Mahasagar Live News 5

Mahasagar Live News 5 news/ media

13/04/2024
12/04/2024

Maha Live News रामटेक लोकसभा मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडी समर्थित उमेदवार किशोर गजभिये Live

23/03/2024

रामटेक लोकसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार अमोल गुजर यांच्याशी विशेष बातचीत

नशे की लत पूरी करने दोपहिया वाहन चुरानेवाले चंद्रकुमार जैन (37), म्हालगी नगर, हुड़केश्वर निवासी को पुलिस ने गिरफ्तार किय...
16/02/2024

नशे की लत पूरी करने दोपहिया वाहन चुरानेवाले चंद्रकुमार जैन (37), म्हालगी नगर, हुड़केश्वर निवासी को पुलिस ने गिरफ्तार किया। तहसील पुलिस ने आरोपी से 3 दोपहिया वाहन सहित 95 हजार रुपए का माल जब्त किया। आरोपी ने तीनों दोपहिया वाहन एक ही दिन में चुराए थे। राजेंद्र भुजाडे (60), यादव नगर, बिनाकी ले-आउट, यशोधरा नगर निवासी ज्वेलर्स की दुकान में काम करते हैं। उन्होंने अपनी प्लेजर (एम.एच.-49-एल.-5720) को इतवारी सराफा बाजार में नाइक गली में रखा था, जिसे अज्ञात चोर चुरा ले गया। तहसील पुलिस ने मामला दर्ज किया और चंद्रकुमार जैन को गुप्त सूचना पर धरदबोचा। आरोपी को नशे की लत है, वह इसे पूरा करने के लिए दोपहिया वाहन चुराता था। पूछताछ में आरोपी ने एक ही दिन में तीन दोपहिया वाहन चुराने की बात स्वीकार की। पुलिस ने आरोपी से तीनों दोपहिया वाहन जब्त किए हैं। पुलिस निरीक्षक संदीप बुवा के नेतृत्व में कार्रवाई की गई।

12/12/2023

Mahasagar Live News या फोटोला caption सुचवा. नागपूर अधिवशनात काही महीला शिक्षिका *जुनी पेन्शन मिळाली पाहिजे या साठी संघर्ष*

09/12/2023

Mahasagar Live News नुकतीच एक बातमी वाचण्यात आली. नुकतीच नव्हे तर परत वाचण्यात आली असे म्हणणे अधिक संयुक्तिक असेल. बातमी होती नाग नदी संदर्भात...‘नदीच्या भिंतींची डागडुजी केल्या जाईल जेणे करून सप्टेंबर महिन्यात एक रात्री झालेल्या भीषण पावसामुळे जी हानी झाली त्याची पुनरावृत्ती होणार नाही.’ नागपुरात त्या रात्री सुमारे तीन तास पावसाने थैमान घातले होते. 109 मिलीमिटर पाऊस त्या रात्री कोसळला.
नाग नदी ला खरेच ‘नदी’ चे स्टेटस (जी आता नाल्या प्रमाणे आहे) देण्या साठी लागणारा निधी, श्रम कार्य, सौंदर्यीकरण इत्यादी संदर्भात गेल्या 50 वर्षात मी निदान 30 तरी बातम्या वाचल्या असतील. पण नाग नदी जशी होती तशीच राहिली आहे. जणू तिला कुरुपतेचा अभिशापच आहे. नाग नदीच्या सौंदर्यीकरणाच्या घोषणा नेत्यांनी केल्या, जी आश्वासने दिल्या गेली, त्यातली अर्धी जरी पूर्णत्वास नेली असती तर नदी कदाचित नागपुरातले सुंदर ‘पिकनिक स्पॉट’ म्हणून उदयास आली असती. लोकांनी बोटिंगचा आनंद अनुभवला असता. पण नाग नदी च्या नशिबी केवळ पोकळ अश्वासनेच असावीत, असे दिसते. नागपुर शहराचे राजकीय महत्त्व आज जबरदस्त आहे. ‘हेवीवेट’ नेत्यांचे इथे वास्तव्य आहे. तरीसुद्धा या शहराच्या मध्यातून वाहत असलेली एक नदी काळ्या, घाणेरड्या पाण्याचा साठ्या शिवाय अधिक नाही. निश्चितच ही लाजीरवाणी बाब आहे. बघुया नाग नदीचे भाग्य कधी फळफळेल आणि ती नाल्याच्या रुपातून खरेच नदीचे स्टेटस प्राप्त करेल. नाग नदी ही नागपूर से भूषण असावयास हवे होते. ही नदी मह्णणजे शहराची अस्मिता आहे पण तिच्या नशिबातले भोग काही संपत नाही. केव‌ळ मैला वाहून नेण्या इतकीच तिची किंमत राहिलेली आहे. नदीच्या सौंदर्यीकरणासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी किमान 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्या जातो. नदीची आज ची अवस्था बघता हा निधी नेमका कुठे वापरल्या जातो, हे कळायला मार्ग नाही. विशेष म्हणजे हा निधी मागील 20 वर्षांपासून स्थानिक प्रशासनाला दिला जातो.

09/11/2023

नागपुरातील वाहतूक यंत्रणेकडे खासगी ट्रॅव्हल्सच्या नियमबाह्य कृत्याची कुंडली! कारवाईची तंबी

Mahasagar Live News नागपुर
नागपूर शहरातील खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या तोडत असलेल्या वाहतुकीच्या नियमांची कुंडली प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) नागपूर शहर आणि शहर वाहतू

नागपूर : शहरातील खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या तोडत असलेल्या वाहतुकीच्या नियमांची कुंडली प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) नागपूर शहर आणि शहर वाहतूक पोलिसांनी जमवली आहे. या विषयावर बुधवारी नागपुरातील आरटीओ कार्यालयात झालेल्या बैठकीत ट्रॅव्हल्सने स्वत:च्या कामात सुधारणा न केल्यास कारवाईची तंबी देण्यात आली.

बैठकीला पोलीस उपआयुक्त (वाहतूक) चेतना तिडके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर ग्रामीण राजेश सरक, अशफाक अहमद, हर्षल डाके, स्नेहा मेंढेसह शहर व ग्रामीण भागातील आरटीओ आणि वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी, ट्रॅव्हल्स कंपन्यांचे मालक उपस्थित होते. प्रथम वाहतूक पोलीस आणि आरटीओच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून नियमबाह्यरीत्या शहरात कुठे-कुठे मालवाहतुकीसाठी बसमध्ये नियमबाह्य माल भरले जातात, शहरातील विविध रस्त्यांचे काम सुरू असलेल्यासह इतर लहान रस्त्यांवर बस चालवल्याने कुठे वाहतूक कोंडी होते, प्रवाशांना रस्त्यावर कुठेही थांबून घेतले जात असल्याने निर्माण होणारी वाहतूक समस्या, गणेश टेकडी येथील बसस्थानक स्थलांतरित करण्यासह इतरही अनेक पुरावे छायाचित्रासह येथे दाखवले गेले. प्रथम ट्रॅव्हल्स कंपन्यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन बैठकीत आरटीओ व वाहतूक पोलिसांकडून ट्रॅव्हल्स कंपन्यांना दिले गेले. त्याचे पालन न झाल्यास कडक कारवाईचा इशाराही दिला गेला. परंतु ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सहकार करून सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, म्हणून सर्व मदत करण्याचे आश्वासन प्रवाशांना दिले. दरम्यान, प्रवाशांच्या सूचनेसाठी यापूर्वीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्याही अंमलबजावणीचे आवाहन यावेळी केले गेले. याप्रसंगी शहरातील बहुतांश ट्रॅव्हल्स कंपन्यांचे मालक अथवा संबंधित कंपनीतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

12/10/2023

🔴🔴Hello नागपूरकर. पोलिसांना🚔 हा आरोपी पाहिजेल आहे.याला इतकं शेअर करा की सर्वांच्या मोबाईल फोन वर हा फोटो पोहचला पाहिजे. 🔴🔴🚨🚔 आपल्या सेवेत 🙏

🙏 *🚔🚨*नागपूर पोलिसांना मदत करा आणि या पोस्ट ला शेअर करा*🚨🚔

*नागपुरात विद्यार्थिनीवर जंगलात अत्याचार करणारा नराधम सापडेना, ड्रोनच्या मदतीने अकरा गावात मोहीम*

Mahasagar Live News

*नागपूर* : अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचा वापर सुरू केला आहे. रविवारी दुपारी व रात्री पोलिसांनी नाइट व्हिजन कॅमेरा असलेल्या ड्रोनसह वर्धा मार्गावरील जामठा परिसरातील जंगलात आरोपीचा शोध घेतला. एखाद्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आल्याची नागपूर शहर पोलिस दलातील ही पहिलीच घटना होय. गडचिरोलीतील जंगलात माओवाद्यांना शोधण्यासाठी पोलिस ड्रोनचा वापर करतात. चार दिवसांपूर्वी जामठ्यातील जंगलात कुऱ्हाडीचा धाक दाखवून अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला जंगलात फरफटत नेण्यात आले. तेथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. हिंगणा व गुन्हेशाखा पोलिसांची १७ पथके बलात्कार करणाऱ्या नराधमाचा शोध घेत आहेत. दोनशेहून अधिक संशयितांची पोलिसांनी झाडाझडती घेतली. परंतु, पोलिसांना आरोपीबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. नराधम जंगल परिसरातच दडून बसल्याची शक्यता असल्याने ड्रोनद्वारे त्याचा शोध घेण्याचा निर्णय रविवारी घेण्यात आला. दुपारी ३ ते ६ या कालावधीत पोलिसांनी जामठा, हिंगण्यासह ११ गावांतील जंगलांमध्ये ड्रोनद्वारे आरोपीचा शोध सुरू केला. त्यानंतर सायंकाळी ७ ते रात्री १० वाजतापर्यंत नाइट व्हिजन कॅमेरा असलेल्या ड्रोनद्वारेही जंगल तसेच समृद्धी महामार्गासह झरी खुशाल डोंगरी परिसरात आरोपीचा सुगावा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपीला गजाआड करण्यासाठी पोलिस रात्रंदिवस प्रयत्न करीत असून, रविवारी दुपारी व रात्री तीन तास ड्रोनद्वारे शोध घेण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दिली.

Mahasagar Live News  & Londe Jewellers Presents   आणि पाठवा तुमच्या बाप्पाचे फोटो किंवा व्हिडिओ .. 9890468325 / 91756 99...
21/09/2023

Mahasagar Live News & Londe Jewellers
Presents
आणि पाठवा तुमच्या बाप्पाचे फोटो किंवा व्हिडिओ .. 9890468325 / 91756 99094 या नंबर वर आणि मिळवा 🎁🎁 गिफ्ट

तुमचा बाप्पा दिसेल च्या सोशल मीडियावर


Address

Jaishree Cinema Cotton Market Square Nagpur
Nagpur
440052

Telephone

+919890468325

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahasagar Live News 5 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mahasagar Live News 5:

Videos

Share

Nearby media companies


Other Media/News Companies in Nagpur

Show All

You may also like