It's an organisation which always tries to spread knowledge and impart positive light in the society in every manner. नमस्कार,
उर्जाचा हा आतापर्यंतचा प्रवास सुखद करण्यात आम्हाला अनेक व्यक्तींचा हातभार लागला.
काहींचा प्रत्यक्ष तर अनेकांचा अप्रत्यक्षपणे या कार्यात सहभाग होता.काहींशी थेटपणे संवाद साधता आला.तर काहीजण नुसतेच आपल्या लेखांतूनच आमच्याशी बोलत राहिले.विविध क्षेत्रातून स्व:ताची
अशी स्वतंत्र
ओळख निर्माण केलेल्या तर कधी तुमच्या आमच्यासारख्या परंतु त्यातही आपले वेगळेपण जपलेल्या अशा कित्येक व्यक्तींशी आम्ही जोडले गेलो.
आपणा प्रत्येकालाच आयुष्यात अशा अनेक व्यक्ती भेटत असतात,कधी कथा काद्म्बार्यान्मधून तर कधी वास्तव जीवनात ,कधी चित्रपट-नाटकांतील पत्रांमधून आणि अनेकदा इतिहासातील घटनांमाधुन्ही तर कित्येकदा चक्क आपल्यालाच आपल्या व्यक्तिमत्वाची वेगळीच बाजू गवसते.
या वर्षीच्या आपल्या उर्जा दिवाळी अंकाचा विषय हा व्यक्तिचित्रणाचा असणार आहे.ज्यात आपण आपल्याला भावलेल्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत.या वर्षीचा आपला विषय आहे आपल्या मनात घर करून राहिलेले व्यक्तिमत्व .जे आपल्या मनात डोकावलं
एखाद्या कादंबरीतून,अथवा एखाद्या चित्रपटातून,नाटकातून,आपल्या कल्पनेतून अथवा प्रत्यक्ष रोजच्या दैनंदिन जीवनातून. अनेकांनी मांडलेली व्यक्तिमत्व नक्कीच वाचकांना आनद देउन जातील.
लेखाचा विषय-मला भावलेले व्यक्तिमत्व.
सूचना -आपले लेख खालील संकेत स्थळावर पाठवावे. oorjakutumb@gmail .com
किंवा खालील क्रमांकावर संपर्क साधावा
९००४६०६५०९
८९७६७९७४९७
७२०८८६८९४३
९०२९५१७२१५