Vivek saptahik - साप्ताहिक विवेक

  • Home
  • India
  • Mumbai
  • Vivek saptahik - साप्ताहिक विवेक

Vivek saptahik - साप्ताहिक विवेक प्रखर राष्ट्रवाद व सामाजिक समरसतेचा विचार घेऊन ७० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले एकमेव साप्ताहिक!

नमस्कार,
प्रखर राष्ट्रवाद आणि सामाजिक समरसतेला केंद्रस्थानी ठेवून साप्ताहिक 'विवेक' गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ अखंडपणे कार्यरत आहे. आपणा सर्व वाचक, दर्शक, वर्गणीदार, हितचिंतकांच्या भक्कम पाठिंब्याच्या जोरावर विवेक ही वाटचाल सुरू आहे. या ७० वर्षांच्या काळात साप्ताहिक विवेकच्या बरोबरीनेच हिंदी विवेक, शिक्षण विवेक, वैद्यराज, PARC (Policy Advocacy Research Centre), विवेक विचार मंच असे अनेक आयाम राष

्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवून 'विवेक समूहा'त जोडले गेले.

अशाप्रकारे महाराष्ट्र राज्यात तसेच राष्ट्रीय स्तरावरही प्रसारमाध्यम क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असलेल्या 'विवेक'ने काळाची गरज ओळखून नव्या 'स्मार्ट' माध्यमांमध्येही पदार्पण करत ठाम व आश्वासक वाटचाल सुरू केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रखर राष्ट्रवादाचा विचार अधिकाधिक वाचक-दर्शकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही अखंडपणे कार्यरत आहोत. या वाटचालीला आपणासारख्या राष्ट्रवादाशी व सामाजिक समरसतेशी बांधिलकी असलेल्या, जागरूक व कृतीशील कार्यकर्त्यांच्या अधिकाधिक पाठबळाची आवश्यकता आहे. तेव्हा साप्ताहिक विवेकच्या सोशल मीडियावरील विचारयात्रेत डिजीटली सहभागी व्हा..!! Website : www.evivek.com
Facebook : https://www.facebook.com/Viveksaptahik/
Youtube : https://youtube.com/c/Viveksaptahik
Twitter : https://twitter.com/viveksaptahik?s=09
Instagram : https://instagram.com/viveksaptahik?utm_medium=copy_link

हिंदुत्व वॉच - भारताविरोधातल्या नव्या युद्धाची सुरुवातपूर्वीचा काळ हा शत्रूशी रणांगणात युद्ध करण्याचा होता, काळ बदलला तस...
10/12/2023

हिंदुत्व वॉच - भारताविरोधातल्या नव्या युद्धाची सुरुवात
पूर्वीचा काळ हा शत्रूशी रणांगणात युद्ध करण्याचा होता, काळ बदलला तसा युद्धाची शस्त्रे आणि पद्धती बदलल्या आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. आधुनिक काळात तंत्रज्ञान आधारित युद्धांचे जाळे पसरत जाईल. त्यातीलच म्हणता येईल असे हिंदुत्व वॉच हे संस्थळ. हे संस्थळ हिंदूंनी केलेल्या मुस्लिमांच्या विरोधातील हेट स्पीच दाखवतात. ही द्वेषपूर्ण भाषणे एकतर्फी दाखवली जातात. एकूण रंग बघता, भारतविरोधी मत तयार करून समाज आणि पर्यायाने देश फोडण्याचा हा प्रयत्न आहे. यातून भारतीय समाजात विविध प्रकारची अस्थिरता माजवण्याचा उद्देश यामागे आहे.
https://www.evivek.com/Encyc/2023/12/9/Hindutva-Watch.html

पूर्वीचा काळ हा शत्रूशी रणांगणात युद्ध करण्याचा होता, काळ बदलला तसा युद्धाची शस्त्रे आणि पद्धती बदलल्या आहेत, हे ....

संघमंत्र आणि केशवार्पण पुस्तकhttps://www.vivekprakashan.in/books/sanghmantra/राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता शताब्दीकडे वाटच...
10/12/2023

संघमंत्र आणि केशवार्पण पुस्तक
https://www.vivekprakashan.in/books/sanghmantra/
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता शताब्दीकडे वाटचाल करीत असून मानवी जीवनाच्या सर्व पैलूंना संघविचाराने स्पर्श केला आहे. भारतमातेच्या परमवैभावाच्या कालखंड दृष्टीपथात येत असताना डॉ. हेडगेवारांनी सांगितलेल्या संघमंत्रची आठवण पुन्हा करण्याची आवश्यकता आहे
३५०/- रुपयांचा संच मिळवा केवळ ३१५/- रुपयांत
https://www.vivekprakashan.in/books/sanghmantra/

राष्ट्रवादाचा विजय@पूनम पवारपाच राज्यांच्या निवडणूक निकाल हा भारतीय राष्ट्रवादाचा विजय आहे. मोदींच्या भाषेत सांगायचे तर ...
09/12/2023

राष्ट्रवादाचा विजय
@पूनम पवार
पाच राज्यांच्या निवडणूक निकाल हा भारतीय राष्ट्रवादाचा विजय आहे. मोदींच्या भाषेत सांगायचे तर हा विजय आत्मनिर्भर भारताचा आहे, हा विजय ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या भावनेचा विजय आहे, हा विजय विकसित भारताचा आहे, हा विजय राष्ट्रभाव जागृतीचा विजय आहे.
https://www.evivek.com//Encyc/2023/12/9/As-Five-States-Assembly-Election-Results-2023-Analysis.html

पाच राज्यांच्या निवडणूक निकाल हा भारतीय राष्ट्रवादाचा विजय आहे. मोदींच्या भाषेत सांगायचे तर हा विजय आत्मनिर्भर ....

विचारप्रवर्तक ‘गोदावरी संवाद’  @अमोघ पोंक्षेआजचे युग हे ‘माहितीचे’ युग म्हणून ओळखले जाते. ज्याच्याकडे ‘डेटा’ अधिक तो राज...
09/12/2023

विचारप्रवर्तक ‘गोदावरी संवाद’
@अमोघ पोंक्षे
आजचे युग हे ‘माहितीचे’ युग म्हणून ओळखले जाते. ज्याच्याकडे ‘डेटा’ अधिक तो राजा, असा हा काळ आहे. मात्र या ‘डेटा’ आणि ‘इन्फो’मागे किंवा त्याच्या मुळाशी एक विचार असणेही तितकेच गरजेचे असते. विचारांची घुसळण झाल्याशिवाय नुसत्या माहितीला अर्थ प्राप्त होत नाही. विचारांच्या अधिष्ठानाशिवाय दिलेली माहिती मग केवळ आकडेवारीपुरती मर्यादित राहते. वैचारिक बैठकीचे हेच महत्त्व ओळखत नाशिकमध्ये ‘गोदावरी संवाद’ या नावाने वैचारिक मंथनाचा एक कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. यामध्ये नावाजलेल्या वक्त्यांनी सहभाग घेत उपस्थित श्रोतृवर्गाशी विविध विषयांवर संवाद साधला. या कार्यक्रमाविषयी.
https://www.evivek.com/Encyc/2023/12/8/godavari-sanwad-nashik-2023.html

आजचे युग हे ‘माहितीचे’ युग म्हणून ओळखले जाते. ज्याच्याकडे ‘डेटा’ अधिक तो राजा, असा हा काळ आहे. मात्र या ‘डेटा’ आणि ‘...

सा. विवेक प्रकाशित ‘सर्वस्पर्शी सावरकर‘ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, लोकमान्य सेवा संघ विलेपार्लेच...
09/12/2023

सा. विवेक प्रकाशित ‘सर्वस्पर्शी सावरकर‘ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, लोकमान्य सेवा संघ विलेपार्लेचे अध्यक्ष मुंकूद चितळे, विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, सा. विवेकचे सह कार्यकारी संपादक रवींद्र गोळे व महेश वैद्य यांच्या हस्ते झाले. ठाणे येथील गोखले मंगल कार्यालयात झालेल्या प्रकाशन सोहळ्यास मोठ्या संख्येने सावरकर प्रेमी उपस्थित होते.

म्यानमारमधील गृहयुद्ध आणि भारताची सुरक्षा@शांभवी थिटेम्यानमारच्या चिन राज्यातील जनता आणि भारताच्या मिझोराम राज्यामधील जन...
09/12/2023

म्यानमारमधील गृहयुद्ध आणि भारताची सुरक्षा
@शांभवी थिटे
म्यानमारच्या चिन राज्यातील जनता आणि भारताच्या मिझोराम राज्यामधील जनता तसेच मणिपूर येथील कुकी वांशिक गट यांच्यात वांशिक साम्य असल्याने, गृहयुद्ध सुरू झाल्यानंतर हजारो म्यानमारी निर्वासित मिझोराममध्ये पळून येत आहेत. यामुळे भारतातील ईशान्येकडील राज्यांमध्ये अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अवैध शस्त्र व्यापार आणि अमली पदार्थ व्यापार वाढण्याची शक्यता आहे.
https://www.evivek.com/Encyc/2023/12/9/Civil-War-in-Myanmar-and-India-s-Security.html

म्यानमारच्या चिन राज्यातील जनता आणि भारताच्या मिझोराम राज्यामधील जनता तसेच मणिपूर येथील कुकी वांशिक गट यांच्या...

ऐतिहासिक शांतता करार@अमिता आपटे गेले सहा महिने - म्हणजे 3 मेपासून मणिपूर राज्य भारतीय जनमानसात अतिशय दु:खद, संतापजनक, नक...
09/12/2023

ऐतिहासिक शांतता करार
@अमिता आपटे
गेले सहा महिने - म्हणजे 3 मेपासून मणिपूर राज्य भारतीय जनमानसात अतिशय दु:खद, संतापजनक, नकारात्मक गोष्टींसाठी चर्चिले जात आहे. पण या सर्व काळात अगदी सुरुवातीपासूनच शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारे बरेच प्रयत्न करत आहेत, हेही आपल्या निदर्शनास येत आहे. याच प्रयत्नांतील एक महत्त्वाचा टप्पा 29 नोव्हेंबर 23 या दिवशी पार पडला. कारण या दिवशी दिल्ली येथे भारत सरकार आणि मणिपूर सरकारने युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटबरोबर (यूएनएलएफबरोबर) एका ऐतिहासिक अशा शांतता करारावर स्वाक्षरी केली. हा दहशतवादी गट मणिपूरच्या खोर्‍यातील सर्वात जुना बंडखोर गट आहे.
https://www.evivek.com//Encyc/2023/12/9/The-Manipur-government-signed-a-historic-peace-agreement-with-the-United-National-Liberation-Front-UNLF-.html

गेले सहा महिने - म्हणजे 3 मेपासून मणिपूर राज्य भारतीय जनमानसात अतिशय दु:खद, संतापजनक, नकारात्मक गोष्टींसाठी चर्चिल...

08/12/2023

मध्य प्रदेशात चमत्कार नाही,
नियोजनबद्ध कष्टाचे फलित

लिंक कमेंटमध्ये

आप्पांचं जाणं.. @सुधीर जोगळेकरडोंबिवलीचं सांस्कृतिक-सामाजिक-शैक्षणिक-आर्थिक आणि क्रीडाविषयक जीवन ज्या त्रयीच्या प्रोत्सा...
08/12/2023

आप्पांचं जाणं..
@सुधीर जोगळेकर
डोंबिवलीचं सांस्कृतिक-सामाजिक-शैक्षणिक-आर्थिक आणि क्रीडाविषयक जीवन ज्या त्रयीच्या प्रोत्साहनाने फुललं, विकसित झालं, डोंबिवलीच्या तीन पिढ्यांतील कलाकारांना-गायकांना-वादकांना-नर्तकांना-अभिनेत्यांना आणि क्रीडापटूंना ज्यांचा आशीर्वाद लाभला, अशा प्राचार्य सुरेंद्र बाजपेई, आबासाहेब पटवारी आणि मधुकरराव चक्रदेव या त्रयीतले आप्पा एक होते. 2013 साली सर गेले, 2021 साली आबासाहेब गेले आणि आता 2023मधल्या आप्पांच्या जाण्याने या त्रयीमधला शेवटचा मालुसरा अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहे. स्मशानात आणि सावित्रीबाई फुले रंगमंदिरात शेकडो डोंबिवलीकरांनी गर्दी केली ती त्या शेवटच्या मालुसर्‍याला मानवंदना देण्यासाठी.
https://www.evivek.com/Encyc/2023/12/8/madhukar-chakradev-passed-away.html

डोंबिवलीचं सांस्कृतिक-सामाजिक-शैक्षणिक-आर्थिक आणि क्रीडाविषयक जीवन ज्या त्रयीच्या प्रोत्साहनाने फुललं, विकसि.....

मध्य प्रदेशातील दणदणीत विजय म्हणजेहिंदुत्वाची पुनर्जागृती@प्रशांत पोळऑगस्टमध्ये पक्षाने केलेले सर्वेक्षणही ‘भाजपा परत सत...
08/12/2023

मध्य प्रदेशातील दणदणीत विजय म्हणजे
हिंदुत्वाची पुनर्जागृती
@प्रशांत पोळ
ऑगस्टमध्ये पक्षाने केलेले सर्वेक्षणही ‘भाजपा परत सत्तेत येत नाही’ असेच सांगत होते, म्हणून भाजपाने ही निवडणूक फार गांभीर्याने घेतली आणि या निवडणुकीची सूत्रे प्रादेशिक नेत्यांकडे न देता अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव यासारख्या केंद्रीय मंत्र्यांकडे सोपवली. राज्यातील पराभूत होत राहणार्‍या 39 जागांसाठीचे उमेदवार तीन महिन्यांपूर्वीच घोषित केले. भाजपाच्या मरगळेल्या कार्यकर्त्यांना कामाला लावले. त्यांच्यामार्फत केंद्राच्या आणि राज्याच्या विविध लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या. ‘सनातन नष्ट करायला निघालेल्या लोकांबरोबर उभ्या असलेल्या काँग्रेसच्या विरोधात’ मध्य प्रदेशातले संत, महंत, साध्वी यांची एकजूट झाली. दुसरीकडे कॉँग्रेसला या बदलत्या हवेचा अंदाज लागलाच नाही. ते गाफील राहिले आणि पराभवात याची परिणती झाली. मध्य प्रदेशातील भाजपाच्या विजयाचे अगदी अचूक विश्लेषण करणारा लेख. पूर्ण वाचण्यासाठी 👇👇👇
https://www.evivek.com/Encyc/2023/12/8/mp-election-2023-bjp.html

ऑगस्टमध्ये पक्षाने केलेले सर्वेक्षणही ‘भाजपा परत सत्तेत येत नाही’ असेच सांगत होते, म्हणून भाजपाने ही निवडणूक फा....

08/12/2023

हिवाळी अधिवेशन - लोकसभा : २०२३

तेलंगण निकाल - हिंदुत्वाचा प्रभाव वाढतो आहे    @चिन्मय रहाळकरसत्तेवर काँग्रेस येत असली, तरी हे निवडणूक निकाल तेलंगणात भा...
07/12/2023

तेलंगण निकाल - हिंदुत्वाचा प्रभाव वाढतो आहे
@चिन्मय रहाळकर
सत्तेवर काँग्रेस येत असली, तरी हे निवडणूक निकाल तेलंगणात भाजपाचे बस्तान बसू लागल्याचे निदर्शक आहेत. वास्तविक भाजपा आणि हिंदुत्ववादी विचारांची पुरस्कर्ती जनता हे दोन्ही जुन्या आंध्र प्रदेशात आणि नव्या तेलंगणात होतेच. तरीही इथे पक्षाला हवे तसे यश अद्याप मिळाले नव्हते. घरोघरी पोहोचणार्‍या प्रभावी संपर्क यंत्रणेचा आणि संघविचारांचे अधिष्ठान असलेल्या भाजपाचा आता इथे प्रभाव वाढतो आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलनात तेलंगण राज्यातून (म्हणजे प्रामुख्याने तेलगू जनतेकडून)सर्वाधिक निधी जमा झाला होता. नजीकच्या काळात भाजपा तेलंगणातला एक प्रमुख राजकीय पक्ष होईल, असेच आश्वासक चित्र आहे. तेलंगणात हिंदुत्वाचा जोर वाढताना दिसतो आहे, असे या वेळेचे निकाल सांगत आहेत.
https://www.evivek.com/Encyc/2023/12/7/Telangana-Assembly-Election-Results-2023.html

सत्तेवर काँग्रेस येत असली, तरी हे निवडणूक निकाल तेलंगणात भाजपाचे बस्तान बसू लागल्याचे निदर्शक आहेत. वास्तविक भाज...

नवाब मलिकांना महायुतीत घेण्यावरून भाजप आक्रमक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना खरमरीत पत्र!             ...
07/12/2023

नवाब मलिकांना महायुतीत घेण्यावरून भाजप आक्रमक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना खरमरीत पत्र!

07/12/2023

चैत्यभूमीवर आकर्षण ठरले “जगाला पोखरणारी डावी वाळवी.” पुस्तकाचे

लिंक कमेंटमध्ये...

असे निवडणूक विश्लेषक काय कामाचे? #संपादकीय      तिन्ही राज्यांमधली मतांची टक्केवारी  सांगतात. ती सांगून झाल्यावर या चारह...
07/12/2023

असे निवडणूक विश्लेषक काय कामाचे?
#संपादकीय
तिन्ही राज्यांमधली मतांची टक्केवारी सांगतात. ती सांगून झाल्यावर या चारही राज्यांत भाजपाला आणि काँग्रेसला मिळालेल्या मतांची बेरीज करून ती समोर ठेवतात. हरलेल्या काँग्रेसला भाजपापेक्षा साडेनऊ लाख मते जास्त मिळाली आहेत, हे त्यांना या द्राविडी प्राणायामातून सुचवायचे आहे. या करामतीमुळे कदाचित काँग्रेसचे सांत्वन होईल, पण ज्या मतदाराने भाजपाच्या हाती सत्ता दिली आहे, तो फसणार नाही. आपल्या या मुद्द्याकडे प्रेक्षकांनी दुर्लक्ष केले, तर निवडणूक निकालांच्या इतिहासाकडे लक्ष द्या, असे ते सुचवतात. विधानसभा मिळाली की लोकसभाही जिंकता येते अशी काही काळ्या दगडावरची रेघ नाही याला इतिहास साक्षी आहे, असे सांगत त्याच्या समर्थनासाठी सोयीची जंत्री सादर करतात.
https://www.evivek.com//Encyc/2023/12/7/What-is-the-use-of-such-election-analysts-.html

असे निवडणूक विश्लेषक काय कामाचे?

नौदलाचो ह्यो कार्यक्रम हजारो लोकांनी बघतल्यांनी@पंकज दिघेहा कार्यक्रम बघण्यासाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे २...
07/12/2023

नौदलाचो ह्यो कार्यक्रम हजारो लोकांनी बघतल्यांनी
@पंकज दिघे
हा कार्यक्रम बघण्यासाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे २०० बसेसमधून लोक आले होते. सुरक्षेच्या नियमांमुळे त्यांना कार्यक्रम स्थानापासून सुमारे दोन किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरून कार्यक्रम बघावा लागला. त्यांच्यासाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे २००००पेक्षा अधिक लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
https://www.evivek.com/Encyc/2023/12/7/malvan-navy-day.html
#नरेंद्रमोदी

कार्यक्रम बघण्यासाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे २०० बसेसमधून लोक आले होते. सुरक्षेच्या नियमांमुळे ....

07/12/2023

संघ शताब्दीनिमित्त | हिंदुराष्ट्राच्या जिवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.

भाऊ तोरसेकर
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक

संघाचे भावविश्व आणि सामाजिक परिवर्तन एकत्रित करून समाजासमोर मांडण्यासाठी हा ग्रंथ विवेकच्या माध्यमातून संघशताब्दीच्या पूर्वसंध्येला प्रकाशित होत आहे.

संघाच्या वैचारिक अभिव्यक्तीचा इतिहास जाणून घेऊन प्रत्येक कार्यकर्त्याने संग्रही ठेवावा असा हा ग्रंथ आहे…

ग्रंथानिमित्त २५००/- रुपयांची विशेष योजना असून वाचकांसाठी २१००/- रुपयाला उपलब्ध राहील.
यात वर्षभर विवेकचा अंक, विवेकच्या अमृत महोत्सवानिमित्त
ग्रंथामध्ये ' अमृतयात्री ' म्हणून आपल्या नावाची नोंद आणि ग्रंथाची एक प्रत देण्यात येईल.

नोंदणी केवळ ३१ डिसेंबरपर्यंतच…
आपली प्रत आजच नोंदवा.

07/12/2023

लोकसभा - हिवाळी अधिवेशन २०२३, LIVE

06/12/2023

लोकसभा - हिवाळी अधिवेशन २०२३ - LIVE

 #हिंदू अस्मितेवर, हिंदू समाजावर लागलेला पराभूत मानसिकतेचा कलंक नष्ट झाला. ६ डिसेंबर १९९२ रोजी न्यायालयाची परवानगी घेऊन ...
06/12/2023

#हिंदू अस्मितेवर, हिंदू समाजावर लागलेला पराभूत मानसिकतेचा कलंक नष्ट झाला.
६ डिसेंबर १९९२ रोजी न्यायालयाची परवानगी घेऊन #कारसेवक अयोध्येत एकत्रित झाले होते. त्याआधी अनेक वेळा प्रभू #श्रीरामाची जन्मभूमी मुक्त करण्यासाठी हिंदू समाजाने न्यायालयीन व सामाजिक पातळीवर प्रयत्न केला होता. शासनाची बोटचेपी भूमिका, मुस्लीम समाजाकडे असणारा ओढा लपून राहिलेला नव्हता. अशा पार्श्वभूमीवर #अयोध्येत एकत्रित आलेल्या हिंदू समाजाने उत्स्फूर्त कृती करत बाबरी ढाचा जमीनदोस्त केला आणि एक #इतिहास घडवला. #हिंदू अस्मितेवर, हिंदू समाजावर लागलेला पराभूत मानसिकतेचा कलंक नष्ट झाला. हिंदू समाज संघटित झाला तर काय होऊ शकते, याचे छोटे प्रात्यक्षिकच त्या दिवशी अयोध्येत पाहायला मिळाले होते. देशभरात #चैतन्य जागृत करणारी ही घटना होती. हिंदूच्या प्रदीर्घ काळ चाललेल्या आंदोलनाचा एक टप्पा त्या वेळी पूर्ण झाला होता.

डॉ. बाबासाहेबांचा सांविधानिक ज्ञानाचा प्रवास@काशीनाथ पवारडॉ. बाबासाहेबांचा जीवनप्रवास हा सामाजिक समरसता प्रस्थापित होण्य...
06/12/2023

डॉ. बाबासाहेबांचा सांविधानिक ज्ञानाचा प्रवास
@काशीनाथ पवार
डॉ. बाबासाहेबांचा जीवनप्रवास हा सामाजिक समरसता प्रस्थापित होण्यासाठी संयमाची कसोटी पाहणारा, व्यवस्थापकीय कौशल्याची मांडणी करणारा आणि ज्ञानाची परीक्षा पाहणारा असा होता, म्हणूनच त्यांच्या विचारातून ‘न भूतो न भविष्यती’ अशी सामाजिक आणि वैचारिक क्रांती जन्माला आली. या क्रांतीची सुरुवात झाली ती महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने. त्या काळात अस्पृश्य समाजाला जी अवहेलना सहन करावी लागली, त्याची सलत असलेली ठिणगी ‘महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहा’च्या आंदोलनरूपी क्रांतिज्योतीने अस्पृश्य समाजाच्या जीवनात प्रकाशाचे किरण उजळण्यास साहाय्यभूत ठरली. डॉ. बाबासाहेबांची असाधारण बुद्धिमत्ता, प्रचंड वाचन, त्यांची ज्ञानासक्ती, त्यांची भाषानिपुणता, असामान्य विद्वत्ता आणि त्यांचा प्रगल्भ सांविधानिक दृष्टीकोन या वैशिष्ट्यांमुळे संपूर्ण भारतवर्षाला आणि अस्पृश्य समाजाला भारतीय संविधान हा खूप मौलिक दस्तऐवज लाभला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या प्रवासाचा घेतलेला वेध.

Dr. Babasaheb's A journey of constitutional knowledge

05/12/2023

लोकसभा - हिवाळी अधिवेशन २०२३ : LIVE

04/12/2023

संघ शताब्दीनिमित्त | हिंदुराष्ट्राच्या जिवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.

प्रताप दड्डीकर
कोल्हापूर विभाग संघचालक

संघाचे भावविश्व आणि सामाजिक परिवर्तन एकत्रित करून समाजासमोर मांडण्यासाठी हा ग्रंथ विवेकच्या माध्यमातून संघशताब्दीच्या पूर्वसंध्येला प्रकाशित होत आहे.

संघाच्या वैचारिक अभिव्यक्तीचा इतिहास जाणून घेऊन प्रत्येक कार्यकर्त्याने संग्रही ठेवावा असा हा ग्रंथ आहे…

ग्रंथानिमित्त २५००/- रुपयांची विशेष योजना असून वाचकांसाठी २१००/- रुपयाला उपलब्ध राहील.
यात वर्षभर विवेकचा अंक, विवेकच्या अमृत महोत्सवानिमित्त
ग्रंथामध्ये ' अमृतयात्री ' म्हणून आपल्या नावाची नोंद आणि ग्रंथाची एक प्रत देण्यात येईल.

नोंदणी केवळ ३१ डिसेंबरपर्यंतच…
आपली प्रत आजच नोंदवा.

04/12/2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग दौऱ्यावर |

04/12/2023

पंतप्रधान मोदींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण : सिंधुदुर्ग, मालवण

ओडिशा भारताचा अल्पस्पर्शित समृद्ध खजिना@सई चपळगावकर   ओडिशातील अनेक आख्यायिकांनी वेढलेल्या जगन्नाथ मंदिराचं आकर्षण आम्हा...
04/12/2023

ओडिशा भारताचा अल्पस्पर्शित समृद्ध खजिना
@सई चपळगावकर
ओडिशातील अनेक आख्यायिकांनी वेढलेल्या जगन्नाथ मंदिराचं आकर्षण आम्हाला खुणावत होतंच. त्यामुळे यंदा आम्ही ओडिशात जाण्याचं निश्चित केलं. त्याबरोबरच अनेकांनी वाखाणलेला पुरीचा समुद्रकिनारा, कोणार्कचं सूर्यमंदिर, चिल्का सरोवर, पुरातत्त्व विभागाच्या काही साइट्स, ओडिशाची खाद्यसंस्कृती, ओडिशा आर्ट.. सगळंच थक्क करणारं आहे. ओडिशात हातावर मोजण्याइतकी मोठी शहरं आणि बाकी सर्व ग्रामीण भाग आहे. तेथील लोकांचं आदारातिथ्यही वाखाणण्याजोगं होतं. आपण केलेला प्रत्येक डोळस प्रवास हा आपलं भावविश्व विस्तारत, आपल्याला अनुभवसमृद्ध करत असतो.
https://www.evivek.com/Encyc/2023/12/2/odisha-tourism-development.html

ओडिशातील अनेक आख्यायिकांनी वेढलेल्या जगन्नाथ मंदिराचं आकर्षण आम्हाला खुणावत होतंच. त्यामुळे यंदा आम्ही ओडिशात ...

राष्ट्र सेविका समितिने दिली जिजाऊंना मानवंदना@नमिता दामले“कणखर, स्वधर्माभिमानी, स्वराष्ट्राभिमानी अशा जिजाऊंच्या कर्तृत्...
04/12/2023

राष्ट्र सेविका समितिने दिली जिजाऊंना मानवंदना
@नमिता दामले
“कणखर, स्वधर्माभिमानी, स्वराष्ट्राभिमानी अशा जिजाऊंच्या कर्तृत्वाचे स्मरण करणे आणि त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे खर्‍या अर्थाने त्यांची पुण्यतिथी साजरी करणे” असे उद्गार राष्ट्र सेविका समितीतर्फे जिजाऊसाहेबांच्या 350व्या पुण्यस्मरणाप्रीत्यर्थ आयोजित पाचाड येथील कार्यक्रमात सा. विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनीताई मयेकर यांनी काढले. त्या या कार्यक्रमास मुख्य वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. जिजामाता पुण्यतिथी व शिवराज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त राष्ट्र सेविका समिती, राजमाता जिजाबाई ट्रस्ट, ठाणे व जिजामाता स्मारक समिती, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी श्रीक्षेत्र पाचाड येथे 1100 सेविका व ग्रामस्थ महिलांचा सहभाग असलेला अत्यंत आखीव-रेखीव, देखणा व प्रेरणादायक कार्यक्रम झाला. महाराष्ट्राच्या पश्चिम क्षेत्रातील व गोव्यामधील सेविका, अधिकारी, कार्यकर्त्या यांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.
https://www.evivek.com/Encyc/2023/12/2/jijabai-death-anniversary-rashtra-savika-samiti-salute.html

जिजामाता पुण्यतिथी व शिवराज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त राष्ट्र सेविका समिती, राजमाता जिजाबाई ट्रस्ट, ठाण....

‘INDI’ आघाडीला भारताचा सूचक इशारा !!!
03/12/2023

‘INDI’ आघाडीला भारताचा सूचक इशारा !!!

एक अकेला कितनों को भारी !!!
03/12/2023

एक अकेला कितनों को भारी !!!

तीन राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश !! 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'INDI’ आघाडीचे भविष्य अंधारात आल...
03/12/2023

तीन राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश !! 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'INDI’ आघाडीचे भविष्य अंधारात आल्याची चिन्हं !!!

02/12/2023

गोदावरी संवाद - २०२३

डी-लिस्टिंगशिवाय तरणोपाय नाही    @शरद चव्हाण डी-लिस्टिंग हा केवळ जनजाती समुदायाचा विषय नसून तो समस्त भारताचा व देशाच्या ...
02/12/2023

डी-लिस्टिंगशिवाय तरणोपाय नाही
@शरद चव्हाण
डी-लिस्टिंग हा केवळ जनजाती समुदायाचा विषय नसून तो समस्त भारताचा व देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण विषय आहे. जनजाती समाजातून धर्मांतर करून, आपल्या पूर्वजांचा (पारंपरिक सनातन) धर्म सोडून ख्रिश्चन किंवा मुस्लीम बनून आरक्षणाचा गैरफायदा घेण्याच्या विरोधात आवाज उठवणे आणि खर्‍या जनजाती समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी घटनात्मक तरतूद करण्यात यावी, यासाठी जनजाती सुरक्षा मंचातर्फे देशभरात आंदोलने, जनजागृती केली जात आहे. हा विषय किती व्यापक आणि देशासाठी महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित करणारा लेख.
https://www.evivek.com/Encyc/2023/12/1/dlisting-demand-grows-to-strip-st-status-of-converts.html

डी-लिस्टिंग हा केवळ जनजाती समुदायाचा विषय नसून तो समस्त भारताचा व देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्त्वपू...

01/12/2023

Henry Kissinger - भारतविरोधी, वादग्रस्त तरीही महान मुत्सद्दी!

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात अमेरिकेचे ७ वेळ आरमार बंगालच्या उपसागरातून परत कसे गेले? हेन्री किसिंजर यांना इंदिरा गांधींबद्दल अपशब्द वापरून नंतर त्याबद्दल माफी का मागितली? अमेरिकेचा शत्रू कम्युनिस्ट चीनने हेन्री किसिंजर यांचा सत्कार का केला होता? ‘वास्तव परराष्ट्र धोरणा‘चा किसिंजर यांचा वारसा एस. जयशंकर पुढे चालवत आहेत का? या व अशा अनेक प्रश्नांवरील रंजक माहितीसाठी पहा चंद्रशेखर नेने यांचा हा विशेष व्हिडिओ :

01/12/2023

रामजन्मभूमी आंदोलनाची संकल्पना आज सत्यात उतरत असताना मा. मोरोपंत पिंगळे नाहीत याचे दु:ख आहे - भय्याजी जोशी
लिंक कमेंटमध्ये..

हिमालयातले आधुनिक भगीरथ@राजेश कुलकर्णीभगीरथाने गंगा पृथ्वीवर आणल्याचे सांगतात. गंगेच्या प्रवाहाचे स्वरूप पाहता ते काम खच...
01/12/2023

हिमालयातले आधुनिक भगीरथ
@राजेश कुलकर्णी
भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणल्याचे सांगतात. गंगेच्या प्रवाहाचे स्वरूप पाहता ते काम खचितच वैयक्तिक पातळीवरचे नसणार. त्या कामात हजारो हात लागले असणार. बोगद्याच्या पलीकडच्या भागात अडकून पडलेल्या श्रमिकांची सुटका हा प्रयत्नही तसाच आहे. हे योगायोगाने हिमालयातच झालेले भगीरथ प्रयत्नच समजायला हवेत.
https://www.evivek.com/Encyc/2023/12/1/Uttarakhand-tunnel-rescue.html

दि. 12 नोव्हेंबरला सिलक्याराच्या बाजूने बोगद्याच्या तोंडापासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर बोगद्याचा भाग ढासळला आ....

डीप-फेक आणि समाजभान@मोहिनी मोडकडीप-फेक वापरून खर्‍या व्हिडिओतला एखादा शब्द, वाक्य, आकडा, स्क्रीनशॉट किंवा संपूर्ण भाषाही...
01/12/2023

डीप-फेक आणि समाजभान
@मोहिनी मोडक
डीप-फेक वापरून खर्‍या व्हिडिओतला एखादा शब्द, वाक्य, आकडा, स्क्रीनशॉट किंवा संपूर्ण भाषाही परवानगी न घेता बदलता येते. एआयच्या मदतीने त्या व्यक्तीचे अस्सल वाटणारे रूप, आवाज किंवा दस्तऐवज तयार केले जातात. समाजमाध्यमांवर शहानिशा न करता वायुवेगाने असे ’डीप-फेक’ फोटो, रील्स व्हायरल होतात. यापुढे सत्य-असत्यामधली सीमारेषा अशीच पुसट होत जाणार असेल, तर समाज एका अनागोंदीच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्यामुळे समाजमाध्यमांतून असे फोटो, व्हिडिओ दिसताच आपण किती जागरूक राहिले पाहिजे, याबद्दल डोळ्यात अंजन घालणारा लेख....
https://www.evivek.com/Encyc/2023/12/1/How-are-deepfakes-dangerous-.html

डीप-फेक वापरून खर्‍या व्हिडिओतला एखादा शब्द, वाक्य, आकडा, स्क्रीनशॉट किंवा संपूर्ण भाषाही परवानगी न घेता बदलता ये....

साथी हाथ बढाना.. #संपादकीय  दुर्घटना घडल्यापासून सरकारला, सरकारी यंत्रणांना, प्रकल्पाला सतत धारेवर धरणार्‍या टीकाकारांच्...
30/11/2023

साथी हाथ बढाना..
#संपादकीय
दुर्घटना घडल्यापासून सरकारला, सरकारी यंत्रणांना, प्रकल्पाला सतत धारेवर धरणार्‍या टीकाकारांच्या टीकेतली हवा गेली आहे ती त्यामुळेच.. बचावकार्यात मिळालेल्या निर्विवाद यशामुळे, त्यात गुंतलेल्या सगळ्यांमधल्या सुसूत्रतेमुळे आणि त्यांनी नेतृत्वावर दाखविलेल्या अढळ विश्वासामुळेच.
https://www.evivek.com//Encyc/2023/11/30/Uttarakhand-Tunnel-Collapse.html

दुर्घटना घडल्यापासून सरकारला, सरकारी यंत्रणांना, प्रकल्पाला सतत धारेवर धरणार्‍या टीकाकारांच्या टीकेतली हवा गे....

29/11/2023

Address

Saptahik Vivek, 108, Shilpin Center Near Wadala Udyog Bhavan, G. D. Ambekar Road, Wadala
Mumbai
400031

Telephone

+912227810235

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vivek saptahik - साप्ताहिक विवेक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vivek saptahik - साप्ताहिक विवेक:

Videos

Share

Nearby media companies


Other Mumbai media companies

Show All