Weekly Bhimyan

Weekly Bhimyan Increase the Media of the Ambedkarite Movement, become a member of the Weekly Bhimyan ..! However, we will get your valuable support, Jay Bhim ..!

04/05/2024

बोंबं मारण्याची प्रथा...
गेल्या 6 वर्षापासून चालत असलेली बोंब मारण्याची प्रथा अजून ही संपलेली नाहीय. जो तो उठसूठ बोंब मरतोय. तो परका असो वा घरचा. शेजारी असो व पाजारी.
कुणाला नेतृत्व करायला मिळत नाही म्हणून, तर कुणाला मतं मिळत नाहीत म्हणून. पण सगळ्यांचा गुणधर्म सारखाच. काहींची तर सगळ्यात मोठी गोची झालीय ती म्हणजे आम्ही एवढं शिक्षण घेतलं तरी सुद्धा समाज आम्हाला साधं रस्त्यावरून जाताना ढुंकून देखील बघत नाही. आता करायची तरी काय? म्हणून जिथे कोणी ऐकत नाही त्यांचं सोशल मीडिया तरी ऐकतो. म्हणून चालू झालय बोंब ठोकायच.
स्वतःमध्ये नेतृत्व गुण नाही हे झाकण्याच सर्वात मोठं शस्त्र म्हणजे दुसऱ्याच्या नावाने बोंब मारणे. जी काल ही मारली आणि आज ही. असो ! कुणाच्या बापाच्यात इतकी हिम्मत होती की ज्यान सगळ्या राष्ट्रीय, प्रादेशिक पक्षासमोर दलीत नेतृत्वाचा पक्ष उभा केला आणि त्यांना स्वतःच अस्तित्वच धोक्यात आलंय अशी शंका मनात येवू लागली. आहे का असा कोणी माईचा लाल! माझ्या तरी ऐकण्यात नव्हता.
पण जे ह्यांच्या बापाला जमलं नाही ते बाळासाहेबांनी करून दाखवलं, ही तर मोठी पोट दुःखी आहे ह्यांची. यानिमित्त एवढंच सांगायचंय की, जेवढी तळमळ वंचितचा विरोध करण्याची आहे तेवढीच तळमळ गेल्या 60 वर्षात जे घडलं नाही ते आत्ताच कसं घडलं? पंजावाल्यांनी एका विशिष्ट समूहाला लांड्या म्हणणाऱ्या चिवसेनेशी संसार कसा थाटला? हे विचारण्याची धमक आजपर्यंत यांच्याकडून झाल्याची कुठे दिसत नाही. अरे बोकडानो आता तरी सुधारा...
स्वतःला खूप मोठे विचारवंत समजताय आणि सगळ्या राजकीय परिस्थितीवर आपली बुद्धी पाजळवताय आणि निष्कर्ष एकच दोषी वंचित. ही शेंडी ची वृत्ती की तुमच्या मानसिक गुलामीची. ठोका कितीही बोंब आजचा इतिहास जेंव्हा उद्या लिहिला जाईल, त्यावेळी नक्कीच तुमच्याकडून जाणून बुजून चालवलेल्या वैचारिक दिवाळखोरीचा लेखाजोखा मांडला जाईल. तेंव्हाही निष्कर्ष हाच निघेल की, तेंव्हाही आंबेडकरांना शिकलेल्या समाजाने धोका दिला आणि आजही.

28/04/2024

नमस्कार मंडळी,
कसं काय चाललंय ! काय करताय या निवडणुकीच्या बुचकुळ्यात. बुचकुळा यासाठी म्हणलं की कोण कुणाच्या बाजूनं हाय काय कळंना म्हणून म्हणलं. बाकी मतदानाबद्दल आपला काय बी विषय न्हाय. मतदान केलच पाहिजे त्यात काय शंका न्हाय, पण करायचं कुणाला ह्योच मोठा विषय हाय.
एकटा म्हणतोय माझा बाण चोरला दुसरा म्हणतोय माझी वेळ संपवली. हे दोन्ही बी ज्या बहाद्दराणं केलं त्यो म्हणतोय आम्ही काय बी न्हाय केलं जे झालं ते त्यांच्या कर्मानं झालं.
पाच वर्ष हे सगळं सुरू हाय ते कशाबद्दल हाय? ह्योच तर मोठा विषय हाय. आलटून पालटून सत्ता भोगल्यावर, चड्डीवाल्यांनी पक्ष फोडल्यावर मग साक्षात्कार होतुय संविधान धोक्यात हाय. आमचा लढा संविधान वाचवण्याचा हाय. नाहीतर या देशात हुकूमशाही येणार हाय.
एवढं सगळं रामायण घडल्यावर हे कशासाठी घडलय ह्यो प्रश्‍न तर पडणारच हाय.... मग काय जरासा डोक्याला ताण दिला आणि गेलो 2019 इतिहासात आणि बघतोय तर काय? तेल लावलेला पैलवान आपली तिरकी बुद्धी चालवत हाय आणि बाणाच्या आधी आपली येळ आल्या म्हणत फेकूच्या पार्टीला पाठिंबा देत हाय आणि म्हणतोय काय या राज्याला थिर सरकारची गरज हाय. म्हणून आमचा फेकूला पाठिंबा हाय. हळूच पहाटेचा शपथ विधी उरकून घेत हाय आणि दिवस अन् रात्र सगळ्या जनतेचं मनोरंजन करत हाय आणि लगेच पठ्ठ्या सांगतोय तरी काय.... आमच्या काही कार्यकर्त्यांचा गोड गैरसमज झालाय. त्यांना आता परत माघारी फजित घेऊन आलाय. हे सगळं बघून बाणाच्या छातीत आलेली कळ मुख्यमंत्री पद देऊन शांत करीत हाय. खुर्चीसाठी चाललेला डाव सगळ्या जगासमोर मांडत हाय. बाणानं आणि वेळेन केलेला डाव टरबूजाच्या जिव्हारी लागत हाय. हे सगळं बघून टरबूज दोन्ही पक्ष फोडत हाय. आणि खुर्चीसाठी चाललेला डाव त्याला धर्मयुद्ध म्हणत हाय. हे सगळं बघून पंजा पुढे येत हाय, फुटलेल्या पार्टीच्या मागे उभं राहत हाय. या चालू असलेल्या खुर्चीच्या तमाशाला संविधानाचा पांघरून घालत हाय.
जो पक्ष सत्तेत नाय, आमदार नाय, खासदार नाय, ज्यानं कधी चड्डीवाल्याला पाठिंबा तर सोडा साधी टाळी ही दिलेली न्हाय. त्याला मात्र त्याच्या बापानं दाखवलेल्या स्वाभिमानाच्या लढाईला, त्यानं कष्टानं उभा केलेल्या स्वत:च्या आंबेडकरी पक्षाला चड्डीवाल्यांची बी टीम म्हणत हाय.
अरे का रे तुम्ही आजुन, वंचितांना तुमचे सालगडी समजत हाय? आता सांगा ओ मंडळी तुम्हीच आतून-बाहेरून कोण कुणाला पाठिंबा देत हाय?
वंचीतांच्या पक्षाने स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवली की झाली बी टीम ? वा... वा... रे... वा....! वंचितांच्या भूमिकेचं युती आघाडीला इतकं कसलं प्रेशर. फक्त 6 वर्षात उभं केलेल्या चॅलेंजचं इतकं कसलं टेन्शन...!
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी केलेली हात मिळवणी, म्हणजे झाली का संविधान रक्षक टीम? हे कसं काय?....
महाभकास आघाडीला मतदान केल्यावर संविधान वाचतंय तर न्हवं... की ह्यांला मतदान केल्यावर परत फेकुला तर जात न्हाय न्हवं... हे विचारायचं कारण म्हणजे, या सगळ्या पक्षांनी अगोदर फेकुला पाठिंबा दिलाय. फक्त सत्तेच्या खुर्चीसाठीच एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसलाय...
तुम्ही किती बी करा रे शाळा, तुमचा अजेंडा इथं चालणार न्हाय. संविधान वाचवायला इथं आंबेडकर शिवाय कुणी नडणार न्हाय...
अरे तुम्ही चालवलेल्या धंद्यांवर... आता तुमची संपल्यारे शक्ती, तुम्ही आता चालवल्या रे भक्ती ! तुम्ही आत्ताच का रे आमची बाजू घेताय? मुस्लिम, दलीत अत्याचारावर तुम्ही एक शबुत नाही काढत. तेंव्हा कुणाचा अजेंडा तुम्ही राबवताय. बी टीम असल्यासारखं का रे सारखं वावरताय.
अरे थुक्तो तुमच्या असल्या पक्षांवर...
या देशाचा इतिहास हाय....
गुलामी विरुद्ध, हुकूमशाही विरुद्ध लढण्यासाठी
कालपण, आजपण आणि उद्यापण फक्त आंबेडकरच हाय...!
- अभिजित वाघवेकर (संपादक, साप्ताहिक भीमयान)

31/12/2023
10/05/2023
राजर्षि छ.शाहू महाराजांनी वसविलेल्या जयसिंगपूर नगरीमध्येविश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच राजर्षि छ.शाहू महाराज या दोन...
26/04/2023

राजर्षि छ.शाहू महाराजांनी वसविलेल्या
जयसिंगपूर नगरीमध्ये
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच
राजर्षि छ.शाहू महाराज या दोन महान महापुरूषांचा
अपमान करू पाहणार्‍या प्रशासनास तसेच
स्थानिक राजकीय सत्ताधार्‍यांना धडा शिकविण्यासाठी..
यायलाचं लागतयं...
बुधवार, दि.3 मे 2023 रोजी सकाळी 9 वाजता
क्रांती चौक, जयसिंगपूर.

13/12/2022

साप्ताहिक भीमयान संपादकीय... सोमवार, दि. ०४ एप्रिल २०२२
संरक्षक भिंत उभारल्याशिवाय या देशात टिकाव लागणे अवघड !
गेल्या काही वर्षामध्ये दिवसेंदिवस शोषित, पिडीत, वंचित, मुस्लिम समाजावर जातीय हल्ले वाढत चालले आहेत. त्याचप्रमाणात जात-धर्म आणि प्रादेशिकतेच्या मुद्यांवर चिथावणीखोर भाषण करणार्‍यांचेही चांगले दिवस आलेत. या देशातल्या जनतेला एकतर मनोरंजन तरी भावतंय किंवा भावना भडकविणारी भाषणं तरी आवडत आहेत. या चिथावणीखोर भाषणांच्या माध्यमातून हेतूपरस्पर धार्मिक व जातीय दंगली घडवण्याचा अजेंडा जरी राबवला जात असला तरी सॉफ्ट टार्गेट असलेला अनु.जाती-जमाती, अल्पसंख्यांक व मुस्लिम समुह मात्र याकडे दुर्लक्ष करून दिवसेंदिवस आपआपल्या अपुर्‍या व फाटक्या पांघरूनात निवांत झोपी जात आहे.
आपल्या माता-भगिनींवर बलात्कार करून अब्रुच्या चिंध्या केल्या जातात, ओठावरील मिश्यांना पिळ दिली म्हणून ठार मारले जाते, घोड्यावर बसून लग्नाची वरात काढली म्हणून बेदम मारहाण केली जाते. विहीरीमध्ये पोहल्यास, पाणी प्यायल्यास नग्न वस्त्र करून धिंड काढली जाते, मारहाण केली जाते, खून केला जातो. तर मुस्लिम समाजाच्या लहान मुलीवर मंदिरात नेऊन बलात्कार केला जातो, सार्वजनिक नळावर पाणी प्यायल्याने मुस्लिम तरूणास बेदम चोप दिला जातो. तरी हा समाज आंदोलन करणे, गांव बंद करणे या सारख्या शस्त्राच्या पुढे जाऊन काही विचारच करू शकत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सन १९२६-२७ च्या सुमारास समता सैनिक दलाची स्थापना महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने केली. त्यावेळी महाडच्या सत्याग्रहाचे कार्य निर्विघ्नपणे आणि यशस्वीरितीने पार पाडण्यासाठी अशा संघटित दलाची फारच आवश्यकता होती. स्थापन केलेल्या या समता सैनिक दलाची पूर्वपिठीका पाहता व एकंदर परिस्थितीचा विचार करता दलाची स्थापना भारतात जे अनेक धर्मीय समाज आहेत त्यात हिंदू समाजात अस्पृश्यांचा समावेश होत असल्यामुळे आणि या हिंदू समाजातील स्पृश्य लोकांकडून अस्पृश्य मानलेल्या समाज बांधवांवर होणार्‍या अन्याय, जोर - जुलूम, विषमतेची शिकवण व वागणूक वगैरे अनिष्ट आणि घातुक प्रकारांना आळा बसविण्याकरीता या समता सैनिक दलाची प्रामुख्याने स्थापना करण्यात आली. ज्या समाजात माणुसकीने जगता येत नाही, नैसर्गिक हक्कांचा जिथे समतेने उपभोग घेता येत नाही, ज्या धर्मावर विषमतेचा कीट चढला आहे तो धर्म झुगारून देऊन खरी माणूसकी जाणणारा धर्म निर्माण करण्यासाठी जे कार्य करावे लागेल त्या पवित्र आणि उज्वल कार्यासाठी या दलाची स्थापना करण्यात आली होती. या कार्याची मुहूर्तमेढ महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने करून सत्याग्रहाचा लढा विजयी केलेला होता. अशाच तर्‍हेने ज्या ज्या ठिकाणी सार्वत्रिक विहीरी, तळी, नळ आहेत तसेच मंदिरे सर्व स्थरातील जनतेला खुली करण्याकरीता असेच समान हक्काचे लढे लढवून आपले कार्य करावयाचे आहे हा मानस ठेऊनच या समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली होती.
बाबासाहेबांच्या हयातीत या समता सैनिक दलामध्ये स्वखुशीने, स्वखर्चाने व समाजाच्या रक्षणासाठी एक लढवय्या सैनिक म्हणून काम करण्याची इच्छा प्रत्येक तरूणामध्ये होती. मात्र सध्या सुरू असलेल्या या शोषित, पिडीत, वंचित, मुस्लिम समाजावर संपूर्ण भारतभर होत असलेल्या अन्यायाविरोधात समता सैनिक दलाच्या गावोगावी शाखा सुरू करणे गरजेचे बनले आहे. त्यातून मर्दानी खेळ, लाठी चालवणे, कराटेचे प्रशिक्षण घेणे या सारख्या स्वरक्षणासाठी उपयुक्त असलेल्या खेळांचे प्रशिक्षण देणारी शिबीरे भरवून वेळोवेळी होणार्‍या हल्याला परतवून लावण्याची ताकद निर्माण केली पाहिजे. या सर्व समूहास आपआपसातील पोकळ मतभेद विसरून वर्षानुवर्षे शोषित, पिडीत व धार्मिकतेसह जातीभेदाचा त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दा केंद्रस्थानी ठेऊन या उद्भवलेल्या नव्या मनुवादी व्यवस्थेत टिकण्यासाठी मुलभूत हक्कांसोबतच स्वरक्षणाचे धडे गिरवून मजबूत मानवी संरक्षक भिंत उभारल्याशिवाय देशात टिकाव लागणे अवघड होणार आहे.

12/12/2022

तिकडे राज ठाकरे सुद्धा एक पत्रक काढून म्हणतोय चंपा वर केलेला शाई हल्ला हा केवळ राजकीय स्टंट आहे आणि चंपा व हेंद्रे फडणवीस यांना विनंती केल्यावर पोलिसांचे निलंबन आणि कॅमेरामन वर झालेली कारवाई मागे घेतली गेली आहे. या वरून असे दिसते कि याची पांढरी कपडे काढली की १०० टक्के आतली खाकी हाफ चड्डी दिसेल. शंडांकडून दुसरी अपेक्षा तरी काय ठेवणार.

12/12/2022

आता पेटलेली मशाल विजू देऊ नका हाफ चड्डी वाल्यांची परंपराच आहे अंगावर आलं कि सारवा सारव करण्याची कारण एकाच दिवशी दोन माफीनामे येणे हा काही योग योग नाही. जो पर्यंत आपले भीमयोद्धे सुखरूप बाहेर येत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवले पाहिजे.

08/12/2022

गेले २५ वर्ष भाजप गुजरातचा विकास कसला करतय काही कळायला मार्ग नाही एवढा विकास करूनही गुजरात महाराष्ट्रापासून मागे कसा याचा शोध प्रबंध लवकरच भविष्यात मीडियाच्या अभ्यासक्रमात यईल हि अपेक्षा !
- साप्ताहिक भीमयान

Address

Jaysingpur
416101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Weekly Bhimyan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Weekly Bhimyan:

Videos

Share


Other News & Media Websites in Jaysingpur

Show All