06/02/2024
लोणावळा शहरातील तुंगार्ली धरणात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू
लोणावळा : सुट्टी असल्याने सोमवारी खंडाळा येथील हॉटेल मधील काही तरुण तुंगार्ली धरण परिसरात फिरायला गेले होते. सायंकाळच्या सुमारास ते तुंगार्ली धरणाच्या जलाशयात पोहण्यासाठी उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्यापैकी एक जण पाण्यात बुडाला. सोबतच्या इतर मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला तसेच मदतीसाठी आरडाओरडा केला. याबाबत लोणावळा शहर पोलीस व शिवदुर्ग रेस्क्यु पथकाला माहिती समजल्यानंतर लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप व पोलीस कर्मचारी व शिवदुर्गची टीम धरणावर पोहचली. मात्र अंधार पडू लागल्याने थोडी शोध मोहीम राबवत मोहीम थांबवण्यात आली होती. आज सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवत सदरचा तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
अभिषेक सिंह रावत (वय 22, रा. मूळ पीथौरागड, उत्तराखंड) असे या पाण्यात बुडून मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिवदुर्गचे सुनीलभाऊ गायकवाड, महेशभाऊ मसणे, आनंद गावडे, विनायक शिंदे, कुणाल कडू, आकाश मोरे, प्रिन्स बैठा, मयुर दळवी, शनी सुतार, प्रणय अंभोरे, समीर देशमुख, प्रणव दुर्गे, साहिल दळवी, सचिन तारे, निलेश लाड, अतुल लाड, महादेव भवर, प्रविण देशमुख, दुर्वेश साठे, गणेश रौंधळ, अनिल सुतार, योगेश दळवी, समीर जोशी, राहुल देशमुख, शुभम कुंभार यांच्या पथकाने ही शोध मोहीम राबवली.