02/07/2023
बाईपण भारी देवा (बायकांनी बायकांसाठी केलेला कल्ला)
वरच्या ओळीचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर "बाईपण भारी देवा" बघा... खरतर या एका ओळीवरच या सिनेमाचा रिव्ह्यू संपवू शकतो... इतका भारी आहे हा सिनेमा... बोलण्याच्या ओघात काही स्पॉइलेर वगैरे निघतील कि काय अशी भीती वाटते... कारण या सिनेमाचे कौतुक असेच दिलखुलास व्हायला हवे... पण वरची ओळ नक्की कुणासाठी आहे हे तुम्हाला सिनेमा संपल्यावर संभ्रमात टाकणारी असेल... म्हणजे सिनेमातील बायकांनी प्रेक्षक बायकांसाठी सिनेमात केलेला कल्ला मोठा आहे कि थेटरमधल्या बायकांनी शिट्ट्या टाळ्या वाजवून सिनेमातील बायकांच्या कामाची पोचपावती म्हणून केलेला कल्ला मोठा आहे हेच कळणार नाही... म्हणून तर म्हणतो कि हा टिपिकल बायकांचा सिनेमा आहे (बायकी सिनेमा नाही)... आणि बायकांची काळजी वाटणाऱ्या आणि त्यांचे दुःख समजणाऱ्या पुरुषांचा सिनेमा आहे... पुरुषी अहंकार आणि उगाचचा मॅनरिजम बाळगणाऱ्या पुरुषांसाठी हा सिनेमा नाही... आणि चुकून पण त्या वाट्याला जाऊ नका...
आता तुम्ही म्हणाल हा सिनेमा झिम्माची आठवण करून देतो... तर हो तुम्हाला झिम्मा आवडला असेल तर मग त्यामुळेच हा सिनेमा तुम्हाला अजून आवडेल... पण जर तुम्हाला झिम्मा आवडला नसेल तर हा सिनेमा तुम्हाला काहीतरी वेगळाच आहे म्हणून देखील आवडेल... कारण हा सिनेमा झिम्माला डोळ्यासमोर ठेवून किंवा त्याला स्पर्धा म्हणून बनवला नाही गेलाय... तर हा सिनेमाचं वेगळाय... हा परफेक्ट स्त्रीप्रधान सिनेमा आहे... आणि चित्रपटाची बुकिंग आणि थेटर्स मधला कल्ला बघता मराठी चित्रपटसृष्टीत महिला प्रधान चित्रपटांना काय value आहे कळून येते... माहेरची साडी हा जर milestone असेल तर हा सिनेमा पण त्यारेषेत बसायचे पोटेन्शियल ठेवतो... हा कदाचित माहेरची साडीचे रेकॉर्डस् वगैरे किंवा लीगसी तोडणे शक्य नाही पण मराठी प्रेक्षक स्त्रीप्रधान सिनेमांना का डोक्यावर घेतात याचे उत्तर हा सिनेमा आहे...
खरतर हा सिनेमा मी देखील एक सामान्य प्रेक्षक या नात्याने बघायला गेलो.. का प्रेक्षकांनी याला झिम्मासोबत कम्पेअर करू नये या विचारात बघत होतो... आणि खरं सांगू तर इंटरव्हल पर्यंत माझ्या लेखी झिम्माचे पारडे जड होते... आणि आपल्या सिनेमांची एक गोची पुन्हा इथे बघायला मिळाली... आपल्याला peak ला जाऊन इंटरव्हल करताच येत नाही... इथे हि तेच घडले सिनेमा अगदी काही सेकंड आधी इंटरव्हल घेतो...त्यामुळे निराशा झाली, जो खरतर अवघ्या 5 सेकंदनंतर घेतला असता तर छान बसला असता...कारण तशी वातावरण निर्मिती केली होती सिनेमात... इंटरव्हलमध्ये चर्चा होत असताना... आणि झिम्माकडे आमचे झुकते माप असताना देखील चित्रपटातील ६ रत्न आणि केदार शिंदे यांच्यावरचा विश्वास काहीतरी जादू करेल वाटत होते... आणि इंटरव्हल संपला.. मग जो सिनेमा सुरु झाला तो वेगळाच होता... तो स्पीड, ते one liner, तो अभिनय, ते give and take आणि महत्वाचे म्हणजे लेखन... सेकंड हाफ मध्ये हा वेगळाच सिनेमा आहे कि काय असे वाटू लागले... आणि इंटरव्हल नंतरच्या अवघ्या ५व्या मिनिटांपासून थेटर दणदणू लागले... शिट्ट्या, टाळ्या, लाफ्टर मध्ये न्हाऊन निघाले... अगदी शेवटच्या "बाईपण भारी देवा" गाण्यापर्यंत थेटरमध्ये फक्त कल्ला, कल्ला आणि कल्ला सुरु होता... आणि तेव्हा कळलं कि "बॉस, इंटरव्हलच्या आधी तर फक्त वात पेटत होती... खरे फटाके तर इंटरव्हल नंतर फुटायला सुरवात झाली... फटाके म्हणजे फक्त ऍटम बॉम्ब आणि रॉकेट होते... नुसता धुमधडाका...
अभिनयाबद्दल काय बोलणार आपण ते पण वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी यांच्या सारख्या शिरोमणी असताना... पण ६ बहिणी ऐवजी सात बहिणी असत्या तर मला अजून आवडले असते कारण या पूर्ण टीम मध्ये म्हणजे वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, सुकन्या कुलकर्णी-मोने आणि दीपा परब-चौधरी यांच्या सोबत भारती आचरेकर हव्या होत्या.... न जाणे का पण समस्त चित्रपटभर मला हे वारंवार जाणवत होते... असे वाटत होते कि त्यांचा एक तरी कॅमिओ हवा होता... म्हणजे चित्रपटात प्रत्येक जणी स्वतःला एक टॅग लावतात "गॉसिप गर्ल" वगैरे वगैरे पण त्यात "गोंडस गर्ल" टॅग लावलेल्या भारती ताईपण हव्या होत्या असे वाटत होते....
लिखाण - आता वर अभिनयाबद्दल बोललो नाही पूर्णपणे कारण लिखाण आणि अभिनय दोन्ही मुद्दे पहिल्यांदा एकमेकांना पूरक वाटले या सिनेमात... सिन उत्तम लिहिलाय कि तो उत्तम अभिनित केलाय याची जुगलबंदी आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते... आणि मुख्य म्हणजे कोणीच कोणाला उगाच overlap करण्याचा प्रयत्न नाही केलाय... एखादी batting करतेय तर आपण non strike ला उभं राहून फक्त त्याला साथ द्यायची नाही तर त्याची batting enjoy पण करायची ही प्रत्येकीची भूमिका मला खूप आवडली... वंदना ताई मला प्रत्येक सिनेमात कायम मला वंदना ताईच वाटत आल्यात... आणि सलमान खान नंतर असे कोणी तरी मला आवडते जे पात्रात घुसत नाहीत तर पात्राला स्वतःचा रंग चढवतात... त्यामुळे मी वंदना ताईंचे काय पात्र आहे यापेक्षा मला वंदना ताईच या चित्रपटात बघायला खूप आवडल्या... रोहिणी ताई का लेजेंड आहेत हे कळून येते... पण शॉकिंग होते ती म्हणजे सुकन्या ताई... I was never accept that अरे यार त्यांचे one liner म्हणजे एखाद्या ५ वर्षाच्या मुलीने आपल्या समोर भन्नाट विनोद साजरा केल्यावर आपल्या तोंडातून "awww so cute" हेच बाहेर पडणार तसेच इथे सुकन्या ताई बद्दल वाटायचे... सुचित्रा ताई आणि शिल्पा ताई यांचे एकत्रित सिन कहर आहेत पण मग या सर्वांवर मानाचा बिंदू देण्याचे काम करते 90's kids millennial crush दीपा ताई (हो आता ताईच) अरे यार तिचा तो बर्थडे party वाला सिन म्हणजे काय सांगू.... speechless... बाकी सोबत रुचिता जाधव, सुरुची आडारकर, तुषार दळवी, वरद चव्हाण, पियुष रानडे, स्वप्नील राजशेखर आणि शरद पोंक्षे यांची साथ कमाल...
आणि यामुळे शेवटी एक गोष्ट सुखावून जाते कि "Last King Of Marathi Movie of Single screen theatres are BACK with Bang" THE केदार शिंदे परत आलेत... थेटरमध्ये शेवटी उभे राहून नाचत नाचत.. टाळ्या वाजवत.. "बाईपण भारी देवा.." गाणाऱ्या प्रेक्षकांना बघून काळ २० वर्ष मागे गेला आणि डोंबिवलीच्या single screen पूजा थेटर मध्ये "अगं बाई अरेच्चा" ला प्रेक्षकांना असा कल्ला करताना शेवटचे पाहिले होते.... तेव्हाही बाई आणि आत्ताही बाई, तेव्हाही केदार शिंदे आणि आत्ताही केदार शिंदेच....
जवळपास आठवड्याभराचे शो ऍडव्हान्स मध्ये housefull झालेत... आठवड्याभरात शोची संख्या ५००० वरून ७००० वर जातेय... हे बऱ्याच दिवसांपासून मराठी चित्रपटांच्या नशिबी नव्हते आले... हे चित्र बघून आज उर भरून येतोय... समोर दोन मराठी connection असलेल्या (SPY चित्रपट निर्मात्या संगीत आहेर आणि सत्यप्रेम कि कथा दिग्दर्शक समीर विध्वंस) फिल्म चालत असताना पण हे चित्र खूपच सुखकर आहे... त्यामुळे खरंच असं वाटतंय कि या ६ जणी लक्ष्मीच्या पावलांनी मराठी बॉक्स ऑफिस वर चालून आल्यात...
एक टीप नक्की देतो - हा खरंच पुरुषी अहंकार असलेल्यांनी बघायचा चित्रपट नाहीये... मला माहिती आहे.. बायकांची कित्येक दुखणी पुरुषांना कळणार नाहीत..म्हणजे मासिक पाळीची सुरवात ते मुल जन्माला घालण्यापर्यंत ते अगदी वयस्कर होऊन पाळी जाण्यापर्यंतचे दुःख नाही जाणवणार पुरुषांना पण काही पुरुषांना ते दुःख जाणवत नसले तरी कळतं कमीत कमी... तर ज्यांना अशी दुःखं कळतात त्या सर्व पुरुषांसाठी हा सिनेमा आहे... त्यामुळे "पिच्चर लयच बायकी बनवलाय" असे ज्यांना वाटते त्यांनी सिनेमा बघू नकाच... हा सिनेमा तुमच्यासाठी नाही आणि तुम्ही या सिनेमासाठी नाही आहात...
इति - फिल्मीराजे
#बाईपणभारीदेवा
Kedar Shinde
Vandana Gupte
Rohini Hattangadi
SHILPA NAVALKAR
Sukanya Mone
Ruchita Jadhav
Suruchi Adarkar
Sharad Ponkshe
Varad Vijay Chawan
Piyush Ranade
Swapnil Rajshekhar