Divya mumbai news

Divya mumbai news Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Divya mumbai news, Media/News Company, Bhayasaheb Ambedkar Nagar O. T. Sector 2, Mumbai.

16/11/2024
शिख धर्माचे संस्थापक श्री गुरू नानक देवजी यांनी जगाला दिलेली शांती, प्रेम, विश्वबंधुत्व आणि मानवतेची शिकवण प्रत्येकासाठी...
15/11/2024

शिख धर्माचे संस्थापक श्री गुरू नानक देवजी यांनी जगाला दिलेली शांती, प्रेम, विश्वबंधुत्व आणि मानवतेची शिकवण प्रत्येकासाठी पथदर्शक आहे. सर्वांना गुरू नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
#गुरूनानकजयंती

13/11/2024

https://youtu.be/मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गट बालाजी किणीकर यांच्या साठी अंबरनाथ येथे सभा घेतली
अंबरनाथ -(शिवाजीराव मस्के)
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे महायुतीतील अधिकृत उमेदवार आणि आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्या प्रचारार्थ आज अंबरनाथ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या अंबरनाथकरांना संबोधित करताना अंबरनाथ शहराचा विकास अधिक गतीने होत असून शहरातील रस्त्यांची स्थिती सुधारली, अनेक पायाभूत सुविधांची उभारणी झाली. एक विकसित शहर म्हणून अंबरनाथ शहराची ओळख होऊ लागली असल्याचे सांगितले. यात आमदार डॉ.बालाजी किणीकर यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे डॉ. किणीकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन यासमयी केले.
अंबरनाथ शहरात नव्याने वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले असून जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे, असे मत यावेळी व्यक्त केले. त्याचप्रमाणे शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प, शहरात नवीन वाचनालय, नाट्यगृह, रस्त्यांचे काँक्रीटीकरण यामुळे आज अंबरनाथ परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या लोकाभिमुख विकासकामांमध्ये येथील आमदार डॉ.बालाजी किणीकर यांचा मोलाचा वाटा आहे. भविष्यातही याच पद्धतीने अंबरनाथ शहराच्या विकासासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी डॉ. बालाजी किणीकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथकरांना केले.

लोकशाहीच्या बळकटीसाठी आम्ही सदैव तत्पर राहू. येत्या २० नोव्हेंबरला आवर्जुन मतदान करु.
12/11/2024

लोकशाहीच्या बळकटीसाठी आम्ही सदैव तत्पर राहू. येत्या २० नोव्हेंबरला आवर्जुन मतदान करु.

*महायुती ने AB फॉर्म विमानाने पाठवले*मुंबई - रवि राणे (दिव्य मुंबई मराठी)विधानसभा निवडणूक 2024 मतदानाची तारीख जवळ येत आह...
02/11/2024

*महायुती ने AB फॉर्म विमानाने पाठवले*
मुंबई - रवि राणे (दिव्य मुंबई मराठी)
विधानसभा निवडणूक 2024 मतदानाची तारीख जवळ येत आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान आहे. अशात यापूर्वी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधत मोठा आरोप केला आहे. त्यांनी म्हटलंय की, ‘पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात आहे. याची माहिती अधिकाऱ्यांनी मला दिली आहे.’

बीपीएल ग्रुपचे संस्थापक टीपी गोपालन नांबियार यांचे गुरुवारी (ता. 31 ऑक्टोबर) निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. नांबियार...
31/10/2024

बीपीएल ग्रुपचे संस्थापक टीपी गोपालन नांबियार यांचे गुरुवारी (ता. 31 ऑक्टोबर) निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. नांबियार हे 94 वर्षांचे होते. गुरुवारी सकाळी 10.15 वाजताच्या सुमारास त्यांची बंगळुरू येथील राहत्या घरी प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून नांबियार यांची प्रकृती ठीक नव्हती. ज्यानंतर आज अखेरीस त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याकडून सांगण्यात आले.

सोनेरी प्रकाशात पहाट न्हाऊन निघालीगोडधोड पदार्थांची मेजवानी बनलीआनंदाची उधळण करीतसोनपावली दिवाळी आली..दिवाळीच्या मंगलमयी...
31/10/2024

सोनेरी प्रकाशात पहाट न्हाऊन निघाली

गोडधोड पदार्थांची मेजवानी बनली

आनंदाची उधळण करीत

सोनपावली दिवाळी आली..

दिवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा

२८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत ७९९५ उमेदवारांचे अर्ज दाखलमुंबई, दि. ३० : दिव्य मुंबई मराठी (संजय खरात)महाराष्ट्र व...
29/10/2024

२८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत ७९९५ उमेदवारांचे अर्ज दाखल

मुंबई, दि. ३० : दिव्य मुंबई मराठी (संजय खरात)महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघासाठी निवडणुकीकरिता आज २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख होती. आजपर्यंत आलेल्या अर्जांची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.
असं निवडणूक आयोगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

27/10/2024
*भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर*मुंबई -दिव्य मुंबई मराठी (रवी राणे) महायुती मधिल  शिवसेना ...
27/10/2024

*भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर*

मुंबई -दिव्य मुंबई मराठी (रवी राणे) महायुती मधिल शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भारतीय जनता पक्षानेही आपल्या विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील उमेदवारीची दुसरी यादी प्रसिद्ध केली, यामध्ये प्रामुख्याने समतोल राखण्यासाठी प्रयत्न केले आहेत,१४१ उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील उमेदवार स्थानिक आमदार कुमार आयलानी यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षातील कार्यकर्ते यांनी उत्साह साजरा केला आहे, त्यांची महत्वाची लढत माजी आमदार पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांच्या विरोधात आहे, त्यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे,तर वंचित बहुजन आघाडी तर्फे उद्योगपती डॉ संजय गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे यांच्या चुरशीची लढत होणार आहे

27/10/2024

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची 141उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ ओमी कलानी यांना उमेदवारी जाहीर

मुंबई, दि. २५: सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, व्यक्ती यांनी राजकीय जाहिरातींचा प्रत्यक्ष वापर / प्रसारण करण्यापूर्वी या जाहि...
25/10/2024

मुंबई, दि. २५: सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, व्यक्ती यांनी राजकीय जाहिरातींचा प्रत्यक्ष वापर / प्रसारण करण्यापूर्वी या जाहिरातींना राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. या समितीचे अध्यक्ष अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी हे आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

जाहिरातींमध्ये दूरचित्रवाहिन्या, केबल नेटवर्क/ केबल वाहिन्यांवरचे प्रक्षेपण प्रसारण, चित्रपटगृहे, रेडिओ, खाजगी एफएम, सार्वजनिक ठिकाणी दृकश्राव्य माध्यमा‌द्वारे (Audio- Video Display) होणारे प्रसारण, ई-वृत्तपत्रांमधील जाहिरातींचे प्रकाशन, बल्क एसएमएस (SMS) / व्हॉईस मॅसेजेस यांचा समावेश होतो. तसेच मुद्रीत माध्यमांमध्ये (Print Media Paper) मतदानाच्या आधीच्या दिवशी तसेच मतदानाच्या दिवशी प्रकाशित केल्या जाणाऱ्या जाहिरातींकरीता देखील माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

जाहिरातीचे पुर्वप्रमाणीकरण करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती व राज्य स्तरावर राज्य पूर्वप्रमाणीकरण समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावरील समितीकडे समितीच्या कार्यकक्षेत येणाऱ्या मतदारसंघातील व्यक्ती किंवा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक मीडियावर जारी करावयाच्या जाहिरातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करावयाचा आहे. तसेच राज्य स्तरीय समितीकडे सर्व नोंदणीकृत राजकीय पक्ष, संस्था यांनी जाहिरात पूर्व प्रमाणीकरणासाठी अर्ज करावयाचा आहे. या समितीकडून भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व राजकीय जाहिरातीचे प्रमाणीकरण केले जाते.

जिल्हास्तरावर जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती व राज्य स्तरावर राज्य पूर्वप्रमाणीकरण समिती यांनी मान्यता दिल्याशिवाय राजकीय पक्ष / उमेदवारांनी राजकीय जाहिरातीचे प्रसारण करू नये. आजपर्यंत 169 जाहिरातींचे राज्यस्तरावरील राज्य पूर्व प्रमाणीकरण समितीकडून प्रमाणिकरण करण्यात आलेले आहे.

Address

Bhayasaheb Ambedkar Nagar O. T. Sector 2
Mumbai
421002MUMBAIMAHANAGARPRADESH

Telephone

9833630333

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Divya mumbai news posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Divya mumbai news:

Videos

Share

Nearby media companies