दिपक सोनावणे, बुध्दभूषण शिंदे, निलेश दुप्पटे,
संजय किर्तीकर, बाबा शिंदे, संतोष गंगावणे, संदेश सोनवणे, विवेक शिर्के, तसेच पिडीत कुटुंबातील सदस्य आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते...
(गोरेगाव पोलिस ठाण्याचे विशेष आभार)

टिप. (फिर्यादीची नाव आणि ओळख जाहीर केली नाही)

ॲड.दिपक सोनावणे
सामाजिक कार्यकर्ता

16/04/2024

धम्म प्रचारासाठी स्वतची मुले महेंद्र आणि संघमित्रा यांना अर्पण करणारे सम्राट अशोक.

सम्राट अशोक यांची २३२८ वी जयंती, चैत्र शुक्ल अष्टमी, १६ एप्रिल २०२४...

ज्याच्या घटनेवर चाले हे राज्य ज्ञान वैभव हे त्यालाच साज.... #जयंती
13/04/2024

ज्याच्या घटनेवर चाले हे राज्य
ज्ञान वैभव हे त्यालाच साज....

#जयंती

"कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’'- महात्मा जोतीबा फुले
11/04/2024

"कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’'
- महात्मा जोतीबा फुले

10/04/2024

जय भीम✌️

विरोधक होते म्हणून बुद्धानं कधी हार मानली नाही, दुःख केलं नाही , त्यांना संपवण्याच्या कारवाया केल्या नाहीत, आयुष्यभर त्य...
05/04/2024

विरोधक होते म्हणून बुद्धानं कधी हार मानली नाही, दुःख केलं नाही , त्यांना संपवण्याच्या कारवाया केल्या नाहीत, आयुष्यभर त्यांच्याविषयी शत्रुत्वाची भावना मनात ठेवली नाही. बुद्धावर प्रेम करणाऱ्यांची संख्या तर अमर्याद होती आणि यात राजा पासून भिकाऱ्या पर्यंत सर्व स्तरांवरचे लोक होते.
रागद्वेषापासून सुटका होण्याची आवश्यकता बुद्धानं अनेकदा बोलून दाखवली आहे. वैरान वैर वाढतं कधी शमत नाही, तर ते प्रेमानंच शमत. प्रेमानं शत्रूला जिंकता येतं, हे बुद्धाने धम्मपदात सांगितलं आहे.
साधेपणाची राहणी, जीवनाच्या गरजा आणि त्या गरजा भागविण्याची साधनं जितकी कमी तितका जगण्यातला आनंद मोठा....

नमो बुद्धाय !!!
मंगलमय सकाळ!!!

सम्राट अशोक यांचे सैन्य प्रशासन कमालीचे होते. एकंदरीत ६ पद्धतीचे सैन्य व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते.१ विभाग -नौसेना२ ...
30/03/2024

सम्राट अशोक यांचे सैन्य प्रशासन कमालीचे होते. एकंदरीत ६ पद्धतीचे सैन्य व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते.

१ विभाग -नौसेना
२ साहित्य,अन्नधान्य आणि जनावराना चारावैरण देणारा,बँड व घोड्याना प्रशिक्षण देणारा विभाग
३ विभाग-पायदळ
४ विभाग- अश्वसेना
५- रथसेना
६- हत्ती सेना.

प्रत्येक विभागात एक अध्यक्ष होता. सैन्य बळातील एका तुकडीत २०० पायदळ, १० हत्ती,१० रथ,५० अश्वरोही होते. यावर एक प्रमुख असायचा आणि असे १० कम्पनीचा प्रमुख सेनापती असे. १० सेनापती वर एक नायक असायचा. यावरून अंदाज येईल की सम्राट अशोक यांचे किती सैन्यव्यवस्थेचा कारभार होता.

#सम्राट_अशोक_जयंती
*चैत्र शुक्ल अष्टमी*
*१६ एप्रिल २०२४*

*मैत्रेय दिपक*

 #संयमी_बाळासाहेब..खरं तर ह्या निवडणुकीच्या रणधुमाळीत बाळासाहेबांच्या संयमी स्वभावाची एक बाजू उठून दिसली. मागच्या लोकसभे...
26/03/2024

#संयमी_बाळासाहेब..

खरं तर ह्या निवडणुकीच्या रणधुमाळीत बाळासाहेबांच्या संयमी स्वभावाची एक बाजू उठून दिसली. मागच्या लोकसभेला वंचित आघाडीच्या रूपाने बाळासाहेबांनी एक स्वाभिमानी राजकारण उभे केले.अनेक जागेवर लाखोंच्या वर मते घेतली तब्बल 7% मते घेणे मोठी गोष्ट होती. VBA चा वाढता प्रतिसाद बघता त्याकाळात काँग्रेस - राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते-नेत्यांनी अतिशय खालच्या पातळीवर बाळासाहेबांवर टीका केली. आज ज्यांचे उभे पक्ष भाजपचे पाय चाटत आहे ते B टीमचा शिक्का मारत होते,माध्यमात अतिशय आक्षेपार्ह फोटो मॉर्फ करून टाकले जात होते हे सगळं करणारे कोण तर पुरोगामी जे उठ सूट संविधान /अधिकार ह्यावर कोकलायचे त्यांना एका पक्षाचे स्वतंत्र राजकारण मान्य नव्हते.

गेल्या पाच वर्षात बरीच उलथापालथ झाली भाजपच्या खऱ्या B टीम कोण होत्या उभ्या देशाने पाहिल्या.पुरोगामी पक्षाचे उरले सुरले सरदार भाजपच्या उंबर्यावर आहेत ते कधीही माप उलांडून सत्तेच्या सासरी जातील.उद्धव ठाकरेंनी सेना फडणवीसांच्या सोबत कधीच फरार झाली आहे.असं सगळं चित्र असताना हे तिन्ही पक्ष आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असताना बाळासाहेब अतिशय संयमी भूमिका घेऊन भाजप विरोधात एकत्र लढले पाहिजे ह्यासाठी थांबून आहेत.

काही पाकीट पत्रकार आणि माध्यमातून जागांच्या बाबतीत उलट सुलट चर्चा पसरवल्या गेल्या 27 जागांची मागणी कधी 15 कधी 10 मनाला येल ते. शेवटी गाडी आली 4 जागांवर तिथे पण मनात खोट फक्त मोगाम बोलणं. VBA ला कोणत्या 4 जागा सोडत आहेत ह्याबद्दल कधीच स्पष्टता ठेवली नाही.

कशात काही नसताना खर्गेच्या निमंत्रणावर बाळासाहेब दादरच्या सभेला गेले.भाजप विरोधात एकत्र लढले पाहिजे अशी भूमिका मांडली.आघाडी होऊ न होऊ तुमच्या 7 जागा सांगा आम्ही पूर्णपणे काँग्रेसला मदत करू असं मोठं मन दाखवले. तिकडे छ. शाहू महाराजांना कोल्हापूरच्या जागेसाठी पाठिंबा दिला.राऊत रोज आभाळ मारतात की बाळासाहेब आंबेडकर आमच्या सोबत पाहिजेत पण हेच लोक आघाडी घटक पक्ष म्हणून कोणता निर्णय विचारत घेऊन करत नाहीत परस्पर उमेदवार घोषित करतात.म्हणजे अजून बाळासाहेब आंबेडकरांनी काय करायचं ह्यांच्यासाठी ? आता त्यांनी फक्त एवढंच म्हणायचं का की मी कोणतीच जागा लढत नाही, तुम्ही सगळ्या जागा लढा मी तुम्हाला सगळीकडे पाठिंबा देतो तुमचा प्रचार सुद्धा करतो आता हेच शिल्लक राहिले आहे.

काँग्रेस-ठाकरे-पवार ह्यांची खरंच भाजप विरोधाची भूमिका सत्याची असती तर त्यांनी आधीच सरळ ह्या ह्या चार जागा आम्ही वंचित आघाडीला देऊ इच्छितो त्यांनी तिथे कामाला लागावे असे स्पष्ट करायला पाहिजे होते.तेव्हा खऱ्या अर्थाने आघाडी करण्याची मानसिकता दिसली असती त्यात हे महाविकास आघाडीवाले सपशेल फेल झाले आहेत.वरून काही बेवडे पत्रकार ह्यात घाण करायला ठेवले आहेत.

काँग्रेसचे सोडा पण पवार आणि ठाकरे यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यांनी तरी पुढाकार घेऊन जे जागावाटपाचे भिजत घोंगडे संपवायला पाहिजे होते.भाजपची 5वी यादी जाहीर झाली हे फॉर्म भरायच्या दिवसापर्यंत फक्त बैठका घेणार असंच वाटतंय. बाळासाहेबांनी ह्यांना खूप वेळ दिला हे सगळे पैसे वाले पक्ष आहेत त्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत VBAचं तसं नाही आपल्याला तयारी करायला वेळ लागतो ह्यांच्या नादाला लागून वेळ घालवू नये.संयमाचा अंत बघणारी ही लोकं आहेत त्यांच्या मागे फरफट करण्यात अर्थ नाही.

#आपलाच_सुशांत_कांबळे..

फाल्गुनी पौर्णिमा #फाल्गुन_पोर्णिमा (फग्गुनो पुण्णमी)फग्गुनो (फाल्गुन) पोर्णिमेस तथागत भगवान बुद्धाच्या आयुष्यसतील तीन म...
24/03/2024

फाल्गुनी पौर्णिमा
#फाल्गुन_पोर्णिमा (फग्गुनो पुण्णमी)

फग्गुनो (फाल्गुन) पोर्णिमेस तथागत भगवान बुद्धाच्या आयुष्यसतील तीन महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत.

प्रथम घटना.
#तथागतांची_कपिलवस्तूस_भेट
सारीपुत्त आणि मोग्गलायन यांच्या प्रवर्तनानंतर तथागत दोन महिने राजगृहात चारिका करत राहिले.
तथागत राजगृह येथे विहार करीत असल्याचे ऐकून राजा शुद्धोधनाने संदेश पाठविला.
" माझ्या मृत्यूपूर्वी मला माझ्या पुत्रास पाहाण्याची इच्छा आहे. तथागताच्या धम्मोपदेशाचा लाभ इतरांना मिळाला परंतु पित्यास किंवा नातेवाईकास तो लाभ मिळालेला नाही."

हा संदेश घेऊन जाणारा कालुदायीन राजा शुद्धोदनाच्या राजदरबाऱ्याचा मुलगा होता.संदेशवाहक तथागताच्या सान्निध्यात जाऊन म्हणाला, "जगदवंदनिय तथागत हो,कमलपुष्प उमलण्याकरिता ज्या आतुरतेने सूर्योदयाची वाट पाहातात त्याप्रमाणे आपले पिताजी आपली वाट पाहात आहेत."
तथागतांनी राजा शुद्धोदनाची विनंती मान्य केली आणि ते अनेक शिष्यांसह राजा शुद्धोदनाच्या भेटीस कपिलवस्तूस निघाले.तथागत हळूहळू मार्गातील गावांना भेटी देत,चारिका करीत निघाले होते. तथागत भेटीसाठी कपिलवस्तूस येत आहेत हा संदेश घेऊन संदेशवाहक पुढे निघून गेला.
लवकरच ही बातमी संपूर्ण शाक्य जनपदात पोहचली.सिद्धार्थाने संबोधी प्राप्ती साठी गृहत्याग केला,संबोधी प्राप्त केल्यामुळे त्याचा हेतू सफल झाला आणि म्हणून ते कपिलवस्तूस परत येत आहेत हेच शब्द प्रत्येकाच्या ओठावर होते.
राजा शुद्धोदन आणि महाप्रजापती सर्व मंत्रीगण आणि नातेवाईकांसह आपल्या पुत्रास भेटण्यास निघाले.दुरूनच जेंव्हा त्यांनी आपल्या पुत्रास पाहिले तेंव्हा त्याचे देखणेपण, गौरवास्पद प्रतिष्ठितता आणि तेजस्विता पाहून ते थक्क झाले.त्यांचे अंतःकरण अत्यानंदाने हर्षित झाले.
आपल्या मुलाचे धार्मिक श्रेष्ठत्व जाणून शुद्धोदन रथातून खाली उतरले आणि तथागतांना वंदन करून म्हणाले, " आम्ही आपणास पाहून आता सात वर्षे लोटली आहेत,या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहात होतो."

बोधिप्राप्तीनंतर तथागताची कपिलवस्तूस ही पहिली भेट.हा दिवस फाल्गुन पोर्णिमेचा होता.याचे सविस्तर वर्णन परमपूज्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकरानी त्यांच्या ' बुद्ध आणि त्याचा धम्म ' या ग्रंथाच्या द्वितीय खंडाच्या चौथ्या भागात केलेले आहे.

दुसरी घटना.
#पुत्र_राहूलची_प्रवज्जा

महाराज शुद्धोदनानी भगवंताना आपल्या घरी आणले.घरच्या सर्व मंडळीनी व नातेवाईकांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी तथागताची माता/मावशी महाप्रजापती, तिची दोन मुले नंद व रुपनंदा, चुलते धौतोदन,शाक्योदन व अमीतोदन, त्याचे चुलत भाऊ आनंद व भद्दीय,अमितोद्दनचे पुत्र अनुरुद्ध व महानाम,आत्या अमितेचा पुत्र देवदत्त इ.सारा राजपरिवार उपस्थित होता.
मात्र या प्रसंगी यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसली होती.तथागत आपले परमप्रिय शिष्य सारिपुत्त व मोग्गलायन यांना घेऊन यशोधरेच्या दालनात प्रवेश केला.त्यावेळी यशोधरेने स्वतःच्या भावनांना आवर घातला.सात वर्षाच्या राहूलची व पित्याची भेट झाली. यशोधरने पुत्र राहूल यास पित्याकडे आपला उत्तराधिकार मागण्यास सुचविले त्यावेळी तथागत म्हणाले, " सोने, रूपे आणि रत्ने यापैकी माझ्याजवळ कांहीही नाही परंतु आध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील तर असले धन माझ्याकडे भरपूर आहे.माझे आध्यात्मिक धन म्हणजे धम्माचा मार्ग.परमोच्च आनंदाच्या प्राप्ती साठी, मनाच्या संस्काराच्या साधनेसाठी ज्यांनी आपले जीवन वाहिलेले आहे अशांच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे काय?"
" होय " बाळ राहूलने निश्चयपूर्वक उत्तर दिले. यानंतर तथागतांनी धम्मसेनापती सारीपुत्त यांना राहूलचे मुंडन करण्याचा आदेश दिला.त्यानंतर माता यशोधरेने त्यास सुगंधी उटणे लावून स्नान घातले.त्याची उंची व राजसी वस्त्रे उतरविण्यात आली,त्यास काषायवस्त्र धारण करावयास लावले व धम्मसेनापती सारिपुत्त यांनी राहूल यास श्रामणेर दीक्षा दिली.राहूल हा भिक्खूसंघातील पहिला श्रामणेर होय.

तिसरी घटना.

#सावत्रभाऊ_नंदाची_प्रवज्जा

तथागताचा सावत्र बंधु, महाप्रजापतीचा पुत्र नंद यास वैदेह नावाच्या भिक्खूकडून प्रवज्जा देण्यात आली.त्यापूर्वी तथागतांनी त्याच्या मनातील प्रतिभार आणि अनिच्छा धम्मोपदेशाने नष्ट केली होती.

अशा या तीन महत्वाच्या घटना फाल्गुन पोर्णिमेस तथागताच्या आयुष्याशी संबंधित आहेत.
संदर्भ : बौद्ध धम्मातील पौर्णिमाचा इतिहास.

संकलन : बी.एन. साळवे

 #बोल_महामानवाचे" तुमच्या हिताचे कायदे आणणे व त्याकरिता झगडणे हे माझे कर्तव्य आहे व मी ते करीन असे मी तुम्हाला आश्वासन द...
23/03/2024

#बोल_महामानवाचे

" तुमच्या हिताचे कायदे आणणे व त्याकरिता झगडणे हे माझे कर्तव्य आहे व मी ते करीन असे मी तुम्हाला आश्वासन देतो.मी माझ्या कर्तव्यास जागेन पण त्याचवेळी तुम्हीपण तुमच्या कर्तव्यास जागले पाहिजे,हे मला तुम्हाला सांगावयाचे आहे.तुम्ही आपली चळवळ जोमदार केल्याशिवाय आपल्याला यश लाभणार नाही व आपले जीवित सुखाचे होणार नाही.

तिसरा प्रश्न आपण आपल्या उन्नतीचे कार्य करीत असता आपल्यावर जो जुलूम होतो त्याचे कसे निवारण करावयाचे? तुम्हाला माहीत आहे की,आपल्या विरूद्ध सारे जग आहे आणि त्याला तोंड द्यावयाचे म्हणजे ते दोन प्रकाराने द्यावयास हवे.प्रथमतः आपण प्रत्येकाने आपल्या मनातील भिती नाहीशी केली पाहिजे.ज्या ज्या वेळी आपल्यावर कोणताही जुलूम होईल त्यावेळेस जुलूम करणाराशी दोन हात करावयास न डगमगता तयार झाले पाहिजे.काय व्हायचे असेल ते होईल त्याला भिण्याचे कारण काय आहे? तुमच्याजवळ आहे काय की ते हरपण्याची धास्ती वाटावी? तुम्ही #मरणास देखील #भिता कामा नये.इतके तुम्ही #निर्भय झालात तरच तुमच्यावरील जुलमाचा तुम्हास प्रतिकार करता येईल.

आपल्यातील तरूण माणसानी आपल्या पेहरावात सुधारणा करायला हवी.धोतराच्या ऐवजी आखुड तुमान व अंगात एक कुडते म्हणजे स्काऊटचा ड्रेस केला पाहिजे.१८ वर्षापासून ४० वर्षापर्यंत प्रत्येकाने असा सुटसुटीत पोशाख केल्यास तुमच्या मनोवृत्तीत देखील बदल झाल्याशिवाय राहाणार नाही व तुमच्या मनातील भिती नाहीशी होईल."

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
संदर्भ : ' जनता ' ८ व १५ जानेवारी १९३८
३१ डिसेंबर १९३७ रोजी पंढरपूर- सोलापूर जिल्हा अस्पृश्य राजकीय परिषदेत दिलेल्या अध्यक्षीय भाषणातील अंश...

- बी.एन. साळवे

महाडच्या तळ्याचं पाणी पेटल गं बाईत्या तळ्यात माझ्या भिमाची छबी भेटल गं बाई...☘️☘️☘️गीतकार : सचिन माळी....
20/03/2024

महाडच्या तळ्याचं पाणी पेटल गं बाई
त्या तळ्यात माझ्या भिमाची छबी भेटल गं बाई...☘️☘️☘️

गीतकार : सचिन माळी....

सातवाहन काळी बौध्द धम्म हा राज धम्म होता...! चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या नंतर त्यांची उणीव भरून काढली ती बौध्द सम्राट ...
18/03/2024

सातवाहन काळी बौध्द धम्म हा राज धम्म होता...!

चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या नंतर त्यांची उणीव भरून काढली ती बौध्द सम्राट गौतमी पुत्र सातकर्णी यांनी ( पान क्रमांक २५०, सर अलेक्झांडर कनिंगहॅम ), लयास गेलेला मौर्य घराण्याची जागा सातवाहन घराण्याने भरून काढली होती आणि बौध्द धम्माला त्यांनी राजाश्रय दिले होते. ( पान क्रमांक ३०३, डॉ रामकृष्ण गोपाळ भंडारकर )

संदर्भ : Ashoka : The Search for India's Lost Emperor , CHARLES ALLEN

#अशोक
भारताच्या हरवलेल्या सम्राटाचा शोध
लेखक : चार्ल्स अॅलन
अनुवाद : डॉ. धनंजय चव्हाण

सूरज रतन जगताप
२०/७/२०२०

17/03/2024

गोदी मीडिया😂😂

शहरात गुंड व बदमाश लोक दबा धरून आहेत. त्यांच्यापासून संरक्षण करण्याकरता तुम्ही चाळीचाळीतून , प्रत्येक मोहल्ल्यातून संरक्...
13/03/2024

शहरात गुंड व बदमाश लोक दबा धरून आहेत. त्यांच्यापासून संरक्षण करण्याकरता तुम्ही चाळीचाळीतून , प्रत्येक मोहल्ल्यातून संरक्षण दले तयार करा आणि संघटनेने रहा.

"समता सैनिक दल " 🇮🇳🤝

#१३मार्च१९२७ "समता सैनिक दलाच्या" स्थापना दिवसाच्या सर्व सैनिकांना खूप खूप सदिच्छा! 💐💐💐

समता सैनिक दलाची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ मार्च १९२७ रोजी केली. इ. स. १९२७ चा काळ पाहता चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि मनुस्मृतीचे दहन या महत्वाच्या घटना आहेत. समाजात अस्पृश्यावर अन्याय, अत्याचार होतच होते. सगळा समाज विषमतेत जळत होता. बाबासाहेबांच्या चळवळीमुळे समाजात जागृती होत होती. शेकडो वर्षे मान खाली घालून चालणारे लोक आता मान वर करू लागले होते. माणसे मुक्तीच्या वाटा चालू लागली होते. सवर्णांना हे आवडणे शक्य नव्हते, त्यांचा वर्चस्वाचा अहंकार दुखविला जाणे साहजिक होते, हे स्वाभिमानाचे नवे वारे सवर्ण समाजाला झोंबत होते आणि त्याचा परिणाम म्हणून गावा – गावात सवर्णांकडून अस्पृश्यावर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले. अशावेळी गावागावातील लोकांच्या रक्षणासाठी, चळवळीची ताकद वाढविण्यासाठी आणि महाडच्या सत्याग्रहाच्या यशस्वितेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘समता सैनिक दलाची’ स्थापना केली होती. आणि आजही ही संघटना कार्यरत आहे.

समता सैनिक दलाचा विजय असो...💙✊

"हजारो वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या कातळात कोरलेल्या लेण्यांतील स्थापत्य शैलीचा एक उत्कृष्ट नजारा"....!वेरूळ लेणीतील चैत्य...
11/03/2024

"हजारो वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या कातळात कोरलेल्या लेण्यांतील स्थापत्य शैलीचा एक उत्कृष्ट नजारा"....!वेरूळ लेणीतील चैत्यगृहातील चैत्यगवाक्षाच्या झरोक्यातून दरवर्षी १० व ११ मार्च रोजी सूर्यकिरणं स्तूपात कोरलेल्या बुद्ध मुर्तीवर पडत असतात...संपुर्ण बुद्ध मुर्ती सूर्यकिरणांनी प्रकाशमान होते... स्वयंप्रकाशित बुद्धांना नमन करण्यासाठीच जणू सूर्यदेव या वेरूळ लेणीत दरवर्षी येत असतो...खगोलीय घटनांचे सखोल ज्ञान असणाऱ्या त्या अनामिक बौद्ध भीक्खु व कारागिरांना शतशः नमन...
सिद्धार्थ कसबे

जयपूर हायकोर्टात मनुच्या पुतळ्याला काळं फासण्याची हिमंत करुन स्री अस्तित्वाच्या लढाईला बळ देणाऱ्या कांताबाई अहिरे आणि श...
08/03/2024

जयपूर हायकोर्टात मनुच्या पुतळ्याला काळं फासण्याची हिमंत करुन स्री अस्तित्वाच्या लढाईला बळ देणाऱ्या कांताबाई अहिरे आणि शीलाबाई पवार आणि फुलन देवी जागतिक महिला दिनाच्या अस्सल मानकरी आहे. या महिला काही प्रिमियर इंस्टुट्युच्या नाहीत, ना ideology वर संशोधनाच्या थप्प्या रचल्या. आपल्या जगण्याची किंमत, आणि स्वातंत्र्य कळलं की लढाई संघर्ष तिथुनच सुरू होतो. विशेष म्हणजे या वरच्या तिन्ही radical महिला या एससी आणि ओबीसी प्रवर्गातुन येतात आणि यातही विशेष म्हणजे तिघ्याही बौद्ध आहे, बुद्धाला अनुसरणाऱ्या आहे. बुद्ध फक्त शांतीचा संदेश देणाराच नाही तर अन्याय व गुलामगिरी विरूद्ध असंतोष पण निर्माण करणारा आहे ही जाणिव या महिला अनुयायी करुन देतात तेव्हा जगाचे सारे थेसिस इथे थिटे पडतात...

- Rahul Pagare

श्रद्धेय बाळासाहेबांच्या लढ्याला बळ देण्यासाठी आद. नागाबाई लोखंडे यांनी म्हातारं पणाचा विचार न करता, पेन्शन मधून तब्बल ए...
07/03/2024

श्रद्धेय बाळासाहेबांच्या लढ्याला बळ देण्यासाठी आद. नागाबाई लोखंडे यांनी म्हातारं पणाचा विचार न करता, पेन्शन मधून तब्बल एक लाख रुपये पक्ष निधी म्हणून साहेबांकडे सुपूर्द केले...! ✌️💯

Balasaheb Ambedkar

समता सैनिक दलाच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना सलामी...   Balasaheb Ambedkar  💙
27/02/2024

समता सैनिक दलाच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना सलामी...



Balasaheb Ambedkar 💙

"नचिरं तथागतस्स परि निब्बानं भविस्सति. इतो तिन्न मासानं अच्चयेन तथागतो परिनिब्बायिस्सति' ति........"  आज माघ पौर्णिमा! २...
24/02/2024

"नचिरं तथागतस्स परि निब्बानं भविस्सति. इतो तिन्न मासानं अच्चयेन तथागतो परिनिब्बायिस्सति' ति........"

आज माघ पौर्णिमा! २६०० वर्षांपूर्वी याच दिवशी भ.बुद्ध भन्ते आनंदास म्हणाले - "आनन्द, आजपासून तीन महिन्यानंतर तथागत परिनिवृत्त होतील. त्यांचे महापरिनिर्वाण होईल. या चापाल चैत्यामध्ये तथागत संपूर्ण स्मृतिवन होऊन आपले जीवन संस्कार सोडत आहेत...."
आपल्या सर्वांना माघ पौर्णिमेच्या खूप सदिच्छा...🙏💙

07/02/2024

*💙🫶😍 #प्रज्ञासुर्याची सावली नऊ कोटीची आई माता रमाई जयंतीनिम्मित आईच्या तेजोमय स्मुर्तीस कोटी कोटी विनम्र अभिवादन*🌎🌿🌼💫

मूकनायक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२० साली समाज्याच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील ...
31/01/2024

मूकनायक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२० साली समाज्याच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते.

३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला.

26/01/2024

*जखडबंद पायातील साखळदंड,
तडातडा तुटली तु थोपताच बंड*.....

प्रजासत्ताक दीन चिरायू होवो....
भारतीय संविधान चिरायू होवो.....
जय भिम....
जय संविधान.....
जय भारत.....

#जयभीम

Send a message to learn more

 #पौषपौर्णिमा*पौष पौर्णिमेला पाली भाषेत ‘फुस्समासो’ म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतः जानेवारी महिन्यात येते.**१) भगवान बुद्...
25/01/2024

#पौषपौर्णिमा
*पौष पौर्णिमेला पाली भाषेत ‘फुस्समासो’ म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतः जानेवारी महिन्यात येते.*
*१) भगवान बुद्धांची राजगृहाला भेट*
*२) राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा*


*पौष पौर्णिमेच्या सर्व उपासक /उपासिका यांना मंगलमय शुभेच्छा.!🙏*
*मैत्रीपूर्ण जय भिम*
*नमो बुध्दाय🙏🙏🙏*
#पौषपौर्णिमा


*- जागतिक बुद्ध धम्म दिक्षा समिती*

21/01/2024

जय भीम CM YS Jagan Mohan Reddy 💙

#जयभीम

Address

Nanded

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhammpala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dhammpala:

Videos

Share