एक बाकी एकाकी

एक बाकी एकाकी "I'm God's lonely man.”

Koi jab tumhara Hrudya Todde----   ाकी_एकाकी
05/12/2024

Koi jab tumhara Hrudya Todde

-
-
-
-
ाकी_एकाकी

असं स्वतःच सांगावं स्वतःला...--
04/12/2024

असं स्वतःच सांगावं स्वतःला...
-
-

चहा हे केवळ पेय नसून, ती एक भावना आहे... 💙 एका गरम चहा कपातून जगाचे सौंदर्य अनुभवण्याचा आनंद काही औरच! 🍵✨ ----- #चहाप्रे...
30/11/2024

चहा हे केवळ पेय नसून, ती एक भावना आहे... 💙 एका गरम चहा कपातून जगाचे सौंदर्य अनुभवण्याचा आनंद काही औरच! 🍵✨
-
-
-
-
-

#चहाप्रेम

( चहा, मनाची ताजगी, पहाट, निसर्ग, चहाप्रेम, अमृत, क्षणांचे सौंदर्य )

अचानक आलेल्या सुखाचं काय करावं हे अजूनही कित्येकांना समजत नाही. तो मात्र भरभरून देत असतो , कधी कुणाला कधी कुणाला. आपण इत...
19/09/2024

अचानक आलेल्या सुखाचं काय करावं हे अजूनही कित्येकांना समजत नाही. तो मात्र भरभरून देत असतो , कधी कुणाला कधी कुणाला. आपण इतरांचंच पाहण्यात इतके मग्न असतो की आपल्याला आपली सुखं सरप्राईज म्हणूनच मिळतात अन मग ती पेलता येत नाहीत. हो नं, दुःखाप्रमाणे सुखही पेलता यायला हवं. नेमकं याचीच तयारी नसते अन हा ठेवा वाया जातो. बरेचदा हे अनपेक्षित सुख जाणवतही नाही. आपण इतकं आपल्या रहाटगाड्यात हरवलेलो असतो. म्हणजे एखाद्या रस्त्यावरून चालताना रस्त्यावरच इतकं लक्ष्य एकाग्र असावं कि कधी दोन्ही बाजूला छानशी हिरवळ लागते, एका बाजूला मोर सुंदर पिसारा फुलवून मोकाक नाचतो असं दृश्य असतं पण आपलं लक्ष मात्र रस्त्यावरच. अशा करंटेपणाचं काय बरं करावं ?

मी नाहीय बुवा असा. खरंच. मला खूप खूप कौतुक आहे त्या क्षणांचं ज्यांनी माझ्या अंगणात आनंदाच्या सरी दिल्या. त्यातलाच एक क्षण... जेव्हा ति भेटली.... पहिल्यांदा !
-
-
-

काय हवंय , हे नेमकं कळणं माणसाचा वेळ खातं..जी जगण्याची वेळ असते ,ती आपण अशी हाताने गमावतो आणि संपलेली वेळ पुन्हा फिरून य...
13/09/2024

काय हवंय , हे नेमकं कळणं माणसाचा वेळ खातं..जी जगण्याची वेळ असते ,ती आपण अशी हाताने गमावतो आणि संपलेली वेळ पुन्हा फिरून येत नाही...
आहे त्या परिस्थितीत सुखात जगणं, हे एक टोक असतं जगण्याचं..जे प्रत्येकालाच धरता येतं नसतं..काहीजण परिस्थिती बदलवायलाही धडपडतात..काही त्यात यशस्वी होतात ,काही यशाच्या मागे लागतांनाच आयुष्यातून सुटतात...
सगळा प्रवास ज्याचा त्याचा..
पण
ह्या प्रवासात माणसाला उसंत शोधता आली पाहीजेत...
काहीच न करता निवांत जगण्याचे क्षण आपल्याला स्वतःसाठी काढता आले पाहीजेत..
अगदी फक्त आपणचं..
आपल्यासोबत कुणीच नाही आणि तरिही आपण आपल्यात सुखी..शांत..हा क्षण ज्याला जगता आला त्यांनी आयुष्यात स्वतःला मिळवलंय..
बाकी सगळ्या गप्पा...
काय आहे जे आपण सोबत घेऊन जाणार आहोत..
आपण फक्त स्वतःला नेणार आहोत...
तेवढचं...
हे नेणं शिकणं म्हणजेच आयुष्याचं देणं फेडणं असतं...

अजून खूप जगायचंय ...
स्वतःसोबत...
अजून खूप लांबचा पल्ला गाठायचाय..
स्वतःसोबतचं
किंवा मग..
फार थोडा वेळ उरलाय आपला आपल्यासोबतचं...

चला जगून घेऊयात...

✍️ Bhagat
-
-
-
-
-

"I have crossed 30, and I’ve realized that I’m much more at peace than I was before—perhaps the most peaceful I’ve ever ...
10/09/2024

"I have crossed 30, and I’ve realized that I’m much more at peace than I was before—perhaps the most peaceful I’ve ever been. I still cry, but I move forward. I still get hurt, but I forgive faster. I still dream, but I don’t stay frustrated. I still love, but I also let go. I think I’ve redefined what peace means to me. It’s not about ‘not experiencing storms,’ but about flourishing even as the storms come and go—accepting that I, too, am just passing by, simply a part of the flow of life."
-
-
-
-
-

फार वाईट वाटलं की वाटून घ्यायचं वाईट..रडू आलं..रडून मोकळं व्हायचं..कुणीतरी बोलतंय ऐकायचं..त्यातचं 'सापडलं बोलायला' म्हणू...
03/09/2024

फार वाईट वाटलं की वाटून घ्यायचं वाईट..रडू आलं..रडून मोकळं व्हायचं..कुणीतरी बोलतंय ऐकायचं..त्यातचं 'सापडलं बोलायला' म्हणून आपलंही बोलणं अधल्या मधल्या वेळात सांगून टाकायचं..कुणी जीव लावतंय ..'आपला जीव नाहीये म्हणून हाकलून लावायचं नाही..समजून घ्यायचं, ऐकून घ्यायचं..'हो' नाही म्हणता येत ..ठिकंय ना..आशेवरही ठेवायचं नाही पण 'मी तुझा माझ्यातला जीव तुटेपर्यंत ऐकत राहीलं' म्हणायचं..
आपल्याला कुणीचं नाही, असं वाटलं की आपण कुणाचंतरी 'तसंच' वाटणं..वाटून घ्यायचं...
फार अवघड असतं 'भावनिकपण' टिकवून ठेवणं कोडग्या माणसात..
ते टिकवायला धडपडणार्‍या माणसांपैकी एक राहायचं कायम..
कोडगी तर काय अख्खी दुनियाच करायला टपलीय !!

✍️ Bhagat
-
-
-
-

I'm okay with being left behind, walking behind the crowd, taking unknown routes, and sometimes getting lost. I love obs...
29/07/2024

I'm okay with being left behind, walking behind the crowd, taking unknown routes, and sometimes getting lost. I love observing life's small details: raindrops, sunsets, moon phases, star constellations, waves, wind, birds. I'm not in a hurry; I'm learning to be okay with the process, adjusting as needed. I'm a work in progress, believing in my own season. I walk, explore, enjoy, and live life. I may be solo, but I'm not lonely—just sentimental.
-
-
-
-
-

𝗚𝗼𝗱'𝘀 𝗽𝗹𝗮𝗻 𝗕𝗮𝗯𝘆😍आमच्या जनरेशनबद्दल सांगायचं झालं तर अर्थातच ज्यांना क्रिकेटचं वेड आहे त्यांच्याबद्दल बोलायचं झालंच तर त्...
30/06/2024

𝗚𝗼𝗱'𝘀 𝗽𝗹𝗮𝗻 𝗕𝗮𝗯𝘆😍

आमच्या जनरेशनबद्दल सांगायचं झालं तर अर्थातच ज्यांना क्रिकेटचं वेड आहे त्यांच्याबद्दल बोलायचं झालंच तर त्यांच्या आयुष्यात सुरू असलेल्या वैयक्तिक पातळीवरील चढउतार, ताणतणाव, संघर्ष, स्वतःच्या आयुष्यात सुरू असलेल्या आणि त्यातून स्वतःला टिकवून ठेवण्याच्या स्पर्धेत शरीरापेक्षा जास्त मनावर मरगळ आल्यासारखी अवस्था त्यावर फुंकर घालण्याची संधी म्हणजे क्रिकेटप्रेम 'कारण वैयक्तिक आयुष्यात आवडीनिवडी ओळखून समाजातल्या वेगवेगळ्या घटकांवर, गोष्टींवर, व्यक्तींवर आम्हांला प्रेम झालं तरी 'तहान भूक आणि झोप विसरून निस्सीम वेडे झालो तो या क्रिकेट पायीच.. आमच्या जनरेशनमधल्या प्रत्येकाला 'सचिन' व्हायचं होत पण 'सचिन' सगळेच होत नाही हे ही तितकंच खरं अस म्हणता म्हणता..आणि 'त्यांचं क्रिकेट बघता बघता आमचं राहून गेलं'💔 अस मनाशी बिंबवून आम्ही त्यांचं क्रिकेट आमचं जगणं समजू लागलो

आजकालची मुलं भावनाशून्य आहेत यांना कशाचं काहीही देणंघेणं नसतं, यांना फरक पडत नाही, ही मुलं बोलत नाही, व्यक्त होत नाहीत, रडत नाही ही सगळी समजूत खोटी ठरवली या क्रिकेटवरच्या प्रेमामुळेच. शाळा असो कॉलेज, ऑफिस असो की एरियामधले मित्र, घरातला थोर असो की लहान असो, ओळखीचा असो - अनोळखी असो क्रिकेटवर बोलताना कधी वेळ बघण्यासाठी घड्याळाकडे लक्ष गेलंच नाही पण तीच वेळ सुखावणारी असायची एवढं मात्र खरं

पण हे सगळं बोलताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यामुळे हे क्रिकेट आयुष्यात कायम टिकून राहिलंय तो म्हणजे आपला भारतीय संघ, आमच्या पिढीच बालपण सचिन, द्रविड, गांगुली, सेहवाग, लक्ष्मण पासून सुरू झाल असलं तरी क्रिकेट डोक्यावर बसवून त्याच डोक्यावर मानाचा तुरा रोवण्याची सवय खऱ्या अर्थाने धोनीने लावली ❤️

पण तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने कधी सगळं जिंकून घेतलं हे कळेपर्यंत आमच्या पिढीच्या वाट्याला समज, अनुभव, प्रगल्भता आणि वैयक्तिक संघर्ष काय तो नव्हता... धोनी पर्व मावळतीला असताना आमचंदेखील हळूहळू वय वाढतय हे कळू लागलं, जबाबदाऱ्या बदलू लागल्या, आयुष्यात 'विराट' चढउतार सुरू झाले, मानसिकता कोलमडू लागली आणि तिथेच कोहली नावाचं वादळ या क्रिकेटच्या मनावर आणि आमच्या मनावर थैमान घालू लागल.. पण जेवढे चढउतार आपल्या आयुष्यात तेवढ्याच या मुलाच्या आयुष्यात बघितले प्रत्येक प्रयत्नांत १००% देऊनही त्यात ९९% यश मिळवून सुद्धा १% नशीब कमी पडायचं आणि परिस्थिती पुन्हा जैसे थे..ह्यातच भर म्हणून विराटची जबाबदारी जराशी सोप्पी करण्यासाठी त्याच्या खांद्यावरच ओझं आपल्याश्या वाटणाऱ्या रोहितने घेतली आणि क्रिकेटशी जगण्याचा संबंध खऱ्या अर्थाने लागायला सुरुवात झाली.. कोरोना काळातल्या २-४ वर्षात आमच्या जनरेशनच्या आयुष्यात झालेली पडझड आणि नेमकं घडलंय काय याच विश्लेषण करण्याआधीच सरलेली ही तीन-चार वर्षे.. त्यामुळे सगळं ठीक वाटत असताना देखील काहीच हाती लागत नसल्याची भावना घेऊन निराशेच्या गर्तेत वावरणारे आम्ही.. पण आमच्या वाटेला आनंदाचे दिवस दाखवायची संधी रोहित भाऊ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आणली ती म्हणजे २०२३चा विश्वचषक.. हा विश्वचषक बघताना अस वाटत होतं की आपण आपल्या आयुष्याच्या अश्या निर्णायक टप्प्यावर आहोत जिथे किमान 'इथून तरी पुढे वाटेला येणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या आनंद देणाऱ्या क्षणांचा, या खेळाचा- खेळाडूंचा, विजयाचा अगदी व्यक्तिगत आयुष्याशी साधर्म्य, संबंध (Relate) जोडून सुख मानत होतो कदाचित हें सुख साजरं करत होतो... आणि इतकं मनापासून की ही एक गोष्ट (World cup) मिळवली की आपल्या आयुष्यातल्याही पुढच्या सर्व गोष्टी नीट होतील इतके संबंध जोडले गेले.. पण ते स्वप्न भंग झालं आणि बऱ्याच हातात आलेल्या गोष्टी निसटल्याची जाणीव झाली अर्थातच 'भारतीय संघाच्या हातून जगज्जेतेपद आणि आमची Mental Health.. 💔

पण त्या दिवसापासून म्हणजे १९ नोव्हेंबर २०२३ला अंतिम सामन्यातला पराभव आणि त्यातून वाट्याला आलेली सगळी दुःख मनाशी गिळून या १४० कोटी भारतीयांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मुलांकडे बघताना सारखं मनाला वाटतं होतं की They Deserve Better Than this.. आणि शेवटी तो दिवस उजाडला.. उजाडला नाही तो या सर्वांनी मेहनतीने, जिद्दीने, लढाऊ वृत्तीने दाखवलाय...

अवघ्या ०७ महिन्यांनी आम्हाला त्या डिप्रेशन मधून बाहेर काढून, चोकर्सचा डाग पुसून, ०७ धावांनी मिळवलेला भारतीय संघाचा हा विजय येणाऱ्या काळात आमच्या पिढीलासुद्धा विजयी होईपर्यंत लढत राहण्याची प्रेरणा देऊन जाणार... अर्थातच ०७ हा आकडा खास आहेच❤️

आणि They Deserv Better म्हणताना यांच्या जे वाट्याला आलंय ते Better आहे की नाही माहीत नाही पण जे आहे ते भारी आहे.. ज्यांच्यामुळे मिळालंय ते लढवय्ये आहेत आणि ह्या लढवय्यांचा हा इतिहास आहे.. फक्त फरक हाच की हा इतिहास लिहिताना वाट्याला आलेल्या प्रत्येक खेळाडूंच्या प्रत्येक पानावरची गोष्ट खास आहे...

खास वर्णन करायचं तर 'दृष्ट लागण्यासारखा बुमराह, मृत्यूला मात देऊन आलेला लढवय्या ऋषभ पंत, आपली अव्वल फिरकी गोलंदाजी,फलंदाजी' पण या पलीकडेही लक्षात राहण्यासारखा खरा 'सिनेमा' म्हणजे 'हार्दिकला नियतीने दिलेली संधी त्यात त्याने हिरो होऊन दाखवणं, सूर्याने त्याच्या शैलीनुसार त्याच्या फॉरमॅटमध्ये तळपणं, ICCच्या प्रत्येक प्रकारात अगदी शेवटपर्यंत झुंजणारा आणि शेवटी अयशस्वी राहणाऱ्या झुंजार 'कोहलीला' त्याला त्याच्या मनासारखा विराट शेवट मिळाला (T20), भारतीय संघाची भिंत म्हणून भारतीय संघांच्या यशाच्या भिंतीच्या प्रत्येक विटेला आकार देणाऱ्या राहुल द्रविड सरांना त्यांच्या हक्काचं काहीतरी मिळालेलं बघितलं आणि 'कप उंचावणारा' ही ओळख असणाऱ्या रोहितवर १४० करोड भारतीयांच्या स्वप्नांचं नेतृत्व सोपवलं होतं ते त्याने 'कप उंचावूनच' सत्यात उतरवलं ! अर्थातच थोडक्यात सांगून होणार नाहीत एवढ्या खास ह्या गोष्टी आहेत म्हणूनच सध्या इतकंच म्हणूयात God's Plan Baby...❤️

तूर्तास इतकंच !!
आम्हांला आयुष्याच्या स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी भारतीय संघाला मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा !!❤️🇮🇳

written by Kishor Satpute

About 4 months ago, I was in a very low point in my life. Then, I found One Piece. To be honest, I had heard of it befor...
18/02/2024

About 4 months ago, I was in a very low point in my life. Then, I found One Piece. To be honest, I had heard of it before and it never really caught my attention.( although i started watching anime 5 years ago.) One Piece has impacted my life by showing me that there are more adventures out there than just your normal average everyday lessons.

After East Blue, I was entranced by the OST, character development, plot points—everything. Arlong Park completely sold it for me, for obvious reasons. The thirst for more of this masterpiece became the only light at the end of my dark tunnel. I reached that light, and a few weeks later, I found the help I needed at the beginning of Fishman Island, I wouldn't have seen any of it if One Piece didn't come into my life when it did. It changed the way I feel about the way I see things and give respect to the things I don't really appreciate much. I love it so much that I fell in love with pirate music.
(rignt now iam on Dressrosa arc)

Thank you Eiichiro Oda for not only teaching me a lesson, but a life long lesson to be remembered by heart and wondrous views.

To the One Piece community, thank you for your support, because without it, One Piece would not have gotten this huge. Once again, to all who had a hand in creating this story, a heartfelt thank you.
-
-
-
-
-

रायगडावर या ठिकाणी आल्यावर आयुष्यात अडखळलेली पाऊले सुदधा नीट पडतात, आयुष्यातील निरागसतेला मागे टाकण्याची स्फुर्ती मिळते ...
14/01/2024

रायगडावर या ठिकाणी आल्यावर आयुष्यात अडखळलेली पाऊले सुदधा नीट पडतात, आयुष्यातील निरागसतेला मागे टाकण्याची स्फुर्ती मिळते ती या ठिकाणीच.. खचून गेलेलं, भरकटलेलं मन, पिचलेलं अंतर्मन लढा द्यायला तयार होते ते या ठिकाणीच...
-
काय करायचं कळत नसेल किंवा रस्ता चुकलो असेल तेव्हा इथं मुजऱ्याला यावं आणि पुन्हा भरारी घ्यायला तयार व्हावं...
-
-
-
CC: वैभव पाटील
-

कोकणाच्या ऐतिहासिक वैभवाची महत्वपूर्ण साक्ष म्हणून मोठ्या गौरवाने महाराष्ट्राची अस्मिता असलेला “किल्ला रायगड”....🚩----- ...
08/01/2024

कोकणाच्या ऐतिहासिक वैभवाची महत्वपूर्ण साक्ष म्हणून मोठ्या गौरवाने महाराष्ट्राची अस्मिता असलेला “किल्ला रायगड”....🚩
-
-
-
-
-
( 1st january 2024)

"In life, you search for mysterious beauty in distress. Kindly hoot to remind yourself, be inspired, and know that you h...
07/01/2024

"In life, you search for mysterious beauty in distress. Kindly hoot to remind yourself, be inspired, and know that you have lived more beautifully."
-
-
-
-
pc :

( happynewyear , by2023 , 2024 )

स्व ची स्व सोबत असलेली लढाई जिंकायला... आधी हरवलेला स्व शोधावा लागतो...-----✍️लीना #शोध_स्वतःचा
19/08/2023

स्व ची स्व सोबत असलेली लढाई जिंकायला... आधी हरवलेला स्व शोधावा लागतो...
-
-
-
-
-
✍️लीना
#शोध_स्वतःचा

तिला बहरण्या वेळ नाहीसाठून ठेवला हा मी वेळ काही..उमलून येतील नवी पाने पुन्हा हीतू सोबती बनुनी माझी सावली...-----
18/08/2023

तिला बहरण्या वेळ नाही
साठून ठेवला हा मी वेळ काही..
उमलून येतील नवी पाने पुन्हा ही
तू सोबती बनुनी माझी सावली...
-
-
-
-
-

समुद्राच्याकडेला बसून तुझ्या खांद्यावर डोकं ठेवूनबघायचा आहे मला सूर्यास्त...🌤️क्षैतिजमायेत विरघळत जाणारे अलवार रंग डोळ्य...
17/08/2023

समुद्राच्याकडेला बसून
तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून
बघायचा आहे मला सूर्यास्त...🌤️

क्षैतिजमायेत विरघळत जाणारे
अलवार रंग डोळ्यांनी टिपत असताना
हवाय तुझा हात हातात

कारण हे आभाळातले रंग विरघळत असताना
मला जपायचा आहे आपल्यातल्या प्रेमाचा
अबोली रंग...

तुझ्या डोळ्यांतल्या सूर्यास्ताच्या खुणा
साठवून ठेवायच्या आहेत उरात
माझ्या डोळ्यांच्या अस्तापर्यंत...

तुला साठवायचं आहे
अथ पासून इतिपर्यंत;

तुझ्यातून माझ्यापर्यंत पोहोचलेली तू
उतरवून घ्यायची आहे माझ्यातल्या मी पर्यंत...

जेव्हा तू मी होशील आणि
मी तू होईन तेव्हांपर्यंत...धरायचा आहे तुझा हात हातात...

तुझ्यामुळे सापडलाय मला
माझ्यातल्या नदीचा उगम
छळणाऱ्या असंख्य प्रश्नांचे तळ
सावरलेले कितीतरी क्षण
मनाच्या मुळाशी साठलेले वळ
नकळत वाहत आलेल्या प्रश्नांचे गळ आणि
तुझ्या डोळ्यांत उत्तर शोधत असलेली माझी नजर...👀

कदाचित या सर्व शुभंकर खुणा
कितीतरी जन्म जपाव्या लागणार आहेत मला
माझ्या नावाची रेघ तुझ्या हातावर
कायमचं गोंदण म्हणून उतरेपर्यंत...😊

आणि म्हणून बघायचा आहे मला
या जन्मातला सूर्यास्त
तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून
तुझ्याच डोळ्यांनी...🤩
-
✍️ अन्वी आठलेकर
-
-
-
-

माणसे कुत्र्यांना पाळतात. ऊठ म्हणाल्यावर उठणारा, आगेमागे डोलणारा, हाडssss म्हणताक्षणीचं काहीचं न बोलता कडेला रुसून बसणार...
14/08/2023

माणसे कुत्र्यांना पाळतात. ऊठ म्हणाल्यावर उठणारा, आगेमागे डोलणारा, हाडssss म्हणताक्षणीचं काहीचं न बोलता कडेला रुसून बसणारा कुत्रा निरपेक्ष असतो. निरपेक्ष म्हणून ते त्याला पाळतात. माणसे निरपेक्ष माणसांनाही पाळतात. कधीच उलटून न बोलणारी, मर्जीत राहाणारी, आगेमागे डोलणारी, 'हो ला हो ' करणारी सगळीच माणसे पाळली जातात. माणसांना त्यांची गरज असेपर्यंत. माणसांकडून त्यांना काय गरजेचं आहे, हे न कळेपर्यंत.

एखाद्या दिवशी पाळलेली माणसे, पाळलेली जनावरे पिसाळतात. मन मानेलं ते जगायला लागतात, त्या दिवशी ती हाकलून लावली जातात..

एखाद्या आयुष्यात टिकून राहायचं असेल तर कुत्र्यासारख जगता आलं पाहीजे ! निरपेक्ष !
निरपेक्षचं !
-
-
✍️Swati Bhagat

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when एक बाकी एकाकी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share