23/05/2019
कधी नव्हे ते राजकारण या विषयावर काही लिहिले आहे
आवडले, पटले किंवा कसे ते नक्की सांगा
*भगवतगीता, लोकशाही, आयुर्वेद आणि मि*
मि एक सामान्य वैद्य, चार पिढ्यांची परंपरा नाशिबाने लाभली तरीही तिला टिकवण्याची जबाबदारी विसरून चालत नाही म्हणून कायम प्रयत्नशील राहण्याचा प्रयत्न सुरुच असतो.
माझा राजकारण या विषयांशी सुताराम संबंध नाही, समाजातील एक सामान्य मतदार म्हणून जो येतो तोच क़ाय तो माझा राजकारणा शी संबंध.
कुटुंबाची परंपरा पाहिली तर मि अर्धा कोंग्रेसी आणि अर्धा BJP वाला ठरतो.
कसे तर, माझ्या आईचे वडील नाशिक चे कै अण्णासाहेब वैशंपायन हे कट्टर गांधीवादी आणि संघाचे गोळवलकर गुरुजी म्हणजे माझ्या वडलांचे मामा.
यामुळे दोन्ही पक्षांशी तसा माझा लांबचा संबंध जोडायचा तर जोडता येईल, असो
२०१४ नंतर पुन्हा आज २३ मे २०१९ रोजी भाजपा ने पुन्हा इतिहास लिहिला. भविष्यात या नोन्दी कायम अभ्यासल्या जातील
गेल्या ५ वर्षात देशात जे काही सध्या सुरु आहे ते एक सामान्य मतदाता म्हणून आणि एक वैद्य म्हणून पाहताना भगवतगीतेतील समजला जाणारा परंतु कदाचित महाभारतात आलेला(?) एक श्लोक राहून राहून आठवतो तो श्लोक किंवा सूत्र म्हणजे
अहिंसा परमो धर्म:, धर्म हिंसा च |
(गीतेच्या, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत....
च्याच धर्ती वर या सूत्राकडे सामान्यपणे पाहिले जाते)
महात्मा गांधीच्या प्रयत्नांमुळे 'अहिंसा परमो धर्म:' हा पहिला अर्धा भाग सर्वांना माहित झाला असे म्हणायला हरकत नाही आणि भारताची ही ख़रच धरोहर आहे असेही म्हणायला हरकत नाही. परंतु या सम्पूर्ण सूत्राचा अर्थ जो पर्यन्त आपल्याला नीट समजत नाही तोपर्यंत आपल्याला भारत देशाची खरी धरोहर समजू शकणार नाही हेच खरे
हे जे सूत्र आहे त्याचा खरा अर्थ भाजपा ला चांगला माहित आहे हे आता सिद्ध झाले आहे. कसे ते थोडक्यात माझ्या शब्दात मांडायचा अल्पमती प्रयत्न करण्याचे आज धाडस करतो आहे. (भगवतगीतेवर अभ्यास केलेल्या तज्ञानी कुठे चूक झाली तर माफ करावे आणि मार्गदर्शन नक्की करावे ही विनंती)
अहिंसा म्हणजे परमधर्म हा सामान्य अर्थ जो लोकांना माहित आहे तो अर्धवट आणि अपुरा आहे, तो तसाच लोकांना शिकवला गेला आहे असेही म्हणता येईल.
नेमका अर्थ खालील प्रमाणे आहे
अहिंसा म्हणजे, मि हिंसा करणार नाही आणि दुसऱ्याला सुद्धा करू देणार नाही, त्यासाठी धर्महिंसा करावी लागली तर ति ही योग्यच
इथे धर्महिंसा म्हणजे समोरच्याला समूळ नष्ट करणे/मारणे असा अर्थ लोक घेतात, तो ही अर्धवटच ठरतो.
धर्महिंसा म्हणजे समोरच्याला अशा स्थिति मधे जीवंत ठेवणे ज्या स्थिति मधे व्यवस्थित जगतो परन्तु तो हिंसा करू शकतच नाही. याउपर असे करूनही जर भविष्यात समोरच्याने हिंसा करायचा प्रयत्न केलाच तर त्याचे समूळ उच्चाटन करावे ही सुद्धा धर्महिंसा म्हणजे योग्य च समजावी लागते
भारताचा इतिहास ही याचे शेकडो दाखले देतो,
- महाभारतात शस्त्र न उचलता देखील भगवान श्रीकृष्णाने अख्खे युद्ध त्यांना पाहिजे तसेच घडवले आणि धर्माचा विजय झाला
- महाराष्ट्रात महाराजांच्या अनेक गोष्टीतील एक शाहिस्तेखानाची गोष्ट (त्यानंतर खान पुन्हा कधी काही करण्यास धजावला नाही)
- पेशव्यांच्या काळातील बाजीराव पेशवे आणि निजामाची गोष्ट
- स्वातंत्र्या नंतर सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या एकसंध भारत बनवण्याच्या कार्या साठी अनेक संस्थाने खालसा करवून घेणे
अशा अनेक ऐतिहासिक घटना या भगवत गितेच्या याच सूत्राच्या/श्लोकाच्या साक्षी आहेत आहेत असे सहज म्हणता येईल. माझा (इतिहासाचा अभ्यास फारच तोकडा आहे हे ईथे आवर्जून नमूद करतो, आणि तरीही त्याबद्दल काही लिहिल्याबद्दल सर्व तज्ञ इतिहासकार व्यक्तिची माफी मागतो, दिलदार पणे ते माफ करतील याची शाश्वती वाटते.)
आता याच निमित्ताने माझ्या प्रिय अशा आयुर्वेद या विषयी ही थोड़े बोलणे आवश्यक आहेच
आयुर्वेदाचे मूळ प्रयोजन पाहिले तर,
स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण,
आतुरस्य विकार प्रशमनं
असे आहे. याचा अर्थ,
आयुर्वेदाची मूळ प्रयोजन 2
1. स्वस्थ व्यक्ति चे स्वास्थ्य टिकवणे
2. नंतर रोग झालाच तर त्याची चिकित्सा करणे
यामधे स्वास्थ्य टिकवण्याचे अनेक नियम, उपाय आयुर्वेद सांगतो. त्यानंतर रोग झाला तर त्याचे नेमके निदान कसे करावे, त्यातील सहज बरे होणारे रोग, कष्ट देऊन बरे होणारे रोग, औषध, आहारविहार नियम यांचे पालन करुन बरे न होणारे पण क़ाबूत राहणारे रोग आणि शेवटचे म्हणजे असाध्य रोग असे चार प्रकार ओळखून त्या सर्वांची चिकित्सा कशी करावी याबद्दल ही आयुर्वेद नंतर विस्तृत पणे निर्देश देतो.
म्हणजे व्याधीप्रतिकारक्षमता यावर आयुर्वेदाचा सम्पूर्ण जोर आहे. उदाहरण पहा
१) एखादे इंफेक्शन शरीरात आले असेल तर त्याचे आधुनिक शास्त्राप्रमाणे एंटीबायोटिक मुळे समूळ उच्चाटन करताना इतर शरीर पेशी सुद्धा होरपळल्या जातात म्हणून साइड इफेक्ट होतात, त्यापेक्षा (इंफेक्शन चा *प्रत्येक वेळी* बाऊ न करता) व्याधिप्रतिकार क्षमता एवढी चांगली करावी की इंफेक्शन आले जरी तरी शरीरास काहीही त्रास होणार नाही किंवा झाला तरी फार मोठे नुकसान होणार नाहीत
२) डास चावून जर ताप येत असेल तर डास होऊ नयेत म्हणून प्रयत्न करावेत हे जास्त महत्वाचे आणि डास चावलाच तर जास्त वाइट परिणाम होऊ नये म्हणून शरीरास बळकट बनवणे ही जास्त योग्यच
डास होण्याची कारणे कमी न करता फक्त आलेला ताप उतरावत बसणे ही अर्धवट चिकित्सा होते, कारण औषध देऊन ही पुन्हा डास चावण्याची आणि त्रास होण्याची शक्यता कायम राहतेच
हेच आयुर्वेदाचे सुद्धा सूत्र आहे, म्हणून जंतु संसर्ग, कृमि इत्यादि सांगून बाकी पूर्ण जोर हा व्याधिक्षमत्व यावर आहे म्हणूनच *स्वस्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम* आधि सांगितले आहे आणि नंतर रोगी चिकित्सा करावी असा उपदेश हेच आयुर्वेदाचे प्रयोजन आहे
२०१९ च्या जगातील सर्वात मोठ्या लोकतंत्राचे आणि आयुर्वेदाचे नाते जवळचे आहे कारण लोकशाही आणि समाजाचे स्वास्थ्य याच देशाच्या भविष्यातील विकासासाठी अत्यावश्यक गोष्टी आहेत हे खरे.
आता लोकशाही साठी समाज स्वतःला किती लायक बनवतो हे काम मात्र समाजाचेच आहे, सरकार काहीही काम तेव्हाच उत्तम/सर्वोत्कृष्ट रित्या करू शकते जेव्हा समाज सरकार ला साथ देतो, साथ देणे म्हणजे फक्त मत देणे नाही तर स्वतः समाज परिवर्तनाचे प्रयत्न करावे असा आहे. स्वतःपासून सुरुवात करत, स्वतः कायदे उल्लघन न करता आणि दूसरे करत असतील तर त्यांना ही करू न देता, उघड्या डोळ्याने जगणे यापुढे आवश्यक आहे. नाही तर श्री मोदी असोत किंवा अजुन कोणी. कितीही चांगले प्रयत्न झाले तरीही देशाचे भविष्यात काहीच चांगले होणार नाही आणि त्याला जबाबदार समाज असेल सरकार नाही.
हेच आयुर्वेदाच्या नियमांचे ही, स्वतः ही नियम पाळावेत आणि आपल्या घराच्याना आजुबाजूच्यांना ही त्याबद्दल अवगत करावे, माहित नसेल तर काहीही करण्यापुर्वी वैदयांचे सल्ले घ्यावेत आणि नेमकी भूमिका समजून घ्यावी
सुशिक्षित समाज सुसंस्कृत असतोच असे नाही आणि सुसंस्कृत समाज सुशिक्षित असतो असेही नाही, दोन्ही चा ताळमेळ घडावा लागतो हे लक्षात आले पाहिजे
सर्वात शेवटी समाजाच्या आज दिसलेल्या कौलाला शतशः नमन आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी अनेक शुभेच्छा
वैद्य सत्यव्रत नानल
- नानल आयुर्वेदिक क्लीनिक
- माधवी प्रकाशन
मुम्बई, अलीबाग
23 मे 2019, @7.10pm
The word Ayurved is made of "Ayu" and "Veda". Ayu means life cycle and Veda means pure knowledge. Hence Ayurved means pure knowledge of life cycle. Ayurved focusses on both elements of "Maintaining healthy life" & "treating various diseases"