B News Kolhapur

B News Kolhapur प्रतिबिंब जनमानाचं ! Channel B Is Leading News Channel In Kolhapur District
People Says That They Can Skip Their Meal But

एक व्यासपीठ ! जिथं तुमच्या समस्यांना , तुमच्या प्रश्नांना फुटेल वाचा ! तुमच्या आंदोलनांना, तुमचा लढयाला मिळेल पाठबळ ! बी न्यूज ......
प्रतिबिंब जनमनाच !

*बी न्यूज बातमीपत्र दि. २८-०७-२०२४* ✨✨✨✨✨✨✨✨✨✨🔵 *आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. २८-०७-२०२४*https://youtu.be/6uOw2r6tOgA🔵 ...
28/07/2024

*बी न्यूज बातमीपत्र दि. २८-०७-२०२४*
✨✨✨✨✨✨✨✨✨✨

🔵 *आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. २८-०७-२०२४*

https://youtu.be/6uOw2r6tOgA

🔵 *पावसाचा जोर ओसरल्यानं महापुराचा विळखा पडलेल्या कोल्हापुरला दिलासा, संथ गतीनं पाणी उतरून पंचगंगेची राजाराम बंधार्‍यावरील पाणी पातळी ४७ फुट १ इंचावर, ८५ बंधारे
पाण्याखाली*

https://youtu.be/b3rKgGgtl90

🔵 *पावसाचा जोर ओसरला असला तरी शहरात पूर परिस्थिती कायम, नागरी वस्तीत शिरलेलं पाणी थोडंफार मागे हटलं असलं तरी जनजीवन पूर्वपदावर नाही*

https://youtu.be/StrelV1Og_M

🔵 *रविवारची सुट्टी आणि पावसाचा जोर ओसरल्यानं, पुराचं पाणी पाहण्यासाठी लोकांची झुंबड, शिवाजी पूल, कळंबा तलाव, शिंगणापूर अशा ठिकाणी जत्रेचं वातावरण*

https://youtu.be/mhwkX6yWifg

🔵 *राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक महायुती एकत्रच लढवणार, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती*

https://youtu.be/orF9v7GmzEs

🔵 *पुणे-बेंगलोर महामार्गावर सांगली फाट्यावर उड्डाणपूल बांधताना भराव टाकून निर्माण झालेला बंधारा कोल्हापूरच्या महापुराला कारणीभूत, माजी नगरसेवक सत्यजित कदम यांचा आरोप*

https://youtu.be/0jaqXlY1qhU

🔵 *इचलकरंजीतील खंजिरे औद्योगिक वसाहत मार्गावर विचित्र अपघात, टेम्पोतून बाहेर आलेल्या बिमाचा डोयाला जबर मार लागल्यानं राजू ऐवळे यांचा मृत्यू, तर अन्य एकजण जखमी*

https://youtu.be/w46NirzfZaQ

🔵 *काळम्मावाडी वीज वाहिनी दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानं, काळम्मावाडीतून पाणी उपसा सुरु, कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा सुरळित होण्याची चिन्हं*

https://youtu.be/Ji3kkjCoa5E

🔵 *नृसिंहवाडीमधील टेंबे स्वामी महाराजांच्या मठात कृष्णेचं पाणी आल्यामुळं, श्री दत्त गुरूंच्या उत्सवमूर्तीचं शनिवारी मध्यरात्री झालं गावात आगमन, दिंगबर खातेदार पुजारी यांच्या घरी आली
श्रींची मूर्ती*

https://youtu.be/XpMCdJZz7M0

🔵 *महापुराच्या पाण्यातून आलेल्या ६० पेक्षा अधिक सापांना गेल्या दोन दिवसात सर्पमित्रांनी दिलं जीवनदान, नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज*

https://youtu.be/V2iMT6Tsc2E

🔵 *ज्यांच्या उंबर्‍याला पूराचं पाणी लागतं, त्यांनाच महापुराची तीव्रता कळते, दरवर्षी कोल्हापूरवर महापूराची टांगती तलवार असल्यानं नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया*

https://youtu.be/YnIKKbnTg6w

🔵 *इचलकरंजीतील पंचगंगेच्या पुरामुळं तीनशे कुटुंबातील ११५० नागरिक स्थलांतर*

https://youtu.be/qhe9mBixh64

🔵 *राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजाकडं जाणार्‍या हौशी नागरिकांची संख्या वाढली, गर्दी नियंत्रित करताना जलसंपदा विभागाचे अधिकारी हैराण*

https://youtu.be/fTAB_nazJ1M

🔵 *राज्याच्या तिजोरीत खडखडाट नव्हे तर भरभराट, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वी होणारच, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा विश्वास*

https://youtu.be/gAfUD9xYAzc

🔵 *विक्रमसिंह घाटगे यांचं विकासाचं स्वप्न साकार करूया, शाहू कारखाना कार्यस्थळावर स्वर्गीय घाटगे यांच्या ७६व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन*

https://youtu.be/GW6nca58_6Y

🔵 *अंमली पदार्थाविरोधातील लढाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मानस हेल्पलाईनची घोषणा, ड्रग्जशी संबंधित माहिती देण्यासाठी १९३३ टोल फ्री क्रमांक जारील*

https://youtu.be/rF9bNcaZUyc

🔵 *राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी*

https://youtu.be/gjYKcW82THQ

🔵 *सोन्या-चांदीच्या विक्री क्षेत्रात ५० वर्षापासून ग्राहक सेवा देणार्‍या ओसवाल ज्वेलर्सची गुजरीतील नवी प्रशस्त शोरूम ग्राहक सेवेत रूजू*

https://youtu.be/blqgumIcs2E

🔵 *पूर ओसरणार्‍या भागात महापालिका आरोग्य विभागाच्यावतीनं स्वच्छता आणि औषध फवारणीला प्रारंभ*

https://youtu.be/k0CJnYBnVa4

🔵 *१० वर्ष सेवेत असलेल्या के एम टी मधील अनुकंपा कर्मचार्‍यांना नोकरीत कायम करावं, २१ कर्मचार्‍यांची मागणी*

https://youtu.be/YOOXWCLR7cU

*अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच 'बी न्यूज' चे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.*
*नोटिफिकेशनसाठी 🔔 आयकॉनवर क्लिक करा.*

पावसाचा जोर ओसरल्यानं महापुराचा विळखा पडलेल्या कोल्हापुरला दिलासा, संथ गतीनं पाणी उतरून पंचगंगेची राजाराम बंधा...

28/07/2024
*बी न्यूज बातमीपत्र दि. २७-०७-२०२४* ✨✨✨✨✨✨✨✨✨✨🔵 *आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. २७-०७-२०२४*https://youtu.be/oQhzGwAG_1o🔵 ...
27/07/2024

*बी न्यूज बातमीपत्र दि. २७-०७-२०२४*
✨✨✨✨✨✨✨✨✨✨

🔵 *आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. २७-०७-२०२४*

https://youtu.be/oQhzGwAG_1o

🔵 *दिवसभरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी महापुराची तीव्रता वाढती, पंचगंगेची पाणी पातळी अतिगंभीर अशा ४७ फुट ७ इंचावर, ९५ बंधारे पाण्याखाली, आता राधानगरी धरणाचे दोन
दरवाजे खुले*

https://youtu.be/Hek_biRGXWI

🔵 *पंचगंगा नदीसह जयंती नाल्याच्या पाण्यानं शहराचा ३५ टक्के भाग व्यापला, संथ वाहणार्‍या पंचगंगेनं घेतलं विराट रूप*

https://youtu.be/79HI3817VXM

🔵 *शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी पाणी उपसा केंद्रात पुराचं पाणी आल्यानं कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा ठप्प, काळम्मावाडी वीज वाहिनी दुरुस्तीसाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न,
रविवारपासून पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता*

https://youtu.be/0g2ya1DQo0U

🔵 *आपत्कालीन उपाययोजनांसाठी इचलकरंजी महानगरपालिकेनं प्रस्ताव पाठवावेत, जिल्हा नियोजन समितीमधून मंजुरी देऊ, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही*

https://youtu.be/3u8NbYy3obQ

🔵 *खासदार धैर्यशील माने आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या वाहनचालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, पालकमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी सुध्दा अवाक*

https://youtu.be/YYIOA0up4xQ

🔵 *खासदार धनंजय महाडिक यांनी केली शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी, पूरग्रस्तांना आवश्यक सोयी-सुविधा आणि जनावरांसाठी चार्‍याची व्यवस्था करण्याची खासदार महाडिक यांची
महापालिका प्रशासनाला सूचना*

https://youtu.be/Gs6Kzr2CD30

🔵 *पुणे-बेंगलोर महामार्गावर रस्त्यालगत आलं महापुराचं पाणी, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्यानं महामार्गावरील वाहतूक धिम्या गतीनं, वाहनचालक त्रस्त*

https://youtu.be/ep8pmIXa3Ks

🔵 *कागल आणि गांधीनगरमधील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचार्‍यांचा आटापिटा, पुराच्या पाण्यानं वेढलेल्या जॅकवेलमध्ये रात्री-अपरात्री बोटीनं प्रवास करून जाणार्‍या कर्मचार्‍यांचं
कौतुक*

https://youtu.be/DVZmWiU5Evg

🔵 *हुंडाई गाडीवर मोटारसायकल आदळून २५ वर्षाच्या तरूणाचा जागीच मृत्यू, शाहूवाडी तालुयातील मलकापूर-अणुस्कुरा मार्गावरील परळे गावच्या हद्दीत झाली दुर्घटना*

https://youtu.be/mTexUc65HRA

🔵 *वाघबिळ घाटातील रस्ता धोकादायक, मुसळधार पावसामुळं कमकुवत पाया झालेला रस्ता कधीही खचण्याची भीती*

https://youtu.be/5JjtVYK9JNk

🔵 *शिरोळ तालुयातील पूरग्रस्त गावांना पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट, पूरग्रस्तांना शासनाकडून मदतीचा हात देण्याची पालकमंत्र्यांची
हमी*

https://youtu.be/ASw6rbgUCpM

🔵 *पूर परिस्थितीमुळं दूध संकलनावर परिणाम, गोकुळच्या दूध संकलनात तीन दिवसात १ लाख १० हजार लिटरची घट, दूध उत्पादकांचं नुकसान*

https://youtu.be/B9tF5Avl8O8

🔵 *केंद्रीय अर्थसंकल्पाविरोधात इचलकरंजीत इंडिया आघाडीची भरपावसात निदर्शनं*

https://youtu.be/-JSPNPp2Jbk

🔵 *सफाई कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावेत, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. वेंकटशन यांचे महापालिका प्रशासनाला आदेश*

https://youtu.be/G-U1YuvSSQw

🔵 *आर के नगर इथल्या स्वर-संध्या संगीत विद्यालयाच्यातीनं गुरुपौर्णिमेनिमित्त झाली संगीत संध्या मैफिल*

https://youtu.be/fyZVjMr6dgs

🔵 *स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतर्फे एआयसीटी मान्यताप्राप्त एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रम होणार सुरू*

https://youtu.be/zKKBIPiUfOg

🔵 *पावसामुळं फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या आवकेवर परिणाम, कोकणचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं आवक कमी असूनही भाजीपाल्याच्या दरात घसरण*

https://youtu.be/ZVwwuzJE534

🔵 *फास्ट न्यूज २७-०७-२४*

https://youtu.be/wkDKdzOFyo4

*अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच 'बी न्यूज' चे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.*
*नोटिफिकेशनसाठी 🔔 आयकॉनवर क्लिक करा.*

फास्ट न्यूज २७-०७-२४Channel B Facebook - https://www.facebook.com/Bnewskop09/Facebook Account - https://www.facebook.com/B-news-234453256613339/youtube - htt...

27/07/2024

आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. २७-०७-२०२४

*बी न्यूज बातमीपत्र दि. २३-०७-२०२४* ✨✨✨✨✨✨✨✨✨✨🔵 *आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. २३-०७-२०२४*https://youtu.be/LlGTxy2Vkas🔵 ...
23/07/2024

*बी न्यूज बातमीपत्र दि. २३-०७-२०२४*
✨✨✨✨✨✨✨✨✨✨

🔵 *आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. २३-०७-२०२४*

https://youtu.be/LlGTxy2Vkas

🔵 *इशारा पातळी ओलांडून पंचगंगेची वाटचाल धोका पातळीकडं, राजाराम बंधार्‍यावर पंचगंगा साडेएक्केचाळीस फुटावर, राधानगरीतून १५०० क्युसेकनं विसर्ग, जिल्हयातील ७९ बंधारे पाण्याखाली*

https://youtu.be/Gxy_F6KMvas

🔵 *पूरबाधीत क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी कोल्हापूर शहरातील निवारा केंद्रं सज्ज, सुतारवाड्यातील ४० तर तावडे हॉटेल वीट भट्टी परिसरातील ५८ जणांचं झालं स्थलांतर*

https://youtu.be/JYiPHuqksH4

🔵 *राधानगरी धरण ९० टक्के भरलं, पावसाचा जोर कायम राहिला तर पुढील ३६ तासात धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शयता, काळम्मावाडी धरणात ६६ टक्के पाणी साठा, अद्याप पाणी
विसर्ग नाही*

https://youtu.be/E9x8kM9U8a8

🔵 *एनडीए सरकारच्या तिसर्‍या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर, पायाभूत सुविधांसाठी ११ लाख कोटी, तर शेतीसाठी दीड लाख कोटी रूपयांची तरतूद, ३ लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त*

https://youtu.be/cNmdboXJpac

🔵 *स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी चळवळीचा घात केला, तिसर्‍या आघाडीचा प्रयोग यशस्वी होणार नाही, रघुनाथदादा पाटील यांची प्रतिक्रिया*

https://youtu.be/Xa0HWYu2pZw

🔵 *इचलकरंजीतील नदीवेस नाका इथं घरफोडी करणार्‍या २ चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं केली अटक, २२ तोळ्यांचे दागिने आणि साहित्य असं १३ लाख ९३ हजाराचा मुद्देमाल जप्त*

https://youtu.be/CbB86MzNAw8

🔵 *आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी मिळणार १० लाख रूपये, तर अपंगत्वासाठी ५ लाख रूपये, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय*

https://youtu.be/9F4-4DGftdU

🔵 *इचलकरंजीत पंचगंगेची पाणी पातळी ६५ फुटावर, इचलकरंजीतून कर्नाटक आणि हुपरीकडे जाणारा मार्ग बंद*

https://youtu.be/N60VmXhqINg

🔵 *करवीर तालुक्यातील आरे, चिखली, आंबेवाडी या गावांना महापूराचा बसतो सर्वाधिक फटका, पूरपरिस्थिती गंभीर होण्यापूर्वीच नागरिकांनी जनावरांसह स्थलांतरण करण्यासाठी प्रशासन सज्ज*

https://youtu.be/17jWyF8gSsM

🔵 *कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि कोल्हापूर प्रेस क्लब यांच्यावतीनं झालं केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल चर्चासत्र, देशातील पायाभूत सुविधांना गती मिळण्याची अपेक्षा*

https://youtu.be/c8f7h6QCx7k

🔵 *शेतकर्‍यांसाठी डिजीटल प्लॅटफॉर्मपेक्षा इतर पायाभूत सुविधांची गरज, माजी खासदार राजू शेट्टी यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया*

https://youtu.be/GEcix7Ga--s

🔵 *खोतवाडी इथले माहिती अधिकार कार्यकर्ते सतिश दिगंबर पाखले यांचं अजब आंदोलन, सहाय्यक गटविकास अधिकार्‍यांच्या खोलीत घेतलं स्वतःला कोंडून*

https://youtu.be/3O8Cmna5BAY

🔵 *रक्कम तिप्पट करून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी, कागल तालुक्यातील बेलवळे खुर्द इथल्या अशोक पाटीलला अटक, न्यायालयानं सुनावली २ दिवसांची पोलिस कोठडी*

https://youtu.be/XeOsFmoo4vA

🔵 *इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या स्वयम् शाळेला महाडिक कुटुंबियांकडून आर्थिक मदत, १० विद्यार्थी घेतले दत्तक*

https://youtu.be/w5bjsf3sdcI

🔵 *ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या हस्ते हॉटेल अवनीचं उद्घाटन, कष्टकरी महिलांना रोजगाराचा आणखी एक मार्ग खुला*

https://youtu.be/CDAZZs4VD3I

🔵 *इचलकरंजी महापालिकेनं तयार केला पाण्याचा काटकसरीनं वापर करण्यासाठी कृती आराखडा*

https://youtu.be/OyDHRx0pY70

🔵 *शिवाजी विद्यापीठच्या वतीनं झाली, नागरी सहकारी बँकेतील चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांची एक दिवसीय व्यावसायिक प्रशिक्षण कार्यशाळा*

https://youtu.be/INvMllAr44o

🔵 *आगामी विधानसभा निवडणुकीसाठी २० ऑगस्टला मतदार यादी अंतिम होणार, इचलकरंजीतील प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांची माहिती*

https://youtu.be/-lSpn6uk90U

🔵 *रुद्रांश अ‍ॅकॅडमीच्यावतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या नागरिकांचा पुरस्कार देऊन झाला सन्मान*

https://youtu.be/uCKuLY_05ig

*अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच 'बी न्यूज' चे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.*
*नोटिफिकेशनसाठी 🔔 आयकॉनवर क्लिक करा.*

इशारा पातळी ओलांडून पंचगंगेची वाटचाल धोका पातळीकडं, राजाराम बंधार्‍यावर पंचगंगा साडेएक्केचाळीस फुटावर, राधानग....

23/07/2024

आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. २३-०७-२०२४

*बी न्यूज बातमीपत्र दि. २२-०७-२०२४* ✨✨✨✨✨✨✨✨✨✨🔵 *आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. २२-०७-२०२४*https://youtu.be/ViuLGDpMtuY🔵 ...
22/07/2024

*बी न्यूज बातमीपत्र दि. २२-०७-२०२४*
✨✨✨✨✨✨✨✨✨✨

🔵 *आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. २२-०७-२०२४*

https://youtu.be/ViuLGDpMtuY

🔵 *साडेएकोणचाळीस फुटावर गेलेल्या पंचगंगेनं कोल्हापुरात इशारा पातळी ओलांडली, जिल्हयातील ७८ बंधारे पाण्याखाली, अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेक पाणी विसर्ग होत असल्यानं
महापूर टळण्याची अपेक्षा*

https://youtu.be/xt7XdDUl25I

🔵 *कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणारा रंकाळा तलाव भरला, सांडव्यातून विसर्ग सुरु*

https://youtu.be/L6ObQPADNak

🔵 *खाद्यपदार्थात अळ्या सापडल्यानं मनसेचे पदाधिकारी झाले आक्रमक, डी मार्टच्या प्रशासनाला धरलं धारेवर, व्यवसाय बंद करण्याबाबत अन्न औषध प्रशासनानं बजावली नोटीस*

https://youtu.be/XkzLWrd8wV8

🔵 *सीपीआरमधील सात नव्या मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचं झालं लोकार्पण, अत्याधुनिक साधनांमुळं रूग्णसेवेचा दर्जा आणि गती वाढणार*

https://youtu.be/FgmNyOEeSR4

🔵 *महसूल प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईचा विद्यार्थ्यांना फटका, जातीच्या दाखल्यासह इतर दाखले वेळेत मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता*

https://youtu.be/1YFV0oteCx4

🔵 *कोसळणारा धो-धो पाऊस, खड्डेमय रस्ते, रस्त्यावरची डबकी-चिखल आणि वाहतुकीची कोंडी यामुळं वाहनचालकांचा जीव गुदमरला, शहरातील अनेक रस्त्यांवर ट्रॅफिक जाम*

https://youtu.be/ZFBgaHfoshQ

🔵 *पदोन्नतीच्या समुपदेशनासाठी आलेला ग्रामविकास अधिकारी अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात, जिल्हा परिषदेत झाली कारवाई*

https://youtu.be/VnibQhFhCLU

🔵 *संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या प्रशासनाला सूचना*

https://youtu.be/fohZQOufvy0

🔵 *प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला ग्राहकातून चांगला प्रतिसाद, कोल्हापूर-सांगली जिल्हयातून ८ हजार अर्ज दाखल*

https://youtu.be/wCwmYXmyd64

🔵 *इचलकरंजीत पावसाची काहीशी विश्रांती, मात्र २४ तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दीड फुटांनी वाढ होऊन पाणी पातळी गेली ६३ फुटांवर*

https://youtu.be/zcba1nHWzag

🔵 *मुसळधार पावसामुळं भात पिक पाण्याखाली, गगनबावडा तालुक्यातील शेतकर्‍यांचं नुकसान*

https://youtu.be/dVEBuiZVlDA

🔵 *दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांचे सुपूत्र राजेश पाटील यांची केडीसीसी बँकेच्या संचालकपदी निवड*

https://youtu.be/W2I7iD8thOQ

🔵 *कोल्हापुरातील साळोखेनगर इथल्या बंगल्याला चोरटयांनी केलं लक्ष, सव्वासात लाखांची रोकड आणि दागिनेे नेले चोरून*

https://youtu.be/g2Suc-cW0DM

🔵 *घरेलू महिला कामगारांना शासनाकडून दरमहा ३ ते ५ हजार रूपये उदरनिर्वाह भत्ता मिळावा, आर्य श्रमिक संघटनेची मागणी*

https://youtu.be/zbCenVkkqMI

🔵 *इचलकरंजीतील ए.एस.सी.महाविद्यालयासमोर निकम यामाहा या नव्या शोरुमचा दिमाखात शुभारंभ*

https://youtu.be/n16ProcKiaA

🔵 *ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची कोल्हापूर कॅन्सर सेंटरला भेट, नन्हे फरिश्ते उपक्रमाला प्रतिसाद*

https://youtu.be/jV90aK1u1rM

🔵 *श्रेया इंडस्ट्रीजच्या उद्यमनगरातील नवीन शाखेचं उद्घाटन, वेल्डिंग मशीन्स, पॉवर टूल्स, केबल यासह वेल्डिंगसाठी लागणारं साहित्य उपलब्ध*

https://youtu.be/D-_xLZWpAjA

🔵 *थायलंड इथल्या युनायटेड वर्ल्ड रेसलिंग स्पर्धेत कोल्हापूरच्या रोहिणी देवबाचा सुवर्ण वेध, कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेचं नाव केलं उज्ज्वलर*

https://youtu.be/gkOU8-x1cPY

🔵 *२२ ते २८ जुलै या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्यावतीनं जनविश्वास सप्ताहाचं आयोजन*

https://youtu.be/9eWyB_KjJyQ

*अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच 'बी न्यूज' चे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.*
*नोटिफिकेशनसाठी 🔔 आयकॉनवर क्लिक करा.*

साडेएकोणचाळीस फुटावर गेलेल्या पंचगंगेनं कोल्हापुरात इशारा पातळी ओलांडली, जिल्हयातील ७८ बंधारे पाण्याखाली, अलम....

22/07/2024

आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. २२-०७-२०२४

*बी न्यूज बातमीपत्र दि. २१-०७-२०२४* ✨✨✨✨✨✨✨✨✨✨🔵 *आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. २१-०७-२०२४*https://youtu.be/Exb8bmupNZ8🔵 ...
21/07/2024

*बी न्यूज बातमीपत्र दि. २१-०७-२०२४*
✨✨✨✨✨✨✨✨✨✨

🔵 *आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. २१-०७-२०२४*

https://youtu.be/Exb8bmupNZ8

🔵 *मुसळधार पावसानं झोडपलं, पंचगंगेची पाणी पातळी गेली साडेसदतीस फुटांवर, जिल्हयातील ८५ बंधारे पाण्याखाली तर ३५ रस्ते वाहतुकीसाठी बंद*

https://youtu.be/TpLGse8Rb_Q

🔵 *गुरूंबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करत विविध कार्यक्रमांनी साजरी झाली गुरूपौर्णिमा, ठिकठिकाणच्या दत्त मंदिरात आणि स्वामी समर्थ मंदिरात भाविकांची उदंड गर्दी*

https://youtu.be/cuJLnlWNxw4

🔵 *श्री दत्तात्रेयांची राजधानी असलेल्या नृसिंहवाडीत गुरूपौर्णिमेनिमित्त भाविकांचा ओघ, दक्षिणद्वार झाल्यानं नारायण स्वामी मठातील श्रींच्या उत्सवमूर्तीच्या दर्शनासाठी गर्दी*

https://youtu.be/1OX1Q3BDgow

🔵 *गगनबावडयातील गगनगिरी मठावर गुरुपौर्णिमेनिमित्तानं भक्तीचा महापूर, राज्याच्या कानाकोपर्‍यातून भाविकांची उपस्थिती*

https://youtu.be/gtNsGk3FJcI

🔵 *माजगाव जवळ दूधगंगेचा डावा कालवा खचला, अस्तरीकरण होऊन २ महिने होण्यापूर्वीच बांधकाम कोसळलं, कामाचा निकृष्ट दर्जा उघड*

https://youtu.be/7pEXASz233E

🔵 *पुण्यातील भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनातून आगामी विधानसभा निवडणुकीचं फुंकलं रणशिंग, भाजपच्या दिग्गज नेतेमंडळींसह सुमारे ५ हजार पदाधिकार्‍यांची उपस्थिती*

https://youtu.be/EAj666bLXME

🔵 *इचलकरंजीतील बंद घराचं कुलूप तोडून १० तोळे सोन्याचे दागिने आणि सव्वादोन किलो चांदी लंपास, चोरटयांकडून १० लाखांच्या ऐवजावर डल्ला*

https://youtu.be/dye3OIMCXgM

🔵 *पंचगंगेच्या पुरात पोहण्यासाठी गेलेला इचलकरंजीतील ३५ वर्षाचा तरुण बेपत्ता, नसतं धाडस जीवावर बेतण्याची शक्यता*

https://youtu.be/oTLHcXkSOq4

🔵 *शाहूवाडी तालुक्यातील बांधारी परिसरात रानडुकरांचा हैदोस, पिकांच्या नुकसानीमुळं शेतकरी हैराण*

https://youtu.be/-1bgg8LpZw8

🔵 *सोनार एकता फौंडेशनच्यावतीनं दुधाळी इथल्या दैवज्ञ हॉलमध्ये झाला सुवर्णकारांचा मेळावा, आर्टीसन कार्ड नोंदणीसाठी गर्दी*

https://youtu.be/UhkechIqZTk

🔵 *वादळी वारा आणि तुफान पावसामुळं शास्त्रीनगरातील भलं मोठं झाड उन्मळून पडलं, तर शिवाजी पेठेतही झाड कोसळून रिक्षाचं ५० हजारांचं नुकसान, पावसाळयात झाडाखाली थांबणं
धोक्याचं*

https://youtu.be/4PePdOxbU1g

🔵 *पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्र म्हणून कोल्हापूर महापालिकेनं निश्चित केलेल्या चित्रदुर्ग मठाची प्रचंड दुरावस्था*

https://youtu.be/tkpNXi38TPw

🔵 *जातीच्या दाखल्यासाठी अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमातीकडून समाज जोडो अभियानाचा आंदोलनाचा इशारा*

https://youtu.be/SAtWQ-rvTNk

🔵 *मुसळधार पावसामुळं एसटीच्या कोल्हापूर आगारातील २५२ फेर्‍या रद्द, अडीच लाख रूपये उत्पन्न बुडालं*

https://youtu.be/_oXgr6xJLIo

🔵 *२६ जुलैला कोल्हापुरात येणार वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा*

https://youtu.be/HiMBjSX_dvc

🔵 *गो ग्रोमोअर शेअर मार्केट क्लासेसचा कोल्हापुरात झाला मेळावा, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना अभ्यास आणि व्यावसायिक दृष्टीकोन आवश्यक*

https://youtu.be/YDkdTN9Q7L0

🔵 *स्वान रिसर्च फौंडेशन, सेंडॉर इंटरनॅशनलच्यावतीनं नासा ट्रेनिंग प्रोग्राम निवडीसाठी ऑक्टोबरमध्ये परीक्षा, स्पेस एज्युकेशन संदर्भात शालेय स्तरावरील भारतातील पहिलाच प्रयोग*

https://youtu.be/gWBJMJjftUk

🔵 *बीएससी टेक्सटाईल मॉलचा श्रावणोत्सव धमाका सुरु, ग्राहकांना मिळणार डबल डिस्काऊंट ऑफर*

https://youtu.be/QvNHU03Dz-8

🔵 *विशाळगडावर शिवसृष्टी स्थापन करावी, इचलकरंजीतील शिवप्रेमींची मागणी*

https://youtu.be/SipPNEpkNV0

*अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच 'बी न्यूज' चे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.*
*नोटिफिकेशनसाठी 🔔 आयकॉनवर क्लिक करा.*

गुरूंबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करत विविध कार्यक्रमांनी साजरी झाली गुरूपौर्णिमा, ठिकठिकाणच्या दत्त मंदिरात ...

21/07/2024

आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. २१-०७-२०२४

*बी न्यूज बातमीपत्र दि. २०-०७-२०२४* ✨✨✨✨✨✨✨✨✨✨🔵 *आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. २०-०७-२०२४*https://youtu.be/uBziUzIjrfU🔵 ...
20/07/2024

*बी न्यूज बातमीपत्र दि. २०-०७-२०२४*
✨✨✨✨✨✨✨✨✨✨

🔵 *आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. २०-०७-२०२४*

https://youtu.be/uBziUzIjrfU

🔵 *कोल्हापूर जिल्हयात मुसळधार, साडेछत्तीस फुटावर गेलेल्या पंचगंगेची इशारा पातळीकडं वाटचाल, जिल्हयातील ७९ बंधारे पाण्याखाली, नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात झाला दुसरा दक्षिणद्वार सोहळा*

https://youtu.be/zYAvvU2eKTo

🔵 *संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा*

https://youtu.be/Qz22UcqdIxc

🔵 *संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं सुतारवाडामधील नागरिकांना निवारा केंद्रात स्थलांतरित होण्याचं आवाहन*

https://youtu.be/g4015TL81Gw

🔵 *राजारामपुरी परिसरात माकडाचा धुमाकूळ, माकडाच्या हल्ल्यात शालेय विद्यार्थी जखमी, अग्निशमन दल आणि वन विभागानं आक्रमक माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी*

https://youtu.be/OqhCCLyNi_Y

🔵 *गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून २८५ कोटी रूपयांची झाली मदत, ३६ हजार रूग्णांचे वाचले प्राण, मंगेश चिवटे यांची माहिती*

https://youtu.be/XwPsG-JfjYE

🔵 *कळंबा तलावाचा सांडवा व्यापला कचर्‍यानं, तलाव भरल्यानंतर कित्येक टन कचरा जयंती नाल्यात आणि पंचगंगा नदीत येण्याची भीती*

https://youtu.be/5ts5TjYEOx8

🔵 *ट्रक आणि दुचाकीचा कोडोली गावाजवळ अपघात, काखे मधील ३० वर्षाच्या तरूणाचा अंत, रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची गरज*

https://youtu.be/MOdUVFx9YUM

🔵 *रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन आणि भागीरथी संस्थेच्यावतीनं वळिवडेतील शाळेत झाला कार्यक्रम, कळी उमलताना अभियानातून विद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती*

https://youtu.be/ANu0bapAdl8

🔵 *बिद्रीतील खिळ्यामोळ्याच्या कमिशनवर के. पी पाटलांनी घरदार पोसलं, आमदार प्रकाश आबिटकर यांचा के. पी. पाटील यांच्यावर पलटवार*

https://youtu.be/CtOC5eupr7c

🔵 *शिवाजी विद्यापीठाचं बनावट प्रमाणपत्र दाखवून नोकरीसाठी प्रयत्न, राजारापुरी पोलिसात आठवड्यात तीन गुन्हे दाखल, बनावट प्रमाणपत्र बनवणारं रॅकेट सक्रीय असल्याची शक्यता*

https://youtu.be/6nNYAIz_AEw

🔵 *संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने यांनी घेतला इचलकरंजीतील आपत्कालीन यंत्रणेचा आढावा*

https://youtu.be/jdU2mL5w_og

🔵 *कोल्हापूरच्या बाजारपेठेत फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक वाढली, फळभाजीचे दर ५ ते १० टक्के घसरले, तर पालेभाज्यांच्या दरातही घट, मात्र टोमॅटोच्या दराची तेजी कायम*

https://youtu.be/f6AghyS8R2w

🔵 *कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी ग्राम सुरक्षा यंत्रणा उपयुक्त, इचलकरंजी पोलिसांच्यावतीनं ग्रामसुरक्षा यंत्रणेबाबत जनजागृती*

https://youtu.be/sMhtUa3eYXI

🔵 *बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेवून बांधकाम कामगारांनी आपलं जीवनमान उंचवावं, नामदार हसन मुश्रीफ यांचं आवाहन*

https://youtu.be/ExGhRi-IMKw

🔵 *दहावी-बारावी फेर परीक्षेच्या धर्तीवर आता टंकलेखन परीक्षेत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांची दर तीन महिन्यांनी होणार फेरपरीक्षा, टायपिंग केंद्रावरच परीक्षा घेण्याचंही नियोजन*

https://youtu.be/9Z40xlilQaE

🔵 *हील रायडर्स अ‍ॅडव्हेंचर्स फौंडेशनच्या वतीनं सलग ३९ व्या वर्षी पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंतीचं आयोजन, यंदा ८०० शिवभक्तांचा सहभाग*

https://youtu.be/q8d_SNt27ac

🔵 *विशाळगडावरील दंगल म्हणजे राज्य सरकार, जिल्हा आणि पोलिस प्रशासन यांचा पूर्वनियोजित कट, शिवसेना ठाकरे गटाचा आरोप*

https://youtu.be/hAa8619jbmA

🔵 *इचलकरंजीतील रेणुकानगर झोपडपट्टीत आहे त्याच ठिकाणी घरकुल बांधण्यास न्यायालयाची मंजुरी*

https://youtu.be/9k5o0k6-i2E

*अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच 'बी न्यूज' चे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.*
*नोटिफिकेशनसाठी 🔔 आयकॉनवर क्लिक करा.*

इचलकरंजीतील रेणुकानगर झोपडपट्टीत आहे त्याच ठिकाणी घरकुल बांधण्यास न्यायालयाची मंजुरीChannel B Facebook - https://www.facebook.com/Bnewskop09/Facebook ...

20/07/2024

आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. २०-०७-२०२४

*बी न्यूज बातमीपत्र दि. १९-०७-२०२४* ✨✨✨✨✨✨✨✨✨✨🔵 *आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. १९-०७-२०२४*https://youtu.be/BHtBZA8gDOQ🔵 ...
19/07/2024

*बी न्यूज बातमीपत्र दि. १९-०७-२०२४*
✨✨✨✨✨✨✨✨✨✨

🔵 *आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. १९-०७-२०२४*

https://youtu.be/BHtBZA8gDOQ

🔵 *विशाळगड अतिक्रमणमुक्त मोहिमेला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती, शासन आणि प्रशासनाला न्यायालयानं सुनावले खडेबोल*

https://youtu.be/WkCYvaWcRBs

🔵 *सरकारी शाळांच्या एक किलोमीटर परिसरातील खासगी विनाअनुदानित शाळांमध्येही आरटीई कोटयातून २५ टक्के प्रवेश देणं बंधनकारक, राज्य शासनाचा पूर्वीचा निर्णय उच्च न्यायालयाकडून
रद्द*

https://youtu.be/AkV3-ozN1MU

🔵 *जिल्हयात पावसाचा जोर वाढला, पंचगंगा पुन्हा पात्राबाहेर, जिल्हयातील ७२ बंधारे पाण्याखाली, विविध ठिकाणी पडझडीमुळं १३ लाख ८५ हजार रूपयांचं नुकसान*

https://youtu.be/Wc36Cvc4IUoo

🔵 *गजापुरातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्याला प्राधान्य, सामाजिक सलोखा बिघडवणार्‍या घटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती*

https://youtu.be/4yYwI4UKuw0

🔵 *इचलकरंजीत कापड गोदामाला शॉर्टसर्कीटनं आग लागून २ कोटीचं नुकसान*

https://youtu.be/xI-mpXwiKsA

🔵 *सुट्टीवर आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानाचे हात-पाय आणि डोळे बांधून विष पाजण्याचा प्रयत्न, गडहिंग्लजमधील घटनेप्रकरणी जवानाच्या पत्नीसह एकावर गुन्हा दाखल*

https://youtu.be/AQBI0YtyPi0

🔵 *आठवडयाच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्सची आपटी, शेअर बाजार कोसळल्यानं गुंतवणूकदारांचं तब्बल ८ लाख कोटी रूपयांचं नुकसान*

https://youtu.be/H3bb8umstbQ

🔵 *गजापूर इथल्या जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे राज्य शासनानं मागे घ्यावेत, खासदार धनंजय महाडिक यांची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं निवेदनाद्वारे मागणी*

https://youtu.be/dA0UXJq4wUE

🔵 *देशाला बलशाली बनवण्यासाठी महिलांनी व्यवसायाभिमुख होणं गरजेचं, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, लक्षतिर्थ वसाहतीमध्ये महिलांसाठी प्रशिक्षण शिबीर
संपन्न*

https://youtu.be/p4DQzBURLmM

🔵 *कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्था सुरळित होण्यासाठी प्रयत्नशील राहू, जल अभियंता हर्षजित घाटगे यांची ग्वाही*

https://youtu.be/bXTOMCmTn7I

🔵 *हेरले मधील शेतकरी सुरेश मगदुम यांचं हातकणंगले तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू, टप्प्याटप्प्यानं आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा*

https://youtu.be/mu2xxjK1-TY

🔵 *विशाळगड, गजापूर इथं झालेल्या घटनेतील हल्लेखोर आणि त्यांच्या सुत्रधारावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, एमआयएम कार्यकर्त्यांची मागणी*

https://youtu.be/yH37clfCHxY

🔵 *कोल्हापुरातील अयोध्या टॉकीजसमोर जुनी पुस्तकं विक्री बाजाराचा रस्ता बनलाय दलदलयुक्त, पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यानं दुर्गंधी आणि डासांचं साम्राज्य*

https://youtu.be/tsUkneLj1yQ

🔵 *लाडकी बहिण योजनेच्या माहितीसाठी आपटेनगर आणि नाना पाटील नगर इथं उभारलेले फलक अज्ञातांनी फाडले*

https://youtu.be/uOfMFPJZgV4

🔵 *महिलांनी अत्याचारांंचा सक्षमपणे मुकाबला करावा, लघु उद्योगाच्या माध्यमातून स्वावलंबी बनावं, यासाठी स्वामी रणरागिनी महिला मंचचा मेळावा संपन्न*

https://youtu.be/xX3nb1T7AYE

🔵 *लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठानच्यावतीन रविवारी होणार दुर्मिळ म्हाळुंग झाडाच्या रोपांचं वाटप*

https://youtu.be/P1OO7Kgquio

🔵 *मराठा महासंघातर्फे १५६ गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला सत्कार, सांगलीच्या अप्पर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख यांनी विद्यार्थ्यांना दिले भविष्यातील शैक्षणिक आव्हानांचे धडे*

https://youtu.be/vruShmMFCoQ

🔵 *कागल तालुक्यातील ३५ शाळांकडून यु डायस प्लस अ‍ॅपवर डिजिटल माहितीची नोंदणी नाही, त्या शाळांना गटशिक्षणाधिकारी नोटीस देणार*

https://youtu.be/t-X9AwgqQJs

🔵 *अवनि संस्थेनं जैताळ फाटयावर उभारलेल्या हॉटेलचा ज्येष्ठ अभिनेेत्री शबाना आझमी यांच्या हस्ते २१ जुलैला होणार शुभारंभ*

https://youtu.be/0xY7MnqOkJY

🔵 *कोल्हापूर मिलेनियल्स इनर व्हील क्लबच्या नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न*

https://youtu.be/V2sSdQpyWIg

🔵 *गुरूपौणिमेचं औचित्य साधून कोल्हापुरातील रूद्रांश अ‍ॅकॅडमीच्यावतीनं सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कारांचं होणार वितरण*

https://youtu.be/k5d5re-vcBc

🔵 *सोनार एकता फौंडेशनच्यावतीनं २० जुलैला भव्य मेळाव्याचं आयोजन, मेळाव्यादरम्यान होणार आर्टीसन कार्ड नोंदणी*

https://youtu.be/s6hwrDT5TzE

🔵 *वडिलांच्या उत्तरकार्यावेळी सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करून व्हाईट आर्मीचे प्रमुख अशोक रोकडे यांनी जपली सामाजिक बांधिलकी*

https://youtu.be/_vQZBtSvakA

*अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच 'बी न्यूज' चे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.*
*नोटिफिकेशनसाठी 🔔 आयकॉनवर क्लिक करा.*

विशाळगड अतिक्रमणमुक्त मोहिमेला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती, शासन आणि प्रशासनाला न्यायालयानं सुनावले खडेबो.....

19/07/2024

आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. १९-०७-२०२४

18/07/2024

*बी न्यूज बातमीपत्र दि. १८-०७-२०२४*
✨✨✨✨✨✨✨✨✨✨

🔵 *आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. १८-०७-२०२४*

https://youtu.be/FXwjc5if_1Q

🔵 *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गजापूर आणि विशाळगडाची पाहणी, व्यावसायिक अतिक्रमणं काढली जातील, पण कोणत्याही घराला हात लावला जाणार नाही, पवार यांचा निर्वाळा*

https://youtu.be/xbcnJydUuXQ

🔵 *राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काँग्रेसकडून खासदार श्रीमंत शाहू महाराज यांची ढाल केली जात असल्याचा खासदार धैर्यशील माने यांचा दावा*

https://youtu.be/PSaI73z8H2Q

🔵 *कोल्हापूर जिल्हयात पावसाचा जोर वाढला, पंचगंगेची पाणी पातळी साडेपंचवीस फुटावर, जिल्हयातील ४९ बंधारे पाण्याखाली, पुढील दोन दिवस मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज*

https://youtu.be/rq6tfdzrbcU

🔵 *भारतीय शेअर बाजाराचा आणखी एक उच्चांक, ६२७ अंकांनी वाढून सेन्सेक्स ८१ हजार ३४३ वर, तर निफ्टी १८७ अंकांची वाढ घेवून २४ हजार ८०० वर*

https://youtu.be/R6Cuk9m1ApQ

🔵 *लाडक्या बहिणीपाठोपाठ आता लाडक्या भावासाठी राज्याच्या तिजोरीचा दरवाजा उघडला, बेरोजगार तरूणांना मिळणार दरमहा ६ ते १० हजार रूपये भत्ता*

https://youtu.be/VPLRXeBTuZE

🔵 *माजी खासदार इम्तियाज जलील कोल्हापुरात येऊन शांतता बिघडवणार असतील तर शुक्रवारी कोल्हापूर बंद ठेवून जशास तसे उत्तर देण्याचा सकल हिंदू समाजाचा इशारा*

https://youtu.be/0ZJ87X34Xv8

🔵 *कुणी कितीही प्रयत्न केले तरी कोल्हापुरातील शांतता आणि सामाजिक सलोखा बिघडू देणार नाही, शिव-शाहू सद्भावना यात्रेतून घडलं धार्मिक आणि सामाजिक सलोख्याचं दर्शन*

https://youtu.be/E6IeuXqa2Uk

🔵 *कोल्हापुरातील कळंबा फिल्टर हाऊस जवळच्या बालाजी पार्कमध्ये भागीरथी संस्थेच्यावतीनं झालं मोफत मसाले प्रशिक्षण शिबिर, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

https://youtu.be/IwQbRHMuxr8

🔵 *काश्मिर मध्ये दहशतवादी हल्ल्यात सैनिकांचा बळी जात असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेची कोल्हापुरातील छत्रपती ताराराणी चौकात निदर्शनं*

https://youtu.be/DHTVo-fP3SM

🔵 *कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा भाजपकडं येईल, खासदार धनंजय महाडिक यांचे संकेत*

https://youtu.be/UnpA9FuJQBA

🔵 *कमिशनमध्ये लोळणार्‍या आमदारांनी चिखलफेक करु नये, माजी आम. के. पी. पाटील यांचा आमदार प्रकाश आबिटकरांवर पलटवार*

https://youtu.be/3emFyiiTQ0U

🔵 *माजी खासदार संभाजी राजे यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणार्‍या तरुणाला कळे येथून घेतलं ताब्यात*

https://youtu.be/mbWdl9WoS20

🔵 *बेंदूर सणासाठी कुंभार बांधवांनी बनवलेल्या मातीच्या बैलजोड्यांनी भुदरगड तालुयातील कुंभारवाडे सजले, अजुनही परंपरेचं जतन*

https://youtu.be/2qEH5jkFDsI

🔵 *घरफोडी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यात इचलकरंजी पोलिसांच्या रेकॉर्डवरील तिघाजणांना अटक, सव्वादोन लाखाचा मुद्देमाल जप्त*

https://youtu.be/GyDqJgUH6Qw

🔵 *बिद्री कारखान्याच्या डिस्टिलरीचा परवाना रद्द करणं म्हणजे राज्य शासनाकडून राजकीय विद्वेषातून कोंडी करण्याचा प्रयत्न, शिवाजीराव परुळेकर यांचा आरोप*

https://youtu.be/_A6tENkMX24

🔵 *एस.टी. बसनं कंटेनरला पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात, बसमधील दोन प्रवासी जखमी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कणेरीवाडीजवळ झाला अपघात*

https://youtu.be/u_e1VRzXZ5E

🔵 *जाती धर्मातील वाद आणि संघर्ष देशाच्या एकात्मतेला बाधा आणणारा ठरेल, संविधानाच्या चौकटीतच देशाचं अस्तित्व टिकून राहील, अ‍ॅड. असिम सरोदे*

https://youtu.be/I_gyKNYKm58

🔵 *महिलांना रिक्षा परवाना देण्याच्या शासनाच्या योजनेचं अखिल भारतीय हिंदू महासभेकडून स्वागत*

https://youtu.be/2j1cdZ-5Gi8

*अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच 'बी न्यूज' चे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.*
*नोटिफिकेशनसाठी 🔔 आयकॉनवर क्लिक करा.*

18/07/2024

आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. १८-०७-२०२४

*बी न्यूज बातमीपत्र दि. १७-०७-२०२४* ✨✨✨✨✨✨✨✨✨✨🔵 *आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. १७-०७-२०२४*https://youtu.be/zqacGCBNO1Q🔵 ...
17/07/2024

*बी न्यूज बातमीपत्र दि. १७-०७-२०२४*
✨✨✨✨✨✨✨✨✨✨

🔵 *आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. १७-०७-२०२४*

https://youtu.be/zqacGCBNO1Q

🔵 *प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या नंदवाळमध्ये भक्तीरसाचा महापूर, आषाढी एकादशीनिमित्त सुमारे ५ लाख भाविकांच्या उपस्थितीत झाली नंदवाळची यात्रा*

https://youtu.be/iN5DD2MK2vE

🔵 *राज्यात चांगला पाऊस होवू दे, बळीराजा सुखी होवू दे ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पंढरपुरात श्री विठूरायाच्या चरणी साकडं*

https://youtu.be/H9rkB7vl3go

🔵 *आमदार सतेज पाटील यांची गजापूर गावाला भेट म्हणजे पुतना मावशीचं प्रेम, खासदार धनंजय महाडिक यांचा टोला, ते पालकमंत्री असताना विशाळगड अतिक्रमणमुक्त का झाला नाही,
महाडिक यांचा सवाल*

https://youtu.be/MN3sB7lot_k

🔵 *विशाळगडावर दहशतवादी यासीन भटकळ वास्तव्याला असल्याबाबतची खात्री पोलिसांनी करुन घ्यावी, नामदार हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया*

https://youtu.be/KKDVNkNYtas

🔵 *दिवसभर पावसाची विश्रांती, पंचगंगेची पाणी पातळी झपाटयानं कमी होवून आली साडेबावीस फुटावर, राधानगरी धरणातून १४०० क्युसेक पाणी विसर्ग सुरू, जिल्हयातील २५ बंधारे
पाण्याखाली*

https://youtu.be/j2CKWoDRcqM

🔵 *एमआयएम नेते इम्तियाज जलील यांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही, सकल हिंदू समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांचा इशारा*

https://youtu.be/xbPRskAsz0Q

🔵 *डांबावरून तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागून चार म्हैशींचा मृत्यू, कळंबा मधील पॉवर ग्रीड परिसरातील दुर्घटना*

https://youtu.be/08XFEnhKIhc

🔵 *विशाळगडावर गेलेल्या हिंदू कार्यकर्त्यांवर मुस्लीम जमावानं हल्ला केल्यानंतर गजापूरात प्रतिक्रिया उमटली, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची सकल हिंदु समाजाची जिल्हा
प्रशासनाकडं मागणी*

https://youtu.be/FT-3bflURL4

🔵 *राजेंद्रनगरजवळच्या शिवाजी विद्यापीठाच्या जागेत मद्यपी आणि अंमली पदार्थ सेवन करणार्‍यांचा वावर, परिसरातील नागरिकांमध्ये दहशत*

https://youtu.be/GDNtQHc_SM8

🔵 *आषाढी एकादशीनिमित्त कोल्हापूर शहरातील ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरात भाविकांची अलोट गर्दी, विविध संस्था-संघटनांकडून झालं फराळ वाटप*

https://youtu.be/tdC5k1H-_3s

🔵 *रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन आणि रोटरॅट लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन फिनिसच्या सदस्यांची नंदवाळपर्यंत रोटरी वारी*

https://youtu.be/glC5O-jALOE

🔵 *कोल्हापूर शहरातील मानाच्या पंजांच्या निघाल्या मिरवणूका, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत वाद्यांच्या गजरात रंगला पंजे भेटीचा आणि खाई फोडण्याचा कार्यक्रम*

https://youtu.be/cxTveCLQQQE

🔵 *इचलकरंजीत विविध कार्यक्रमांनी आषाढी एकादशी उत्साहात साजरी*

https://youtu.be/pwkoXgRHeOo

🔵 *आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपसह गद्दारांना धडा शिकवण्यासाठी सज्ज रहा, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांचं कार्यकर्त्यांना आवाहन*

https://youtu.be/kUDUBFmx_-E

🔵 *जाहीर माफी मागेपर्यंत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना इचलकरंजीत प्रवेश करू देणार नाही, मनसेचा इशारा*

https://youtu.be/CxIpy_txN8I

🔵 *शेतकर्‍यांचं साडेसात एचपी पर्यंतचं वीज बिल माफ होणार, मागेल त्याला सौर पंप आणि शेतीला दिवसा आठ तास वीज देणार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती*

https://youtu.be/AkZQNPyTbNw

🔵 *नीट परीक्षेच्या पेपरफुटी विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन*

https://youtu.be/dYe4BV50nH8

🔵 *कोल्हापूर महापालिकेच्या नेहरुनगर शाळेतील विद्यार्थ्यांचं शिष्यवृत्ती परीक्षेत यश, यशस्वी विद्यार्थ्यांची निघाली जल्लोषी रॅली*

https://youtu.be/84d7dNdPHvA

*अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच 'बी न्यूज' चे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.*
*नोटिफिकेशनसाठी 🔔 आयकॉनवर क्लिक करा.*

कोल्हापूर महापालिकेच्या नेहरुनगर शाळेतील विद्यार्थ्यांचं शिष्यवृत्ती परीक्षेत यश, यशस्वी विद्यार्थ्यांची नि....

Address

Office/3rd Floor, Kailash Towers, Assembly Road
Kolhapur
416001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when B News Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to B News Kolhapur:

Videos

Share

Category

Nearby media companies


Other TV Channels in Kolhapur

Show All

You may also like