ShilpaDilse

ShilpaDilse Shilpa Dilse is a personal blog expressing my thoughts.

URGENT SALE:Converted 1.5 bhk for sale in Sunder Nagar, Kalina, Santacruz East.CLOSE TO BKC.Kalina is centrally located ...
04/01/2025

URGENT SALE:

Converted 1.5 bhk for sale in Sunder Nagar, Kalina, Santacruz East.
CLOSE TO BKC.
Kalina is centrally located so very easy to commute to western, central, harbour railway station. Easy to travel to any part of south Mumbai, Thane, Vashi, Borivali, Wadala, Chembur etc.
Everything is within the vicinity. All goods are available just a phone call away.
Posh area of Kalina. NO SLUMS AROUND.
1.5 bathrooms
Flat is Fully renovated from A to Z like plumbing, bathrooms, flooring, electrical, bathroom commode, showers, sinks, fittings,etc.
Society is in talks with builders regarding redevelopment. After redevelopment you will get bigger size flat, corpus, rent, shifting charges, brokerage etc. from builder, so buyer will get pay back in the price.
Even if it doesn’t go for redevelopment, society is well maintained and flat is fully renovated.

Car parking.

So it will be win-win situation for buyer.
460 sq ft old carpet area. Very low loading in comparison with new construction.
Built-up 540 sq ft.

Being close to BKC, rental income : 50k for unfurnished flat.

Price 1.65 Nego for genuine buyers who wants to close the deal.

Please contact 7506614837 asap.

Welcome to Worli!A beautiful 2 BHK for sale in Worli, just 2 minutes walking distance from Palladium mall.  @ 3.75Cr.Jod...
14/10/2024

Welcome to Worli!
A beautiful 2 BHK for sale in Worli, just 2 minutes walking distance from Palladium mall. @ 3.75Cr.
Jodi flat is available @ 7.5 Cr.
Breathtaking view of Mahalaxmi Race Course & Sea.
Higher floor.
Close to Penninsula Business Park and renowned corporate offices in Worli, Parel, Lower Parel.
New Tower with modern amenities like a swimming pool, gym, toddler's room, landscaped terrace garden, indoor games, etc.
Modular, kitchen, AC, pop ceiling with lights, etc.

Please call 7506614837 for inspection.

Welcome to Worli!A beautiful 2 BHK for sale in Worli, just 2 minutes walking distance from Palladium mall.  @ 3.75Cr.Jod...
17/06/2024

Welcome to Worli!

A beautiful 2 BHK for sale in Worli, just 2 minutes walking distance from Palladium mall. @ 3.75Cr.
Jodi flat is available @ 7.5 Cr.
Breathtaking view of Mahalaxmi Race Course & Sea.
Higher floor.
Close to Penninsula Business Park and renowned corporate offices in Worli, Parel, Lower Parel.
New Tower with modern amenities like a swimming pool, gym, toddler's room, landscaped terrace garden, indoor games, etc.
Modular, kitchen, AC, pop ceiling with lights, etc.

Please call 7506614837 for inspection.

Galgibaga BeachIf you're seeking a hidden gem in South Goa away from the usual tourist spots, consider visiting Galgibag...
11/06/2024

Galgibaga Beach

If you're seeking a hidden gem in South Goa away from the usual tourist spots, consider visiting Galgibaga Beach. It's known for its pristine beauty, tranquil atmosphere, and often remains untouched by crowds. Galgibaga is also famous as a nesting site for Olive Ridley turtles, so if you're lucky, you might witness this natural wonder. It's an ideal spot for those who prefer solitude and a closer connection to nature.

Galgibaga Beach is indeed a beautiful and relatively lesser-known spot in South Goa. The beach is known for its serene ambiance, soft sand, and clear waters. Since it's not as commercialized as some of the other beaches in Goa, it offers visitors a more peaceful and secluded experience. It's a great place to relax, unwind, and enjoy the natural beauty of the surroundings. However, facilities like shacks and water sports may be limited compared to more popular beaches, so it's ideal for those seeking a quieter retreat.

How to get there:

1. By Air: The nearest airport is Dabolim Airport, which is located about 67 kilometers away from Galgibaga Beach. From the airport, you can hire a taxi or use a pre-booked cab service to reach the beach.

2. By Train: The nearest railway station is Canacona Railway Station, which is about 16 kilometers away from Galgibaga Beach. From the station, you can hire a taxi or use local transportation like buses or auto-rickshaws to reach the beach.

3. By Road: Galgibaga Beach is accessible by road and is well-connected to other parts of Goa. If you're coming from North Goa, you can take National Highway 66 (NH66) and then follow the signs to reach Galgibaga. If you're already in South Goa, you can use local buses, taxis, or rental vehicles to reach the beach.

Once you arrive in the vicinity of Galgibaga Beach, you may need to walk a short distance from the parking area to reach the shore, as vehicles are not allowed directly onto the beach in order to preserve its natural beauty.

Accommodation:
Galgibaga Beach is known for its serene and secluded ambiance, so you won't find many large hotels or resorts directly on the beach itself. However, there are a few accommodation options nearby that offer a comfortable stay while still allowing you to enjoy the tranquility of the area. These options include guesthouses, eco-resorts, and beach huts. Here are a few places to consider:

Cuba Premium Bungalows: Located just a short distance from Galgibaga Beach, Cuba Premium Bungalows offers cozy accommodations in a serene setting.

The Beach House Goa: Situated near Galgibaga Beach, The Beach House Goa is a wellness retreat offering comfortable rooms and holistic wellness programs.

Palolem Beach Resort: While not directly on Galgibaga Beach, Palolem Beach Resort is located nearby and offers beachfront accommodations with a range of amenities.

Coco Palms Beach Resort: Another option near Galgibaga Beach, Coco Palms Beach Resort offers comfortable rooms and cottages in a tranquil setting.

Disclaimer: Keep in mind that these options may vary in terms of amenities and price range, so it's a good idea to check reviews and availability before booking. Additionally, since Galgibaga Beach is less developed compared to other beaches in Goa, you may also find homestays or smaller guesthouses offering accommodations in the area.

Activities to do:

It may not have the bustling atmosphere or commercial activities of some other beaches in Goa, there are still several things to see and do at Galgibaga Beach:

1. Olive Ridley Turtles: One of the main attractions of Galgibaga Beach is its importance as a nesting site for Olive Ridley turtles. If you visit during the nesting season (usually from November to March), you might have the opportunity to witness these magnificent creatures coming ashore to lay their eggs. Conservation efforts are in place to protect the nesting sites, so make sure to adhere to any guidelines provided by local authorities.

2. Scenic Views: Galgibaga Beach is renowned for its natural beauty, with soft white sands, swaying palm trees, and clear turquoise waters. Take a leisurely stroll along the shoreline and soak in the breathtaking coastal scenery.

3. Birdwatching: The surrounding area of Galgibaga Beach is rich in biodiversity, making it a paradise for birdwatchers. Keep an eye out for various bird species, including kingfishers, herons, and eagles, especially during early morning or late afternoon when bird activity is at its peak.

4. Sunset Watching: Experience the magical sight of the sun setting over the Arabian Sea from Galgibaga Beach. The tranquil ambiance and uninterrupted horizon make it an ideal spot to witness stunning sunset views. Don't forget to bring your camera to capture the mesmerizing colors painting the sky.

5. Beach Picnics: Pack a picnic basket with some snacks and refreshments and enjoy a relaxing day by the beach. Whether you're lounging on the sand, swimming in the gentle waves, or simply basking in the sun, Galgibaga Beach offers the perfect setting for a laid-back beach day.

6. Local Cuisine: While there may not be many commercial establishments directly on the beach, you can explore nearby villages to sample some authentic Goan cuisine. Indulge in fresh seafood dishes, spicy curries, and refreshing coconut-based beverages at local eateries.

Happy travelling!

Shilpa Dilse
11.6.2024

It's a proud moment for India.  India salutes our beloved scientists. Jai Ho!
23/08/2023

It's a proud moment for India. India salutes our beloved scientists. Jai Ho!

ए वतन, तुजपें ए दिल कुर्बानतुझसें हम, हम हैवरना हम कुछ भीं नहीं।जवानोंसे हम, हम हैंवो है, तो सुकून से सोते हैंजब वे जगसे...
15/08/2023

ए वतन, तुजपें ए दिल कुर्बान
तुझसें हम, हम है
वरना हम कुछ भीं नहीं।

जवानोंसे हम, हम हैं
वो है, तो सुकून से सोते हैं
जब वे जगसे विदाई लेते हैं,
हम खून के आंसू रोते हैं

शौर्य, साहस से ये देश भरा
देशप्रेम दिल में कुटकूट भरा
हमें ही इसें सँवारना हैं
नई उच्चांइंको छुना हैं

फक्र हैं हमें, हम भारतीय हैं
ए वतन, तुजपें ए दिल कुर्बान
तुझसें हम, हम है
वरना हम कुछ भीं नहीं।

शिल्पा कदम
२६.०१.२०२२

05/08/2023

भाग १

पाश्चात्य देशातील स्त्रीपुरूष एकोणिसाव्या शतकात हिंदुस्तानात येत तेव्हा त्यांना न चुकता एक गोष्ट खटकायची ती म्हणजे रस्त्यांवरील स्त्रियांची अनुपस्थिती. तेव्हा त्यांना वाटायचे की या एवढया मोठ्या देशात स्त्रिया आहेत की नाहीत? जेव्हा त्यांना कळायचे की लोकसंख्येच्या निम्म्या प्रमाणात स्त्रिया आहेत तेव्हा त्यांना आश्चर्य वाटायचे. त्याकाळी कुलीन स्त्रिया घराचा उंबरठा ओलांडत नसत. कधी काळी अगदी कोणी ओलांडलाच तर ती वर्तमान पत्रात येण्याजोगी बातमी असे.

वैद्यकीय मदतीचा तुटवडा ही समस्या संपूर्ण देशालाच ग्रासली होती. निष्णात वैद्य व सुईणी लोकसंख्येच्या मानाने कमी होते. अर्धशिक्षित वैद्य, अज्ञानी सुईणी, जारणमारण करणारे साधू-वैरागी बोकाळले होते. त्याकाळी मुलींची लग्ने अल्पवयात करत असत. बालविवाहामुळे त्यांना अल्पवयात वारंवार एकामागून एक बाळंतपणाच्या दिव्यातून जावे लागे. अकाली प्रौढ होणाऱ्या, खंगणाऱ्या स्त्रिया दुर्धर स्त्रीरोग, बाळंतरोग यांना बळी पडत. त्यांच्या प्रकृतीकडे, आरोग्यविषयक समस्यांकडे बरेचदा दुर्लक्ष होई. त्या पुरुष वैद्याकडे जायला संकोचत. त्यांच्या प्रकृतीचे निदान होत नसे तर त्यावर उपाय ही दूरची गोष्ट. थोडक्यात स्त्रियांच्या हालअपेष्टांना सीमा नव्हती. बारातेरा वर्षाच्या कोवळ्या मुली प्रसववेदनांनी पिळवटून निघत होत्या. पण त्यांच्या आकांतांचे पडसाद समाजपुरूषाच्या मनात उमटत नव्हते. वारंवार होणाऱ्या बाळंतपणामुळे त्याच्या अपरीपक्व शरीराची चाळण होई. या बालमातांची मुलेही वैद्यकीय मदतीविना अगदी लहानसहान आजाराला मृत्युमुखी पडत होती. आरोग्यरक्षणाच्या साध्यासुध्या नियमांची साधी जाणीवही स्त्रियांना नव्हतीच पण त्यांची बाळंतपणात सुटका करायला येणाऱ्या सुईणीलाही नसे. सुईणींच्या निष्काळजीपणातून, अज्ञानातून, चुकीतून अनेकदा स्त्रियांचे व मुलांचे मृत्यू ओढावत.

उंबरठ्याआड तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणाऱ्या या स्त्रियांसाठी मिशनरी स्त्रियांनी वाचा फोडली. या मिशनरी स्त्रियांनी आपापल्या देशांना स्त्री डॉक्टर्स हिंदुस्तानातील महिलांसाठी पुरवावेत असे आवाहन केले. स्त्री डॉक्टर्सची कुमक येईस्तोवर याच मिशनरी स्त्रियांनी स्वतःला जमेल तशी मदत केली. हिंदुस्तानी स्त्रियांसाठी अनेकांनी वैद्यकीय पुस्तकं हातात धरली. त्यांच्या मातृभाषेत जमेल तशी त्यांना प्रथमोपचार, आरोग्यविषयक ढोबळ नियमांची माहिती पुरवली. बाळंतीण व रोगींची स्वच्छता कशी राखावी हे शिकवले. त्याकाळी हिंदुस्तानी स्त्रिया पुरुष डॉक्टरकडून तपासणी करून घेणे वर्ज्य मानत असल्याने या मिशनरी स्त्रिया रोग्याची माहिती डॉक्टर्सना सांगत व त्यांनी दिलेले औषध स्त्री रोग्यांपर्यंत पोहोचवत असत

पाश्चात्य मिशनरी स्त्रियांना हिंदुस्तानी माजघरातून, जनानखान्यातून या समस्येचं भीषण रूप दृष्टीस पडले.

यातूनच मेरी शॅरलिब या मिशनरी स्त्रीने स्वतः डॉक्टर व्हायची स्फूर्ती घेऊन १८७९ साली Medical Practitioner Certified झाली.

१८७० च्या सुरुवातीला भारतात आलेली सर्वप्रथम पाश्चात्य स्त्री डॉक्टर म्हणजे "डॉक्टर क्लॅरा स्वेन". क्लॅरा ह्या आपल्या भारताच्या सर्वप्रथम स्त्री डॉक्टर असलेल्या माननीय डॉक्टर आनंदीबाई जोशी ज्या कॉलेजात शिकल्या त्याच अमेरिकेतील वुमेन्स कॉलेज ऑफ पेन्सिलवेनियाची विद्यार्थीनी होत्या.

१८६७ पासून डॉ. कॅारबाईन हिने बरेली गावी एका धनाढय गृहस्थाच्या मदतीने एतद्देशीय मुलींना वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी वर्ग सुरू केले. डॉ. क्लॅरा बरेली गावी आली तेव्हा तिच्या लक्षात आले की भारतात स्त्रियांना वैद्यकीय मदत वा शिक्षण नसले तरी ते घेण्याची उत्सुकता आहे. मिशनरी असलेल्या क्लॅराने मिशनच्या अनाथालयातील मुलींना मेडीसिन, नर्सिंग, कंपाऊंडिंग हे विषय शिकवायला सुरुवात केली व डॉ. कॅारबाईन यांचे कार्य चालू ठेवले. त्यांनी स्वतःचा एक छोटासा दवाखाना सुरू केला. पहिल्या ६ आठवड्यात १८० स्त्रियांनी दवाखान्यात येण्याचे धाडस दाखविले. रामपूरच्या नाबाबाला मिशनरयांविषयी तिटकारा होता. पण स्त्री डॉक्टरची आवश्यकता त्याला पटलेली होती. त्याने डॉ. क्लॅराला ४० एकराची जमीन व भलाथोरला बंगला भेट दिला. त्यांनी त्याचे रूपांतर हॉस्पिटलमध्ये केले. आणि हेच भारताचे पहिले स्त्रियांचे हॉस्पिटल जे १ जानेवारी १८७४ ला सुरू झाले.

हे सर्व वाचल्यावर तुम्हाला तत्कालीन स्त्रियांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटते ते comments मध्ये नक्की लिहा.

शिल्पा दिल से
शिल्पा कदम
५/०८/२०२३

(Dr. Clara Swain🙏- Pioneer Woman Physician of India-Google images)

29/07/2023
13/07/2023

*क्षण*

क्षण क्षणभंगूर तरंगांचे
क्षण क्षण वेचू आयुष्याचे

क्षणिक क्षण क्षणां-क्षणांचे
क्षण व्यापते युगां- युगांचे

क्षण जन्मते डोही आनंदतरंग
क्षण मालवते जीवन ज्योत मलंग

क्षण पुरेसा एका उत्थानाचा
क्षण तेवढा एका पतनाचा

क्षण जसा फुलण्यास कळी
क्षण तसा फुटण्यास पालवी

क्षण तो एका पहिल्या आसवाचा
क्षण मातृत्वाचा, छातीस बिलगण्याचा

क्षण भरारी पिलाची पाहण्याचा
क्षण तो सार्थ कर्तृत्वाचा

क्षण क्षणिक आठवणींचा
क्षण प्रयत्ने जपण्याचा

क्षण आज बंद संदुकि जोपासण्याचा
क्षण क्षण क्षणांत जगण्याचा

शिल्पा कदम
१३/०७/२०२३

30/06/2023

आज माझ्याकडे अपेक्षित अनपेक्षित पाहुणे आले. अपेक्षित यासाठी कारण ते यावेत ही अपेक्षा होती. अनपेक्षित कारण ते येतील तेही इतक्या लवकर वाटले नव्हते. आज माझ्याकडे २ पोपट आले. माझी खूप दिवसांपासून मनापासूनची इच्छा होती की माझ्याकडे पोपट यावेत. आशा आहे की ते नेहेमी येतील. त्यांना माझ्या खिडकीत पाहून मला खूप खूप आनंद झाला. हा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. 😊

27/06/2023

आज सहज आकाशात पाहताना एक विमान पाहिले. मन एकदम स्मृतींतील भूतकाळाच्या हिंदोळ्यावर डोलू लागले. तेव्हा मी कदाचित जेमतेम २-३ वर्षांची असेन. माझी मावशी जिला आम्ही प्रेमाने माई म्हणतो ती आमच्याकडे अधूनमधून येत असे. ती माझे खूप लाड करी. मला तयार करणे, भरवणे, झोपवणे हा जणू तिचा छंदच होता.

ती मला तेव्हा जेवण भरवायची तेव्हाचा एक किस्सा सांगते. ती मला चिऊ काऊचा घास भरवत असे पण त्याबरोबर आकाशातील विमानही दाखवून घास भरवत असे. आणि काय सांगू? त्या त्या प्रत्येक घासाला विमानही दिसत असे. असे माझे जेवण सुखकर चिऊ -काऊ व विमान पाहत होत असे. त्यावेळी मला विमान पाहिल्याशिवाय घासही जात नसे. आज वाटते कदाचित तो विमानांचा त्यावेळचा route असावा.

पण आजच्या छोट्या मुलांना जे जेवतानाही मोबाईलवर कार्टून्स बघत असतात त्यांना कदाचित आपल्या काऊ -चिऊचा घास, भरवणाऱ्या त्या प्रेमळ हाताची प्रत्येक घासाला असलेली चव, तो प्रेमळ आवाज व त्याची जग दाखवण्याची ती तळमळ, चिमुकल्यांचे पोट भरावे ही इच्छा व त्याची मज्जा कळणारच नाही. जेव्हा मी चिमुरड्यांना मोबाईलमध्ये डोके खुपसून restaurant मध्ये त्यांची आया त्यांच्या तोंडात चमच्याने खुपसताना पाहते तेव्हा खूप वाईट वाटते. पालकांनी याचा खरंच विचार करण्याची गरज आहे. नाही का? असो.

पुढे थोडी मोठी झाल्यावर देखील विमानांचे मला खूप आकर्षण होते. मी साधारण ५-६ वर्षांची असेन तेव्हा मला आकाशातले विमान पाहून नेहेमीच बालसुलभ प्रश्न पडायचा आपण एवढे आकाराने मोठे मग आपण एवढयाशा टिचभर विमानात कसे मावणार? कारण विमान फक्त आकाशातच पाहिले होते. बोटाने मापले तरी फक्त चिमटीतच मावणारे दिसायचे. पण जेव्हा मी सहावीत असताना पहिल्यांदा विमानाने मुंबई ते लंडन मग लंडन ते न्यूयॉर्क प्रवास केला विमान प्रत्यक्ष जवळून पाहिले तेव्हा मला पडलेल्या या प्रश्नाचा तिढा सुटला. पण त्यावेळी केलेला तो प्रवास व त्यावेळी Air-India चे असलेले प्रवासाचा राजेशाही थाट, स्वरूप व सर ती आजच्या प्रवासाला नाही. याबद्दल मी पुढे केव्हातरी लिहिन.

तूर्तास इथेच थांबते. माझ्या माईला देव भरभरून सुख, आरोग्य, शांती व समाधान देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.



शिल्पा दिलसे
२७/०६/२०२३

What's the name of these beautiful flowers?
27/06/2023

What's the name of these beautiful flowers?

07/06/2023

आता काही दिवसात पावसाला सुरुवात होईल. चिखलाचे साम्राज्य माजेल. ठिकठिकाणी पाणी साचेल. लोकांच्या घरात गटारी, नाल्यांचे घाणेरडे पाणी घुसेल. ही तर सर्वश्रुत मुंबईकरांची सत्यस्थिती आहे. किती पावसाळे आले गेले. हे पावसाळे पाहत पाहत आपले केस पांढरे होत आले. चिमुरडी प्रौढ झाली पण स्थिती जशीच्या तशीच किंबहुना अजुन बिकट होत आहे.

याला शासन. प्रशासन, नियोजन समिती, सत्ताधारी जितके जबाबदार आहे तितकाच सामान्य माणूसही जबाबदार आहे.

हो, तुम्ही एकदम बरोबर वाचले आहे. मला आशा वाटत होती की कोविडमुळे माणूस, समाज बदलेल, त्याची जीवनशैली , वर्तणूक बदलेल, स्वच्छता अंगिकारली जाईल. ते एक स्वप्नच राहिले हो. हे असले स्वप्न पाहताना मला १००% खात्री होती की आपण भारतीय या बाबतीत बदलणार नाही. आणि हे खरेच ठरले.

आपल्याला चांगल्या स्वच्छ जागाच आवडत नाही मुळी. स्वच्छ जागा दिसली तरी तेथे कचरा फेकायला कोणाला काहीच वाटत नाही. त्यात शाळेतील विद्यार्थी, सामान्य नागरिक, उच्चभ्रू ,श्रीमंत,शिक्षित, अशिक्षित, गरीब अशी काहीच वर्गवारी नाही. सर्वजण सचोटीने या कार्यात आपापल्या परीने कधी ना कधी कुठे ना कुठे कार्यभाग साधून contribution देत असतात.

प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, चिप्स ची पाकिटे, प्लास्टिक-. फोम पलेट्स, कप, गादी, बांधकामाचे साहित्य इत्यादी सर्रास रस्त्यावर फेकली जातात. हे सर्व गटारे, नाले तुंबवतात. पाणी वाहते न राहिल्यामुळे गटारे, नाले तुंबतात. मग काय? थोडा जरी पाऊस पडला तरी सगळीकडे पाणी तुंबते. मुंबईची तुंबई होते. TV वर हेडलाईन्स येतात. मीडिया बोंबाबोंब करतो झाले. सर्व चिडीचूप. पुढच्या वर्षी परत तेच. जास्त प्रमाणात दिवस -रात्र पाऊस पडला आणि त्यात high-tide असली म्हणजे रस्त्यावरील नद्यांना महापूर येतो मग बैठ्या घरात धबधबे कोसळताना, प्रपंच पाण्यावर तरंगताना दिसतात. लोक जीव वा सर्वस्व गमावतात.

प्रश्न मनात येतो की आपण कधीच बदलणार नाही का? दरवर्षी हेच चित्र पाहायला मिळते. लोक मिडियासमोर रडताना तक्रार करताना दिसतात. शासनाला दोष देताना दिसतात. त्यांचं दोष तर आहेच .मला पीडितांबद्दल संवेदना व सहानुभूती आहे. पण आता यातून आपल्यालाच मार्ग काढायची गरज आहे.
कारण नुकसान हे आपले होत आहे. शासन व मिडिया कुणालाही जनतेची पडलेली नाही. इथून तिथून सगळे एकाच माळेचे मणी हे जनतेने समजले पाहिजे. आपल्यासाठी जी हितकारी गोष्ट केली पाहिजे ती आपणच केली पाहिजे.

तर आतापासून एक दृढनिश्चय करा:

१) मी प्लास्टिक कमी वापरेन. तेच परत वापरेन आणि recycle करेन. Reduce, re-use and recycle.

२) कचरा प्लास्टिक, सुका, व ओला वेगळा करेन.

३) कचरा कचराकुंडी व्यतिरिक्त कुठेही टाकणार नाही.

४) प्रवासात किंवा कुठेही कचराकुंडी नसेल तर तो कचरा स्वतःच्या हातात किंवा पर्समधल्या पिशवीत ठेवून डस्टबिन दिसल्यावर त्यात टाकेन अथवा घरी जाऊन माझ्या घरातील डस्टबिनमध्ये टाकेन.

५) सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करेन. ती मदत करणार नसेल तर निदान कचरा तरी रस्त्यावर टाकणार नाही.

६) माझ्या घराप्रमणेच घराभोवतलचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करेन.
घरातल्या छोट्या व मोठ्यांना याची सवय लावून घेईन.

६) या गोष्टींची जाणीव माझ्या सभोवतालच्या लोकांना रागाने नाही तर समजावून सांगेन की हे का आपल्यासाठी गरजेचे आहे.

मी स्वतः ही मूल्ये कित्येक वर्षे जपली आहेत आणि अंगी बाणली आहेत. प्रश्न आहे फक्त सवयी बदलण्याचा व नेटाने पुढे चालू ठेवण्याचा. प्रत्येकाने हा बदल स्वतः केला तर काय किमया घडेल? विचार करा. हाताला व मनाला सवय लावा. शक्य आहे. करून तर पहा.

मला हा लेख लिहिण्यामागे एक सुंदर बदलाची अपेक्षा आहे. सगळं overnight बदलणार नाही. पण एक प्रयत्न करायला काय हरकत आहे? आणि हा बदल जर आपल्या घरात पाणी येऊ देणार नसेल , प्रपंच पाण्यावर तरंगणार नसेल, वाताहात होणार नसेल तर काय हरकत आहे?

एक बदल दिलसे
शिल्पा कदम
५/६/२०२३

कृपया हा लेख शक्य असेल तर इतरांना पाठवा जेणेकरून माझे म्हणणे सर्वांपर्यंत पोहोचेल आणि बघुया काही बदल घडतो का ते? आतापर्यंत यासाठी आपण काही केले नाही तर आता स्वतःसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी व पुढच्या पिढीसाठी तरी करूया. खरंच जर हे वाचून अगदी एखादा जरी हा बदल स्वतःत करू शकला तरी मला आनंद होईल. ही साखळी होऊ द्या. एक बदल घडवण्याचा प्रयत्न आहे फक्त साथ द्या. माझ्या मताशी खूप लोक सहमत असतील अशी आशा आहे. व ते असला बदल मनापासून इच्छितात. ही एक जनजागृती मोहीम होऊ द्या.🙏🙏

24/04/2023

*कटू सत्य*

पैशाला पैसा घेचतो उमगते हातचा गमावून
दिडशहाणे ठरतो बेअक्कल होऊन

येते शहाणपण मूर्ख झाल्यावर
मोठेपण कळते सरणावर चढल्यावर

नेहेमीच असतात वरातीमागून घोडे
जीवन सरते कोडे उलगडते थोडे थोडे

काबू करता येत नाही बेफाम मनाला
करायचे नाही तेच करता येते त्याला

फुटते पालवी तरूला पडझड झाल्यावर
आशेचा किरण दिसतो उध्वस्त विखुरल्यावर

उत्साह येतो निराशेत गाडल्यावर
सत्य जिंकते असत्य हरल्यावर

यश आनंदते अपयशाच्या गर्तेत डुबल्यावर
माणुसकी दिसते संवेदना मेल्यावर

मुखवटे फाटतात प्रसंग आल्यावर
आसवे स्पंदतात हृदय निखळल्यावर

शिल्पा कदम
२४/०४/२०२३

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ShilpaDilse posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ShilpaDilse:

Videos

Share